Skip to main content

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)

लेखक गॅरी ट्रुमन यांनी बुधवार, 09/03/2016 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक या आधीच्या धाग्यावर १६० पेक्षा जास्त प्रतिसाद आले आहेत. त्यामुळे भविष्यात चर्चा वाचणे सोयीचे व्हावे या उद्देशाने हा नवा धागा काढत आहे. त्या धाग्यात उल्लेख झालेल्या मुद्द्यांवर काही मते मांडायची असतील तर त्या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत आणि नवे मुद्दे या धाग्यावर मांडावेत ही विनंती. गरज भासल्यास तिसरा धागाही भविष्यात काढेन. तसेच भारतातल्या निवडणुकांप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी स़काळपासून निकाल पोस्ट करायचाही मानस आहे. तसेच भारतातल्या निवडणुकांच्या वेळी प्रश्नमंजुषा सुरू केली होती त्याप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांसाठीही प्रश्नमंजुषा मिपावर काढायचा मानस आहे. त्यासाठी प्रश्न बनविणे सुरूही केले आहे. प्रश्न साधारणपणे जून-जुलैपासून पोस्ट करेन. भारतातल्या निवडणुकांप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये तितक्या प्रमाणात सर्वच मिपाकरांना रस असेल असे नाही.तरीही मराठी आंतरजालावर या निवडणुकांसाठी जितकी होईल तितकी परिपूर्ण माहिती केवळ आपल्या मिपावर असावी या उद्देशाने हे काम तसे लवकरच हाती घेतले आहे. मिशिगन आणि मिसिसीपीमध्ये दोन्ही पक्षांच्या तर आयडॅहो आणि हवाईमध्ये केवळ रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरी मंगळवारी झाल्या.त्यातील काही निकाल आले आहेत.ते थोड्या वेळेत इथे प्रतिसादात पोस्ट करेन. क.लो.अ गॅरी ट्रुमन यापूर्वीचे लेखनः अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक

वाचने 66530
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by गॅरी ट्रुमन

याच बुश यांनी मुशर्रफ यांनाही जवळ केले होते. पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी प्रचंड पैसा त्यांच्याच काळात दिला गेला. तो कुठे खर्च होतोय, याकडे मात्र लक्ष नव्हते. पुढे ओबामांच्या काळात केरी- लुगर बिलाने त्यावर नियंत्रण आले.

In reply to by गॅरी ट्रुमन

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की बुश अमेरिकेसाठी आणि इतर जगासाठी कसेही असले तरी भारतासाठी ते चांगले असतील तर भारतातील सरकारला आणि सामान्य नागरिकांना बुशविषयी अधिक आत्मीयता वाटली तर त्यात फार काही चूक आहे असे मला तरी वाटत नाही. अगदी पूर्णपणे सहमत. तसा असण्यात गैर काहीच नाही. पण म्हणून बूश काही चांगला राज्यकर्ता ठरत नाही. याच अर्थाने वरील कुठल्यातरी प्रतिसादात मॅकेन बद्दल पण आले होते. ओबामा विरुद्ध मॅकेनच्या लढतीच्या वेळेस अनेकांनी ओबामाच्या काश्मिर धोरणावरून साशंकता व्यक्त करत मॅकेनला पाठींबा दिला होता. त्या अर्थाने तो योग्य देखील होता. पण माझा मुद्दा किंचीत वेगळा आहे. बुश अथवा नंतर ओबामा या दोघांनीही भारताशी असलेले संबंध वृध्दींगतच केले आहेत. केरी हे काही भारताचे सुहृद म्हणता येतील असे नाहीत तरी देखील आजच आलेल्या बातमीनुसार स्टेट डिपार्टेमेंटने पाकीस्तानला सुनावले आहे. मोदी समर्थक म्हणून विचार करायचा झाला तर बुशच्या काळात मोदींचा व्हिसा रद्द केला गेला होता तर ओबामाच्या काळात (आता) पायघड्या घालण्यात येणार आहेत... हे कशामुळे होते? अर्थातच कृशे कशास्ती सौहृदम न्यायाने दुर्बळाला मित्र नसतो पण जसे आपण आपले स्थान बळकट करतो तसे आपल्या बाजूने सगळे होत जातात. तेंव्हा अमेरीकेतला राष्ट्राध्य़क्ष कोण होणार या पेक्षा आपण कोण होत आहोत हे महत्वाचे आहे. हे केवळ तात्विक अर्थाने म्हणत नाही तर व्यावहारीक अर्थाने म्हणत आहे. म्हणूनच केवळ अमेरीकेवर भर देणे योग्य नाही हे मोदी जाणून आहेत आणि एकीकडे या एकमेव महासत्तेशी मैत्री करत असताना जगात इतरत्र आपले बस्तान बसवत आहेत.

मल्ल्या आणि ट्रंपची तुलना हास्यास्पद आहे. (राहुल गांधी आणि ट्रंपची तर दखलही न घ्यावी इतकी हास्यास्पद आहे.) मल्ल्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. कोर्टाने त्याच्याविरुद्ध जप्तीची नोटीस काढली आहे. ब्रिटनसरकारकडे हस्तांतराची मागणी केलेली आहे. ह्यापैकी कुठली गोष्ट ट्रंपबाबत केली आहे? उद्योग बुडीत गेले असतील. १००% यशस्वी उद्योजक असल्याचा त्याने दावा केलेला नाही. टक्केटोणपे खात त्याची कारकीर्द चालली असेल तर माझी काही हरकत नाही. उद्योगात निर्भेळ यश मिळवणारे दुर्मिळच असतात. बाकीचे राजकारणी मेक्सिकोतून होणार्‍या घुसखोरीविरुद्ध चकार शब्द काढणे हे आपल्या पुरोगामीत्वाला काळिमा फासणे समजतात. एखाद्या देशात प्रवेश करताना तिथले कायदे मोडणे हे कसे समर्थनीय आहे हे माझ्या आकलनाबाहेर आहे. ट्रंपने त्याविरुद्ध आवाज उठवताच त्याला वर्णद्वेष्टा, वंशद्वेष्टा अशी खास ठेवणीतली दूषणे दिली जातात. बेकायदा कृत्याला विरोध करणे हे चूक का आहे? मुस्लिम इमिग्रेशनबद्दल ट्रंप नक्की काय म्हणाला होता हे जाणायची तसदी घेतली आहे का? तमाम माध्यमांनी नवा हिटलर जन्माला आला की काय अशा थाटात राळ उडवली आहे. पण तो इतके भयंकर बोलला का? आजिबात नाही. ट्रंप हा समस्त स्त्री जातीच्या विरोधात आहे हा एक असाच लाडका, माध्यमांनी पोसलेला गैरसमज. त्याने एखाद्या स्त्रीबद्दल गैर उद्गार काढले तर त्यामुळे तो तमाम स्त्रीवर्गाशी असाच वागतो हे कसे ठरवले? अमेरिकन लोक जाणते, प्रगल्भ आहेत असे वाटत नाही. मूर्ख, अज्ञानी लोक प्रचंड संख्येने आहेत (डावे, उजवे दोन्ही बाजूला). बुशला दोनदा निवडून देणारे अमेरिकनच होते. पण आठ वर्षांनी निदान डेमोक्रॅटिक पक्षाचा कंटाळा आला म्हणून दुसर्‍या बाजूला चान्स मिळेल ही आशा. देव करो आणि हिलरीची पीडा टळो!

In reply to by हुप्प्या

१००% यशस्वी उद्योजक असल्याचा त्याने दावा केलेला नाही.
खरंच? ट्रम्पच्या अनेक भाषणांत तर याच्या उलट चित्र दिसतं.
बाकीचे राजकारणी मेक्सिकोतून होणार्‍या घुसखोरीविरुद्ध चकार शब्द काढणे हे आपल्या पुरोगामीत्वाला काळिमा फासणे समजतात. एखाद्या देशात प्रवेश करताना तिथले कायदे मोडणे हे कसे समर्थनीय आहे हे माझ्या आकलनाबाहेर आहे. ट्रंपने त्याविरुद्ध आवाज उठवताच त्याला वर्णद्वेष्टा, वंशद्वेष्टा अशी खास ठेवणीतली दूषणे दिली जातात. बेकायदा कृत्याला विरोध करणे हे चूक का आहे?
गेल्या आठ वर्षांत २० लाखाहून अधिक बेकायदेशीर निर्वासितांना देशाबाहेर पाठवलं गेलं. सीमेवर तैनात असलेल्या बॉर्डर पेट्रोल एजंट्सची संख्या ही आजमितीस सर्वाधिक आहे. २०१३ मध्ये, सिनेटने (रिपब्लिकन्स + डेमोक्रॅट्स असे ६८ सिनेटर्स मिळून) कॉम्प्रिहेन्सिव्ह इमिग्रेशन रिफॉर्म पास केला तेव्हा दोन्ही बाजूंच्या सिनेटर्सची वक्तव्यं ऐकायला हवी होती. मेक्सिकोतून होणारी घुसखोरी ही बेकायदेशीर असून ती रोखायला हवी, याच मंगलाचरणाने सुरूवात करून ओबामानेही या रिफॉर्मवरील चर्चेला तोंड फोडलं होतं, आणि त्यात सीमेवरील सुरक्षा अधिक वाढवण्यासाठी तरतूदही होती. (रिपब्लिकन बहुसंख्या असलेल्या हाऊसने हा रिफॉर्म काही कडव्या मेंबरांच्या आग्रहामुळे साध्या चर्चेसही घेतला नाही.) याचा अर्थ, सारं काही आलबेल आहे असं नव्हे - पण याविरुद्ध कुणी चकार शब्द काढत नाही वा पुरोगामी त्याच्या आड येतात, किंवा ट्रम्प हाच याविरुद्ध आवाज उठवणारा कुणी क्रांतिकारी आहे (असं तुम्ही म्हटलेलं नाही, पण अनेक ट्रम्पसमर्थकांचा दावा आहे) हा जावईशोध झाला. शिवाय, इल्लिगल इमिग्रंट्स हे केवळ मेक्सिकोतून येत नाहीत. क्युबातून येणारे निर्वासित आहेतच (ज्यांना 'पॉलिटिकल असायलम' म्हणून स्वीकारलं जातं), पण 'टूरिस्ट व्हिसा' घेऊन येणारे आणि त्याची मुदत संपली तरी इथेच राहणारे इल्लिगल इमिग्रंट्स मोठ्या संख्येने आहेत. विशेषतः इस्ट कोस्टवर, या पद्धतीने, फिलिपिनो कुशल/अकुशल कामगार पुरवठ्याची सुनियोजित साखळी अस्तित्वात आहे. (आपल्याच शेजारी राज्यातून वा उत्तरेतूनही, हा मार्ग चोखाळून आलेले आणि इथे इल्लिगली राहिलेले लोकही आहेत.) भिंत बांधून यांची विमानं कशी अडवणार? दुसरं म्हणजे, हे इल्लिगल इमिग्रेशन बरीच दशकं चालू असल्याने, कित्येकांची पुढली पिढी अमेरिकेत जन्मली - शिकली - सैन्यात वा अन्यत्र नोकरी करू लागली. अमेरिकन भूमीवर जन्म झाल्याने त्यांना नागरिकत्व बहाल करायचं की त्यांच्या पालकांनी वीस-तीस वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा त्यांना देऊन, त्यांना हाकलून लावायचं - या दोन टोकाच्या भूमिका झाल्या. थोडक्यात, इल्लिगल इमिग्रेशनच्या प्रश्नाला अनेक पैलू आहेत. ट्रंपवर होणारी टीका ही 'मेक्सिकोतून इथे येणारे लोक हे बहुसंख्येने गुन्हेगार, रेपिस्ट्स असतात' यासारख्या विधानांमुळे होते आहे, इल्लिगल इमिग्रेशनबद्दल तर १७ पैकी प्रत्येक रिपब्लिकन उमेदवार बोंबा मारत होता की.
ट्रंप हा समस्त स्त्री जातीच्या विरोधात आहे हा एक असाच लाडका, माध्यमांनी पोसलेला गैरसमज. त्याने एखाद्या स्त्रीबद्दल गैर उद्गार काढले तर त्यामुळे तो तमाम स्त्रीवर्गाशी असाच वागतो हे कसे ठरवले?
एखादी स्त्री? रोझी ओ'डनेल, मेगन केली, हिलरी क्लिंटन, हायडी क्रुझ (टेड क्रुझची पत्नी), कार्ली फिओरिना अशी उज्ज्वल परंपरा आहे की अलीकडची. शिवाय गर्भपाताबद्दल स्त्रियांना शिक्षा व्हायला हवी, हेही आहेच. (नंतरचं खास राजकारणी घूमजावही मजेदार होतं). अर्थात, अशा बेलगामी विधानालाही वैट्ट, वैट्ट, दूश्ट मीडियाच कारणीभूत असेल ना? पण, ट्रम्प हा स्त्रीद्वेष्टा किंवा स्त्रीजातीच्या विरोधात आहे, असं मलाही वाटत नाही - तो कुणाबद्दलही जेंडर-न्यूट्रल गैरउद्गार काढू शकतो! :)

In reply to by नंदन

इल्लीगल इमिग्रंट्स हे अनेक सीनेटर्स आणि काँग्रेसमन्सच्याच आशीर्वादाने शेतीशी संबंधित आणि अन्नौद्योगाशी संबंधित उद्योगधंद्यांमध्येच अतिशय स्वतातले अकुशल कामगार म्हणून राबवले जातात हे सत्य आहे. इथल्या मिनिमम पे रेटने हे कामगार लीगली आणायचे म्हंटले तर अमेरिकेतले उरलेलेही सगळे छोटेमोठे उद्योग बाहेर हाकलून लावायची वेळ येईल अशी परिस्थिती आहे. कोणी कितीही बोंबा मारल्या तरी लोक येत राहणार त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कॄप्त्या लढवून भाषणबाजी होत राहणार यापेक्षा जास्ती काही शक्य आहे असे दिसत नाही. आणि याला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स दोघेही जबाबदार आहेत. हा ट्रंप नुसता दिसला तरी माझी तळपायाची आग मस्तकाला जाते बुवा! :( (अवांतर - कधी नव्हे ते चक्क नंदनलाही, प्रतिसाद का होईना, लिहिण्यास भाग पाडले म्हणजे हा ट्रंप किती डोक्यात जात असेल बघा!! ;) )

In reply to by चतुरंग

घुसखोरी थांबव़ली तर अमेरिकन अर्थव्यवस्था रसातळाला जाईल हा एक बिनबुडाचा जावईशोध आहे. तसे काहीही होणार नाही. दर वर्षी लाखो बेकायदा लोक घुसतात. आणि ते अमेरिकेतच रहातात. शेतकामगारांची गरज ही अशी नित्य वाढती आहे का? कामाकरता व्हिसा मिळवणे सोपे करावे इतके अमेरिकन सरकारला करणे शक्य नाही का? केवळ घुसखोरीचाच पर्याय उपलब्ध आहे हा गोड गैरसमज माध्यमांनी जोपासलेला आहे. ट्रंपला अकारण एक काळाकुट्ट खलनायक म्हणून रंगवले जात आहे. बेकायदा घुसखोरीबद्दल आक्रमक असणे मला तरी आवडते. अशा बेकायदा कृत्याला डोक्यावर घेऊन कौतुकाने नाचले की माझी तळपायाची आग मस्तकात जाते बुवा!

In reply to by हुप्प्या

आहे असं कोण म्हणालंय? त्याबद्दल आक्रमक असू नये असेही म्हणणे नाही. परंतु घुसखोरी आणि त्याविरुद्ध यंव करु अन त्यंव करु अशी टोकाची भूमिका घेणे यांच्यापासून सद्यस्थिती ही कोसो दूर असली तर शहाणा माणूस विचार करेल ना की बाबा हे आरडाओरड करताहेत तसं खरंच शक्य आहे का? का यात राजकारण जास्त आणि प्रत्यक्ष कार्यवाही नाममात्र असे असणार आहे? मी वरती म्हंटलेच आहे की याला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत त्यामुळे वरकरणी वाटते त्यापेक्षा या प्रश्नाची पाळेमुळे भलतीच खोल गेलेली आहेत. असो यापेक्षा जास्त चर्चा शक्य नाहीये मला.

In reply to by नंदन

>>एखादी स्त्री? रोझी ओ'डनेल, मेगन केली, हिलरी क्लिंटन, हायडी क्रुझ (टेड क्रुझची पत्नी), कार्ली फिओरिना अशी उज्ज्वल परंपरा आहे की अलीकडची. शिवाय गर्भपाताबद्दल स्त्रियांना शिक्षा व्हायला हवी, हेही आहेच. (नंतरचं खास राजकारणी घूमजावही मजेदार होतं). अर्थात, अशा बेलगामी विधानालाही वैट्ट, वैट्ट, दूश्ट मीडियाच कारणीभूत असेल ना? टेड क्रुझने ट्रंपच्या बायकोचा उत्तान फोटो प्रकाशित केला होता. रोझी आणि ट्रंपचे जुने वैर आहे. (रोझीला स्त्री म्हणावे का नाही हा वादाचा विषय आहे. पण ते जाऊ द्या!) हिलरीबद्दल स्त्री म्हणून काय अनुदार उद्गार काढले आहेत? ही यादी तमाम स्त्रीवर्गाचे प्रतिनिधित्व करते का? गर्भपाताबद्दलचे विधान मागे घेतले आहे. तेवढे माझ्या लेखी पुरे आहे. ज्या प्रकारे ख्रिस मॅथ्युजने ट्रंपकडून वदवून घेतले होते ते पहाता ते ट्रंपचे खरे मत नव्हते असे माझे मत आहे. इलिगल इमिग्रेशनबद्दल खणखणीत आवाजात बोलणारा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा माझ्या आठवणीत ट्रंप हाच आहे. बाकी लोक बोलतात ते एक उपचार म्हणून बोलतात. बहुतेक वेळा बेकायदा लोकांना कायदेशीर बनवण्यापूर्वी एक बोलाचीच कढी बोलाचाच भात इतपत बेकायदा घुसखोरीला विरोधी बोलतात. बाकी मार्गाने बेकायदा इमिग्रेशन होते म्हणून मेक्सिकोतून होणारेही गोड माना हा काय मूर्खपणा आहे? कुठूनही बेकायदा स्थलांतर होता कामा नये. मेक्सिकोतून बेकायदा घुसणार्‍यात अगदी १ टक्का जरी गुन्हेगार असतील तरी ते अनिष्टच आहे. अमेरिकेत पुरेसे गुन्हेगार असताना ही आणखी विकतची डोकेदुखी कशाला हवी आहे? मेक्सिकन सरकारला त्यांची डोकेदुखी संभाळू दे. शिवाय सॅक्चुअरी सिटी सारखे विकृत प्रकार सॅन फ्रॅन्सिस्कोत बनले आहेत जे इमिग्रेशनच्या कायद्याला सरळसरळ धाब्यावर बसवतात. गेल्या वर्षी सॅन फ्रॅन्सिस्कोत अशा घुसखोर गुन्हेगाराने एका निरपराध तरूण स्त्रीला गोळी घालून मारले. तिच्या आईबापासमोर बेकायदा घुसखोरीचे समर्थन करता येते का पहा! मेक्सिकोतून येणारे घुसखोर हे काही हार्ट सर्जन, ब्रेन सर्जन, नॅनो टेक्नोलॉजी तज्ञ असे नसतात. अशिक्षित, अर्धशिक्षित, हातावर पोट असणारे लोकच अमेरिकेत बेकायदा घुसतात. अशा लोकांना पोसायची जबाबदारी अमेरिकेवर का?

In reply to by हुप्प्या

बाकी मार्गाने बेकायदा इमिग्रेशन होते म्हणून मेक्सिकोतून होणारेही गोड माना हा काय मूर्खपणा आहे? कुठूनही बेकायदा स्थलांतर होता कामा नये.
मी असं विधान कुठं केलंय? असो, चर्चा आता ताशेरेबाजीवर उतरली असल्याने माझ्याकडून पूर्णविराम.

In reply to by हुप्प्या

पण आठ वर्षांनी निदान डेमोक्रॅटिक पक्षाचा कंटाळा आला म्हणून दुसर्‍या बाजूला चान्स मिळेल ही आशा. इतका मनस्ताप होण्याचे कारण कळेल का?

रॉनाल्ड रेगन यांनी १९८० मध्ये मेक्सिकन घुसखोरांविषयी काय म्हटले होते याविषयीचा एक अ‍ॅन्करींग पॉईंट मिळावा म्हणून हा व्हिडिओ डकवत आहे. रेगनही त्याच रिपब्लिकन पक्षाचे आणि दोन सलग टर्म अध्यक्ष होते (१९८१ ते १९८९) आणि अत्यंत लोकप्रियही होते.

जज Gonzalo P. Curiel - जन्म - इस्ट शिकागो, इंडियाना राज्य, इ. स. १९५३ शिक्षण - बी.ए. + Juris Doctor, इंडियाना युनिव्हर्सिटी, इ. स. १९७९ अनुभव - १९७९ ते १९८९ - प्रायव्हेट प्रॅक्टिस १९८९ ते २००६ - असिस्टंट यू.एस. अ‍ॅटर्नी, कॅलिफोर्निया (*१९८९ साली व्हाईट हाऊस आणि कॅलिफोर्नियाचं गव्हर्नरपद रिपब्लिकनांकडे होतं.) २००६ ते २०१२१ - जज ऑफ सुपिरियर कोर्ट, सॅन डिएगो, कॅलिफोर्निया (*२००६ साली व्हाईट हाऊस आणि कॅलिफोर्नियाचं गव्हर्नरपद रिपब्लिकनांकडे होतं.) २०१२ ते आतापर्यंत - जज, यू.एस. डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ सदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्निया (*यू.एस. सिनेट ज्युडिशियरी कमिटी आणि संपूर्ण सिनेटकडून मान्यता) . . . गेली सहा वर्षं (२०१० पासून - म्हणजे ट्रम्पने अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचं ठरवलं, त्याच्या कितीतरी आधी), ट्रम्प युनिव्हर्सिटीच्या विरोधात खटला चालू आहे. या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीतून ट्रम्पने भरपूर फी घेऊन ($३५,००० च्या घरात), त्या बदल्यात जाहिरात केलेल्या गोष्टी/कोर्सेस शिकवले नाहीत, असं त्याचं स्वरूप आहे. सध्या ही केस जज गोन्झालो क्युरिअल यांच्यासमोर असून, तिची सुनावणी नोव्हेंबरमध्ये (२०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर) आहे. आज सॅन डिएगो शहरात एका सभेत बोलताना, ट्रम्पने जज क्युरिअल यांच्याबद्दल खालील भाष्य केलं:
Trump leveled a series of blows against Curiel. He called him “a hater of Donald Trump” and “very hostile” person who had “railroaded” him.....“I think Judge Curiel should be ashamed of himself. I think it’s a disgrace that he’s doing this.” Trump brought up Curiel’s ethnicity: “The judge, who happens to be, we believe, Mexican…

डॉनल्ड ट्रम्प एका अर्थी आतापर्यंतच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांपेक्षा वेगळे आहेत. रिपब्लिकन पक्ष हा "फ्री मार्केट" वाला म्हणजे उजवा पक्ष समजला जातो. रॉनाल्ड रेगन अशा उजव्यांपैकी सर्वात आघाडीचे अध्यक्ष होते असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक विजेते मिल्टन फ्रिडमन हे एकंदरीतच रिपब्लिकन पक्षाच्या जवळचे समजले जात. याचे कारण मिल्टन फ्रिडमन हे "फ्री मार्केट" चे आघाडीचे पुरस्कर्ते होते. युट्यूबवर कोणीतरी डॉनल्ड ट्रम्प यांनी परदेशांशी केलेल्या व्यापाराविरूध्द एका मुलाखतीत काय बोलले आहे आणि नेमक्या त्याच मुद्द्यांवर मिल्टन फ्रिडमन यांनी काय म्हटले आहे याचा खाली दिलेला व्हिडिओ बनविला आहे: १. ट्रम्प म्हणत आहेत की ते अध्यक्ष झाल्यास परदेशातून आयात केलेल्या मालावर आयातकर लावतील. त्यावर फ्रिडमन म्हणतात-- ट्रेड डेफिसिट ही वाईट गोष्ट अजिबात नाही. फ्रिडमनच्या काळात जपानचा प्रचंड ट्रेड सरप्लस होता. पण जपानने अमेरिकेत निर्यात करून जमा केलेले डॉलर जमा करून त्याचा उपयोग काय केला? तर अमेरिकेतच शेअर/प्रॉपर्टी विकत घेतली. ते वाईट कसे? फ्रिडमनच्या मते फ्री ट्रेड "benefits large group at the expense of small group. However small group is always politically more influential". २. ट्रम्प परत चीनमधून आयात केलेल्या मालावर आयातकर लावतील असे म्हटले. त्यावर फ्रिडमन म्हणतात की लोकांचा फ्री ट्रेडला विरोध का करतात? त्याचे एक कारण म्हणजे उत्पादकांचा दबाव असतोच पण त्याचबरोबर दोन देशांमधील चलनांच्या Floating Exchange Rate चा नक्की काय परिणाम होईल हे बहुसंख्य लोकांना समजत नाही. तसेच फ्रिडमनने म्हटले आहे की जपानचा ट्रेड सरप्लस जास्त का? कारण जपानचा saving rate अमेरिकेपेक्षा जास्त आहे. आणि एवढ्या सेव्हिंगचे पुढे काय करायचे? तर त्यातून निर्यात वाढते. अर्थातच मिल्टन फ्रिडमन म्हणत आहेत ते एक अर्थशास्त्रीय तथ्य आहे. फ्रिडमनने पुढे हेनरी जॉर्ज या अभ्यासकाने फ्री ट्रेडविषयीचे मत मांडले---"It is a very interesting thing in time of war we blocade our enemies in order to prevent them getting goods from us. In time of peace, we do it to ourselves by tarrif what we do to ourselves in peace what we do to our enemies at the time of war" आणि अर्थातच डॉनल्ड ट्रम्प यांचे आताचे धोरण रिपब्लिकन पक्षाच्या धोरणापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने डॉनल्ड ट्रम्प यांना हर्बर्ट हूव्हर (१९२९ ते १९३३ या काळातील अध्यक्ष) यांच्यानंतर फ्री ट्रेडच्या सर्वात जास्त विरोधात असलेला अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार असे म्हटले आहे. तसेच मेक्सिकन घुसखोरांविषयी मिल्टन फ्रिडमन (आणि वर दिलेल्या व्हिडिओत रॉनाल्ड रेगन) यांच्या मताच्या पूर्ण वेगळे मत ट्रम्प यांचे आहे. फ्रिडमन म्हणतात की immigration नोकरीसाठी होणे आणि वेलफेअरसाठी होणे (सोशल सेक्युरिटी इत्यादी) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर मेक्सिकन घुसखोर अवैधपणे येत असतील तर त्यांना वेलफेअर नक्कीच मिळणार नाही आणि अमेरिकन लोक जी कामे ज्या पगारावर करायला कधीच तयार होणार नाहीत त्या गोष्टी हे मेक्सिकन लोक करतात. त्यातून त्या लोकांचे आणि अमेरिकेतील लोकांचेही हितच होते. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे immigration जर बेकायदा असेल तरच ही गोष्ट फायदेशीर ठरेल. जर का त्या लोकांना सोशल सेक्युरिटी आणि तत्सम फायदे मिळायला लागले तर ते फायदेशीर ठरणार नाही. एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर फ्रिडमन यांनी उत्तर दिले---हे मेक्सिकन लोक अमेरिकेत यायला इतकी धडपड करतात याचाच अर्थ त्यांना तिथे मिळेल त्यापेक्षा अधिक चांगले जीवन अमेरिकेत जगायला मिळेल ही खात्री आहे. आणि अमेरिकेत जा म्हणून त्यांच्यावर कोणी सक्ती केलेली नाही. त्यांच्यापुढे मेक्सिकोत राहणे आणि अमेरिकेत जाणे हे दोन पर्याय आहेत. त्यापैकी त्यांच्या मते चांगल्या पर्यायाची ते निवड करतात. बेकायदापणे घुसखोरी करणे हा पण फार चांगला पर्याय आहे असे नाही पण तो मेक्सिकोत राहण्यापेक्षा अधिक चांगला आहे (म्हणूनच ते अमेरिकेत जायला धडपडत असतात). आणखी दुसरा मुद्दा म्हणजे अमेरिकन लोकांच्या पूर्वजांनी युरोपातून immigration केल्यानंतर ज्या आव्हानांना तोंड दिले त्याच टप्प्यातून मेक्सिकोतून आलेले लोक जात आहेत. याविषयी पुढील व्हिडिओ रोचक ठरेल. साधारण तीन मिनिटांनंतर हे सगळे मुद्दे येतील. म्हणजे डॉनल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाची आतापर्यंतची भूमिका होती त्यापेक्षा वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या पारंपारिक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हायची शक्यता नक्कीच आहे. आणि त्यामुळे डेमॉक्रॅटिक पक्षाचे काही मतदार रिपब्लिकन पक्षाच्या बाजूला वळतील ही पण शक्यता आहे. आणि डॉनल्ड ट्रम्प यांच्या रॅश पध्दतीमुळे काही रिपब्लिकन मतदार डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूला वळतील ही पण शक्यता आहेच. एकूणच ही निवडणूक रोचक होणार आहे हे नक्कीच.

In reply to by गॅरी ट्रुमन

Dportation वरील आलेख हा होमलँड सिक्युरीटीच्या अधिकृत विदाचा वापर करून Pew Research Center ने तयार केला आहे. जरी आलेख हा सुस्पष्ट असला तरी, थोडक्यात - ओबामाच्या काळात सर्वाधिक बेकायदेशीर घुसखोरांना परत पाठवले गेले आहे. म्हणून त्यांना उपरोधाने, "डिपोर्टर-इन-चीफ" असे म्हणू लागले आणि लॅटीनो समाजात त्यांच्याबद्दल नाराजी तयार झाली होती. पण ओबामाने त्याला भिक घातलेली नाही. तेच ओबामाने दहशतवाद्यांना मारण्याच्या बाबतीत केलेले आहे, अगदी परदेशी सीमेच्या आत हल्ले करून, जे बुश सरकारने पण केलेले नव्हते (अर्थात जाहीर युद्ध सोडून). मला वाटत नाही की तुमचा तसा उद्देश असावा, पण ट्रम्प हे एकोहं द्वितियोनास्ती आहेत. ;) (एकमेवाद्वितीय अर्थाने नाही!) मेक्सिकन जज संबंधात वर नंदन ने आधी लिहीले आहेच. सध्या त्याच प्रकरणावरून म्हणजे ट्रंप विद्यापिठातील गैरव्यवहारावरून ज्यांच्या अख्त्यारीत हे प्रकरण चालवले जात आहे त्या न्यायमुर्ती गोन्झॅलो क्युरिएल यांना ट्रंप मेक्सिकन म्हणून हिणावत आहेत. थोडक्यात ट्रंप हे काही केवळ बेकायदेशीर घुसखोरांना विरोध करत नसून वांशिकतेला पण खतपाणि घालत आहेत. गेल्या आठवड्यातील कॅलिफोर्नियातील एका सभेत तेच त्यांनी एका कृष्णवर्णियाला उद्देशून केले: Donald Trump clumsily sought to tout his support among African-Americans on Friday by pointing out a black man in the crowd at a rally and calling him “my African-American.” Sounding like a plantation owner more than a presidential candidate, Trump pointed at the man and said: “Oh, look at my African-American over here!” “Are you the greatest?” he added. “You know what I’m talking about? OK.” त्यामुळे ट्रंप यांची असली विधाने आणि त्याहूनही अधिक वर्तने ही भारतीयांच्या मागे पण लागू शकतात... -------- फ्रिडमनच्या काळात जपानचा प्रचंड ट्रेड सरप्लस होता. पण जपानने अमेरिकेत निर्यात करून जमा केलेले डॉलर जमा करून त्याचा उपयोग काय केला? तर अमेरिकेतच शेअर/प्रॉपर्टी विकत घेतली. ते वाईट कसे? फ्रिडमनच्या मते फ्री ट्रेड "benefits large group at the expense of small group. However small group is always politically more influential". जपानने केले तेंव्हा अमेरीकेस भिती नव्हती. पण तेच आता चीन करत आहे आणि ते भितीदायक वाटत आहे. कारण चिनी आणि इतरही राष्ट्रे केवळ शेअर/प्रॉपर्टीच घेत आहेत असे नाही तर ते युएस बाँड्स पण घेत आहेत. त्यासगळ्याचे कारण अमेरीकन अर्थ आणि एकूणच व्यवस्थेबद्दल असलेला विश्वास. पण त्याचे परीणाम हे देश म्हणून (अर्थशास्त्र म्हणून नाही) धोकादायक ठरू शकतात असे म्हणणारा पण विचारप्रवाह आहे. माझ्या लेखी ह्या दोन्ही विचारपद्धती किंचीत टोकाच्या आहेत. उत्तर कुठेतरी मधे आहे. असो.

In reply to by विकास

जपानने केले तेंव्हा अमेरीकेस भिती नव्हती. पण तेच आता चीन करत आहे आणि ते भितीदायक वाटत आहे. कारण चिनी आणि इतरही राष्ट्रे केवळ शेअर/प्रॉपर्टीच घेत आहेत असे नाही तर ते युएस बाँड्स पण घेत आहेत. त्यासगळ्याचे कारण अमेरीकन अर्थ आणि एकूणच व्यवस्थेबद्दल असलेला विश्वास.
याचे अर्थशास्त्रीय उत्तर इथे देतो आणि राजकीय उत्तर याच प्रतिसादात खाली देतो. एका मर्यादापुढे ट्रेड imbalance (deficit/surplus) असणे वाईट. याचे कारण एखादा देश फार प्रमाणावर निर्यातीवर अवलंबून असेल आणि ज्या देशांमध्ये निर्यात केली जात आहे त्या देशांमध्ये मंदी आली तर त्याचे परिणाम त्या देशावर होतात. चीनने इतकी वर्षे निर्यातीवर आधारीत अर्थव्यवस्था ठेवली आहे आणि देशांतर्गत consumption वाढवायचा तितका प्रयत्न केलेला नाही. पूर्वी चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेपुढे लहान होती तेव्हा ते चालून गेले. पण मधल्या काळात अमेरिका आणि युरोपमध्ये मंदी आल्यामुळे तिथून मागणी कमी झाली. चीनमध्ये स्लोडाऊन आला आहे त्यात हे पण एक कारण आहेच. त्यामुळे झाले असे की २०१२-१३ च्या काळात जगाची गाडी पूर्वीप्रमाणे रूळावर आणायला इंजिन म्हणून अमेरिका सक्षम नव्हती, युरोप तर नाहीच. चीनमध्ये ती क्षमता होती पण या कारणामुळे चीनही ते काम करू शकले नाही आणि याचा सगळ्यांवरच परिणाम झाला. नोव्हेंबर २००८ मध्ये आर्थिक संकटावर उपाय शोधायच्या दृष्टीने पिट्सबर्गमध्ये जागतिक नेत्यांची (जी-२०) परिषद भरली होती. त्यावेळी मनमोहनसिंगांनी हेच मत मांडले होते. रघुराम राजन यांनीही एका मर्यादेपुढे ट्रेड imbalance (deficit/surplus) असू नये असेच म्हटले आहे. पण फ्री ट्रेडला विरोध करणारे (ट्रंप, सँडर्स इत्यादी) या कारणामुळे विरोध करत नाहीत. वर दिलेल्या व्हिडिओत तर ट्रंप म्हणत आहेत-- अमेरिका चीनला श्रीमंत व्हायला हातभार लावत आहे आणि अमेरिकेतून पैसे बाहेर जात आहेत म्हणून फ्री ट्रेड वाईट. एक उदाहरण म्हणून असे समजू की अमेरिकन ग्राहकांनी वॉलमार्टमधून १ लाख डॉलरच्या मेड इन चायना वस्तू खरेदी केल्या. हे १ लाख डॉलर चीनमध्ये गेले. त्याचे चीन काय करेल? १. १ लाख डॉलरच्या अमेरिकन उत्पादनांची खरेदी करेल (डेल कॉम्प्युटर, फोर्ड- जी.एम इत्यादी गाड्या, जी.ई किंवा रोल्स रॉईस इत्यादी कंपन्यांची इंजिनिअरींग उपकरणे इत्यादी) किंवा १ लाख डॉलरच्या अमेरिकन सेवांची खरेदी करेल (सॉफ्टवेअर लायसन्सेस इत्यादी) २. १ लाख डॉलरचे शेअर किंवा बाँड अमेरिकेत खरेदी करेल यापैकी (१) मध्ये ट्रेड डेफिसिट शून्य असेल कारण जेवढी वस्तूंची/सेवांची आयात तेवढीच निर्यात असेल. (२) मध्ये ट्रेड डेफिसिट १ लाख डॉलर असेल कारण १ लाख डॉलरचे शेअर/बाँड घेतले तर ते आयात/निर्यातीच्या करंट अकाऊंटमध्ये नाही तर कॅपिटल अकाऊटमध्ये गणले जातात. मग १ लाख डॉलरची आयात तितकी वाईट आहे का? दुसरे म्हणजे चीनने अमेरिकन सरकारचे बाँड मोठ्या प्रमाणावर घेतले आहेत त्याचा अमेरिकेला काहीच फायदा झाला नाही का? त्यातून बाँडची मागणी वाढून किंमती वाढल्या आणि अमेरिकन सरकारला बाँडवर व्याज कमी द्यावे लागले. अमेरिकन लोक एकूणच बचत वगैरे करायच्या फार भानगडीत पडत नाहीत. हा त्यांचा स्वभाव झाला.एका अर्थी चीन किंवा इतर देशांनी घेतलेल्या बाँडमुळे अमेरिकन लोकांच्या भरमसाठ consumption ला हातभार लागला नाही का? त्याउलट चीनमध्ये इतकी वर्षे लोक मोठ्या प्रमाणावर बचत करत होते (यापुढे काही वर्षे देशात वृध्दांचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे हे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी राहिल). एवढे वाचलेले पैसे घेऊन चीन काय करत होते? तर त्यातून निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेन्ट करत होते आणि निर्यात वाढवत होते. तेव्हा मिल्टन फ्रिडमनचा हाच दावा आहे. त्यावेळी जपानमध्ये (आणि नंतर चीनमध्ये) बचतीचा दर जास्त होता आणि अमेरिकेत तो कमी होता हे ट्रेड डेफिसिटचे मोठे कारण आहे.तेव्हा चीनमधील आयातीवर आयातकर लावू, याच्यावर बंदी टाकू, त्याच्यावर बंदी टाकू इत्यादी म्हणणे म्हणजे साप साप म्हणून जमीन धोपटण्यासारखे झाले. जे काही होत आहे त्याचे कारण अन्यत्र नाही तर आपल्यातच दडलेले आहे हे यांना कोण आणि कसे समजावणार?
त्यासगळ्याचे कारण अमेरीकन अर्थ आणि एकूणच व्यवस्थेबद्दल असलेला विश्वास. पण त्याचे परीणाम हे देश म्हणून (अर्थशास्त्र म्हणून नाही) धोकादायक ठरू शकतात असे म्हणणारा पण विचारप्रवाह आहे. माझ्या लेखी ह्या दोन्ही विचारपद्धती किंचीत टोकाच्या आहेत. उत्तर कुठेतरी मधे आहे. असो.
पण तसा धोका निर्माण करताना चीनला स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारावी लागेल त्याचे काय? इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्यात अमेरिकेत होत असल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या सशक्त असण्यातच चीनचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळेच २००८-०९ मध्ये चीनच्या सॉव्हरीन वेल्थ फंडने मॉर्गन स्टॅनले सारख्या संस्थांमध्ये गुंतवणूक करून त्या संस्थांना एका अर्थी हात दिला. कारण त्यावेळी अमेरिकेत आणखी संकट गडद होणे चीनलाही परवडणारे नव्हते. आणि स्वतःला दुप्पट नुकसान झाले तरी दुसर्‍यांना थोडेतरी नुकसान करायचे ही मनोवृत्ती चीनची असेल असे वाटत नाही. (ती मोनोपॉली पाकिस्तान, इसिस आणि तत्सम प्रवृतींकडे).

In reply to by विकास

एखाद्या बोटीला एक मोठे भोक पडले असेल तर बोटीतले पाणी उपसणे महत्त्वाचे आहे पण तितकेच किंवा त्याहून जास्त महत्त्वाचे ते भोक बंद करणे आहे. कितीही जोरात पाणी उपसले तरी जोवर ते भगदाड बुजत नाही तोपर्यंत त्या पाणी उपसण्याचा हवा तो परिणाम होणार नाही. बोटीला पडलेले भोक हे बोटीचे भूषण आहे असे मानणारे लोक फार असल्यामुळे भगदाड बुजवण्याच्या विचाराला नाके मुरडली जातात! ट्रंपला तसे वाटत नाही आणि बहुतांश लोक त्याच्या मागे आहेत.

In reply to by हुप्प्या

अजून तुम्ही मला या प्रतिसादाला उत्तर दिलेले नाही. थकले रे डोळे माझे अशी अवस्था झाली आहे हो! ;)
पण आठ वर्षांनी निदान डेमोक्रॅटिक पक्षाचा कंटाळा आला म्हणून दुसर्‍या बाजूला चान्स मिळेल ही आशा. इतका मनस्ताप होण्याचे कारण कळेल का?

In reply to by विकास

ओबामा अनेक पातळीवर निराशाजनक ठरला आहे. ग्वांटानमो बे चा बेकायदा तुरुंग बंद करायचे आश्वासन पाळले नाही. ओसामाला ठार केल्यावर अतिरेकी इस्लामचे लांगूलचालन करायचा सपाटा लावला. बेनगाझी प्रकरण हे त्याचे मोठे उदाहरण. कायद्याच्या कचाट्यात कोणी सापडेल का नाही ते नंतर पाहू. पण अमेरिकन सरकारचे वागणे नैतिकदृष्ट्या अत्यंत चूक होते. मुस्लिम दहशतवाद मुस्लिम नाहीच असे म्हणायचा आडमुठेपणा आणि ढोंगीपणा. हा अत्यंत घातक आहे. सिरियातून अमाप संख्येने निर्वासित घेण्याचा ओसंडून जाणारा उत्साह. ह्यातले ०.००१ टक्के जरी अतिरेकी असतील तरी मला तो धोका पत्करावासा वाटत नाही. उलट सौदी अरेबियासारख्या तथाकथित मित्रराष्ट्राला त्यांना मदत करावी म्हणून दबाव आणायला हवा होता. इथेही ओबामा बेजबाबदार आहे. बेकायदा घुसखोरीचे तर विचारूच नका. कुठल्याही प्रकारे ह्या प्रकाराला आळा घालायचे धोरण आखले जात नाही. घुसखोर हे अमेरिकन नागरिकांपेक्षाही श्रेष्ठ आहेत की काय अशी शंका येत आहे. पुरुष स्त्री ह्यांची स्वच्छतागृहे वेगळी असू नयेत ह्या करता कायदा बदलणे हे पॉलिटिकल करेक्टनेसचा अतिरेक करण्याचे उदाहरण. अमेरिकेपुढे बाकी प्रश्न नाहीत का की हा इशू उकरुन काढावा? किती लोकांना ह्या धोरणाचा फायदा होणार आहे आणि किती लोकांना त्रास होणार आहे ह्याचा विचार केला आहे का? अल्पसंख्यांकाचे लांगूलचालन हेही डोईजड वाटू लागले आहे. अनेक अल्पसंख्य संघटना ज्यांचे वागणे, विचार हे हिंसक, घातक आहेत त्यांच्याशी वागताना बोटचेपेपणा केला जात आहे. मलातरी ह्यात बदल झालेला आवडेल. पण एकंदरीत तसे होणे अवघड दिसते आहे. हिलरीचे पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे.

In reply to by हुप्प्या

कितीही जोरात पाणी उपसले तरी जोवर ते भगदाड बुजत नाही तोपर्यंत त्या पाणी उपसण्याचा हवा तो परिणाम होणार नाही. तुम्ही कुठं राहता याची मला कल्पना नाही. पण इतका तळतळाटाने बोलणे चालले आहे म्हणून कदाचीत अमेरीकेत राहत असाल असे गृहीत धरतो. अर्थातच अधिकृतपणे रहात असाल असेच समजतोयं, कल्जी नसावी! पण टाईम्समधील बातमीनुसार २०१२ च्या आकडेवारीनुसार जवळपास ४५०,००० बेकायदेशीर भारतीय रहात आहेत. म्हणजे मग आता ते कसे बंद करायचे म्हणे? तुम्ही जे भगदाड वाटतयं ते खालील माहितीप्रमाणे कमी झालयं हो! Mexican immigration हा तर ग्राफ अजूनच गंमतशीर आहे! Net Mexican immigration अर्थात तुम्हाला हिटलरशाहीच हवी असली तर गोष्ट वेगळी. आणि हो, डाव्यांना विरोध असला तर समजू शकतो. तो तसा माझा पण असतो पण आंधळा व्देष करणे मला तरी जमत नाही. त्यांच्याकडून जे काही घेता येते ते मी घेयचा प्रयत्न करतो. असो.

In reply to by विकास

मुद्दे संपले की विरोधकांना हिटलरशाही हवी आहे वगैरे कांगावा करायचा शॉर्टकट चांगला आहे! मीही वापरून बघीन कधीतरी! असो. बेकायदा घुसखोरी ही कमी होते आहे का जास्त. शून्य आहे का लाखात हा मुद्दा गौण आहे. सीमेचे रक्षण करणे ही अमेरिकन सरकारची जबाबदारी आहे. घुसखोरांची संख्या आपोआप कमी होते आहे का नाही हे न बघता सीमा सुरक्षित केली गेलीच पाहिजे. मग भिंत बांधा वा कुंपण. जे येणार ते कायदा पाळूनच आले पाहिजेत. कुणीतरी किती लोकांची गरज आहे, काय प्रकारचा अनुभव पाहिजे, जे येत आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सगळे तपासून मगच त्यांना प्रवेश दिला गेला पाहिजे. कुणीही यावे आणि अमेरिकेत घुसावे ह्याला विरोध म्हणजे हिटलरशाही अशी आपली व्याख्या असेल तर आपण एकदा हिटलरचा आणि त्याच्या नाझी संघटनेचा नीट अभ्यास करावा असा माझा अनाहूत सल्ला आहे. बेकायदा भारतीय अमेरिकेत येत असतील तर त्यावरही उपाय केलाच पाहिजे. दंड, तुरुंग, हकालपट्टी जे काही उचित आहे ते. पण बेकायदा मेक्सिकनचा मुद्दा असताना बेकायदा भारतीयांकडे बोट दाखवून बेकायदा मेक्सिकन घुसखोरीचे समर्थन करणे हे मला पटत नाही. दुसरया चुकीमुळे पहिली बरोबर ठरत नाही. उघडी सीमा ही जास्त धोकादायक आहे. विमानाने वा बोटीने येणारे घुसखोर आवरणे तुलनेने सोपे आहे असे माझे मत (बहुधा ही हिटलरशाही नसावी!).

फ्रिडमनने बेकायदा घुसखोरीचे समर्थन करायचा जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत दयनीय आणि केविलवाणा आहे. >>अमेरिकन लोक जी कामे ज्या पगारावर करायला कधीच तयार होणार नाहीत त्या गोष्टी हे मेक्सिकन लोक करतात. हा एक आवडता गैरसमज. तमाम मेक्सिकन लोक जे लाखोंच्या संख्येने दरवर्षी घुसतात ते सगळे "अमेरिकन लोक ज्या पगारावर काम करणार नाहीत" त्या पगारात काम करण्याच्या निश्चयाने कटिबद्ध होऊनच घुसतात ह्याला काय आधार आहे? काही लोक तसे करत असतील. काही हतबल लोक गुन्हेगारी करतात. काही सोशल वेल्फेअरचा गैरफायदा घेऊन सरकारला (म्हणजे अमेरिकन करदात्यांना) लुटतात. अनेक वर्षे कामे केल्यावर ते धंदे करतात आणि अशाच असहाय लोकांना नोकरीवर ठेवतात. अनेक बांधकाम व्यावसायिक तक्रार करतात की मेक्सिकन लोकांनी एक रॅकेट बनवले आहे आणि अन्य कोणाला त्या व्यवसायात शिरणे अवघड होत चालले आहे. मेक्सिकन लोकांना बेकायदा अमेरिकेत घुसायला आवडते म्हणून ते अमेरिकन लोकांना त्यांचे येणे आवडलेच पाहिजे हे तर्कट माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. आयसिसच्या लोकांना अमेरिकन लोकांनी इस्लाम कबूल केलेला आवडेल म्हणून अमेरिकन लोकांनी तेही करावे की काय? आता नवनवे रोग जे दक्षिण अमेरिकेत निर्माण होतायत ते हळूहळू अमेरिकेत येऊ लागले आहेत. बेकायदा घुसखोरीत कुठलीही वैद्यकीय तपासणी होत नाही त्यामुळे हे घातक रोग येतच रहाणार. ह्या आणि असल्या ढुढ्ढाचार्यांचे मत काहीही असले तरी ठोस व्यावाहारिक कारणामुळे सामान्य अमेरिकन लोकांना बेकायदा घुसणे साफ नापसंत आहे. म्हणूनच ट्रंपसारखा उमेदवार जोरदार आघाडी घेताना दिसतो आहे.

ह्या आणि असल्या ढुढ्ढाचार्यांचे मत काहीही असले तरी ठोस व्यावाहारिक कारणामुळे सामान्य अमेरिकन लोकांना बेकायदा घुसणे साफ नापसंत आहे. म्हणूनच ट्रंपसारखा उमेदवार जोरदार आघाडी घेताना दिसतो आहे.
ठिक आहे. त्याचप्रमाणे एकेकाळी मुंबईतल्या मराठी अनेक माणसांनीही राज ठाकरे सारख्या गुड फॉर नथिंग माणसालाही भरभरून समर्थन दिलेच होते.समजा सगळ्या 'भय्यांना' हाकलून दिले असते तर त्याच राठा समर्थकांना इस्त्रीवाले, दूधवाले, भाजीवाले आणि अन्य अनेक वाले कमी पडले असते. मेक्सिकन लोकांच्या बाबतीत अमेरिकेत तीच परिस्थिती आहे का? मला माहित नाही. याविषयी तिथे राहणारेच मिपाकर अधिक सांगू शकतील. पण नन्द्या यांच्या या प्रतिसादावरून तसे वाटत आहे खरे. बाकी मिल्टन फ्रिडमनना त्यांच्या काळातच प्रचंड विरोध झाला होता. १९७६ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यावेळीही त्याविरोधात निदर्शने झाली होती.पण ते जे म्हणत होते त्यातला बहुतांश गोष्टी लोकांना बर्‍याच काळाच्या गॅपनंतर कळल्या. असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

आपला गोंधळ होतो आहे का? राज ठाकरे आणि भैय्या विरोध ह्यात आणि ट्रंप आणि मेक्सिकन घुसखोर ह्यात एक मोठा फरक आहे. उत्तर प्रदेश, बिहार ही राज्ये भारताचा अविभाज्य घटक आहेत. मी शेवटचे बघितले तेव्हापर्यंत मेक्सिको हे स्वतंत्र राष्ट्र होते. आपल्याला असे वाटते का की मेक्सिको हे अमेरिकेचे राज्य आहे? तसे ते नाही. हा मोठा फरक आहे. त्यामुळे भय्या लोकांना कायद्याचे पाठबळ आहे. बेकायदा मेक्सिकन घुसखोरांना ते नाही. बेकायदा मेक्सिकन लोकांना हाकलले तर अमेरिकेचा बट्ट्याबोळ होईल हे गृहितक अत्यंत खोटे आहे. जर बेकायदा घुसखोरी इतके सोन्याच्या मोलाचे वरदान असते तर कुणीतरी अमेरिका मेक्सिकोच्या सीमा पूर्णपणे उघडून द्याव्यात. सध्या गुंडांच्या टोळ्या लाच घेऊन लोकांना सीमा ओलांडायला मदत करतात. त्यात असहाय बायका मुले ह्यांच्यावर अत्याचारही होतात. आणि अमेरिकेत आल्यावर शोषणही होते. आजही अगदी डेमोक्रॅटही असा कायदा आणू धजत नाही की कुणीही या आणि घुसा अमेरिकेत आणि करा अमेरिकेची भरभराट! कारण तसे केले तर पुढची निवडणूक हरणार हे नक्की. त्यामुळे बेकायदा घुसखोरीकडे दुर्लक्ष करून आपण लॅटिनो लोकांचे तारणहार असल्याची टिमकी वाजवायची! ट्रंप ती वाजवत नाही म्हणून तो रेसिस्ट! छान. नोबेल पारितोषिकाचा दाखला देऊन फ्रिडमन म्हणाला ते खरे असणार असे म्हणत आहात का? अहो, ओबामाला नोबेलचा शांतता पुरस्कार मिळाला होता म्ह्णून तो ८ वर्षात शांतिदूत झाला का? नोबेल हा काही मापदंड नाही की जो मिळाल्यावर आपण जे बोलू ते खरेच ठरावे. त्याऐवजी ठोस मुद्दे मांडून बेकायदा घुसखोरी ही अमेरिकेकरता सोन्याची खाण कशी आहे आणि त्यामुळे अमेरिकेत लक्ष्मीची पावले कशी उमटत आहेत ते सांगा. नोबेलचे दाखले नकोत.

In reply to by हुप्प्या

नोबेल पारितोषिकाचा दाखला देऊन फ्रिडमन म्हणाला ते खरे असणार असे म्हणत आहात का?
छे हो. नोबेलचा उल्लेख इथे का आला? कारण तुम्हीच मिल्टन फ्रिडमनना ’ढुढ्ढाचार्य’ की काहीतरी म्हणाला होतात. त्यावर म्हणणे इतकेच की फ्रिडमनच्या हयातीतच त्यांना प्रचंड विरोध झाला होता आणि त्याचे एक उदाहरण म्हणून नोबेल पारितोषिक द्यायच्या समारंभाच्या वेळी बाहेर निदर्शने झाली होती.
त्याऐवजी ठोस मुद्दे मांडून बेकायदा घुसखोरी ही अमेरिकेकरता सोन्याची खाण कशी आहे आणि त्यामुळे अमेरिकेत लक्ष्मीची पावले कशी उमटत आहेत ते सांगा. नोबेलचे दाखले नकोत.
मी बेकायदा घुसखोर हे सोन्याची खाण आहे आणि त्यांच्यामुळे लक्ष्मीची पावले उमटत आहेत वगैरे काहीही म्हटलेले नाही. उगीच काहीतरी चिकटवायचा प्रयत्न करू नका. माझे म्हणणे इतकेच की लो पेईंग नोकऱ्यांसाठी जर पुरेसे अमेरिकन मिळत नसतील तर तिथे मेक्सिकन लोक कामाला येतात. आणि जर का त्या कामासाठी पुरेसे अमेरिकन मिळत असतील तर त्यांना खुशाल हाकलून द्या किंवा मेक्सिकन लोक गुन्हेगारी/दहशतवादामध्ये सामील असतील तर त्यांना अमेरिकेतूनच नव्हे तर पृथ्वीतलावरूनच नाहिसे केले तरी काही म्हणायचे नाही हे लिहिलेले वाचले नाहीत का? असो. २००७ मध्ये ऍरिझोना राज्याने घुसखोरांविरूध्द कडक कायदा पास केला. याविषयी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामधील सारा बॉन आणि इतर दोघांनी या कायद्यामुळे मेक्सिकन लोक त्यांच्या देशात हाकलले गेले त्यावर नक्की काय परिणाम झाला यावर एक पेपर लिहिला आहे. त्यातील निष्कर्ष पुढीलप्रमाणे: "Our results suggest that contrary to its intent, the Legal Arizona Workers Act does not appear to have improved labor market outcomes of competing legal low-skilled workers. In fact,we find some evidence of diminished employment and increased unemployment among legal low-skilled workers in Arizona. These findings are concentrated on the largest demographic group of workers – non-Hispanic white men. While they are less likely to find employment, those who do have on average higher earnings as a result of LAWA". म्हणजे काय की या कायद्यामुळे आर्थिक व्यवहार घटले त्यामुळे लो पेईंग नोकऱ्या कमी झाल्या. ज्या काही थोड्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना पगार जास्त मिळाला. एकूणच काय की या प्रकारामुळे मिनिमम वेज वाढविल्यामुळे होईल तो परिणाम झाला (माझा निष्कर्ष). आणि असा परिणाम होणे चांगले आहे का? हा पेपर https://gspp.berkeley.edu/assets/uploads/research/pdf/p82.pdf वर आहे. इतरही अभ्यास झाले आहेत पण त्यासाठी त्या जर्नलचे subscription घ्यावे लागेल त्यामुळे ते पेपर मी इथे देऊ शकत नाही. आता हा ठोस मुद्दा नाही असे म्हणायला तुम्ही मोकळे आहातच. पण निदान या बाबतीत I rest my case. बाकी राज ठाकरेचा मुद्दा समकक्ष नाही हे मान्य. तो पण मुद्दा का आला? कारण तुम्हीच म्हटले आहे की फ्रिडमनसारख्या ’ढुढ्ढाचार्यांचे’ म्हणणे काहीही असले तरी सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर ट्रम्पना पाठिंबा देत आहेत. त्यावर माझा मुद्दा हा की सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत हा मुद्दाही तितकासा योग्य नाही. कारण सामान्य लोक अनेकदा अशा डेमॉगॉगना भरभरून पाठिंबा देत असतात. राज ठाकरेंचे नाव लिहिण्याच्या आधी मी केजरीवाल लिहिले होते. पण त्यामुळे केजरू समर्थक अंगावर येऊन चर्चा भरकटू नये म्हणून ते नाव काढले. म्हणजे मजा बघा. नोबेल पारितोषिक हा एखाद्याचे म्हणणे बरोबर आहे याचा मापदंड नाही हे तुम्ही म्हणता.त्याविषयी मतभेद असायचा प्रश्नच नाही. पण मग त्याबरोबरच सामान्य लोकांचे मतही डोळे झाकून न घेता pinch of salt ने घेणे योग्य नाही का?

In reply to by गॅरी ट्रुमन

>> म्हणजे मजा बघा. नोबेल पारितोषिक हा एखाद्याचे म्हणणे बरोबर आहे याचा मापदंड नाही हे तुम्ही म्हणता.त्याविषयी मतभेद असायचा प्रश्नच नाही. पण मग त्याबरोबरच सामान्य लोकांचे मतही डोळे झाकून न घेता pinch of salt ने घेणे योग्य नाही का? लोकशाही मग ती अमेरिकन वा भारतीय कुठलीही असो. सामान्य लोकांच्या मतावरच सरकार बनते. सामान्य लोकांना डावलून चालत नाही. नोबेल पुरस्कार विजेत्यांचे तसे नाही. जर सामान्य लोकांनी झुंडशाही करुन कुणाच्या हक्काची पायमल्ली केल्यास त्यावर दाद मागायला न्यायालये आहेत. जर बेकायदा घुसखोरीवर बंदी घालून कुणाच्या मूलभूत, सांविधानिक हक्कावर गदा येते असे म्हणणे असल्यास न्यायालये आहेत. पण कुणी तसे केलेले दिसत नाही. निव्वळ एक रिसर्च पेपर, निव्वळ एका नोबेल पुरस्कार विजेत्याचे मत ह्याच्या जोरावर सीमा पुसून टाका, देश ही संकल्पना पायदळी तुडवा, कुणीही यावे आणि अमेरिकेत वसावे असा खुलेपणा दाखवावा हा खुळचटपणा आहे. जर बेकायदा घुसखोरी हे अमेरिकेकरता एक अनमोल वरदान आहे आणि त्यातूनच अमेरिकेची अफाट भरभराट होणार आहे असा विश्वास असेल तर ते लोकांना पटवा, त्या मुद्द्यावर निवडणुका लढा व जिंका व नवी धोरणे राबवा वा खटले लढा , ते जिंका आणि कायदे बदला.

अमेरिकन लोक जी कामे ज्या पगारावर करायला कधीच तयार होणार नाहीत त्या गोष्टी हे मेक्सिकन लोक करतात.
ट्रुमन साहेब, हे लॉजिक कधी अमेरीकेसाठी चांगले असेल जेंव्हा मध्य पूर्वे सारखे त्यांना काम संपले की पुन्हा मेक्सीको मधी जायला लागेल, आयुष्यात कधीही त्यांना आणि त्यांच्या मुलांना सिटीझनशिप मिळणार नाही. फक्त आर्थिक बाजु बघितली की असे होते, त्याचा सामाजिक परीणाम नको बघायला? पूर्ण समाजाचा ढाचाच बदलुन जातो जेंव्हा दुसर्‍या भिन्न संस्कृतीची लोक घुसतात तेंव्हा. आसामचे / बंगालचे उदाहरण आहे ना. ते दाखवा फ्रीडमन साहेबांना. आता कोकणात पण बांधकाम मजुन बांग्लादेशी आहेत, ते काय परत जाणारेत?

In reply to by गंम्बा

आसामचे / बंगालचे उदाहरण आहे ना. ते दाखवा फ्रीडमन साहेबांना.आता कोकणात पण बांधकाम मजुन बांग्लादेशी आहेत, ते काय परत जाणारेत?
कसं दाखवणार हो? फ्रिडमनसाहेब २००६ मध्येच गेले की!! असो. बांगलादेशातील भारतात होणारी घुसखोरी आणि मेक्सिकन लोकांची अमेरिकेत होणारी घुसखोरी याच्यात तुलना कशी करता येईल? एक तर अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील आर्थिक सुबत्तेत कित्येक पटींनी फरक आहे तेवढा फरक भारत आणि बांगलादेशात आहे का? त्यामुळे होते असे की काही प्रकारची कामे करायला अमेरिकन लोक तयार होत नसतील तर ती कामे करायला मेक्सिकन लोक मिळू शकतात.भारतातील परिस्थिती लक्षात घेता अशा कामांसाठी बाहेरच्या देशातील कोणाचीही गरज भारतात नाही. आणि जर का त्या रेटमध्ये अशी कामे करायला स्थानिक अमेरिकन लोक तयार असतील तर मेक्सिकन लोकांनाही हाकला की. काय फरक पडतो? मी पूर्वी अमेरिकेत काही वर्षे राहिलो आहे आणि भविष्यात परत तिथे जाईन याची फार शक्यता नाही.त्यामुळे मला सध्याची परिस्थिती माहित नाही.पण नन्द्यांसारखे ४५ वर्षांपासून अमेरिकेत राहात असलेले मिपाकर जर म्हणत असतील की अशी कामे करायला अमेरिकन लोक तयार होत नाहीत तर त्यात तथ्य असले पाहिजे असे मला पामराला वाटते. दुसरे म्हणजे भारतात घुसलेले बांगलादेशी अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया, दहशतवाद इत्यादींमध्ये सामील असतात (आठवा दिल्लीतील डॉ. पंकज नारंग यांची हत्या). तसे मेक्सिकन लोक करत असतील तर त्यांना अमेरिकेतूनच नव्हे तर पृथ्वीतलावरूनच नाहिसे करा.काहीही म्हणणे नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

फक्त आर्थिक बाजु बघितली की असे होते, त्याचा सामाजिक परीणाम नको बघायला? पूर्ण समाजाचा ढाचाच बदलुन जातो जेंव्हा दुसर्‍या भिन्न संस्कृतीची लोक घुसतात तेंव्हा
हे वाक्य पण बघा की साहेब.

In reply to by गंम्बा

फक्त आर्थिक बाजु बघितली की असे होते, त्याचा सामाजिक परीणाम नको बघायला? पूर्ण समाजाचा ढाचाच बदलुन जातो जेंव्हा दुसर्‍या भिन्न संस्कृतीची लोक घुसतात तेंव्हा हे वाक्य पण बघा की साहेब.
अमेरिकेला मेल्टिंग पॉट की काहीतरी म्हणतात ना?संस्कृती वगैरे गोष्टी अमेरिकेत कधीपासून महत्वाच्या झाल्या? आणि खुद्द अमेरिकेचेच बोलाल तर नेटिव्ह लोकांचे शिरकाण करूनच गोर्‍यांनी अमेरिका स्थापन केली ना? अमेरिकेचा मोठा भाग १८४८ मध्ये अमेरिकेने मेक्सिकोकडून जिंकून घेतला होता. टेक्सस, न्यू मेक्सिको, अ‍ॅरिझोना, कॅलिफॉर्निया, नेवाडा, युटा, कोलोरॅडोचा अर्धा भाग आणि इतकेच काय तर वायोमिंगसारख्या उत्तरेकडील राज्याचाही दक्षिणेतला थोडा भाग १८४८ मध्ये मेक्सिकोकडून जिंकून घेतला होता. त्या भागातील मेक्सिकन ओरिजीनच्या लोकांचे काय झाले? याविषयी कोणाला माहित आहे का? ते अमेरिकन झाले की मेक्सिकोत हाकलले गेले की त्यांचेही शिरकाण झाले? अशावेळी भिन्न संस्कृतीचे लोक घुसल्यामुळे बदल झाले नव्हते वाटते? पूर्वीच्या गोष्टी परत परत उगाळण्यात अर्थ नाही हे ठिक आहे पण मग अमेरिकेत मेक्सिकन घुसत असतील तर तो निसर्गाचा न्याय म्हणायचा का? असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

पूर्ण समाजाचा ढाचाच बदलुन जातो जेंव्हा दुसर्‍या भिन्न संस्कृतीची लोक घुसतात तेंव्हा
'Then they came for me—and there was no one left to speak for me.' ही ओळ किती फिट्ट बसते ना इथे?
अमेरिकेचा मोठा भाग १८४८ मध्ये अमेरिकेने मेक्सिकोकडून जिंकून घेतला होता. टेक्सस, न्यू मेक्सिको, अ‍ॅरिझोना, कॅलिफॉर्निया, नेवाडा, युटा, कोलोरॅडोचा अर्धा भाग आणि इतकेच काय तर वायोमिंगसारख्या उत्तरेकडील राज्याचाही दक्षिणेतला थोडा भाग १८४८ मध्ये मेक्सिकोकडून जिंकून घेतला होता. त्या भागातील मेक्सिकन ओरिजीनच्या लोकांचे काय झाले?
जॉर्ज लोपेझ या एका अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियनचा प्रसिद्ध किस्सा आठवला: प्रश्नः George, what part of Mexico are your ancestors from? उत्तरः LOS ANGELES, #&*@$!

In reply to by गॅरी ट्रुमन

आज अमेरिकेत कायद्याचे राज्य आहे. तेव्हा जर मेक्सिकन लोकांना मुक्तद्वार द्यावे असे कुणाला पोटतिडिकीने वाटत असेल तर तसा कायदेबदल करून मेक्सिकन लोकांना अमेरिकेत खुला प्रवेश द्या. उगाच इतिहासाची पाने उलगडून पूर्वीच्या चुकांची शिक्षा आजच्या लोकांना द्या वगैरे तर्कदुष्ट कल्पना नकोत. भारतात उच्चवर्णीयांना काही पिढ्या अस्पृश्याप्रमाणे वागवले तर "निसर्गाचा न्याय" मिळेल का? शेकडो वर्षापूर्वी काही लोकांनी अत्याचार केले म्हणून त्याची शिक्षा आजच्या पिढीला देणे कितपत योग्य आहे? जर्मनीतील नाझीच्या वंशजांना आज ओव्हनमधे घालून जाळा असे म्हणाल का? घड्याळ उलटे फिरवून काही साध्य होत नाही. गोर्या लोकांनी स्थानिक मूळ अमेरिकन लोकांवर केले ते अत्यंत घृणास्पद होते पण आज तसे होत नाही. अमका भाग पूर्वी मेक्सिकोचा होता वगैरे प्रकारही साफ गैरलागू आहेत. पाकिस्तान भारताचा भाग होता. बांगलादेश पाकिस्तानचा भाग होता. पण आज त्यातले काहीही लागू नाही तसेच मेक्सिकोचे आहे. आजच्या सीमा, आजचे कायदे हे बघणे योग्य आहे. अमेरिका मेल्टिंग पॉट आहेच. (बहुतांशी) सर्व कायदे पाळून येणारे भारतीय आणि चिनी लोक पहा. निमूटपणे एच वन, ग्रीन कार्ड वगैरे चक्रातून वर्षानुवर्षे जातात आणि अमेरिकेत रहातात. अमेरिकेच्या अनेक भागात ते सुखाने रहातात. आपली भाषा, आपली संस्कृती टिकवतात, वाढवतात. तेव्हा बेकायदा घुसखोरीला विरोध हा वर्णद्वेष नव्हे.

हिलरी क्लिंटन आता डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार झाल्या आहेत. अध्यक्षीय निवडणुकांमध्ये उतरणार्‍या त्या पहिल्या स्त्री उमेदवार ठरतील. काल कॅलिफॉर्निया, न्यू जर्सी, न्यू मेक्सिको, मॉन्टाना, नॉर्थ डॅकोटा आणि साऊथ डॅकोटा राज्यांमध्ये प्रायमरी झाल्या. सर्व ठिकाणी मतमोजणी पूर्ण झालेली नाही.पण केवळ मॉन्टाना आणि नॉर्थ डॅकोटामध्ये बर्नी सँडर्स यांनी थोडीशी आघाडी मिळवली आहे. सर्वात मोठ्या आणि सर्वात महत्वाच्या कॅलिफॉर्नियामध्ये हिलरींनी बरीच मोठी आघाडी घेतली आहे. दिसताना असे दिसत आहे की बर्नी सँडर्स यांनी सुध्दा बरीच राज्ये जिंकली आहेत. पण त्या राज्यांमध्ये मिशिगन सोडून फार मोठी राज्ये नाहीत. भारतात समजा एखाद्या उमेदवाराने मणिपूर, नागालॅंड, मिझोराम, त्रिपुरा इत्यादी राज्ये जिंकली तर दिसताना दिसेल की त्याने चार राज्ये जिंकली आहेत. पण त्यापेक्षा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र असे मोठे राज्य जिंकणारा उमेदवार कितीतरी पटींनी पुढे असेल. तसेच काहीसे सँडर्स यांच्याबरोबर होत आहे. आता दोन्ही प़क्षांची फिलाडेल्फिया आणि क्लिव्हलँड येथे होणारी अधिवेशने म्हणजे औपचारिक ठरतील. तरीही डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात बिल क्लिंटन यांचे भाषण ऐकणे ही माझ्यासाठी तरी पर्वणी असेल.ते मला नक्कीच चुकवायचे नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

अध्यक्षीय निवडणुकांमध्ये उतरणार्‍या त्या पहिल्या स्त्री उमेदवार ठरतील. ह्यात फक्त "प्रमुख पक्षाकडून" असे सुरवातीस म्हणायला हवे. मला जीन स्टाईन ही मॅसॅच्युसेट्स मधून ग्रीन पार्टीकडून २०१२ साली लढली होती. पण विकीवरील रोचक दुव्याप्रमाणे सगळ्यात पहील्यांदा व्हिक्टोरीया वुडहल नावाच्या स्त्रीने १८७२ मध्ये इक्वल राईट्स पार्टीकडून उमेदवार होती. तिला शून्य मते मिळाली - हे पार्टी नाँइनेशन बद्दल. सगळ्यात पहील्यांदा १९४० मधे "सर्प्राईज पार्टी" कडून ग्रेसी अ‍ॅलन नावाच्या स्त्रीने निवडणूक लढवली (रुजवेल्ट अध्यक्ष म्हणून निवडून आले होते). १९६८ मधे कम्युनिस्टपार्टीने शार्लीन मिचेल नावाच्या स्त्रीस उमेदवार केले होते. अर्थात मला वाटते कम्युनिस्टांवर त्यावेळेस (कदाचीत आत्ता देखील) बॅन असल्याने तीने निवडणू़क लढवली नव्हती.

In reply to by विकास

"प्रमुख पक्षाकडून" असे सुरवातीस म्हणायला हवे
हो बरोबर. प्रमुख पक्षाकडून असे सुरवातीला म्हणायला हवे. दुरूस्तीबद्दल धन्यवाद.

In reply to by गॅरी ट्रुमन

तसेच काहीसे सँडर्स यांच्याबरोबर होत आहे. खरे आहे. काल कुठेतरी चर्चा ऐकताना/पहाताना असे देखील म्हणल्याचे आठवते की सँडर्स हे प्रामुख्याने इन्डेपंडट मतदारांमुळे जिंकत होते. म्हणजे रजिस्टर्ड डेमोक्रॅटीक व्होटर्स हे हिलरच्या बाजूनेच होते. फक्त जिथे जिथे इन्डेपन्डंट मतदार मते देऊ शकत होते तेथे सँडर्स यांची मते वाढली अथवा ते जिंकले. कदाचीत सांख्यिकी कसरत असेल असे विधान करण्यात, पण त्यात तथ्य नक्की आहे. काल ट्रंप ने सँडर्सच्या मतदारांना आता आपणच कसे तुमचे तारणहार असू (म्हणजे हिलरी नसेल) असे सुचवणे चालू केले आहे. ट्रंपचा खरा प्रॉब्लेम आहे तो आता हिस्पॅनिक मतदार. आताच्या काळात अमेरीकन निवडणूक ही हिस्पॅनिक मतदारांचा सपोर्ट असल्याशिवाय जिंकता येणार नाही इतके त्यांचे प्रमाण आहे. हिलरी कडून याबाबतीत एक शक्यता आहे म्हणजे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून ती कदाचीत, Julian Castro या सॅन अ‍ॅन्टोनियो, टेक्सास च्या तरूण महापौरास घेईल. तसे जर सर्वार्थाने होऊ शकले* तर ते ट्रंपला प्रचंड आव्हान राहील. (*होऊ शकले तर, असे म्हणायचे कारण म्हणजे इथल्या प्रत्येक व्हिपी कॅन्डीडेट आणि नंतर कॅबिनेट मेंबरला, न्यायाधिश निवडीतील उमेदवारांना अत्यंत कडक परीक्षणातून जावे लागते. ती vetting process जर बरोबर झाली आणि काही भानगड बाहेर आली नाही तसेच ते त्यानंतर राजकारणाच्या अर्थाने योग्य ठरले तर ते पुढे जाऊ शकेल.)

In reply to by विकास

प्रत्येक व्हिपी कॅन्डीडेट आणि नंतर कॅबिनेट मेंबरला, न्यायाधिश निवडीतील उमेदवारांना अत्यंत कडक परीक्षणातून जावे लागते.
म्हणजे कॅबिनेट सदस्यांच्या नेमणुकीचे सिनेटकडून रॅटिफिकेशन व्हावे लागते हे माहित होते. पण उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांनाही तशाच परिक्षणातून जावे लागते हे माहित नव्हते. असे परिक्षण कोण करते आणि कोणाचे? म्हणजे दोन प्रमुख पक्ष असले तरी ग्रीन पक्ष आणि इतर पक्षही निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करत असतात.जर दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे परिक्षण होत असेल तर या इतर उमेदवारांचेही परिक्षण व्हायला हवे. तसे होते का?

In reply to by गॅरी ट्रुमन

मला वाटते (माहीत नाही) पण कॅबिनेट सदस्यांचे रॅटीफिकेशन हे अधिकृत (सरकारकरवी) होते. पण उपध्यक्षपदासाठीचे रॅटीफिकेशन हे अंशतः सिक्युरीटी क्लिअरन्स सारखे होत असावे. त्याच बरोबर राष्ट्राध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे सगळे जीवन हे इथल्या जनतेसाठी उघड करावे लागते. त्यामुळे ते इतरांनी करण्याआधी आधी बघून सगळे कन्फर्म करावे लागते. उदा. काही आर्थिक गडबडी, उमेदवाराची तब्येत, इतर काही कायद्याच्या गोष्टी वगैरे बघाव्या लागतात. याचे एक गंमतीशीर उदाहरणः ओबामाने जेंव्हा प्रेसिडंन्सीसाठी उभे राहण्याचा प्लॅन केला, तेंव्हा त्याने ८०-९० च्या दशकात हार्वर्ड विद्यापिठ असलेल्या केंब्रिज शहरात जाऊन त्यावेळी न दिलेले पार्किंग व्हायोलेशनचे पैसे दिले!

In reply to by विकास

काही आर्थिक गडबडी, उमेदवाराची तब्येत, इतर काही कायद्याच्या गोष्टी वगैरे बघाव्या लागतात.
जॉर्ज डब्लू बुशना १९७६ मध्ये दारू पिऊन गाडी चालविल्याबद्दल अटक झाली होती. ही गोष्ट महत्वाची कशी ठरली नाही हे समजत नाही. DUI हा त्या मानाने बराच गंभीर गुन्हा समजला जातो. उमेदवाराच्या तब्येतीवरून आठवले. जॉन केनेडींना पाठीचे प्रचंड दुखणे होते. दिवसातून अनेक पेन किलर घेऊन ते काम करू शकत असत.अन्यथा त्यांना उभे राहणेही शक्य झाले नसते असे वाचल्याचे आठवते. पण एका अर्थी अशा गोष्टी तपासून बघितल्या जात असतील तर ते योग्यच आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

क्लिंटन माफ करा एक्झॅक्ट नाव त्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच आठवत नाहिये बहुधा निक्सन असावेत, हे जास्त चालु नाहि शकायचे, ह्यांच्या करिता त्या वेळेस एक स्पेशल रेल्वे असायचि. असलाच एक एपिसोड हिस्टरी चॅनल वर बघितला होता.

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

त्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच आठवत नाहिये बहुधा निक्सन असावेत, हे जास्त चालु नाहि शकायचे,
ते फ्रॅन्कलीन डी. रूझवेल्ट होते. त्यांना पोलिओ होता त्यामुळे ते व्हिल-चेअर वर असत.

In reply to by गॅरी ट्रुमन

जॉर्ज डब्लू बुशना १९७६ मध्ये दारू पिऊन गाडी चालविल्याबद्दल अटक झाली होती. बरोबर. पण ती माहिती वेळीच पब्लिक केली गेली होती. त्यामुळे त्याची हवा पद्धतशीर पणे गेली होती. अशा अनेक कथा आहेत. परत कधीतरी! :)

In reply to by विकास

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हाइस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट यांचे अतिशय कडक पूर्वपरीक्षण होत असते. पैकी दोन्ही पक्षांच्या मुख्य उमेदवारांचे पूर्वपरीक्षण (vetting) वृत्तपत्रे व इतर माध्यमांकडून (news channels) इ. करत असतात. हे vetting करायचे राहिले की काय होते याचे अलीकडचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे John McCain यांच्या व्हाईस प्रेसिडेन्शिअल उमेदवार सारा पालीन.

भा.प्र.वे. प्रमाणे आज नक्की किती वाजता पंतप्रधान मोदी अमेरिकन संसदेच्या सभागृहात भाषण करणार आहेत?

In reply to by माहितगार

धन्यवाद! भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ८:३० वाजता पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात भाषण करणार आहेत.

शेंच्युर निमीत्त श्रीमती. हिलरी क्लिंटन यांचा सत्कार साडीचोळी देऊन आणी श्री.डोनाल्ड ट्रंप यांचा सत्कार धोतरजोडी देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी अनिवाशी भारीतय कार्यकर्ते

In reply to by गॅरी ट्रुमन

रिपब्लीकन पक्षात जवळपास १६ जणांना तर डेमोक्रॅटीक पक्षात (सँडर्स सहीत) चौघांना श्रीफळ मिळालेले आहे. ;)

माध्यमे ह्या जजला स्वच्छ पांढर्या रंगात आणि ट्रंपला काळ्या वर्णद्वेष्टी रंगात रंगवण्यात मग्न आहेत. पण वस्तुस्थिती काय आहे? हा जज आपल्या हिस्पॅनिक वारशाचा अभिमान बाळगून आहे (आणि त्यात काहीही चूक नाही). विविध हिस्पॅनिक संघटनांचा तो सदस्य आहे. उदा. हिस्पॅनिक नॅशनल बार असोसिएशन. ह्या संघटनेने पूर्वीच ट्रंपवर बहिष्कार घाला वगैरे आंदोलने सुरु केली होती. ही पार्श्वभूमी आहे म्हणून मला हा जज नको असे ट्रंप म्हणाल तर तो वर्णद्वेष्टा? काय विचित्र तर्कट आहे! खरे तर त्यानेच आपणहून स्वत: रजा घेऊन दुसरा जज पहा असे म्हणायला हवे होते. तेव्हा त्याचे निव्वळ मेक्सिकन मूळ असणेच नव्हे तर त्याची कृतीही अशीच दिसते आहे ज्यात पूर्वग्रह असणे शक्य आहे. तेव्हा अश्या संशयाला वाव असू नये म्हणून जज बदलला तर काय बिघडले?

In reply to by हुप्प्या

ह्या संघटनेने पूर्वीच ट्रंपवर बहिष्कार घाला वगैरे आंदोलने सुरु केली होती.
अहो, दोन्ही संघटना वेगळ्या आहेत. Some Trump supporters have incorrectly linked La Raza Lawyers to the National Council of La Raza, a 50-year-old civil rights group that has been strongly critical of Trump's proposals on immigration, as well as his idea to temporarily ban Muslims from entering the United States. The NCLR's non-profit designation bars it from engaging in political campaigns, and the group's website describes it as a "nonpartisan voice for Latinos." फक्त 'La Raza' हा शब्दसमूह कॉमन आहे. (हे म्हणजे केवळ 'तामिळ' हा शब्द कॉमन आहे म्हणून लिट्टे आणि पुण्यातला तामिळ संघम् सारखेच आहे, असं म्हणण्यासारखं झालं!)
ही पार्श्वभूमी आहे म्हणून मला हा जज नको असे ट्रंप म्हणाल तर तो वर्णद्वेष्टा?
ट्रम्प तसं म्हणाला नाही, त्याने जजच्या मेक्सिकन वंशाकडे वारंवार निर्देश केला. रिपब्लिकन पॉल रायन, गिंगरीच, नेब्रास्का, मेन आणि इलिनॉयचे रिपब्लिकन सिनेटर्स या सार्‍यांनी या 'टेक्स्टबुक डेफिनेशन ऑफ रेसिझम'चा निषेध केला आहे.
तेव्हा त्याचे निव्वळ मेक्सिकन मूळ असणेच नव्हे तर त्याची कृतीही अशीच दिसते आहे
कृतीबद्दलच बोलायचं तर या जजने मेक्सिकन तस्करांच्या विरोधात निर्णय देऊन त्यांचा रोष अनेकदा ओढवून घेतला आहे. अगदी नेव्हल बेसवर फेडरल मार्शल्सच्या संरक्षणात रहावे लागण्याची पाळी येण्याइतपत.
पण ट्रंपने ह्या लोकांचा वंश काढला नाही. हे दोघे हिस्पॅनिक आहेत म्हणून ते राष्ट्राध्यक्ष बनायला नालायक आहेत असे तो म्हणाला नव्हता. बाकी अनेक सवंग उखाळ्यापाखाळ्या काढूनही तो त्यांच्या वंशावर उतरला नाही त्यामुळे तो सरसकट वर्णद्वेष्टा आहे असे म्हणवत नाही.
हे म्हणजे, चोरीचा आळ असलेल्या माणसावर त्याने यापूर्वी अनेकवेळा संधी मिळूनही चोरी न केल्याने त्याला चोर म्हणता येईल यासारखं तर्कट झालं.

In reply to by नंदन

सुप्रिम कोर्टाचे आत्ताच स्वर्गवासी झालेले अ‍ॅन्थनी स्कलीया हे स्वतःच्या इटालीयन वंशाचा अभिमान बाळगून होते. ते मला वाटते पहीले इटालीयन जज होते. मग काय त्यांनी इटालीयन केसेस घ्यायच्याच नाहीत? सुप्रिम कोर्टाच्या न्या. सोनिया सोडोमायोर या हिस्पॅनिक आहेत. मग त्यांनी उद्या जेंव्हा ट्रंपचा खटला सुप्रिम कोर्टात जाईल तेंव्हा स्वतला: काय लांब ठेवायचे? का स्त्री हक्कावरून अनेक पेंडींग खटले आहेत त्यात स्त्री म्हणून लांब रहायचे? रिपब्लिकन पॉल रायन, गिंगरीच, नेब्रास्का, मेन आणि इलिनॉयचे रिपब्लिकन सिनेटर्स या सार्‍यांनी या 'टेक्स्टबुक डेफिनेशन ऑफ रेसिझम'चा निषेध केला आहे. आता ट्रंप म्हणतो की माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. (वरील प्रतिक्रीयेत तसे केले आहे असे मह्णलेले दिसलेले नाही ते वेगळे! ;) ) आणि नंतर (ट्रंप) म्हणतो की आता माझ्यासाठी हा विषय संपला म्हणून. आता का संपला? जर बरोबर बोलला होता तर अजून का ठाम रहात नाही?

In reply to by विकास

ट्रंपचे वाक्य पाहिलेत तर त्याने असेच म्हटले आहे की हा जज मेक्सिकन आहे आणि तो कुठल्याशा संघटनेचा सदस्य आहे जिचा बेकायदा घुसखोरीला पाठिंबा आहे . त्यात निव्वळ मूळचा मेक्सिकन आहे म्हणून असे म्हटले नाही. मेक्सिकन असणे आणि बेकायदा मेक्सिकन घुसखोरांना सहानुभूती असणे हे दोन्ही कारणीभूत आहे. हा त्याच्या मते कॉन्फ्लिक्ट ओफ इंटरेस्ट आहे. जज काही आकाशातून पडलेला नाही की त्याचे निष्पक्ष असणे हे वादातीत असावे! एखादा श्वेतवर्णी न्यायाधीश बेकायदा घुसखोरीचा समर्थक असता तरी ट्रंपने त्याच्याबद्दल हेच म्हटले असते ह्याची खात्री आहे. आणि प्रत्येक आरोपीला आपली केस निष्पक्ष लढली जावी हे बघण्याचा अधिकार आहे. तो अधिकार वापरून त्याने ते मत मांडले. लोकांनी नेहमीप्रमाणे त्याच्या विधानाचा विपर्यास केलाच आहे. तो जे म्हणाला होता ते आणि माध्यमे जे आरोळ्या ठोकून बोलत आहेत त्यात तफावत आहेच आहे.

In reply to by हुप्प्या

ट्रंपचे वाक्य पाहिलेत तर त्याने असेच म्हटले आहे की हा जज मेक्सिकन आहे आणि तो कुठल्याशा संघटनेचा सदस्य आहे जिचा बेकायदा घुसखोरीला पाठिंबा आहे . त्यात निव्वळ मूळचा मेक्सिकन आहे म्हणून असे म्हटले नाही.
चूक. सॅन डिएगोत झालेल्या या मूळ भाषणाचा व्हिडिओ यूट्यूबवर आहे. त्यात साधारण त्रेचाळिसाव्या मिनिटाला ट्रम्पचं विधान आहे. त्यात ट्रम्पने सरळ जजला 'मेक्सिकन' म्हटलं आहे. मेक्सिकन हेरिटेजचा किंवा संघटनेचा त्यात उल्लेख नाही. त्या नंतरही अनेक इंटरव्ह्यूजमध्ये त्याने याचा पुनरुच्चार केला आणि ते पुरेसं वाटलं नाही म्हणून मुस्लिम जजेसनाही यात ओढलं. हे उघडउघड रेसिस्ट आहे. आणि तो कुठल्याशा संघटनेचा सदस्य आहे जिचा बेकायदा घुसखोरीला पाठिंबा आहे . हा ट्रम्पभक्तांनी नंतर लावलेला जावईशोध आहे. याचं वर नावानिशी खंडन केलेलं आहेच.

In reply to by नंदन

सॅन डिएगोच्या व्हिडियोत तो प्रथम असे म्हणाला की "हा जज माझा तिरस्कार करतो. तो माझा खरोखर तिरस्कार करतो". नंतर तो म्हणाला की हा जज माझ्या माहितीप्रमाणे मेक्सिकन आहे. तसे असण्यात काही प्रॉब्लेम नाही. वगैरे. नंतर सीएनेनला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्टीकरण दिले होते की जज मेक्सिकन आहे केवळ म्हणूनच नव्हे तर तो एका क्लबचा सदस्य आहे ज्याची मेक्सिकोला सहानुभूती आहे. ही लिंक् पहा ज्या संघटनेचा क्युरियेल सदस्य आहे तिचे पत्रक वाचा. त्यात त्यांनी बेकायदा घुसखोरीचे समर्थन केल्याचे दिसते. बेकायदा घुसखोर लोकांना भाड्याने जागा द्यायला नाकारण्याविरुद्ध संघर्ष असा एक उल्लेख त्यात आहे. अशा संघटनेचा सदस्य असणारा न्यायाधीश असेल तर तो ट्रंप ज्याने उघड घुसखोरीला विरोध केला आहे त्याला निष्पक्ष न्याय मिळण्याविषयी नक्कीच शंका निर्माण होईल. त्यामुळे ट्रंपचा संशय अगदीच गैर नाही. जाता जाता, राझा ह्या स्पॅनिश शब्दाचा अर्थ वंश (रेस) असाच आहे.

In reply to by हुप्प्या

>>> सॅन डिएगोच्या व्हिडियोत तो प्रथम असे म्हणाला की "हा जज माझा तिरस्कार करतो. तो माझा खरोखर तिरस्कार करतो". नंतर तो म्हणाला की हा जज माझ्या माहितीप्रमाणे मेक्सिकन आहे. --- म्हणजे त्या भाषणात, ह्या संघटनेचा काही उल्लेख नव्हता हे तुम्हांला मान्य आहे तर. धन्यवाद. (सीएनएनवरची मुलाखत या भाषणानंतर एका आठवड्याने होती. त्यातही ट्रम्पने वारंवार जजला 'मेक्सिकन' असंच संबोधलं. संघटनेचा उल्लेख एखादवेळेलाच केला.) वर म्हटल्याप्रमाणे, त्याने पुढे जाऊन मुस्लिम जजेसनाही यात ओढलं. हे तरी तुम्हांला रेसिस्ट वाटतं की नाही? का हेदेखील नेहमीप्रमाणे मीडियानेच वदवून घेतलेलं वक्तव्य आहे? आणि अजूनही तुम्हांला याबाबत मीडियाच दोषी वाटत असेल, तर असा लेचापेचा अध्यक्ष ज्याच्याकडून मीडिया इतक्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल (अ‍ॅबॉर्शनबद्दल महिलांना शिक्षा, न्युक्लिअर प्रॉलिफरेशन, रेसिस्ट विधानं) काहीही वदवून घेऊ शकते, तो काय कामाचा? >>> ज्या संघटनेचा क्युरियेल सदस्य आहे तिचे पत्रक वाचा. त्यात त्यांनी बेकायदा घुसखोरीचे समर्थन केल्याचे दिसते. बेकायदा घुसखोर लोकांना भाड्याने जागा द्यायला नाकारण्याविरुद्ध संघर्ष असा एक उल्लेख त्यात आहे. --- पत्रकात बेकायदा घुसखोरीचे समर्थन कुठेही आढळले नाही. तुम्ही ज्या संघर्षाचा उल्लेख केला आहे, तो कायदा कधीच अस्तित्वात आला नाही - त्याविरुद्ध आवाज उठवणार्‍यांमागे स्थानिक श्वेतवर्णीय लोकही होते. स्थानिक नगरपालिकेच्या कार्यकक्षेबाहेर तो असल्याने, तो कुठल्याही न्यायालयात टिकला नसता. पण, मुख्य मुद्दा म्हणजे ट्रम्पने किंवा त्याच्या कॅम्पेनने ज्या संघटनेकडे निर्देश केला ती ही संघटना नव्हेच.
When Trump began his public tirade against Curiel, Trump campaign spokeswoman Katrina Pierson and other supporters conflated the two groups, which both use “La Raza.” But now, even conservative groups have acknowledged that they are separate organizations.
वर म्हटल्याप्रमाणे, आधी आरोप करायचा की जज 'लिट्टे'चा मेंबर आहे आणि मग तो पुण्यातल्या 'तामिळ संघाचा' आहे असं समजल्यावर त्यांच्या पत्रकातल्या एका निदर्शनाकडे लक्ष वेधायचं - असा हा प्रकार झाला. कॉन्स्पिरसी थिअरींचा भांडेफोड करणारी स्नोप्स.कॉम (http://www.snopes.com/judge-curiel-la-raza-kkk/) किंवा फॅक्ट-चेकिंग साईट्स (https://www.washingtonpost.com/news/fact-checker/wp/2016/06/07/trump-su…) काय म्हणतात ते पहा.
जाता जाता, राझा ह्या स्पॅनिश शब्दाचा अर्थ वंश (रेस) असाच आहे.
La Raza (उच्चारः 'रासा') चा संदर्भाने अर्थ - Many people incorrectly translate the name, “La Raza,” as “the race.” While it is true that one meaning of “raza” in Spanish is indeed “race,” in Spanish, as in English and any other language, words can and do have multiple meanings. As noted in several online dictionaries, “La Raza” means “the people” or “the community.” Translating our name as “the race” is not only inaccurate, it is factually incorrect. “Hispanic” is an ethnicity, not a race. As anyone who has ever met a Dominican American, Mexican American, or Spanish American can attest, Hispanics can be and are members of any and all races.

In reply to by नंदन

तरीही ट्रंप हा वंशद्वेष्टा नाही, नाह, नाही. १. जर ट्रंपने चुकीचा समज केला असेल तर ती एक चूक आहे त्यात वर्णद्वेष कुठून आला? एक हॉनेस्ट मिस्टेक म्हणून मानायची माझी तरी तयारी आहे. आपली दिसत नाही आहे. तेव्हा तुम्हाला हवे तसे समजा. २. ह्या संघटनेचे पत्रक आपला प्रो मेक्सिकन पवित्रा स्पष्ट करत आहे. जर तसे असेल तर जजने आपणहून रजा घ्यायला हवी होती. हा सरळ सरळ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. जजला इतकाही सद्सद विवेक नसेल तर धन्य आहे! पुण्याचा तमीळ संघ आणि लिट्टे ह्यांची इथे तुलना साफ गैरलागू आहे. ह्या जजची संघटनाही बेकायदा घुसखोरीचे समर्थन करते असेच ध्वनित होते आहे. तुम्हाला मान्य नसेल तर ठीकच आहे. पण मला तरी ह्या पत्रकातील मजकूरावरून ह्याची खात्री पटली आहे. राझाचा एक अर्थ रेस असा आहे हे मान्य केलेत त्याबद्दल धन्यवाद!

In reply to by हुप्प्या

मी पुन्हा एकदा विचारतो: 'एखादा जज मुस्लिम धर्मीय आहे, म्हणून तो बायस्ड् आहे' हे ट्रम्पचे (रेसिझमची मूर्तिमंत व्याख्या असणारे) विधान तुमच्या मते, रेसिस्ट आहे की नाही?

In reply to by नंदन

जर मी मुस्लिम धर्माच्या कट्टरपणाविरुद्ध जाहीर भूमिका मांडली असेल आणि जज जर उघड उघड अत्यंत धार्मिक मुस्लिम असेल तर मी अशा जजच्या भानगडीत पडण्याचा धोका न पत्करता जज बदलण्याची मागणी करेन. खरे तर जजनेच आपणहून समजूतदारपणा दाखवून माझ्या केसमधे कुठलीही भूमिका न बजावण्याचे ठरवले पाहिजे अशी मी एका सभ्य जजकडून अपेक्षा करेन. अशा वेळेस जजने आपणहून प्रकरणातून अंग काढून घेणे उचित आहे असे आपणास वाटत नाही का? उगाच निर्णयाबाबत संशय यायला नको म्हणून तरी जजने बाहेर पडणेच उचित आहे. जर जज निष्पक्ष असेल तर त्याच्या जागी दुसरा जज आल्याने निर्णय वेगळा होणार नाही. आणि नसेल तर अशा जजने त्या प्रकरणात न गुंतणेच उत्तम आहे. अशा भूमिकेत असताना संशयाला ०.०००००१ टक्काही जागा रहाता कामा नये.

In reply to by हुप्प्या

>>> जर मी मुस्लिम धर्माच्या कट्टरपणाविरुद्ध जाहीर भूमिका मांडली असेल आणि जज जर उघड उघड अत्यंत धार्मिक मुस्लिम असेल --- ही स्पेशलाईज्ड केस झाली. माझा मूळ प्रश्न अद्यापही कायम आहे. >>> उगाच निर्णयाबाबत संशय यायला नको म्हणून तरी जजने बाहेर पडणेच उचित आहे. जर जज निष्पक्ष असेल तर त्याच्या जागी दुसरा जज आल्याने निर्णय वेगळा होणार नाही. आणि नसेल तर अशा जजने त्या प्रकरणात न गुंतणेच उत्तम आहे. --- ही सेल्फ-फुलफिलिंग प्रोफेसी झाली. ट्रम्प सुमारे ३५०० खटल्यांत गुंतला आहे. सगळीकडेच असं करत बसणार का? आणि मग स्त्री/पुरुष, कॅथलिक/प्रॉटेस्टंट, इस्ट कोस्टावरचा/वेस्ट कोस्टावरचा असले अनंत भेद आहेत.

In reply to by नंदन

एक हाय प्रोफाईल व्यक्तिमत्त्व आहे. त्याची भूमिका अनेकांना वादग्रस्त वाटते आहे. अशा माणसाला जज निवडताना कष्ट होणारच. एखाद्या गाजलेल्या केसकरता ज्यूरी निवडणे हे प्रचंड कष्टाचे, वेळखाऊ काम असते. ते कशासाठी? निष्पक्ष ज्यूरी निवडणे अवघड होते. केसच्या प्रसिद्धीमुळे लोकांचे मत आधीच बनलेले असते. तसे न बनलेले लोक शोधणे अवघड असतेच. तीच परिस्थिती ट्रंपबाबत आहे. काहीही फरक नाही. वलयांकित केसमधे ज्यूरी निवडताना होणारी दिरंगाई ही तुम्हाला तितकीच खटकते का? न्यायाधीश काही आकाशातून पडत नाही. तोही माणूसच असतो. त्यालाही पूर्वग्रह असू शकतात. तेव्हा एखादा जज सकारण बदलण्याचा आग्रह केला तर काही आकाश कोसळत नाही.

In reply to by नंदन

>>हे म्हणजे, चोरीचा आळ असलेल्या माणसावर त्याने यापूर्वी अनेकवेळा संधी मिळूनही चोरी न केल्याने त्याला चोर म्हणता येईल यासारखं तर्कट झालं. अहो, एक म्हणजे चोरी हा कायद्याने गुन्हा आहे. पण चोरीच्या बाबतीतही एखादा जज हा पहिल्यांदा गुन्हा करणार्‍याला शिक्षा देताना कमीच देतो. निर्ढावलेल्या गुन्हेगाराला जास्त कठोर शिक्षा होते असा जगभरात नियम आहे. त्यामुळे ह्या कृत्यामागे वंशद्वेष आहे का हे पहाताना ट्रंपला वंशद्वेष्टी पार्श्वभूमी आहे का ते तपासून पाहिले. ह्यात तर्कदुष्ट काय आहे? एखादा माणूस खोटारडा आहे असे सिद्ध करायचे असल्यास त्याने मागे अनेक वेळा खोटे बोललेले आहे हे सिद्ध केले तर आपल्या दाव्याला वजन येते. तसेच यापूर्वी त्याने खोटे बोललेले आढळत नाही असे सिद्ध झाले तर हा दावा कमजोर होतो. हा साधा कॉमन सेन्स आहे. तरीही, असे बोलणे हा फौजदारी वा दिवाणी खटला गुदरयाला पुरेसे कारण असेल तर ट्रंपविरोधकांनी तसे का बरे केले नाही अद्याप? समजा ट्रंपने ह्या जजच्या कुठल्याशा संघटनेशी असणारा संबंध चुकीचा लावून चुकीचा निष्कर्ष काढला आहे, तरी तो वंशद्वेष्टा कसे बरे म्हणता येईल? फारतर त्याने (जाणूनबुजून वा चुकून) चुकीची माहिती वापरून चुकीचे निष्कर्ष काढले म्हणता येईल.

In reply to by हुप्प्या

>>> त्यामुळे ह्या कृत्यामागे वंशद्वेष आहे का हे पहाताना ट्रंपला वंशद्वेष्टी पार्श्वभूमी आहे का ते तपासून पाहिले. ह्यात तर्कदुष्ट काय आहे? --- पार्श्वभूमी - क्र. १) Donald Trump Was Once Sued By Justice Department For Not Renting To Blacks (दुवा) Trump responded in characteristic fashion — holding a press conference to call the charges “absolutely ridiculous.” He told the New York Times: “We never have discriminated and we never would. There have been a number of local actions against us and we’ve won them all. We were charged with discrimination and we proved in court that we did not discriminate.” He later took the uncommon step of suing the Justice Department for defamation, seeking $100 million in damages. His lawyer was Roy Cohn, the infamous former Joseph McCarthy aide, who was known for his hard-ball tactics. Cohn called up the federal official in charge of the case — J. Stanley Pottinger, the head of DOJ’s Civil Rights division — to demand that the lawyer handling the lawsuit be fired. (हे टॅक्टिक्स ओळखीचे वाटताहेत का? :)) Pottinger told The Huffington Post that his reaction at the time was “I don’t think so. That’s up to me and that’s not going to happen. I called [lawyer] Donna [Goldstein] into my office and said, ‘Keep up the good work.’” The suit, which Pottinger called a “media gimmick done for local consumption,” was dismissed and the judge criticized Cohn for “wasting time and paper from what I consider to be the real issues” - discriminating against blacks in apartment rentals. Two years later, Trump Management settled the case, promising not to discriminate against blacks, Puerto Ricans and other minorities. As part of the agreement, Trump was required to send its list of vacancies in its 15,000 apartments to a civil-rights group, giving them first priority in providing applicants for certain apartments, according to a contemperaneous New York Times account. Trump, who emphasized that the agreement was not an admission of guilt, later crowed that he was satisfied because it did not require them to “accept persons on welfare as tenants unless as qualified as any other tenant.” But the company didn’t sufficiently fulfill its promise, because three years later, the Justice Department charged Trump Management with continuing to discriminate against blacks through such tactics as telling them that apartments were not available. क्र. २) Here Are 10 Examples Of Donald Trump Being Racist (http://www.huffingtonpost.com/entry/donald-trump-racist-examples_us_56d…) क्र. ३) The Sept. 11 attacks — "Thousands and thousands" of Muslims cheering in the streets (दुवा) Campaigning in Alabama last November, Trump claimed that Muslims in New Jersey celebrated the attacks on the World Trade Center on Sept. 11, 2001: "Hey, I watched when the World Trade Center came tumbling down. And I watched in Jersey City, N.J., where thousands and thousands of people were cheering as that building was coming down. Thousands of people were cheering. So something's going on. We've got to find out what it is." Trump repeated the claim multiple times over the following days, repeating an Internet rumor that has circulated since the attacks despite comprehensive reporting from that time that debunked the claims. FactCheck.org ran down Trump's various claims and concluded: "What's clear to us — and should be to Trump — is that there were no widespread televised celebrations in New Jersey on 9/11. In fact, what Trump described would have been big news, and the reporters at the Daily News, Star-Ledger and elsewhere who tried and failed to track down rumors of 9/11 celebrations could have just turned on the TV to get their story." क्र. ४) Trump retweets apparent neo-Nazi for the second time this year (दुवा) क्र. ५) Shocking. Another White Nationalist Trump Delegate (दुवा) बाकी वर विकास यांनी उद्धृत केलेलं भाषण हाही एक ताजा मासला आहेच.

In reply to by नंदन

आरियाना हफिंग्टन ह्या बाईला ट्रंपबद्दल कमालीचा तिरस्कार आहे हे उघड आहे. तेव्हा निव्वळ हफिंग्टन पोस्टची साक्ष देणे म्हणजे मोदीविरुद्ध मणी शंकर अय्यर वा दिग्विजय सिंगाची साक्ष करण्यासारखे आहे. हफिंग्टन पोस्टचा प्रत्येक दावा हा कमालीचा पूर्वग्रहदूषित आहे असे मला वाटते. गेल्या वर्षभरात ट्रंपबद्दल वाईटात वाईट गरळ ओकण्यात हे प्रकाशन आघाडीवर आहे. अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन ह्या गोष्टीचा ब्लॅकमेलिंगसाठी उपयोग अनेकदा केला गेला असेल. ट्रंपची कंपनी अशा प्रकाराला बळी पडून प्रकरण वाढू नये म्हणून लाच देऊन मोकळे झाले असतील. जेसी जॅक्सन हा काळ्या लोकांचा नेता अशा प्रकारे शेकडाऊन करण्यात वाकबगार आहे. ओबामाला पाठिंबा देणार्‍यात अनेक काळे लोक हे अत्यंत वर्णद्वेष्टे होते. अल शार्प्टन वगैरे आहेतच. शिवाय अन्य काळ्या संघटनांचे लोक त्याहून जास्त कडवे आहेत जे गोर्यांचा तीव्र द्वेष करतात. त्यांच्या विरुद्ध हिंसा करणे ह्यात त्यांना काही गैर वाटत नाही. ह्या सगळ्यांचा पाठिंबा मिळवणार्‍या ओबामाला अशा लोकांच्या वर्णद्वेष्टेपणाचा कलंक लागतो का?

In reply to by हुप्प्या

अपेक्षित प्रतिवाद. Everyone is entitled to his own opinion, but not his own facts - हे वाक्य आठवलं. चालू द्या.

In reply to by नंदन

खरं म्हणजे तुमचा ट्रंपबाबत त्यांच्या बोलण्या-वागण्यावरूनचा विरोध स्पष्ट दिसत आहे. म्हणून तुम्ही या चर्चेतून स्वतःला recuse करून घेतले पाहीजे.

In reply to by नंदन

९/११ झाल्यावर न्यू जर्सीत हजारो मुस्लिम लोक आनंद व्यक्त करत होते हे ट्रंपचे विधान अतिशयोक्त आहे पण पूर्ण खोटे नाही. काही न्यू जर्सी पोलिसांच्या रिपोर्टमधे असा उल्लेख आहे की तिथल्या अनेक भागात छोट्या छोट्या संख्येने मुस्लिम लोक आनंद साजरा करत होते. लोक अल्लाहू अकबर च्या आरोळ्या ठोकत होते. अशा लोकांची शिरगणती केलेली नाही तेव्हा ते हजारो होते का शेकडो हे माहित नाही पण ह्या भयंकर घटनेच्या इतक्या जवळ असणार्‍या लोकांना आनंद व्यक्त करावासा वाटला हे जास्त भयंकर आहे!

In reply to by हुप्प्या

इंदिरा गांधींना मारले तेंव्हा पंजाबमधे फटाके उडवण्यात आले. आता याचा अर्थ सगळे शिख वाईट ठरतात का? आणि म्हणून मग जे काही दिल्लीत हत्याकांड झाले ते समर्थनीय ठरते का? मुस्लीम समुदायात अधिक धर्मांधता आहे, धार्मिक मुलतत्ववाद आहे असे म्हणले तर गैर नाही. पण सरसकट समुदायाला नावे ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यातून हिटलरशाही तयार होते. अर्थात, (या संदर्भात) केवळ मुसलमान म्हणल्यावर त्या व्यक्तीवर संशय घेणे जितके चूक आहे तितकेच केवळ मुसलमान (पक्षी: अल्पसंख्य वगैरे) आहे म्हणून संशयाचा अतिरेकी फायदा देणे पण चुकीचे आहे. म्हणून त्यातून असे लेबलिंग काढणे महत्वाचे आहे आणि मग जे काही आहे त्याला त्या अनुसरून कायदेशीर प्रतिक्रीया देणे योग्य ठरते. ह्या भयंकर घटनेच्या इतक्या जवळ असणार्‍या लोकांना आनंद व्यक्त करावासा वाटला हे जास्त भयंकर आहे! ह्या संदर्भात अधिक - एकंदरीत मुस्लीम समाज कसा वागला हे काही मी जवळून पाहीलेले नाही. त्यामुळे त्यावर बाजूने अथवा विरोधात भाष्य करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण बर्‍याचदा अशा घटनांच्या वेळेस राईचा पर्वत कसा होऊ शकतो याचे आता मजेशीर वाटेल असे एक उदाहरण गांधीहत्येच्या वेळचे आहे. आचार्य अत्र्यांच्या "अशा गोष्टी अशा जमती' मधे त्यांनी ही आठवण सांगितली आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे पण येथे नुसता गोषवारा: ३० जानेवारी १९४८ला सातारला पत्रकार संमेलनासाठी जाण्याच्या रस्त्यावर अत्रे आणि अजून काही तत्कालीन पत्रकार हे वाईला तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्र्यांच्या घरी उतरले होते. आता तर्कतिर्थ हे यशवंतरावांच्या आणि तत्कालीन काँग्रेसनेत्यांच्या जवळचे. पक्षि: संघ अथवा इतर "हिंदू" संघटना-विचारवंतापैकी ते नव्हते. हे केवळ पुर्वपिठीका म्हणून सांगितले. तर्कतिर्थांच्या कार्याबद्दल आदर आहे! तर्कतिर्थांच्या घरात सगळे जरा कुठे स्थिरस्थावर झाले तर अचानक बाहेर गडबड गोंधळ ऐकायला आला. (परत, याचे वर्णन, अत्र्यांच्या शब्दांमधे वाचण्यासारखे आहे). हे सगळे पण बाहेर जाऊन बघू लागले काय झाले. मग आधी नुसतीच कुणकुण लागली मग खात्री झाली की दुर्दैवाने गांधी हत्या झाली आहे. पुढचा भाग माझ्याकडे चित्ररुपात आहे तो खाली डकवतो. वाचल्यावर काय म्हणायचे आहे ते समजेल! :) Acharya Atre

In reply to by विकास

गांधी मेले म्हणून मेजवानी केली नव्हती. मेजवानी आधीच नियोजित होती. ती रद्द केली नाही इतकेच. न्यू जर्सीतील मुस्लिम नेहमीच अल्ला हू अकबरच्या आरोळ्या ठोकत रस्त्यात वावरतात आणि ९/११ झाल्यावर ह्या आरोळ्या रद्द झाल्या नाहीत असे काही म्हणणे असेल तर कदाचित गांधीहत्येच्या वर्णनाशी मिळतेजुळते होईल. पण इथे तसे झाले नाही. अल्ला हू अकबर हे विजयोत्सव साजरा करणे होते आणि ते ९/११ ची थेट प्रतिक्रिया म्हणून होते. अर्थातच सगळे मुस्लिम तसे करत नव्हते. पण काही लोकांचे जल्लोष करणे हे धोक्याची घंटा आहे. ===== इंदिरा गांधींना मारले तेंव्हा पंजाबमधे फटाके उडवण्यात आले. आता याचा अर्थ सगळे शिख वाईट ठरतात का? आणि म्हणून मग जे काही दिल्लीत हत्याकांड झाले ते समर्थनीय ठरते का? === ह्या प्रश्नाचा ट्रंपच्या विधानाशी काय संबंध? ट्रंपने कुठले हत्याकांड घडवून आणले आहे? == मुस्लीम समुदायात अधिक धर्मांधता आहे, धार्मिक मुलतत्ववाद आहे असे म्हणले तर गैर नाही. पण सरसकट समुदायाला नावे ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यातून हिटलरशाही तयार होते. अर्थात, (या संदर्भात) केवळ मुसलमान म्हणल्यावर त्या व्यक्तीवर संशय घेणे जितके चूक आहे तितकेच केवळ मुसलमान (पक्षी: अल्पसंख्य वगैरे) आहे म्हणून संशयाचा अतिरेकी फायदा देणे पण चुकीचे आहे. म्हणून त्यातून असे लेबलिंग काढणे महत्वाचे आहे आणि मग जे काही आहे त्याला त्या अनुसरून कायदेशीर प्रतिक्रीया देणे योग्य ठरते. == दुसरे टोक असे आहे की बिन लादेन वगैरे मंडळी मुस्लिम नाहीतच अशी ढोंगी हाकाटी पिटवणे. आयसिसचा इस्लामशी संबंध नसल्याचा मूर्ख दावा करणे. शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून संकट नाहीसे होईल अशी आशा करणे. इस्लामचे तत्त्वज्ञान वापरून अतिरेक, दहशतवाद करणारे अनेक आहेत. त्यांना कमी अधिक सहानुभुती देणारे खूप जास्त आहेत. शरिया सारखे कायदे आणावेत, धर्मनिंदा, प्रेषितनिंदा करणार्‍यांना मृत्यूदंड दिला जावा असे म्हणणारे तर प्रचंड संख्येने आहेत. इजिप्त, पाकिस्तान, बांगला देश, ट्युनिशिया, इंडोनेशिया ह्या देशात अशा लोकांची संख्या ५० टक्क्याहून कितीतरी जास्त आहे. हे सगळे धर्मामुळे, धर्मात सुधारणा न करण्याच्या अट्टाहासापायी होते आहे. आणि डेमोक्रॅट्स हे नाकारण्यात धन्यता मानत आहेत त्यामुळे ट्रंपसारखे रोखठोक बोलणारे लोकांना जास्त आवडत आहेत.