Skip to main content

काश्मीर - वल्गना आणि वास्तव.

लेखक संदीप ताम्हनकर यांनी गुरुवार, 21/07/2016 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते. याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत. हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता. पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की. ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा. पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल. आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.

वाचने 65007
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

आज कारगील विजय दिवस. मातृभुमीसाठी बलिदान देणार्‍या सर्व शहिद जवानांना अभिवादन.

मातृभुमीसाठी बलिदान देणार्‍या सर्व शहिद जवानांना अभिवादन.

खरे सर, एकदम सहमत. पोलीस हे इतरांना कमी लेखतात. लकडी़ पुलावर सुद्धा तसच झाल असावे.

कोणी कितीही आपटली तरी काश्मीर मधून अफ्स्पा कधी रद्द होईल असे वाटत नाही. जर झालाच तर सैनिक सुद्धा आम्ही कशाला फुकटात हुतात्मा होऊ असा विचार करुन पोलिसांप्रमाणे गंमत पाहात बसतील. गेले काश्मीर तर गेले असे म्हणून मजा बघत बसतील आणि त्यात काही चूक आहे असेही म्हणता येणार नाही.

मित्रहो, सर्वांनाच काश्मीर समस्येविषयी तळमळ आहे. मिपा मध्ये ‘मजकूर’ देणे अपेक्षित आहे याची मला कल्पना आहे. पण तरीही एक विनंती की पुढील २ व्हिडीओ आवर्जून पहा. जे लोक जास्त वाचत नाहीत त्यांच्यासाठीपण सोय होईल. साहिल अली आणि अवलोक लंगर या तरुणांनी मोठ्या-मोठ्या चॅनलना लाजवेल असे रिपोर्टींग केलंय. कुठेही न पाहिलेलं एकदम लेटेस्ट कंटेन्ट आहे. काश्मीर - Inside A Friday Protest (Hindi and English) Part I : - https://youtu.be/6Q1rd6jaIRY Part II : - https://youtu.be/_K7e2GLjmHI आता खरे दिग्गज लोकांचे महत्वपूर्ण प्रतिसाद यायला लागलेत. सुरवातीला खाल्ल्या मिठाला आणि चालू OROP ला जागणारे प्रतिसाद जरा जास्तच होते. मूळ पोस्टच्या एवढ्या चिरफाडीनंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या पुढे दिलेल्या विधानांवर कोणाचीही काहीही प्रतिक्रिया नाही. 1. 'सैन्याला (विशेष) हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी (देशातील) उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे.' 2. 'एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.' 3. 'श्री डोवाल यांची काशिरातील कामगिरी काय हे अजून समोर यायचंय.' 4. 'बहुतेकवेळा कॅमेरा सैन्याच्या (बाजूने) समोरील आंदोलकांचे चित्रण करतो. या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहेच.' 5. 'दहशतवादाचे पीक पेरण्यासाठी जमिनीची मशागत भारतीय सैन्यदले पाकिस्तानला फुकटात करून देतायत, असे चित्र आहे.' 6. ‘५६ इंची छाती वाल्यांकडून अशी काय Break Through Strategy वापरली जाते हे पाहण्यासाठी देशातील जनता उत्सुक असताना जे चाललंय ते खेदजनक आहे आणि विशेष आशादायक नाही हे सत्य वारंवार समोर येतंय.’ 'प्रत्यक्ष रस्त्यावर जे असते त्या सैन्याच्या बौद्धिक कुवतीसंबंधी' प्रतिक्रिया श्रीगुरुजी या आयडीची आहे, माझ्याकडून सोन्याबापू या आयडीची असा उल्लेख झालाय त्याबद्दल दिलगीर आहे. या श्रीगुरुजी नावाच्या आयडीने, 'पोस्ट लिहिणारा मूर्ख आहे' एवढेच एका प्रतिसादात जागोजागी लिहिले आहे. श्रीगुरुजी या परमदेशाभिमानी आयडीने 'काश्मिरची समस्या सोडविणे हे भारताच्या हातात नसून काश्मिरी व पाकिस्तानच्याच हातात आहे. पाकिस्तानने काश्मिरींना भडकाविणे थांबविले .....' असा नियोगाचा मार्ग सुचवला आहे. याच श्रीगुरुजींनी 'काश्मिरींच्या डोळ्यांना झालेल्या जखमा पॅलेट गन मुळे नसून दंगेखोरांनीच फेकलेल्या ग्रेनेड मधील खिळे इत्यादींनी झाल्याचा' ही जावईशोध लावलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सैन्यावर फेकलेल्या 'खिळे आणि काचा वगैरेने ठासून भरलेल्या' या ग्रेनेड्सनी सैन्यातील एकही जवानाच्या डोळ्यांना इजा झालेली नाही. सैनिक केवळ स्व-संरक्षण करताना एवढी माणसं मारताय आणि जायबंदी करताय असंही श्रीगुरुजी उवाच. केवळ हिंदुत्ववादी आणि संघी अजेंडा कुठेही आणि कायम रेटत राहणं किती गांभीर्याने घ्यायचं? कुठच्याही चुलीत एक संघी लाकूड घालायचच याला काय अर्थ आहे! मागची पंचवीस वर्षे सैन्याची पूर्ण ताकद वापरूनही आणि काश्मिरींच्या दोन पिढ्या सडवूनही आज पंचवीस वर्षानंतर आझादीचा नारा आहेच. त्यामुळे सैन्य वापरून हा प्रश्न सुटू शकत नाही हे सिद्ध झालंय. केवळ आफ्स्पा कायदा नाही तर PSA (The Jammu and Kashmir Public Safety Act, 1978) कायदा देखील हटवला पाहिजे ही मागणी जोर धरतेय.

In reply to by संदीप ताम्हनकर

एक दुरुस्ती: माझ्या माहितीप्रमाणे पॅलेट बंदूका सैन्य वापरत नाही. स्थानिक पोलीस आणि CRPF आदी वापरतात. बाकी चालू द्या.

In reply to by संदीप ताम्हनकर

तुमची काश्मीर प्रश्न सुटावा हि तळमळ दिसून येते परंतु तुमि जे उपाय सांगत आहेत ते खूपच soft आहेत ते काश्मीर मद्ये उपयोगी पडणार नाहीत असं मज मत आहे. काश्मीर मधला असंतोष हा radical लोक , प्रो-पाकिस्तान, प्रो-फ्रीडम,आणि सरकार विषयी असंतोषी लोक यांची भेलमिसल आहे, त्यामुळं सगळ्यांना एकाच strategy उपयोगी नाही पडणार. Afspa हा ठराविक एरिया मधुन काडाय हवा परंतु त्या ठिकाणाची जबाबदारी पोलिसांना द्यावी कारण आर्मी ह्या कायद्याशीवाय काम करू शकणार नाही। Afspa च्या जागी त्याच्यापेक्षा softer ऍक्ट अनाय हवा, आणि saperatist लोकांबर चर्चा चालुकरून पाहावी। जो पर्यंत काही positive outcome येत नाही तोपर्यंत status quo ठेवावा। आणि एक नागरिक म्हणून मला हा कायदा नसता चालला पण मी एवढा गोंधलं आणि असंतोष केलाच नसता, म्हणजे असंतोष आहे म्हणून हा कायदा आणि कायदा आहे म्हणून परत असंतोष, म्हणजे ही एक cycle आहे. श्री डोवाल यांचे कार्य आणि personal intigrity हि अत्युचं दर्जाची आहे त्यामुळं त्यांच्यावर शंका घेणं चूक. आणि जेवढे आंदोलक जखमी तेवढेच जवान पण जखमी झालेत हे लक्षात घ्या. काश्मीर मधली newspaper जाणीवपूर्वक जवान आणि पोलिसांना व्हिलन ठरवतात आणि त्यांना झालेल्या हानीची आकडेवारी देत नाहीत. माजामते मोदींची startegy खूप धारसोडी ची वाटते पण हे पर्सनल ओपिनियन आहे. शेवटी एक लक्षात घ्या काश्मीर हा फक्त जमीन आणि लोक यांचा विषय राहिला नाहीये तर हा आता स्ट्रॅटेगिक गेम झाला आहे भारत, पाकिस्तान आणि possibly in future चीन मधला, म्हणून जपून पावलं उचलायला हवी.

In reply to by धनावडे

अजिबात नाही आणि मी हि आस कूट बोलो नाही। फक्त मिलिटरी आणि पोलिटिकल अँप्रोच वापरून प्रश्न सोडावा आस मज म्हणणं आहे। high hardness च चालणार नाही हे आपण गेल्या 30 वर्षात पाहिलं आहे। वाजपेयींना जे समजलं ते नंतरच्या सरकारनं समजलं आस दिसत नाही। मोदींनी सुरुवात चांगली केली नंतर मात्र दिशा भरकटलेली दिसते । आणि काश्मीर देऊन उपयोगाचं नाही कारण आज काश्मीर गेला तर उद्या पंजाब जाईल परवा ईशान्य भारत जाईल, हे होऊ नये असे वाटत असेल तर मिलीटरी अँप्रोच ला चर्चे ची साथ दिल्याशिवाय पर्याय नाही।

In reply to by संदीप ताम्हनकर

ताम्हनकर साहेब वरील दोन्ही व्हिडीओ मध्ये फक्त श्रीनगर शहराच्या अंतर्भागातील काही युवक शुक्रवारी नमाज नंतर दगडफेकी करतात आणि त्यावर जम्मू आणि काश्मीर पोलीस कशी कारवाई करतात एवढाच विषय आहे. AFPSA लष्कर किंवा निमलष्करी दले याबाबत एक नव्या पैशाची हि चर्चा नाही. एवढा मोठा डोंगर पोखरून तुम्ही फक्त झुरळ बाहेर काढलं. आपला आवेश असा होता कि न भूतो न भविष्यती असा माहितीचा स्रोत आपल्या हाताला लागला आहे. आपल्या एकंदर आवेशावरून असे दिसत आहे कि आपण जेवढा पाहिला तोच आणि तेवढाच हत्ती आहे अशी तुमची समजूत आहे. काश्मीर प्रश्न आपल्याला वाटतो त्यापेक्षा खूप मोठा आणि खोलवर गेलेला आहे. सद्या स्थिती अशी आहे कि मोदी सरकारने पाकिस्तानचे बरेचसे आखाती मित्र देश आणि अमेरिका यांच्याबरोबर वेगवेगळे करार करून पाकिस्तानची नाकेबंदी केलेली आहे. यामुळे पाकिस्तान त्याला प्रतिक्रिया म्हणून काश्मीर मध्ये परत अंतर्गत हिंसाचार भडकावून तो प्रश्न अंतरराष्ट्रीय समुदायापुढे आणून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण अपूर्ण माहितीवर बेफाट विधाने करीत आहेत ती बंद करा अशी आपल्याला विनंती आहे. मिसळपाव वर बहुश्रुत आणि विद्वान अशी अनेक मंडळी आहेत त्यामुळे कोणतेही विधान त्याच्या सकृतदर्शनी अवतारावर न घेता ते पारखूनच घेतले जाईल.

In reply to by सुबोध खरे

हा प्रतिसाद तुमच्या ह्या वाक्याला आहे "सद्या स्थिती अशी आहे कि मोदी सरकारने पाकिस्तानचे बरेचसे आखाती मित्र देश आणि अमेरिका यांच्याबरोबर वेगवेगळे करार करून पाकिस्तानची नाकेबंदी केलेली आहे" काश्मीर असंतोषानंतर अमेरिकेने जे स्टेटमेंट दिले त्यामध्ये कुठं हि काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे असा अमेरिका म्हणत नाही, चीन सहसा काश्मीर वर मत प्रदर्शित करत नव्हता परंतु आता चीन ने स्टेटमेंट जरी करून स्वतःची strategy चेंज केली आहे. OIC जी इस्लामिक देशांची संघटना आहे त्यांनी ही काश्मीर मध्ये हिंसाचार थांबवा आस बोलून पाकिस्तानची तळी उचलली आहेत. जगामध्ये अजूनसुद्धा एकही देश काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अंतर्गत प्रश्न आहे असं जाहीरपणे मान्य करत नाही (माझ्या वाचनातं तरी आलं नाही). ह्या गोष्टी जरी सिम्बॉलीक असल्या आणि याने ग्राउंड रिऍलिटी जरी बदलत नसली तरी त्या स्ट्रॅटेगिकली खूप महत्वपूर्ण आहेत. मोदी सरकार ने पाकिस्तान ला economically आणि politically एकाकी पाडण्यासाठी पावले उचलली पण त्याचे परिणाम दिसायला खूप काळ लोतेल. सध्यातरी पाकिस्तान काश्मीर विषयावर एकाकी नाही, अमेरिका आणि इस्लामिक राष्ट्रे double गेम खेळतायत आणि चीन पाकिस्तान पाठीमागे ठामपणे उभा आहे.

In reply to by अमितदादा

भारत व पाकिस्तान या वादात कोणताही देश स्वतःहून भाग घेत नाही. या दोन्ही देशांनी द्विपक्षीय चर्चेतूनच वाद मिटवावे असेच सर्व देशांनी अनेकवेळा सांगितले आहे. पाकिस्तानने वारंवार विनंती करूनसुद्धा अमेरिकेने या वादात मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. हा द्वपक्षीय मुद्दा आहे हेही अमेरिकेने मान्य केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सुद्धा काश्मिर व सार्वमत हा मुद्दा बॅकबर्नरवर टाकलेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तोचतर प्रॉब्लेम आहे ना गुरुजी. जर काश्मीर अंतर्गत प्रश्न नसून द्विपक्षीय प्रश्न असेल तर पाकिस्तान बर वाटाघाटी कराव्याच लागतील ना, कारण आता जस इस्राईल च्या विरोधी जागतिक मत बनत जात आहे तस भारताविषयी बनाय नको अशी माजी इच्छा आहे. कारण हि लढाई अता perception ची बनाल्यामुळं भारतालाही आपण काहीतरी चर्चा करतोय हे दाखवाय हवं भलेही मागे मिलीटरी action चालू असुदे।

In reply to by अमितदादा

पाकिस्तान असो वा काश्मिरी, भारताने त्यांच्याशी नक्की कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची हे एक प्रश्नचिन्ह आहे. भारताने काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे, काश्मिर पाकिस्तानच्या हवाली करावे, भारताने काश्मिरमधून सैन्य हटवावे इ. पाकिस्तानच्या मागण्यांवर भारताची भूमिका ठाम आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर चर्चा अशक्य आहे. काश्मिरला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी, काश्मिरला स्वायत्तता द्यावी, काश्मिरमधून सैन्य हटवावे, अ‍ॅफ्प्सा रद्द करावा, पाकव्याप्त काश्मिर व भारतातील काश्मिर इ. दोन प्रदेशांतील नागरिकांना व्हिसाशिवाय एकमेकांच्या प्रदेशात जाता यावे इ. फुटिरतावादी काश्मिरींच्या मागण्यांवर भारताची भूमिका ठाम आहे. त्यामुळे या मुद्द्यांवरही चर्चा अशक्य आहे. पाकिस्तानने काश्मिरमध्ये दहशतवादी पाठविणे बंद करावे, दहशतवाद्यांना पाठिंबा व मदत देणे थांबवावे, दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, दाउद सारख्या अतिरेक्यांना भारताच्या हवाली करावे, हाफिझ सईद सारख्या अतिरेक्यांना शिक्षा ठोठवावी, काश्मिरमध्ये सार्वमताचा नाद सोडावा, काश्मिरमधील फुटिरतावाद्यांना मदत व पाठिंबा देणे थांबवावे, सीमेवरील गोळीबार थांबवावा, पाकव्याप्त काश्मिरवरील ताबा सोडावा, पाकव्याप्त काश्मिरमध्ये चीनला प्रवेश देऊ नये इ. भारताच्या मागण्यांना पाकिस्तानने कायमच नकार दिला आहे. सर्वांच्या भूमिका अत्यंत ठाम असताना भारत पाकिस्तानशी किंवा काश्मिरींशी कोणत्या मुद्द्यांवर वाटाघाटी करणार? अशा चर्चेतून काहीही निष्पन्न होणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु जगाला दाखविण्यासाठी चर्चेचे नाटक करावे लागते व हे नाटक व्यवस्थित सुरू आहे.

In reply to by श्रीगुरुजी

दोन्ही देश्यांचा ह्या मागण्या आहेत हे मान्य पण त्या ठाम आहेत हे अमान्य. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी मुर्शिरफ शी बॅक चॅनेल वाटाघाटी सुरु केलेल्या आणि काश्मिर प्रश्नी खूप मोठी प्रोग्रेस झालेली. पण कम नशिबाने मुर्शिरफ यांची सत्ता गेली आणि मनमोहन सिंग याचं ह्या वाटाघाटी पुढ न्यायचं धाडस झालं नाही । हि माहिती wikileaks cable नि उघडी केली आहे ती तुमि जालावर बगू शकता। त्यातील प्रमुख मुद्दे अशे होते की 1. LOC हीच पेरमेनेन्ट बॉर्डर असेल म्हणजे कोणतीही भारतीय काश्मीर भारताकडे आणि पाकिस्तानी काश्मीर पाकिस्तान कडे राहील . 2. बॉर्डर वरची आर्मी ओमी करून फ्री व्यापार आणि लोकांची movement चालू करायांची . 3. भारत आणि पाकिस्तान कोणत्याही दाहशदवादी कृत्याला डायरेक्ट किंवा इन डायरेक्ट पाठिंबा देणार नाहीत . 4. जॉईंट मॅनेजमेंट ऑफ काश्मीर . थोडक्यात काय दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असू शकतात, चर्चे मधून खूप काही साध्य होऊ शकत.

In reply to by अमितदादा

कारगील घडवणार्या मुशर्रफवर विश्वास ठेवणे, म्हणजे सापावर विश्वास ठेवण्यासारखे आहे. आतापर्यंत झालेल्या वाटाघाटीतुन दिसून आले आहे कि, भारत फक्त अटी पाळतो व पाकिस्तान सोयीनूसार भूमिका बदलतो.

In reply to by अर्जुन

तुमची शंका बरोबर आहे अर्जुन साहेब, पण ह्या वाटाघाटी तोंडी नसतात त्याला स्ट्रॉंग पोलिटिकल कंमिटमेंट असते, आणी त्या चर्चे मध्ये अमेरिका सुद्धा होती । आणि शेवटी भारताने केलेले सिमला करार आणि पाणी वाटपाचे करार हे अपवाद वगळता पळाले जातात । नवाज शरीफ याना जर पोलिटिकल बँकिंग आणि निर्णय घेण्याचे अधिकार असते तर त्यांनी मोदी बरोबर नक्कीच चांगली प्रगती केली असती, मोदी यांनी हे जाणले म्हणूनच सतत शरीफ याना भेटत राहिले ते । परंतु पाकिस्तान आर्मी नेहमी चर्चे मध्ये अडथळा उभा करत आली आहे ।

In reply to by अमितदादा

1. LOC हीच पेरमेनेन्ट बॉर्डर असेल म्हणजे कोणतीही भारतीय काश्मीर भारताकडे आणि पाकिस्तानी काश्मीर पाकिस्तान कडे राहील .
झिया उल हक व राजीव गांधी यांच्यात या मुद्द्यावर ८० च्या दशकात चर्चा झाली होती. परंतु झिया व राजीव गांधी दोघेही नजीकच्या अंतराने गेल्यामुळे त्यावर पुढे चर्चा होउ शकली नाही. ही चर्चा सुरू असतानाचा काश्मिरमध्ये थेट युद्ध करण्याच्या ऐवजी दहशतवादाच्या मार्गाने भारताला नामोहरम करून काश्मिर मिळविण्याची एक समांतर योजना झियाने सुरू केली होती. दरम्यानच्या काळात आधी बेनझीर, नंतर नवाझ शरीफ आणि नंतर मुशर्रफ यांनी झियाने सुरू केलेली दहशतवादाचीच योजना पुढे नेल्यामुळे सर्व गणितेच बदलून केली. सध्याची ताबारेषा हीच कायमस्वरूपी सीमारेषा मानण्यास भारतातून फारसा विरोध होणार नाही. परंतु पाकिस्तानातून या तोडग्याला जबरदस्त विरोध होईल. काश्मिरीसुद्द्धा या तोडग्याच्या विरोधात असतील. त्यामुळे हा तोडगा प्रत्यक्षात येणार नाही. हा तोडगा अधूनमधून माध्यमात येतो, परंतु मनमोहन सिंगांच्या काळात यावर खूप प्रगती झाली होती असे वाटत नाही. जरी सध्याची ताबारेषा हीच कायमस्वरूपी सीमा म्हणून मान्य केली तरी जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवित नाही तोपर्यंत या तोडग्याला अर्थ नाही.
2. बॉर्डर वरची आर्मी ओमी करून फ्री व्यापार आणि लोकांची movement चालू करायांची .
भारत-पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून व्यापार सुरूच आहे. लोकांची आवकजावकही सुरू आहे.
3. भारत आणि पाकिस्तान कोणत्याही दाहशदवादी कृत्याला डायरेक्ट किंवा इन डायरेक्ट पाठिंबा देणार नाहीत .
भारत दहशतवाद्यांना अजिबात पाठिंबा देत नाही. पाकिस्तान मात्र उघडपणे दहशतवाद्यांना सक्रीय पाठिंबा देतो. अनेकवेळा मागणी करूनसुद्धा दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे पाकिस्तानने थांबविले नाही व भविष्यातही ते थांबणार नाही. पाकिस्तानची भूमिका ठाम असल्याने या मुद्द्यावर चर्चा होऊच शकत नाही व झाली तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.
4. जॉईंट मॅनेजमेंट ऑफ काश्मीर .
हा अत्यंत अव्यवहारी तोडगा आहे. हा दोन्ही देशातील कोणालाही मान्य होणार नाही. जॉईंट मॅनेजमेंट करण्याच्या प्रदेशात पाकिस्तान पाकव्याप्त काश्मिरचा समावेश करणार नाही. भारतातील काश्मिर जॉईंटली मॅनेज करणे हे भारत कधीही मान्य करणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या प्रदेशावर दोघांनी संयुक्तरित्या राज्य करावे हे काश्मिरी कधीही मान्य करणार नाहीत. हा तोडगा कधीही प्रत्यक्षात येणार नाही.
चर्चे मधून खूप काही साध्य होऊ शकत.
या प्रश्नात सर्वांच्याच ठाम भूमिका असल्याने चर्चेच्या कितीही फेर्‍या केल्या तरी फलनिष्पत्ती शून्य असेल. भारताची सध्याची भूमिका योग्य आहे. चर्चेचे गुर्‍हाळ सुरू ठेवून आपण लवचिक आहोत हे दाखवून देणे व पाकिस्तानी सैन्य व दहशतवादी यांना सैन्याच्या माध्यमातून चोख उत्तर देणे व त्याचवेळी कोणतीही पडती भूमिका न घेता दडपणाखाली अयोग्य तडजोड न करणे ही भारताची भूमिका अत्यंत योग्य आहे. १९८० ते १९९५ या काळात पंजाबमध्ये सुद्धा फुटीरतावाद व दहशतवादाला उधाण आले होते. भारताने दहशतवाद्यांपुढे नमते न घेता व फुटिरतावाद्यांच्या मागण्या मान्य न करता दहशतवाद्यांविरूद्ध कठोर कारवाई करून दहशतवाद संपुष्टात आणला. त्यात महत्वाची भूमिका पंजाबमधील नागरिकांची होती. सुरवातीला फुटिरतावादी व दहशतवाद्यांना बर्‍यापैकी पाठिंबा देणार्‍या पंजाब्यांना काही काळाने त्यातील फोलपणा लक्षात आला व त्यांचा दहशतवाद्यांना व फुटिरतावाद्यांना असलेला पाठिंबा बंद झाल्यामुळे तिथे शांतता निर्माण होऊन तो प्रश्न सुटला. त्यानंतर दहशतवादाचे पुनरूज्जीवन करण्याचा अनेकवेळा प्रयत्न करूनसुद्धा पंजाब शांत आहे. काश्मिरमधील नागरिकांना सुबुद्दी सुचून त्यांनी दहशतवाद्यांना व फुटिरतावाद्यांना पाठिंबा द्यायचे थांबविले तर तिथे आपोआपच शांतता प्रस्थापित होईल. चर्चा किंवा दहशतवाद्यांच्या कारवायातून किंवा फुटिरतावाद्यांच्या पाठीशी उभे राहून आपल्याला काहीही मिळणार नाही व आपले नुकसानच होत राहील हे त्यांच्या जेव्हा लक्षात येईल तो सुदिन.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी आपले विचार जुळत नसले तरी तुम्ही नेहमी मुध्येसुद मांडणी करता हे आवडत । असो माझा मुद्दा ऐवडाच होता की कोणतेही मुद्दे ठाम नसतात थोडी लवचिकता असते आणि एकदा दोनी देशामद्वे पोलिटिकल कंमिटमेंट झाली की तुमाला किंवा मला मुद्दे पटतात कि नाही याचा कोणी विचार हि करणार नाही। भारत दहशतवाद नाही पण पाकिस्तान मध्ये अशांतता पसरवण्यात माहीर आहे, कराची अशांतता, बालुचिस्तान अशांतता आणि RAW यावर जालावर शोधा। बाकी पंजाब मध्ये वरवरची शांतता आहे असं मला वाटत, अजून हि काही लोकांमध्ये खलिस्तान ला सॉफ्ट कॉर्नर आहे ( हि माजी शंका आहे चुकीची असू शकते कारण मी पंजाब मधील newspaper खालच्या कंमेन्ट वाचून हे मत बनवलं आहे ) बाकी गोल्डन टेम्पल मधून भिंगरेवाला च्या तसबिरी कोणीही कडू शकत नाही बर का । पंजाब हे मिलिटरी आणि पोलिटिकल अँप्रोच चे उत्तम उदाहरण आहे, आजच अकाली दल हे पुराणे फुटीरवादीच (सॉफ्ट) आहेत । बाकी माझे मुद्दे मी मांडले आहेत हे बोलून इथेच थांबतो।

In reply to by अमितदादा

अमिदददादा, सरकार अशी पोलिटीकल कमीटमेंट करत आहे, अशी शंका जरी आली तरी पाकिस्तान लश्क्रर नजर वक्र करते ल्गेच सरकारची भाषा बदलते. हे आपल्याला बेनझीर भुत्तो, नवाझ शरीफ(?), झरदारी या प्रत्येक पंतप्रधानाच्या वेळेस दिसून आले, त्यामुळे तो विषय सोडुन बोला. बाकी खलिस्तानसाठी पाकिस्तानने पुर्ण प्रयत्न करुन स्थानिक जनतेची पूरेशी साथ न मिळाल्यमुळेच पंजाब भारतात आहे. देशद्रोही तर स्रर्वच राज्यात आहेत, पण स्थानिक जनतेची पूरेशी साथ न मिळाल्यास ते निष्प्रभ ठरतात.

In reply to by अमितदादा

माझा मुद्दा ऐवडाच होता की कोणतेही मुद्दे ठाम नसतात थोडी लवचिकता असते आणि एकदा दोनी देशामद्वे पोलिटिकल कंमिटमेंट झाली की तुमाला किंवा मला मुद्दे पटतात कि नाही याचा कोणी विचार हि करणार नाही।
काही मुद्द्यांवरील भूमिका अजिबात लवचिक नसते व ती लवचिक नसायलाच हवी. उदाहरणार्थ अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना किंवा दहशतवादी हल्ले करणार्‍यांना किंवा बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा हवीच. त्यात कोणतीही लवचिकता नसते.
भारत दहशतवाद नाही पण पाकिस्तान मध्ये अशांतता पसरवण्यात माहीर आहे, कराची अशांतता, बालुचिस्तान अशांतता आणि RAW यावर जालावर शोधा।
हे आरोप अधूनमधून पाकिस्तान करीत असतो. परंतु त्यात तथ्य नाही. कराची व सिंध प्रांतात ८० व ९० च्या दशकात जिये सिंध ही चळवळ जोरात होती. सिंध प्रांताला वेगळ्या देशाचा दर्जा मिळावा यासाठी मुहाजिर कौमी मुव्हमेंट या संघटनेचा प्रमुख अल्ताफ हुसेन या मागणीसाठी हिंसक आंदोलन करीत होता. त्याच्या मागणीला सिंध प्रांतात बराच पाठिंबा होता. पाकिस्तान सरकार त्याच्या मागे हात धुउन लागल्यावर तो लंडनला पळाला व शेवटपर्यंत तो तिथेच राहिला. नुकतेच त्याचे निधन झाले. तो लंडनला गेल्यावर ती चळवळ थंडावली व आता ती चळवळ जवळपास संपलेली आहे. बर्‍याच पूर्वी अफगाणिस्तान सीमेच्या दोन्ही बाजूकडील पठाणांनी स्वतंत्र पख्तुनिस्तानची मागणी केली होती. पण ती मागणी फारशी पुढे रेटली गेली नाही. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागण्या अधूनमधून येत असतात. पण त्या चळवळीत फारसा दम नाही. या सर्व चळवळींमागे भारत व रॉ आहे असा पाकिस्तान अधूनमधून आरोप करतो. परक्या देशातील कोणत्याही चळवळीला पाठिंबा देण्यासाठी व त्यात सक्रीय सहभाग देण्यासाठी स्थानिक फितुर व्हावे लागतात. पाकिस्तानात हिंदू २ % पेक्षाही कमी आहेत. त्यातले बरेच सिंध प्रांतात आहेत. उर्वरीत भागात हिंदू जवळपास नाहीतच. अशा परिस्थितीत भारताला स्थानिकांचा पाठिंबा मिळणे जवळपास अशक्य आहे. भारत पाकिस्तानमध्ये अशांतता पसरवतो हे एक मिथ आहे.
बाकी पंजाब मध्ये वरवरची शांतता आहे असं मला वाटत, अजून हि काही लोकांमध्ये खलिस्तान ला सॉफ्ट कॉर्नर आहे ( हि माजी शंका आहे चुकीची असू शकते कारण मी पंजाब मधील newspaper खालच्या कंमेन्ट वाचून हे मत बनवलं आहे ) बाकी गोल्डन टेम्पल मधून भिंगरेवाला च्या तसबिरी कोणीही कडू शकत नाही बर का । पंजाब हे मिलिटरी आणि पोलिटिकल अँप्रोच चे उत्तम उदाहरण आहे, आजच अकाली दल हे पुराणे फुटीरवादीच (सॉफ्ट) आहेत ।
पंजाब मध्ये फुटिरतावादाचे पुनरूज्जीवन अशक्य आहे. पाकिस्तानने तसा प्रयन्त अनेकवेळा करून पाहिलेला आहे, परंतु त्यांना कायमच अपयश आले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असहमत प्रतिवाद करत नाही. चर्चा करणे म्हणजे दहशतवाद ला सॉफ्ट कॉर्नर न्हवे. बाकी अल्ताफ हुसेन जिवंत आहे।

In reply to by अमितदादा

काहीतरी गोंधळ दिसतो. अल्ताफ हुसेनच्या मृत्युबद्दल उलटसुलट बातम्या आहेत. https://www.youtube.com/watch?v=JTjzSNGePKU http://lifewithstyless.blogspot.in/2016/03/mqms-chief-altaf-hussain-die…

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या ह्या वाक्याला माझा प्रतिसाद "भारत पाकिस्तानमध्ये अशांतता पसरवतो हे एक मिथ आहे." तुम्ही innocent आहेत की ignorant हे कळत नाही. पाकिस्तान भारतात अशांतता आणि दहशतवाद पसरवत असेल तर भारताने त्यांची भाषा त्यांना शिकवायलाच हवी हे माझे मत आणि RAW चा पाकिस्तान विभाग हे काम करत आहे आणि असणार हे माझे मत ( जे तुम्ही नाकारू शकता ). बाकी कुलभूषण जाधव पाकिस्तान मध्ये व्यापारासाठी किंवा टुरिझम साठी गेलेले म्हणत असाल तर धन्य आहे । आता मी म्हणतो याला काय पुरावा नाही कारण गुप्तहेर संस्था काय रिपोर्ट छापून जालावर नाही टाकणार ।

In reply to by अमितदादा

पुरावा नसताना कसा विश्वास ठेवायचा? नुसत्या पर्सेप्शनला किंवा विशफुल थिंकिंगला अर्थ नसतो.

In reply to by संदीप ताम्हनकर

1. 'सैन्याला (विशेष) हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी (देशातील) उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे.' 2. 'एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.'
सैन्याचे विशेष हक्क सहन करायचे नसतील तर अतिरेक्यांना पाठिंबा देणे थांबवा, अतिरेक्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर येउन निदर्शने करणे व पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणे थांबवा, सैन्यावर व पोलिसांवर हल्ले करणे बंद करा, आझादीच्या मागण्या बंद करा. हे सर्व बंद झाले तर तिथे मोठ्या प्रमाणात सैन्य ठेवण्याची व सैन्याला विशेषाधिकार देण्याची गरजच भासणार नाही. मुळात फक्त काश्मिरमध्येच सैन्याला विशेषाधिकार द्यायची का गरज भासली हे समजतंय का? याला तिथले नागरिकच कारणीभूत आहेत. त्यांच्याच देशद्रोही कृत्यांमुळे हे करावे लागत आहे. काश्मिरप्रमाणे राजस्थान व पंजाब राज्यांची सीमा सुद्धा पाकिस्तानला लागून आहे. तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्य का नाही व तिथल्या सैन्याला विशेषाधिकार का दिलेले नाहीत याचा अभ्यास केलात तर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
3. 'श्री डोवाल यांची काशिरातील कामगिरी काय हे अजून समोर यायचंय.'
त्यांनी काय तुम्हाला रोजचं काम रिपोर्टिंग करायच का? तुम्ही त्यांचे वरीष्ठ आहात का? त्यांची जी काही कामगिरी असेल ती योग्य वेळी समोर येईलच. नाही समोर आली तरी फरक पडत नाही. त्यांच्यासारख्यांनी आपल्या कामात जितकी गुप्तता राखता येईल तितकी राखावी. तेच देशहिताचे आहे. त्यांची कामगिरी समजण्यासाठी इतके कासावीस झाले असाल तर माहिती अधिकारात अर्ज दाखल करून त्यांची कामगिरी विचारा किंवा सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून त्यांना आपल्या कामगिरीचा अहवाल जनतेसमोर ठेवण्यास सांगा.
4. 'बहुतेकवेळा कॅमेरा सैन्याच्या (बाजूने) समोरील आंदोलकांचे चित्रण करतो. या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहेच.'
दाखवा बरं दुसरी बाजू.
5. 'दहशतवादाचे पीक पेरण्यासाठी जमिनीची मशागत भारतीय सैन्यदले पाकिस्तानला फुकटात करून देतायत, असे चित्र आहे.'
नेहमीप्रमाणेच अत्यंत हास्यास्पद विधान. सैन्याला विशेषाधिकार नसतानाच्या काळात सुद्धा पाकिस्तान दहशतवादाची पेरणी करतच होता.
6. ‘५६ इंची छाती वाल्यांकडून अशी काय Break Through Strategy वापरली जाते हे पाहण्यासाठी देशातील जनता उत्सुक असताना जे चाललंय ते खेदजनक आहे आणि विशेष आशादायक नाही हे सत्य वारंवार समोर येतंय.’
या सर्व अशांततेचे मूळ कलम ३७०, काश्मिरींचे दहशतवादी व पाकिस्तान प्रेम आणि आझादीची मागणी यामध्ये आहे. जोपर्यंत काश्मिरींना सदबुद्धी येत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहणार.
या श्रीगुरुजी नावाच्या आयडीने, 'पोस्ट लिहिणारा मूर्ख आहे' एवढेच एका प्रतिसादात जागोजागी लिहिले आहे. श्रीगुरुजी या परमदेशाभिमानी आयडीने 'काश्मिरची समस्या सोडविणे हे भारताच्या हातात नसून काश्मिरी व पाकिस्तानच्याच हातात आहे. पाकिस्तानने काश्मिरींना भडकाविणे थांबविले .....' असा नियोगाचा मार्ग सुचवला आहे. याच श्रीगुरुजींनी 'काश्मिरींच्या डोळ्यांना झालेल्या जखमा पॅलेट गन मुळे नसून दंगेखोरांनीच फेकलेल्या ग्रेनेड मधील खिळे इत्यादींनी झाल्याचा' ही जावईशोध लावलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सैन्यावर फेकलेल्या 'खिळे आणि काचा वगैरेने ठासून भरलेल्या' या ग्रेनेड्सनी सैन्यातील एकही जवानाच्या डोळ्यांना इजा झालेली नाही. सैनिक केवळ स्व-संरक्षण करताना एवढी माणसं मारताय आणि जायबंदी करताय असंही श्रीगुरुजी उवाच.
मी परदेशाभिमानी? बरे आहात ना? पोस्ट लिहिणारा मूर्ख आहे हे मूळ लेखातून व नंतरच्या प्रतिसादातून अनेकवेळा सिद्ध झालेलं आहे. वर तोंड करून सैनिकांना स्वतः भरलेल्या टीचभर टॅक्सच्या गप्पा सांगणारा शहाणा असतो का? माझ्या आधीच्या प्रतिसादात 'काश्मिरमध्ये जे तरूण आंधळे झाले आहेत त्याला फक्त पॅलेट गन्स कारणीभूत नाहीत. 'असे लिहिले होते. ते वाचले असते व समजले असते तर "याच श्रीगुरुजींनी 'काश्मिरींच्या डोळ्यांना झालेल्या जखमा पॅलेट गन मुळे नसून दंगेखोरांनीच फेकलेल्या ग्रेनेड मधील खिळे इत्यादींनी झाल्याचा' ही जावईशोध लावलाय. " असा बाष्कळ आरोप केलाच नसता. डोळ्यांच्या जखमा पॅलेट गन्सप्रमाणे दंगलखोरांनी मागून फेकलेल्या ग्रेनेड्समुळे सुद्धा झालेल्या आहेत असे मी लिहिले होते. सध्या सुरू असलेल्या आंदोलनात जखमीची संख्या ३००० च्या आसपास आहे. त्यात जवळपास निम्मे सैनिक व पोलिस आहेत. अनेक पोलिस व सैनिकांच्या डोळ्यांना जखमा झालेल्या असून त्यांची चित्रे आंतरजालावर अनेक ठिकाणी पहायला मिळतात. दुर्दैवाने तुमच्यासारख्या सैनिक द्वेष ठासून भरलेल्यांना फक्त काश्मिरींच्याच जखमा दिसतात. जमावाने सैनिक व पोलिसांवर केलेले हल्ले व त्यांच्या जखमा दिसत नाहीत. सैनिक जो काही प्रतिकार करीत आहेत तो फक्त स्वसंरक्षणासाठीच करीत आहेत. सुरवातीला दगडफेकीपासून सैनिक व पोलिस स्वत:ला वाचवायचा प्रयत्न करतात. नंतर जमाव अनावर झाला तर अश्रूधूर सोडून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न करतात. तरीही जमाव शांत झाला नाही तर नाईलाजाने पॅलेट गन्सचा वापर करावा लागतो.
केवळ हिंदुत्ववादी आणि संघी अजेंडा कुठेही आणि कायम रेटत राहणं किती गांभीर्याने घ्यायचं? कुठच्याही चुलीत एक संघी लाकूड घालायचच याला काय अर्थ आहे!
यात कसला आलाय हिंदुत्ववादी आणी संघी अजेंडा? सैनिक व पोलिस अनेक महिने बुर्‍हान वाणीसारख्या अतिरेक्याच्या मागावर होते ते काय हिंदुत्ववादी व संघाच्या आदेशावरून? त्याचा ठावठिकाणा शोधून गोळीबारात तो मेला तो काय हिंदुत्ववादी व संघाच्या सांगण्यावरून? संचारबंदी मोडून काश्मिरी रस्त्यावर उतरून पोलिस व सैनिकांवर हल्ले करतात ते काय हिंदुत्ववादी व संघाच्या सांगण्यावरून? आपण काय निरर्थक व बेताल बरळतोय हे समजतंय का? तुमच्या डोळ्यावरच्या चष्म्याची एक काच सैनिक द्वेषाची आहे व दुसरी काच हिंदूत्ववादी/संघाच्या द्वेषाची आहे. त्यातून काय दिसणार ते स्पष्ट आहे.
मागची पंचवीस वर्षे सैन्याची पूर्ण ताकद वापरूनही आणि काश्मिरींच्या दोन पिढ्या सडवूनही आज पंचवीस वर्षानंतर आझादीचा नारा आहेच. त्यामुळे सैन्य वापरून हा प्रश्न सुटू शकत नाही हे सिद्ध झालंय. केवळ आफ्स्पा कायदा नाही तर PSA (The Jammu and Kashmir Public Safety Act, 1978) कायदा देखील हटवला पाहिजे ही मागणी जोर धरतेय.
जगात मुस्लिम जिथे जिथे संख्येने जास्त आहेत तिथे तिथे ते फुटिरतावादी आंदोलने करून वेगळा देश तोडून मागतात. अनेक देशांनी मुस्लिमांच्या फुटिरतावादी प्रवृत्तीचा वाईट अनुभव घेतलेला आहे. भारतात तेच सुरू आहे. काश्मिर हे एकमेव राज्य मुस्लिम बहुल राज्य आहे आणि तिथेच आझादीच्या मागण्या होतात यात काहीही आश्चर्य नाही. सैन्य वापरून कदाचित हा प्रश्न सुटणार नसेल पण सैन्य न वापरले तर काश्मिर केव्हाच पाकिस्तानच्या घशात जाईल व उर्वरीत संपूर्ण भारताला मोठा धोका निर्माण होईल. हे टाळायचे असेल तर सैन्य हवेच. काही जण अ‍ॅफ्स्पा हटवा किंवा पीएसए हटवा अशा वाटेल त्या मागण्या करतील. अशा मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावणे हेच योग्य धोरण आहे. मूठभर तथाकथित मानवतावाद्यांच्या, पाकिस्तानप्रेमींच्या व निधर्मांधांच्या मागण्यांपुढे मान तुकवून हे कायदे रद्द केले तर ती मोठी घोडचूक असेल. त्यामुळे कोणतेही सरकार हे कायदे रद्द करणार नाही. हे कायदे रद्द व्हावे असे वाटत असेल तर काश्मिरींनी अतिरेक्यांना पाठिंबा देणे थांबवावे, अतिरेक्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर येउन निदर्शने करणे व पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणे थांबवावे, सैन्यावर व पोलिसांवर हल्ले करणे बंद करावे व आझादीच्या मागण्या बंद करून व ३७० वे कलम रद्द करण्याची मागणी स्वतःहून करावी. असे झाले तर या कायद्यांची गरजच राहणार नाही.

In reply to by संदीप ताम्हनकर

मागची पंचवीस वर्षे सैन्याची पूर्ण ताकद वापरूनही आणि काश्मिरींच्या दोन पिढ्या सडवूनही आज पंचवीस वर्षानंतर आझादीचा नारा आहेच. त्यामुळे सैन्य वापरून हा प्रश्न सुटू शकत नाही हे सिद्ध झालंय. केवळ आफ्स्पा कायदा नाही तर PSA (The Jammu and Kashmir Public Safety Act, 1978) कायदा देखील हटवला पाहिजे ही मागणी जोर धरतेय.
जम्मू-काश्मिरमधील सैन्याच्या उपस्थितीबद्दल गैरसमज झालेला दिसतोय. तिथे जे सैन्य तैनात आहे व सैन्याला अ‍ॅफ्स्पा सारखा विशेषाधिकार असलेला कायदा दिलेला आहे तो काश्मिर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी किंवा आझादीच्या नार्‍यांवर उपाय काढण्यासाठी नाही. काश्मिर हे पाकिस्तान या शत्रूराष्ट्राच्या सीमेवरील राष्ट्र आहे. पाकिस्तानने आजतगायत भारताबरोबर ४ वेळा युद्ध केलेले आहे. पाकिस्तान आपल्या देशात दहशतवादी तयार करून त्यांना शस्त्रे, एके४७, ग्रेनेड्स, राजकीय व आर्थिक पाठिंबा देऊन त्यांना निष्पाप भारतीयांचे प्राण घेण्यासाठी काश्मिरमार्गे भारतात पाठवितो. पाकिस्तानी सैन्यापासून देशाचे रक्षण करण्यासाठी व दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी तिथे सैन्य तैनात केले आहे.

संदीप ताम्हनकर, तुम्ही दिलेल्या पहिल्या चलचित्रातला सव्वा मिनिटांचा भाग पहिला. मेलो तिच्यायला हसून हसून. रिक्षावाला म्हणतो की जो कोणी इथे येईल तो व्हिसा घेऊन यायला पाहिजे. १९४८ साली बारामुल्लामध्ये पाकी घुसखोर कसला व्हिसा घेऊन आले होते? १५००० मुस्लीमांपैकी १२००० मारले गेले ना तेव्हा? काश्मिरात पुराचं पाणी घुसलं होतं ते कोणता व्हिसा घेऊन घुसलं होतं? रिक्षावाला नंतर आजून एक भयाण हास्यास्पद विधान करतांना दाखवलाय. म्हणे इथे (=श्रीनगरात) सही लोकं राहतात. जुलूम करत नाहीत आणि करूही देत नाहीत. मग काश्मिरी हिंदूंना नेसत्या कपड्यांवर हाकलून लावलं तेव्हा हे थोर लोकं काय करत होते ? असो. तुम्हाला जे सांगायचंय ते स्पष्टपणे स्वत:च्या शब्दांत मांडा. उगीच हा व्हिडियो पहा आणि तो लेख वाचा वगैरे कालहरण नको. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रिक्षावाला म्हणतो की जो कोणी इथे येईल तो व्हिसा घेऊन यायला पाहिजे. १९४८ साली बारामुल्लामध्ये पाकी घुसखोर कसला व्हिसा घेऊन आले होते? १५००० मुस्लीमांपैकी १२००० मारले गेले ना तेव्हा? काश्मिरात पुराचं पाणी घुसलं होतं ते कोणता व्हिसा घेऊन घुसलं होतं? रिक्षावाला नंतर आजून एक भयाण हास्यास्पद विधान करतांना दाखवलाय. म्हणे इथे (=श्रीनगरात) सही लोकं राहतात. जुलूम करत नाहीत आणि करूही देत नाहीत. मग काश्मिरी हिंदूंना नेसत्या कपड्यांवर हाकलून लावलं तेव्हा हे थोर लोकं काय करत होते ?
काय बिनडोक रिक्षावाला आहे? भारतातल्या भारतात व्हिसा? आपण राहतो त्या ठिकाणी भारतीयांनी व्हिसा घेऊन यावे असे वाटत असेल तर बाडबिस्तारा गुंडाळून जा पाकिस्तानला निघून.
तुम्हाला जे सांगायचंय ते स्पष्टपणे स्वत:च्या शब्दांत मांडा. उगीच हा व्हिडियो पहा आणि तो लेख वाचा वगैरे कालहरण नको.
असला एकतर्फी प्रोपागंडा प्रचार करणे हेच इथल्या निधर्मांधांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. एकवेळ अतिरेकी परवडले, पण हे घरचे भेदी जास्त धोकादायक आहेत.

केवळ हिंदुत्ववादी आणि संघी अजेंडा कुठेही आणि कायम रेटत राहणं किती गांभीर्याने घ्यायचं? कुठच्याही चुलीत एक संघी लाकूड घालायचच याला काय अर्थ आहे!
कुठल्याही चुलीत तुम्हाला 'संघी' लाकूडच दिसत असेल तर त्याला काय करायचं ताम्हनकर साहेब? तुमचे सर्व लेख, प्रतिसाद एका घटनेबद्दल सविस्तर चर्चा करतात पण मध्येच हे संघप्रकरण कुठून घुसडता? कश्मीरप्रश्नाशी संघाचा नेमका काय संबंध? कश्मीर प्रश्न संघाने निर्माण केला की चिघळवून ठेवलाय? कश्मीर प्रश्नाबाबत संघाचा नेमका रोल काय ते सांगा पाहू आधी. उगाच तुमची संघाशी काय दुष्मनी असेल ती स्पेस्श्यल मधे काढा बाहेर. आस्फा कायदा, कश्मीरची परिस्थिती, पाकिस्तानचे कुलंगड्या, स्थानिकांचे आतंकवाद्यांना समर्थन, ह्या सर्वामागे संघच आहे असा काही निर्णय देऊन मोकळे होताय तुम्ही. मोदी सत्तेत आले म्हणून पाकधार्जिण्या कश्मिरींना कसे सरळ करतील अशा वल्गना करणार्‍यांचा योग्य तो समाचार घ्या. पण सैन्य, सरकार, मोदी, आणि संघभक्त ह्यांना एकत्र करुन तुम्ही मुद्दा भरकटत नेत आहात हे लक्षात येतंय काय तुमच्या. एका भारतीय सैनिकाला तुमच्या टिचभर टॅक्सचं गुणगान गाऊन दाखवताय, जरा मनाची लाज बाळगा. तुमच्या टिचभर ट्याक्समधे तुम्हालाच लागणार्‍या नागरी सेवा पुरवता पुरवता नाकी नौ येतंय. एवढीच धमक तुम्ही तुमच्या गल्लीतल्या नगरसेवकाला, मंत्र्याला दाखवून बघा. तुमच्या नखभर ट्याक्सच्या जीवावर देशाचे सैनिक विकत घेतलेले नाहीत तुम्ही एवढं लक्षात ठेवा आणि इथली असंबंद्ध बडबड थांबवा. संघावरच टिका करायची असेल तर जरा व्यवस्थित मुद्दे घेऊन करा. कोण नाही म्हणतंय. पण असले बुद्धीभेद करणारे लेख टाकणे शुद्ध देशद्रोह आहे. तुमच्यामाझ्या सर्वांसाठी शीर हातात घेऊन लढणार्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे. सैनिक जर एवढेच बेताल असते तर तुमचा ट्याक्सचा माज त्याने नुसता दोन फटक्यात उतरवला असता. सारासारविवेकबुद्धी गमावलेल्यांच्या नादाला काय लागता म्हणून त्यानेही तुम्हाला सोडून दिलं असेल.

In reply to by संदीप डांगे

सैनिक जर एवढेच बेताल असते तर तुमचा ट्याक्सचा माज त्याने नुसता दोन फटक्यात उतरवला असता.
+१

In reply to by संदीप डांगे

सैन्याच्या चूक नसतील असे नाही त्याबद्दल योग्य ती शिक्षा त्यांना व्हावी म्हणून आग्रह धरणे , हे योग्य आहे पण त्या चुकांचे अवडंबर आणि बाकी देशद्रोहींचे उदात्तीकरण हा भयानक प्रकार थांबला पाहिजे

......चंपा-माई मोड ऑण
आता खरे दिग्गज लोकांचे महत्वपूर्ण प्रतिसाद यायला लागलेत. सुरवातीला खाल्ल्या मिठाला आणि चालू OROP ला जागणारे प्रतिसाद जरा जास्तच होते.
याने हे वाक्य कोणाला उद्देशुनकाय समजुन लिहिले आहे ?? असे आमचे हे विचारत होते.

अरे तामण्या (.....) .. ज्या सैनिकांच्या जीवावर या देशात निर्धास्त फिरतोस त्यांनाच कुठलेही पुरावे नसताना नावे ठेवायला तुला शरम वाटत नाही काय रे फक्त ३ वेळा काश्मीरमध्ये फिरून आलास त्यातून तुला कसे कळाले रे की स्वतःचे घरदार सोडून फक्त काश्मिरी लोकांच्या आणि पर्यायाने देशाच्या संरक्षणासाठी आलेले आपले सैनिक तिथे अत्याचार करतात. ज्यांच्यामुळे तू तिथे फिरू शकलास त्यांनाच निर्लज्जपणे आमच्या टेक्स वर तुम्ही जगता असे म्हणताना असा किती टेक्स भरतो रे तू ? स्वताला हुशार समजत असशील तर काश्मिरी लोकांकडून त्रास होऊनही त्यांना संरक्षण देणाऱ्या एखाद्या सैनिकांच्या तुकडीत एक दिवस राहून बघ. जेंव्हा अंगावर दगडं पडतील ना तेंव्हा मिसळपाव वर असले घाणेरडे लेख छापायची ताकद उरणार नाही . बाकी मोदी , संघ वगैरे च्या द्वेशातून असले घाणेरडे लिखाण केले असल्याची दाट शक्यता मला वाटत आहे जे तुझ्या फालतू आणि निर्लज्ज प्रतिसादातून दिसतेच आहे तुझ्या लेखाची लक्तरं सगळ्यांनी पुरेपूर फाडलीच आहेत तेंव्हा असले काही लिहिण्याआधी, आणि स्वताचा मूर्खपणा जगाला उघडपणे दाखवण्याआधी थोडी अक्कल वापर . भाषेबद्दल क्षमस्व पण तुझ्यासारख्याना हे हि कमीच . विचारांचा मुकाबला विचारांनी आणि चांगल्या भाषेत करावा हे आम्हालाही समजते पण घाणीत लोळनाऱ्या प्राण्याचा मुकाबला विचारांनी करून दाखवा असे म्हटल्यास ते शक्य नसते . हे तुझ्यासाठी खास. नाहीतर येशील पुन्हा ओरडत कि बघा भक्त वगैरे कसली भाषा वापरतात वगैरे नेहेमीचे तूणतूणे घेऊन . तूर्तास इतकेच

In reply to by सुज्ञ

विचारांचा मुकाबला विचारांनी आणि चांगल्या भाषेत करावा हे आम्हालाही समजते पण घाणीत लोळनाऱ्या प्राण्याचा मुकाबला विचारांनी करून दाखवा असे म्हटल्यास ते शक्य नसते .
सहमत !!

In reply to by सुज्ञ

च्यायला हे असलं बोलून (म्हणजे असली भाषा वापरून) तुम्ही लोक्स जे मुळात न्याय्य आहे त्यालाच श्रीमुखावर डांबर फासता आहात राव, उगा ताम्हनकरांच्या हाती कोलीतरुपी मुद्दा देण्याचा हा प्रकार काही रुचला नाही, हे स्पष्ट नोंदवतो. असो

काश्मिरी लोकांसाठी गळे काढणाऱ्या व भारतीय लष्कराला नावे ठेवणाऱ्या लोकांशी कशी चर्चा करावी.How to Deal With Pro-Pakistanis & Anti-Indian's: The Newshour Debate - (26th July 2016)https://www.youtube.com/watch?v=M8jtVBt28nU

In reply to by गणेश उमाजी पाजवे

गणेश उमाजी पाजवे, मेजर आर्य एकदम सही बोललेत! खरंतर काश्मीरवर चर्चा करतोच कशाला आपण भारतीय? चर्चा थेट पाकिस्तानवर व्हायला हवी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

दुःख या गोष्टीच वाटत कि आपलेच लोक्स आज भारतीय लष्कराविरुद्ध उभे ठाकलेत.भारताला पाकिस्तानपासू धोका आहेच पण त्यापेक्षा जास्त धोका या लोकांचा आहे जे स्वतःला मानवतावादी म्हणवून घेतात. आता वरच्या लिंक मध्ये ज्या बाई बोलत आहेत माहिरि सूद म्हणून त्यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी बुरहान वाणीला पुअर फेलो म्हणून संबोधले आहे व या एन्काउंटर ची चौकशी व्हावी कारण हे एन्काउंटर त्यांना फेक वाटते आहे.आता काय म्हणावे अशा लोकांना. अरे he is damn terrorist guys. जो माणूस AK - 47 घेऊन फिरतो, ज्याच्याजवळ ग्रेनेड्स आहेत. जो जवानांवर फायरिंग करतो त्याच्यासाठी तुम्ही गळे काढता ? लाज नाही वाटत तुम्हाला ? वरून हे आपले सुधींद्र कुलकर्णी सर, त्यांना काश्मीर चा प्रश्न पाकिस्तानबरोबर शांततेच्या चर्चेने सुटेल असे वाटते आहे. अरे आतापर्यंत एवढ्या चर्चा झाल्या त्यातून काय निष्पन्न झाले? मी काही पाकिस्तानशी आताच्या आता युद्ध करा असे म्हणत नाहीये.पण एक

भारताचा सुशिक्षित नागरिक म्हणून आज लष्कर ज्या परिस्थितीत काश्मीर मध्ये वावरतंय, आपलं संरक्षण करतंय, त्यांना आपण काही मदत करू शकत नसू तर त्यांना एक मॉरल सपोर्ट तरी देऊ शकतो ना आपण?

आता या मानवतावाद्यांनी एक नवीन मुद्दा समोर आणलाय तो म्हणजे भारतीय लष्कराने पॅलेट गन चा जो वापर केला काश्मीर मध्ये तो चुकीचा होता आपल्याला ऑफिस मध्ये गार गार थंड हवेत बसून हे लिहिताना अगदी सोप्प वाटत कि पॅलेट गन वापरणं कसं चुकीचं आहे वगैरे, पण जरा आपण कल्पना करूयात कि आपण भारतीय लष्करातले एक जवान आहोत आणि आपण आपल्या 15-20 सहकाऱ्यांसोबत 200-300 दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांना थोपवण्याचा प्रयत्न करत आहोत, यातले काही दंगलखोर चाकू-सुरे घेऊन आपले डोळे फोडायला येत असतील तर आपण त्यांची आरती ओवाळावी का? कि त्याचा सत्कार करावा?दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लहान मुले व महिला या सगळ्या प्रकारात जखमी झालेल्या आहेत, तर या सो कोल्ड मानवतावाद्यांच्या मते हे सगळे भारतीय जवानांमुळे झालेले आहे पण मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो कि या दंगलीमध्ये लहान मुले व बायका घराबाहेर पडतीलच का? या मानवतावाद्यांना हे का कळत नाही कि आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून दंगलखोरच या मुलांचा व महिलांचा संरक्षक कवच सारखा वापर करीत आहे म्हणून. या दंगलखोरांच्या पहिल्या फळीत नेहेमी हि लहान मुले व महिला असतात व दंगलखोर त्यांच्या मागून हल्ले करीत असतात. आता यात भारतीय लष्कराची चूक काय हे मला श्री. लेखकमहाशयाना विचारायचे आहे.

In reply to by गणेश उमाजी पाजवे

संपूर्ण सहमत. खालील वाक्यांविषयी तर अजून जास्त सहमत.
भारताला पाकिस्तानपासू धोका आहेच पण त्यापेक्षा जास्त धोका या लोकांचा आहे जे स्वतःला मानवतावादी म्हणवून घेतात.
भारताचा सुशिक्षित नागरिक म्हणून आज लष्कर ज्या परिस्थितीत काश्मीर मध्ये वावरतंय, आपलं संरक्षण करतंय, त्यांना आपण काही मदत करू शकत नसू तर त्यांना एक मॉरल सपोर्ट तरी देऊ शकतो ना आपण?
पण मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो कि या दंगलीमध्ये लहान मुले व बायका घराबाहेर पडतीलच का? या मानवतावाद्यांना हे का कळत नाही कि आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून दंगलखोरच या मुलांचा व महिलांचा संरक्षक कवच सारखा वापर करीत आहे म्हणून. या दंगलखोरांच्या पहिल्या फळीत नेहेमी हि लहान मुले व महिला असतात व दंगलखोर त्यांच्या मागून हल्ले करीत असतात.
___________________________________________________________________ >>> आता यात भारतीय लष्कराची चूक काय हे मला श्री. लेखकमहाशयाना विचारायचे आहे. किती अडाणीपणाचा प्रश्न! सर्व चूक भारतीय लष्कराचीच आहे. लहान मुलांच्या आडून दगडफेक करणारे व ग्रेनेड्स फेकणारे तरूण, अतिरेकी, स्वातंत्र्याची मागणी करणारे काश्मिरी, पाकिस्तानी समर्थक इ. पूर्ण निष्पाप असून त्यांची काहीही चूक नाही.

उद्या शुक्रवार, पुन्हा काश्मीरमध्ये तोच लाजीरवाणा खेळ होणार का ? मुलांना पुढे करून भाडोत्री संधिसाधू लोक अतिरेक्यांचे बाहुले बनणार का ? सरकार ने लष्करा ऐवजी मानव आयोग वाले आणि "थोर गळेकाढू विचारवंत" "उपेक्षितांचे अंतरंग" जाणणाऱ्या लोकांना पुढे पाठवावे. परवा पर्यंत काश्मीर प्रश्न सुटायला हरकत नाही.

काश्मीर चे वास्तव... तथाकथित बुद्धीवादींचा संत हाफि़ज सैद याच्या मुखाने वास्तव (सत्य आणि असत्यसुद्धा)... एका बाजूला काश्मीरमध्ये फितूरांना मदत आणि अतिरेकी पाठवत असल्याची बढाई मारत कबूली देत आहे (२८ जुलै २०१६ ला प्रसिद्ध)... तर दुसरीकडे आपण मानवतावादी संत असल्याचा मानभावी प्रचार पाकिस्तानी टिव्हीवर चालू आहे (२४ जुलै २०१६ ला प्रसिद्ध)... हे दुहेरी वागणे तथाकथित मानवतावाद्यांना समजत नाही इतका त्यांच्या बुद्धीचीचा स्तर कमी आहे असे अजिबात नाही. पण, संकुचित राजकिय आणि/अथवा आर्थिक स्वार्थाने प्रेरीत कांगावा करताना त्यांना भारताच्या बर्‍यावाईटाची पर्वा नाही हे स्पष्ट आहे. मुख्य म्हणजे, इतिहासात जेव्हा जेव्हा अतिरेकी विचारसरणीने बदल घडले आहेत, तेव्हा तेव्हा सर्वप्रथम कांगावाखोरांची मुंडकी उडवली गेली आहेत ("Revolution devours its own" — Le Vieux Cordelier). कारण, "असा स्वार्थाने प्रेरीत कांगावा करणारे त्यांचे सत्व आणि स्वत्व आपल्यापेक्षा अधिक बोली लावणार्‍या इतर कोणालाही सहज विकतील व आपल्याविरुद्ध कांगावा चालू करतील" हे वास्तव त्यांच्या बोलवत्या धन्यांना अनुभवाने पूरेपूर माहित झालेले असते; आणि सर्वसत्ताधीश झालेल्यांना त्याबाबतीत काडीचाही धोका पत्करणे ठीक वाटत नाही. मात्र, हे सार्वकालीक सत्य संकुचित स्वार्थाच्या उन्मादात कांगावाखोर नेहमी विसरतात... हे वर्तन त्यांच्या बुद्धिची मर्यादा अधोरेखीत करते.

काश्मीर आणि तिथले अंतर्गत मुद्दे ह्याविषयी मला जास्त ज्ञान नाही. तज्ज्ञांची चर्चा वाचतोय. पण या चर्चेवरून मला 'शूटआउट अट लोखंडवाला' सिनेमातला एक प्रसंग आठवला. त्या प्रसंगाच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच ह्या धाग्याला उत्तर ठरू शकेल असे वाटते. ATS ची टीम माया डोलस या सुपारी गुंडाचा एनकौंटर करते. खान (संजय दत्त) नावाचा पोलीस अधिकारी टीमचा प्रमुख असतो. या टीम विरुद्ध न्यायालयीन चौकशी सुरु होते. या टीमचा वकील असलेला अमिताभ बच्चन शेवटच्या प्रसंगात कोर्टाला एक प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच या केसचा निकाल असेल असे तो सांगतो. या धाग्याला अनुसरून त्या प्रश्नाचा आशय कायम ठेऊन थोडा बदल करून तो प्रश्न खाली विचारतोय. "आज आत्ता या क्षणी आपण सगळे आपापल्या कंपनीत / कार्यालयात/ इतर कुठल्या कामात व्यग्र आहोत . पण आपण सगळेच घराबाहेर आहोत असे समजा. घरात आपले कुटुंबीय आहेत (बायको, मुलं, आई-वडील). तेवढ्यात तुम्हाला कुठूनतरी असे कळते की तुमच्या घरातील दरवाज्याबाहेर याक्षणी एक माणूस बंदूक घेऊन उभा आहे आणि तो कुठल्याही क्षणी आतमध्ये शिरेल. तो माणूस खालील पैकी कोण असावा अशी तुम्ही प्रार्थना कराल ? 1. चोर/दरोडेखोर/ आतंकवादी किंवा 2. पोलीस / सैनिक

पूर्ण लेख वाचला , आणि त्यावरच्या सगळ्या प्रतीकिरिया सुद्धा वाचल्या. खूप दिवस झाले वाचतेय , मिपा मध्ये आल्यापासून मनोरंजन म्हणून इथले लेख वाचते परंतु हा लेख वाचल्यावर मनोरंजनाचा सोडा पण हसू कि रडू हेच समजत नाहीये एका प्रतिक्रियेत एका महाशयांनी असा लिहले आहे कि काश्मिरात फिरत असताना त्यांना हुर्रियत वाल्यानी मदत केली म्हणजे ...... जोक ओफ द इयर ... हसून हसून वेडे झाले झाले.... माझे बहुसंख्य मित्र आणि मैत्रिणी मुस्लिम आहेत त्यांच्याबरोबर हा लेख आणि प्रतिक्रिया शेअर केला , त्यांनी मला काही प्रश्न उपस्थित केले ते खालील प्रमाणे , परत कधी आपण काश्मीर ला गेलात तर नक्कीच टिकडेच्या हुर्रियत वाल्याना हा प्रश्न विचारा १. आतंकवादी अफजल गुरु च्या फाशीनंतर (तुमच्या भाषेत जनाब ) आमच्या भाषेत हरामी हाफिज सैद यांनी पाकिस्तान मधील एक ठिकाणी ( ठिकाणाचा नाव माहित नाही ) एका दिवसाचे जे उपोषण ठेवले होते त्यात हुर्रियत वाल्यांचे पुढारी सुद्धा गेले होते , म्हणजे तुमचा त्याला पाठिंबा आहे का ? २. जर हुर्रियत वाल्याना एव्हडेच वाटते कि काश्मीर ची जनता त्यांच्या सोबत आहे तर ते निवडणुकीत सहभाग का घेत नाहीत ? त्यांना हरण्याची भीती आहे का ? जर ते जिंकून आले तर त्यांची मागणी स्पष्टपणे भारतातल्या सरकारसमोर मांडू शकतात . मोदी साहेबांचे सरकार काही जास्त वेळ टिकेल असे तर दिसत नाही नंतर जे काही डाव्या लोकांचे किंवा tolerant म्हणजे सेक्युलर लोकांचे सरकार येईल ते नक्कीच त्यांच्या बाजूने विचार करतील. ३. POK मध्ये हुर्रियत वाले काय करतात ?? तिकडच्या लोकांना का नाही स्वतंत्र काश्मीर बद्दल काही बोलत ?? तिकडच्या सरकारला घाबरता कि त्यांच्या पाठबळावर तुम्ही काश्मीर मध्ये हिंसक कारवायांना पाठीशी घालता ?? ४. काश्मीर चा खूप सारा भाग चीन ने सुद्धा आपल्या घशात घालून ठेवला आहे (अकसाई चीन असाच कहितरी नाव आहे ) , मग तुम्ही म्हणजे हुर्रियत वाले तिथे काही करत नाहीत ? म्हणजे तुम्ही चीन ला पण घाबरता कि चीन चा सुद्धा तुम्हाला पाठिंबा आहे ?? तुमच्या माहितीसाठी एक सांगते , तुमच्या म्हणल्याप्रमाणे काश्मीर मध्ये पावला पावलावर सैनिक आहेत , ते तुमच्या आणि आमच्या आणि तिकडच्या जनतेच्या संरक्षणासाठी आहेत . त्यांना माहित नाही कि तुम्ही महाराष्ट्र मधून आलेत कि UP कि बिहार मधून कि पाकिस्तान मधून , तुमची तपासणी करणें आणि तुम्ही त्यांना करून देणे हे आपले कर्तव्य आहे. जर समजा कोणी आतंकवादी असेल आणि ते त्याला न तपासणी करता जाऊन देतील आणि तो आतंकवादी कोणत्या न कोणत्या मार्गाने महारष्ट्रात किंवा अजून कोणत्या ठिकाणी आला आणि त्याने कोणती दहशदवादी कारवाई घडवून आणली तर पुन्हा तुम्ही आपल्या सैनिकांनाच नवा ठेवणार कि त्यांची सेक्युरिटी बरोबर नाही म्हणून हे भारतात येऊ शकले ... म्हणू जर ते तुमच्या छातीवर काय डोक्यावर सुद्धा बंदूक ठेऊन तुमची तपासणी करत असतील तर त्यांना करू द्या. उगाच जे टॅक्स भारत त्याचा मज दाखवू नका. त्या बिचार्यांना ३५००० एव्हडी रक्कम पगार म्हणून मिळते , तिथे मंत्री लोक २,००,००० आणि त्याच्या वर पगार घेतात आणि काही करत नाही ना त्यांना माज दाखवा तुमच्या टॅक्स चा . तेव्हडी हिम्मत नसेलच तुमच्यात आणि येणार पण नाही ... १००%. राहवलं नाही म्हणून लिहला पण एखाद्या सरकारची आणि नेत्याची जेव्हडी निंदा नांदस्ती करायची असेल तेव्हडी करा , पण माझ्या देशाच्या सैनिकांबद्दल नाही ऐकून घेऊ शकत जाता जाता एक फुकटचा सल्ला देते तुम्हाला पण आणि वाचणाऱ्या सगळ्यांनाच , आज काल स्मार्ट फोन सगळ्यांकडेच आहे आणि नेट पण सगळ्यांच्याच फोनमध्ये आहे , लतादीदी चा एक अत्यंत सुरेख गाणं आहे "ए मेरे वतन के लोगो ... जरा आंख मे भरलो पानि .... जो शाहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी .... जब तुम खेल रहे थे होली वो झेल रहे थे गोली "...... आजच डाउनलोड करा , हेडफोन लावा , फुल्ल वोल्युम ठेवा आणि ऐका . जर डोळ्यात पाणी आला तर पुन्हा एकदा मनाला विचार कि खरंच मी टॅक्स भरतोय त्याचा माज करू ... कि ते माझ्या जीवाचा रक्षण करण्यासाठी तिथे मारतात आहेत त्याचा उपकार मानू जय हिंद

In reply to by जेसीना

जेसीनाजी अत्यंत जबरा..
म्हणू जर ते तुमच्या छातीवर काय डोक्यावर सुद्धा बंदूक ठेऊन तुमची तपासणी करत असतील तर त्यांना करू द्या. उगाच जे टॅक्स भारत त्याचा मज दाखवू नका. त्या बिचार्यांना ३५००० एव्हडी रक्कम पगार म्हणून मिळते , तिथे मंत्री लोक २,००,००० आणि त्याच्या वर पगार घेतात आणि काही करत नाही ना त्यांना माज दाखवा तुमच्या टॅक्स चा . तेव्हडी हिम्मत नसेलच तुमच्यात आणि येणार पण नाही ... १००%.
वास्तव.. :(
राहवलं नाही म्हणून लिहला पण एखाद्या सरकारची आणि नेत्याची जेव्हडी निंदा नांदस्ती करायची असेल तेव्हडी करा , पण माझ्या देशाच्या सैनिकांबद्दल नाही ऐकून घेऊ शकत
हेच म्हणायचे होते...!
म्हणजे तुम्ही चीन ला पण घाबरता कि चीन चा सुद्धा तुम्हाला पाठिंबा आहे ??
हे मात्र जरा खटकले

ताम्हनकरराव, खालील बातमी खास तुमच्यासाठी आहे. http://www.rediff.com/news/report/hc-refuses-to-ban-pellet-guns/2016092… Rejecting a plea seeking ban on the use of pellet guns in controlling street protests in Kashmir Valley, the Jammu and Kashmir high court has cited the ground situation and observed that as long as there is violence by unruly mobs, use of force is inevitable. A bench comprising Chief Justice N Paul Vasanthakumar and Justice Ali Mohammad Magrey also declined the plea to prosecute the officers who ordered use of pellet guns or fired them even as it directed the authorities to provide adequate medical treatment to the injured ‘This court in the writ jurisdiction without any finding rendered by the competent forum/ authority cannot decide as to whether the use of force in particular incident is excessive or not,’ the court said. The bench also declined the plea to prosecute the officers who ordered use of pellet guns and those who actually fired them. Same cannot be considered in this petition as no finding on use of excessive force, violating the guidelines issued in SOP (Standard Operating Procedure), have been recorded by any fact-finding authority,’ it said.

In reply to by श्रीगुरुजी

कोर्टासमोर जो विषय येतो तेवढ्यावरच कोर्ट निकाल देते. आपण नागरिक म्हणून साकल्याने विचार करून बोलतो. ही बातमी मी वाचल्येय. त्याआधी सरकारने स्वतःच पॅलेट गन चा जबाबदारीने आणि कमी वापर करू असे महिन्याभरापूर्वीच काबुल केले आहे ते बघावे. मॉब कंट्रोल चे इतर नवीन उपाय शोधणे चालू आहे. माझं मूळ मुद्दा काय आहे हे आज 80 लोक मेल्यानंतर आणि तीन महिने होऊनही परिस्थिती सुधारत नाहीये हा असून त्याचे कारण लष्करी ताकदीवर अतिरेकी आणि अवास्तव भिस्त ठेवण्याच्या मानसिकतेविरुद्ध आहे.

In reply to by संदीप ताम्हनकर

काश्मिरमध्ये दीर्घकाळ आंदोलन सुरू राहणे नवे नाही. २०१० मध्ये तब्बल १२० दिवस दगडफेकीचे प्रकार सुरू होते व त्यात १०० हून अधिक माणसे/सैनिक/पोलिस मृत्युमुखी पडले होते. लहान मुलांना पुढे उभे करून दगड फेकण्यासाठी पैसे दिले जात होते. यावेळीही तेच होत आहे. जोपर्यंत काश्मिरींना अक्कल येत नाही तोपर्यंत हेच सुरू राहणार.