Skip to main content

लग्नाचा बाजार

लेखक वाल्मिक यांनी बुधवार, 06/07/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव 1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे 2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू 3) चुकून request accept केली 4) सकाळपासून 50 call आले 5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ? 6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू 7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका आणि सर्वात भयानक 8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे

वाचने 40506
प्रतिक्रिया 225

प्रतिक्रिया

एका कोल्हापुरच्या मुलीने तर मला सॅलरी स्लीप अन इन्कम टॅक्स रिटर्न्स मागितले होते कारण तिला माझ्या उत्पन्नाची खात्री करुन घ्यायची होती. :)

In reply to by पामर

लोकं चक्क खोटं बोलतात मुलाच्या इन्कम बद्दल. खात्री करुन घेणे चुकीचे नाही. खात्री कशी करायची हे टॅक्टफुली ठरवावे ज्याने त्याने.

एवढेच ? गावाकडची मुलगी MBA करून नोकरी नाही ,बापाच्या ओळखीचे HR लागली सॅलरी स्लीप मागते ,कंपनीत फोन करते हा माणूस खरंच कामाला आहे का ,आणि साखरपुडा ठरवते मग परत तिचा रिकामटेकडा भाऊ येऊन कंपनी चेक करतो

In reply to by वाल्मिक

बरोबर आहे कि मग. उलट अशी सगळ बघुन, सवरुन निर्णय घेणारी मुलगी बायको म्हणुन मिळाली तर उत्तम संसार करेल की

In reply to by राजाभाउ

साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी बघणार की नंतर ? त्या वेळी मी सुट्टीवर असतो तर त्यांनी नकार कशावरून दिला नसता?

In reply to by राजाभाउ

बरोबर आहे कि मग. उलट अशी सगळ बघुन, सवरुन निर्णय घेणारी मुलगी बायको म्हणुन मिळाली तर उत्तम संसार करेल की
सहमत...

In reply to by गंम्बा

साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी बघणार की नंतर ? त्या वेळी मी सुट्टीवर असतो तर त्यांनी नकार कशावरून दिला नसता?

In reply to by सूड

सॅलरी स्लिप झाली कंपनीत फोने पण केला तिकडचे एक राजकारणी मध्यस्त ,जे आमचे नातेवाईक आहेत मातोश्री शाळेत HM पण होकार dilywar का म्हणून चेक करावे ?

In reply to by वाल्मिक

साखरपुडा हे अ‍ॅग्रीमेंट नव्हे. ते अ‍ॅग्रीमेंट टु अ‍ॅग्री आहे. असं बघा, विसारपावती झाल्यावरसुद्धा व्यवहार थांबवता येतोच ना?

In reply to by वाल्मिक

चौकशी करणे म्हणजे संशय घेणे नाही. आणि लपवण्यासारखं काही नसेल तर तुम्ही का ऑफेंड होताय? टक्या चा पडद्या वाला प्रतिसाद कळला नाही बाबा.

In reply to by टवाळ कार्टा

त्यान्ना मी कंपनी चेक करून दिली पण मग नकार दिला होता साखरपुड्याआधीच सगळे चेक करणे पाहिजे असे माझे मत आहे ,

In reply to by सूड

च्यायला सुडक्या कसा घाव घालील सांगता येत नाही. बेक्कार, अतिबेकार, महाबेक्कार पंच. पडू पडू हसलो

In reply to by राजाभाउ

हेच बोल्तो. अमुक एका कंपनीत कामाला आहे. इतका इतका पगार आहे अशा थापा मारून लग्न जुळवलेली एक केस माहिती आहे.

In reply to by मुक्त विहारि

साखरपुड्या नंतर तुम्हाला कुणी सांगितले असते की मुलीचे लफडे होते तर तुम्ही तपासून पाहिले असते की नाही?

फक्त छाती वरचे सांगितले

मापाचे? मापाचे म्हन्जे नेमके कशे? जरा ये बी ईस्कुटुन सांगो की!

मापाचे? मापाचे म्हन्जे नेमके कशे? जरा ये बी ईस्कुटुन सांगो की!

आमचा वर्‍हाडी अनुभव (थोडा जाहिरातीसारखा वाटला तरीही): १. आजचा सगळ्यात मोठा क्रायटेरिआ म्हणजे पुण्यात नोकरी आणि घर. त्यापुढे सात खून माफ. मुलीने आयुष्यभर रिसोड-बाळापूर-इ.इ. सोडून कधी अमरावती,अकोला, नागपूरही पाहिले नसते पण मुलगा मात्र पुण्याचा हवा किंवा मग एकदम फॉरेन.अधेमधे काही नाहीच. २. यात अजून एक फाईन क्रायटेरीआ म्हणजे मुलगा तर पुण्यात स्थायिक हवा पण आई-वडील गावी राहणारे असावेत. ३. सरकारी नोकरी? ई..ई..ई..सरकारी नोकरीला प्राधान्य हा प्रकार आता इतिहासजमा झाला आहे.आता कॉर्पोरेट जॉब,पॅकेज,बोनस (८.३३%नव्हे बर का!), कॅब,सोडेक्सो का कुठले तरी कुपन्स इ.इ. परवलीचे शब्द आहेत.या जुलै महिन्यात किती डीए वाढतो यावर लक्ष ठेवून असणारे आमच्यासारखे लोक अत्यंत मागास प्रजातीत मोडतात. ४. काही कोकणस्थांकडून आलेला अनुभव (कृ.वैयक्तिक घेऊ नये): आधी लिहायचं पोटजात चालेल.मग म्हणायचं:नाही बाई,आई म्हणते तुमच्याकडे फारच सोवळंओवळं,सतत कुळाचार असतो,सगळा वेळ त्यातच जाईल.मी म्हणालो:बाई,मी स्वत: फक्त वर्षातून हाडपक्षानंतर एकदाच जानवं बदलणारा माणूस.पण नाही.असो. ५. काही मुलींना तर लग्न "कशासाठी?" करतात हेही माहीत नसतं.एकीला मी विचारलं: लोक "ज्यासाठी" लग्न करतात त्याबद्दल तुझं काय मत आहे तर "अं..करायचं म्हणून करायचं" असं निराशाजनक उत्तर. आणि वर "नेमकं" काय करायचं तेही माहीत नाही असंही तिने सांगून टाकलं.तर इथूनही काहींची सुरूवात असते. ६. काय ड्रिंक, स्मोक करत नाही ? सोशल? नाही? ऊं... (एकूण निर्व्यसनी लोक निकम्मे असतात ही समजूत) ७. मुलीच्या पॅकेजपेक्षा मुलाचं पॅकेज जास्त हवं (हे लॉजिक मला काही केल्या समजत नाही.) एक पुणेक्रेझग्रस्त अअवा

In reply to by ए ए वाघमारे

आणि दुखर्‍या नसेवर पाय ठेवल्याबद्दल धागाकाढत्याचे आभार ! जखम कुरवाळण्यातही एक वेगळे सुख असते.असो.

In reply to by ए ए वाघमारे

७. मुलीच्या पॅकेजपेक्षा मुलाचं पॅकेज जास्त हवं (हे लॉजिक मला काही केल्या समजत नाही.)
उत्क्रांतीचा अभ्यास वाढवा!

In reply to by ए ए वाघमारे

६. काय ड्रिंक, स्मोक करत नाही ? सोशल? नाही? ऊं...
मी तर उलटं ऐकलं होतं. ड्रिंक स्मोक केल्याबद्दल नाकारण्याच्या केसेस.

In reply to by ए ए वाघमारे

वाघमारे साहेब, कोण्या डिपार्टमेंटले हाय थुमी मंग? अवांतर :- (तरी महत्वाचे) काही पोरी सब्बन नाही तर काही पोरी नीरानाम म्याट रायतेत वाघमारे साहेब, सध्या अकोल्यात लेटेस्ट ट्रेंड पिंपळे गुरव हाय, पिंपळेगुरव मंदी जर थुमचा 2 बेडरूम असला तर मंग तुम्ही लुळे लंगडे भोकने कानानं डुचके कशे बी राहा ज्यमते तुमचे काम, त्यात जर ऑन साईट वाल्या कंपनी मध्ये अससान तर स्वर्ग 2 बोटे उरला, भाऊ इंटरकास्ट करा नाईतर टू स्टेट्स मॅरेज करा हो :D आमचे तसेच आहे मॅरेज, अकोल्यात आपल्या चारबंगला गौरक्षण रोड साईडच्या एका स्थळाचा लैच खास अनुभव आलेला आहे आपल्याला जमन तसा व्यनि करतो

In reply to by संदीप डांगे

काय घोडं मारलय (न व्यनी करायला) फक्त बोलीभाषेत केले तर काही शब्दांचे अर्थासाठी त्रास द्यावा लागेल हे नक्की. व्यनी माहीती उत्सुक नाखु

कुठंवर आलं भाऊ? लावली हजेरी. वर आमचा आशिर्वाद घ्या... धागा हजारी होऊ दे

निरीक्षण बरोबर आहे कि नाही? बाकी किती चिंधीगिरी करू शकता हे काय आपनाला म्हायती न्हाय

In reply to by वाल्मिक

आणि टक्याला नाही म्हणतात असे कोणी सांगितले तुम्हाला..? आमच्या टक्याच्या मागण्याच हटके असल्याने मुलगी मिळत नाहीये... नैतर कट्ट्याचा फोटो फोटोशॉप करायची गरज नसती पडली.

In reply to by संदीप डांगे

अयायाय बघ लका टक्या, आता लग्नाचे फोटो फोटोशॉप करायची वेळ आणू नको म्हणजे बरे. ;) बाकी अशा काय जगावेगळ्या मागण्या आहेत टक्याच्या? त्याला पण मुलाच्या छातीवर केसबिस पाहिजेत कि काय?

In reply to by संदीप डांगे

फोटोशॉप???? तो फोटो शॉप वाटला तुम्हाला? किती बाजू घेताय टक्याची? अहो झालं काय ते मला विचारा ना! तुम्ही सोनेरी पेयात दंग झालात, इकडे लाडोबा ची आरती करायची म्हणून तिथे आलेला दुसरा मुलींचा ग्रुप होता त्यांना या अनाहितांनी सुपारी दिली. मगकाय, लाडोबाचे दोन्ही हात धरून ओढाओढ नुसती! तेवढ्यात कुणीतरी क्लिक केला तो फोटो. ;)