✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जाळं

न
निखिल निरगुडे यांनी
गुरुवार, 07/14/2016 - 01:04  ·  लेख
लेख
रात्रीचे दोन तरी वाजले असतील. मला अजूनही झोप येत नव्हती. हातात पुस्तक घेऊन मी उगाच पानं चाळत होतो. खिडकी उघडीच होती. झोप येण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. तितक्यात एक पाकोळी फडफडत आली. माझ्या डोळ्यांसमोर एक क्षणभर फडफडून ती खोलीभर फिरू लागली. तिचा रंग, त्यावरचे ठिपके फारच आकर्षक होते. मी मजेने तिच्याकडे पाहू लागलो. पण हा आनंद क्षणिक होता. काही वेळातच ती पाकोळी एका कोळ्याच्या जाळ्यात अडकली. पाकोळीने सुटण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु केला. तिची तडफड, तो शेवटचा संघर्ष पाहून माझे मन हेलावले. मी पटकन उठून तिचे पंख अलगद पकडले, तिला जाळ्यातून सोडवून, बाहेर सोडून दिले. जाळ्यावर आता एक कोळी होता - राखाडी रंगाचा, अगदीच रुक्ष. माझ्या मनात त्या जीवाविषयी भयंकर तिरस्काराचा भाव आला. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मी पहिले. जाळं तसच होतं, कोळ्याचा पत्ता नव्हता. मी सगळं जाळं साफ करून माझ्या कामाला लागलो. रात्री बेडवर पडल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला. जाळं पुन्हा तसंच होतं. एक नवीन पाकोळी त्या जाळ्यात अडकली होती आणि तोच कोळी जाळ्यावरून तोल सांभाळत सावकाश आपली भक्ष्याकडे निघाला होता. पाकोळीची ती धडपड मला सहन होईना. मी पाकोळीला पुन्हा सोडवले. कोळी पुन्हा निघून गेला. पुढे हा क्रम आठवडाभर चालू राहिला. आठवड्याभराने मी जाळं काढत असताना कोळ्याचा पत्ता नेहमीप्रमाणे कुठेच नव्हता. नंतर जेव्हा मी फारशी झाडायला गेलो तेव्हा मला एक राखाडी रंगाचा रुक्ष कोळी मेलेला दिसला. माझ्या हातून झाडू गळून पडला.कशीबशी स्वच्छता उरकून मी बाहेर पडलो. आज रात्री मी बेडवर पडून वरती पहिले तेव्हा दुसऱ्या एका कोळ्याने आपले जाळे तयार केले होते. काही वेळातच एक पाकोळी उडत उडत येउन त्या जाळ्यात येउन अडकली. पाकोळीने फडफड सुरु केली. एक कोळी सावकाशपणे तिच्या दिशेने चालला होता. पाकोळीची धडपड वाढत होती, तशीच माझा मनातली चलबिचलही, जणू मीच त्या जाळ्यात अडकलो होतो. पण आज उठून त्या पाकोळीला वाचवण्याचे धाडस माझ्यात नव्हते. नियतीचा हा क्रूर नियम मोडण्यासाठी माझा हात आता उठेना. काही क्षणांत ती प्राणांतिक धडपड थांबली आणि मग कोळ्याने आपले काम आटोपले. मी मात्र छताला लागलेल्या जाळ्याकडे पाहतच राहिलो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
6834 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

छान लिहिलं आहे.

रुपी
गुरुवार, 07/14/2016 - 01:07 नवीन
छान लिहिलं आहे. फक्त शेवटच्या परिच्छेदात "नियतीचा" ऐवजी "निसर्गाचा" जास्त बरोबर वाटलं असतं बहुतेक.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.. मिपा वर माझं

निखिल निरगुडे
गुरुवार, 07/14/2016 - 01:25 नवीन
धन्यवाद.. मिपा वर माझं पाहिलंच लेखन आहे, असेच प्रतिसाद मिळाले तर आणखी उत्तम लिहिण्याचा प्रयत्न करेन....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

फक्त शेवटच्या परिच्छेदात

किसन शिंदे
गुरुवार, 07/14/2016 - 11:04 नवीन
फक्त शेवटच्या परिच्छेदात "नियतीचा" ऐवजी "निसर्गाचा" जास्त बरोबर वाटलं असतं बहुतेक.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

चांगलं लिहिलं आहे!

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/14/2016 - 08:33 नवीन
मिपावर स्वागत!
  • Log in or register to post comments

मिपावर स्वागत

सुधांशुनूलकर
गुरुवार, 07/14/2016 - 09:07 नवीन
चांगलं लिहिलंय. लेखन चांगलं, सकस असेल, तर चोखंदळ मिपाकर चांगलेच प्रतिसाद देतील, याची माझ्या अनुभवावरून खातरी देतो. पुलेशु
  • Log in or register to post comments

छान लिहिलय.... +१

शित्रेउमेश
गुरुवार, 07/14/2016 - 10:59 नवीन
छान लिहिलय.... +१
  • Log in or register to post comments

तुमचा पहिलाच लेख आवडला.

किसन शिंदे
गुरुवार, 07/14/2016 - 11:04 नवीन
तुमचा पहिलाच लेख आवडला. पुलेशु
  • Log in or register to post comments

छान लिहलंय

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 07/14/2016 - 11:12 नवीन
छान लिहलंय
  • Log in or register to post comments

नैसर्गीक शिकवण

नाखु
गुरुवार, 07/14/2016 - 11:26 नवीन
घरी नॅशनल जिऑग्राफी सारखे चॅनेल बघताना जी हिंदीतून आणि दूरदर्शनवर टॉम अल्टरचा एक कार्यक्रम असे त्यातील काही वाक्ये सम्जलयावर जंगलातील प्राण्यांची शिकारीची अनिवार्यता आणि अपरिहार्यता समजली.
निसर्गात भूक/गरज नसताना शिकार करणारा एकच प्राणी म्हणजे "माणूस".
मिपावर स्वागत पुलेशु
  • Log in or register to post comments

भूकेबद्दल तरी पुर्ण खरं

मराठी कथालेखक
गुरुवार, 07/14/2016 - 11:31 नवीन
भूकेबद्दल तरी पुर्ण खरं नाहीये. गरजेबद्दल म्हणाल तर 'स्वसंरक्षण' हीच गरज असली पाहिजे पण त्याव्यतिरिक्त जर शिकार होत असेल तर ती 'गरजेची नसून' असेच म्हणावी लागेल काही प्राण्यात नर हे परिसरातील दुसर्‍या नरांवर हल्ले करुन त्यांना संपवू पहातात (उदा: सिंह. बहूधा मांजरदेखील).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

लेखनशैली चांगली आहे... बाकी

मराठी कथालेखक
गुरुवार, 07/14/2016 - 11:26 नवीन
लेखनशैली चांगली आहे... बाकी कोळी /पाकोळी इत्यादींच्या आयुष्यात विशेष रस नसल्याने कथा विशेष आवडली नाही. एकवेळ हत्ती, वाघ , सिह असे मोठे प्राणी किंवा गेला बाजार कुत्रा/मांजर यांची कथा टाका :) (बाकी जव्हेरगंज साहेब दिसत नाहीत आजकाल) पुढील लेखनास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

चला प्राणिसंग्रहालयात.

धनंजय माने
गुरुवार, 07/14/2016 - 11:32 नवीन
चला प्राणिसंग्रहालयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

तिथे फक्त प्राणी असतील.. कथा

मराठी कथालेखक
गुरुवार, 07/14/2016 - 11:40 नवीन
तिथे फक्त प्राणी असतील.. कथा कोण सांगणार ? जव्हेरगंज साहेबांना सोबत न्याव लागेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

१. जव्हेरगंज हे हत्तीचं नाव

धनंजय माने
गुरुवार, 07/14/2016 - 12:07 नवीन
१. जव्हेरगंज हे हत्तीचं नाव आहे २. जव्हेरगंज प्राण्यांच्या कथा लिहीत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

तुम्ही वाचल्या नसतील

मराठी कथालेखक
गुरुवार, 07/14/2016 - 14:51 नवीन
जव्हेरगंज प्राण्यांच्या कथा लिहीत नाही
ह्या घ्या शिट्टी मैथिली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

त्या रूपक कथा आहेत. धन्यवाद.

धनंजय माने
गुरुवार, 07/14/2016 - 19:04 नवीन
त्या रूपक कथा आहेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

धन्यवाद

मराठी कथालेखक
Fri, 07/15/2016 - 16:11 नवीन
बरं झालं हो सांगितलत ते ... मला तर माहितच नव्हतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

लेखन जमलंय. पुलेशु.

अभ्या..
गुरुवार, 07/14/2016 - 11:31 नवीन
लेखन जमलंय. पुलेशु. फक्त ते पाकोळी म्हणजे माझया मते बारके वटवाघूळ टाईप असते. त्यावर ठिपके बीपके नसतात. तुम्ही म्हणता ते फुलपाखरू अथवा पतंग असावा.
  • Log in or register to post comments

हां.. मी पण विचार करतोय, एवढी

यसवायजी
Fri, 07/15/2016 - 16:31 नवीन
हां.. मी पण विचार करतोय, एवढी मोठी पा़कोळी कोळ्याच्या जाळ्यात तडफडते कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पाकोळी म्हणजे फुलपाखरासारखंच

तुषार काळभोर
Wed, 07/20/2016 - 11:34 नवीन
थोडं मळकट/मातीसारख्या रंगाचं असतं. आकार (गेंडाछाप) चाराण्यापासून नवीन दहा रुपयाच्या नाण्याएवढा. लई डीझाईन नसतंय, भौतेक प्लेन कलर, असलंच तर थोडंफार चारसहा बारीकमोठ्या ठिपक्यांचं डिझाईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छान लिहिलंय.

एस
गुरुवार, 07/14/2016 - 11:56 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

छान लिहीलंय.

धनंजय माने
गुरुवार, 07/14/2016 - 12:08 नवीन
छान लिहीलंय.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय

पैसा
गुरुवार, 07/14/2016 - 12:13 नवीन
छान लिहिलंय
  • Log in or register to post comments

उत्तम जमले आहे लेखन! आवडले

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 07/14/2016 - 12:20 नवीन
उत्तम जमले आहे लेखन! आवडले,मिपावर स्वागत
  • Log in or register to post comments

मिपावर स्वागत. अपाल्हाळीक सरळ

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 07/14/2016 - 12:34 नवीन
मिपावर स्वागत. अपाल्हाळीक सरळ साधे लेखन. फक्त ती पाकोळी नसणार कारण ती चिमणीच्या आकाराएवढी असते, त्यामुळे अभ्याशी बाडीस तो पतंग असावा.
  • Log in or register to post comments

मस्तय

वगिश
गुरुवार, 07/14/2016 - 12:43 नवीन
मस्तय
  • Log in or register to post comments

अतिषय सुरेख लेखन . आमच्या

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/14/2016 - 13:04 नवीन
अतिषय सुरेख लेखन . आमच्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ! मागे मीही कोळ्यांच्या एका विशिष्ठ प्रजातीवर सखोल अभ्यास करत होतो , तेव्हा एकदा कोळ्यांच्या जाळ्यात वाईट अडकलो होतो , सगळीकडुन कोळी तुटुन पडले , पण तुमच्या सारखाच काही सज्जनांनी तेव्हा कोळ्याच्या जाळ्यातुन मला बाहेर काढले . तेव्हा पासुन कानाला खडा ... कोळ्यांच्या अजिबात नादाला लागायचे नाही , कुठेही जाळे दिसले तर त्यापासुन दोन हात लांबच रहायचे असे ठरवले आहे :)
  • Log in or register to post comments

हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!

धनंजय माने
गुरुवार, 07/14/2016 - 13:43 नवीन
हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!

धनंजय माने
गुरुवार, 07/14/2016 - 13:48 नवीन
हा शुद्ध हलकटपणा आहे मार्कस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मिपावर स्वागत!!

मोहनराव
गुरुवार, 07/14/2016 - 13:14 नवीन
मिपावर स्वागत!!
  • Log in or register to post comments

उत्तम जमले आहे !!

चिनार
गुरुवार, 07/14/2016 - 13:39 नवीन
उत्तम जमले आहे !! मिपावर स्वागत!!
  • Log in or register to post comments

चांगली आहे कथा

जगप्रवासी
गुरुवार, 07/14/2016 - 17:36 नवीन
चांगली आहे कथा
  • Log in or register to post comments

कथा आवडली...

मुक्त विहारि
गुरुवार, 07/14/2016 - 17:54 नवीन
मिपावर स्वागत.
  • Log in or register to post comments

उत्तम लेखन. पण पाकोळी

मृत्युन्जय
गुरुवार, 07/14/2016 - 18:31 नवीन
उत्तम लेखन. पण पाकोळी कोळ्याच्या जाळ्यात अडकेल असे वाटत नाही. तुम्हाला पाखरं म्हणायचे होते का?
  • Log in or register to post comments

मिपावर स्वागत. छान जमलीय रुपक

राजाभाउ
गुरुवार, 07/14/2016 - 18:36 नवीन
मिपावर स्वागत. छान जमलीय रुपक कथा. पुलेशु
  • Log in or register to post comments

कोळ्याच्या जाळ्याच्या तुलनेत

श्रीगुरुजी
गुरुवार, 07/14/2016 - 21:02 नवीन
कोळ्याच्या जाळ्याच्या तुलनेत पाकोळी हा खूपच मोठा व ताकदवान सजीव असतो. इतका मोठा सजीव कोळ्याच्या जाळ्यात अडकणे अशक्य वाटते. कोळ्याच्या जाळ्यात साधारणपणे छोटे कीटक, फुलपाखरांसारखे अत्यंत हलके कीटक अडकू शकतात. परंतु पाकोळीएवढे तुलनेने आकाराने मोठे व तुलनेने वजनदार सजीव अडकवून ठेवण्याइतके कोळ्याचे जाळे ताकदवान असते असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

વાહ વાહ .... મિપાવર સ્વાગત...

लालगरूड
गुरुवार, 07/14/2016 - 21:12 नवीन
વાહ વાહ .... મિપાવર સ્વાગત... ળિતે રહો ભિખતે રહો...
  • Log in or register to post comments

कथा उत्तम जमली आहे. फक्त

अभिजीत अवलिया
गुरुवार, 07/14/2016 - 23:35 नवीन
कथा उत्तम जमली आहे. फक्त पाकोळी ऐवजी एखादा किडा असे उल्लेख असायला हवा होता. बाकी उत्तम.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय.

मार्मिक गोडसे
Fri, 07/15/2016 - 00:03 नवीन
छान लिहिलंय. पाकोळी हा फुलपाखरासारखाच दिसणारा किटक आकाराने फुलपाखरापेक्षा लहान असतो. रंगही फार आकर्षक नसतो त्याचा.
  • Log in or register to post comments

आता कसं व्यवस्थित जमलं.

धनंजय माने
Fri, 07/15/2016 - 02:05 नवीन
आता कसं व्यवस्थित जमलं. पाकोळी म्हणजे काळं फुलपाखरुच...(इथे तरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

पाकोळी म्हणजे काळं फुलपाखरुच

जव्हेरगंज
Fri, 07/15/2016 - 09:43 नवीन
पाकोळी म्हणजे काळं फुलपाखरुच
+१००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

माझ्या माहिती प्रमाणे आणि इथे

निखिल निरगुडे
Fri, 07/15/2016 - 04:04 नवीन
माझ्या माहिती प्रमाणे आणि इथे अभिप्रेत असलेली पाकोळी वटवाघूळ किंवा चिमणी सारखी नसून फुलपाखरासारखा एक कीटक असतो, पुन्हा पडताळून पाहीन.
  • Log in or register to post comments

आणि मनापासून खरोखर धन्यवाद...

निखिल निरगुडे
Fri, 07/15/2016 - 04:08 नवीन
आणि मनापासून खरोखर धन्यवाद... सर्व प्रतिक्रिया वाचून खूप आनंद वाटला.. आपल्या सूचना वाचून मिपा वर लिहिण्याचा उद्देश्य पूर्ण होईल याची खात्री होतेय, योग्य ते बदल करून अजून अचूक आणि चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करत राहीन..
  • Log in or register to post comments

क्लास!!!

जव्हेरगंज
Fri, 07/15/2016 - 09:42 नवीन
क्लास!!!
  • Log in or register to post comments

पाकोळी नसावी. पाकोळी जाळे

जागु
Fri, 07/15/2016 - 12:53 नवीन
पाकोळी नसावी. पाकोळी जाळे फाडून टाकेल. तुम्हाला दुसर काहीतरी म्हणायच असेल. आता त्याचा फोटोच काढून टाका इथे उत्सुकता लागली आहे. आणि हे निसर्गचक्र आहे. आमच्याइथे नेहमी साप आणि पक्षांचे हे खेळ चालू असतात.
  • Log in or register to post comments

पाकोळीने जाळे तोडले आहे.

मितभाषी
Fri, 07/15/2016 - 16:40 नवीन
पाकोळीने जाळे तोडले आहे. सोनेरी कोळी ठार झाला आहे.
  • Log in or register to post comments

नविन मिपाकरांच स्वागत, छान

Bhagyashri sat…
Tue, 07/19/2016 - 21:48 नवीन
नविन मिपाकरांच स्वागत, छान लिहीलंय
  • Log in or register to post comments

छान लिहिलय!

अनुप ढेरे
Tue, 07/19/2016 - 22:02 नवीन
छान लिहिलय!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा