Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संदीप ताम्हनकर on गुरुवार, 07/21/2016 - 13:40
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते. याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत. हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता. पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की. ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा. पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल. आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
  • 64887 views

प्रतिक्रिया

Submitted by सुज्ञ on Wed, 07/27/2016 - 18:58

Permalink

अरे तामण्या (.....) ..

अरे तामण्या (.....) .. ज्या सैनिकांच्या जीवावर या देशात निर्धास्त फिरतोस त्यांनाच कुठलेही पुरावे नसताना नावे ठेवायला तुला शरम वाटत नाही काय रे फक्त ३ वेळा काश्मीरमध्ये फिरून आलास त्यातून तुला कसे कळाले रे की स्वतःचे घरदार सोडून फक्त काश्मिरी लोकांच्या आणि पर्यायाने देशाच्या संरक्षणासाठी आलेले आपले सैनिक तिथे अत्याचार करतात. ज्यांच्यामुळे तू तिथे फिरू शकलास त्यांनाच निर्लज्जपणे आमच्या टेक्स वर तुम्ही जगता असे म्हणताना असा किती टेक्स भरतो रे तू ? स्वताला हुशार समजत असशील तर काश्मिरी लोकांकडून त्रास होऊनही त्यांना संरक्षण देणाऱ्या एखाद्या सैनिकांच्या तुकडीत एक दिवस राहून बघ. जेंव्हा अंगावर दगडं पडतील ना तेंव्हा मिसळपाव वर असले घाणेरडे लेख छापायची ताकद उरणार नाही . बाकी मोदी , संघ वगैरे च्या द्वेशातून असले घाणेरडे लिखाण केले असल्याची दाट शक्यता मला वाटत आहे जे तुझ्या फालतू आणि निर्लज्ज प्रतिसादातून दिसतेच आहे तुझ्या लेखाची लक्तरं सगळ्यांनी पुरेपूर फाडलीच आहेत तेंव्हा असले काही लिहिण्याआधी, आणि स्वताचा मूर्खपणा जगाला उघडपणे दाखवण्याआधी थोडी अक्कल वापर . भाषेबद्दल क्षमस्व पण तुझ्यासारख्याना हे हि कमीच . विचारांचा मुकाबला विचारांनी आणि चांगल्या भाषेत करावा हे आम्हालाही समजते पण घाणीत लोळनाऱ्या प्राण्याचा मुकाबला विचारांनी करून दाखवा असे म्हटल्यास ते शक्य नसते . हे तुझ्यासाठी खास. नाहीतर येशील पुन्हा ओरडत कि बघा भक्त वगैरे कसली भाषा वापरतात वगैरे नेहेमीचे तूणतूणे घेऊन . तूर्तास इतकेच
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on गुरुवार, 07/28/2016 - 10:46

In reply to अरे तामण्या (.....) .. by सुज्ञ

Permalink

+१००

विचारांचा मुकाबला विचारांनी आणि चांगल्या भाषेत करावा हे आम्हालाही समजते पण घाणीत लोळनाऱ्या प्राण्याचा मुकाबला विचारांनी करून दाखवा असे म्हटल्यास ते शक्य नसते .
सहमत !!
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on गुरुवार, 07/28/2016 - 12:28

In reply to अरे तामण्या (.....) .. by सुज्ञ

Permalink

च्यायला हे असलं बोलून (म्हणजे

च्यायला हे असलं बोलून (म्हणजे असली भाषा वापरून) तुम्ही लोक्स जे मुळात न्याय्य आहे त्यालाच श्रीमुखावर डांबर फासता आहात राव, उगा ताम्हनकरांच्या हाती कोलीतरुपी मुद्दा देण्याचा हा प्रकार काही रुचला नाही, हे स्पष्ट नोंदवतो. असो
  • Log in or register to post comments

Submitted by गणेश उमाजी पाजवे on गुरुवार, 07/28/2016 - 17:08

Permalink

हि लिंक आवर्जून बघा

काश्मिरी लोकांसाठी गळे काढणाऱ्या व भारतीय लष्कराला नावे ठेवणाऱ्या लोकांशी कशी चर्चा करावी.How to Deal With Pro-Pakistanis & Anti-Indian's: The Newshour Debate - (26th July 2016)https://www.youtube.com/watch?v=M8jtVBt28nU
  • Log in or register to post comments

Submitted by गणेश उमाजी पाजवे on गुरुवार, 07/28/2016 - 17:27

In reply to हि लिंक आवर्जून बघा by गणेश उमाजी पाजवे

Permalink

अजून एक लिंक

मेजर आर्या, बुरहान वाणी ला का मारले व ते कसे बरोबर आहे हे सांगताना............. https://www.youtube.com/watch?v=LI9ap0G_d4E
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 07/28/2016 - 18:16

In reply to अजून एक लिंक by गणेश उमाजी पाजवे

Permalink

एकदम सही !

गणेश उमाजी पाजवे, मेजर आर्य एकदम सही बोललेत! खरंतर काश्मीरवर चर्चा करतोच कशाला आपण भारतीय? चर्चा थेट पाकिस्तानवर व्हायला हवी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेश उमाजी पाजवे on गुरुवार, 07/28/2016 - 20:06

In reply to एकदम सही ! by गामा पैलवान

Permalink

गामा पैलवानजी

दुःख या गोष्टीच वाटत कि आपलेच लोक्स आज भारतीय लष्कराविरुद्ध उभे ठाकलेत.भारताला पाकिस्तानपासू धोका आहेच पण त्यापेक्षा जास्त धोका या लोकांचा आहे जे स्वतःला मानवतावादी म्हणवून घेतात. आता वरच्या लिंक मध्ये ज्या बाई बोलत आहेत माहिरि सूद म्हणून त्यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी बुरहान वाणीला पुअर फेलो म्हणून संबोधले आहे व या एन्काउंटर ची चौकशी व्हावी कारण हे एन्काउंटर त्यांना फेक वाटते आहे.आता काय म्हणावे अशा लोकांना. अरे he is damn terrorist guys. जो माणूस AK - 47 घेऊन फिरतो, ज्याच्याजवळ ग्रेनेड्स आहेत. जो जवानांवर फायरिंग करतो त्याच्यासाठी तुम्ही गळे काढता ? लाज नाही वाटत तुम्हाला ? वरून हे आपले सुधींद्र कुलकर्णी सर, त्यांना काश्मीर चा प्रश्न पाकिस्तानबरोबर शांततेच्या चर्चेने सुटेल असे वाटते आहे. अरे आतापर्यंत एवढ्या चर्चा झाल्या त्यातून काय निष्पन्न झाले? मी काही पाकिस्तानशी आताच्या आता युद्ध करा असे म्हणत नाहीये.पण एक

भारताचा सुशिक्षित नागरिक म्हणून आज लष्कर ज्या परिस्थितीत काश्मीर मध्ये वावरतंय, आपलं संरक्षण करतंय, त्यांना आपण काही मदत करू शकत नसू तर त्यांना एक मॉरल सपोर्ट तरी देऊ शकतो ना आपण?

आता या मानवतावाद्यांनी एक नवीन मुद्दा समोर आणलाय तो म्हणजे भारतीय लष्कराने पॅलेट गन चा जो वापर केला काश्मीर मध्ये तो चुकीचा होता आपल्याला ऑफिस मध्ये गार गार थंड हवेत बसून हे लिहिताना अगदी सोप्प वाटत कि पॅलेट गन वापरणं कसं चुकीचं आहे वगैरे, पण जरा आपण कल्पना करूयात कि आपण भारतीय लष्करातले एक जवान आहोत आणि आपण आपल्या 15-20 सहकाऱ्यांसोबत 200-300 दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांना थोपवण्याचा प्रयत्न करत आहोत, यातले काही दंगलखोर चाकू-सुरे घेऊन आपले डोळे फोडायला येत असतील तर आपण त्यांची आरती ओवाळावी का? कि त्याचा सत्कार करावा?दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लहान मुले व महिला या सगळ्या प्रकारात जखमी झालेल्या आहेत, तर या सो कोल्ड मानवतावाद्यांच्या मते हे सगळे भारतीय जवानांमुळे झालेले आहे पण मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो कि या दंगलीमध्ये लहान मुले व बायका घराबाहेर पडतीलच का? या मानवतावाद्यांना हे का कळत नाही कि आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून दंगलखोरच या मुलांचा व महिलांचा संरक्षक कवच सारखा वापर करीत आहे म्हणून. या दंगलखोरांच्या पहिल्या फळीत नेहेमी हि लहान मुले व महिला असतात व दंगलखोर त्यांच्या मागून हल्ले करीत असतात. आता यात भारतीय लष्कराची चूक काय हे मला श्री. लेखकमहाशयाना विचारायचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 07/28/2016 - 20:30

In reply to गामा पैलवानजी by गणेश उमाजी पाजवे

Permalink

संपूर्ण सहमत.

संपूर्ण सहमत. खालील वाक्यांविषयी तर अजून जास्त सहमत.
भारताला पाकिस्तानपासू धोका आहेच पण त्यापेक्षा जास्त धोका या लोकांचा आहे जे स्वतःला मानवतावादी म्हणवून घेतात.
भारताचा सुशिक्षित नागरिक म्हणून आज लष्कर ज्या परिस्थितीत काश्मीर मध्ये वावरतंय, आपलं संरक्षण करतंय, त्यांना आपण काही मदत करू शकत नसू तर त्यांना एक मॉरल सपोर्ट तरी देऊ शकतो ना आपण?
पण मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो कि या दंगलीमध्ये लहान मुले व बायका घराबाहेर पडतीलच का? या मानवतावाद्यांना हे का कळत नाही कि आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून दंगलखोरच या मुलांचा व महिलांचा संरक्षक कवच सारखा वापर करीत आहे म्हणून. या दंगलखोरांच्या पहिल्या फळीत नेहेमी हि लहान मुले व महिला असतात व दंगलखोर त्यांच्या मागून हल्ले करीत असतात.
___________________________________________________________________ >>> आता यात भारतीय लष्कराची चूक काय हे मला श्री. लेखकमहाशयाना विचारायचे आहे. किती अडाणीपणाचा प्रश्न! सर्व चूक भारतीय लष्कराचीच आहे. लहान मुलांच्या आडून दगडफेक करणारे व ग्रेनेड्स फेकणारे तरूण, अतिरेकी, स्वातंत्र्याची मागणी करणारे काश्मिरी, पाकिस्तानी समर्थक इ. पूर्ण निष्पाप असून त्यांची काहीही चूक नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आबा on गुरुवार, 07/28/2016 - 20:13

Permalink

लेख आवडला.

लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by झेन on गुरुवार, 07/28/2016 - 20:17

Permalink

उद्या शुक्रवार

उद्या शुक्रवार, पुन्हा काश्मीरमध्ये तोच लाजीरवाणा खेळ होणार का ? मुलांना पुढे करून भाडोत्री संधिसाधू लोक अतिरेक्यांचे बाहुले बनणार का ? सरकार ने लष्करा ऐवजी मानव आयोग वाले आणि "थोर गळेकाढू विचारवंत" "उपेक्षितांचे अंतरंग" जाणणाऱ्या लोकांना पुढे पाठवावे. परवा पर्यंत काश्मीर प्रश्न सुटायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 07/30/2016 - 04:28

Permalink

काश्मीर चे वास्तव... संत

काश्मीर चे वास्तव... तथाकथित बुद्धीवादींचा संत हाफि़ज सैद याच्या मुखाने वास्तव (सत्य आणि असत्यसुद्धा)... एका बाजूला काश्मीरमध्ये फितूरांना मदत आणि अतिरेकी पाठवत असल्याची बढाई मारत कबूली देत आहे (२८ जुलै २०१६ ला प्रसिद्ध)... तर दुसरीकडे आपण मानवतावादी संत असल्याचा मानभावी प्रचार पाकिस्तानी टिव्हीवर चालू आहे (२४ जुलै २०१६ ला प्रसिद्ध)... हे दुहेरी वागणे तथाकथित मानवतावाद्यांना समजत नाही इतका त्यांच्या बुद्धीचीचा स्तर कमी आहे असे अजिबात नाही. पण, संकुचित राजकिय आणि/अथवा आर्थिक स्वार्थाने प्रेरीत कांगावा करताना त्यांना भारताच्या बर्‍यावाईटाची पर्वा नाही हे स्पष्ट आहे. मुख्य म्हणजे, इतिहासात जेव्हा जेव्हा अतिरेकी विचारसरणीने बदल घडले आहेत, तेव्हा तेव्हा सर्वप्रथम कांगावाखोरांची मुंडकी उडवली गेली आहेत ("Revolution devours its own" — Le Vieux Cordelier). कारण, "असा स्वार्थाने प्रेरीत कांगावा करणारे त्यांचे सत्व आणि स्वत्व आपल्यापेक्षा अधिक बोली लावणार्‍या इतर कोणालाही सहज विकतील व आपल्याविरुद्ध कांगावा चालू करतील" हे वास्तव त्यांच्या बोलवत्या धन्यांना अनुभवाने पूरेपूर माहित झालेले असते; आणि सर्वसत्ताधीश झालेल्यांना त्याबाबतीत काडीचाही धोका पत्करणे ठीक वाटत नाही. मात्र, हे सार्वकालीक सत्य संकुचित स्वार्थाच्या उन्मादात कांगावाखोर नेहमी विसरतात... हे वर्तन त्यांच्या बुद्धिची मर्यादा अधोरेखीत करते.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Sat, 07/30/2016 - 10:29

Permalink

काश्मीर आणि तिथले अंतर्गत

काश्मीर आणि तिथले अंतर्गत मुद्दे ह्याविषयी मला जास्त ज्ञान नाही. तज्ज्ञांची चर्चा वाचतोय. पण या चर्चेवरून मला 'शूटआउट अट लोखंडवाला' सिनेमातला एक प्रसंग आठवला. त्या प्रसंगाच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच ह्या धाग्याला उत्तर ठरू शकेल असे वाटते. ATS ची टीम माया डोलस या सुपारी गुंडाचा एनकौंटर करते. खान (संजय दत्त) नावाचा पोलीस अधिकारी टीमचा प्रमुख असतो. या टीम विरुद्ध न्यायालयीन चौकशी सुरु होते. या टीमचा वकील असलेला अमिताभ बच्चन शेवटच्या प्रसंगात कोर्टाला एक प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच या केसचा निकाल असेल असे तो सांगतो. या धाग्याला अनुसरून त्या प्रश्नाचा आशय कायम ठेऊन थोडा बदल करून तो प्रश्न खाली विचारतोय. "आज आत्ता या क्षणी आपण सगळे आपापल्या कंपनीत / कार्यालयात/ इतर कुठल्या कामात व्यग्र आहोत . पण आपण सगळेच घराबाहेर आहोत असे समजा. घरात आपले कुटुंबीय आहेत (बायको, मुलं, आई-वडील). तेवढ्यात तुम्हाला कुठूनतरी असे कळते की तुमच्या घरातील दरवाज्याबाहेर याक्षणी एक माणूस बंदूक घेऊन उभा आहे आणि तो कुठल्याही क्षणी आतमध्ये शिरेल. तो माणूस खालील पैकी कोण असावा अशी तुम्ही प्रार्थना कराल ? 1. चोर/दरोडेखोर/ आतंकवादी किंवा 2. पोलीस / सैनिक
  • Log in or register to post comments

Submitted by होकाका on Sat, 07/30/2016 - 11:15

Permalink

एक अत्यंत उथळ आणि वल्गना

एक अत्यंत उथळ आणि वल्गना वाटावं असं विश्लेषण.
  • Log in or register to post comments

Submitted by होकाका on Sat, 07/30/2016 - 13:02

Permalink

"इंडियन जेम्स बॉन्ड" (???!!!) श्री. अजित डोवाल यांचे भाषण

आत्ताच काही दिवसांपूर्वी पाहिलेल्या एका भाषणाची आठवण झाली. सर्वांनी जरूर ऐकावं असं भाषण.
  • Log in or register to post comments

Submitted by जेसीना on Tue, 08/02/2016 - 13:49

Permalink

पूर्ण लेख वाचला , आणि

पूर्ण लेख वाचला , आणि त्यावरच्या सगळ्या प्रतीकिरिया सुद्धा वाचल्या. खूप दिवस झाले वाचतेय , मिपा मध्ये आल्यापासून मनोरंजन म्हणून इथले लेख वाचते परंतु हा लेख वाचल्यावर मनोरंजनाचा सोडा पण हसू कि रडू हेच समजत नाहीये एका प्रतिक्रियेत एका महाशयांनी असा लिहले आहे कि काश्मिरात फिरत असताना त्यांना हुर्रियत वाल्यानी मदत केली म्हणजे ...... जोक ओफ द इयर ... हसून हसून वेडे झाले झाले.... माझे बहुसंख्य मित्र आणि मैत्रिणी मुस्लिम आहेत त्यांच्याबरोबर हा लेख आणि प्रतिक्रिया शेअर केला , त्यांनी मला काही प्रश्न उपस्थित केले ते खालील प्रमाणे , परत कधी आपण काश्मीर ला गेलात तर नक्कीच टिकडेच्या हुर्रियत वाल्याना हा प्रश्न विचारा १. आतंकवादी अफजल गुरु च्या फाशीनंतर (तुमच्या भाषेत जनाब ) आमच्या भाषेत हरामी हाफिज सैद यांनी पाकिस्तान मधील एक ठिकाणी ( ठिकाणाचा नाव माहित नाही ) एका दिवसाचे जे उपोषण ठेवले होते त्यात हुर्रियत वाल्यांचे पुढारी सुद्धा गेले होते , म्हणजे तुमचा त्याला पाठिंबा आहे का ? २. जर हुर्रियत वाल्याना एव्हडेच वाटते कि काश्मीर ची जनता त्यांच्या सोबत आहे तर ते निवडणुकीत सहभाग का घेत नाहीत ? त्यांना हरण्याची भीती आहे का ? जर ते जिंकून आले तर त्यांची मागणी स्पष्टपणे भारतातल्या सरकारसमोर मांडू शकतात . मोदी साहेबांचे सरकार काही जास्त वेळ टिकेल असे तर दिसत नाही नंतर जे काही डाव्या लोकांचे किंवा tolerant म्हणजे सेक्युलर लोकांचे सरकार येईल ते नक्कीच त्यांच्या बाजूने विचार करतील. ३. POK मध्ये हुर्रियत वाले काय करतात ?? तिकडच्या लोकांना का नाही स्वतंत्र काश्मीर बद्दल काही बोलत ?? तिकडच्या सरकारला घाबरता कि त्यांच्या पाठबळावर तुम्ही काश्मीर मध्ये हिंसक कारवायांना पाठीशी घालता ?? ४. काश्मीर चा खूप सारा भाग चीन ने सुद्धा आपल्या घशात घालून ठेवला आहे (अकसाई चीन असाच कहितरी नाव आहे ) , मग तुम्ही म्हणजे हुर्रियत वाले तिथे काही करत नाहीत ? म्हणजे तुम्ही चीन ला पण घाबरता कि चीन चा सुद्धा तुम्हाला पाठिंबा आहे ?? तुमच्या माहितीसाठी एक सांगते , तुमच्या म्हणल्याप्रमाणे काश्मीर मध्ये पावला पावलावर सैनिक आहेत , ते तुमच्या आणि आमच्या आणि तिकडच्या जनतेच्या संरक्षणासाठी आहेत . त्यांना माहित नाही कि तुम्ही महाराष्ट्र मधून आलेत कि UP कि बिहार मधून कि पाकिस्तान मधून , तुमची तपासणी करणें आणि तुम्ही त्यांना करून देणे हे आपले कर्तव्य आहे. जर समजा कोणी आतंकवादी असेल आणि ते त्याला न तपासणी करता जाऊन देतील आणि तो आतंकवादी कोणत्या न कोणत्या मार्गाने महारष्ट्रात किंवा अजून कोणत्या ठिकाणी आला आणि त्याने कोणती दहशदवादी कारवाई घडवून आणली तर पुन्हा तुम्ही आपल्या सैनिकांनाच नवा ठेवणार कि त्यांची सेक्युरिटी बरोबर नाही म्हणून हे भारतात येऊ शकले ... म्हणू जर ते तुमच्या छातीवर काय डोक्यावर सुद्धा बंदूक ठेऊन तुमची तपासणी करत असतील तर त्यांना करू द्या. उगाच जे टॅक्स भारत त्याचा मज दाखवू नका. त्या बिचार्यांना ३५००० एव्हडी रक्कम पगार म्हणून मिळते , तिथे मंत्री लोक २,००,००० आणि त्याच्या वर पगार घेतात आणि काही करत नाही ना त्यांना माज दाखवा तुमच्या टॅक्स चा . तेव्हडी हिम्मत नसेलच तुमच्यात आणि येणार पण नाही ... १००%. राहवलं नाही म्हणून लिहला पण एखाद्या सरकारची आणि नेत्याची जेव्हडी निंदा नांदस्ती करायची असेल तेव्हडी करा , पण माझ्या देशाच्या सैनिकांबद्दल नाही ऐकून घेऊ शकत जाता जाता एक फुकटचा सल्ला देते तुम्हाला पण आणि वाचणाऱ्या सगळ्यांनाच , आज काल स्मार्ट फोन सगळ्यांकडेच आहे आणि नेट पण सगळ्यांच्याच फोनमध्ये आहे , लतादीदी चा एक अत्यंत सुरेख गाणं आहे "ए मेरे वतन के लोगो ... जरा आंख मे भरलो पानि .... जो शाहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी .... जब तुम खेल रहे थे होली वो झेल रहे थे गोली "...... आजच डाउनलोड करा , हेडफोन लावा , फुल्ल वोल्युम ठेवा आणि ऐका . जर डोळ्यात पाणी आला तर पुन्हा एकदा मनाला विचार कि खरंच मी टॅक्स भरतोय त्याचा माज करू ... कि ते माझ्या जीवाचा रक्षण करण्यासाठी तिथे मारतात आहेत त्याचा उपकार मानू जय हिंद
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Tue, 08/02/2016 - 14:07

In reply to पूर्ण लेख वाचला , आणि by जेसीना

Permalink

प्रतिसाद आवडला.

प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलभाऊ on Fri, 09/23/2016 - 13:37

In reply to पूर्ण लेख वाचला , आणि by जेसीना

Permalink

+११११

जेसीनाजी अत्यंत जबरा..
म्हणू जर ते तुमच्या छातीवर काय डोक्यावर सुद्धा बंदूक ठेऊन तुमची तपासणी करत असतील तर त्यांना करू द्या. उगाच जे टॅक्स भारत त्याचा मज दाखवू नका. त्या बिचार्यांना ३५००० एव्हडी रक्कम पगार म्हणून मिळते , तिथे मंत्री लोक २,००,००० आणि त्याच्या वर पगार घेतात आणि काही करत नाही ना त्यांना माज दाखवा तुमच्या टॅक्स चा . तेव्हडी हिम्मत नसेलच तुमच्यात आणि येणार पण नाही ... १००%.
वास्तव.. :(
राहवलं नाही म्हणून लिहला पण एखाद्या सरकारची आणि नेत्याची जेव्हडी निंदा नांदस्ती करायची असेल तेव्हडी करा , पण माझ्या देशाच्या सैनिकांबद्दल नाही ऐकून घेऊ शकत
हेच म्हणायचे होते...!
म्हणजे तुम्ही चीन ला पण घाबरता कि चीन चा सुद्धा तुम्हाला पाठिंबा आहे ??
हे मात्र जरा खटकले
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 09/21/2016 - 10:21

Permalink

http://m.ndtv.com/blog/the-12

http://m.ndtv.com/blog/the-12-year-old-who-stopped-our-car-and-pelted-stones-at-us-in-kashmir-1464397?pfrom=home-lateststories
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 09/22/2016 - 20:48

Permalink

ताम्हनकरराव,

ताम्हनकरराव, खालील बातमी खास तुमच्यासाठी आहे. http://www.rediff.com/news/report/hc-refuses-to-ban-pellet-guns/20160922.htm Rejecting a plea seeking ban on the use of pellet guns in controlling street protests in Kashmir Valley, the Jammu and Kashmir high court has cited the ground situation and observed that as long as there is violence by unruly mobs, use of force is inevitable. A bench comprising Chief Justice N Paul Vasanthakumar and Justice Ali Mohammad Magrey also declined the plea to prosecute the officers who ordered use of pellet guns or fired them even as it directed the authorities to provide adequate medical treatment to the injured ‘This court in the writ jurisdiction without any finding rendered by the competent forum/ authority cannot decide as to whether the use of force in particular incident is excessive or not,’ the court said. The bench also declined the plea to prosecute the officers who ordered use of pellet guns and those who actually fired them. Same cannot be considered in this petition as no finding on use of excessive force, violating the guidelines issued in SOP (Standard Operating Procedure), have been recorded by any fact-finding authority,’ it said.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप ताम्हनकर on Fri, 09/23/2016 - 13:29

In reply to ताम्हनकरराव, by श्रीगुरुजी

Permalink

लष्करी ताकदीवर अतिरेकी आणि अवास्तव भिस्त

कोर्टासमोर जो विषय येतो तेवढ्यावरच कोर्ट निकाल देते. आपण नागरिक म्हणून साकल्याने विचार करून बोलतो. ही बातमी मी वाचल्येय. त्याआधी सरकारने स्वतःच पॅलेट गन चा जबाबदारीने आणि कमी वापर करू असे महिन्याभरापूर्वीच काबुल केले आहे ते बघावे. मॉब कंट्रोल चे इतर नवीन उपाय शोधणे चालू आहे. माझं मूळ मुद्दा काय आहे हे आज 80 लोक मेल्यानंतर आणि तीन महिने होऊनही परिस्थिती सुधारत नाहीये हा असून त्याचे कारण लष्करी ताकदीवर अतिरेकी आणि अवास्तव भिस्त ठेवण्याच्या मानसिकतेविरुद्ध आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 09/23/2016 - 15:22

In reply to लष्करी ताकदीवर अतिरेकी आणि अवास्तव भिस्त by संदीप ताम्हनकर

Permalink

काश्मिरमध्ये दीर्घकाळ आंदोलन

काश्मिरमध्ये दीर्घकाळ आंदोलन सुरू राहणे नवे नाही. २०१० मध्ये तब्बल १२० दिवस दगडफेकीचे प्रकार सुरू होते व त्यात १०० हून अधिक माणसे/सैनिक/पोलिस मृत्युमुखी पडले होते. लहान मुलांना पुढे उभे करून दगड फेकण्यासाठी पैसे दिले जात होते. यावेळीही तेच होत आहे. जोपर्यंत काश्मिरींना अक्कल येत नाही तोपर्यंत हेच सुरू राहणार.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com