येकांद्या लैलाचा मजनू बनीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
आयटम नं लाईन
दिली काय, न दिली काय,
आपल्याले हुंगत ऱ्हायची
सवयच हाय,
च्यान्सवर ड्यान्स
मारीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
चिकनी पोरगी
पटली काय, न पटली काय,
पोट्ट्यान्ले चप्पल खायची
वायली हौसच हाय,
चपलीलाबी फुलाने
सजवीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
अब्यासाचे परश्न
सुटले काय, न सुटले काय,
गटांगळ्या खाने
आपली मजबूरी हाय,
प्येपराची सुरनळी करून
त्येवर लौ लेटर ल्हीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
एकीला टांग देऊन
दुसरी फिरवता येते,
एकीशी इमान राखनारा
तोंडघशीच पडते,
पिरमाचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे,
मन भरले की
खुशाल बेरकप करावे,
होलसेलात प्रकरनं करायचं
ह्येच आसतंय वय,
समदे मिलून बोला राव,
वासुगिरी की जय !!
***************
प्रेरणा:
https://www.misalpav.com/node/36609,
https://www.misalpav.com/node/36747
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रेम करा हो.अवश्य करा.
प्रेम करा हो.अवश्य करा.
पण एकाच वेळी दोन-दोन स्थळी???
https://www.misalpav.com/node/36752
अरेच्या! प्रेमळ तडका आणि
अरेच्या! प्रेमळ तडका आणि टपोरी तडका हाय वाटते.
स्वारी.रॉयली स्वारी.
अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे
अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे तर.. ओके
-दिलीप बिरुटे
आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही.
आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - Sun, 24/07/2016 - 08:53
उगा, कुठलेही संदर्भ याला जोडू नका म्हणतो.
मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या म्हणतो,
मी बी काय तरी लिहीन म्हणतो.
-
आव मीतभाषीसाहेब, स्वत:चे धागे
In reply to आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही. by मितभाषी
आव मीतभाषीसाहेब, स्वत:चे धागे सोडुन कधीही अन कुठेही प्रतिसाद (न) देणार्या आयडीने इथे प्रतिसाद द्यावा आणि तोही चक्क पहीलाच यातच सर्व आलं की....
-दिलीप बिरुटे
अच्छा. असं हाय व्हय !
In reply to आव मीतभाषीसाहेब, स्वत:चे धागे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता त्यांच्या रचनेची आम्ही मोड़तोड़ केली आता त्यांनी येऊन बघितलं, आता त्यावर ते काय बोलले तर तो माझा दोष का ? असो, आपल्याला वाटलं ना, त्यांचं माझं कनेक्शन आहे, तर आहेच म्हणतो. कशाला नाय म्हणू.....(तसं माझं जवळ जवळ सर्वच मिपाकरांशी कनेक्शन आहे) आपल्या विचाराला मी थांबवू शकत नाही. आपला रविवार सुखात जावो. :)
धागा निलमोहर यांचा आहे, मी
In reply to अच्छा. असं हाय व्हय ! by मितभाषी
धागा निलमोहर यांचा आहे, मी प्रतिसादही त्यांनाच दिले आहेत आणि उत्तराची अपेक्षाही नीलमोहर यांचीच आहे, दुसऱ्याने उगाच तिसऱ्याच्या वरातीत नाचू नये. (प्रतिसादाची प्रेरणा अन्य प्रतिसादावरुन) ;)
-दिलीप बिरुटे
हे उत्तर मितभाषीना दिलंय ;)
In reply to धागा निलमोहर यांचा आहे, मी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे उत्तर मितभाषीना दिलंय ;)
-दिलीप बिरुटे
मुटे सर तुम्ही खरच मिनिस्टर
In reply to निलमोहरराव, by गंगाधर मुटे
मुटे सर तुम्ही खरच मिनिस्टर व्हायला पाहिजे होते राव. लै भारी जुगलबंदी पाहायला मिळाली असती कवितांची.
जस्ट आठवले बरका ;)
बाकी प्रेमळ तडका लैच आवडला,
In reply to मुटे सर तुम्ही खरच मिनिस्टर by अभ्या..
बाकी प्रेमळ तडका लैच आवडला, हा टपोरी इतका जम्या नाही. उगी दोन डिझाईन बनवा असे क्लायंताने सांगितले कि आपण एक मनापासून चांगले बनवून वेटेजला दुसरे देतो तसे वाटले.
ज्याला जे करायचेय ते करा,
ज्याला जे करायचेय ते करा, फक्त जिल्ब्या पाडू नका राव. :-(
+१
In reply to ज्याला जे करायचेय ते करा, by एस
+१
जय भीम समद्यास्नी
जय भीम समद्यास्नी
मस्तय टपोरी तडका निमो, पहा कीती छान प्रतिसाद आलेत. मनातली तडफड बाहेर आलीये प्रतिसादकर्त्यान्ची. काय ताकद आहे हो तुमच्या लिखाणात.
आईबाबा न् साईबाबांची शप्पत. लै भारी तडका.
In reply to जय भीम समद्यास्नी by कविता१९७८
आमचा नेवरती महाराज म्हण्तो बाॅ, साईबाबा शिर्डीत नाही .
तुमचा पत्ता दया. इकडे वडगाव
तुमचा पत्ता दया. इकडे वडगाव बुद्रुकला सुप्रसिद्ध कवी सुर्यकांत खोकले राहतात. त्यांचा "मी माझा तर..." हा सुप्रसिद्ध चारोळी संग्रह तुम्हाला पाठवून देतो.
गावडे सर
In reply to तुमचा पत्ता दया. इकडे वडगाव by सतिश गावडे
पत्ते गोळा करतात हे पाहून मौज वाटली..
टपोरी तडका चाम्गला हाय, मस्त हाय.
हाण तेज्यायला, लै भारी...
हाण तेज्यायला, लै भारी...
विडंबन म्हणवत नाही इतक्या वरीजेनल भावणा....
लै म्हणजे लैच आवडले...
पैजारबुवा,
विडंबन ऐवजी स्वतंत्र कविता
विडंबन ऐवजी स्वतंत्र कविता म्हणून पण छान आहे
चांगल्या विडंबनाच्या धाग्यावर
चांगल्या विडंबनाच्या धाग्यावर अवांतर होताना पाहुन खेद वाटला.
छान लिहिलंय नीलमोहोरजी.
जाऊ द्या हो....
In reply to चांगल्या विडंबनाच्या धाग्यावर by सालस
आपला सालसपणा नेहमीच आवडला आहे. आपली इंट्री नेहमी योग्य वेळी होते. लोकांना किती सांगा अवांतर करू नका तरी लोक ऐकतच नाही. माझ्याही धाग्यावर एकदा डोकावून जा न गड़े... !
-दिलीप बिरुटे
=)) किती ते अवांतर
=))
किती ते अवांतर
इथे भल्याभल्यांचे डुआयडी आहेत
इथे भल्याभल्यांचे डुआयडी आहेत म्हणे????!!
विडंबन आवडले!
विडंबन आवडले!
=))
=))