Skip to main content

@ संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 10/07/2016 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय संपादक, मी गेली ४ ते ५ वर्षे नियमित पणे मिपाचा सदस्य आणि वाचक आहे. इथे उत्तम पैकी ज्ञान विशेषतः पा.कृ. आणि भटकंती, मिळते हा फायदा आहेच. उगाच खोटे का बोला? मिपाने मला फार उत्तम मित्र पण मिळवून दिले. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे आणि इतरही अनेक. कित्येकां बरोबर वाद-विवादही होत असतात, पण मी तरी ते त्या-त्या धाग्यांपुरतेच ठेवत होतो, ठेवतो आणि ठेवीन. पण इथे सध्या चंपाबाई नामक आय.डी. बहूदा हाच आय.डी. आधी मोगा, मुग्धा गोडे, उद्दाम, सचिन ह्या आय.डी.ने कार्यरत असावा. (असा संशय आहे.) आम्ही (म्हणजे मी आणि इतरही अनेकजण) इथे येतो ते, काही तरी मिळवायला, मग ते ज्ञान असो किंवा, आमच्या स्वभावाला शोभतील अशा व्यक्ती आणि वल्ली शोधायला. प्रामाणिकपणे सांगायचे तर, इथे खूप काही मिळाले. व्यक्तीशः अनेक उत्तम माणसे मित्र आणि सवंगडी म्हणून आयुष्यभरासाठी मिळाली.पुढे-मागे मी मिपाचे सदस्यत्व सोडले किंवा मिपाने माझे सदस्यत्व रद्द केले तरी पण नाखू, सुरंगी, पैसा, अजया,सुबोध खरे,बोका, वल्ली, सूड, स्पा, विनोद१८, टका, प्यारे१, कुंदन, सगा, रामदास, सर्वसाक्षी,गवि, नानबा, अजय इंगळे, निनाद मुक्काम प.ज., आत्मू गुरुजी,डॉ. म्हात्रे,नंदादीप, मंदार कात्रे, भटक्या खेडवाला, शैलेन्द्र, रघूनाथ केरकर, पम्या, प्रगो, असे अनेक मिपासदस्य माझे मिपा सवंगडी असतीलच.ह्याची खात्री आहे. काहींना भेटता आले तर काहींना खूप प्रयत्न करून पण अजिबात भेटता आले नाही. (उदा. इरसाल, सोन्याबापू, चिनार, खेडूत, पि.डां, जेपी,स्पार्टाकस, फारएन्ड, चित्रगुप्त, चतुरंग, हुप्प्या, आजानुकर्ण, विवेक पटाईत, गणपा, अजिंक्य विश्वास, डॉ. बिरुटे, जैनांचे कार्टे, अशी बरीच आहेत.पटकन आठवली ती नावे लिहिली.) पण आता मात्र मिपाचा उबग आला आहे, कारण एकच, डू.आय.डी. विशेषतः माई, नाना, ग्रेट थिंकर सारखे. माझ्यासारख्याच विचारसरणी सारखे इतरही असतील किंवा नसतीलही. पण इथे एखादा माझ्यासारखा सामान्य आय.डी.पण त्याची व्यथा मांडू शकतो, म्हणून हा प्रपंच. मिपावर आमचा लोभ आहेच आणि तो वाढेलही पण कृपया, ह्या डू.आय.डींचे, आता तरी काही तरी करा आणि एखादे ठोस पावूल तरी उचला, अशी नम्र विनंती. मिपा वर येणे सोडल्याने किंवा मिपाचे माझे सदयत्व रद्द झाल्याने, माझेच नुकसान आहे, ह्याची मला पुर्ण कल्पना आहे. आपलाच, मुवि

वाचने 47070
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by माम्लेदारचा पन्खा

डूआयडी हा वैयक्तिक पराभव मानता की काय ?रत्नांग्रीहून थेट पुणे ???

मी काय म्हणतो...अनुल्लेखाने मारा ना. यांचं दुकान चालतं कारण त्यांना प्रतिसाद (लेखनाला नव्हे) मिळतात म्हणून. आपण नाही बघायचं. कोणी लक्ष नाही दिलं की जातील आपोआप. आपण सगळे मिळून ठरवू की असल्या भंपक लोकांकडे दुर्लक्ष करायचं. रीमोट ठेवायचा आपल्या हातात.

ऑफ साइड ऑफ़ स्टम्प का खेळताय मुवि???? असले चेंडू सोडून द्या. आपण भावनाप्रधान विचार करतोय हे ओळखून हे लोक मुद्दाम असल्या टिंग्या टाकतात. आपण अकारण त्रास करुन घेऊ नये ही मन:पूर्वक विनंती. हम आपके साथ थे और रहेंगे. बाकी गा च्या गां त. -प्यारे१

तुम्हाला या आयडी बोगस असल्याचा फक्त सम्शय आहे असे तुम्ही लिहिले आहे मग मिपा सोदायची भाषा का असा प्रश्न पडतो. वर माने यानी लिहिल्याप्रमाणे इथे आलेले सर्व लेख वाचले पाहिजेत असा मिपाकरान्चा आग्रह नाही. अर्थात तुम्ही मिपा केव्हाही सोडु शकता तसा त्म्हाला अधिकार आहेच.

तुम्हाला या आयडी बोगस असल्याचा फक्त सम्शय आहे असे तुम्ही लिहिले आहे मग मिपा सोदायची भाषा का असा प्रश्न पडतो. वर माने यानी लिहिल्याप्रमाणे इथे आलेले सर्व लेख वाचले पाहिजेत असा मिपाकरान्चा आग्रह नाही. अर्थात तुम्ही मिपा केव्हाही सोडु शकता तसा अधिकार तुम्हाला आहेच.

यु जस्ट मेड अ स्टार आऊट ऑफ समवन नॉट सो इम्पॉरटंट, दुर्लक्ष करा, अन कुठेही जायची भाषा बोलू नका ही हक्काने केलेली विनंती समजा आमची

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मुवि काका कुठे बाईमाणसाच्या नादी लागता

In reply to by सतिश गावडे

नाही हो, हे फक्त ज्यांना फक्त गढूळाचं पाणी ढवळायचंआहे, त्यासाठी ज्यांना वारंवार डूआयडी आवश्यक असतात अश्या प्रव्रत्तींसाठी.

अनुल्लेखाने मारा. त्रास करून घेऊ नका.

=))))) बाईमाणूस !!!! जाऊ द्या ओ मुवि.एवढं मनावर घेऊ नका.तुम्ही जाल पण आजची चंपा उद्या शांता होऊन येईल आणि बोर्डावर नाचेल.तिचा एक आय डी उडवला तर दुसरा येईल.तुम्ही मात्र उगाच बाहेर रहाल.कुठे महत्त्व देता. खुल्या संस्थळाचे अनेक फायदे असतात तसेच असे तोटेही असायचेच. तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते बघावे!

In reply to by अजया

मुविंचा सात्विक संताप समजू शकते. पण जशा समाजात अपप्रवृत्ती असायच्याच तसेच मिपावरही. अखेर संस्थळे समाजाचाच आरसा. सो जाने भी दो !

या वरुन एक गावरान म्हण आठवली "वास्तु कोणाची आणि रुबाब कोणाचा" अशा अर्थाची. च्यायला आता पर्यत आम्ही असे समजत होतो की आम्ही गोठ्यात रहातो तर शेणा मुताचा वास येतो अशी तक्रार मालका कडे करायचा आम्हाला काही एक अधिकार नाही. उलट गोठ्यात रहायला मिळतय हे मालकांचे उपकारच आहेत. आपण त्यांच्यावरच दुगाण्या कशा झाडायच्या? पण वरील खुले पत्र वाचले आणि आमचे डोळे खाडकन उघडले.... या पत्रावरुन प्रेरणा घेउन मी पण आता आमच्या सोसायटीच्या चेअरमन ना पत्र लिहिणार आहे. आमचे शेजारी त्यांच्या घरात एकमेकांशी सारखे भांडण करतात, वस्तुंची आदळआपट करतात, दणादणा आवाज करत धुणी धुतात, घरामधे मासे मटण असले काहीबाही शिजवतात त्याचा घाण वास आमच्या घरात येतो. भल्या पहाटे उठुन घशात हात घालुन कसले कसले आवाज करत नरडे साफ करतात. जोरजोरात नाक शिंकरतात. सोसायटीला तर मी मेंटेनन्स देतो, काय फुकट रहात नाही, तेव्हा मी सांगतो तेच करणे हे चेअरमनचे कामच आहे. असे पत्र लिहिण्याचा मला नैतीक अधिकार देखिल आहे, कारण मी सोसायटीच्या बाल गणेश मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे. शिवाय मी सोसायटीत दोन भिश्या पण चालवतो. आणि हे जर चेअरमनने केले नाही तर मी पण सोसायटी सोडुन देणार आहे. मी सोसायटी सोडली तरी सोसायटीच्या गेटच्या बाहेर आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटत जाईन आणि व्हॉटसपवर भिशी चालवेन. असेच पत्र मी पुण्याच्या महापौरांना, पोलिस कमिशनरांना, पुण्याच्या जिल्हाधिका-यांना आणि देवेंद्र फडणवीसांनाही लिहीणार आहे. नरेंद्र मोदींना मात्र असले काही लिहिणार नाही कारण देश सोडुन बाहेर जायची आपल्या मधे ताकद नाही. पैजारबुवा,

 श्री मिपाय नमः

 दि.१०/७/२०१६

प्रिय मुक्तविहारी, स.न.वि.वि. पत्र लिहिण्यास कारण की आज सकाळी सकाळी मिपा उघडलं आणि संपादकांना काही तरी खरमरती लिहिलेला धागा वाचला. ''संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का? '' एक तर धागा रात्रीचा म्हणजे एक वाजून एकवीस मिनिटाचा. अंमळ उशीराचा. मनात काहीही विचार येतो. म्हणजे रात्री काढलेल्या धाग्यांकडे मी जरा संशयाने बघतो (हलकेच घेणे) म्हणजे अशा वेळी काढलेल्या धाग्यांमधे भावना तीव्र असतात. आणि सकाळी आपलाच धागा वाचला की कशाला धागा काढला असेही होते. आपल्या मुद्दा आहे की डु आयडींचे करावे काय ? हा जालावर असंख्य जालप्रवाशांना पडलेला सनातन प्रश्न आहे. माझं व्यक्तिगत मत असं आहे की, आयडीं लिहिते काय हे महत्वाचे आहे, आपलं कोणत्याही आयडींशी भांडन नसावं. कोणताही पूर्वग्रह नसावा. चालू वर्तमानकाळावर भर द्यावा. आता काही आयडी सतत चांगल्या धाग्यांवर.... इथे तिथे असं चोहीकडे फुले उधळत असतात. अशा वेळी नाकाला रुमाल लावायचा आणि पुढे चालायचं. बघायचं सुद्धा नाही, नसता ओकारीची भावना होते. मग आपण म्हणाल की आयडीला प्रवेश देतांनाच पाहिले पाहिजे की अशा आयडींना प्रवेश देतांनाच रोखले पाहिजे. मला वाटतं सिष्टीम मधे असं रोखणे जरा अवघड आहे. सध्या इमेल पत्त्यावरुन असे आयडी मिपाजगात प्रवेश करतात. पूर्वी काही दिवस ओळखीने प्रवेश द्यायचं चाललं होतं ते बरं होतं असं वाटतं. कोणी म्हणालं की मोबाईल नंबरने व्हेरीफाय करावं. कदाचित भविष्यात असंही करता येईल, पण आवरता किती येईल असा मोठा प्रश्न आहेच. संपादक फक्त प्रतिसाद अप्रकाशित करु शकतात. मिपा संपादकांचा कल लिहिण्याच्या स्वातंत्र्य देण्याकडे आहे, असे नेहमीच जाणवते. मिपाच्या जन्माची चित्तरकथा लिहिण्याच्या स्वातंत्र्याशीचजोडलेली आहे, हे अनेकांना माहित आहे.प्रतिसाद अप्रकाशित करणे, त्रास खूप झाला तर सदस्याला ब्यान करणे, असा तो उपाय. आणि असे आयडी जातातही लवकर. पण एक आयडी गेला की दुसर्‍या आयडीने ते हजर होतात. मिपावर अशा लोकांना वैतागून मिपा कधीच सोडू नये. असे फक्त मुठभरच आयडी असतात. आणि त्यांच्या तुलनेने वरीजनल आणि चांगल्या भावनेने लिहिणारे लोक खूप असतात. पण ते सहन करतात, दुर्लक्ष करतात. आपणही तसंच केलं पाहिजे. मिपा सोडून गेलं तर नुकसान आपलं होतं. आपला आनंद जातो. मिपाचं काही अडत नाही. मिपावर खूप लोक आले आणि गेले मिपा आपल्या गतीने आपला प्रवास करीत आहे, मिपा सोडून गेलेल्यांची आठवण सुद्धा नंतर येत नाही. बाकी, सध्या तर मला लिहिण्याचा कंटाळा खूप आला आहे. लिहावंच वाटत नाही. सध्या कविता आणि पाककृती बघतो. आपला धागा बघितला आणि लिहिणं आवरलं नाही. मिपा इंजॉय करा. मिपावर शक्यतो गेंड्याची कातडी करुन घ्यायची मग काहीच टोचत नाही. कधी इग्नोर करणे, कधी त्रास सहन करुन गुपचूप झोपणे, कधी विनाकारण चौकशांच्या खरडी मित्रांना टाकायचं असं केलं की मिपा जगणं आनंदात आणि सुसह्य होतं. बाकी, इकडे आता चांगला पाऊस आहे. सर्वांना नमस्कार सांगा. लहानांना आशिर्वाद. इकडे बंटी आणि बबली सर्दी तापाने परेशान आहेत. डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. आता बरे आहेत. पत्रात लिहितांना काही चुकल्यास क्षमस्व. ता.क. आज रविवारचं एक लग्नाला जायचं आहे, कंटाळा आला आहे. आठवड्यातून एकच दिवस सुट्टी आणि असा डोक्याला ताप. जाऊन येतो. बोलत राहूच. कभी कभी कितनी बाते होती है कहने को... जब कोयी सुनने वाला नही होता.

-दिलीप बिरुटे
(आपलाच मिपाकर मित्र)


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येवढं लिव्हलं आणिक्... "आक्षराला हासू नये !" हे र्‍हायलंच की... ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सॉरी. अक्षराला हसू नये. सालं ते आंतर्देशी कार्डावर लोकांनी सरळ पत्र कधीच लिहिली नसतील. तिरपी तिरपी अक्षरं. ते कार्डबी अपुरं पडायचं लिहायला. भारी होतं ते सर्व. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरूटेसरांचा प्रतिसाद आवडला. सदरचा लेख म्हणजे जखम मांडीला, मलम शेंडीला वाटला. बाकी ते रामकृष्ण ही आले गेले वगैरे वगैरे वगैरे आहेच. ..

मिपा सोडून जातो अशी भाषा कुणी केली, Image and video hosting by TinyPic की त्यांना ताबडतोब अशा चपला प्रेझेंट द्यायची प्रथा होती म्हणे?

In reply to by आनंदी गोपाळ

अशा वेळी एक माणुस आठवतो. त्याचं धोरण जब्रा होतं. :) -दिलीप बिरुटे

असु द्या हो. चार दिवस चंपीचे चार दिवस तुमचेही येतील. रमजान झाला , आता वारीच्या नादाला लागा. जगतगुरु संत तुकोबाराय पुण्यातुन दिंडी घेवुन जात होते. मुख्य पुण्यातुन जाताना एका भर चौकात जोराचा पाऊस सुरु झाला. दिंडीतले सर्व वारकरी आडोसा शोधत इकडे तिकडे पळायला लागले आणि सर्वजन वेगवेगळ्या ठिकाणी व्हरांड्यात वगैरे जाऊन उभे राहीले. परंतु तुकाराम महाराज मात्र पावसातच शांतचित्ताने भिजू लागले. त्याच चौकात एका बाजूला मंदिर तर दुसरी कडुन मस्जिद होती. मंदिराच्या भट-पुरोहितांनी लगेच दरवाजे पटपट बंद केले. पण मस्जिदित मात्र चर्चा सुरु झाली, "अरे वह तुकाराम भिग रहे है,,, वो बहुत ही बडे संत है.. किसानका कर्जा माफ करनेवाले बहुत भले इन्सान..." वगैरे वगैरे.... आणि मग काय आश्चर्य मस्जितीतील मुसलमानानी, मुल्ला-मौलवींनी जगतगुरु तुकोबारायांना सन्मानाने आदरपुर्वक मशीदीत धरुन नेले. नंतर सर्व दिंडी मस्जिदमधे गेली. सर्व वारकरी मस्जिदमधे जमले. रात्रीची किर्तनाची वेळ झाली. मुर्ती पुजा न मानणा-यांच्या मस्जिदित तुकोबा काय बोलतील आणि कसे किर्तन करतील याची सर्वाना उत्कंठा लागली. तुकोबाराय किर्तनाला उभे राहीले आणि अभंग घेतला, आल्ला देवे अल्ला दिलावे, अल्ला दवा अल्ला खिलावे । अल्ला बगर नही कोये, अल्ला करे सो ही होये ॥१॥ (अभंग क्र. ४४४ गाथा, देहुची प्रत) http://tukaram.com/hindi/tukaramji_hindi.asp वि. सू. : संदर्भ ज्याचे त्याने तपासुन घ्यावेत (

In reply to by चंपाबाई

तुकोबाची ही कथा माहिती नव्हती. आभार हं. -दिलीप बिरुटे

In reply to by चंपाबाई

चंपाबाई कसं हो जमतं तुम्हाला हे सर्व म्यानेज करायला ? चंपाबाई, आयडीवरुन आपलं व्यक्तिमत्व कसं असेल असं एक काल्पनिक चित्र डोळ्यासमोर आलं. पान बीन खाऊन, तोंडात पानाचा तोबरा भरलेला, तुम्ही चांगल्या जाडजुड, म्हणजे बसल्या जागेवरुन उठायचं तर कशाचा तरी आधार घेऊन उठणार, असं डोळ्यासमोर येतं. समोर मोठं पानाचं एक तबक. आपण बसला आहात त्या हॉलमधे सर्वत्र झुंबरं लटकली आहेत. वीजेचा लखलखाट आहे. कुठं तरी सतारीचे मंद सूर. कुछ महक, कुछ मदिरा. छ्या. सलामे इश्कच्या वाटेनं चालली वाटतं माझी कथा. :( (हलकेच घ्या हो, मुड साला आज गमती जमतीचा आहे) _/|_ -दिलीप बिरुटे

In reply to by चंपाबाई

चंपाबै मूळ संदर्भात दवा हा शब्द नाही वेगळा शब्द आहे तो जसाच्या तसा का नाही वापरला बरे ? असो .... ..... हिंदी भाषा तज्ञांसाठी एक शंका . * चंपाबै दिलेल्या संदर्भ दुव्यात साई हा शब्द येतो आहे. 'साई' हा शब्द किती जुना आहे ?

In reply to by चंपाबाई

चंपाबाई, अल्लाच्या अभंगाविषयी लाख लाख धन्यवाद. पुढच्याच अभंगांत तुकोबांनी लिहिलंय : सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥२॥ .... .... सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥४॥ 'भजनगोळी' मुस्लिमांनी गांभीर्याने घेतल्याचं ऐकिवात नाही. थोडी तरी 'इमान'दारी दाखवायची ना? दाखवली असती तर आज मध्यपूर्वेत अशी हालत झाली नसती. तिथले 'गावंढाळ' कसे कुत्र्याच्या मौतीने मरताहेत (की मारताहेत) नाही? कुठली 'हगवनि' न धुता मिरवताहेत ओळखा पाहू! 'मटी' खाणारा 'गधडा' म्हणजे झाकीर नाईक आहे. उभी 'ज्वानी निकल जावे' पण 'भजनगोळी' घ्यायची अक्कल आली नाही किनई त्याला? बघा तुकोबाराया खरोखर किती द्रष्टे आहेत ते. असेच छानछान अभंग निवडून देत जा. आ.न., -गा.पै.

तुमच्या मागे अजून बर्‍याच कटकटी मिपाच्या बाहेर लागणार आहेत आता. कशाला त्रास करून घेताय? मिपावर यापेक्षा भयानक प्रकार चालू आहेत. तुम्हाला अज्ञानात सुख म्हणा, आणि सोडून द्या. हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे. कुठे सगळ्यांना तुम्ही पुरे पडणार आहात की प्रशांत/नीलकांत पुरे पडणार आहेत? झक मारू देत म्हणून सोडून द्या. तुम्हालाही जगाचा इतका अनुभव आहे. मी तुम्हाला काय सांगणार? पूर्वीही बोलले आहे. तुम्ही मिपावर सिरियसली येता तसे बरेच लोक इथे फक्त स्वतःचे मनोरंजन करून घेण्यापुरते येतात. तुम्ही त्रागा कराल तेवढी त्यांच्या दृष्टीने त्याची एंटरटेनमेंट व्हॅल्यु जास्त असेल. का स्वतःला त्रास करून घेऊन आपण त्यांचा खेळ करून द्यावा? आपल्याला त्रास करून न घेता हाताशी असलेल्या वेळात जेवढे काही मिपामधून घेता येईल तेवढे घ्यावे. बाकीच्यांना "गच्छ सूकर, भद्रं ते" म्हणून पौड फाट्यावर सोडून यावे हे काय आता मी तुम्हाला सांगायला पाहिजे का? वैयक्तिक त्रास कोणी दिला तर प्रशांतकडे तक्रार करूर त्याच्यावर सोडून द्या. तो बघेल. आपल्या डोक्याला ताप नको. ते सगळे फालतू लोक झक मारले. तुमच्या शेतीच्या अनुभवांवर लिहीत रहा. (ढिसक्लेमरः हा प्रतिसाद मी पूर्णपणे एक सामान्य सदस्य म्हणून माझ्या जबाबदारीवर, अक्कलहुशारीने, नशापाणी न करता वगैरे वगैरे लिहिला आहे. त्याचा संपादक मंडळ, नीलकांत, प्रशांत इत्यादींशी काहीही संबंध नाही. यावर खोडसाळ टिप्पणी केल्यास कोणतेही उत्तर दिले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.)

In reply to by पैसा

हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे. कुठे सगळ्यांना तुम्ही पुरे पडणार आहात की प्रशांत/नीलकांत पुरे पडणार आहेत?
अतीतीव्र सहमत.

In reply to by पैसा

>>>>> मिपावर यापेक्षा भयानक प्रकार चालू आहेत. कोणते बरं....? >>>> वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. काही लिंका ? काही माहिती ? कोण करतं बरं असा खोटार्डेपणा. >>>> स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. हे मला बिलकुल खरं वाटत नाही. एखादे दोन आयडी इकडे तिकडे. पण डझनावारी असूही शकतील. दिल 'माने न माने' पण असं होऊ शकतं. >>>> कुठे सगळ्यांना तुम्ही पुरे पडणार आहात की प्रशांत/नीलकांत पुरे पडणार आहेत? खरं आहे. मी तर हे नीलकांत आणि प्रशांतसाठी हे सर्व सहन करतो. कोणी मिपावर राहो न राहो आम्ही तिघं मिपावर शेवटपर्यंत राहू. ;) >>>> यावर खोडसाळ टिप्पणी केल्यास कोणतेही उत्तर दिले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.) मी गंभीरपणे लिहिलं आहे, आपल्याला माझा प्रतिसाद खोडसाळ वाटल्यास आपण लिहू शकता. ;) -दिलीप बिरुटे (लंबर एकचा खोडसाळ) :)

In reply to by अजया

Thank u very much. पण मलाच सहमत म्हणायचे होते का ? लैच भारी प्रतिसाद, डोळे भरून आले, अति-अति तीव्र सहमत, पाचशे वर्षात असा प्रतिसाद झाला नाही, असं तरी म्हणायचं होतं ? ;) -दिलीप बिरुटे -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बघा की सर.स्पष्ट लिहिलंय सरांना सहमत. -सर thanku काय म्हणाले डोळे भरुन आले....असा प्रतिसाद दहा हजार वर्षात एखादाच.वाचला की शमतावा.

In reply to by पैसा

स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. सहमत आहे! बरेच वेळा हे 'सहकारी तत्त्वावरील' आयडी हे आळीपाळीने संभावित मिपा ठेकेदार वापरतात ते फक्त काही खास आयडी (ज्यांचे विचार विरोधी आहेत किंवा क्रॉसिंग आहेत) अश्यांना वेचून वेचून टार्गेट करायला वापरले जातात, मला सुद्धा अश्या सहकारी आयडीचा त्रास झालेला होता, आधी त्रागा केला मी माझ्या मित्रांजवळ व्यनि मधून नंतर विचार केला कश्याला रगात आटवा, माझ्यावरही अतिशय हीन आरोप झाले होते, पण ज्याचीत्याची लायकी म्हणून नंतर सोडून दिले, त्या प्रसंगी कळले की मित्र आहेत मला भरपूर मिपावर, कित्येकांनी मला आधार दिला त्या काळी, असो, तर विषय काय आहे की तुमचे विचार पटले नाहीत तरी खास तुम्हाला वेचून वेचून हैराण करायला डुप्लिकेट आयडी निघतात अन तुम्ही व्यथित होऊन लेखणी म्यान केली की ते आयडी बरोबर वेळेवर अंतर्धानही पावतात, आपण असल्यांना भीक घालू नये हे मी समजलो अन अश्यांना अजून त्रास द्यायला मी सगळे काही सोडून परत एकदा वाचन अन लेखन आनंद घेऊ लागलो! टीप :- परत आल्यावर माझा हुरूप वाढवणाऱ्या सगळ्या मित्रमंडळीचा मी कायम ऋणी राहीन हे आज सार्वजनिकरित्या सांगतो

In reply to by पैसा

स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत.
१. असे लोक तिकडे गेल्यामुळे निदान या प्रकारामुळे सध्या इथे होणारा त्रास कमी झाला आहे असे वाटते. २. यातलेच काही लोक क्लोज्ड फेसबुक ग्रुपवर इकडच्या सदस्यांविषयी गॉसिपिंग करत असतात. मा़ंजर डोळे मिटून दूध पित असले तर त्याला वाटते की आपल्याला कोणी बघू शकत नाही.अर्थातच तो मांजराचा गैरसमज असतो!!

In reply to by गॅरी ट्रुमन

मराठी आंतरजालावर बरे वाईट जे काय आहे ते सगळे मिपावर होते आणि आहे. एकदा आंतरजालावर सक्रीय झाल्यावर कसलाही त्रास वाटून घेण्यात मतलब नाही. कारण इथे बरेच जण कुत्र्याला खाली फेकून त्याचे व्हिडिओ काढणार्‍यांपैकीच असतात. त्याना फुकटची करमणूक आपल्या त्रासाच्या किंमतीवर मिळवून देण्यात काही हशील नाही. परा म्हणायचा ना, त्याची आठवण खूपदा येते. "एकदा तोंडाला रंग लावून खिडकीत बसले की कोणी खालून शुक शुक करतोय म्हणून तक्रार करण्यात काही अर्थ नाही."

असे किती ट्रोल्स इथे आले आणि गेले. तरी आम्ही इथेच आहोत आणि रहाणार, असा निर्धार ठेवा. तुम्ही मिपा सोडून काय साध्य होणार ? त्यापेक्षा अशा चंपांविषयी अनुकंपा ठेवा, त्यांना कट्ट्याला बोलवा, हारतुरे देऊन त्यांचा सत्कार करा.

In reply to by तिमा

यांना आपलं म्हणा. (चंपूताईंबद्दल बोलतोय. तिमाकाका आपलेच आहेत.वेगळं सांगायची गरज नाही.) बाकी चंपांविषयी अनुकंपा हा खतरा अनुप्रास आहे. त्यावरून बाकी पण सुचलं - मोगांची निगा राखा.

In reply to by आदूबाळ

इश्य आदुबाळा........... काय हा चाळा.......... पुरे आदुबाळ थांबव हा खेळ.. @ बोकोबा मोगांची राखा निगा आगागागा यासाठी बोका ए आझम बात मे है दम चंपा अनुकंपा ला तोड नाही मात्र यावरुन मिसळतापे बहु तापलो रामराया का घातले मला मोकलाया अस काही तरी जमु शकेल बहुधा आहे आहे स्कोप आहे धाग्याला

मी तर मुवींचे असे बोट वर करून पगडी घालून व्यंगचित्र ( सॉरी अर्कचित्र )काढून त्यात " या संपादकांचे डोके ठिकाणावर आहे काय....? " असा संवाद टाकणार होतो. पण टक्कल लपले असते व ते मुवि न वाटता टिळकच वाटले असते. व जे स्वतः च एक संपादक होते ते असे म्हणतीलच कसे अशी तांत्रिक चूक काही अभ्यासूनी काढली असती. सबब बेत रद्द ! ता.क. हे डू आय डी वगैरे प्रकरण संपादकांच्या हातात नसून ते मालक व उपमालक यांचे हातात आहे असे कळते ती म्हाईती बरोबर आहे काय मुवि....?

मुविसाहेब, नको त्या लोकांना उगा महत्व देण्याने त्यांचा खाजवून खरूज काढण्याचा हेतू सफल होतो आणि त्यांना प्रोत्साहन मिळून त्यांचे चाळे अजूनच वाढतात. त्यांना दुर्लक्षाने मारले की अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचा मर्कटलिला करण्यातला रस निघून जातो असा सर्वसामान्य अनुभव आहे. फारच अतिरेक झाला तर त्यासंबंधी कारवाई होते हा इतिहास आहेच. मात्र, "अती म्हणजे नक्की किती अती ?" हा सार्वकालिक व सार्ववैषयिक यक्षप्रश्न नेहमीचाच आहे... आणि त्यावर एकमत होणे नाही, हे पण सार्वकालिक सत्य आहे हे तुम्हालाही माहीत आहेच. सार्वजनिक रस्त्यावरून जाताना आपण कचरा (आणि कायकाय) टाळून पुढे जातो... फारतर त्याला मनातल्या मनात दोनचार श्या हासडतो आणि पुढच्या दोन पावलांत ते विसरूनही जातो... व आपल्याला पाहिजे त्या गंतव्यावर पोहोचण्याचे सोडत नाही. हेच माहिती महामार्गावर (इन्फर्मेशन हायवे) करावे असे मला वाटते. मुख्य म्हणजे, ज्यांच्याकडे आपण सहज दुर्लक्ष करू शकतो अश्या खोडसाळ प्रवृत्तींमुळे आपले मनःस्वास्थ्य बिघडवून घ्यावे इतकी त्यांची लायकी अजिबात नसते, असे माझे मत आहे.

मिपावर सूज्ञ लोकही आहेत हे प्रतिसादांवरून जाणवले. आंतरजालावर वावरणारा सोशल जाणिव नसलेला श्रेष्ठत्वाच्या अहंभावात कळपाने राहणारा एक समाज आहे. अवांतर : मुवि टेंशन घेऊ नका.

धागा पेटला. कुठले कुठले म्हातारे (आणि म्हाताऱ्या) शेकोटीला आले. ;)

वाह वाह खतरनाकच धागा मुवी ! फुल्ल इन्टर्टेन्मेन्ट होणार इथे ! बाकी चंपाताईंनी तुकोबांचा अभंग दिल्याने आपण तर फॅनच झालो त्यांचे ! त्यांना ह्या निमित्ताने तुकोबांचा एक अभंग ऐकवावा म्हणतो :
आधी होता वाघ्या | दैवयोगे झाला पाग्या| त्याचा यळकोट राहिना | मुळस्वभाव जाईना|| आधी होते ग्रामजोशी | राज्यपद आले त्यासी | त्याचे पंचांग राहीना | मुळस्वभाव जाईना || आधी होती देवदासी | पट्टराणी केले तीसी| तिचे हिंडणे राहीना |मुळस्वभाव जाईना|| आधी होता संतसंग | तुकाझाला पांडुरंग | त्याचे भजन राहीना | मुळस्वभाव जाईना ||
बिरुटे सरांचे पत्र कम सल्ला आवडले एस्पिशियली ते गेंड्याची कातडी वगैरे तर भारीच ! मागे एका मिनि कट्ट्याला एका माजी मिपाकराने मांडलेले मत आठवले की चंपा , नाना , मोगा , हितेश सारखे डु आयडी मिपाच्या दृष्टीने एका अर्थी गरजेचे आहेत कारण त्यांच्या मुळेच तर मिपावर इतका हिटरेट आहे. मुवी मी तुम्हाला ग्रेग चॅपेल आणि गांगुलीची गोष्ट सांगितली आहे का हो ? नसेल तर पुढील कट्ट्याला जरुर आठवण करुन द्या , आवर्जुन सांगेन !! आणि माझे वैयक्तिक मत म्हणुन सांगतो की तुमच्या लेखनावर येवुन असला कोणी डु आयडे की जो'शी' करत असेल तर संपादकांना व्यनि करावा , किमान त्या प्रतिसादावर तरी कारवाई केली जातेच !

In reply to by प्रसाद गोडबोले

तुकोबा पोस्ट आज सकाळी व्हाट्सपवर आले. इथे संदर्भ मागणारी भुतावळ मागे लागू नये म्हणुन गुगलवरुन संदर्भ काढुन कन्फर्म करुन ते लिहिले. आtaa पुण्यात मंदिर मशीद आमने सामने असलेला तो रोड कुठचा , पुजारी मौलवी यांच्या खापरपणजोबांचे फोन नंबर , हे तुकोबा नक्की तेच की दुसरे कुणीतरी , इ इ प्रश्न विचारणारे येतील

In reply to by प्रसाद गोडबोले

हेच बोल्तो. वैयक्तिक कूणी त्रास देत असेल तर योग्य ठिकाणी तक्रार करावी. मिपावर नक्की दखल घेतली जाते.

याच धाग्यावर लिहीतो. मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके कोण कोण??? मिपा ला बऱ्याच जणांची गरज नाही तसं बऱ्याच जणांची गरज आहे का? आम्ही सांगतो ती पोततिडीक आणि बाकीच्यांची टिंगळ टवाळी? सामान्य सदस्याला दिसणारे पर्याय वेगळे, आतल्या वर्तुळासाठी 'संवाद' वेगळे का? ठराविक लोकांसाठीच काही घोषणा, अमुक तारखेला लेखमाला लिहायची असे उपक्रम असं का? अमुक एक जण काड्या च करायला येतो, त्याला बाजूला सारा असं predefined मत का? चार लेख लिहून स्वत:च्या मिपाबाह्य पात्रतानिकषावर खुर्च्या पकडून बसलेल्या लोकांबद्दल बोललं की त्रास होतो ते का???

याच धाग्यावर लिहीतो. मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके कोण कोण??? मिपा ला बऱ्याच जणांची गरज नाही तसं बऱ्याच जणांची गरज आहे का? आम्ही सांगतो ती पोततिडीक आणि बाकीच्यांची टिंगळ टवाळी? सामान्य सदस्याला दिसणारे पर्याय वेगळे, आतल्या वर्तुळासाठी 'संवाद' वेगळे का? ठराविक लोकांसाठीच काही घोषणा, अमुक तारखेला लेखमाला लिहायची असे उपक्रम असं का? अमुक एक जण काड्या च करायला येतो, त्याला बाजूला सारा असं predefined मत का? चार लेख लिहून स्वत:च्या मिपाबाह्य पात्रतानिकषावर खुर्च्या पकडून बसलेल्या लोकांबद्दल बोललं की त्रास होतो ते का???

In reply to by धनंजय माने

मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके कोण कोण???
हा कळीचा मुद्दा आहे. इथे डांगे, बापू या उत्तम लिहिणार्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास देणारे आहेतच. चांगलं लिखाण करणार्‍या नवोदितांमूळे नेमके कोणाचे आसन डळमळीत झाले? =))

'डू आय डी' हा प्रकार कितपत तापदायक आहे याची मला काही कल्पना नाही. मात्र 'दुर्लक्ष करणे' हे तत्व अवलंबणे मला स्वतःला पटंत नाही. 'डू आय डी' ही संकल्पनाच dishonest आहे. ती एखाद्याला अवलंबवावी लागते याचाच अर्थ दालमे कुछ काला है| त्यामुळे त्यांचा निचरा करणं मिपाच्या तब्येतीच्या दृष्टीनी जरूरीचं आहे. त्याला सगळ्यात सोपं आणि प्रॅक्टिकल उत्तर आहे मोबाईल फोन नंबर. हे नंबर नीलकांतांकडे गोपनीय राहतील. आज जगभर सगळीकडे मेंबरशिपसाठी मोबाईल फोन नं. वापरला जातोय.

In reply to by स्वीट टॉकर

+1