येकांद्या लैलाचा मजनू बनीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
आयटम नं लाईन
दिली काय, न दिली काय,
आपल्याले हुंगत ऱ्हायची
सवयच हाय,
च्यान्सवर ड्यान्स
मारीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
चिकनी पोरगी
पटली काय, न पटली काय,
पोट्ट्यान्ले चप्पल खायची
वायली हौसच हाय,
चपलीलाबी फुलाने
सजवीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
अब्यासाचे परश्न
सुटले काय, न सुटले काय,
गटांगळ्या खाने
आपली मजबूरी हाय,
प्येपराची सुरनळी करून
त्येवर लौ लेटर ल्हीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
एकीला टांग देऊन
दुसरी फिरवता येते,
एकीशी इमान राखनारा
तोंडघशीच पडते,
पिरमाचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे,
मन भरले की
खुशाल बेरकप करावे,
होलसेलात प्रकरनं करायचं
ह्येच आसतंय वय,
समदे मिलून बोला राव,
वासुगिरी की जय !!
***************
प्रेरणा:
http://www.misalpav.com/node/36609,
http://www.misalpav.com/node/36747
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8588
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रेम करा हो.अवश्य करा.
अरेच्या! प्रेमळ तडका आणि
अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे
आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही.
आव मीतभाषीसाहेब, स्वत:चे धागे
In reply to आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही. by मितभाषी
अच्छा. असं हाय व्हय !
In reply to आव मीतभाषीसाहेब, स्वत:चे धागे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धागा निलमोहर यांचा आहे, मी
In reply to अच्छा. असं हाय व्हय ! by मितभाषी
हे उत्तर मितभाषीना दिलंय ;)
In reply to धागा निलमोहर यांचा आहे, मी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुटे सर तुम्ही खरच मिनिस्टर
In reply to निलमोहरराव, by गंगाधर मुटे
बाकी प्रेमळ तडका लैच आवडला,
In reply to मुटे सर तुम्ही खरच मिनिस्टर by अभ्या..
ज्याला जे करायचेय ते करा,
+१
In reply to ज्याला जे करायचेय ते करा, by एस
जय भीम समद्यास्नी
आईबाबा न् साईबाबांची शप्पत. लै भारी तडका.
In reply to जय भीम समद्यास्नी by कविता१९७८
तुमचा पत्ता दया. इकडे वडगाव
गावडे सर
In reply to तुमचा पत्ता दया. इकडे वडगाव by सतिश गावडे
हाण तेज्यायला, लै भारी...
विडंबन ऐवजी स्वतंत्र कविता
चांगल्या विडंबनाच्या धाग्यावर
जाऊ द्या हो....
In reply to चांगल्या विडंबनाच्या धाग्यावर by सालस
=)) किती ते अवांतर
इथे भल्याभल्यांचे डुआयडी आहेत
विडंबन आवडले!
=))