✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रिओ ऑलिम्पिक २०१६

ख
खेडूत यांनी
गुरुवार, 08/04/2016 - 21:29  ·  लेख
लेख
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच. भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते. तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा. भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा ! काही दुवे स्पर्धेचे संस्थळ पदकतालिका
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
79447 वाचन

💬 प्रतिसाद (405)

प्रतिक्रिया

....हम होंगे कामयाब ...एक दिन

असंका
Mon, 08/22/2016 - 11:51 नवीन
....हम होंगे कामयाब ...एक दिन! चला कामाला लागू या...
  • Log in or register to post comments

रियोतले भारतीय क्रीडाधिकारी ....

गामा पैलवान
Tue, 08/23/2016 - 11:45 नवीन
लोकहो, ही पहा आपल्या क्रीडाधिकाऱ्यांची तत्परता : जैशा आणि कविताला कुणी पाणीही दिलं नाही! सुदैवाने एके ठिकाणी काही नावं सापडली आहेत : १. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये हॉकी इंडियाचे पदाधिकारी या नात्याने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर २. तरलोचन सिंह (हे भारतीय तिरंदाजी संघटनेचे कार्यकारी अध्यक्षही आहेत आणि त्यांचेच पुत्र .... ३. पवनदीप सिंह भारतीय ऑलिम्पिक पथकाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ४. भारतीय तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा ५. भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री अखिलेश दासगुप्ता ६. भारतीय हौशी मुष्टीयुद्ध फेडरेशनचे अध्यक्ष आमदार अभिषेक मटोरिया ७. हॉकी इंडियाच्या आजीवन अध्यक्ष काँग्रेसच्या विद्या स्टोक्स आणि सहायक उपाध्यक्ष अनुराग ठाकूर ८. नॅशनल रायफल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार कलिकेश नारायण सिंह देव ९. भारतीय जलतरण महासंघाचे अध्यक्ष गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत १०. टेबल टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष खासदार दुष्यंत चौटाला ११. अ.भा. टेनिस असोसिएशनचे आजीवन अध्यक्ष यशवंत सिन्हा आणि .... १२. उपाध्यक्ष खासदार दीपिंदर हुड्डा १३. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंह स्रोत : http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/rajdhaneetun/politics-in-sports/ उपरोक्त व्यक्तींना ऑक्टोबरच्या उन्हाळ्यात दिल्लीत निर्जळी मॅरेथाॅन धावायला लावली पाहिजे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

हे ही वाचाhttp://indiatoday

बाळ सप्रे
Tue, 08/23/2016 - 13:05 नवीन
हे ही वाचा http://indiatoday.intoday.in/olympics2016/story/athletics-federation-of-india-op-jaisha-rio-olympics-2016/1/746475.html जैशा हिची प्रतिक्रीया भावनेच्या भरात व सर्वोत्तम कामगिरी न करता आल्याच्या निराशेत असावी. व माध्यमांनी आधीच टीकेचे धनी झालेल्या भारतीय पथकातील अधिकार्‍यांवर वार करण्याची संधी न दवडण्याच्या नादात खर्‍याखोट्याची शहानिशा न करता बातमी झटपट प्रसिद्ध केली. बर्‍याच अधिकार्‍यांनी रिओला जाउन खेळाडूंना सहाय्य करण्याऐवजी स्वतः ची चैन केली. हे खचितच अयोग्य होतं. दर २-२.५ किमीवर पाणी देणे ही आयोजकांची जवाबदारी असते ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली होती. पण साधं पाणी सुद्धा न मिळणं हे ऑलिंपिकसारख्या आयोजनात घडणे कठीण वाटते. तसे झाले असते तर जगभरातून यजमान देशावर टीकेची झोड उठली असती. अ‍ॅथलीट्सना एनर्जी ड्रिंक्स, जेल्स वगैरे पुरवणे हे त्या त्या देशाच्या क्रूने करायचे असते. जे जैशा व कविताने सवय नसल्याने नाकारले होते असे अ‍ॅथलेटीक फेडरेशनचे म्हणणे आहे. जे झाले ते दुर्दैवी होते. खेळाडू व प्रशिक्शक/ अधिकारी यात बाँडिंग नसल्याचे सूचित करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

समन्वयाचा अभाव

पाटीलभाऊ
Tue, 08/23/2016 - 13:25 नवीन
सहमत...कालच एका वृत्तवाहिनीवर पाहिले...त्यावर जैशा सांगत होती कि "मुझे ये रुल्स वगैरे कुछ नाही पता...में बस दौडना जानती हू !" आता यास जबाबदार कोण ? खेळाडू आणि क्रीडा पदाधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अरेरे..!

खेडूत
Tue, 08/23/2016 - 12:26 नवीन
अरेरे..! दुर्दैव, दुसरं काय? पण साफसफाई करणार कोण?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा