Skip to main content

( मी बी पिरेम करीन म्हनतो ) : टपोरी तडका

लेखक नीलमोहर यांनी रविवार, 24/07/2016 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
येकांद्या लैलाचा मजनू बनीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो... आयटम नं लाईन दिली काय, न दिली काय, आपल्याले हुंगत ऱ्हायची सवयच हाय, च्यान्सवर ड्यान्स मारीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो... चिकनी पोरगी पटली काय, न पटली काय, पोट्ट्यान्ले चप्पल खायची वायली हौसच हाय, चपलीलाबी फुलाने सजवीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो... अब्यासाचे परश्न सुटले काय, न सुटले काय, गटांगळ्या खाने आपली मजबूरी हाय, प्येपराची सुरनळी करून त्येवर लौ लेटर ल्हीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो... एकीला टांग देऊन दुसरी फिरवता येते, एकीशी इमान राखनारा तोंडघशीच पडते, पिरमाचे नाव फक्त कामापुरते घ्यावे, मन भरले की खुशाल बेरकप करावे, होलसेलात प्रकरनं करायचं ह्येच आसतंय वय, समदे मिलून बोला राव, वासुगिरी की जय !! *************** प्रेरणा: http://www.misalpav.com/node/36609, http://www.misalpav.com/node/36747
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 8588
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - Sun, 24/07/2016 - 08:53 उगा, कुठलेही संदर्भ याला जोडू नका म्हणतो. मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या म्हणतो, मी बी काय तरी लिहीन म्हणतो. -

In reply to by मितभाषी

आव मीतभाषीसाहेब, स्वत:चे धागे सोडुन कधीही अन कुठेही प्रतिसाद (न) देणार्‍या आयडीने इथे प्रतिसाद द्यावा आणि तोही चक्क पहीलाच यातच सर्व आलं की.... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता त्यांच्या रचनेची आम्ही मोड़तोड़ केली आता त्यांनी येऊन बघितलं, आता त्यावर ते काय बोलले तर तो माझा दोष का ? असो, आपल्याला वाटलं ना, त्यांचं माझं कनेक्शन आहे, तर आहेच म्हणतो. कशाला नाय म्हणू.....(तसं माझं जवळ जवळ सर्वच मिपाकरांशी कनेक्शन आहे) आपल्या विचाराला मी थांबवू शकत नाही. आपला रविवार सुखात जावो. :)

In reply to by मितभाषी

धागा निलमोहर यांचा आहे, मी प्रतिसादही त्यांनाच दिले आहेत आणि उत्तराची अपेक्षाही नीलमोहर यांचीच आहे, दुसऱ्याने उगाच तिसऱ्याच्या वरातीत नाचू नये. (प्रतिसादाची प्रेरणा अन्य प्रतिसादावरुन) ;) -दिलीप बिरुटे

In reply to by गंगाधर मुटे

मुटे सर तुम्ही खरच मिनिस्टर व्हायला पाहिजे होते राव. लै भारी जुगलबंदी पाहायला मिळाली असती कवितांची. जस्ट आठवले बरका ;)

In reply to by अभ्या..

बाकी प्रेमळ तडका लैच आवडला, हा टपोरी इतका जम्या नाही. उगी दोन डिझाईन बनवा असे क्लायंताने सांगितले कि आपण एक मनापासून चांगले बनवून वेटेजला दुसरे देतो तसे वाटले.

जय भीम समद्यास्नी मस्तय टपोरी तडका निमो, पहा कीती छान प्रतिसाद आलेत. मनातली तडफड बाहेर आलीये प्रतिसादकर्त्यान्ची. काय ताकद आहे हो तुमच्या लिखाणात.

तुमचा पत्ता दया. इकडे वडगाव बुद्रुकला सुप्रसिद्ध कवी सुर्यकांत खोकले राहतात. त्यांचा "मी माझा तर..." हा सुप्रसिद्ध चारोळी संग्रह तुम्हाला पाठवून देतो.

हाण तेज्यायला, लै भारी... विडंबन म्हणवत नाही इतक्या वरीजेनल भावणा.... लै म्हणजे लैच आवडले... पैजारबुवा,

In reply to by सालस

आपला सालसपणा नेहमीच आवडला आहे. आपली इंट्री नेहमी योग्य वेळी होते. लोकांना किती सांगा अवांतर करू नका तरी लोक ऐकतच नाही. माझ्याही धाग्यावर एकदा डोकावून जा न गड़े... ! -दिलीप बिरुटे

=))