Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निखिल निरगुडे on गुरुवार, 07/14/2016 - 01:04
लेखनविषय (Tags)
कथा
रात्रीचे दोन तरी वाजले असतील. मला अजूनही झोप येत नव्हती. हातात पुस्तक घेऊन मी उगाच पानं चाळत होतो. खिडकी उघडीच होती. झोप येण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. तितक्यात एक पाकोळी फडफडत आली. माझ्या डोळ्यांसमोर एक क्षणभर फडफडून ती खोलीभर फिरू लागली. तिचा रंग, त्यावरचे ठिपके फारच आकर्षक होते. मी मजेने तिच्याकडे पाहू लागलो. पण हा आनंद क्षणिक होता. काही वेळातच ती पाकोळी एका कोळ्याच्या जाळ्यात अडकली. पाकोळीने सुटण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु केला. तिची तडफड, तो शेवटचा संघर्ष पाहून माझे मन हेलावले. मी पटकन उठून तिचे पंख अलगद पकडले, तिला जाळ्यातून सोडवून, बाहेर सोडून दिले. जाळ्यावर आता एक कोळी होता - राखाडी रंगाचा, अगदीच रुक्ष. माझ्या मनात त्या जीवाविषयी भयंकर तिरस्काराचा भाव आला. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मी पहिले. जाळं तसच होतं, कोळ्याचा पत्ता नव्हता. मी सगळं जाळं साफ करून माझ्या कामाला लागलो. रात्री बेडवर पडल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला. जाळं पुन्हा तसंच होतं. एक नवीन पाकोळी त्या जाळ्यात अडकली होती आणि तोच कोळी जाळ्यावरून तोल सांभाळत सावकाश आपली भक्ष्याकडे निघाला होता. पाकोळीची ती धडपड मला सहन होईना. मी पाकोळीला पुन्हा सोडवले. कोळी पुन्हा निघून गेला. पुढे हा क्रम आठवडाभर चालू राहिला. आठवड्याभराने मी जाळं काढत असताना कोळ्याचा पत्ता नेहमीप्रमाणे कुठेच नव्हता. नंतर जेव्हा मी फारशी झाडायला गेलो तेव्हा मला एक राखाडी रंगाचा रुक्ष कोळी मेलेला दिसला. माझ्या हातून झाडू गळून पडला.कशीबशी स्वच्छता उरकून मी बाहेर पडलो. आज रात्री मी बेडवर पडून वरती पहिले तेव्हा दुसऱ्या एका कोळ्याने आपले जाळे तयार केले होते. काही वेळातच एक पाकोळी उडत उडत येउन त्या जाळ्यात येउन अडकली. पाकोळीने फडफड सुरु केली. एक कोळी सावकाशपणे तिच्या दिशेने चालला होता. पाकोळीची धडपड वाढत होती, तशीच माझा मनातली चलबिचलही, जणू मीच त्या जाळ्यात अडकलो होतो. पण आज उठून त्या पाकोळीला वाचवण्याचे धाडस माझ्यात नव्हते. नियतीचा हा क्रूर नियम मोडण्यासाठी माझा हात आता उठेना. काही क्षणांत ती प्राणांतिक धडपड थांबली आणि मग कोळ्याने आपले काम आटोपले. मी मात्र छताला लागलेल्या जाळ्याकडे पाहतच राहिलो.
  • Log in or register to post comments
  • 6834 views

प्रतिक्रिया

Submitted by रुपी on गुरुवार, 07/14/2016 - 01:07

Permalink

छान लिहिलं आहे.

छान लिहिलं आहे. फक्त शेवटच्या परिच्छेदात "नियतीचा" ऐवजी "निसर्गाचा" जास्त बरोबर वाटलं असतं बहुतेक.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल निरगुडे on गुरुवार, 07/14/2016 - 01:25

In reply to छान लिहिलं आहे. by रुपी

Permalink

धन्यवाद.. मिपा वर माझं

धन्यवाद.. मिपा वर माझं पाहिलंच लेखन आहे, असेच प्रतिसाद मिळाले तर आणखी उत्तम लिहिण्याचा प्रयत्न करेन....
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 07/14/2016 - 11:04

In reply to छान लिहिलं आहे. by रुपी

Permalink

फक्त शेवटच्या परिच्छेदात

फक्त शेवटच्या परिच्छेदात "नियतीचा" ऐवजी "निसर्गाचा" जास्त बरोबर वाटलं असतं बहुतेक.
+१
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 07/14/2016 - 08:33

Permalink

चांगलं लिहिलं आहे!

मिपावर स्वागत!
  • Log in or register to post comments

Submitted by सुधांशुनूलकर on गुरुवार, 07/14/2016 - 09:07

Permalink

मिपावर स्वागत

चांगलं लिहिलंय. लेखन चांगलं, सकस असेल, तर चोखंदळ मिपाकर चांगलेच प्रतिसाद देतील, याची माझ्या अनुभवावरून खातरी देतो. पुलेशु
  • Log in or register to post comments

Submitted by शित्रेउमेश on गुरुवार, 07/14/2016 - 10:59

Permalink

छान लिहिलय.... +१

छान लिहिलय.... +१
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 07/14/2016 - 11:04

Permalink

तुमचा पहिलाच लेख आवडला.

तुमचा पहिलाच लेख आवडला. पुलेशु
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on गुरुवार, 07/14/2016 - 11:12

Permalink

छान लिहलंय

छान लिहलंय
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 07/14/2016 - 11:26

Permalink

नैसर्गीक शिकवण

घरी नॅशनल जिऑग्राफी सारखे चॅनेल बघताना जी हिंदीतून आणि दूरदर्शनवर टॉम अल्टरचा एक कार्यक्रम असे त्यातील काही वाक्ये सम्जलयावर जंगलातील प्राण्यांची शिकारीची अनिवार्यता आणि अपरिहार्यता समजली.
निसर्गात भूक/गरज नसताना शिकार करणारा एकच प्राणी म्हणजे "माणूस".
मिपावर स्वागत पुलेशु
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 07/14/2016 - 11:31

In reply to नैसर्गीक शिकवण by नाखु

Permalink

भूकेबद्दल तरी पुर्ण खरं

भूकेबद्दल तरी पुर्ण खरं नाहीये. गरजेबद्दल म्हणाल तर 'स्वसंरक्षण' हीच गरज असली पाहिजे पण त्याव्यतिरिक्त जर शिकार होत असेल तर ती 'गरजेची नसून' असेच म्हणावी लागेल काही प्राण्यात नर हे परिसरातील दुसर्‍या नरांवर हल्ले करुन त्यांना संपवू पहातात (उदा: सिंह. बहूधा मांजरदेखील).
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 07/14/2016 - 11:26

Permalink

लेखनशैली चांगली आहे... बाकी

लेखनशैली चांगली आहे... बाकी कोळी /पाकोळी इत्यादींच्या आयुष्यात विशेष रस नसल्याने कथा विशेष आवडली नाही. एकवेळ हत्ती, वाघ , सिह असे मोठे प्राणी किंवा गेला बाजार कुत्रा/मांजर यांची कथा टाका :) (बाकी जव्हेरगंज साहेब दिसत नाहीत आजकाल) पुढील लेखनास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 07/14/2016 - 11:32

In reply to लेखनशैली चांगली आहे... बाकी by मराठी कथालेखक

Permalink

चला प्राणिसंग्रहालयात.

चला प्राणिसंग्रहालयात.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 07/14/2016 - 11:40

In reply to चला प्राणिसंग्रहालयात. by धनंजय माने

Permalink

तिथे फक्त प्राणी असतील.. कथा

तिथे फक्त प्राणी असतील.. कथा कोण सांगणार ? जव्हेरगंज साहेबांना सोबत न्याव लागेल :)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 07/14/2016 - 12:07

In reply to तिथे फक्त प्राणी असतील.. कथा by मराठी कथालेखक

Permalink

१. जव्हेरगंज हे हत्तीचं नाव

१. जव्हेरगंज हे हत्तीचं नाव आहे २. जव्हेरगंज प्राण्यांच्या कथा लिहीत नाही
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 07/14/2016 - 14:51

In reply to १. जव्हेरगंज हे हत्तीचं नाव by धनंजय माने

Permalink

तुम्ही वाचल्या नसतील

जव्हेरगंज प्राण्यांच्या कथा लिहीत नाही
ह्या घ्या शिट्टी मैथिली
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 07/14/2016 - 19:04

In reply to तुम्ही वाचल्या नसतील by मराठी कथालेखक

Permalink

त्या रूपक कथा आहेत. धन्यवाद.

त्या रूपक कथा आहेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Fri, 07/15/2016 - 16:11

In reply to त्या रूपक कथा आहेत. धन्यवाद. by धनंजय माने

Permalink

धन्यवाद

बरं झालं हो सांगितलत ते ... मला तर माहितच नव्हतं :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 07/14/2016 - 11:31

Permalink

लेखन जमलंय. पुलेशु.

लेखन जमलंय. पुलेशु. फक्त ते पाकोळी म्हणजे माझया मते बारके वटवाघूळ टाईप असते. त्यावर ठिपके बीपके नसतात. तुम्ही म्हणता ते फुलपाखरू अथवा पतंग असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Fri, 07/15/2016 - 16:31

In reply to लेखन जमलंय. पुलेशु. by अभ्या..

Permalink

हां.. मी पण विचार करतोय, एवढी

हां.. मी पण विचार करतोय, एवढी मोठी पा़कोळी कोळ्याच्या जाळ्यात तडफडते कशी?
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Wed, 07/20/2016 - 11:34

In reply to लेखन जमलंय. पुलेशु. by अभ्या..

Permalink

पाकोळी म्हणजे फुलपाखरासारखंच

थोडं मळकट/मातीसारख्या रंगाचं असतं. आकार (गेंडाछाप) चाराण्यापासून नवीन दहा रुपयाच्या नाण्याएवढा. लई डीझाईन नसतंय, भौतेक प्लेन कलर, असलंच तर थोडंफार चारसहा बारीकमोठ्या ठिपक्यांचं डिझाईन.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on गुरुवार, 07/14/2016 - 11:56

Permalink

छान लिहिलंय.

छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 07/14/2016 - 12:08

Permalink

छान लिहीलंय.

छान लिहीलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 07/14/2016 - 12:13

Permalink

छान लिहिलंय

छान लिहिलंय
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on गुरुवार, 07/14/2016 - 12:20

Permalink

उत्तम जमले आहे लेखन! आवडले

उत्तम जमले आहे लेखन! आवडले,मिपावर स्वागत
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on गुरुवार, 07/14/2016 - 12:34

Permalink

मिपावर स्वागत. अपाल्हाळीक सरळ

मिपावर स्वागत. अपाल्हाळीक सरळ साधे लेखन. फक्त ती पाकोळी नसणार कारण ती चिमणीच्या आकाराएवढी असते, त्यामुळे अभ्याशी बाडीस तो पतंग असावा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user वगिश

Submitted by वगिश on गुरुवार, 07/14/2016 - 12:43

Permalink

मस्तय

मस्तय
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 07/14/2016 - 13:04

Permalink

अतिषय सुरेख लेखन . आमच्या

अतिषय सुरेख लेखन . आमच्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ! मागे मीही कोळ्यांच्या एका विशिष्ठ प्रजातीवर सखोल अभ्यास करत होतो , तेव्हा एकदा कोळ्यांच्या जाळ्यात वाईट अडकलो होतो , सगळीकडुन कोळी तुटुन पडले , पण तुमच्या सारखाच काही सज्जनांनी तेव्हा कोळ्याच्या जाळ्यातुन मला बाहेर काढले . तेव्हा पासुन कानाला खडा ... कोळ्यांच्या अजिबात नादाला लागायचे नाही , कुठेही जाळे दिसले तर त्यापासुन दोन हात लांबच रहायचे असे ठरवले आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 07/14/2016 - 13:43

In reply to अतिषय सुरेख लेखन . आमच्या by प्रसाद गोडबोले

Permalink

हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!

हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 07/14/2016 - 13:48

In reply to अतिषय सुरेख लेखन . आमच्या by प्रसाद गोडबोले

Permalink

हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!

हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 07/14/2016 - 13:14

Permalink

मिपावर स्वागत!!

मिपावर स्वागत!!
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on गुरुवार, 07/14/2016 - 13:39

Permalink

उत्तम जमले आहे !!

उत्तम जमले आहे !! मिपावर स्वागत!!
  • Log in or register to post comments

Submitted by जगप्रवासी on गुरुवार, 07/14/2016 - 17:36

Permalink

चांगली आहे कथा

चांगली आहे कथा
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 07/14/2016 - 17:54

Permalink

कथा आवडली...

मिपावर स्वागत.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 07/14/2016 - 18:31

Permalink

उत्तम लेखन. पण पाकोळी

उत्तम लेखन. पण पाकोळी कोळ्याच्या जाळ्यात अडकेल असे वाटत नाही. तुम्हाला पाखरं म्हणायचे होते का?
  • Log in or register to post comments

Submitted by राजाभाउ on गुरुवार, 07/14/2016 - 18:36

Permalink

मिपावर स्वागत. छान जमलीय रुपक

मिपावर स्वागत. छान जमलीय रुपक कथा. पुलेशु
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 07/14/2016 - 21:02

Permalink

कोळ्याच्या जाळ्याच्या तुलनेत

कोळ्याच्या जाळ्याच्या तुलनेत पाकोळी हा खूपच मोठा व ताकदवान सजीव असतो. इतका मोठा सजीव कोळ्याच्या जाळ्यात अडकणे अशक्य वाटते. कोळ्याच्या जाळ्यात साधारणपणे छोटे कीटक, फुलपाखरांसारखे अत्यंत हलके कीटक अडकू शकतात. परंतु पाकोळीएवढे तुलनेने आकाराने मोठे व तुलनेने वजनदार सजीव अडकवून ठेवण्याइतके कोळ्याचे जाळे ताकदवान असते असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by लालगरूड on गुरुवार, 07/14/2016 - 21:12

Permalink

વાહ વાહ .... મિપાવર સ્વાગત...

વાહ વાહ .... મિપાવર સ્વાગત... ળિતે રહો ભિખતે રહો...
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on गुरुवार, 07/14/2016 - 23:35

Permalink

कथा उत्तम जमली आहे. फक्त

कथा उत्तम जमली आहे. फक्त पाकोळी ऐवजी एखादा किडा असे उल्लेख असायला हवा होता. बाकी उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 07/15/2016 - 00:03

Permalink

छान लिहिलंय.

छान लिहिलंय. पाकोळी हा फुलपाखरासारखाच दिसणारा किटक आकाराने फुलपाखरापेक्षा लहान असतो. रंगही फार आकर्षक नसतो त्याचा.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Fri, 07/15/2016 - 02:05

In reply to छान लिहिलंय. by मार्मिक गोडसे

Permalink

आता कसं व्यवस्थित जमलं.

आता कसं व्यवस्थित जमलं. पाकोळी म्हणजे काळं फुलपाखरुच...(इथे तरी)
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 07/15/2016 - 09:43

In reply to आता कसं व्यवस्थित जमलं. by धनंजय माने

Permalink

पाकोळी म्हणजे काळं फुलपाखरुच

पाकोळी म्हणजे काळं फुलपाखरुच
+१००००
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल निरगुडे on Fri, 07/15/2016 - 04:04

Permalink

माझ्या माहिती प्रमाणे आणि इथे

माझ्या माहिती प्रमाणे आणि इथे अभिप्रेत असलेली पाकोळी वटवाघूळ किंवा चिमणी सारखी नसून फुलपाखरासारखा एक कीटक असतो, पुन्हा पडताळून पाहीन.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल निरगुडे on Fri, 07/15/2016 - 04:08

Permalink

आणि मनापासून खरोखर धन्यवाद...

आणि मनापासून खरोखर धन्यवाद... सर्व प्रतिक्रिया वाचून खूप आनंद वाटला.. आपल्या सूचना वाचून मिपा वर लिहिण्याचा उद्देश्य पूर्ण होईल याची खात्री होतेय, योग्य ते बदल करून अजून अचूक आणि चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करत राहीन..
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 07/15/2016 - 09:42

Permalink

क्लास!!!

क्लास!!!
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Fri, 07/15/2016 - 12:53

Permalink

पाकोळी नसावी. पाकोळी जाळे

पाकोळी नसावी. पाकोळी जाळे फाडून टाकेल. तुम्हाला दुसर काहीतरी म्हणायच असेल. आता त्याचा फोटोच काढून टाका इथे उत्सुकता लागली आहे. आणि हे निसर्गचक्र आहे. आमच्याइथे नेहमी साप आणि पक्षांचे हे खेळ चालू असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Fri, 07/15/2016 - 16:40

Permalink

पाकोळीने जाळे तोडले आहे.

पाकोळीने जाळे तोडले आहे. सोनेरी कोळी ठार झाला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Bhagyashri sat… on Tue, 07/19/2016 - 21:48

Permalink

नविन मिपाकरांच स्वागत, छान

नविन मिपाकरांच स्वागत, छान लिहीलंय
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 07/19/2016 - 22:02

Permalink

छान लिहिलय!

छान लिहिलय!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com