Skip to main content

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 22/06/2016 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे! ***************************************** तारीख - ३ जुलै,रविवार कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी वेळ- दुपारी बारा वाजता जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल. रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे. निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती! NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.

वाचने 92425
प्रतिक्रिया 382

प्रतिक्रिया

In reply to by पद्मावति

मोसाद, स्केअरक्रो, अंधारक्षण वगैरे कशालाच एवढे धपाधप प्रतिसाद नव्हते आले. आता यापुढे सगळे लेख बंद. फक्त कट्ट्यांचे धागे काढणार ;)

In reply to by बोका-ए-आझम

=))

३ जुलै ला वाशीत कांदे पोहे कम कॉफी पानाचा कार्यक्रम असल्याने कट्ट्याला धावती भेट जाणार. गाववाल्यानी कट्टा लावलाय जाना तो पडेगाचा....

सगळीकडे कट्टे होत आहेत... आपापल्या कट्ट्याचे वृत्तांत छायाचित्रांसहित सादर करून एक कट्टा विशेषांकच टाकावा महा कट्ट्यास शुभेच्छा... --- अश्याच एका कट्ट्याच्या अपेक्षेत

अरे वा, ठरणार म्हणता म्हणता कट्टा ठरला तर.. यायला आवडले असते तरीही २-३ जुलैलाच ट्रेक प्लॅन असल्याने ह्या कट्ट्याला मिसणार. जर रवीवारी संध्याकाळी असता तर कदाचीत ट्रेकवरून येता येता भेटता आले असते. कट्ट्याला शुभेच्छा.

मला सांगा प्रोफाइल एडिट कशी करायची. मी मिपा वर नवीन आहे, कळावे.

In reply to by कैलासवासी

मिपावर स्वागत, तुमच्या प्रोफाइल गेल्यावर संपादन म्हणून एक आयकॉन दिसेल त्यावर क्लीक केलं की तुम्हाला प्रोफाइल अपडेट करता येईल. पण तुमचा आयडी मात्र बदलता येणार नाही, त्यासाठी संमं शी संपर्क करा

In reply to by कैलासवासी

नका करू एडिट, इथे प्रतिसादावरून अन लेखनावरून तुमच्याविषयी मत बनवले जाते. सो चिल अँड कीप प्रतिसादिंग.

बोकोबा, डायल इन ऑप्शन आहे का रिमोट लोकांसाठी? कट्ट्याला शुभेच्छा!

मिपावर अभ्या म्हणाला तसे प्रतिसादावरून साचेबद्ध करण्याचे भिकारडे प्रकार खूप झेलले आहेत त्यामुळे भाऊगर्दीत यायची इच्छा नाही , कदीमदी मुंबईला आलो तर खास तुम्हाला भेटायला म्हणून फोन किंवा व्यनि करून येईन बोक्याभाऊ (तुम्हाला चालणार असेल तर)! तसेच मिपावर जे काही चारपाच चांगले मित्र घावले आहेत त्यांनाही असेच भेटेन म्हणतो

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापूसाब जवा येईल तव्हा आपण शुअर असणार म्हमैला. आणि सोलापुरात तर घरच हाय त्याचं.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

खास व-हाडी शिव्या पडतील मुंबईला येऊन भेटायला नाही आलात तर! यायचंच. That goes without saying.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चालत असेल तर? ये भी क्या बात हुई? अस्सल व-हाडी शिव्या पडतील मुंबईत येऊन घरी नाही आलात तर!

कशाला बाहेर चरायचं अन् पोटाला घोर लावायचा इकतचा, उगं बसावं की घरी हरी हरी करित. इच्छा आहे, पण पैशे किती ? २०० त भागंल का?

सर्व मिपाकरांना नमस्कार, मी मिपाचा खूप दिवसांपासून सदस्य आहे. सदस्य असलो तरी फक्त वाचनमात्र आहे. नव्या मुंबईत कट्टा होतोय वाचून आनंद झाला. कट्ट्यासाठी "नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन" (NMSA) वाशी हे ठिकाण सुचवू इच्छितो. ऐसपैस जागा, खाण्यापिण्याची सर्व सोय, पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. मी येथील सदस्य असल्याने कट्ट्यास परवानगी मिळेल. आयोजकांशी संपर्क कसा साधावा ते माहीत नाही. माझा नंबर देत आहे : विलास पाटील - 9323245857.

मी आणि स्वीट टॉकर येणार आहोत. पुण्यापासून गाडी. आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तीन जणा/जणींचं स्वागत आहे.

In reply to by स्वीट टॉकरीणबाई

आम्ही ४ जनी तर फिक्स आहोत yenaryat.पण इतके लोक नाही मैनेज होणार गाडीत.आम्ही दुसऱ्या गाड़ी ने येवू. पुण्यातून कोणत्या एरियातून nighnar आहात.

येण्याचा प्रयत्न करीन आत्ताच फायनल सांगता येत नाही कट्ट्यास शुभेच्छा

In reply to by अजया

पुणेकरांची सवय लागली काय बृहन्मुम्बई आणि रायगड वाल्यांना??? याचे २०० झाले की दुसरा धागा येऊ दे. मौक़ा भी हाउ दस्तूर भी!

In reply to by धनंजय माने

ओ माने, पुणेकरांना कट्ट्याचे ठिकाण ठरवायला ३ धागे लागतात...इथे तारिख, जागा आणि वेळ याबाबत कोणाचे नखरे नाहित

मी पण येतोय. कळंबोलीवरुन यायला जेमतेम पाऊण तास लागेल. अर्थातच काही काम आले तर मात्र येता येणार नाही..

रविवारी सगळीकडेच गर्दी असते. इन ऑर्बिट मध्ये तर फारच. मी येतेय नक्की.

In reply to by कवितानागेश

कट्ट्याचे ठिकाण अपडेट केले आहे.आता नो गर्दी! श्री पाटील यांच्यामुळे आपल्याला नवी मुंबई स्पोर्टस् असो.मध्ये निवांत कट्टा करता येणार आहे.