प्रिय संपादक,
मी गेली ४ ते ५ वर्षे नियमित पणे मिपाचा सदस्य आणि वाचक आहे.
इथे उत्तम पैकी ज्ञान विशेषतः पा.कृ. आणि भटकंती, मिळते हा फायदा आहेच. उगाच खोटे का बोला?
मिपाने मला फार उत्तम मित्र पण मिळवून दिले. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे आणि इतरही अनेक.
कित्येकां बरोबर वाद-विवादही होत असतात, पण मी तरी ते त्या-त्या धाग्यांपुरतेच ठेवत होतो, ठेवतो आणि ठेवीन.
पण इथे सध्या चंपाबाई नामक आय.डी. बहूदा हाच आय.डी. आधी मोगा, मुग्धा गोडे, उद्दाम, सचिन ह्या आय.डी.ने कार्यरत असावा. (असा संशय आहे.)
आम्ही (म्हणजे मी आणि इतरही अनेकजण) इथे येतो ते, काही तरी मिळवायला, मग ते ज्ञान असो किंवा, आमच्या स्वभावाला शोभतील अशा व्यक्ती आणि वल्ली शोधायला.
प्रामाणिकपणे सांगायचे तर,
इथे खूप काही मिळाले.
व्यक्तीशः अनेक उत्तम माणसे मित्र आणि सवंगडी म्हणून आयुष्यभरासाठी मिळाली.पुढे-मागे मी मिपाचे सदस्यत्व सोडले किंवा मिपाने माझे सदस्यत्व रद्द केले तरी पण नाखू, सुरंगी, पैसा, अजया,सुबोध खरे,बोका, वल्ली, सूड, स्पा, विनोद१८, टका, प्यारे१, कुंदन, सगा, रामदास, सर्वसाक्षी,गवि, नानबा, अजय इंगळे, निनाद मुक्काम प.ज., आत्मू गुरुजी,डॉ. म्हात्रे,नंदादीप, मंदार कात्रे, भटक्या खेडवाला, शैलेन्द्र, रघूनाथ केरकर, पम्या, प्रगो, असे अनेक मिपासदस्य माझे मिपा सवंगडी असतीलच.ह्याची खात्री आहे.
काहींना भेटता आले तर काहींना खूप प्रयत्न करून पण अजिबात भेटता आले नाही. (उदा. इरसाल, सोन्याबापू, चिनार, खेडूत, पि.डां, जेपी,स्पार्टाकस, फारएन्ड, चित्रगुप्त, चतुरंग, हुप्प्या, आजानुकर्ण, विवेक पटाईत, गणपा, अजिंक्य विश्वास, डॉ. बिरुटे, जैनांचे कार्टे, अशी बरीच आहेत.पटकन आठवली ती नावे लिहिली.)
पण आता मात्र मिपाचा उबग आला आहे, कारण एकच,
डू.आय.डी. विशेषतः माई, नाना, ग्रेट थिंकर सारखे.
माझ्यासारख्याच विचारसरणी सारखे इतरही असतील किंवा नसतीलही.
पण इथे एखादा माझ्यासारखा सामान्य आय.डी.पण त्याची व्यथा मांडू शकतो, म्हणून हा प्रपंच.
मिपावर आमचा लोभ आहेच आणि तो वाढेलही पण कृपया, ह्या डू.आय.डींचे, आता तरी काही तरी करा आणि एखादे ठोस पावूल तरी उचला, अशी नम्र विनंती.
मिपा वर येणे सोडल्याने किंवा मिपाचे माझे सदयत्व रद्द झाल्याने, माझेच नुकसान आहे, ह्याची मला पुर्ण कल्पना आहे.
आपलाच,
मुवि
वाचने
47070
प्रतिक्रिया
175
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही तुमच्या मित्रात मला
+११११
In reply to तुम्ही तुमच्या मित्रात मला by खटपट्या
मुवि शेठ....
In reply to +११११ by माम्लेदारचा पन्खा
काका
ऑफ साइड ऑफ़ स्टम्प का खेळताय
चंपाबाई सारखे डू.आय.डी
चंपाबाई सारखे डू.आय.डी
मी काय केले म्हणे ?
मुविंच्या सात्विक संतापाचे
उगाच तणतण! काय त्रास दिलाय
मुवि काका
असेच म्हणतो
In reply to मुवि काका by कैलासवासी सोन्याबापु
भेदभावमुलक प्रतिसाद.
In reply to असेच म्हणतो by झेन
भेदभावमुलक ?
In reply to भेदभावमुलक प्रतिसाद. by सतिश गावडे
बापूंशी बाडिस
=)))))
+१
In reply to =))))) by अजया
फारच प्रेरणादायी पत्र....
धन्य आहात माऊली. ___/\___
In reply to फारच प्रेरणादायी पत्र.... by ज्ञानोबाचे पैजार
लैच भारी राव....
In reply to धन्य आहात माऊली. ___/\___ by अभ्या..
+111
In reply to धन्य आहात माऊली. ___/\___ by अभ्या..
पैजारबुवियन प्रतिसाद! लोल!
In reply to फारच प्रेरणादायी पत्र.... by ज्ञानोबाचे पैजार
=))
In reply to पैजारबुवियन प्रतिसाद! लोल! by आदूबाळ
चुकून विजारबनियन वाचलं!! ;)
In reply to पैजारबुवियन प्रतिसाद! लोल! by आदूबाळ
बुवा
In reply to फारच प्रेरणादायी पत्र.... by ज्ञानोबाचे पैजार
=)) भारी आहे हे पैजारबुवा!!
In reply to फारच प्रेरणादायी पत्र.... by ज्ञानोबाचे पैजार
मुक्तविहारी, घर नं. १७२४७. मु.पो. मिसळपाव. ता.जि. मिपा.
श्री मिपाय नमः
दि.१०/७/२०१६
प्रिय मुक्तविहारी, स.न.वि.वि. पत्र लिहिण्यास कारण की आज सकाळी सकाळी मिपा उघडलं आणि संपादकांना काही तरी खरमरती लिहिलेला धागा वाचला. ''संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का? '' एक तर धागा रात्रीचा म्हणजे एक वाजून एकवीस मिनिटाचा. अंमळ उशीराचा. मनात काहीही विचार येतो. म्हणजे रात्री काढलेल्या धाग्यांकडे मी जरा संशयाने बघतो (हलकेच घेणे) म्हणजे अशा वेळी काढलेल्या धाग्यांमधे भावना तीव्र असतात. आणि सकाळी आपलाच धागा वाचला की कशाला धागा काढला असेही होते. आपल्या मुद्दा आहे की डु आयडींचे करावे काय ? हा जालावर असंख्य जालप्रवाशांना पडलेला सनातन प्रश्न आहे. माझं व्यक्तिगत मत असं आहे की, आयडीं लिहिते काय हे महत्वाचे आहे, आपलं कोणत्याही आयडींशी भांडन नसावं. कोणताही पूर्वग्रह नसावा. चालू वर्तमानकाळावर भर द्यावा. आता काही आयडी सतत चांगल्या धाग्यांवर.... इथे तिथे असं चोहीकडे फुले उधळत असतात. अशा वेळी नाकाला रुमाल लावायचा आणि पुढे चालायचं. बघायचं सुद्धा नाही, नसता ओकारीची भावना होते. मग आपण म्हणाल की आयडीला प्रवेश देतांनाच पाहिले पाहिजे की अशा आयडींना प्रवेश देतांनाच रोखले पाहिजे. मला वाटतं सिष्टीम मधे असं रोखणे जरा अवघड आहे. सध्या इमेल पत्त्यावरुन असे आयडी मिपाजगात प्रवेश करतात. पूर्वी काही दिवस ओळखीने प्रवेश द्यायचं चाललं होतं ते बरं होतं असं वाटतं. कोणी म्हणालं की मोबाईल नंबरने व्हेरीफाय करावं. कदाचित भविष्यात असंही करता येईल, पण आवरता किती येईल असा मोठा प्रश्न आहेच. संपादक फक्त प्रतिसाद अप्रकाशित करु शकतात. मिपा संपादकांचा कल लिहिण्याच्या स्वातंत्र्य देण्याकडे आहे, असे नेहमीच जाणवते. मिपाच्या जन्माची चित्तरकथा लिहिण्याच्या स्वातंत्र्याशीचजोडलेली आहे, हे अनेकांना माहित आहे.प्रतिसाद अप्रकाशित करणे, त्रास खूप झाला तर सदस्याला ब्यान करणे, असा तो उपाय. आणि असे आयडी जातातही लवकर. पण एक आयडी गेला की दुसर्या आयडीने ते हजर होतात. मिपावर अशा लोकांना वैतागून मिपा कधीच सोडू नये. असे फक्त मुठभरच आयडी असतात. आणि त्यांच्या तुलनेने वरीजनल आणि चांगल्या भावनेने लिहिणारे लोक खूप असतात. पण ते सहन करतात, दुर्लक्ष करतात. आपणही तसंच केलं पाहिजे. मिपा सोडून गेलं तर नुकसान आपलं होतं. आपला आनंद जातो. मिपाचं काही अडत नाही. मिपावर खूप लोक आले आणि गेले मिपा आपल्या गतीने आपला प्रवास करीत आहे, मिपा सोडून गेलेल्यांची आठवण सुद्धा नंतर येत नाही. बाकी, सध्या तर मला लिहिण्याचा कंटाळा खूप आला आहे. लिहावंच वाटत नाही. सध्या कविता आणि पाककृती बघतो. आपला धागा बघितला आणि लिहिणं आवरलं नाही. मिपा इंजॉय करा. मिपावर शक्यतो गेंड्याची कातडी करुन घ्यायची मग काहीच टोचत नाही. कधी इग्नोर करणे, कधी त्रास सहन करुन गुपचूप झोपणे, कधी विनाकारण चौकशांच्या खरडी मित्रांना टाकायचं असं केलं की मिपा जगणं आनंदात आणि सुसह्य होतं. बाकी, इकडे आता चांगला पाऊस आहे. सर्वांना नमस्कार सांगा. लहानांना आशिर्वाद. इकडे बंटी आणि बबली सर्दी तापाने परेशान आहेत. डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. आता बरे आहेत. पत्रात लिहितांना काही चुकल्यास क्षमस्व. ता.क. आज रविवारचं एक लग्नाला जायचं आहे, कंटाळा आला आहे. आठवड्यातून एकच दिवस सुट्टी आणि असा डोक्याला ताप. जाऊन येतो. बोलत राहूच. कभी कभी कितनी बाते होती है कहने को... जब कोयी सुनने वाला नही होता.-दिलीप बिरुटे
(आपलाच मिपाकर मित्र)
येवढं लिव्हलं आणिक्...
In reply to मुक्तविहारी, घर नं. १७२४७. मु.पो. मिसळपाव. ता.जि. मिपा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे हो
In reply to येवढं लिव्हलं आणिक्... by डॉ सुहास म्हात्रे
बिरूटेसरांचा प्रतिसाद आवडला.
In reply to मुक्तविहारी, घर नं. १७२४७. मु.पो. मिसळपाव. ता.जि. मिपा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फार पूर्वी,
हो
In reply to फार पूर्वी, by आनंदी गोपाळ
असो.
वा चंपाबै वा.
In reply to असो. by चंपाबाई
चंपाबाई कसं हो जमतं तुम्हाला ?
In reply to असो. by चंपाबाई
चंपाबै मूळ संदर्भात दवा हा
In reply to असो. by चंपाबाई
ये हुई ना बात!
In reply to असो. by चंपाबाई
काय ओ मुवि!
हा मोगाखान निदान जसा आहे तसा
In reply to काय ओ मुवि! by पैसा
सहमत आहे पण उपप्रतिसाद पाहिजेच ना..
In reply to काय ओ मुवि! by पैसा
उपप्रतिसादासाठी काय पन ;)
In reply to सहमत आहे पण उपप्रतिसाद पाहिजेच ना.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शमतीबद्दल.
In reply to उपप्रतिसादासाठी काय पन ;) by अजया
उपप्रतिसादासाठी काय पन ;)
In reply to शमतीबद्दल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी पण शमत.
In reply to सहमत आहे पण उपप्रतिसाद पाहिजेच ना.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाबौ ताई पेटली!!
In reply to काय ओ मुवि! by पैसा
पूर्णपणे सहमत!!!
In reply to बाबौ ताई पेटली!! by कैलासवासी सोन्याबापु
अपडेट्स
In reply to काय ओ मुवि! by पैसा
हम्म
In reply to अपडेट्स by गॅरी ट्रुमन
ट्रोल
सहमत आहे.
In reply to ट्रोल by तिमा
गविंना चावी मारा. (दिसत
In reply to सहमत आहे. by बोका-ए-आझम
आदूबाळाला टाळा,
In reply to गविंना चावी मारा. (दिसत by आदूबाळ
गवि आजकाल फक्त पाककृत्यांवर
In reply to गविंना चावी मारा. (दिसत by आदूबाळ
मलाही सुचतय काही बाही
In reply to गविंना चावी मारा. (दिसत by आदूबाळ
मी तर..... पण...
मुविसाहेब,
मिपावर सूज्ञ लोकही आहेत हे
>>>>>मिपावर सूज्ञ लोकही आहेत
In reply to मिपावर सूज्ञ लोकही आहेत हे by मितभाषी
का बरे निषेध? ???
In reply to >>>>>मिपावर सूज्ञ लोकही आहेत by धनंजय माने
धागा पेटला.
वाह वाह खतरनाकच धागा मुवी !
..
In reply to वाह वाह खतरनाकच धागा मुवी ! by प्रसाद गोडबोले
+1
In reply to वाह वाह खतरनाकच धागा मुवी ! by प्रसाद गोडबोले
याच धाग्यावर लिहीतो.
याच धाग्यावर लिहीतो.
मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके
In reply to याच धाग्यावर लिहीतो. by धनंजय माने
मुक्त विहारी जी
मुवि बिपिन कार्यकर्त्यांचा हा
डू आय डी
+1
In reply to डू आय डी by स्वीट टॉकर