Skip to main content

जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 07/10/2014 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप. हे "जिओ मिपा" पुढे चालू रहिलं तर 'जियो मिपा' म्हणुयात! मी केवळ सुरूवात करून देतो आहे, यात प्रत्येक मिपाकराने आणि मिपाकरणीने आपापल्या परीने भर घालावी ही अपेक्षा आणि विनंती! उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः Mipa1 युरोपातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः mipa2 अमेरिका आणि आफ्रिका खंडातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः Mipa3 मिपाकरांनी आपापले सद्य-स्थान या नकाशात आपल्या आय-डी सह दर्शवले की ते नकाशावर असे पोपटी रंगातल्या झेंड्यात दिसेलः Mipa4 या झेंड्यावर 'क्लिक' केले असता एक बॉक्स उघडेल ज्यात त्या मिपाकराच्या मिपावरील लेखनाचे दुवे असतीलः Mipa5 Mipa6 तुम्हाला तुमच्या भटकंतीच्या लेखाविषयी वाचकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रकाशचित्रांपैकी एखाद्या खास चित्राचा दुवा द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकाल; त्यासाठी 'website' अशी बॉक्स असेल त्यात आपल्या प्रकाशचित्राचा असा दुवा द्या: Mipa7 म्हणजे ते प्रकाशचित्र असं दिसेलः Mipa8 आता हे करणं अगदी सोपं आहे, त्यासाठीच्या सूचना पुढे देतो आहे:
  • सुरूवातीला आपल्याला हवा तो लेख निवडून त्याचं शीर्षक आणि मिपावरील दुवा हे जमा करून ठेवावेत. मग खालीलप्रमाणे नकाशावर जाऊन हे दुवे add करावेतः Mipa11 Mipa12
  • यातील Marker या pull-down box मध्ये झेंड्याचा योग्य रंग निवडा: म्हणजे मिपाकरांच्या स्थानासाठी green, मिपाकरांच्या कट्ट्यासाठी Teal तर मिपाकरांच्या भटकंतीसाठी Blue हे रंग निवडा.
वर लिहिल्याप्रमाणे मी केवळ सुरूवात करून देतो आहे. मला सहज सापडले असे कट्टे आणि भटकंतींचे लेख सध्या या नकाशावर समाविष्ट आहेत. वाचकांनी आणि मिपा लेखकांनी आपापल्या आणि इतरांच्या आवडलेल्या भटकंतींची आणि कट्ट्यांची इथे नोंद करावी. हा नकाशा open access असा आहे, त्यामुळे नोंदी करण्यासाठी सभासदत्व लागत नाही. कधी कधी दोन भटकंती एकाच गावी झाल्याने असे लेख एकाच झेंड्याने नकाशावर दाखवले जातील, उदाहरणार्थ 'किल्ले हरिहर' आणि 'हरिहर - एक ट्रेक कथा' हे दोन्ही लेख 'त्रिंबक' या एकाच झेंड्याखाली लपलेले असतील. Mipa9 अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः Mipa10 म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल. मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-) आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 58603
प्रतिक्रिया 164

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तसे मिपाकर रशिया आणि त्याआसपासच्या देशांप्रमाणे पुढील कोणत्याच देशात पोचले नसावेत हे पचवायला कठीण वाटतंय: चीन, जपान, फिलिपाईन्स, दक्षिण कोरिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, ब्रम्हदेश, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण अमेरिकेतले ब्राझील, चिले वगैरे सर्वच देश... बरेच मिपाकर अजून यायचे असणार नकाशावर. मिपाचे बल्लवाचार्य गणपाशेठ तरी कुठे आले आहेत नायजेरियातून?

In reply to by श्रीरंग_जोशी

मी तेथील कार्यकाल पूर्ण करुन जानेवारी १४ लाच भारतात परतलो सध्या अनेक व्यापात अडकल्यामुळे मिपावर नियमीत येणे होत नाही. रशियात फारशी मराठी माणसे नाहीत; पण २००७ ते २०१० दरम्यान कुआलालम्पूर, मलेशियामध्ये वास्तव्य केले आहे तेथे भरपूर मराठी मंडळी आहेत, महाराष्ट्र मंडळही त्यावेळेस होते ते नक्कीच मिपाकर असतील. बहुगुणी साहेब उत्तम धागा आहे. आवडला उद्या सवडीने मला स्वतःलाही टॅग करेन.

In reply to by विटेकर

व्ह्यू--सर्च केल्यावर 'नेम' मध्ये 'विटेकर' असं शोधून तुमचा झेंडा दिसत नाहीये नकाशावर. कुठल्या गावी लावलंय ते सांगता?

In reply to by विटेकर

व्ह्यू--सर्च केल्यावर 'नेम' मध्ये 'विटेकर' असं शोधून तुमचा झेंडा दिसत नाहीये नकाशावर. कुठल्या गावी लावलंय ते सांगता?

काही वाचकांनी व्य नि मध्ये 'झेंडे लावतांना चुकीचा रंग वा इतर चुका झाल्या तर त्या दुरूस्त कशा करता येतील' अशी विचारणा केली आहे. उजवीकडे वर Map Access म्हणून बटन आहे, ते मी सध्या 'लॉक' करून ठेवले आहे पासवर्ड टाकून, कुणी चुकून [किंवा चेष्टेत] दुसर्‍यांचे झेंडे 'एडिट / डिलीट' करू नये म्हणून. तेंव्हा ज्या सभासदांना काही बदल करायचे असतील त्यांनी मला इथे धाग्यात किंवा व्यनि ने कळवावे, म्हणजे मी ते बदल करीन. गेल्या पंधरवड्यात काही नवीन प्रवासवर्णने तसेच कट्टे-वृत्तांत आले आहेत. यांपैकी बरेच जियो मिपावर आलेले दिसत नाहीत, तेंव्हा त्या लेखकांना सहभागाची विनंती.आणि अर्थातच सर्वच मिपाकरांनी आपापल्या स्थानांचे झेंडे वर लेखात लिहिल्याप्रमाणे लावावेत असं आवाहन पुन्हा एकदा.

जवळपास राहणारे मिपाकर व विविध प्रदेशांची माहिती मिळविण्यासाठी फारच उपयोगी

In reply to by खटपट्या

वरती लिहिल्याप्रमाणे उजवीकडे वर Map Access म्हणून बटन आहे, ते मी सध्या 'लॉक' करून ठेवले आहे पासवर्ड टाकून, कुणी चुकून [किंवा चेष्टेत] दुसर्‍यांचे झेंडे 'एडिट / डिलीट' करू नये म्हणून. तेंव्हा ज्या सभासदांना काही बदल करायचे असतील त्यांनी मला इथे धाग्यात किंवा व्यनि ने कळवावे, म्हणजे मी ते बदल करीन. धन्यवाद!