इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय
शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव
1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे
2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू
3) चुकून request accept केली
4) सकाळपासून 50 call आले
5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ?
6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू
7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका
आणि सर्वात भयानक
8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे
वाचने
41015
प्रतिक्रिया
225
मिसळपाव
प्रतिक्रिया
इथे मिपाकरणींना सांगा शोधायला
इथे मिपाकरणींना सांगा शोधायला...झटक्यात शोधतील
छ्या !
In reply to इथे मिपाकरणींना सांगा शोधायला by टवाळ कार्टा
कुठल्या काळात अडकलायेस ?
मिपा'करणी' नव्हे मिपा बायका. लिही बघू दहा वेळा !
अर्रे हो...आय माय स्वारी
In reply to छ्या ! by सस्नेह
अर्रे हो...आय माय स्वारी बर्का...मिपाबायकाच
तुम्हाला कोनता अनुभव सर्वात
तुम्हाला कोनता अनुभव सर्वात त्रासदायक वाटला? म्हणजे प्रॉब्लेम कशात वाटला?
अजून शोध चालू असल्याने खरा
In reply to तुम्हाला कोनता अनुभव सर्वात by अभ्या..
अजून शोध चालू असल्याने खरा त्रास सुरू व्हायचंय
बाकीचं ठिक आहे कदचीत. पण
बाकीचं ठिक आहे कदचीत. पण
हे अवघड आहे.
काय अवघड आहे?
In reply to बाकीचं ठिक आहे कदचीत. पण by राजाभाउ
काय अवघड आहे?
नसले तर डॉ. बत्रा हायेच कि, उगवायला
:) :)
In reply to काय अवघड आहे? by अभ्या..
:) :)
:)
In reply to :) :) by राजाभाउ
:)
शनिवार पेठेत लावून मिळतात,
In reply to बाकीचं ठिक आहे कदचीत. पण by राजाभाउ
शनिवार पेठेत लावून मिळतात, ओंकारेश्वर मंदिरापासून खाली जा
शोधले नाही मिळले
In reply to शनिवार पेठेत लावून मिळतात, by महासंग्राम
शोधले
नाही मिळले
ओमकारेश्वर पोलीस चौकी कडून
In reply to शोधले नाही मिळले by वाल्मिक
ओमकारेश्वर पोलीस चौकी कडून कसब्या कडे जाताना उजव्या हाताला आहे ते दुकान. आमदार बापट यांच्या घरासमोर.
शादी डॉट कॉम वगैरे सारख्या ई
शादी डॉट कॉम वगैरे सारख्या ई-मार्केटप्लेस मॉडेल राबवणार्या सायटींचे फायदे पाहिजेत; मग बाजार झाला म्हणून तक्रार कशाला करायची? (माझ्या एका भूतपूर्व बॉसचं कन्सल्टिंगसंदर्भातलं एक अश्लील सुवचन आठवलं. पण ते इथे अस्थानी ठरेल म्हणून देत नाही.)
दादा, बाजार आहे हे स्वतःशी मान्य करा आणि पुढे चला. उगा मनस्ताप करून घेऊन काय साध्य होणार आहे?
टेन्शन घेऊ नका. प्रत्येक सॉफ्टवेअरला अल्गोरिदम असतोच. त्या गाठी डिझाईन फेजच्या स्वर्गात बांधलेल्या असतात. ;)
हे ते
८ नंबरच काय गोड-बोंगाल आहे ?
होते सातारा साईड चे पात्र
In reply to हे ते by इरसाल
होते सातारा साईड चे पात्र
मॅडम ना नृत्यनागां व्हायचे होते ,पण मग घर सांभाळणार नाही म्हणून नाद सोडला
नृत्यनागां
In reply to होते सातारा साईड चे पात्र by वाल्मिक
आयोव. नागीन डॅन्स. धुरळाच की.
का ते नागा आदिवासी डॅन्स. शिंगाचा टोप घालून चटै गुंडाळून बाल्या टाइप?
पण नृत्यनागां होण्याचा आणि ८
In reply to होते सातारा साईड चे पात्र by वाल्मिक
पण नृत्यनागां होण्याचा आणि ८ नं. चा काय संबंध?
असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज.
In reply to पण नृत्यनागां होण्याचा आणि ८ by राजाभाउ
असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज. हाऊ टु ची पुस्तके बिस्तके वाचून, आपल्याकडे केस असतील तर इचार करायचा नाही. नसतील तर छातीला महाभृंगराज नाहीतर सेसा चोळायचे झंडू बामसारखे अन गप्प झोपायचे.
च्यायला अभ्या भाउ भारीय हे !!
In reply to असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज. by अभ्या..
च्यायला अभ्या भाउ भारीय हे !!
बेक्कार हसतोय
कोणत्या तरी चित्रपट अशोक सराफ
In reply to असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज. by अभ्या..
कोणत्या तरी चित्रपट अशोक सराफ च्या छातीवर नायिका हात फिरवताना बघतील होत
जंगल बुक?
In reply to कोणत्या तरी चित्रपट अशोक सराफ by वाल्मिक
जंगल बुक?
अहो बास!
In reply to जंगल बुक? by आदूबाळ
हसाकर बोकेकी जान लोगे क्या? =))
सेसा?
In reply to असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज. by अभ्या..
असं तेल आहे? बाकी वटवाघळाच्या तेलाबद्दल ऐकलं होतं काहीतरी. हे तेच तर नाही ना?
हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज
In reply to सेसा? by बोका-ए-आझम
हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज झैराती असतात पेपरात. गुडघ्यापर्यंत केस सोडलेल्या बायकांचे फोटो आणि नाव पत्ते असतात.
मेडिकल मधे चालते ओटीसीला फुल्ल.
अभ्याला आवरा =)) लै सुटलंय हे
In reply to हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज by अभ्या..
अभ्याला आवरा =)) लै सुटलंय हे.
मला क्लिनिकला महाभृंगराज आणि सेसा आठवुन आठवुन हसायला येत होतं =))))
हसुन हसुन मेले. आॅफिसमध्ये
In reply to अभ्याला आवरा =)) लै सुटलंय हे by अजया
हसुन हसुन मेले. आॅफिसमध्ये लोक बघताहैत हिला काय वेड लागलं का म्हणून :)
पुरुषांसाठी गोर होण्याच वेगळ
In reply to हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज by अभ्या..
पुरुषांसाठी गोर होण्याच वेगळ क्रिम असतय तस वेगळ तेल का नको, का पुरषांनी बायकांच डोक्याचं तेल वापरायच
मक्काय तर... उगा छातीचे केस
In reply to पुरुषांसाठी गोर होण्याच वेगळ by राजाभाउ
मक्काय तर... उगा छातीचे केस गुडग्यापतूर आले तर काय घ्या?
=))
In reply to मक्काय तर... उगा छातीचे केस by संदीप डांगे
=))
अश्लील अश्लील अश्लील
In reply to =)) by आनन्दिता
अश्लील अश्लील अश्लील
ख्खिक्क!!!
In reply to मक्काय तर... उगा छातीचे केस by संदीप डांगे
लई बेक्कार!!
छातीचे केस गुडघ्यापर्यंत ...
In reply to मक्काय तर... उगा छातीचे केस by संदीप डांगे
छातीचे केस गुडघ्यापर्यंत ... =)))
हे वाचून
In reply to मक्काय तर... उगा छातीचे केस by संदीप डांगे
वारल्या गेले आहे! =)))
अगायायाया!! =)) =))
In reply to मक्काय तर... उगा छातीचे केस by संदीप डांगे
खंप्लीट मार्केटयार्ड उठवणारा प्रतिसाद! =)) =))
(महाबुंगराजप्रेमी)रंगा
प्रतिसाद आणि
In reply to अगायायाया!! =)) =)) by चतुरंग
प्रतिसाद आणि बुंगप्रतिप्रतिसाद पाहून लयच मज्या आल्या गेली आहे. =)) =)) =))
तेवढं ते स्मायली पुनरेकवार इनेबल करायचं बघा की ओ.
@प्रतिसाद आणि
In reply to प्रतिसाद आणि by बॅटमॅन
@प्रतिसाद आणि बुंगप्रतिप्रतिसाद पाहून लयच मज्या आल्या गेली आहे. =)) =)) =)) ››› +++ १११.
207
In reply to @प्रतिसाद आणि by अत्रुप्त आत्मा
207
आणि छातीवरचे केस
In reply to हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज by अभ्या..
आणि छातीवरचे केस गुडघ्यापर्यंत वाढले तर दोघांना केशभूषा स्पर्धा खेळता येईल !! =))
अनुभव घेऊन पाहा असे उत्तर
In reply to होते सातारा साईड चे पात्र by वाल्मिक
अनुभव घेऊन पाहा असे उत्तर द्यायचे की झाले.
ते
In reply to होते सातारा साईड चे पात्र by वाल्मिक
नृत्यनागां म्हणजे स्ट्र्रीप्टीज नव्हे नां ?
नृत्य करता करता नागा होणे ?????
वाल्मिक.
वाल्मिक.
नृत्यांगना असं लिहा बरं १०० वेळा.
बाकी चालु द्या!
शांत शब कथा ?
In reply to वाल्मिक. by धनंजय माने
शांत शब कथा ?
आपला ते शांत शब्द katha
म्हणजे काय ओ?
In reply to शांत शब कथा ? by वाल्मिक
म्हणजे काय ओ?
शत शब्द कथा
In reply to म्हणजे काय ओ? by धनंजय माने
शत शब्द कथा
जिल्बी माहित नाही आणि शत शब्द
In reply to शत शब्द कथा by वाल्मिक
जिल्बी माहित नाही आणि शत शब्द कथा माहिती आहे...तू पातेलंच रे =))
मोजी का नाही
In reply to जिल्बी माहित नाही आणि शत शब्द by टवाळ कार्टा
मोजी का नाही
८ नं !!
असं खरंच लिहिलेलं असतं का?
=)))
अट क्र. ८ अतिशयोक्ती वाटत आहे
In reply to ८ नं !! by अजया
अट क्र. ८ अतिशयोक्ती वाटत आहे.
मला अजिबात अतिशयोक्ती वाटली नाही.
In reply to अट क्र. ८ अतिशयोक्ती वाटत आहे by कविता१९७८
जर काहीही करुन नकारच द्यायचा असेल तर हे कारण चांगलं आहे. समोरच्याला जेव्हा सरळ नाही म्हणणं अवघड वाटत असतं तेव्हा अशा कारणांचा उपयोग होतो. स्वानुभव आहे. मी टेलिव्हिजन क्षेत्रात असताना एका मुलीने या क्षेत्रात फार व्यसनाधीनता आहे असं सांगून नकार दिला होता - मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसताना.
व्यसनाचे कारण दिले असेल हे एक
In reply to मला अजिबात अतिशयोक्ती वाटली नाही. by बोका-ए-आझम
व्यसनाचे कारण दिले असेल हे एक वेळ मानुही शकतो पण अशी अट?????
हो. ही अट solid आहे.
In reply to व्यसनाचे कारण दिले असेल हे एक by कविता१९७८
पूर्वी मुलीचे केस लांब नाहीत म्हणून नकार द्यायचे. आता poetic justice प्रमाणे मुलींनी बाजू पलटवलेली आहे.
छातीवरचे ?
In reply to हो. ही अट solid आहे. by बोका-ए-आझम
छातीवरचे ?
और ये लगा सिक्सर!!
In reply to छातीवरचे ? by वाल्मिक
ठो ठो ठो हसलो!
धन्यवाद
In reply to और ये लगा सिक्सर!! by राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद
ते नकार द्याचे कारण नव्हते
In reply to मला अजिबात अतिशयोक्ती वाटली नाही. by बोका-ए-आझम
ते नकार द्याचे कारण नव्हते
( छातीवर केस असलेला )
वाल्मिक
नाही गं.
In reply to अट क्र. ८ अतिशयोक्ती वाटत आहे by कविता१९७८
नाही गं.
आपल्याकडे पूर्वी डॉट कॉम वाल्या साईटींचा प्रकार येण्याआधी जसे ओळखीतून स्ठळे पाहणे, अपेक्षा विचारणे होत असे त्याप्राकारातला किस्सा आहे. नातेवाईक भेटले होते. त्या बाईंची तक्रार होती की त्यांची मुलगी आलेल्या बर्याच स्ठळांना नकार देते, तूच बघ ना विचारून तिच्या मनात नक्की काय आहे वगैरे बोलून झाल्यावर आईने तिला अपेक्षा विचारल्या. त्यात क्र. ८ ऐकून ती गप्पच बसली व मला तेथून घेऊन तडक घरी आली. माझ्या टीनएज मनावर याचा कितपत परिणाम झालाय वगैरे विचारांनी ती धास्तावली होती. आत्ता मलाही लईच हसू आलं, त्यातही अभ्याचे प्रतिसाद वाचायचे म्हणजे आजूबाजूचे लोक आपल्याला वेडं समजायला लागतात इतकं हसू येतं.
ती मुलगी मुंबई ची होती ? मूळ
In reply to नाही गं. by रेवती
ती मुलगी मुंबई ची होती ? मूळ सातारा ?
इंदोर.
In reply to ती मुलगी मुंबई ची होती ? मूळ by वाल्मिक
इंदोर.
मला वाटलं एकाच नमुना आहे
In reply to इंदोर. by रेवती
मला वाटलं एकाच नमुना आहे छातीवर केस पाहिजे असणारा ;(
पण मी काय म्हणतो छातीवर केस
In reply to मला वाटलं एकाच नमुना आहे by वाल्मिक
पण मी काय म्हणतो छातीवर केस आहेत की नाही हे त्या कन्येला लग्न होइस्तोवर कळणार कसे? आणि मग चेक करुनच घेणार असेल तर मुलाने उलटी अट घातल्यास काय करणार?
त्यासाठी लग्नाची काय गरज ?
In reply to पण मी काय म्हणतो छातीवर केस by मृत्युन्जय
त्यासाठी लग्नाची काय गरज ?
ठ्ठो!
In reply to पण मी काय म्हणतो छातीवर केस by मृत्युन्जय
ठ्ठो!
हेहेहे
पत्रिकाच बित्रिकाच बघायची असेल तर मग आपापल्या समाजाच्या वधु वर सुचक मंडळात नाव घाला की.
जसे क्षत्रिय समाज, सारस्वत,मराठा ,ब्राम्हण वगैरे. बेस्ट मॅच तिकडेच मिळेल. उगीच चव्हाट्यावर जाहिरात केली की असेच होणार. कारण डॉट कॉम असेल तरी पाठीमागची विचारसरणी बदलत नाही.
आणि छातीवर केस बिस अशा अपेक्षा असतील तर भयानक आहे. उद्या फ्लिपकार्टवर नवरे शोधावे लागतील आपल्या आवडीचे/मापाचे.
मापाचे?
In reply to हेहेहे by राजेंद्र मेहेंदळे
मापाचे?
मापाचे म्हन्जे नेमके कशे? जरा ये बी ईस्कुटुन सांगो की!
नेमके कोणते माप ?
In reply to मापाचे? by भीमराव
नेमके कोणते माप ?
मुलाच्या छातीवर केस पाहिजे
मुलाच्या छातीवर केस पाहिजे
डोक्यावर नसतील तर चालतील काय?
मुलाच्या छातीवर केस पाहिजे
असे मला कोणीच का विचारले नाही ?? का ??
मग मुलांनी केस असतील तर उघडे फोटो टाकायचे का ?? विचारानेच मळमळायला लागले !
https://i1016.photobucket.com/albums/af281/rakeshjhun/14e88d80.jpg
मी त्यावेळेची सरळ छाती वरचे
In reply to मुलाच्या छातीवर केस पाहिजे by हेमन्त वाघे
मी त्यावेळेची सरळ छाती वरचे केस दाखवले होते
दुसर्याची अपेक्षा काहीही
In reply to मी त्यावेळेची सरळ छाती वरचे by वाल्मिक
दुसर्याची अपेक्षा काहीही मूर्खासारखी असेल. आपण त्याला किती बळी पडायचं? मुलींना जसे चालून दाखव, पाय दाखव वगैरे म्हणतात व ते अपमानास्पद वाटते तसेच पुरुषांसाठीही ही गोष्ट अपमानास्पद आहेच! तुम्ही ही अपेक्षा कशाला पूर्ण करता? नंतर तक्रार करायची नाही मग!
मला त्या अपॆक्षेत मूर्ख पण
In reply to दुसर्याची अपेक्षा काहीही by रेवती
मला त्या अपॆक्षेत मूर्ख पण नाही वाटलं ,आणि त्या मुलीवर तेव्हा प्रेम असल्याने अपेक्षा पूर्ण केली होती
ईऽऽऽ
In reply to मला त्या अपॆक्षेत मूर्ख पण by वाल्मिक
ईऽऽऽ
मग आत्ताच भयानक अपेक्षा म्हणून का उल्लेख करताय.
भयानक ? मान्य
In reply to ईऽऽऽ by रेवती
भयानक ? मान्य
मूर्खपणा ? अमान्य
केस छातीवर पाहिजे ह्याचा अर्थ मुलातले पुरुषत्व बघायची कसोटी होऊ शकते हा तांत्रिक दृष्टिकोन ,पण कसोटी आगाऊ पानाची आहे
मुलीला चालायला बोलायला जुन्या काळी लावत होते कारण मुलगी पांगळी ,मूक आहे हे बघायला
???? बासच!
In reply to भयानक ? मान्य by वाल्मिक
????
बासच!
तुम्ही विनाकारण चिडत आहेत असे
In reply to ???? बासच! by रेवती
तुम्ही विनाकारण चिडत आहेत असे वाटत्ये
छे छे, चिडत नाहीये. हसायचे
In reply to तुम्ही विनाकारण चिडत आहेत असे by वाल्मिक
छे छे, चिडत नाहीये. हसायचे तरी किती एका दिवसात? बाकी तुमचे चालू द्या!
ह्या ह्या ह्या.. इकडे कुठे
In reply to छे छे, चिडत नाहीये. हसायचे by रेवती
ह्या ह्या ह्या.. इकडे कुठे गल्ली चुकलीस रेवाक्का?
चूक झाली. ;)
In reply to ह्या ह्या ह्या.. इकडे कुठे by स्रुजा
चूक झाली. ;)
:)
In reply to चूक झाली. ;) by रेवती
:)
:(
In reply to :) by स्मिता_१३
:(
कधीकधी मिपावर आहे की मुपीवर असा प्रश्न पडतो.
हा धागा त्या प्रकारचा आहे. महालोल धागा! ब्रम्ह्यांची लूना, ताम्हिणी घाटातला वाघ आणि सप्तर्षी बाईंच्या मांजरानंतर आता हे अजरामर होणार!
मुलींच्या बाबतीत नकार
मुलींच्या बाबतीत नकार द्यायलाही फनी कारणं देतात हं. चष्मा आहे ( भलेही मुलगी लेन्सेस असेल), गोरी हवी हे क्लास्सीक. आमची मुलगी सामान्य रंगाची आहे सांगितल्यावर सावळी,गहूवर्ण, गोरी का लख्ख गोरी असे चार पर्याय माझ्या वडिलांना दिले गेले होते. त्यामधून एक निवडा म्हणाले...
पण हे माझ्या लग्नाच्या वेळेस नव्वद च्या दशकात. आता काय परिस्थीति आहे हे माहीत नाही..
महालोल धागा
हहपुवा सेसा आणी महाभृंगराज
छाती उघडी टाकूनच मुलगी बघायला
छाती उघडी टाकूनच मुलगी बघायला जायला पाहीजे.
डोक्यावर केस नसले तरी चालतील? पण छातीवर पाहीजे...
ऊपर चांद का मकान,
In reply to छाती उघडी टाकूनच मुलगी बघायला by खटपट्या
ऊपर चांद का मकान,
नीचे बालोंकी दुकान
असे काहीतरी गाणे आठवले मला. ;)
अनिलकपूर नाहीय्ये यात.
मला जुना रणजीत नावाचा व्हीलन
In reply to ऊपर चांद का मकान, by अभ्या..
मला जुना रणजीत नावाचा व्हीलन आठवला. त्याने एका चित्रपटात लेदर जॅकेट घातले होते ज्यात फक्त छाती उघडी उघडी होती.
अमिताभ होता
In reply to ऊपर चांद का मकान, by अभ्या..
अमिताभ होता
नीचे फुलो की दुकान
In reply to ऊपर चांद का मकान, by अभ्या..
नीचे फुलो की दुकान
उपर गोरी का मकान
जब वो चौबारे से देखे
मेरा दिल हो बेईमान
-इति गोविंदा.
https://memegenerator.net
https://memegenerator.net/instance/53684358
अत्यंत केसाळ धागा! फार च
अत्यंत केसाळ धागा! फार च 'गुंतागुंत' आहे.
गाॅन केस धागा आहे!
In reply to अत्यंत केसाळ धागा! फार च by धनंजय माने
मोजी परत आले!
आता पर्यन्त एक डझन लोकांची
In reply to गाॅन केस धागा आहे! by बोका-ए-आझम
आता पर्यन्त एक डझन लोकांची आठवण मला पाहून आलीये
नशीब कोणी तात्या नाही म्हणाले
कायेक्की !
कायेक्की एकाची चप्पल दुसर्याला वापरता येते मात्र एकाचे अंतर्वस्त्र दुसर्याच्या मापाचे असले तरी काही कारणास्तव ते वापरता येत नाही. लग्नाच्या अनुभवांचे अगदी तस्सेच आहे. वरुन अनुभव एकसारखे दिसत असले तरी प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि युनिक असतो. तस्मात पास !
तरीही मार्गदर्शन हवेच असेल तर बाबा वाड्यावर या ! (निळु फुले स्टाईल)
बाबौ...काय ती उपमा =))
In reply to कायेक्की ! by धर्मराजमुटके
बाबौ...काय ती उपमा =))
उपमा ?
In reply to बाबौ...काय ती उपमा =)) by टवाळ कार्टा
उपमा की अतिशयोक्ती अलंकार ? कुणास ठाऊक ? मराठीच्या मॅडमला जाऊन विचारले पाहिजे परत एकदा !
काय हो.....शेवटचा प्रश्न कोणी विचारला होता ?
लग्नासाठी "आशाळभूत" लोकांनी "केसाळ भूत" कसं व्हावं हाच मूलभूत प्रश्न आहे !
तुम्हीही डोकं लढवून काहीतरी हटके अटी काढा आता....आम्ही मदत करू....
आपण ही अट नाही टाकू शकत ब्वा
In reply to काय हो.....शेवटचा प्रश्न कोणी विचारला होता ? by माम्लेदारचा पन्खा
आपण ही अट नाही टाकू शकत ब्वा
म्हणजे छातीवर केस असणारी
In reply to आपण ही अट नाही टाकू शकत ब्वा by वाल्मिक
म्हणजे छातीवर केस असणारी मुलगी हवीये??? बाबौ =))
या खुदा, उठा ले!
In reply to म्हणजे छातीवर केस असणारी by टवाळ कार्टा
या खुदा, उठा ले!
आमची पार्वती पाठवू का?
=)
In reply to या खुदा, उठा ले! by धनंजय माने
आमची पार्वती? =))
अशी ही बनवा बनावी बघा
In reply to =) by नावातकायआहे
अशी ही बनवा बनावी बघा
ते ज़रा चूक झाली,
In reply to =) by नावातकायआहे
ते ज़रा चूक झाली,
आम'चा' पार्वती पाठवू का असं हवं होतं.
- धनंजय माने
आमचा नाही
In reply to ते ज़रा चूक झाली, by धनंजय माने
आमचा नाही
"माझा बायको "
ही पब्लिक प्रॉपर्टी नाहीये हो
अरे अट आहे ती आहे पण ती पुरी
अरे अट आहे ती आहे पण ती पुरी होणार की नाही हे कसं कळणार? बघण्याच्या कार्यक्रमात मुलाला काय सलमान खान सारखं शर्ट काढुन नाचायला लावणार की काय?
माँट्रीमनी वर नेहमी सारखे
In reply to अरे अट आहे ती आहे पण ती पुरी by स्रुजा
माँट्रीमनी वर नेहमी सारखे बघायचे प्रोग्राम होत नसतात
मुले मुली सरळ जाऊन भेटता
कै सांग्तो
In reply to माँट्रीमनी वर नेहमी सारखे by वाल्मिक
कै सांग्तो
तू कै बोला ?
In reply to कै सांग्तो by टवाळ कार्टा
तू कै बोला ?
>>>माँट्रीमनी
In reply to माँट्रीमनी वर नेहमी सारखे by वाल्मिक
>>>माँट्रीमनी
मॉन्टेसरी म्हण त्यापेक्षा....
अन म्हणे माझं लगीन करायचं.
तुम्ही एकदा मॅट्रिमोनी वर फेर
In reply to >>>माँट्रीमनी by धनंजय माने
तुम्ही एकदा मॅट्रिमोनी वर फेर फटका माराच ,निम्म्या वर प्रोफिले मध्ये शुद्धलेखन नसतंच
टाका ला विचार पाहिजे तर
असो!
In reply to तुम्ही एकदा मॅट्रिमोनी वर फेर by वाल्मिक
असो!
नाही.
In reply to अरे अट आहे ती आहे पण ती पुरी by स्रुजा
सँपल देऊन डीएनए टेस्ट करणार बहुतेक! ;)
आज लग्नाचा बाजार उठतोय बहूतेक
आज लग्नाचा बाजार उठतोय बहूतेक. मिनिटाला प्रतिसाद हाय राव
महालोल धागा.
महालोल धागा.
८ मधल्या ७ अपेक्षांबद्दल कोणी फारसं बोलत नाही क्रं ८ ने मात्र बाजार उठवला. त्या पांढर्या कागदावर काढलेल्या काळ्यां टिंबाच्या गोष्टीची आठवण झाली.
त्याहून जास्त बाजार मी कोण
In reply to महालोल धागा. by राजाभाउ
त्याहून जास्त बाजार मी कोण ह्यावर उठलाय
मग एकदा सांगूनच टाका तुम्ही
In reply to त्याहून जास्त बाजार मी कोण by वाल्मिक
मग एकदा सांगूनच टाका तुम्ही कोण. नंतर म्हणाल "तो मी नव्हेच"
मी विजू खोटे
In reply to मग एकदा सांगूनच टाका तुम्ही by सुबोध खरे
मी विजू खोटे
परत परत तेच झाड पकडणारा ना?
In reply to मी विजू खोटे by वाल्मिक
परत परत तेच झाड पकडणारा ना?
अरे काय हे... कित्ती हसवालं..
अरे काय हे... कित्ती हसवालं....... तरी नशिब सर नाहियेत ऑफ्फीसमध्ये, नाहितत माझं काही खरं नव्हतं आज...
असा प्रकार झाला तर...
In reply to अरे काय हे... कित्ती हसवालं.. by गौतमी
असा प्रकार झाला तर...
आणि सर असते ऑफिसमध्ये...तर?
In reply to असा प्रकार झाला तर... by धनंजय माने
जरा सविस्तर सांगा की
माझ्या पाहण्यात आलेल्या काही मागण्या
माझ्या पाहण्यात आलेल्या काही मागण्या
१) मुलाचे स्वतःचे घर असावे पण होमलोन नसावे.
२) घरात आजेसासु, सासरे नसावेत कारण काय? तर हे लोक बेडरिडन होतात मग त्यांचे सगळे करावे लागते.
३) छातीवरच काय अंगावर केस नसावेत. असल्यास वॅक्सिंग करुन घ्यावे.
४) दर महिन्याला बाहेर फिरायला जावे. बाहेर म्हणजे शहरातल्या शहरात शॉपिंग, हॉटेलिंग नव्हे तर महाबळेश्वर, गोवा, उटी वगैरे ठिकाणी फिरायला जावे.
५) नवरा मुलगा घरातला मोठा मुलगा नसावा. कारणः सासु-सासर्यांनंतर सगळे कुळाचार करावे लागतील.
६) मुलगी सेंट्रल लाईन वर राहणारी असेल तर मुलगा पण सेंट्रलचाच हवा. कारणः माहेरी जाताना जास्त प्रवास करावा लागत नाही.
मुलींना सासू नकोय पण स्वतःचे
In reply to माझ्या पाहण्यात आलेल्या काही मागण्या by परिंदा
मुलींना सासू नकोय पण स्वतःचे आई वडील पाहिजे
मुलीच्या वडिलांना मात्र व्याही पाहिजेतच
मी असे पण बघितले की मुलीला शेती मध्ये काम करायचे नाही पण मुलगा शेती वाला पाहिजे
बाजारात फेरफटका मारला.
बाजारात फेरफटका मारला.

गरगरायला लागले...
शतकी धाग्यानिमित्त वाल्मिक
शतकी धाग्यानिमित्त वाल्मिक यांना एक मुंग्यांचे वारुळ, छातीवर लावायच्या केसांचा विग आणि एक नटराजाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे!
एक प्रेयसी फक्त पाहिजे हो
In reply to शतकी धाग्यानिमित्त वाल्मिक by धनंजय माने
एक प्रेयसी फक्त पाहिजे हो
ती पण आम्हीच द्यायची का?
In reply to एक प्रेयसी फक्त पाहिजे हो by वाल्मिक
ती पण आम्हीच द्यायची का?
ठीक, तीही देऊ. शबरी स्टाइल ने चालेल का?
शबरी स्टाइल ने !!!
In reply to ती पण आम्हीच द्यायची का? by धनंजय माने
शबरी स्टाइल ने !!!
विस मोड ऑन
हा शुद्ध अश्लील पण आहे
विस मोड ऑफ
ह.घ्या.
हा शुद्ध हलकट पण आहे माने
In reply to शबरी स्टाइल ने !!! by राजाभाउ
हा शुद्ध हलकट पण आहे माने
(आँखे छुपाऊवा बंदर का स्मायली)
In reply to ती पण आम्हीच द्यायची का? by धनंजय माने
इ सब का बकर हो राहैस भाईबा! उधर उ सबरीया स्वर्ग मा बेहोस हो गौवा!!
अब का बताइये ससुरा? वाल्मिक
In reply to (आँखे छुपाऊवा बंदर का स्मायली) by कैलासवासी सोन्याबापु
अब का बताइये ससुरा? वाल्मिक जो कही उ का उसे शोभा देत रही? ई कलजुग का वाल्मिक तो हमै भी कलजुग का सबर! कोनो फरक नाही पडत उ बुडबत का|
प्रेयसी पाहिजे का बायको
In reply to एक प्रेयसी फक्त पाहिजे हो by वाल्मिक
प्रेयसी पाहिजे का बायको पाहिजे ते नक्की करा.. :)
बायको मधेच प्रेयसी असते
In reply to प्रेयसी पाहिजे का बायको by मोहनराव
बायको मधेच प्रेयसी असते
बर्रर्र
In reply to बायको मधेच प्रेयसी असते by वाल्मिक
अजून कोणकोण असते ????
मॆत्रिण
In reply to बर्रर्र by स्वप्नज
मॆत्रिण
'छातीवर लावायच्या केसांचा विग
In reply to शतकी धाग्यानिमित्त वाल्मिक by धनंजय माने
'छातीवर लावायच्या केसांचा विग'
लोळुन लोळ!!
+११११
In reply to 'छातीवर लावायच्या केसांचा विग by मोहनराव
+११११
+१११११
In reply to 'छातीवर लावायच्या केसांचा विग by मोहनराव
पार मेलो.....
हल्ली हे काम तुम्ही घेतले का?
In reply to शतकी धाग्यानिमित्त वाल्मिक by धनंजय माने
हल्ली हे काम तुम्ही घेतले का?
ते नृत्यनागां वाचून खुर्चीतून
ते नृत्यनागां वाचून खुर्चीतून सांडलो.
त्यामुळेच पावसाळ्यात जास्त
In reply to ते नृत्यनागां वाचून खुर्चीतून by सूड
त्यामुळेच पावसाळ्यात जास्त बाहेरचे खाणे बरे नाही हो
ह्म्म्म
बाकी केस वाढवायचे उपाय ही उत्तम हो......सल्ल्यांचे दुकान टाकायला हरकत नाही.....
अवघड आहे
एका कोल्हापुरच्या मुलीने तर मला सॅलरी स्लीप अन इन्कम टॅक्स रिटर्न्स मागितले होते कारण तिला माझ्या उत्पन्नाची खात्री करुन घ्यायची होती. :)
पण
In reply to अवघड आहे by पामर
तुम्ही दिलीत का?
लोकं चक्क खोटं बोलतात
In reply to अवघड आहे by पामर
लोकं चक्क खोटं बोलतात मुलाच्या इन्कम बद्दल. खात्री करुन घेणे चुकीचे नाही. खात्री कशी करायची हे टॅक्टफुली ठरवावे ज्याने त्याने.
मुली कडचे पण बोलतात
In reply to लोकं चक्क खोटं बोलतात by स्रुजा
मुली कडचे पण बोलतात
एवढेच ?
एवढेच ?
गावाकडची मुलगी
MBA करून नोकरी नाही ,बापाच्या ओळखीचे HR लागली
सॅलरी स्लीप मागते ,कंपनीत फोन करते हा माणूस खरंच कामाला आहे का ,आणि साखरपुडा ठरवते मग परत तिचा रिकामटेकडा भाऊ येऊन कंपनी चेक करतो
यात चूक काय?
In reply to एवढेच ? by वाल्मिक
यात चूक काय?
बरोबर आहे कि मग.
In reply to एवढेच ? by वाल्मिक
बरोबर आहे कि मग.
उलट अशी सगळ बघुन, सवरुन निर्णय घेणारी मुलगी बायको म्हणुन मिळाली तर उत्तम संसार करेल की
साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी
In reply to बरोबर आहे कि मग. by राजाभाउ
साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी बघणार की नंतर ?
त्या वेळी मी सुट्टीवर असतो तर त्यांनी नकार कशावरून दिला नसता?
बरोबर आहे कि मग.
In reply to बरोबर आहे कि मग. by राजाभाउ
सहमत...
साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी
In reply to बरोबर आहे कि मग. by गंम्बा
साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी बघणार की नंतर ?
त्या वेळी मी सुट्टीवर असतो तर त्यांनी नकार कशावरून दिला नसता?