Skip to main content

@ संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 10/07/2016 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय संपादक, मी गेली ४ ते ५ वर्षे नियमित पणे मिपाचा सदस्य आणि वाचक आहे. इथे उत्तम पैकी ज्ञान विशेषतः पा.कृ. आणि भटकंती, मिळते हा फायदा आहेच. उगाच खोटे का बोला? मिपाने मला फार उत्तम मित्र पण मिळवून दिले. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे आणि इतरही अनेक. कित्येकां बरोबर वाद-विवादही होत असतात, पण मी तरी ते त्या-त्या धाग्यांपुरतेच ठेवत होतो, ठेवतो आणि ठेवीन. पण इथे सध्या चंपाबाई नामक आय.डी. बहूदा हाच आय.डी. आधी मोगा, मुग्धा गोडे, उद्दाम, सचिन ह्या आय.डी.ने कार्यरत असावा. (असा संशय आहे.) आम्ही (म्हणजे मी आणि इतरही अनेकजण) इथे येतो ते, काही तरी मिळवायला, मग ते ज्ञान असो किंवा, आमच्या स्वभावाला शोभतील अशा व्यक्ती आणि वल्ली शोधायला. प्रामाणिकपणे सांगायचे तर, इथे खूप काही मिळाले. व्यक्तीशः अनेक उत्तम माणसे मित्र आणि सवंगडी म्हणून आयुष्यभरासाठी मिळाली.पुढे-मागे मी मिपाचे सदस्यत्व सोडले किंवा मिपाने माझे सदस्यत्व रद्द केले तरी पण नाखू, सुरंगी, पैसा, अजया,सुबोध खरे,बोका, वल्ली, सूड, स्पा, विनोद१८, टका, प्यारे१, कुंदन, सगा, रामदास, सर्वसाक्षी,गवि, नानबा, अजय इंगळे, निनाद मुक्काम प.ज., आत्मू गुरुजी,डॉ. म्हात्रे,नंदादीप, मंदार कात्रे, भटक्या खेडवाला, शैलेन्द्र, रघूनाथ केरकर, पम्या, प्रगो, असे अनेक मिपासदस्य माझे मिपा सवंगडी असतीलच.ह्याची खात्री आहे. काहींना भेटता आले तर काहींना खूप प्रयत्न करून पण अजिबात भेटता आले नाही. (उदा. इरसाल, सोन्याबापू, चिनार, खेडूत, पि.डां, जेपी,स्पार्टाकस, फारएन्ड, चित्रगुप्त, चतुरंग, हुप्प्या, आजानुकर्ण, विवेक पटाईत, गणपा, अजिंक्य विश्वास, डॉ. बिरुटे, जैनांचे कार्टे, अशी बरीच आहेत.पटकन आठवली ती नावे लिहिली.) पण आता मात्र मिपाचा उबग आला आहे, कारण एकच, डू.आय.डी. विशेषतः माई, नाना, ग्रेट थिंकर सारखे. माझ्यासारख्याच विचारसरणी सारखे इतरही असतील किंवा नसतीलही. पण इथे एखादा माझ्यासारखा सामान्य आय.डी.पण त्याची व्यथा मांडू शकतो, म्हणून हा प्रपंच. मिपावर आमचा लोभ आहेच आणि तो वाढेलही पण कृपया, ह्या डू.आय.डींचे, आता तरी काही तरी करा आणि एखादे ठोस पावूल तरी उचला, अशी नम्र विनंती. मिपा वर येणे सोडल्याने किंवा मिपाचे माझे सदयत्व रद्द झाल्याने, माझेच नुकसान आहे, ह्याची मला पुर्ण कल्पना आहे. आपलाच, मुवि

वाचने 47070
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by स्वीट टॉकर

एक माणूस किमान 5 7 नंबर असे देऊ शकतो , ज्या मोबाईल ला त्याला access असेल। म्हणजे otp वगैरे पाठवला आणि वेरिफिकेशन compulsary केले तर दुर्लक्ष्य एव्हडा एकमेव उपाय आहे हौशे नवशे गवशे हे सगळीकडे असायचेच आपल्याला जेवढे स्वतंत्र आहे व्यक्त होण्याचे, तेवढेच त्यांना हि आहे आपल्याला त्यांची मते, विचार, लेखन आवडत वा रुचत नसेल तर सोडून द्या 2 5 न आवडणाऱ्या लोंकां साठी बाकी 50 मित्रांपासून कशाला दूर जात ? मिपा बाहेर संपर्कात राहिलात तरीही तुम्ही बऱ्याच गोष्टी , ज्या मिपा मुळे common आहेत, त्या मिस कराल शेवटी कुणाचेच कुणा वाचून आडत नसते। ना तुमचे संस्थळावाचून किंवा संस्थळाचे तुमच्या वाचून शाळा कॉलेजात नोकरीत कमी लोकांकडे दुर्लक्ष्य करावे लागते का? Trolls हे सगलीकडे असतातच च च च त्याला संस्थळ हे कसा अपवाद असेल? लोकं ची उपद्रव क्षमता हि तुम्ही दुर्लक्ष केलेत कि 0 होते हे लक्ष्यात घ्या

In reply to by स्वीट टॉकर

मुविंनी लैच प्वाईंटाचा मुद्दा मांडलेला आहे. भात ताटात आल्यावर खडे काढत बसण्यात मजा नाही. आयडी मंजूर करायचे फिल्टर्स वाढवले जाउ शकतात किंवा संपादन कठोर केलं जाउ शकतं. (पैसाताई, वल्लीबुवा वगैरे संपादक असतांना ट्रोलगिरी कमी होती- बायस असू शकतो, माहीती नाही. किंवा सध्या संपादकांची संख्या कमी असल्याने त्यांना वेळ देता येत नसावा) दरवेळी शिशुपालाचे शंभर अपराध होउ द्यायचे आणि मग काहीतरी करायचे. दुर्दैवाने आयडींच्या ट्रोलगिरीला संपूर्णपणे दुर्लक्षिले जात नाही. दुर्लक्ष करायला हरकत नाही पण उत्तम धाग्याच्या शेवटच्या क्षणी केलेली ट्रोलगिरी पाहून आधी बासुंदी 1 आणि त्यावर लिंबू जिभेवर ठेवायला दिलं की कसं होईल तसं वाटतं.2 आणि अजूनही दुर्लक्ष करायचं म्हणत असाल तर आधीचे आयडी कशाला ब्लॉक करता आहात. राहू देत की. करू दुर्लक्ष.

मुवि, आभासी जगाचं फार टेन्शन घेतलंत. आपल्याला त्रासदायक वाटणारे लेख वाचायचेच नाहीत. तुम्ही ज्या पद्धतीच्या आयडींना त्रासून लेख लिहीला आहे त्यांना तांत्रिक भाषेत Internet troll म्हणतात. त्यांच्याबद्दल वाचा. एकदा वाचलेत की तुम्ही आपोआप दुर्लक्ष करु लागाल. इथून आपण काय घ्यायचं हे एकदा मनात पक्कं ठरवलं की मिपा हा माणसं जोडण्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहे. मस्त उगाचच मित्रमंडळींच्या खरडवह्यांमध्ये डोकवायचं, त्यांची मस्करी करणारी खरड टाकायची. कधी वेळ असल्यास भेटायचं, सोबत पुस्तकं खरेदी करायची, जेवायचं, मस्त रक्त वारुणी किंवा आपल्या सोनेरी पेयाचा आस्वाद घ्यायचा. एक राहिलं, एखादा मित्र माझ्या धाग्यावर प्रतिसाद दे म्हणून फारच मागे लागला तर लेख उघडायचा. झरकन पेज स्क्रोल करायचे आणि "छान लिहिलंय" किंवा "मस्त लिहिलंय" असं एक विशेषण आणि एक क्रियापद असणारा दोन अक्षरांचा प्रतिसाद टाकायचा. प्रयत्न करा. नक्की जमेल. आपण इथे मौज करण्यासाठी येतो. मनस्ताप करुन घेण्यासाठी थोडेच येतो. :)

In reply to by सतिश गावडे

गावडे सर अगदी बरोबर सांगितलेत मुविकाका. म्हणजे कसंय ना की गावडे सर बोलतो तसा वागणारा माणूस. अगदी मी सुध्दा "वाच की मी लिहिलेली कथा" असे मागे लागलो की "मस्तय, अप्रतिम लिहिलेय" असे धाग्यावर चार थेंब शिंपडून जातात. कारण एकच. त्यांना मी लिहितो ते कथाविषयात गम्य नसतेच. मग मीही टेन्शन घेत नाही. त्यांनी अध्यात्मावर काही लिहिले की असेच चार थेंब परत करुन येतो. संपला हिशोब. बाकी धन्या हा मित्र अ‍ॅक्चुअली कसाय हे मला चांगले माहीताय. व्यावहारिक जीवनात त्याचे सल्ले मोलाचे असतात. अडीअडचणीला तो कसा धावून येतो हे आम्हाला कळते. मग आभासी अन खरे यातला फरक पटकन कळून जातो. राहता राहिला डूआयडी अथवा ट्रोलाचा प्रश्न. मला तर वैयक्तिक ट्रोलांचा त्रास कधी झालाच नाही. कारण मी लिहिणार कथा बिथा. तिकडे ट्रोल फिरकत नाहीत. एखाद्या विघ्नसंतोष्याने तसा परयत्न केला तर मिपाकरच परस्पर चंपी करतात. आपण काई करावेच लागत नाही. ट्रोलांचे हक्काचे कुरण म्हणजे राजकीय, सामाजिक आणी काही इतिहासावरचे धागे. मी तिकडे जास्त फिरकतच नाही. सो टेन्शनका सवालच नै पैदा होता. काही ट्रोलांची काही मते खरोखरी विचारात पाडणारी असतात. अशांनी चर्चा एकतर्फी न होता नाण्याची दुसरी बाजू पण आहे असे वाटते. सो तेवढाच डोस्क्याला खुराक. डूआयडी हा जरा विवादास्पद मॅटर आहे. खर्‍या आयडीने मनातली मळमळ ओकता येत नसेल म्हणून काढलेले डूआयडी, स्वतःची लोकप्रियता वाढवायसाठी वापरलेले डूआयडी, उगी चर्चेत राहण्यासाठी असलेले अटेंशन सीकर डूआयडी, अ‍ॅक्चुअली ओरिजिनल आयडी बिझी असल्याने येत नाही पण मिपाशिवाय राहावत पण नाही म्हणोन काढलेले डूआयडी आणि कुणाला तरी त्रास द्यायचाच ह्या हेतूने काढलेले डूआयडी अशी मानसिक रोगाची लक्षणे असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच हितावह. अगदीच त्रास होत असेल तर सरळ मालकाकडे तक्रार करावी. ते अशा मानसिक रोग्यांना मग ते आयडी असोत की डूआयडी, नुसते सरळ नाही करत तर योग्य ती ट्रीटमेंट देतात याचा अनुभव आहे.

सकाळच्यान लग्णात हुतो,त्यामुळे आता धागा अणि प्रतिसाद वाचलो, या जगामध्ये संतुलन आवश्यक आहे,पांढरा रंग असला कि काळा असतोच,देव जर असतील तर दानव असणारच,सुख असेल तर दुख हे असणारच त्यामुळेच तर जग टिकून आहे. तराजूच्या एकाच तागडीत माल भरला तर तोलता येत नाही,म्हणून दुसर्या तागडीत वजन ठेवावे लागते त्याशिवाय संतुलन साधता येत नाही. कसय ना मित्रांनो कोणत्याही गोष्टीत संतुलन आवश्यक आहे,हेच मिपाला सुद्धा लागू होते. By the way,what is the definition of troll??

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

मी तुम्हाला किती वेळा सांगितलय की असं खाली मुंडी घालून नका येत जाऊ. वर मुंडी ठेवली असती तर हे https://en.m.wikipedia.org/wiki/Internet_troll दिसलंच असतं ना ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डेफिनेशन सुद्धा भावनाप्रधान माणसांच्या कंपूने बनवली असावी. मुळात विचार हे तार्किक असले पाहिजेत न कि भावनिक, आणि तार्किक विचार भावनिक लोकांना झेपले नाहीत कि भावनिक विचारवाले तार्किक विचारवाल्यांना 'ट्रोल' असे संबोधतात. आणि मिपावर ट्रोल का जन्मतात? उत्तर- एकांगी,दांभिक विचारसरणीला कंटाळून.

In reply to by मितभाषी

हो ना, एकांगी दांभिकतेवर लाथाळ्या झाडणार्‍या गाढवाचे कौतुक होत असेल तर इतरांना शिव्या देण्यात काय पॉइंट?

'८०-२० (Eighty-twenty)' हा व्यवस्थापन शास्त्रातला नियम इथेही लागू होतो. २०% मिपाकर ८०% त्रासदायक आहेत, असं सर्वसाधारण प्रमाण आहे. आपण उरलेल्या ८०% (चांगल्या) मिपाकरांकडे लक्ष देऊ. (म्हणजे आपल्याला फक्त २०%च त्रास होईल.) जास्त कट्टे करू. तिथे हे ८०% (चांगले) मिपाकर भेटतील याची खातरी. (ह.घ्या.)

१. मिसळपाव नावातच सर्व आहे, अनेक पदार्थांची भेळ त्यात आंबट-गोड, कडू-तिखट सर्वच राहणार. २. प्रत्येक सदस्याचे व्यक्तिगत विचार असतात, तो मांडतो. ३. काहींना स्वत:चे विचार मांडताना भीती वाटते, कारणे काहीही असू शकतात. ते अनेक नावे धारण करतात. त्यात मला तरी गैर वाटत नाही. ४. आपल्याला जे पटले नाही आपण त्याला नकारात्मक प्रतिसाद देतो. लिहिणारा डू आय डी असेल त्याला भरपूर कडू-तीखट प्रतिसाद मिळतातच. ५. संपादक मंडळाला धागा किंवा प्रतिसाद उडविण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कसा वापरायचा याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. बाकी माझे मत, चंपाबाई नी लिहिलेली कविता काढण्याचे मला तरी काहीच कारण दिसले नाही. त्यांना त्यांचे मत मांडू द्या, आम्ही आमचा प्रतिसाद देऊ. वाचणार्यांना जे रुचीकर आहे, ते ग्रहण करतील. ६. मिसळपाव सारखे 'संकेतस्थळ' अजून तरी मराठीत अन्य नाही. इथे लोक वाचतात आणि भरपूर प्रतिसाद हि देतात. ७. संकेतस्थळ सोडण्याची भाषा करण्यापेक्षा आपले मत अधिक जोमाने मांडा.

चंपाबाई या आयडीने नक्की कोणाचं काय वाकडं केलय / कोणाला काय त्रास दिलाय हे कोणी समजावू शकेल काय?

In reply to by अनुप ढेरे

ते मुस्लिम धर्माचे श्रीगुरूजी आहेत (किंवा तसे उगा भासवतात) म्हणून लोकांना त्यांचा त्रास होत असावा =)) =)) =)), त्याचे तसे असण्यात आम्हाला काही हरकत नाही वैयक्तिक , फक्त इस्लामच्या नादात जेव्हा हे राजेश्री पाकिस्तान वगैरे शत्रूराष्ट्र किंवा दार उल उलूम वगैरेची भलामण करत बसतात ते पाहून आमचे शिपूरडे इमान जळते, त्यालाही कोणी आमची वैयक्तिक बौद्धिक कुवतीची सीमा असे समजल्यासही आमची काही हरकत नाही हे ही स्पष्ट बोलतो! बाकी आम्हाला वैयक्तिक इग्नोरस्र आवडते, आधी जमत नसे आता जमते, त्यामुळे आजकाल श्रीगुरुजी ह्यांचा ही त्रास होत नाही अन मोगा/नाना/हितेश ह्यांचा ही नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्यांची बहुतांश मतं मलाही अजिबात पटत नाहीत. पण पटत नाहीत म्हणून आयडी उडवा असे गळे काढायचे?

In reply to by अनुप ढेरे

अनुपजी मुविंचे किंवा इतरांचे काय आक्षेप आहेत माहित नाही, - मी अगदी डूआयडींचाहि कधी विरोध करत नाही केवळ विचारांवर फोकस ठेवतो, - चंपाबाई या आयडी ची एक मिपा संपादकांनी उडवलेली कवितेतील किमान एक ओळ एका स्त्रीचे व्यक्तीचे अनावश्यक चारीत्र्य हनन स्वरुपी असावी असे माझे मत मी तेथील प्रतिसादात नोंदवले होते असे आठवते. बाकी चालू द्या.

खर तर मालक यावरून काहीच उपाय करू शकत नाही.डुआयडी ची ओळख पटवन्यात तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे चर्चा निरर्थक आहे.

भारताला सन्नी लोयोनी चालते, तर तुम्हाला चंपाबाई का नाही..? प्रयत्न करा बघू, आमची आजी सांगायची, कावळ्यासोबत लगीन झाले, तरी हळूहळू ते पण आवडायला लागेल,.. :) जी आली, जशी आली चालवून घेशील.. :)

असे काय मुविकाका? तुम्ही कुठेही राहायला असलात (डोंबिवली/चिपळूण) तरी आम्ही मात्र तुम्हाला मिपा सोडून कुठे जाऊ देणारच नाही. रच्यकने, मला स्वतःला पण मिपावरील खिकारणार्‍या ट्रोलभैरवांचा एकेकाळी खूपच त्रास झाला होता.मला पण मिपा सोडावे असे वाट॑त होते.नंतर मात्र कातडी निबर करून गेंड्याची कातडी बनवली. अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेले उत्तम असे मला वाटते. अर्थातच तुम्हाला काही सांगायचा माझ्यासारख्यांना अधिकार नाहीच.पण अशांकडे दुर्लक्ष करता आले तर बघा ही आग्रहाची विनंती मात्र आहेच. (मुविकाकांच्या कित्येक पुतण्यांपैकी एक) ट्रुमन

मिपावर टका बॅन होतो, बॅटमॅन बॅन होतो, विमे बॅन होतो, सुहास बॅन होतो. चंपा सुद्धा होइल. तुम्हाला त्रास इतकाच होतो आहे ना की: १. पहिले चार जेन्युइन आहेत आणि पाचवा विघ्नसंतोषी आहे. २. पहिल्या चारांचे मिपाच्या जडणघडणीत योगदान आहे आणि पाचवा इथे फक्त उच्छाद मांडण्यासाठी येतो. ३. पहिले चौघे विषयानुरुप लिहितात आणि चौथा फक्त गरळ ओकतो. ४. पहिले चारांनी काही उत्कॄष्ट लेख / प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि पाचवा फक्त जिथे तिथे हागुन ठेवतो. ५. पहिल्या चारांकडुन एखादी चूक झाली असेल / नसेल आणि पाचवा सतत ओकार्‍या काढत असतो. ६. पहिले चार द्वेषमूलक लिखाण करत नाही आणि पाचवा कायम आपली जळजळ बाहेर काढुन इथे घाण करतो. अजुनही काहीए गोष्टी खुपत असतील तुम्हाला कदाचित पण फक्त एवढ्यासाठी मिपा सोडुन जायचे? पहिल्या चारांबद्दल ज्यांनी निर्णय घेतला ते पाचव्या बद्दलही घेतील की. तुम्ही उगी रहा बरे. अगदीच असह्य झाले तर "रंग माझा वेगळा"म्हणायचे आणी बाजुला व्हायचे. हाकानाका.

In reply to by मृत्युन्जय

नितवाचक नाखु. स्वगत : तुम्ही मिपातून बाहेर पडू शकता मिपा तुमच्यातून बाहेर पडत नाही, हे असले तरी मिपाबाहेरही जग आहे हेही सत्य आहे.

जसं मला आकलन झालय त्यांच, त्याप्रमाणे अस वाटतय की थोडा भावनिक, हळव्या मनाचा माणुस. आपण भलं आपलं काम भलं या सदरातला. खोटेपणा करायचा नाही किंवा करु द्यायचा नाही असा स्टँड ! पण सध्या तसं जग राहिलय कुठे ? उलट खोटारडेपणाला भाव आलाय. तर मुवि मिपावर (फक्त हं) कातड कमवुन घ्या (गेंड्यासारख कमवाल तर अतिउत्तम....... माहित आहे की नाही जमणार तुम्हाला). स्वतःला का मनस्ताप करुन घ्यायचा ? आता मी जेव्हा दिल्लीला कामाला होतो तेव्हा भुसावळ ते भोपाळ दरम्यान ट्रेन मधे हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. तस्मात तुम्हीही ही ट्रेन सोडु नये असे वाटते. शेवटी......आभासी जगात मित्र असलेले काही मोजकेच पण चांगली माणसे गमवावी वाटत नाहीत.

In reply to by इरसाल

हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. हे लै म्हणजे लैच भारी.

In reply to by इरसाल

हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. हे लै म्हणजे लैच भारी.

In reply to by इरसाल

ट्रेन मधे हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. तस्मात तुम्हीही ही ट्रेन सोडु नये असे वाटते. +१०००

मुवी काका, असा त्रास नका करून घेऊ. आज डुआयडींना कंटाळलात म्हणून मिपा सोडायला निघालात, उद्या संपादकांना कंटाळाल. मी संपादकांना कंटाळून एकदा मिपा सोडलेही होते. त्यावेळी संपादकांच्या मनमानीला वैतागून अनेकांनी सोडले होते मिपा. पण काळाच्या ओघात ते संपादक गेले आणि बहुतांश चिमण्या घरट्याकडे परत आल्या. त्यामुळे हे डुआयडीही येतील जातील, मिपा सोडणे हा उपाय होत नाही.

In reply to by सूड

इतक्यातचं ???? आपलं काय ठरलय सगळ्यांच्या यादीत (अगदी किराणा यादीत्सुद्धा) नाव आल्याखेरीज डोळे मिटायचे नाहीत.

जे वातावरण बिघडवत आहेत त्यांना संपादक बघुन घेतीलच. आणि जे आपल्याला टारगेट करुन मुद्दाम लिहीतात त्यांना "चल ए.. फुट" म्हणुन लाथ घालायची. कुत्तरड्यांच्या कोण नादाला लागतं का काका? एवढ्यासाठी मिपा कशाला सोडायचं?

हे सगळ नक्की काय चाल्लय? कोण चंपाबाई?

मुवि,तुम्हीच मिपावरच्या इतक्या मैत्रपरिवाराचा ऊल्लेख केला आहात.त्यापुढे अशा डुआयडींची काय मातब्बरी?अहो, इथे राष्ट्रध्वजाचा अपमान झाला म्हणून स्वतः न रागावता, केलेली तक्रार रागावून न करता, खेळीमेळीने करता आली असती असा शहाणपणा शिकवणारे मूर्खसुद्धा इथे भेटले आहेत.त्याना घाबरून मिपा सोडायचं कशाला?

101

हायला मुविकाका, 100 ला कसा सत्कार करायचा बरे तुमचा? एक ऍग्रोवन चा अंक, आणि पम्पासाठी 5 लिटर डिझेल देऊन करावा म्हणतोय. सोबत एक इरले पण.

In reply to by अभ्या..

5 लि. कहाला दलिन्द्री. डायरेक पंपाव खातंच काढूण देऊणा मुविला =))

मुविंचा सत्कार शांताबाई गाण्याची सीडी, कुराणाची प्रत आणि 'मी मिपाहितकर्ता' लिहिलेली टोपी देऊन करावा काय???? -पळून गेलेला

In reply to by खटपट्या

वारीला जायच्या तयारीत असतील. सोळा सोमवार , श्रावण सोमवार , श्रावणी , गणोबा देवी , शुक्रवार , ऋषी पंच्मी , दोन एकादश्या ... पुण्य मिळवायच्या इतक्या संधी तोंडावर असताना दूसरों के घर मे क्यु टाचा उपर कर कर के देख रहे है , समझ मे नै आ रहा.

कुत्रे काय?हिजडे काय?? सभ्य म्हणवून घेणारे आयडी कुठल्या पातळीवर येतात बघा.

In reply to by अनुप ढेरे

+1

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

तृतीयपंथी व्यक्तीला हिजडा हा शब्द आहे आणि कुत्रा हा एक प्राणी आहे. यात पातळी कुठे आली? उलट तुमच्या मनात या व्यक्तींविषयी आणि प्राण्यांविषयी हीन भावना आहेत असं का म्हणू नये?

In reply to by बोका-ए-आझम

जाऊ द्या बोका भाऊ, डिफेंड करायचे असले कोणाला किंवा कोणाच्या कन्सेप्टला करा डिफेंड पण इथे तृतीयपंथीय किंवा कुत्रा हे फक्त एखादे लिंग किंवा एखादा प्राणी ह्या अर्थाने खचितच वापरलेले शब्द नाहीयेत हे आपणही नीट जाणताच, उगाच त्याला पांढरा रंग द्यायचा प्रयत्न करू नका, तुमच्या सारख्या विचारी माणसाकडून हे अपेक्षित नाही इतके नोंदवतो. रच्याकने, कुतरड्या म्हणणे म्हणजे नुसता प्राण्याचा उल्लेख आहे असे मानत असल्यास आपल्या तुम्हांस शुभेच्छा भरभरून, शिवाय उद्या जर कोणी मला "ए बाप्या कुत्र्या, हिजड्या" अशी हाक मारली तर मी त्याने मला शिवी दिली म्हणावी का त्याने फक्त मला एका प्राणीविश्वातल्या एका स्पिशीजच्या नावाने पुकारून माझे पुल्लिंगी संबोधन गडबड केल्याचे म्हणावे?? अति अवांतर :- ह्या शिव्या मोगांच्या लायक आहेत का नाही हे माहिती नाही, पण पब्लिक फोरमवर त्या देणे हे गैरच आहे इतके मी आवर्जून नोंदवतो, संबंधितांनी व्यनि, खव ह्या सुविधांचा लाभ घ्यावा ही विनंती!, गंमत म्हणजे मागे डांगेंनी इथेच एक प्रयोग ठरवून केला होता, त्यावेळी भाषिक शुचिता अन मिपापावित्र्य ह्या विषयावर, डांगेंचा प्रतिसाद पडल्या पडल्या येऊन अक्कलामृत (डांगेंनाही नाही मलाच!!!) पाजणाऱ्या लोकांनी इथे न लावलेली हजेरी हाच काय तो डोक्यात जाणारा डोकेबाज कंपूबाज शाहजोगपणा!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू, माणूस एखाद्याला शिव्या देतो ना तो गळ्यापर्यंत आल्यानन्तर. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी खुसपट काढून काहीतरी तिरकं बोलणारी, श्रद्धास्थानावर घाण उडवणारी, किमान सभ्यता बाळगावं असं न समजणारी व्यक्ती शिव्यांच्या पात्र ठरते. एकदा केलं तर चुकून झालं मानता येतं. परत परत तेच???? मोगा/ चंपाबाई, 'प्लीज कंसल्ट अ सायकियाट्रिस्ट' असं इथून पुढे प्रत्येक धाग्यावर सांगणेत येईल याची नोंद घ्यावी.

In reply to by धनंजय माने

मोगांप्रती लोकांची काय भावना आहे, त्यांनी किती लोकांना खाजवून त्रास दिलाय हे मला माहिती आहेच, त्यामुळे जर कोणाला शिव्या द्याव्या वाटल्या तर त्याने त्यांच्या व्यक्तिगत संपर्कसूत्रात जाऊन त्या नोंदवाव्यात हे ही मान्य, पब्लिक फोरमवर शिव्या दिल्या तर मी हरकत नोंदवू नये का?? ह्यात मोगाची वकिली हा हेतू नाही तर, संबंधितांस अन त्यांच्या कंपूस टेस्ट ऑफ देयर ओन मेडिसिन आहे, बरं publically शिव्या देऊनही जर कोणी तिसरेच (ह्या केस मध्ये बोका भाऊ) त्या शिव्या कश्या नाहीत असे समजावत बसले तर त्यांना रिप्लाय देणे चूक असेल का?? महत्वाचे :- मोगा काय बोलतात ते मला अजिबातच पटत नाही, पण म्हणुन मी त्यांना अश्या सार्वजनिक शिव्या देऊन त्यांच्याच रांगेत जाऊन बसणार नाही (त्यांची रांग म्हणजे असंबद्ध अन उचकवणारे बड्बडणे)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्यामुळे तुमच्याशी सहमत. माझ्यासाठी काय म्हटलंय हे महत्वाचं आहेच, कोणी म्हटलंय तेही महत्त्वाचं आहे. खामुपाधुंनी घेतलेला आक्षेप जर तुम्ही घेतला असता तर मीही असे शब्द वापरण्याचा निषेध केला असता. पण खामुपाधु माझे मित्र नाहीत त्यामुळे मी त्याचा निषेध करणार नाही. ही biased वागणूक आहे का - तर आहे. काहीजण न सांगता biased वागतात. मी सर्वांना सांगून biased वागतो.

In reply to by बोका-ए-आझम

बाकी बायस वाला मुद्दा स्पष्ट बोललात ते आवडले!, आम्ही असेच आहोत हे सांगायला (इतर) लोकं का लाजत असतात ते आजवर कळलेले नाही, उगा नथीतून तीर मारणे रुचत नाही, एक घाव 2 तुकडे बरे, त्याबद्दल आपले अभिनंदन अन मैत्रीखात्यात का होईना मुद्दा समजून घेतल्याबद्दल आभार

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

हिजड्यांबद्दलचा उल्लेख माझ्या प्रतिसादात आलाय म्हणुन हा प्रतिसाद. कृपया प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचावा, नी आपण जे म्हणत आहात त्यावर नीट विचार करावा. कधी कधी रामदासस्वामी म्हणतात ते बरोबर आहे हे पक्के होते....(पुर्ण ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दुषण......)

In reply to by इरसाल

कृपया प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचावा, नी आपण जे म्हणत आहात त्यावर नीट विचार करावा.
इरसालजी, बदलत्या काळात लिंगवाचक अथवा प्राणीवाचक हेटाळणी शीष्टसंमत मानली जात नाही. आपला आधिचा प्रतिसाद वाचून खटकले केवळ आपल्या आयडीच्या विशेषनामाचे स्वरुप लक्षात घेऊन आश्चर्य वाटले नाही. डॉक्टर साहेबांचा ही खाली प्रतिसाद दिसतोय त्यांनी शब्द प्रयोग revisit करावा असे वाटते. 'काही' लोक त्रास द्यायचे आणि मी दुर्लक्ष करत असे म्हणणे आणि समाजात सरसकट हिनत्व दर्शक उद्देशानी वापरला जाणारा लिंगवाचक शब्द वापरण्याचा आग्रह 'उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपन्हुती, अन्योक्ती, पर्यायोक्ती या मराठी भाषेतील अलंकारांपैकी कुठे बसत नाही ना अशी साशंकता आणि म्हणुन शब्द प्रयोगाबाबत खेद वाटणे स्वाभाविक वाटते.

In reply to by माहितगार

पटले. पण मी जे लिहीले ते कोणाबद्द्ल संबोधन नसुन भुसावळ ते भोपाळ दरम्यान होणार्‍या हिजड्यांच्या त्रासाबद्द्ल बोललो. त्या प्रतिसादावर खालीमुंडीपाताळधुंडी साहेबांनी मी ते चंपाबाईसाहेब यांनाच (च ठळक) बोललो असे गृहित धरुन प्रतिसाद दिला त्यावर लगेच्च ४/५ जणांचे +१. असच चालु राहिलं तर भविष्यात केसरी रंग, हिरवा रंग वापरता येणे अशक्य होईल हो.

In reply to by इरसाल

ताकाला जाऊन भांडी लपवणे बरे नसते दादा, तुमच्याविषयी आदर आहे म्हणून सांगतोय, शिव्या (रुपकात का होईना) दिल्या आहेत तर मग डंके की चोट पर त्याची जबाबदारी पण घ्यावी, असो.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

रुपकात का होईना, पण मी त्यांना बोललेलोच नाही. कदाचित तुम्ही मला अजुनही ओळखत नाहीत म्हणुन अस म्हणाला असाल. जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना इथेच काय समक्ष जावुन सुद्धा हे बोलेन.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इरसाल साहेब का पैजारबुवा कोणाचा तरी किस्सा आहे. हार्डवेअर च्या दुकानात जाऊन काहीशी असंबद्ध वस्तू मागितली, ती वस्तू नाही असं सांगून वर अपमान वगैरे केला दुकानदाराने. त्यावर या साहेबांनी लोणी आहे का विचारलं. आणि पुढे ओळीने अनेक दिवस रोज त्याच्याकडे जाऊन लोणी आहे का हाच प्रश्न. दुकानदार दुकानाबाहेर येऊन शिव्या द्यायला लागला. लोकांना आणि कटत्यावरच्या पोरांना पण कळलं. जातायेता आपले साहेब आणि ती पोरं पण ' ए लोणी', 'ए लोणी' सुरु.

In reply to by धनंजय माने

निरंजन बाबांचा आंबा खर्‍या बायकोला दिला का?

In reply to by चंपाबाई

प्यारेकाका कसेही असले तरी ही जरा अगदीच वैयक्तिक प्रतिक्रिया झाली चंपाआत्याबाईमामी.

In reply to by सूड

चंपाआत्याबाईमामी हि मात्र वैयक्तिक न होता सामाजिक प्रतिक्रीया झाली. ;) बादवे जाता जाता कसेहि असलेल्या प्यारेकाकांना सोडले नाही ते भावले. ;)

In reply to by सूड

अशोक सराफच असणार बहुतेक त्यात. नाही बघायला. :( किंवा थोडा थोडा बघतल्यागत वाटतोय. रंजना, म्हैस, दोन वाडे असा काहीतरी मसाला.