✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!

ब
बहुगुणी यांनी
Tue, 10/07/2014 - 01:20  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी! बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप. हे "जिओ मिपा" पुढे चालू रहिलं तर 'जियो मिपा' म्हणुयात! मी केवळ सुरूवात करून देतो आहे, यात प्रत्येक मिपाकराने आणि मिपाकरणीने आपापल्या परीने भर घालावी ही अपेक्षा आणि विनंती! उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः Mipa1 युरोपातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः mipa2 अमेरिका आणि आफ्रिका खंडातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः Mipa3 मिपाकरांनी आपापले सद्य-स्थान या नकाशात आपल्या आय-डी सह दर्शवले की ते नकाशावर असे पोपटी रंगातल्या झेंड्यात दिसेलः Mipa4 या झेंड्यावर 'क्लिक' केले असता एक बॉक्स उघडेल ज्यात त्या मिपाकराच्या मिपावरील लेखनाचे दुवे असतीलः Mipa5 Mipa6 तुम्हाला तुमच्या भटकंतीच्या लेखाविषयी वाचकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रकाशचित्रांपैकी एखाद्या खास चित्राचा दुवा द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकाल; त्यासाठी 'website' अशी बॉक्स असेल त्यात आपल्या प्रकाशचित्राचा असा दुवा द्या: Mipa7 म्हणजे ते प्रकाशचित्र असं दिसेलः Mipa8 आता हे करणं अगदी सोपं आहे, त्यासाठीच्या सूचना पुढे देतो आहे:
  • सुरूवातीला आपल्याला हवा तो लेख निवडून त्याचं शीर्षक आणि मिपावरील दुवा हे जमा करून ठेवावेत. मग खालीलप्रमाणे नकाशावर जाऊन हे दुवे add करावेतः Mipa11 Mipa12
  • यातील Marker या pull-down box मध्ये झेंड्याचा योग्य रंग निवडा: म्हणजे मिपाकरांच्या स्थानासाठी green, मिपाकरांच्या कट्ट्यासाठी Teal तर मिपाकरांच्या भटकंतीसाठी Blue हे रंग निवडा.
वर लिहिल्याप्रमाणे मी केवळ सुरूवात करून देतो आहे. मला सहज सापडले असे कट्टे आणि भटकंतींचे लेख सध्या या नकाशावर समाविष्ट आहेत. वाचकांनी आणि मिपा लेखकांनी आपापल्या आणि इतरांच्या आवडलेल्या भटकंतींची आणि कट्ट्यांची इथे नोंद करावी. हा नकाशा open access असा आहे, त्यामुळे नोंदी करण्यासाठी सभासदत्व लागत नाही. कधी कधी दोन भटकंती एकाच गावी झाल्याने असे लेख एकाच झेंड्याने नकाशावर दाखवले जातील, उदाहरणार्थ 'किल्ले हरिहर' आणि 'हरिहर - एक ट्रेक कथा' हे दोन्ही लेख 'त्रिंबक' या एकाच झेंड्याखाली लपलेले असतील. Mipa9 अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः Mipa10 म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल. मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-) आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
58162 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

मस्त उपक्रम!!

किलमाऊस्की
गुरुवार, 10/09/2014 - 06:38 नवीन
माझ्या नावाचा झेंडा रोवलाय. वॉशिंग्टनात अजून कुणी दिसत नाहिये.
  • Log in or register to post comments

अनन्त अवधुत

बहुगुणी
Wed, 10/15/2014 - 01:12 नवीन
अनन्त अवधुत यांनी तुमच्या आसपास झेंडा रोवलाय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किलमाऊस्की

धन्यवाद!

बहुगुणी
गुरुवार, 10/09/2014 - 09:16 नवीन
या निमित्ताने तुमच्या 'मोनार्क' लेखमालेत (पुन्हा) डोकावून आलो, आणि तुमच्या पैसाताईंना बरोबर वर्षापूर्वी दिलेल्या वचनाची आठवण करून द्यावीशी वाटली! पुढची मालिका पुढच्या वर्षी.... आता संपत आलं वर्ष, वचनपूर्ती करा! (आणि सिअ‍ॅटलला किंवा जवळपास आहे कुणीतरी मिपाकर, करतील झेंडालावणी लवकरच अशी आशा ठेवायला हरकत नाही, तसं अजून पिडा, नंदन, नाटक्या, वगैरे दिग्गजही यायचे बाकी आहेत पश्चिम किनार्‍यावरून.)
  • Log in or register to post comments

:-)

किलमाऊस्की
गुरुवार, 10/09/2014 - 22:10 नवीन
नक्कीच, सध्या वैयक्तिक कारणांमुळे वेळ मिळत नाही आहे नविन काही लिहायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

झेंडा लावला आहे

अनन्त अवधुत
गुरुवार, 10/09/2014 - 23:21 नवीन
झेंडा लावला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

जिओचा गजर आत्मुनामाचा झेंडा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/09/2014 - 11:00 नवीन
जिओचा गजर आत्मुनामाचा झेंडा रोविला! Image removed.
  • Log in or register to post comments

LA मध्ये अवघे २ मिपा कर?

नेत्रेश
Fri, 10/10/2014 - 05:38 नवीन
एवढ्या मोठ्या Los Angeles मध्ये अवघे २ मिपाकर? असो,कधी तरी निशदे ना भेटायचा योग येईल.
  • Log in or register to post comments

अहो, आद्य मिपाकरांपैकी काही दिग्गज तिथे आहेत

बहुगुणी
Fri, 10/10/2014 - 07:51 नवीन
हे कट्टा-वर्णन वाचा, घाटावरचे भट, भाग्यश्री आणि पिवळा डांबिस हे तिघे अद्यापही आसपासच आहेत असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

६ वर्ष जुने आहे ते

नेत्रेश
Fri, 10/10/2014 - 09:55 नवीन
६ वर्ष जुने आहे ते कट्टा वर्णन. आमेरीकेत लोकस ईतकी वर्षे एका जागी क्वचितच थांबतात घाटावरचे भट, भाग्यश्री आणि पिवळा डांबिस यांनी झेंडे गाडले की त्यांची ठीकाणे समजतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

नस्ती उठाठेव!

पिवळा डांबिस
Sun, 10/12/2014 - 10:55 नवीन
आमच्या झेंडे गाडण्याची उठाठेव तुम्ही करायची गरज नाही. आम्ही इथे झेंडे गाडले काय, न गाडले काय, जे महत्वपूर्ण (मराठीतः सिग्निफिकन्ट) मिपाकर आहेत त्यांना आम्ही कुठे आहोत ते नक्की ठाऊक आहे... तेंव्हा फक्त तुम्ही तुमचे काय ते झेंडे गाडा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

वा! याला म्हणतात मराठी बाणा !!

नेत्रेश
Sun, 10/12/2014 - 11:20 नवीन
वा! याला म्हणतात मराठी बाणा !! मराठा तीतुका लोळवावा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

व्हॉटेव्हर!!!

पिवळा डांबिस
Sun, 10/12/2014 - 11:31 नवीन
व्हॉटेव्हर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

नेत्रेश

बहुगुणी
Sun, 10/12/2014 - 18:29 नवीन
माझ्या विनंतीला मान देऊन पिवळा डांबिस यांनी सँटा मोनिका येथे झेंडा रोवला आहे, त्यावरून ते आपल्या किती जवळ आहेत ते लक्षात आलंच असेल.(त्यांच्या प्रतिक्रियेवरून हे एक जहाल रसायन वाटेल, पण ते एक अत्यंत resourceful असं व्यक्तिमत्व आहे असं ऐकून आहे :-) , बाकी ते 'आमेरीकेत लोकस ईतकी वर्षे एका जागी क्वचितच थांबतात' वगैरे सरसकट profiling विधानं करू नका, अगदी मी स्वतः देखील तुम्ही आहात त्या शहरात एका दशकाहून आधिक काल राहिलेलो आहे :-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

सहमत आहे.

नेत्रेश
Sun, 10/12/2014 - 20:14 नवीन
सरसकटीकरणा बाबत सहमत आहे. थोडे चुकलेच. गेल्या काही वर्षांत बरेचसे जवळचे मित्र नोकरी निमीत्त दूर गेले आहेत, त्यामुळे असे विधान केले गेले. कुणाला व्यक्तीशः दुखवायचा अजीबात उद्येश नव्हता. बाकी पिवळा डांबिस यांच्या बाबतीत माझाही 'एक उमदे व्यक्तीमत्व' असाच ग्रह होता, त्यामुळॅ त्यांचा अनपेक्षीत असा प्रतिसाद पाहुन थोडे आश्चर्यच वाटले. असो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

या प्रतिसादावरची माझी प्रतिक्रिया

बहुगुणी
Sun, 10/12/2014 - 21:59 नवीन
या प्रतिसादावरची माझी प्रतिक्रिया चुकून खाली पडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

सोडून द्या

पिवळा डांबिस
Mon, 10/13/2014 - 10:06 नवीन
नेत्रेश, तुमचा व्यनि मिळाला. त्याला उत्तरही पाठवले आहे... एकूण सगळा गैरसमजाचा खेळ दिसतो आहे, तेंव्हा सोडून द्या.. तुम्ही एल ए मध्ये कुठे असतां?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

धन्यवाद, व्यनिला उत्तर दीले आहे

नेत्रेश
Mon, 10/13/2014 - 12:42 नवीन
बाकी आपला 'झेंडा गाडणे' हा शब्द प्रयोग, हींदीतील 'झंडा गाड दीया' चा मराठी अनुवाद होता. श्री घाटावरचे भट व भाग्यश्री यांचा ही गैरसमज व्हायला नको म्हणुन येथे खुलासा करत आहे. सध्या एल ए मध्ये सॅन फर्नांडो व्हॅली मध्ये वास्तव्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हम्म!!

पिवळा डांबिस
Mon, 10/13/2014 - 10:11 नवीन
....... असं व्यक्तिमत्व आहे असं ऐकून आहे
नुसतं "ऐकून आहे" कशाला? एकदा या आणि खात्री करा! मिपाकरांचा संतोष, हेच आमचं समाधान!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

पि डा शेठ, आमंत्रणाबद्दल धन्यवाद!

बहुगुणी
Mon, 10/13/2014 - 17:36 नवीन
त्या भागात येणं ठरलं तर आधी नक्की कळवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

डन !

स्वामी संकेतानंद
Fri, 10/10/2014 - 09:31 नवीन
दिल्लीवर मराठी झेंडा रोविला आहे! ;)
  • Log in or register to post comments

अरे वा वा!

पैसा
Sun, 10/12/2014 - 17:34 नवीन
स्वामीजी आले का मिपावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

आलो आलो

स्वामी संकेतानंद
Sun, 10/12/2014 - 18:21 नवीन
धावतपळत आलो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बहुगुणी, एक नंबर काम केलेत !

चौथा कोनाडा
Fri, 10/10/2014 - 23:49 नवीन
बहुगुणी, एक नंबर काम केलेत ! तुम्हाला त्रिवार सलाम ! -------------------------- तुम्हाला आमच्या तर्फे मिपारत्न सन्मान ! खुप इंटरेस्टींग करून ठेवलत !
  • Log in or register to post comments

डन

क्लिंटन
Sun, 10/12/2014 - 17:41 नवीन
खूपच चांगला उपक्रम. आवडला. अशा कल्पना याव्यात त्या बहुगुणींकडूनच. वाशीवर माझा झेंडा रोवला आहे :)
  • Log in or register to post comments

क्लिंटन आणि चौथा कोनाडा

बहुगुणी
Sun, 10/12/2014 - 18:33 नवीन
क्लिंटन: तुमच्या लेखनाचा दुवा दुरूस्त केला आहे, झेंडा लावल्याबद्दल धन्यवाद! चौथा कोनाडा: झेंडा लावल्याबद्दल धन्यवाद! पण आता (तुमचं लेखन, भटकंती, कट्टे वगैरे) आणखी माहिती येऊ द्यात नकाशावर.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, बहुगुणी ! नक्की

चौथा कोनाडा
Mon, 10/13/2014 - 21:42 नवीन
धन्यवाद, बहुगुणी ! नक्की टाकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

धन्यवाद, बहुगुणी ! नक्की

चौथा कोनाडा
Mon, 10/13/2014 - 21:42 नवीन
धन्यवाद, बहुगुणी ! नक्की टाकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

धन्यवाद बहुगुणी !

चौथा कोनाडा
Tue, 10/14/2014 - 07:15 नवीन
धन्यवाद बहुगुणी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

परफेक्ट! देर आये, दुरूस्त आये...

बहुगुणी
Sun, 10/12/2014 - 21:34 नवीन
आता शब्दच्छल सोडून टंकनफळ्यावरचे मिनी-वादळ मागे राहू द्या, जवळपासचे इतर मिपाकर शोधून एक मस्त कट्टा घडवा, आणि येऊ द्या कट्टा-वर्णन मिपावर, आणि झेंडा जियो मिपावर!
  • Log in or register to post comments

एक डाव माफी!

बहुगुणी
Sun, 10/12/2014 - 21:36 नवीन
ही वरची प्रतिक्रिया नेत्रेश यांच्या प्रतिसादास उद्देशून होती, भलत्याच ठिकाणी पडली! एक डाव माफी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

माझाही झेंडा रोवला आहे. परंतु

मोहनराव
Tue, 10/14/2014 - 18:57 नवीन
माझाही झेंडा रोवला आहे. परंतु रंग बदलायचा चुकून राहिला. तेवढे जरा पहाता का?
  • Log in or register to post comments

केला पोपटी झेंडा!

बहुगुणी
Tue, 10/14/2014 - 21:14 नवीन
शिवाय तुमच्या लेखनाचा दुवाही दिलाय (त्यानिमित्ताने तुमचं लिखाण वाचायला मिळालं, आणखी लिहा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

धन्यवाद!!

मोहनराव
Wed, 10/15/2014 - 12:18 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

केला अ‍ॅड

लंबूटांग
गुरुवार, 10/16/2014 - 19:27 नवीन
बॉस्टनजवळ.
  • Log in or register to post comments

स्वागतम्!

बहुगुणी
गुरुवार, 10/16/2014 - 20:39 नवीन
यानिमित्ताने तुमचा अँड्रॉईड बद्दलचा लेख वाचला आणि सुहास झेले यांच्या धाग्याचीही आठवण झाली. (अवांतर: आता लॉलीपॉप प्रणाली येऊ घातली आहे, त्यासंबंधी आणि त्याचा अ‍ॅप्स-विश्वावर काय परिणाम होईल याविषयीही वाचायला आवडेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

अँड्रॉईड बद्दल

लंबूटांग
गुरुवार, 10/16/2014 - 21:17 नवीन
पुढे लिहायचे होते पण कामाच्या व्यापात राहूनच गेले. खरं तर अँड्रॉईडने त्यानंतर प्रचंड मोठी झेप घेतली आहे. धमाल मुलाने वर विचारल्याप्रमाणे मी कस्टम रॉम्स वगैरेही इन्स्टॉल करून बघितले. स्वतःसाठी नवीन अँड्रॉईड फोन घेतला एल जी ने गूगलसाठी बनवलेला Nexus 5. Vanilla अँड्रॉईडची चव चाखली. असो लिहीण्यासारखे बरेच आहे. वेळ मिळाला की टंकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

कट्टेकर्‍यांसाठी: आपल्या गावात इतर मिपाकर कसे शोधायचे?

बहुगुणी
गुरुवार, 10/16/2014 - 22:49 नवीन
जियो मिपावर तुमच्या झेंड्यावर क्लिक करून तो बंद केलात आणि मग पुन्हा तिथल्या पोपटी झेंड्यावर क्लिक केलंत की तिथले इतर सदस्य दिसतात. हेच क्रमाक्रमाने केलं तर एकाच गावी किती मिपाकर आहेत तेही कळतं.
  • Log in or register to post comments

अहो मी जॅक डनियल्सचा झेंडा

आदूबाळ
Fri, 10/17/2014 - 00:06 नवीन
अहो मी जॅक डनियल्सचा झेंडा गाडला आहे पण तो हिरवा करायचा विसरलो. कृ करता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

केला

बहुगुणी
Fri, 10/17/2014 - 06:00 नवीन
केला पोपटी झेंडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लैच भारी वाटतोय नकाशा आता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/17/2014 - 08:21 नवीन
सालं रशियात कसं कै नै गेले आपले मिपाकर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बरेच मिपाकर अजून यायचे असणार नकाशावर

बहुगुणी
Fri, 10/17/2014 - 10:09 नवीन
तसे मिपाकर रशिया आणि त्याआसपासच्या देशांप्रमाणे पुढील कोणत्याच देशात पोचले नसावेत हे पचवायला कठीण वाटतंय: चीन, जपान, फिलिपाईन्स, दक्षिण कोरिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, ब्रम्हदेश, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण अमेरिकेतले ब्राझील, चिले वगैरे सर्वच देश... बरेच मिपाकर अजून यायचे असणार नकाशावर. मिपाचे बल्लवाचार्य गणपाशेठ तरी कुठे आले आहेत नायजेरियातून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आहेत की

श्रीरंग_जोशी
Fri, 10/17/2014 - 22:04 नवीन
श्री लालटोपी रशियात वास्तव्यास होते. अजूनही असावेत असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाही,... श्रीरंगजी,

लाल टोपी
Sat, 10/18/2014 - 03:30 नवीन
मी तेथील कार्यकाल पूर्ण करुन जानेवारी १४ लाच भारतात परतलो सध्या अनेक व्यापात अडकल्यामुळे मिपावर नियमीत येणे होत नाही. रशियात फारशी मराठी माणसे नाहीत; पण २००७ ते २०१० दरम्यान कुआलालम्पूर, मलेशियामध्ये वास्तव्य केले आहे तेथे भरपूर मराठी मंडळी आहेत, महाराष्ट्र मंडळही त्यावेळेस होते ते नक्कीच मिपाकर असतील. बहुगुणी साहेब उत्तम धागा आहे. आवडला उद्या सवडीने मला स्वतःलाही टॅग करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

जरूर करा,

बहुगुणी
Sat, 10/18/2014 - 03:46 नवीन
तुमची मॉस्कोची प्रवासवर्णनंही टॅग करा योग्य रंगाच्या झेंड्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी

हरिभक्तिचा घाव गाजे निशाणी....

विटेकर
Fri, 10/17/2014 - 15:33 नवीन
बहुगुणीश्री, लावलयं निशाण ! तेव्हडे अप्रूव करा . आणि दंडवत स्वीकारा.
  • Log in or register to post comments

नमस्कार! दिसत नाहीये हो नकाशावर

बहुगुणी
Fri, 10/17/2014 - 17:27 नवीन
व्ह्यू--सर्च केल्यावर 'नेम' मध्ये 'विटेकर' असं शोधून तुमचा झेंडा दिसत नाहीये नकाशावर. कुठल्या गावी लावलंय ते सांगता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

नमस्कार! दिसत नाहीये हो नकाशावर

बहुगुणी
Fri, 10/17/2014 - 17:27 नवीन
व्ह्यू--सर्च केल्यावर 'नेम' मध्ये 'विटेकर' असं शोधून तुमचा झेंडा दिसत नाहीये नकाशावर. कुठल्या गावी लावलंय ते सांगता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

प्राधिकरणामधे हिरवा मार्कर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/17/2014 - 17:39 नवीन
प्राधिकरणामधे हिरवा मार्कर रोवलेला आहे.
  • Log in or register to post comments

विटेकर आणि कॅप्टन जॅक स्पॅरो

बहुगुणी
Fri, 10/17/2014 - 23:14 नवीन
दोघांचेही लेखनाचे दुवे दुरूस्त केले आहेत. झेंडे गाडल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सही. जिओ मिपाचा चांगलाच उपयोग

पिंगू
Sun, 10/19/2014 - 10:56 नवीन
सही. जिओ मिपाचा चांगलाच उपयोग होइल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा