✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!

ब
बहुगुणी यांनी
Tue, 10/07/2014 - 01:20  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी! बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप. हे "जिओ मिपा" पुढे चालू रहिलं तर 'जियो मिपा' म्हणुयात! मी केवळ सुरूवात करून देतो आहे, यात प्रत्येक मिपाकराने आणि मिपाकरणीने आपापल्या परीने भर घालावी ही अपेक्षा आणि विनंती! उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः Mipa1 युरोपातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः mipa2 अमेरिका आणि आफ्रिका खंडातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः Mipa3 मिपाकरांनी आपापले सद्य-स्थान या नकाशात आपल्या आय-डी सह दर्शवले की ते नकाशावर असे पोपटी रंगातल्या झेंड्यात दिसेलः Mipa4 या झेंड्यावर 'क्लिक' केले असता एक बॉक्स उघडेल ज्यात त्या मिपाकराच्या मिपावरील लेखनाचे दुवे असतीलः Mipa5 Mipa6 तुम्हाला तुमच्या भटकंतीच्या लेखाविषयी वाचकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रकाशचित्रांपैकी एखाद्या खास चित्राचा दुवा द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकाल; त्यासाठी 'website' अशी बॉक्स असेल त्यात आपल्या प्रकाशचित्राचा असा दुवा द्या: Mipa7 म्हणजे ते प्रकाशचित्र असं दिसेलः Mipa8 आता हे करणं अगदी सोपं आहे, त्यासाठीच्या सूचना पुढे देतो आहे:
  • सुरूवातीला आपल्याला हवा तो लेख निवडून त्याचं शीर्षक आणि मिपावरील दुवा हे जमा करून ठेवावेत. मग खालीलप्रमाणे नकाशावर जाऊन हे दुवे add करावेतः Mipa11 Mipa12
  • यातील Marker या pull-down box मध्ये झेंड्याचा योग्य रंग निवडा: म्हणजे मिपाकरांच्या स्थानासाठी green, मिपाकरांच्या कट्ट्यासाठी Teal तर मिपाकरांच्या भटकंतीसाठी Blue हे रंग निवडा.
वर लिहिल्याप्रमाणे मी केवळ सुरूवात करून देतो आहे. मला सहज सापडले असे कट्टे आणि भटकंतींचे लेख सध्या या नकाशावर समाविष्ट आहेत. वाचकांनी आणि मिपा लेखकांनी आपापल्या आणि इतरांच्या आवडलेल्या भटकंतींची आणि कट्ट्यांची इथे नोंद करावी. हा नकाशा open access असा आहे, त्यामुळे नोंदी करण्यासाठी सभासदत्व लागत नाही. कधी कधी दोन भटकंती एकाच गावी झाल्याने असे लेख एकाच झेंड्याने नकाशावर दाखवले जातील, उदाहरणार्थ 'किल्ले हरिहर' आणि 'हरिहर - एक ट्रेक कथा' हे दोन्ही लेख 'त्रिंबक' या एकाच झेंड्याखाली लपलेले असतील. Mipa9 अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः Mipa10 म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल. मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-) आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
58162 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

माझा मार्कर लागलाय का?

मी-सौरभ
Wed, 10/22/2014 - 19:37 नवीन
बहुगुणी: बघता का जरा..
  • Log in or register to post comments

बरोबर लागला आहे

बहुगुणी
Wed, 10/22/2014 - 22:27 नवीन
मी तुमच्या लेखनाचा दुवा Description मध्ये दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

चुकीची दुरूस्ती

बहुगुणी
Mon, 11/10/2014 - 09:37 नवीन
काही वाचकांनी व्य नि मध्ये 'झेंडे लावतांना चुकीचा रंग वा इतर चुका झाल्या तर त्या दुरूस्त कशा करता येतील' अशी विचारणा केली आहे. उजवीकडे वर Map Access म्हणून बटन आहे, ते मी सध्या 'लॉक' करून ठेवले आहे पासवर्ड टाकून, कुणी चुकून [किंवा चेष्टेत] दुसर्‍यांचे झेंडे 'एडिट / डिलीट' करू नये म्हणून. तेंव्हा ज्या सभासदांना काही बदल करायचे असतील त्यांनी मला इथे धाग्यात किंवा व्यनि ने कळवावे, म्हणजे मी ते बदल करीन. गेल्या पंधरवड्यात काही नवीन प्रवासवर्णने तसेच कट्टे-वृत्तांत आले आहेत. यांपैकी बरेच जियो मिपावर आलेले दिसत नाहीत, तेंव्हा त्या लेखकांना सहभागाची विनंती.आणि अर्थातच सर्वच मिपाकरांनी आपापल्या स्थानांचे झेंडे वर लेखात लिहिल्याप्रमाणे लावावेत असं आवाहन पुन्हा एकदा.
  • Log in or register to post comments

उपयुक्त उपक्रम

समर्पक
Wed, 05/04/2016 - 22:40 नवीन
जवळपास राहणारे मिपाकर व विविध प्रदेशांची माहिती मिळविण्यासाठी फारच उपयोगी
  • Log in or register to post comments

लोकांनी आपापली भटकंती आणि

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 21:14 नवीन
लोकांनी आपापली भटकंती आणि कट्टे अपडेट करा!!
  • Log in or register to post comments

त्या नकाशाची लींक द्या ना परत

खटपट्या
गुरुवार, 09/01/2016 - 21:22 नवीन
त्या नकाशाची लींक द्या ना परत. लोकेशन अपडेट करतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हा घ्या दुवा

बहुगुणी
गुरुवार, 09/01/2016 - 21:28 नवीन
जियो मिपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

लोकेशन बदलायचे कसे?

खटपट्या
गुरुवार, 09/01/2016 - 21:58 नवीन
लोकेशन बदलायचे कसे? विसरलो आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

वरती लिहिल्याप्रमाणे उजवीकडे

बहुगुणी
गुरुवार, 09/01/2016 - 23:05 नवीन
वरती लिहिल्याप्रमाणे उजवीकडे वर Map Access म्हणून बटन आहे, ते मी सध्या 'लॉक' करून ठेवले आहे पासवर्ड टाकून, कुणी चुकून [किंवा चेष्टेत] दुसर्‍यांचे झेंडे 'एडिट / डिलीट' करू नये म्हणून. तेंव्हा ज्या सभासदांना काही बदल करायचे असतील त्यांनी मला इथे धाग्यात किंवा व्यनि ने कळवावे, म्हणजे मी ते बदल करीन. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

प्लीज माझ्यासाठी करा एकदा...

खटपट्या
गुरुवार, 09/01/2016 - 23:25 नवीन
प्लीज माझ्यासाठी करा एकदा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

करतो ना, कळवा काय बदल हवाय तो

बहुगुणी
गुरुवार, 09/01/2016 - 23:49 नवीन
व्य नि ने कळवा काय बदल हवाय तो
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर सोय आहे ही. मी आधी

पद्मावति
Fri, 09/02/2016 - 00:21 नवीन
खूपच सुंदर सोय आहे ही. मी आधी मार्कर टाकला होताच. आता अपडेट पण केलंय. धन्यवाद बहुगुणी.
  • Log in or register to post comments

मिपा अकाउंटमध्ये राहाण्याचे

कंजूस
Fri, 09/02/2016 - 05:27 नवीन
मिपा अकाउंटमध्ये राहाण्याचे ठिकाण - gps data वाढवता येईल.
  • Log in or register to post comments

मार्कर टाकला आहे !

ए ए वाघमारे
Fri, 09/02/2016 - 09:01 नवीन
मार्कर टाकला आहे !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा