Skip to main content

लग्नाचा बाजार

लेखक वाल्मिक यांनी बुधवार, 06/07/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव 1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे 2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू 3) चुकून request accept केली 4) सकाळपासून 50 call आले 5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ? 6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू 7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका आणि सर्वात भयानक 8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे

वाचने 40506
प्रतिक्रिया 225

प्रतिक्रिया

In reply to by राजाभाउ

:)

In reply to by वाल्मिक

ओमकारेश्वर पोलीस चौकी कडून कसब्या कडे जाताना उजव्या हाताला आहे ते दुकान. आमदार बापट यांच्या घरासमोर.

शादी डॉट कॉम वगैरे सारख्या ई-मार्केटप्लेस मॉडेल राबवणार्‍या सायटींचे फायदे पाहिजेत; मग बाजार झाला म्हणून तक्रार कशाला करायची? (माझ्या एका भूतपूर्व बॉसचं कन्सल्टिंगसंदर्भातलं एक अश्लील सुवचन आठवलं. पण ते इथे अस्थानी ठरेल म्हणून देत नाही.) दादा, बाजार आहे हे स्वतःशी मान्य करा आणि पुढे चला. उगा मनस्ताप करून घेऊन काय साध्य होणार आहे?
5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग ...
टेन्शन घेऊ नका. प्रत्येक सॉफ्टवेअरला अल्गोरिदम असतोच. त्या गाठी डिझाईन फेजच्या स्वर्गात बांधलेल्या असतात. ;)

८ नंबरच काय गोड-बोंगाल आहे ?

In reply to by इरसाल

होते सातारा साईड चे पात्र मॅडम ना नृत्यनागां व्हायचे होते ,पण मग घर सांभाळणार नाही म्हणून नाद सोडला

In reply to by वाल्मिक

नृत्यनागां
आयोव. नागीन डॅन्स. धुरळाच की. का ते नागा आदिवासी डॅन्स. शिंगाचा टोप घालून चटै गुंडाळून बाल्या टाइप?

In reply to by राजाभाउ

असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज. हाऊ टु ची पुस्तके बिस्तके वाचून, आपल्याकडे केस असतील तर इचार करायचा नाही. नसतील तर छातीला महाभृंगराज नाहीतर सेसा चोळायचे झंडू बामसारखे अन गप्प झोपायचे.

In reply to by अभ्या..

च्यायला अभ्या भाउ भारीय हे !!
छातीला महाभृंगराज नाहीतर सेसा चोळायचे झंडू बामसारखे
बेक्कार हसतोय

In reply to by बोका-ए-आझम

हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज झैराती असतात पेपरात. गुडघ्यापर्यंत केस सोडलेल्या बायकांचे फोटो आणि नाव पत्ते असतात. मेडिकल मधे चालते ओटीसीला फुल्ल.

In reply to by अभ्या..

अभ्याला आवरा =)) लै सुटलंय हे. मला क्लिनिकला महाभृंगराज आणि सेसा आठवुन आठवुन हसायला येत होतं =))))

In reply to by अभ्या..

पुरुषांसाठी गोर होण्याच वेगळ क्रिम असतय तस वेगळ तेल का नको, का पुरषांनी बायकांच डोक्याचं तेल वापरायच

In reply to by चतुरंग

प्रतिसाद आणि बुंगप्रतिप्रतिसाद पाहून लयच मज्या आल्या गेली आहे. =)) =)) =)) तेवढं ते स्मायली पुनरेकवार इनेबल करायचं बघा की ओ.

In reply to by बॅटमॅन

@प्रतिसाद आणि बुंगप्रतिप्रतिसाद पाहून लयच मज्या आल्या गेली आहे. =)) =)) =)) ››› +++ १११. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

वाल्मिक. नृत्यांगना असं लिहा बरं १०० वेळा. बाकी चालु द्या!

असं खरंच लिहिलेलं असतं का? =)))

In reply to by कविता१९७८

जर काहीही करुन नकारच द्यायचा असेल तर हे कारण चांगलं आहे. समोरच्याला जेव्हा सरळ नाही म्हणणं अवघड वाटत असतं तेव्हा अशा कारणांचा उपयोग होतो. स्वानुभव आहे. मी टेलिव्हिजन क्षेत्रात असताना एका मुलीने या क्षेत्रात फार व्यसनाधीनता आहे असं सांगून नकार दिला होता - मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसताना.

In reply to by कविता१९७८

पूर्वी मुलीचे केस लांब नाहीत म्हणून नकार द्यायचे. आता poetic justice प्रमाणे मुलींनी बाजू पलटवलेली आहे.

In reply to by कविता१९७८

नाही गं. आपल्याकडे पूर्वी डॉट कॉम वाल्या साईटींचा प्रकार येण्याआधी जसे ओळखीतून स्ठळे पाहणे, अपेक्षा विचारणे होत असे त्याप्राकारातला किस्सा आहे. नातेवाईक भेटले होते. त्या बाईंची तक्रार होती की त्यांची मुलगी आलेल्या बर्‍याच स्ठळांना नकार देते, तूच बघ ना विचारून तिच्या मनात नक्की काय आहे वगैरे बोलून झाल्यावर आईने तिला अपेक्षा विचारल्या. त्यात क्र. ८ ऐकून ती गप्पच बसली व मला तेथून घेऊन तडक घरी आली. माझ्या टीनएज मनावर याचा कितपत परिणाम झालाय वगैरे विचारांनी ती धास्तावली होती. आत्ता मलाही लईच हसू आलं, त्यातही अभ्याचे प्रतिसाद वाचायचे म्हणजे आजूबाजूचे लोक आपल्याला वेडं समजायला लागतात इतकं हसू येतं.

In reply to by वाल्मिक

पण मी काय म्हणतो छातीवर केस आहेत की नाही हे त्या कन्येला लग्न होइस्तोवर कळणार कसे? आणि मग चेक करुनच घेणार असेल तर मुलाने उलटी अट घातल्यास काय करणार?

पत्रिकाच बित्रिकाच बघायची असेल तर मग आपापल्या समाजाच्या वधु वर सुचक मंडळात नाव घाला की. जसे क्षत्रिय समाज, सारस्वत,मराठा ,ब्राम्हण वगैरे. बेस्ट मॅच तिकडेच मिळेल. उगीच चव्हाट्यावर जाहिरात केली की असेच होणार. कारण डॉट कॉम असेल तरी पाठीमागची विचारसरणी बदलत नाही. आणि छातीवर केस बिस अशा अपेक्षा असतील तर भयानक आहे. उद्या फ्लिपकार्टवर नवरे शोधावे लागतील आपल्या आवडीचे/मापाचे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मापाचे? मापाचे म्हन्जे नेमके कशे? जरा ये बी ईस्कुटुन सांगो की!

असे मला कोणीच का विचारले नाही ?? का ?? मग मुलांनी केस असतील तर उघडे फोटो टाकायचे का ?? विचारानेच मळमळायला लागले ! http://i1016.photobucket.com/albums/af281/rakeshjhun/14e88d80.jpg

In reply to by वाल्मिक

दुसर्‍याची अपेक्षा काहीही मूर्खासारखी असेल. आपण त्याला किती बळी पडायचं? मुलींना जसे चालून दाखव, पाय दाखव वगैरे म्हणतात व ते अपमानास्पद वाटते तसेच पुरुषांसाठीही ही गोष्ट अपमानास्पद आहेच! तुम्ही ही अपेक्षा कशाला पूर्ण करता? नंतर तक्रार करायची नाही मग!

In reply to by रेवती

मला त्या अपॆक्षेत मूर्ख पण नाही वाटलं ,आणि त्या मुलीवर तेव्हा प्रेम असल्याने अपेक्षा पूर्ण केली होती