काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.
याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत.
हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.
पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.
ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.
पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
वर्गीकरण
वाचने
65007
प्रतिक्रिया
271
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!! आवडला प्रतिसाद!!!
In reply to वर या सुडो सेक्युलर आणि by शाम भागवत
आज कारगील विजय दिवस.
अभिवादन.
मातृभुमीसाठी लढणाऱ्या सर्व
सहमत.
कोणी कितीही आपटली तरी काश्मीर
दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: -
एक दुरुस्ती: माझ्या
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: - by संदीप ताम्हनकर
तुमची काश्मीर प्रश्न सुटावा
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: - by संदीप ताम्हनकर
मग काश्मीर देउन टाकायचा
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: - by संदीप ताम्हनकर
अजिबात नाही आणि मी हि आस कूट
In reply to मग काश्मीर देउन टाकायचा by धनावडे
हा प्रश्न तुम्हाला नाही वो
In reply to अजिबात नाही आणि मी हि आस कूट by अमितदादा
ताम्हनकर साहेब
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: - by संदीप ताम्हनकर
हा प्रतिसाद तुमच्या ह्या
In reply to ताम्हनकर साहेब by सुबोध खरे
भारत व पाकिस्तान या वादात
In reply to हा प्रतिसाद तुमच्या ह्या by अमितदादा
तोचतर प्रॉब्लेम आहे ना गुरुजी
In reply to भारत व पाकिस्तान या वादात by श्रीगुरुजी
पाकिस्तान असो वा काश्मिरी,
In reply to तोचतर प्रॉब्लेम आहे ना गुरुजी by अमितदादा
दोन्ही देश्यांचा ह्या मागण्या
In reply to पाकिस्तान असो वा काश्मिरी, by श्रीगुरुजी
कारगील घडवणार्या मुशर्रफवर
In reply to दोन्ही देश्यांचा ह्या मागण्या by अमितदादा
तुमची शंका बरोबर आहे अर्जुन
In reply to कारगील घडवणार्या मुशर्रफवर by अर्जुन
छान
In reply to दोन्ही देश्यांचा ह्या मागण्या by अमितदादा
1. LOC हीच पेरमेनेन्ट बॉर्डर
In reply to दोन्ही देश्यांचा ह्या मागण्या by अमितदादा
गुरुजी आपले विचार जुळत नसले
In reply to 1. LOC हीच पेरमेनेन्ट बॉर्डर by श्रीगुरुजी
अमिदददादा,
In reply to गुरुजी आपले विचार जुळत नसले by अमितदादा
सहमत..
In reply to अमिदददादा, by अर्जुन
माझा मुद्दा ऐवडाच होता की
In reply to गुरुजी आपले विचार जुळत नसले by अमितदादा
असहमत प्रतिवाद करत नाही.
In reply to माझा मुद्दा ऐवडाच होता की by श्रीगुरुजी
काहीतरी गोंधळ दिसतो. अल्ताफ
In reply to असहमत प्रतिवाद करत नाही. by अमितदादा
तुमच्या ह्या वाक्याला माझा
In reply to माझा मुद्दा ऐवडाच होता की by श्रीगुरुजी
पुरावा नसताना कसा विश्वास
In reply to तुमच्या ह्या वाक्याला माझा by अमितदादा
ह्या वाक्याशी पूर्ण सहमत।
In reply to पुरावा नसताना कसा विश्वास by श्रीगुरुजी
1. 'सैन्याला (विशेष) हक्क आहे
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: - by संदीप ताम्हनकर
मागची पंचवीस वर्षे सैन्याची
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: - by संदीप ताम्हनकर
चलचित्र थोडं पाहिलं ....
रिक्षावाला म्हणतो की जो कोणी
In reply to चलचित्र थोडं पाहिलं .... by गामा पैलवान
केवळ हिंदुत्ववादी आणि संघी
सैनिक जर एवढेच बेताल असते तर
In reply to केवळ हिंदुत्ववादी आणि संघी by संदीप डांगे
सहमत
In reply to केवळ हिंदुत्ववादी आणि संघी by संदीप डांगे
सहमत।
In reply to सहमत by सामान्य वाचक
आरे संदीपा...........
अरे तामण्या (.....) ..
+१००
In reply to अरे तामण्या (.....) .. by सुज्ञ
च्यायला हे असलं बोलून (म्हणजे
In reply to अरे तामण्या (.....) .. by सुज्ञ
हि लिंक आवर्जून बघा
अजून एक लिंक
In reply to हि लिंक आवर्जून बघा by गणेश उमाजी पाजवे
एकदम सही !
In reply to अजून एक लिंक by गणेश उमाजी पाजवे
गामा पैलवानजी
In reply to एकदम सही ! by गामा पैलवान
भारताचा सुशिक्षित नागरिक म्हणून आज लष्कर ज्या परिस्थितीत काश्मीर मध्ये वावरतंय, आपलं संरक्षण करतंय, त्यांना आपण काही मदत करू शकत नसू तर त्यांना एक मॉरल सपोर्ट तरी देऊ शकतो ना आपण?
आता या मानवतावाद्यांनी एक नवीन मुद्दा समोर आणलाय तो म्हणजे भारतीय लष्कराने पॅलेट गन चा जो वापर केला काश्मीर मध्ये तो चुकीचा होता आपल्याला ऑफिस मध्ये गार गार थंड हवेत बसून हे लिहिताना अगदी सोप्प वाटत कि पॅलेट गन वापरणं कसं चुकीचं आहे वगैरे, पण जरा आपण कल्पना करूयात कि आपण भारतीय लष्करातले एक जवान आहोत आणि आपण आपल्या 15-20 सहकाऱ्यांसोबत 200-300 दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांना थोपवण्याचा प्रयत्न करत आहोत, यातले काही दंगलखोर चाकू-सुरे घेऊन आपले डोळे फोडायला येत असतील तर आपण त्यांची आरती ओवाळावी का? कि त्याचा सत्कार करावा?दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लहान मुले व महिला या सगळ्या प्रकारात जखमी झालेल्या आहेत, तर या सो कोल्ड मानवतावाद्यांच्या मते हे सगळे भारतीय जवानांमुळे झालेले आहे पण मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो कि या दंगलीमध्ये लहान मुले व बायका घराबाहेर पडतीलच का? या मानवतावाद्यांना हे का कळत नाही कि आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून दंगलखोरच या मुलांचा व महिलांचा संरक्षक कवच सारखा वापर करीत आहे म्हणून. या दंगलखोरांच्या पहिल्या फळीत नेहेमी हि लहान मुले व महिला असतात व दंगलखोर त्यांच्या मागून हल्ले करीत असतात. आता यात भारतीय लष्कराची चूक काय हे मला श्री. लेखकमहाशयाना विचारायचे आहे.संपूर्ण सहमत.
In reply to गामा पैलवानजी by गणेश उमाजी पाजवे
लेख आवडला.
उद्या शुक्रवार
काश्मीर चे वास्तव... संत
काश्मीर आणि तिथले अंतर्गत
एक अत्यंत उथळ आणि वल्गना
"इंडियन जेम्स बॉन्ड" (???!!!) श्री. अजित डोवाल यांचे भाषण
पूर्ण लेख वाचला , आणि
प्रतिसाद आवडला.
In reply to पूर्ण लेख वाचला , आणि by जेसीना
+११११
In reply to पूर्ण लेख वाचला , आणि by जेसीना
http://m.ndtv.com/blog/the-12
ताम्हनकरराव,
लष्करी ताकदीवर अतिरेकी आणि अवास्तव भिस्त
In reply to ताम्हनकरराव, by श्रीगुरुजी
काश्मिरमध्ये दीर्घकाळ आंदोलन
In reply to लष्करी ताकदीवर अतिरेकी आणि अवास्तव भिस्त by संदीप ताम्हनकर