जाळं
रात्रीचे दोन तरी वाजले असतील. मला अजूनही झोप येत नव्हती. हातात पुस्तक घेऊन मी उगाच पानं चाळत होतो. खिडकी उघडीच होती. झोप येण्याची काही चिन्हे दिसत नव्हती.
तितक्यात एक पाकोळी फडफडत आली. माझ्या डोळ्यांसमोर एक क्षणभर फडफडून ती खोलीभर फिरू लागली. तिचा रंग, त्यावरचे ठिपके फारच आकर्षक होते. मी मजेने तिच्याकडे पाहू लागलो.
पण हा आनंद क्षणिक होता. काही वेळातच ती पाकोळी एका कोळ्याच्या जाळ्यात अडकली. पाकोळीने सुटण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु केला. तिची तडफड, तो शेवटचा संघर्ष पाहून माझे मन हेलावले. मी पटकन उठून तिचे पंख अलगद पकडले, तिला जाळ्यातून सोडवून, बाहेर सोडून दिले. जाळ्यावर आता एक कोळी होता - राखाडी रंगाचा, अगदीच रुक्ष. माझ्या मनात त्या जीवाविषयी भयंकर तिरस्काराचा भाव आला.
दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मी पहिले. जाळं तसच होतं, कोळ्याचा पत्ता नव्हता. मी सगळं जाळं साफ करून माझ्या कामाला लागलो.
रात्री बेडवर पडल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला. जाळं पुन्हा तसंच होतं. एक नवीन पाकोळी त्या जाळ्यात अडकली होती आणि तोच कोळी जाळ्यावरून तोल सांभाळत सावकाश आपली भक्ष्याकडे निघाला होता. पाकोळीची ती धडपड मला सहन होईना. मी पाकोळीला पुन्हा सोडवले. कोळी पुन्हा निघून गेला.
पुढे हा क्रम आठवडाभर चालू राहिला. आठवड्याभराने मी जाळं काढत असताना कोळ्याचा पत्ता नेहमीप्रमाणे कुठेच नव्हता. नंतर जेव्हा मी फारशी झाडायला गेलो तेव्हा मला एक राखाडी रंगाचा रुक्ष कोळी मेलेला दिसला. माझ्या हातून झाडू गळून पडला.कशीबशी स्वच्छता उरकून मी बाहेर पडलो.
आज रात्री मी बेडवर पडून वरती पहिले तेव्हा दुसऱ्या एका कोळ्याने आपले जाळे तयार केले होते. काही वेळातच एक पाकोळी उडत उडत येउन त्या जाळ्यात येउन अडकली. पाकोळीने फडफड सुरु केली. एक कोळी सावकाशपणे तिच्या दिशेने चालला होता. पाकोळीची धडपड वाढत होती, तशीच माझा मनातली चलबिचलही, जणू मीच त्या जाळ्यात अडकलो होतो.
पण आज उठून त्या पाकोळीला वाचवण्याचे धाडस माझ्यात नव्हते. नियतीचा हा क्रूर नियम मोडण्यासाठी माझा हात आता उठेना. काही क्षणांत ती प्राणांतिक धडपड थांबली आणि मग कोळ्याने आपले काम आटोपले.
मी मात्र छताला लागलेल्या जाळ्याकडे पाहतच राहिलो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
छान लिहिलं आहे.
धन्यवाद.. मिपा वर माझं
फक्त शेवटच्या परिच्छेदात
चांगलं लिहिलं आहे!
मिपावर स्वागत
छान लिहिलय.... +१
तुमचा पहिलाच लेख आवडला.
छान लिहलंय
नैसर्गीक शिकवण
भूकेबद्दल तरी पुर्ण खरं
लेखनशैली चांगली आहे... बाकी
चला प्राणिसंग्रहालयात.
तिथे फक्त प्राणी असतील.. कथा
१. जव्हेरगंज हे हत्तीचं नाव
तुम्ही वाचल्या नसतील
त्या रूपक कथा आहेत. धन्यवाद.
धन्यवाद
लेखन जमलंय. पुलेशु.
हां.. मी पण विचार करतोय, एवढी
पाकोळी म्हणजे फुलपाखरासारखंच
छान लिहिलंय.
छान लिहीलंय.
छान लिहिलंय
उत्तम जमले आहे लेखन! आवडले
मिपावर स्वागत. अपाल्हाळीक सरळ
मस्तय
अतिषय सुरेख लेखन . आमच्या
हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!
हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!
मिपावर स्वागत!!
उत्तम जमले आहे !!
चांगली आहे कथा
कथा आवडली...
उत्तम लेखन. पण पाकोळी
मिपावर स्वागत. छान जमलीय रुपक
कोळ्याच्या जाळ्याच्या तुलनेत
વાહ વાહ .... મિપાવર સ્વાગત...
कथा उत्तम जमली आहे. फक्त
छान लिहिलंय.
आता कसं व्यवस्थित जमलं.
पाकोळी म्हणजे काळं फुलपाखरुच
माझ्या माहिती प्रमाणे आणि इथे
आणि मनापासून खरोखर धन्यवाद...
क्लास!!!
पाकोळी नसावी. पाकोळी जाळे
पाकोळीने जाळे तोडले आहे.
नविन मिपाकरांच स्वागत, छान
छान लिहिलय!