रात्रीचे दोन तरी वाजले असतील. मला अजूनही झोप येत नव्हती. हातात पुस्तक घेऊन मी उगाच पानं चाळत होतो. खिडकी उघडीच होती. झोप येण्याची काही चिन्हे दिसत नव्हती.
तितक्यात एक पाकोळी फडफडत आली. माझ्या डोळ्यांसमोर एक क्षणभर फडफडून ती खोलीभर फिरू लागली. तिचा रंग, त्यावरचे ठिपके फारच आकर्षक होते. मी मजेने तिच्याकडे पाहू लागलो.
पण हा आनंद क्षणिक होता. काही वेळातच ती पाकोळी एका कोळ्याच्या जाळ्यात अडकली. पाकोळीने सुटण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु केला. तिची तडफड, तो शेवटचा संघर्ष पाहून माझे मन हेलावले. मी पटकन उठून तिचे पंख अलगद पकडले, तिला जाळ्यातून सोडवून, बाहेर सोडून दिले. जाळ्यावर आता एक कोळी होता - राखाडी रंगाचा, अगदीच रुक्ष. माझ्या मनात त्या जीवाविषयी भयंकर तिरस्काराचा भाव आला.
दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मी पहिले. जाळं तसच होतं, कोळ्याचा पत्ता नव्हता. मी सगळं जाळं साफ करून माझ्या कामाला लागलो.
रात्री बेडवर पडल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला. जाळं पुन्हा तसंच होतं. एक नवीन पाकोळी त्या जाळ्यात अडकली होती आणि तोच कोळी जाळ्यावरून तोल सांभाळत सावकाश आपली भक्ष्याकडे निघाला होता. पाकोळीची ती धडपड मला सहन होईना. मी पाकोळीला पुन्हा सोडवले. कोळी पुन्हा निघून गेला.
पुढे हा क्रम आठवडाभर चालू राहिला. आठवड्याभराने मी जाळं काढत असताना कोळ्याचा पत्ता नेहमीप्रमाणे कुठेच नव्हता. नंतर जेव्हा मी फारशी झाडायला गेलो तेव्हा मला एक राखाडी रंगाचा रुक्ष कोळी मेलेला दिसला. माझ्या हातून झाडू गळून पडला.कशीबशी स्वच्छता उरकून मी बाहेर पडलो.
आज रात्री मी बेडवर पडून वरती पहिले तेव्हा दुसऱ्या एका कोळ्याने आपले जाळे तयार केले होते. काही वेळातच एक पाकोळी उडत उडत येउन त्या जाळ्यात येउन अडकली. पाकोळीने फडफड सुरु केली. एक कोळी सावकाशपणे तिच्या दिशेने चालला होता. पाकोळीची धडपड वाढत होती, तशीच माझा मनातली चलबिचलही, जणू मीच त्या जाळ्यात अडकलो होतो.
पण आज उठून त्या पाकोळीला वाचवण्याचे धाडस माझ्यात नव्हते. नियतीचा हा क्रूर नियम मोडण्यासाठी माझा हात आता उठेना. काही क्षणांत ती प्राणांतिक धडपड थांबली आणि मग कोळ्याने आपले काम आटोपले.
मी मात्र छताला लागलेल्या जाळ्याकडे पाहतच राहिलो.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
फक्त शेवटच्या परिच्छेदात "नियतीचा" ऐवजी "निसर्गाचा" जास्त बरोबर वाटलं असतं बहुतेक.
धन्यवाद.. मिपा वर माझं
In reply to छान लिहिलं आहे. by रुपी
धन्यवाद.. मिपा वर माझं पाहिलंच लेखन आहे, असेच प्रतिसाद मिळाले तर आणखी उत्तम लिहिण्याचा प्रयत्न करेन....
फक्त शेवटच्या परिच्छेदात
In reply to छान लिहिलं आहे. by रुपी
+१
चांगलं लिहिलं आहे!
मिपावर स्वागत!
मिपावर स्वागत
चांगलं लिहिलंय.
लेखन चांगलं, सकस असेल, तर चोखंदळ मिपाकर चांगलेच प्रतिसाद देतील, याची माझ्या अनुभवावरून खातरी देतो.
पुलेशु
छान लिहिलय.... +१
छान लिहिलय.... +१
तुमचा पहिलाच लेख आवडला.
तुमचा पहिलाच लेख आवडला.
पुलेशु
छान लिहलंय
छान लिहलंय
नैसर्गीक शिकवण
घरी नॅशनल जिऑग्राफी सारखे चॅनेल बघताना जी हिंदीतून आणि दूरदर्शनवर टॉम अल्टरचा एक कार्यक्रम असे त्यातील काही वाक्ये सम्जलयावर जंगलातील प्राण्यांची शिकारीची अनिवार्यता आणि अपरिहार्यता समजली.
मिपावर स्वागत पुलेशु
भूकेबद्दल तरी पुर्ण खरं
In reply to नैसर्गीक शिकवण by नाखु
भूकेबद्दल तरी पुर्ण खरं नाहीये. गरजेबद्दल म्हणाल तर 'स्वसंरक्षण' हीच गरज असली पाहिजे पण त्याव्यतिरिक्त जर शिकार होत असेल तर ती 'गरजेची नसून' असेच म्हणावी लागेल
काही प्राण्यात नर हे परिसरातील दुसर्या नरांवर हल्ले करुन त्यांना संपवू पहातात (उदा: सिंह. बहूधा मांजरदेखील).
लेखनशैली चांगली आहे... बाकी
लेखनशैली चांगली आहे... बाकी कोळी /पाकोळी इत्यादींच्या आयुष्यात विशेष रस नसल्याने कथा विशेष आवडली नाही.
एकवेळ हत्ती, वाघ , सिह असे मोठे प्राणी किंवा गेला बाजार कुत्रा/मांजर यांची कथा टाका :) (बाकी जव्हेरगंज साहेब दिसत नाहीत आजकाल)
पुढील लेखनास शुभेच्छा
चला प्राणिसंग्रहालयात.
In reply to लेखनशैली चांगली आहे... बाकी by मराठी कथालेखक
चला प्राणिसंग्रहालयात.
तिथे फक्त प्राणी असतील.. कथा
In reply to चला प्राणिसंग्रहालयात. by धनंजय माने
तिथे फक्त प्राणी असतील.. कथा कोण सांगणार ? जव्हेरगंज साहेबांना सोबत न्याव लागेल :)
१. जव्हेरगंज हे हत्तीचं नाव
In reply to तिथे फक्त प्राणी असतील.. कथा by मराठी कथालेखक
१. जव्हेरगंज हे हत्तीचं नाव आहे
२. जव्हेरगंज प्राण्यांच्या कथा लिहीत नाही
तुम्ही वाचल्या नसतील
In reply to १. जव्हेरगंज हे हत्तीचं नाव by धनंजय माने
ह्या घ्या
शिट्टी
मैथिली
त्या रूपक कथा आहेत. धन्यवाद.
In reply to तुम्ही वाचल्या नसतील by मराठी कथालेखक
त्या रूपक कथा आहेत. धन्यवाद.
धन्यवाद
In reply to त्या रूपक कथा आहेत. धन्यवाद. by धनंजय माने
बरं झालं हो सांगितलत ते ... मला तर माहितच नव्हतं :)
लेखन जमलंय. पुलेशु.
लेखन जमलंय. पुलेशु.
फक्त ते पाकोळी म्हणजे माझया मते बारके वटवाघूळ टाईप असते. त्यावर ठिपके बीपके नसतात. तुम्ही म्हणता ते फुलपाखरू अथवा पतंग असावा.
हां.. मी पण विचार करतोय, एवढी
In reply to लेखन जमलंय. पुलेशु. by अभ्या..
हां.. मी पण विचार करतोय, एवढी मोठी पा़कोळी कोळ्याच्या जाळ्यात तडफडते कशी?
पाकोळी म्हणजे फुलपाखरासारखंच
In reply to लेखन जमलंय. पुलेशु. by अभ्या..
थोडं मळकट/मातीसारख्या रंगाचं असतं. आकार (गेंडाछाप) चाराण्यापासून नवीन दहा रुपयाच्या नाण्याएवढा.
लई डीझाईन नसतंय, भौतेक प्लेन कलर, असलंच तर थोडंफार चारसहा बारीकमोठ्या ठिपक्यांचं डिझाईन.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहीलंय.
छान लिहीलंय.
छान लिहिलंय
छान लिहिलंय
उत्तम जमले आहे लेखन! आवडले
उत्तम जमले आहे लेखन! आवडले,मिपावर स्वागत
मिपावर स्वागत. अपाल्हाळीक सरळ
मिपावर स्वागत. अपाल्हाळीक सरळ साधे लेखन. फक्त ती पाकोळी नसणार कारण ती चिमणीच्या आकाराएवढी असते, त्यामुळे अभ्याशी बाडीस तो पतंग असावा.
मस्तय
मस्तय
अतिषय सुरेख लेखन . आमच्या
अतिषय सुरेख लेखन . आमच्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या !
मागे मीही कोळ्यांच्या एका विशिष्ठ प्रजातीवर सखोल अभ्यास करत होतो , तेव्हा एकदा कोळ्यांच्या जाळ्यात वाईट अडकलो होतो , सगळीकडुन कोळी तुटुन पडले , पण तुमच्या सारखाच काही सज्जनांनी तेव्हा कोळ्याच्या जाळ्यातुन मला बाहेर काढले .
तेव्हा पासुन कानाला खडा ... कोळ्यांच्या अजिबात नादाला लागायचे नाही , कुठेही जाळे दिसले तर त्यापासुन दोन हात लांबच रहायचे असे ठरवले आहे :)
हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!
In reply to अतिषय सुरेख लेखन . आमच्या by प्रसाद गोडबोले
हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!
हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!
In reply to अतिषय सुरेख लेखन . आमच्या by प्रसाद गोडबोले
हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!
मिपावर स्वागत!!
मिपावर स्वागत!!
उत्तम जमले आहे !!
उत्तम जमले आहे !!
मिपावर स्वागत!!
चांगली आहे कथा
चांगली आहे कथा
कथा आवडली...
मिपावर स्वागत.
उत्तम लेखन. पण पाकोळी
उत्तम लेखन. पण पाकोळी कोळ्याच्या जाळ्यात अडकेल असे वाटत नाही. तुम्हाला पाखरं म्हणायचे होते का?
मिपावर स्वागत. छान जमलीय रुपक
मिपावर स्वागत. छान जमलीय रुपक कथा. पुलेशु
कोळ्याच्या जाळ्याच्या तुलनेत
कोळ्याच्या जाळ्याच्या तुलनेत पाकोळी हा खूपच मोठा व ताकदवान सजीव असतो. इतका मोठा सजीव कोळ्याच्या जाळ्यात अडकणे अशक्य वाटते. कोळ्याच्या जाळ्यात साधारणपणे छोटे कीटक, फुलपाखरांसारखे अत्यंत हलके कीटक अडकू शकतात. परंतु पाकोळीएवढे तुलनेने आकाराने मोठे व तुलनेने वजनदार सजीव अडकवून ठेवण्याइतके कोळ्याचे जाळे ताकदवान असते असे वाटत नाही.
વાહ વાહ .... મિપાવર સ્વાગત...
વાહ વાહ .... મિપાવર સ્વાગત... ળિતે રહો ભિખતે રહો...
कथा उत्तम जमली आहे. फक्त
कथा उत्तम जमली आहे. फक्त पाकोळी ऐवजी एखादा किडा असे उल्लेख असायला हवा होता. बाकी उत्तम.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
पाकोळी हा फुलपाखरासारखाच दिसणारा किटक आकाराने फुलपाखरापेक्षा लहान असतो. रंगही फार आकर्षक नसतो त्याचा.
आता कसं व्यवस्थित जमलं.
In reply to छान लिहिलंय. by मार्मिक गोडसे
आता कसं व्यवस्थित जमलं.
पाकोळी म्हणजे काळं फुलपाखरुच...(इथे तरी)
पाकोळी म्हणजे काळं फुलपाखरुच
In reply to आता कसं व्यवस्थित जमलं. by धनंजय माने
+१००००
माझ्या माहिती प्रमाणे आणि इथे
माझ्या माहिती प्रमाणे आणि इथे अभिप्रेत असलेली पाकोळी वटवाघूळ किंवा चिमणी सारखी नसून फुलपाखरासारखा एक कीटक असतो, पुन्हा पडताळून पाहीन.
आणि मनापासून खरोखर धन्यवाद...
आणि मनापासून खरोखर धन्यवाद... सर्व प्रतिक्रिया वाचून खूप आनंद वाटला.. आपल्या सूचना वाचून मिपा वर लिहिण्याचा उद्देश्य पूर्ण होईल याची खात्री होतेय, योग्य ते बदल करून अजून अचूक आणि चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करत राहीन..
क्लास!!!
क्लास!!!
पाकोळी नसावी. पाकोळी जाळे
पाकोळी नसावी. पाकोळी जाळे फाडून टाकेल. तुम्हाला दुसर काहीतरी म्हणायच असेल. आता त्याचा फोटोच काढून टाका इथे उत्सुकता लागली आहे.
आणि हे निसर्गचक्र आहे. आमच्याइथे नेहमी साप आणि पक्षांचे हे खेळ चालू असतात.
पाकोळीने जाळे तोडले आहे.
पाकोळीने जाळे तोडले आहे. सोनेरी कोळी ठार झाला आहे.
नविन मिपाकरांच स्वागत, छान
नविन मिपाकरांच स्वागत, छान लिहीलंय
छान लिहिलय!
छान लिहिलय!