✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

( मी बी पिरेम करीन म्हनतो ) : टपोरी तडका

न — नीलमोहर, Sun, 07/24/2016 - 22:00
येकांद्या लैलाचा मजनू बनीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो... आयटम नं लाईन दिली काय, न दिली काय, आपल्याले हुंगत ऱ्हायची सवयच हाय, च्यान्सवर ड्यान्स मारीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो... चिकनी पोरगी पटली काय, न पटली काय, पोट्ट्यान्ले चप्पल खायची वायली हौसच हाय, चपलीलाबी फुलाने सजवीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो... अब्यासाचे परश्न सुटले काय, न सुटले काय, गटांगळ्या खाने आपली मजबूरी हाय, प्येपराची सुरनळी करून त्येवर लौ लेटर ल्हीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो... एकीला टांग देऊन दुसरी फिरवता येते, एकीशी इमान राखनारा तोंडघशीच पडते, पिरमाचे नाव फक्त कामापुरते घ्यावे, मन भरले की खुशाल बेरकप करावे, होलसेलात प्रकरनं करायचं ह्येच आसतंय वय, समदे मिलून बोला राव, वासुगिरी की जय !! *************** प्रेरणा: http://www.misalpav.com/node/36609, http://www.misalpav.com/node/36747

Book traversal links for ( मी बी पिरेम करीन म्हनतो ) : टपोरी तडका

  • ‹ ( मी बी पिरेम करीन म्हनते ) : प्रेमळ तडका
  • Up

प्रतिक्रिया द्या
8504 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रेम करा हो.अवश्य करा.

गंगाधर मुटे
Sun, 07/24/2016 - 22:15 नवीन
प्रेम करा हो.अवश्य करा. पण एकाच वेळी दोन-दोन स्थळी??? http://www.misalpav.com/node/36752
  • Log in or register to post comments

अरेच्या! प्रेमळ तडका आणि

गंगाधर मुटे
Sun, 07/24/2016 - 22:18 नवीन
अरेच्या! प्रेमळ तडका आणि टपोरी तडका हाय वाटते. स्वारी.रॉयली स्वारी.
  • Log in or register to post comments

अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 22:21 नवीन
अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे तर.. ओके -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही.

मितभाषी
Sun, 07/24/2016 - 22:30 नवीन
आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - Sun, 24/07/2016 - 08:53 उगा, कुठलेही संदर्भ याला जोडू नका म्हणतो. मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या म्हणतो, मी बी काय तरी लिहीन म्हणतो. -
  • Log in or register to post comments

आव मीतभाषीसाहेब, स्वत:चे धागे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 22:38 नवीन
आव मीतभाषीसाहेब, स्वत:चे धागे सोडुन कधीही अन कुठेही प्रतिसाद (न) देणार्‍या आयडीने इथे प्रतिसाद द्यावा आणि तोही चक्क पहीलाच यातच सर्व आलं की.... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

अच्छा. असं हाय व्हय !

मितभाषी
Sun, 07/24/2016 - 22:52 नवीन
आता त्यांच्या रचनेची आम्ही मोड़तोड़ केली आता त्यांनी येऊन बघितलं, आता त्यावर ते काय बोलले तर तो माझा दोष का ? असो, आपल्याला वाटलं ना, त्यांचं माझं कनेक्शन आहे, तर आहेच म्हणतो. कशाला नाय म्हणू.....(तसं माझं जवळ जवळ सर्वच मिपाकरांशी कनेक्शन आहे) आपल्या विचाराला मी थांबवू शकत नाही. आपला रविवार सुखात जावो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धागा निलमोहर यांचा आहे, मी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 23:02 नवीन
धागा निलमोहर यांचा आहे, मी प्रतिसादही त्यांनाच दिले आहेत आणि उत्तराची अपेक्षाही नीलमोहर यांचीच आहे, दुसऱ्याने उगाच तिसऱ्याच्या वरातीत नाचू नये. (प्रतिसादाची प्रेरणा अन्य प्रतिसादावरुन) ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

हे उत्तर मितभाषीना दिलंय ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 23:06 नवीन
हे उत्तर मितभाषीना दिलंय ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुटे सर तुम्ही खरच मिनिस्टर

अभ्या..
Sun, 07/24/2016 - 22:47 नवीन
मुटे सर तुम्ही खरच मिनिस्टर व्हायला पाहिजे होते राव. लै भारी जुगलबंदी पाहायला मिळाली असती कवितांची. जस्ट आठवले बरका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

बाकी प्रेमळ तडका लैच आवडला,

अभ्या..
Sun, 07/24/2016 - 23:07 नवीन
बाकी प्रेमळ तडका लैच आवडला, हा टपोरी इतका जम्या नाही. उगी दोन डिझाईन बनवा असे क्लायंताने सांगितले कि आपण एक मनापासून चांगले बनवून वेटेजला दुसरे देतो तसे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ज्याला जे करायचेय ते करा,

एस
Sun, 07/24/2016 - 23:54 नवीन
ज्याला जे करायचेय ते करा, फक्त जिल्ब्या पाडू नका राव. :-(
  • Log in or register to post comments

+१

संदीप डांगे
Mon, 07/25/2016 - 00:02 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

जय भीम समद्यास्नी

कविता१९७८
Mon, 07/25/2016 - 07:34 नवीन
जय भीम समद्यास्नी मस्तय टपोरी तडका निमो, पहा कीती छान प्रतिसाद आलेत. मनातली तडफड बाहेर आलीये प्रतिसादकर्त्यान्ची. काय ताकद आहे हो तुमच्या लिखाणात.
  • Log in or register to post comments

आईबाबा न् साईबाबांची शप्पत. लै भारी तडका.

मितभाषी
Mon, 07/25/2016 - 17:04 नवीन
आमचा नेवरती महाराज म्हण्तो बाॅ, साईबाबा शिर्डीत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

तुमचा पत्ता दया. इकडे वडगाव

सतिश गावडे
Mon, 07/25/2016 - 09:15 नवीन
तुमचा पत्ता दया. इकडे वडगाव बुद्रुकला सुप्रसिद्ध कवी सुर्यकांत खोकले राहतात. त्यांचा "मी माझा तर..." हा सुप्रसिद्ध चारोळी संग्रह तुम्हाला पाठवून देतो.
  • Log in or register to post comments

गावडे सर

नाखु
Mon, 07/25/2016 - 09:18 नवीन
पत्ते गोळा करतात हे पाहून मौज वाटली.. टपोरी तडका चाम्गला हाय, मस्त हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हाण तेज्यायला, लै भारी...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/25/2016 - 09:18 नवीन
हाण तेज्यायला, लै भारी... विडंबन म्हणवत नाही इतक्या वरीजेनल भावणा.... लै म्हणजे लैच आवडले... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

विडंबन ऐवजी स्वतंत्र कविता

संजय पाटिल
Mon, 07/25/2016 - 10:24 नवीन
विडंबन ऐवजी स्वतंत्र कविता म्हणून पण छान आहे
  • Log in or register to post comments

चांगल्या विडंबनाच्या धाग्यावर

सालस
Mon, 07/25/2016 - 11:04 नवीन
चांगल्या विडंबनाच्या धाग्यावर अवांतर होताना पाहुन खेद वाटला. छान लिहिलंय नीलमोहोरजी.
  • Log in or register to post comments

जाऊ द्या हो....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/25/2016 - 11:20 नवीन
आपला सालसपणा नेहमीच आवडला आहे. आपली इंट्री नेहमी योग्य वेळी होते. लोकांना किती सांगा अवांतर करू नका तरी लोक ऐकतच नाही. माझ्याही धाग्यावर एकदा डोकावून जा न गड़े... ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालस

=)) किती ते अवांतर

प्रचेतस
Mon, 07/25/2016 - 13:51 नवीन
=)) किती ते अवांतर
  • Log in or register to post comments

इथे भल्याभल्यांचे डुआयडी आहेत

खालीमुंडी पाताळधुंडी
Mon, 07/25/2016 - 18:26 नवीन
इथे भल्याभल्यांचे डुआयडी आहेत म्हणे????!!
  • Log in or register to post comments

विडंबन आवडले!

रुपी
Tue, 07/26/2016 - 00:22 नवीन
विडंबन आवडले!
  • Log in or register to post comments

=))

रातराणी
Wed, 07/27/2016 - 00:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा