Skip to main content

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)

लेखक गॅरी ट्रुमन यांनी बुधवार, 09/03/2016 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक या आधीच्या धाग्यावर १६० पेक्षा जास्त प्रतिसाद आले आहेत. त्यामुळे भविष्यात चर्चा वाचणे सोयीचे व्हावे या उद्देशाने हा नवा धागा काढत आहे. त्या धाग्यात उल्लेख झालेल्या मुद्द्यांवर काही मते मांडायची असतील तर त्या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत आणि नवे मुद्दे या धाग्यावर मांडावेत ही विनंती. गरज भासल्यास तिसरा धागाही भविष्यात काढेन. तसेच भारतातल्या निवडणुकांप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी स़काळपासून निकाल पोस्ट करायचाही मानस आहे. तसेच भारतातल्या निवडणुकांच्या वेळी प्रश्नमंजुषा सुरू केली होती त्याप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांसाठीही प्रश्नमंजुषा मिपावर काढायचा मानस आहे. त्यासाठी प्रश्न बनविणे सुरूही केले आहे. प्रश्न साधारणपणे जून-जुलैपासून पोस्ट करेन. भारतातल्या निवडणुकांप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये तितक्या प्रमाणात सर्वच मिपाकरांना रस असेल असे नाही.तरीही मराठी आंतरजालावर या निवडणुकांसाठी जितकी होईल तितकी परिपूर्ण माहिती केवळ आपल्या मिपावर असावी या उद्देशाने हे काम तसे लवकरच हाती घेतले आहे. मिशिगन आणि मिसिसीपीमध्ये दोन्ही पक्षांच्या तर आयडॅहो आणि हवाईमध्ये केवळ रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरी मंगळवारी झाल्या.त्यातील काही निकाल आले आहेत.ते थोड्या वेळेत इथे प्रतिसादात पोस्ट करेन. क.लो.अ गॅरी ट्रुमन यापूर्वीचे लेखनः अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक

वाचने 66530
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

मंगळवार ८ मार्च रोजी दोन्ही पक्षांच्या मिशिगन आणि मिसिसीपी राज्यांमध्ये प्रायमरी झाल्या. तर रिपब्लिकन पक्षाची आयडॅहो आणि हवाईमध्ये प्रायमरी झाली. या प्रायमरीचा सगळ्यात अनपेक्षित निकाल मिशिगनमध्ये डेमॉक्रॅटिक प्रायमरीचा लागला आहे.सर्व जनमतचाचण्यांमध्ये हिलरी क्लिंटन आरामात जिंकणार असे कल आले होते.पण प्रत्यक्षात बर्नी सँडर्स यांनी सुमारे २% मते अधिक घेऊन ही प्रायमरी जिंकली. असे म्हटले जात आहे की बिल क्लिंटन अध्यक्ष असताना त्यांनी कॅनडा आणि मेक्सिकोबरोबर North American Free Trade Agreement केले होते.त्यामुळे अमेरिकेत जो थोडाफार मॅन्युफॅक्चरींगचा बेस मिशिगन-ओहायोमध्ये होता त्याला धक्का लागला.त्याचा तोटा हिलरींना होताना दिसला.तसेच हिलरींनी केवळ डिट्रॉईटमध्येच प्रचार केला पण बर्नी सँडर्स यांनी मिशिगनच्या इतर भागांमध्येही सभा घेतल्या.एकेकाळी जगाची Automobile Capital असलेल्या डिट्रॉईट आणि डिअरबॉर्नमध्ये हिलरींना मोठी आघाडी मिळाली आहे. कदाचित या भागात पूर्वी नोकरीला असलेले कर्मचारी आता डिट्रॉईटमध्ये राहात नाहीत त्यामुळे त्यांच्या मतांचा फटका हिलरींना खुद्द डिट्रॉईट आणि डिअरबॉर्नमध्ये न बसता राज्याच्या इतर भागात बसला. तसेच डिट्रॉईटमध्ये आफ्रिकन अमेरिकनची संख्या लक्षणीय आहे.हे मतदार हिलरींचे समर्थक आहेत त्याचाही फायदा हिलरींना त्या भागात होताना दिसत आहे. भाप्रवे सकाळी सी.एन.एन वर बघितले की मिशिगनमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांचा तर रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प यांचा विजय होणे हे डेमॉक्रॅटिक पक्षासाठी फार चांगले लक्षण नाही.हे दोन्ही उमेदवार फ्री-ट्रेडच्या विरोधात आहेत.जर या कारणामुळे हे मतदार अधिक कॉन्झर्व्हेटिव्ह उमेदवारांना मत देत असतील तर त्याचे परिणाम देशाच्या इतर भागात (विशेषतः कॅलिफॉर्निया आणि न्यू यॉर्क या परदेशी लोकांची संख्या लक्षणीय असलेल्या भागात) बघायला मिळतील.विशेषत: हिलरी विरूध्द ट्रम्प ही लढत असेल तर या दोन महत्वाच्या राज्यांमधून फ्री-ट्रेडची झळ बसलेले मतदार ट्रम्पच्या दिशेने झुकतील ही शक्यता आहेच. आतापर्यंत लागलेले निकाल पुढीलप्रमाणे:
    
  रिपब्लिकन पक्ष  
 मिसिसीपीमिशिगनआयडॅहोआतापर्यंत
डॉनल्ड ट्रम्प242510446
टेड क्रुझ131714347
मार्को रूबिओ000151
जॉन कॅसिक017054
इतर00015
एकूण3759241013
     
  डेमॉक्रॅटिक पक्ष  
 मिसिसीपीमिशिगन आतापर्यंत
हिलरी क्लिंटन2958 1221
बर्नी सँडर्स465 571
एकूण33123 1792
तर डेमॉक्रॅटिक पक्षात पुढील चित्र आहे:
   
 सुपर डेलीगेटअन्य डेलिगेटएकूण
हिलरी क्लिंटन4617601221
बर्नी सँडर्स25546571
एकूण48613061792
रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प यांची घोडदौड थांबविण्यात टेड क्रुझ यांना या प्रायमरीमध्ये अपयश आले.जॉन कॅसिक यांची कामगिरी या प्रायमरीमध्येही निराशाजनकच राहिली.मिशिगन हे त्यांच्या ओहायोच्या शेजारचेच राज्य असल्यामुळे मिशिगनमधून त्यांची कामगिरी त्या मानाने चांगली होईल अशी अपेक्षा होती.पण तसे झालेले नाही. रिपब्लिकन पक्षाच्या कॉकसेसमध्ये हवाईमध्ये भाप्रवे प्रमाणे मतदान उशीरापर्यंत चालू होते (मिशिगन आणि हवाईच्या स्थानिक वेळेत ५ तासांचा फरक आहे).मतमोजणी सुरू झाली आहे.आतापर्यंत ८% मते मोजून झाली आहेत. त्यात डॉनल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. तिथले निकाल आले की पोस्ट करेनच.

हवाई कॉकसेसचा निकाल हाती आला आहे. हवाईमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांनी ४२.४% मते घेऊन १० प्रतिनिधी तर टेड क्रुझ यांनी ३२.७% मते घेऊन ६ प्रतिनिधी मिळवले आहेत. मार्को रूबिओ आणि जॉन कॅसिक यांचा या राज्यातही फारसा प्रभाव दिसलेला नाही. भाप्रवे सकाळी रिपब्लिकन पक्षातील प्रतिनिधींचे आकडे पोस्ट केले होते.त्यानंतर हवाईमधील कॉकसेसचे निकाल हाती आले. बहुदा मधल्या काळात अनबाऊंड डेलिगेटमध्ये (डेमॉक्रॅटिक पक्षातील सुपरडेलीगेटना समकक्ष) काही बदल झाले असावेत.सध्याचे आकडे पुढीलप्रमाणे आहेत--
 
 आतापर्यंत
डॉनल्ड ट्रम्प458
टेड क्रुझ359
मार्को रूबिओ151
जॉन कॅसिक54
इतर15
एकूण1037

हा शब्द मला बुचकळ्यात टाकत आलेला आहे. हा एकवचनी वापरायचा का नाही की कायम अनेकवचनीच? काही लोक त्याचे अनेकवचन कॉकाय असे करतात ते बरोबर आहे का? हवाईचा कॉकस का हवाईचे कॉकसेस? अत्यंत विचित्र शब्द आहे हा!

In reply to by हुप्प्या

नुसार Caucuses हा शब्द आहे. काॅकाय म्हटल्यावर Coci हा एका जातीच्या जीवाणूंसाठी वापरला जाणारा शब्द सापडला.

In reply to by हुप्प्या

कॉकस म्हणजे पक्षाने राज्यात स्वखर्चाने आयोजित केलेले मेळावे. अर्थातच राज्याचा आकार लक्षात घेता हे मेळावे एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी आयोजित केले जातात.त्यामुळे अनेकवचनी या अर्थी कॉकसेस असे लिहिले आहे. कॉकाय हा उच्चार ऐकलेला नाही.अमेरिकेत सर्व जगातून लोक येतात आणि प्रत्येक माणूस आपल्या मुळच्या ठिकाणची इंग्रजीची छाप घेऊन येतो.त्यामुळे काही लोक कॉकाय हा उच्चार करत असतीलही. (माझे अमेरिकन विद्यापीठातील अ‍ॅडव्हाजर दक्षिण भारतीय आहेत.ते अमेरिकेत कित्येक वर्षे राहत असूनही 'एम' ला 'यम' आणि 'एन' ला 'यन' आणि 'सर्किट' ला 'सर्क्युट' म्हणतात. असे उच्चार दक्षिण भारतात सर्रास ऐकायला मिळतात).

गेल्या काही दिवसांमधील घडामोडी: १. डॉ. बेन कार्सन यांनी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यापासून माघार घेतली आहे. अर्थातच बेन कार्सन हे रिपब्लिकन पक्षाचे फार आघाडीचे दावेदार आहेत असे नाही त्यामुळे त्यांनी माघार घेतल्यामुळे फार उलथापालथ होईल अशातला भाग नाही. तरीही आणखी एक उमेदवार आता कमी झाला आहे. १५ फेब्रुवारीला महत्वाच्या राज्यांमध्ये प्रायमरी/कॉकसेस झाली की बहुदा जॉन कॅसिक आणि (कदाचित) मार्को रूबिओ हे सुध्दा माघार घेतील आणि शेवटी डॉनल्ड ट्रम्प आणि टेड क्रुझ हे दोन उमेदवार राहतील. बेन कार्सन यांना माघार घेतल्यानंतर डॉनल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहिर केला आहे. २. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांची शुक्रवारी ११ मार्चला मायामी, फ्लॉरीडा येथे चर्चा झाली. एकूणच रिपब्लिकन पक्षाचा क्लायमेट चेंजवर विश्वास नाही. त्या चर्चेतही हेच प्रतिबिंब उमटले. विशेषत: डॉनल्ड ट्रम्प यांचा तर क्लायमेट चेंज या कल्पनेलाच विरोध आहे. जर क्लायमेट चेंजमुळे समुद्राची पातळी वाढली तर फ्लॉरीडा राज्याला विशेषत: मायामीला धोका उत्पन्न होऊ शकतो. नेमक्या त्याच ठिकाणी बोलताना क्लायमेट चेंजविरोधी भूमिका त्यांनी घेणे हे विशेष. अध्यक्ष बराक ओबामा पुढच्या आठवड्यात क्युबाच्या ऐतिहासिक भेटीवर हॅवानाला रवाना होणार आहेत. ही क्युबाला दिलेली गेल्या ८८ वर्षातील पहिली अमेरिकन अध्यक्षाची भेट असेल. डॉनल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक शैलीला अनुसरून त्यालाही विरोध केला आहे. ३. डॉनल्ड ट्रम्प यांच्या शिकागोमधील सभेच्या वेळी ट्रम्प विरोधक आणि ट्रम्प समर्थक यांच्यात हाणामारी झाली आणि त्यातून ट्रम्प यांना आपली सभा रद्द करावी लागली.

In reply to by गॅरी ट्रुमन

डॉनल्ड ट्रम्प यांच्या शिकागोमधील सभेच्या वेळी ट्रम्प विरोधक आणि ट्रम्प समर्थक यांच्यात हाणामारी झाली आणि त्यातून ट्रम्प यांना आपली सभा रद्द करावी लागली.
हे ऐकून जरा गंंमत वाटली.

In reply to by गॅरी ट्रुमन

रिपब्लिकन लोकांचे असे म्हणणे आहे की हवामान हे नित्य बदलत असते. त्यात नवीन काही नाही. गेली लाखो वर्षे हवामान बदलाची चक्रे फिरत आहेत. अनेक हिमयुगे आली आणि गेली. सध्याचा हवामान बदल हा तसाच आहे. त्यामागे मानवाचे कर्तृत्त्व नाही. प्रदूषण वगैरे गोष्टींमुळे हवामानावर परिणाम होतो. निदान स्थानिक पातळीवर तरी होतोच. त्याबाबतीत अमेरिकेने प्रयत्न करुन परिस्थिती सुधारली आहे. वाहने जास्त स्वच्छ, कमी प्रदूषण करणारी बनवली आहेत. मात्र भारत व चीनसारखे देश अफाट प्रदूषण करतात. त्यांच्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कितीतरी मोठे आहे. ह्या आणि अशा देशांच्या चुकीची शिक्षा अमेरिकेला का? जाचक हवामानविषयक कायदे, कार्बन कर वगैरे गोष्टींचा त्रास हा सामान्य अमेरिकन नागरिकांनाच होणार. त्यांच्या नोकर्‍या जाणार आणि खर्च वाढणार. आणि एवढे करुन समुद्राची पातळी न वाढण्याची खात्री कोण देणार? म्हणून आमचा त्याला विरोध आहे असे रिपब्लिकन मत आहे.

In reply to by हुप्प्या

मात्र भारत व चीनसारखे देश अफाट प्रदूषण करतात. त्यांच्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कितीतरी मोठे आहे. >> याला काही विदा आहे का? मी आजपर्यंत जितके वाचले आहे त्यात चीन काही बाबतीत अमेरिकेच्या पुढे असला (total emissions) तरी अमेरिका अनेक बाबतीत आघाडीवर आहे(emissions per capita). भारत यात पहिल्या तिनातही(अजून तरी) नाही. जाचक हवामानविषयक कायदे, कार्बन कर वगैरे गोष्टींचा त्रास हा सामान्य अमेरिकन नागरिकांनाच होणार. त्यांच्या नोकर्‍या जाणार आणि खर्च वाढणार. आणि एवढे करुन समुद्राची पातळी न वाढण्याची खात्री कोण देणार? >> याबाबतीत अंशतः सहमत. सरकारचा सहभाग आणखी वाढवणे हा यावरचा मार्ग अर्थातच नाही.

In reply to by निशदे

"" मात्र भारत व चीनसारखे देश अफाट प्रदूषण करतात. त्यांच्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कितीतरी मोठे आहे. "" याला काही विदा आहे का? मी आजपर्यंत जितके वाचले आहे त्यात चीन काही बाबतीत अमेरिकेच्या पुढे असला (total emissions) तरी अमेरिका अनेक बाबतीत आघाडीवर आहे(emissions per capita). भारत यात पहिल्या तिनातही(अजून तरी) नाही. "" जाचक हवामानविषयक कायदे, कार्बन कर वगैरे गोष्टींचा त्रास हा सामान्य अमेरिकन नागरिकांनाच होणार. त्यांच्या नोकर्‍या जाणार आणि खर्च वाढणार. "" याबाबतीत अंशतः सहमत. सरकारचा सहभाग आणखी वाढवणे हा यावरचा मार्ग अर्थातच नाही.

In reply to by निशदे

वाया गेलेल्या अन्नापासून होणारं प्रदूषण (वाया जाणारी ऊर्जा, नंतर विल्हेवाट लावताना खर्च होणारी ऊर्जा हे सगळं धरून) हे अमेरिका आणि चीनच्या खालोखाल ग्रीनहाऊस वायू वाढवणारा घटक आहे. लिंक मिळाली नाही. हा report कितपत खरा मानायचा ते माहित नाही. पण खुद्द अमेरिकेत अन्न वाया घालवण्याचं प्रमाण बरंच असावं असं वाटतं. आपण प्रदूषण म्हणजे फक्त खनिज किंवा जीवाष्म इंधन जाळण्याने होणारं प्रदूषण जर म्हणत असू, तर ती व्याख्या अजून व्यापक करायला हवी.

१२ मार्चला रिपब्लिकन पक्षाच्या डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबिया (डी.सी) आणि वायोमिंग राज्यात प्रायमरी झाल्या. त्याचे निकाल खालीलप्रमाणे
  
 रिपब्लिकन पक्ष 
 डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबियावायोमिंग
डॉनल्ड ट्रम्प01
टेड क्रुझ09
मार्को रूबिओ101
जॉन कॅसिक90
इतर00
एकूण1911
डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबियामध्ये मार्को रुबिओ आणि जॉन कॅसिक या उमेदवारांना यश मिळाले. एका अर्थी डी.सी ने इतर देशाविरूध्द कौल रिपब्लिकन प्रायमरीमध्ये दिला. अर्थातच डी.सी ने वेगळा कौल द्यायची ही पहिलीच वेळ नाही. इलेक्टोरल कॉलेजमध्ये प्रतिनिधित्व मिळाल्यापासून प्रत्येक वेळी डी.सी ने डेमॉक्रॅटिक पक्षाच्याच उमेदवारांना अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजयी केले आहे-- अगदी १९७२ मध्ये रिचर्ड निक्सन आणि १९८४ मध्ये रोनाल्ड रेगन आणि बर्‍याच अंशी १९८८ मध्ये थोरले जॉर्ज बुश या रिपब्लिकन उमेदवारांना लॅन्डस्लाईड विजय मिळालेला असतानाही. काल १५ मार्चला इतर काही राज्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रायमरी झाल्या.त्याचे निकाल इथे थोडया वेळात पोस्ट करेन.

In reply to by गॅरी ट्रुमन

दिल्लीने देशाच्या बरोबरीने लोकसभेत आणि एकदम विरूद्ध प्रकारे विधानसभेत कौल दिला. त्याची आठवण झाली हे वाचून.

In reply to by बोका-ए-आझम

with a small difference............ दिल्लीच्या उदाहरणात संपूर्ण रा॑ज्याने मत दिले होते. इथे रिपब्लिकन्सने दिलेल्या मताचे निकाल आहेत.

काल १५ मार्चला फ्लॉरीडा, इलिनॉय, मिसॉरी, नॉर्थ कॅरोलायना आणि ओहायो या राज्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रायमरी झाल्या. त्यापैकी मिसॉरी राज्यात रिपब्लिकन प्रायमरीमध्ये जबरदस्त चुरस चालू आहे.हे लिहिताक्षणी डॉनल्ड ट्रम्प ०.१% मतांनी आघाडीवर आहेत. दुसर्‍या क्रमांकावर टेड क्रुझ आहेत. अजूनही काही मते मोजली जायची आहेत.आणि या राज्यात रिपब्लिकन पक्षाचा विजयी उमेदवार सर्व प्रतिनिधी मिळवत असल्यामुळे (विनर टेक्स ऑल) हे राज्य महत्वाचे आहे. इतर राज्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली नाही तरी आतापर्यंत मोजल्या गेलेल्या मतांवरून विविध न्यूज चॅनेल विजयी उमेदवार प्रोजेक्ट करतात.पण मिसॉरीमध्ये अजून कोणत्याही चॅनेलने नक्की कोण विजयी होणार हे प्रोजेक्ट केलेले नाही. तेव्हा तिथली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच निकाल पोस्ट करतो. इतर राज्यांमधील निकाल पुढीलप्रमाणे:
    
  रिपब्लिकन पक्ष  
 फ्लॉरीडाइलिनॉयनॉर्थ कॅरोलायनाओहायो
डॉनल्ड ट्रम्प9924290
टेड क्रुझ00260
मार्को रूबिओ0050
जॉन कॅसिक00966
इतर0000
एकूण99246966
     
     
  डेमॉक्रॅटिक पक्ष  
 फ्लॉरीडाइलिनॉयनॉर्थ कॅरोलायनाओहायो
हिलरी क्लिंटन124685975
बर्नी सँडर्स60644254
एकूण184132101129
मार्को रुबिओ यांचा त्यांच्याच फ्लॉरीडा राज्यात डॉनल्ड ट्रम्प यांनी पराभव केला.आणि तो पराभव १५% पेक्षा अधिक मतांनी केला. म्हणजे रूबिओ यांना त्यांच्याच राज्यात फारशी लढत देता आलेली दिसत नाही.या पराभवानंतर मार्को रूबिओ यांनी अध्यक्षीय निवडणुकांच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. ओहायोचे गव्हर्नर जॉन कॅसिक यांनी त्यांच्या राज्यात विजय मिळवला आहे. दोन्ही पक्षांमधील डेलिगेटची आकडेवारी मिसॉरीचे निकाल आल्यानंतर त्याबरोबरच पोस्ट करतो.

मिसॉरी राज्यात दोन्ही पक्षांच्या प्रायमरीमध्ये अत्यंत चुरस दिसून आली. दोन्ही पक्षांच्या विजयी उमेदवारांनी (डेमॉक्रॅटिक हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन डॉनल्ड ट्रम्प) यांना अगदी थोडक्यात (सुमारे ०.२% मतांनी) विजय मिळाला. फॉक्स न्यूजने या राज्यातील निकाल खालीलप्रमाणे दिले आहेत (त्याबरोबरच एकूण प्रतिनिधीसंख्याही त्याच कोष्टकात देत आहे)
  
 रिपब्लिकन पक्ष 
 मिसॉरीआतापर्यंत
डॉनल्ड ट्रम्प25673
टेड क्रुझ5411
मार्को रूबिओ0169
जॉन कॅसिक0143
इतर015
एकूण301411
   
   
 डेमॉक्रॅटिक पक्ष 
 मिसॉरीआतापर्यंत
हिलरी क्लिंटन321606
बर्नी सँडर्स32851
एकूण642457
तर डेमॉक्रॅटिक पक्षात प्रायमरीमधून आलेले डेलिगेट आणि इतर डेलिगेट यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:
   
 सुपर डेलीगेटअन्य डेलिगेटएकूण
हिलरी क्लिंटन46711391606
बर्नी सँडर्स26825851
एकूण49319642457
सध्याची परिस्थिती अशी आहे की डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. त्यांना उमेद्वारी मिळायला फारसे जड जाऊ नये. अजून न्यू यॉर्क आणि कॅलिफॉर्निया या दोन मोठ्या राज्यांमधील प्रायमरी व्हायच्या आहेत.हिलरी स्वत: न्यू यॉर्क राज्यातून सिनेटवरही निवडून गेल्या होत्या आणि कॅलिफॉर्निया गेल्या अनेक निवडणुकांपासून डेमॉक्रॅटिक पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे.या दोन राज्यांमधून हिलरींना मात देणे सँडर्स यांना कठिणच जाईल. रिपब्लिकन पक्षात ट्रम्प यांनी आघाडी घेतली असली तरी सध्याचे चित्र असे आहे की ते ५०% डेलिगेटपेक्षा थोडे मागे आहेत. त्यांना ५०% पेक्षा जास्त हक्काची मते मिळणार नसतील तर मात्र रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात मतदान घ्यायची वेळ येऊ शकेल.

inenews हे काय आहे? त्यात कुणि प्रशांत कुमार याने लिहीले आहे की अमेरिकेतील भारतीय, ज्यात हिन्दू बहुसंख्य आहेत, त्यांचा ट्रंप ला पाठिंबा आहे. भारतातील भारतीयांचे काय मत आहे? प्रशांत कुमारच्या लेखात काहीतरी गैर वाटते. कारण माझ्या ओळखीचे कुणीच भारतीय किंवा अमेरिकन ट्रंपच्या बाजूचे नाहीत, अगदी रिपब्लिकनसुद्धा. शिवाय अगदी आवर्जून बहुसंख्य हिंदू लिहिण्याची काय गरज? जो माणूस सरसकट मुसलमान व मेक्सिकन लोकांविरुद्ध आहे, जो एच वन बी व्हिसा मर्यादित करण्याच्या विरोधात आहे, जो आपल्या सभांमधे विरोधकांना ठोसे मारा, हाकलून द्या इ. बोलतो, तो भारतीयांना कसा पसंत असेल? अगदी अमेरिकन सुद्धा या मुद्द्यांशी सहमत नाहीत. आज मुसलमान, मेक्सिकन उद्या सरसकट चिनी जपानी भारतीय नकोत असे म्हणणार नाही कशावरून? लक्षात ठेवा, त्याने केकेके चा पाठिंबा नको असे म्हंटले पण तो केकेके विरोधी आहे असे स्पष्ट म्हणत नाही!

In reply to by नन्द्या

माझे अमेरिकेतील काही मित्र ट्रम्पच्या बाजूचे आहेत आणि काही ट्रम्पच्या विरोधात आहेत. ट्रम्प आम्ही अमुक करू, तमुक करू वगैरे बोलत असले तरी त्यापैकी किती गोष्टी प्रत्यक्षात करू शकतील हा प्रश्न आहेच. मेक्सिकोबरोबरच्या सीमेवर भिंत बांधू, अमेरिकन उद्योगांना अमेरिकेतच मॅनुफॅक्चरींग करायला सांगू वगैरे गोष्टी बोलायला सोप्या असल्या तरी करायला तितक्याच कठिण होतील. अगदी बराक ओबामाही बंगलोरमध्ये नाही तर बफेलो (न्यू यॉर्क राज्यातील शहर) मध्ये नोकर्‍या आणा असे म्हणालेच होते. त्याला अमेरिकन उद्योगांनीही विरोध केला होताच.

In reply to by गॅरी ट्रुमन

एच १ बी हा व्हिसा वापरून उच्चशिक्षित परदेशस्थ अमेरिकेत येऊन नोकरी करू शकतात. यथावकाश ग्रीन कार्ड मिळवू शकतात. नागरिकही बनू शकतात. ट्रंपने ह्यावर काही काळ बंदी असावी असे मत व्यक्त केले आहे. माझे मत १. राजकारणी जी आश्वासने देतात विशेषत: प्रचारादरम्यान ती सगळी पाळली जातात असे नाही. २. ह्या व्हिशाच्या नावाखाली अनेक गैर प्रकार वेळोवेळी उघडकीस आले आहेत त्यामुळे हा मार्ग १००% सोवळा पवित्र नाही. ३. उच्च तंत्रज्ञानावर आधारित अनेक उद्योग अशा बंधनांना विरोध करतील ह्यात शंका नाही. कारण अशा बंदीमुळे ह्या उद्योगांची अडचण होईल. कुठलाही नेता अशा श्रीमंत लोकांना दुखावू इच्छित नाही. ४. ह्या दोन्ही टोकांच्या मधे कुठेतरी उपाय निघू शकेल. ह्या व्हिशावर पूर्ण बंदी न घालता त्यावर जास्त कठोर बंधने येणे शक्य आहे. जसे येणार्‍या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता जास्त तपासली जाणे शक्य आहे. नोकरी देणारा खरोखरच स्थानिक उमेदवार मिळवण्याचा प्रयत्न करतो का ते जास्त काटेकोरपणे तपासले जाईल.

In reply to by नन्द्या

>> जो माणूस सरसकट मुसलमान व मेक्सिकन लोकांविरुद्ध आहे, जो एच वन बी व्हिसा मर्यादित करण्याच्या विरोधात आहे, हा अपप्रचार आहे. अत्यंत खोटा आहे. ट्रंप जे बोलला ते फक्त बेकायदेशीररित्या अमेरिकेत शिरणारे (मुख्यत:) मेक्सिकन लोकांविरुद्ध. कायदे पाळून येणार्‍यांविषयी तो काही बोललेला नाही. विरोधकांना घुसखोर लोकांकरता पायघड्या घालायच्या असतील तर आधी परदेशी लोकांना अमेरिकन सीमा कायद्याने खुल्या करून द्या. जोवर ह्या सीमा ओलांडण्याकरता कायदे, नियम आहेत तोपर्यंत ते पाळण्याचा आग्रह धरणार्‍याला चूक म्हणणे ही त्याहून मोठी घोडचूक आहे. मुसलमान लोकांबद्दल तो असे म्हणाला की परराष्ट्र खात्याचा कारभार नीट ठिकाणावर येईपर्यंत मुस्लिम लोकांना अमेरिकेत येऊ देऊ नका. हे सॅन बर्नार्डिनोच्या अतिरेकी हल्ल्यामुळे तो म्हणाला. हल्लेखोरातील स्त्री ही अत्यंत जहाल अतिरेकी विचाराची असून तिला व्हिसा का मिळाला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अब्जावधी डॉलर्स अमेरिकेच्या सुरक्षेवर खर्च होत असताना असे होत असेल तर कुठेतरी गडबड आहे. ही गडबड ठीक होईपर्यंत काहीतरी कठोर उपाय केले पाहिजेत ह्या दृष्टीने हा विचार मांडला गेला. हा टोकाचा वाटला तरी अनेक अमेरिकन लोकांना तो पटला होता.

मार्क डाईस हा अमेरिकेतील पत्रकार रस्त्यावर जाऊन लोकांना प्रश्न विचारतो आणि त्यातून अनेक लोकांना काहीच माहिती नसते ही गोष्ट लक्षात येते. मध्यंतरी त्याने एके ठिकाणी जाऊन काहींना "हिलरी क्लिंटन अध्यक्षपदी आल्यास त्या अमेरिकेत शरीया कायदा आणणार आहेत त्याला तुमचे समर्थन आहे का" असा प्रश्न विचारला. अर्थातच हिलरींनी असे काही आश्वासन दिलेलेच नाही. तरीही काही मतदारांनी "हो आमचे समर्थन आहे" किंवा "हिलरी असे काही करणार असतील ते योग्यच असेल" अशा स्वरूपाचे उत्तर दिले. त्याने हा व्हिडिओ युट्यूबवर टाकला आहे. व्हिडिओवरून हे ठिकाण एखादे पर्यटनस्थळ वाटत आहे. अर्थातच सर्व मतदार अशा स्वरूपाचे अज्ञानी असतात असे नाही तेव्हा या व्हिडिओला मनोरंजक व्हिडिओ म्हणून बघणे अधिक योग्य आहे.तरीही काही भारतीयांना अमेरिकेतलेही सर्वसामान्य मतदार फार वेगळे नाहीत का हा प्रश्नही नक्कीच विचारावासा वाटेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

तरीही काही भारतीयांना अमेरिकेतलेही सर्वसामान्य मतदार फार वेगळे नाहीत का हा प्रश्नही नक्कीच विचारावासा वाटेल.
ह्म्म.. मोदी म्हणतायत म्हणजे चूक नसणारच.. किंवा बाबाजी म्हणतायत म्हण्जे बरोबरच.. शेवटी सामान्य माणसाला त्या राजकारणाशी काहीही घेणेदेणे नसते. जाताजाता - मला खटकेलेली गोष्ट म्हणजे एकाही माणसाने शरीय लॉ म्हणजे काय हे विचारलेले नाही.. फक्त हिलरी करणार म्हणजे चांगलेच करणार असे समजून प्रश्न चक्क "उडवून" लावला गेलेला आहे. इतके आंधळे समर्थक वाईटच.

यापुढे ८-१० दिवस बाहेरगावी जाणार आहे.त्यामुळे यानंतरचे अपडेट परत आल्यानंतरच देईन. दरम्यानच्या काळात पुढील घडामोडी होणार आहेतः मंगळवार, २२ मार्चः अ‍ॅरिझोनामध्ये दोन्ही पक्षांच्या प्रायमरी आणि युटा मध्ये दोन्ही पक्षांची कॉकसेस तर आयडॅहोमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाची कॉकसेस शनीवार, २६ मार्चः अलास्का, हवाई आणि वॉशिंग्टन राज्यांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाची कॉकसेस जाताना लॅपटॉप घेऊन जाणार आहे तेव्हा अगदीच काही महत्वाचे घडले तर त्याचे अपडेट देता येतील.तसेच फोनवरूनही मिपावर लॉगिन होणारच आहे.पण फोनवरून टाईप करणे कठिण असल्यामुळे केवळ नवे मुद्दे आल्यास वाचण्यापुरताच त्याचा उपयोग करेन.

बेकायदा घुसखोरी, जिहादी अतिरेकी ह्या समस्या आहेत हे कुणी नाकारू नये. पण बहुतेक अमेरिकन पुढारी ह्या नसल्यासारखे वागतात. ओबामा, हिलरी वगैरे अतिरेकी इस्लामी नाहीतच वगैरे छान छान बोलून त्या अतिरेकाच्या धार्मिक पैलूकडे दुर्लक्ष करणे आपले कर्तव्य समजतात. बेकायदा घुसखोरी थांबवली पाहिजे असे स्पष्ट म्हणतही नाहीत. ज्यांचे बोलणेच इतके बोटचेपे असेल त्यांच्याकडून कारवाईची काडीचीही अपेक्षा करता येत नाही. ट्रंपसारखे लोक निदान आक्रमक भूमिका मांडतात तरी. अनेक अमेरिकन नागरिकांना ह्या समस्यांचे शर्करावगुंठन करणे नको झाले आहे. ह्या विरुद्ध आक्रमक बोलणारे बोलतात त्याच्या १००% टक्के नाही तरी निदान १०% तरी काम अशी आशा लोकांना वाटत आहे. ज्यांच्या आडातच असे विचार नाहीत त्यांच्या पोहर्‍यात कुठून येणार?

In reply to by बोका-ए-आझम

ट्रम्पकडे स्वत:चाच खूप पैसा आहे भाऊ :) पण रिपब्लिकन पक्षात अस्वस्थता आहे. उद्या चार राज्यांचे निकाल येतील.

मला वाटले असे प्रकार फक्त भारतातच होतात की काय ? मटा ऑनलाइन वृत्त । वॉशिंग्टन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी म्हणून रिपब्लिकन पक्षातील राजकारणाने अत्यंत खालची पातळी गाठली आहे. पक्षात उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे डोनाल्ड ट्रम्प आणि टेड क्रूझ या दोघांच्याही समर्थकांची एकमेकांवर चिखलफेक सुरू असून आता तर ट्रम्प यांची पत्नी मलेनिया यांचा मॉडेलिंग करत असतानाचा १६ वर्षांपूर्वीचा न्यूड फोटो 'व्हायरल' करण्यात आला आहे. या प्रकाराने ट्रम्प चांगलेच भडकले आहेत.

(CNN)Republican presidential front-runner Donald Trump called Monday for barring all Muslims from entering the United States. "Donald J. Trump is calling for a total and complete shutdown of Muslims entering the United States until our country's representatives can figure out what is going on," a campaign press release said. हे ट्रंप कार्ड डोनाल्ड ट्रंप खेळले आहेत. अतिरेक्यांना धर्म नसतो हे वाक्य टाळ्या घेऊन जाते पण आपले नातेवाईक अतिरेक्यांच्या कारवाईत मारले गेले म्हणजे समजते की अतिरेकी कोणत्या धर्माचे आहेत. मला वाटत हा मुद्दा कदाचित अमेरीकेच्या सार्वत्रीक निवडणुकात कळीचा ठरावा.

गॅरी ट्रुमन सर ट्र्म्प ला उमेदवारी न मिळण्याचे किती चान्सस आहेत?

In reply to by DEADPOOL

ट्र्म्प ला उमेदवारी न मिळण्याचे किती चान्सस आहेत?
जर सगळ्या प्रायमरी आणि कॉकसेसमध्ये मिळून डॉनाल्ड ट्रम्प यांना ५०% पेक्षा कमी प्रतिनिधींचे समर्थन असेल तर पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी मतदान घ्यायची वेळ येऊ शकते. ओहायोचे गव्हर्नर जॉन कॅसिक अजूनही शर्यतीत आहेत. त्यांना १४३ प्रतिनिधींचे समर्थन मिळाले आहे.तर फ्लॉरीडाचे सीनेटर मार्को रूबिओ यांना त्यापेक्षा जास्त प्रतिनिधींचे समर्थन असूनही त्यांनी माघार घेतली आहे. मला वाटते की जॉन कॅसिक अजूनही शर्यतीत आहेत याचे कारण इतर राज्यांमधून जितके मिळतील तितके प्रतिनिधी मिळवायचे आणि ते प्रतिनिधी ट्रम्प यांना जाऊ द्यायचे नाहीत. पक्षाच्या अधिवेशनात मतदानाची वेळ आल्यास हे प्रतिनिधी ट्रम्पविरोधी मते द्यायला हाताशी येतील.मार्को रूबिओ यांचा तर त्यांच्याच राज्यात, फ्लॉरीडात पराभव झाला.त्यामुळे त्यांना शर्यतीत टिकून राहणे प्रशस्त राहिले नाही आणि माघार घेणे भाग पडले.पण जॉन कॅसिक यांनी त्यांच्या ओहायो राज्यात विजय मिळवला आहे त्यामुळे त्यांना या कारणासाठी अधिक काळ शर्यतीत टिकून राहायला अडचण नसावी. सध्याचे प्रायमरीचे गणित असे आहे की कॅसिक यांनी अजून मतदान न झालेल्या सगळ्या राज्यातील सगळे प्रतिनिधी जिंकले तरी ते ५०% पर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशावेळी खरे तर त्यांनी माघार घ्यायला हवी. तरी ते शर्यतीत टिकून आहेत याचा उद्देश ट्रम्प यांचे समर्थन जितके कमी करता येईल तितके करावे हा असावा असे दिसत आहे. १९६८ च्या रिपब्लिकन प्रायमरीमध्ये रिचर्ड निक्सन (ज्यांना पुढे उमेदवादी मिळाली) आणि रॉनाल्ड रेगन यांच्यात अगदी अटीतटीचा सामना होता. रेगन थोडेसे आघाडीवर होते पण कोणत्याच उमेदवाराला ५०% समर्थन नव्हते. अशावेळी पक्षाच्या मायामी बीच, फ्लॉरीडा येथील अधिवेशनात मतदान झाले. तिसरे उमेदवार नेल्सन रॉकफेलर आणि रेगन या दोघांचाही उद्देश निक्सनना रोखणे होता. पण या दोघांनीही उमेदवारीवर दावा सांगितला आणि त्यातून दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असे होऊन रिचर्ड निक्सन यांनाच उमेदवारी मिळाली. २०१६ मध्ये समजा तशीच वेळ आली तर टेड क्रुझ यांचा उमेदवारीवरचा दावा जॉन कॅसिक यांच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रबळ आहे त्यामुळे निक्सनप्रमाणे ट्रम्प उमेदवारी पटकावतील असे वाटत नाही. पुढे १९७६ मध्येही रॉनाल्ड रेगन यांचा पक्षाच्या कॅन्सस सिटी, मिसॉरी येथील अधिवेशनात परत एकदा थोडक्यात पराभव झाला आणि उमेदवारी अध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांना मिळाली. तरीही रेगन यांनी हिंमत न हारता १९८० मध्ये परत एकदा प्रायमरीमध्ये उडी घेतली आणि उमेदवारी आणि त्यानंतर ८ वर्षे अध्यक्षपदही मिळवले.

एकदम सनी लिओनि सारखा बिंधास्त अन वास्तविकतेची प्रांजळपणाशी उघड सांगड राखणारा... हां सत्तेवर आला तर मजाच येइल. हिलरी न बोलूं शाहणी आहे... विशेषता भारताबाबत

२२ मार्चला अ‍ॅरिझोना, आयडॅहो आणि युटा राज्यांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षांच्या तर अ‍ॅरिझोना आणि युटा राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षांच्या प्रायमरी झाल्या. तर २६ मार्चला डेमॉक्रॅटिक पक्षांच्या अलास्का, हवाई आणि वॉशिंग्टन राज्यांमध्ये प्रायमरी झाल्या. या प्रायमरीचे निकाल पुढीलप्रमाणे लागले--
       
   डेमॉक्रॅटिक पक्ष    
 अ‍ॅरिझोनायुटाआयडॅहोअलास्काहवाईवॉशिंग्टनआतापर्यंत
हिलरी क्लिंटन44653891712
बर्नी सॅंडर्स3026171317251004
एकूण7432221625342716
        
   रिपब्लिकन पक्ष    
 अ‍ॅरिझोनायुटा    आतापर्यंत
डॉनल्ड ट्रम्प580    739
टेड क्रुझ040    465
जॉन कॅसिक00    143
इतर00    181
एकूण5840    1528
तर डेमॉक्रॅटिक पक्षात डेलिगेटची स्थिती पुढीलप्रमाणे आहे:
   
 सुपर डेलीगेटअन्य डेलीगेटएकूण
हिलरी क्लिंटन46912431712
बर्नी सॅंडर्स299751004
एकूण49822182716
डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांनी या ६ पैकी ५ राज्यांमधील प्रायमरी जिंकल्या.असे असले तरी सँडर्स यांनी जिंकलेली राज्ये त्या मानाने विरळ लोकसंख्येची आणि म्हणून निवडणुकांमध्ये कमी महत्वाची आहेत (अलास्का, हवाई, आयडॅहो इत्यादी). सँडर्स यांनी म्हटले की देशाच्या दक्षिण भागातील अधिक कॉन्झर्व्हेटिव्ह राज्यांमध्ये पराभव होणार याची कल्पना होती पण वॉशिंग्टन, अलास्का सारख्या पश्चिमेकडील उदारमतवादी राज्यांमध्ये विजय होणे हे त्यांच्यासाठी चांगले चिन्ह आहे. सध्या तरी हिलरी क्लिंटन सुपरडेलीगेटच्या समर्थनामुळे चांगल्याच आघाडीवर आहेत.पण अर्थातच सुपरडेलीगेटना पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी आपले मत बदलायचा अधिकार आहे. जर सँडर्स यांनी कॅलिफॉर्निया, न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया सारखी मोठी (आणि दक्षिणेतील त्यांच्यासाठीच्या कमकुवत क्षेत्रात नसलेली) राज्ये जिंकली तर मात्र सँडर्स या प्रायमरीमध्ये अजून रंगत आणू शकतील. रिपब्लिकन पक्षात मात्र टेड क्रुझ यांनी युटा राज्य जिंकून रंगत आणली आहे.जर ट्रम्प यांना ५०% पेक्षा कमी प्रतिनिधींचे समर्थन मिळाले तर मात्र पक्षाच्या अधिवेशनात मतदान घ्यायची वेळ येऊ शकते. एप्रिलमध्ये न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, मेरीलँड, विस्कॉन्सिन आणि कनेक्टिकट या अधिक मोठ्या राज्यांमध्ये प्रायमरी आहेत. एप्रिलअखेरपर्यंत चित्र आणखी स्पष्ट व्हायला हवे.

थोडेसे अवांतरः डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी अधिक चांगली असते असा दावा केला जातो. हिलरी क्लिंटन यांनीही तोच दावा केला . याविषयी प्रिन्सटन विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक अ‍ॅलन ब्लाईंडर आणि मार्क वॉटसन यांनी एप्रिल २०१६ च्या American Economic Review या जर्नलमध्ये "Presidents and the US Economy: An Econometric Exploration" हा पेपर लिहिला आहे. या पेपरसाठी त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेचा १९४७ पासून ओबामांच्या पहिल्या टर्मपर्यंतचा अभ्यास केला आहे. हा सगळा पेपर वाचून आणि समजून झालेला नाही कारण त्यातील Econometrics च्या सगळ्या संज्ञा मला माहित नाहीत आणि त्या गोष्टी समजावून घ्यायला वेळ लागत आहे. पण जे काही वाचले आहे त्यावरून गोषवारा समजला की डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेचा वाढीचा सरासरी दर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष असताना असलेल्या अमेरिकन अर्थव्यस्थेचा वाढीच्या सरासरी दरापेक्षा तब्बल १.७९% ने जास्त आहे (४.३३% विरूध्द २.५४%). यामागचे कारण काय असावे याचा अभ्यास लेखकांनी केला. त्यांच्या अनुमानातील मला समजलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे: १. डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना तेलाचे भाव कमी राहिले आहेत. त्याचा फायदा अमेरिकन अर्थव्यवस्थेला झाला. १.७९% फरकापैकी सुमारे ०.५०% म्हणजे जवळपास २८% फरक यामुळे पडतो. २. डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना Total Factor Productivity मध्ये झालेली वाढ रिपब्लिकन अध्यक्ष असताना झालेल्या वाढीपेक्षा जास्त होती. यामुळे १.७९% फरकापैकी आणखी ०.५% म्हणजे जवळपास २८% फरक पडतो. (यावर माझी टिप्पणी: या वाढीमागे अध्यक्षांच्या धोरणांचा हात असेलच असे नाही. ही वाढ शास्त्रीय प्रगती किंवा अमेरिकेत ज्याला disruptive technology म्हटले जाते त्यामुळे होते.) ३. या काळात अमेरिकेचा कोरिया, व्हिएटनाम, पहिले आणि दुसरे इराक युध्द आणि अफगाणिस्तानमधील युध्द याच्यात प्रत्यक्ष सहभाग होता. युध्दाच्या वेळी सरकारचा संरक्षणावरील खर्च वाढतो आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते तर युध्द थांबले की हा संरक्षणावरील सरकारी खर्च कमी होतो आणि अर्थव्यवस्था मंदावते. कोरिअन युध्द हॅरी ट्रुमन (डेमॉक्रॅटिक) अध्यक्ष असताना सुरू झाले तर ड्वाईट आयसेनहॉवर (रिपब्लिकन) अध्यक्ष असताना संपले. व्हिएटनाम युध्द लिंडन जॉन्सन (डेमॉक्रॅटिक) अध्यक्ष असताना अधिक भडकले तर रिचर्ड निक्सन (रिपब्लिकन) अध्यक्ष असताना संपले. पहिले इराक युध्द इतके मोठे नव्हते त्यामुळे त्याचा इतका फरक पडायला नको. इराकमधील अमेरिकन सैन्याची बरीचशी involvement रिपब्लिकन जॉर्ज डब्लू बुश अध्यक्ष असतानाच संपली होती तर अफगाणिस्तानातील चालू होती. सांगायचा मुद्दा म्हणजे मोठ्या युध्दांची समाप्ती रिपब्लिकन अध्यक्ष असताना अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामामुळे अर्थव्यवस्थेची वाढ मंदावली. १.७९% पैकी आणखी ०.२१% फरक (जवळपास १२%) यामुळे पडतो. ४. मोनेटरी पॉलिसी ठरविणारे अमेरिकन फेडचे चेअरमन रिपब्लिकन अध्यक्ष असताना थोडे hawkish होते आणि व्याजाचे दर जास्त ठेवण्याकडे त्यांचा कल होता. त्याचाही अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. डेमॉक्रॅटिक अध्यक्ष जिमी कार्टर यांनी नियुक्त केलेले पॉल व्होल्कर हे त्यातील सर्वात hawkish होते. किंबहुना त्या कारणासाठी रिपब्लिकन अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांचे त्यांच्याशी संबंध फार चांगले नव्हते. या कारणामुळे १.७९% पैकी साधारण ०.२३% ते ०.३२% म्हणजे आणखी १३-१४% फरक पडतो. (तर इतर काही संशोधनाप्रमाणे या घटकाचा विशेष फरक पडत नाही) तेव्हा एकूण १.७९% फरकापैकी किमान ६८% फरक या कारणांमुळे पडतो. म्हणजे डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली असली तरी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली होते असे म्हणता येणार नाही असा या पेपरचा आशय वाटला. या पेपरचे २०१४ मधील जुने व्हर्जन National Bureau of Economic Research च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पण या संकेतस्थळावरील बहुसंख्य पेपरचे formating चांगले नसते त्यामुळे शक्यतो मी तिथून पेपर वाचणे टाळतो. American Economic Review च्या संकेतस्थळावरून पेपर वाचायचा असेल तर मात्र subscription असणे गरजेचे आहे. यापुढील माझी टिप्पणी: २००८-०९ च्या संकटासाठी रिपब्लिकन जॉर्ज डब्लू बुश यांचे प्रशासन पूर्णपणे जबाबदार होते का? खरे तर Fannie Mae आणि Freddie Mac वर सबप्राईम कर्जांनाही securitization मध्ये समाविष्ट करावे हा दबाव डेमॉक्रॅटिक बिल क्लिंटन अध्यक्ष असतानाही होता. इतकेच नव्हे तर विविध आर्थिक संस्थांना एकाच छत्राखाली असायला बंदी असलेला Glass-Steagal Act क्लिंटन अध्यक्ष असताना रद्द केला गेला होता. वाढत्या विषमतेविरूध्द लोकांनी तक्रार करू नये यासाठी सामान्य लोकांना गृहकर्ज स्वस्तात उपलब्ध करून देऊन स्वत:चे घर होणे--अर्थातच American dream जगता येणे ती अफूची गोळी (palliative) बुश यांनी दिली तशी बिल क्लिंटन यांनीही दिलीच. बाकी CDO, Credit Default Swaps वगैरे भानगडींसाठी सरकारपेक्षाही खाजगी क्षेत्राची अधिक जबाबदारी होती. या सगळ्या प्रकाराचे परिणाम बुश अध्यक्ष असताना दिसले तरी त्यासाठी बुश हेच १००% जबाबदार होते असे म्हणता येईल असे मला तरी वाटत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

तुमचा व्यवसाय काय म्हणायचा ? नोकरी वगैरे करत असाल तर ताबडतोब राजीनामा देऊन स्वतःचा बिझनेस सुरु करा.

In reply to by गॅरी ट्रुमन

म्हणजे डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली असली तरी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली होते असे म्हणता येणार नाही असा या पेपरचा आशय वाटला.
बव्हंशी सहमत आहे. रिपब्लिकन पक्षाची धोरणं एरवी कितीही रेसिस्ट, मिसॉजनिस्ट (स्त्री-द्वेष्टी), होमोफोबिक, आक्रस्ताळी असली; तरी त्यांची आर्थिक धोरणं अधिक सरस आहेत; असा एक बचावात्मक पवित्रा काही लोक घेताना दिसतात. त्या पार्श्वभूमीवर हे आकडे आणि विवेचन उल्लेखनीय आहे. ओबामाच्या दुसर्‍या टर्ममधले आकडे यात धरले, तर टक्केवारी डेमोक्रॅट्सच्या बाजूने अजून झुकेल.
इतकेच नव्हे तर विविध आर्थिक संस्थांना एकाच छत्राखाली असायला बंदी असलेला Glass-Steagal Act क्लिंटन अध्यक्ष असताना रद्द केला गेला होता. वाढत्या विषमतेविरूध्द लोकांनी तक्रार करू नये यासाठी सामान्य लोकांना गृहकर्ज स्वस्तात उपलब्ध करून देऊन स्वत:चे घर होणे--अर्थातच American dream जगता येणे ती अफूची गोळी (palliative) बुश यांनी दिली तशी बिल क्लिंटन यांनीही दिलीच
+१ 'बिल क्लिंटन वॉज द बेस्ट रिपब्लिकन प्रेसिडेंट एव्हर!' या विनोदात तथ्य आहेच ;)

अपडेट :- Bernie Sanders Continues To Dominate Caucuses, But He’s About To Run Out Of Them Sanders: 'We are going to win New York' आता एक प्रश्न :- Why the major media fail to see how Bernie Sanders can win या प्रश्नाचे "खरे" उत्तर इथे मिळेल :- These 6 Corporations Control 90% Of The Media In America मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कधी कधी का नजर भिजते... :- इरादा पक्का

In reply to by मदनबाण

एक लिंक ध्यायची राहिलीच की... Clinton, Trump both losing to Sanders and Cruz in Wisconsin – polls मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का भिजते... :- इरादा पक्का

In reply to by मदनबाण

धन्यवाद मदनबाण. एकूणच अमेरिकेत आपला पक्ष सत्तेत नसताना कॉर्पोरेटमध्ये जायचे आणि पक्ष सत्तेत आल्यावर सरकारमध्ये जायचे हे प्रकार अगदी सर्रास चालतात. उदाहरणार्थः १. हेनरी पॉलसन: जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या मंत्रीमंडळातील २००६ ते २००९ या काळातील अर्थमंत्री त्यापूर्वीची ७ वर्षे गोल्डमन सॅक्सचे सी.ई.ओ होते. २००८ च्या संकटात लेहमन ब्रदर्सला बुडीतखाती जाऊन देऊन आर्थिक संकट त्यांनी अधिक गंभीर केले असा आरोप केला जातो. आणि लेहमन बुडायला हेनरी पॉलसनला का हवी होती? कारण इन्व्हेस्टमेन्ट बँकिंगमध्ये गोल्डमन सॅक्स आणि लेहमन ब्रदर्स या कंपन्या प्रतिस्पर्धी होत्या. खरेखोटे तो भगवंत, बुशबाबा आणि हेनरी पॉलसनच जाणोत. २. डॉनल्ड रम्सफेल्डः इराक युध्दामुळे बदनाम झालेले डॉनल्ड रम्सफेल्ड हे १९६२ ते १९७७ या काळात सरकारमध्ये होते. जेराल्ड फोर्ड यांच्या मंत्रीमंडळात ते संरक्षणमंत्री होते. पुढे १९७७ ते २००० या काळात कॉर्पोरेटमध्ये होते.या काळात ते जी.डी.सर्ल या औषधकंपनीचे सी.ई.ओ होते.२००१ ते २००६ या काळात ते जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या मंत्रीमंडळात परत एकदा संरक्षणमंत्री होते. ३. डिक चेनी: डिक चेनी हे जेराल्ड फोर्ड यांच्या कारकिर्दीत चीफ ऑफ स्टाफ, थोरल्या जॉर्ज बुश यांच्या मंत्रीमंडळात संरक्षणमंत्री आणि जॉर्ज डब्लू बुश यांचे उपाध्यक्ष होते. मधल्या काळात बिल क्लिंटन अध्यक्ष असताना हॅलीबर्टन या तलकंपनीचे सी.ई.ओ होते.या कंपनीला फायदा व्हावा म्हणून इराकवर हल्ला करण्यात आला असाही आरोप केला जातो. ४. लॉईड बेन्टसेनः बिल क्लिंटन यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होण्यापूर्वी हे विविध विमा आणि तेल कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर होते. असे इतरही अनेक व्यक्तींविषयी लिहिता येईल. त्यामुळे सरकारवर कॉर्पोरेटचा प्रभाव असणे ही गोष्ट ओघाने आलीच.

अमेरिकेत १} वॉल स्ट्रीट २ } मिलेटरी सिक्युरिटी कॉप्लॅक्स आणि ३ री आणि सर्वात पॉवरफुल असलेली इजरायल लॉबी यावेळी कोण्याचा मागे आहे ? Here's Why AIPAC and the Israel Lobby Will Be Critical to 2016 Elections मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का भिजते... :- इरादा पक्का

In reply to by मदनबाण

वॉल स्ट्रीट हिलरी क्लिंटन यांच्या मागे आहे, असे बर्नी सॅंडर्स म्हणतात. ते खरेही असावे.

In reply to by विशाखा पाटील

बर्नी सँडर्स यांचा वॉल स्ट्रीटला विरोध आहे त्यामुळे वॉल स्ट्रीटचा त्यांना विरोध आहे. मी आर्थिक दृष्ट्या बराच उजवा असलो तरी वॉल स्ट्रीटवरील पैशाच्या मागे धाऊन जे किळसवाणे प्रकार चालतात त्याला मात्र माझा विरोधच आहे.माझ्या काही मित्रांनी २०१० मध्ये बार्कलेजच्या इन्व्हेस्टमेन्ट बँकिंगच्या कॅपिटल मार्केट्स डिव्हिजनमध्ये न्यू यॉर्कमध्ये समर इंटर्नशीप केली होती.बार्कलेजने लेहमन ब्रदर्सचा अमेरिकेतील कारभार टेक-ओव्हर केला होता त्यामुळे माझ्या मित्रांच्या डेस्कवर मुळातले लेहमन मधले ट्रेडर्स होते.त्यातले अनेक त्या सीडीओ आणि तत्सम प्रकारांमध्येही होतेच. मान्य आहे की २००८-०९ च्या संकटाला कोणी एक व्यक्ती किंवा संघटना जबाबदार नव्हती. सरकारपासून फेड (विशेषतः ग्रीनस्पॅन), रेटिंग एजन्सीज इत्यादी इत्यादी अनेक पातळ्यांवर अपयश आले होते.पण जर अपयश अनेक पातळ्यांवर आले असेल तर त्याची जबाबदारीही अनेक पातळ्यांवरच स्विकारली गेली पाहिजे. प्रत्येक माणूस/संस्था एकदुसर्याकडे बोट दाखवायला लागले तर ते योग्य नाही. असो. तर सांगायचा मुद्दा हा की या मुळातल्या लेहमनमधील ट्रेडर्सना जगाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले त्यात आपलाही काही वाटा होता याची अजिबात खंत नव्हती. वॉल स्ट्रीटवरील मनी माईंडेडनेसच्या अनेक कहाण्या माझ्या मित्रांकडून मी ऐकल्या आहेत.जिथे कुठे पैसे दिसतील तिथे हे लोक हात घालतात. सगळे जग खड्ड्यात गेले तरी चालेल, मला गलेलठ्ठ बोनस हवा, मला भरपूर पगार हवा असा काहीसा शिसारी आणणारा दृष्टीकोन यांचा असतो. २००८ मध्ये करदात्यांच्या पैशातून यांना बेल आऊट दिले आणि इतके मोठे संकट आलेले असतानाही त्याच करदात्यांच्या पैशातून बोनस घेण्यातही त्यांना काही गैर वाटले नव्हते. बर्नी सँडर्स यांच्या काही योजनांमुळे (विशेषतः मिनिमम वेज वाढविणे) तोटा होईल असे मला वाटते.पण ते किंवा जो कोणी अध्यक्ष बनेल त्या/तीने या वॉल स्ट्रीट वाल्यांच्या माजाला काही प्रमाणात तरी अटकाव घालावा असे फार वाटते.

नेवाडा राज्यातील कॉकसेसमधून डेमॉक्रॅटिक पक्षाचे फिलाडेल्फियातील जुलैमधील अधिवेशनासाठी प्रतिनिधी निवडायची प्रक्रीया थोडी गुंतागुंतीची आहे. राज्यातून एकूण ४३ प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. त्यापैकी २३ प्रतिनिधी फेब्रुवारीमधील कॉकसेसमधून निवडले गेले. या प्रतिनिधींना डिस्ट्रीक्ट लेव्हल डेलिगेट म्हणतात. या डिस्ट्रीक्ट लेव्हल डेलिगेटपैकी १३ हिलरींनी जिंकले तर १० सँडर्स यांनी जिंकले.उरलेल्या २० प्रतिनिधींपैकी ८ सुपर डेलीगेट आहेत (आजी-माजी सिनेटर आणि हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हजचे सदस्य). तर १२ प्रतिनिधी आणखी दोन पातळ्यांमधून निवडले जातात. फेबुवारीतील कॉकसेसमध्ये सहभागी झालेल्या मतदारांनी त्यांच्यातून १२,२३३ प्रतिनिधी निवडले. हे प्रतिनिधी काऊंटी लेव्हल संमेलनासाठी एकत्र येतात. या प्रतिनिधींमधून आणखी लहान गट निवडला जातो आणि हा गट मे महिन्यातील राज्यस्तरीय संमेलनासाठी निवडला जातो. हे राज्यस्तरीय संमेलनासाठी निवडले गेलेले प्रतिनिधी शेवटी उरलेले १२ प्रतिनिधी निवडतात जे जुलैमध्ये फिलाडेल्फियातील पक्षाच्या अधिवेशनात हिलरी किंवा बर्नी सँडर्स यांच्या बाजूने मतदान करतील. एकूणच नेवाडा राज्यातील कॉकसेसची प्रक्रीया बरीच गुंतागुंतीची आहे. यातील मेख अशी की काऊंटी लेव्हल संमेलनासाठी निवडले गेलेले १२,२३३ प्रतिनिधी या काऊंटी लेव्हल संमेलनात आपले मत बदलू शकतात. या १२,२३३ पैकी हिलरींनी जिंकलेले बहुसंख्य प्रतिनिधी परवा झालेल्या काऊंटी लेव्हल संमेलनासाठी गैरहजर राहिले. त्यातून झाले असे की काऊंटी लेव्हल संमेलनात बर्नी सँडर्स यांच्या बाजूचे २,९६४ तर हिलरी क्लिंटन यांच्या बाजूचे २,३८६ प्रतिनिधी उपस्थित राहिले. त्यामुळे मे महिन्यातील राज्यस्तरीय संमेलनासाठी बर्नी सँडर्स यांच्या बाजूचे १,६१३ तर हिलरी क्लिंटन यांच्या बाजूचे १,२९८ प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. शक्यता आहे की यातून नेवाडा राज्यातील बर्नी सँडर्स यांना हिलरींपेक्षा एखाद-दोन प्रतिनिधी जास्तही मिळू शकतील. सध्या तरी हिलरींची आघाडी बरीच मोठी आहे.त्यामुळे एखाद दोन प्रतिनिधी सँडर्स यांच्या बाजूला गेल्यामुळे फार फरक पडायचा नाही. तरीही हिलरींच्या बाजूचे बहुसंख्य प्रतिनिधी अनुपस्थित राहणे हे हिलरींच्या प्रचारातील उणीवा नक्कीच दर्शविते. २००८ मध्येही हिलरींना हाच अनुभव आला होता. फेब्रुवारीतील कॉकसेसमध्ये जास्त मते मिळूनही शेवटी बराक ओबामांना अधिक प्रतिनिधी मिळाले.हा अनुभव लक्षात घेता हिलरींनी थोडी अधिक काळजी घ्यायला पाहिजे होती असे दिसते.

एप्रिल महिन्यात पुढील राज्यात प्रायमरी होणार आहेतः ५ एप्रिलः विस्कॉन्सिन ९ एप्रिलः वायोमिंग (फक्त डेमॉक्रॅटिक पक्षाची प्रायमरी) १९ एप्रिलः न्यू यॉर्क २६ एप्रिलः कनेक्टिकट, डेलावेअर, मेरीलँड, र्‍होड आयलंड आणि पेन्सिल्व्हेनिया भाप्रवे उद्यापर्यंत विस्कॉन्सिन प्रायमरीचे निकाल येतील. निकाल आल्यावर इथे पोस्ट करेनच. सध्या तरी जनमत चाचण्यांप्रमाणे डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स आणि रिपब्लिकन पक्षात टेड क्रुझ आघाडीवर आहेत. विस्कॉन्सिनमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यास रिपब्लिकन पक्षात आणखी चुरस निर्माण होईल. डेमॉक्रॅटिक पक्षात मात्र हिलरींची आघाडी बरीच जास्त आहे तसेच न्यू यॉर्क आणि पेन्सिल्व्हेनिया या पूर्वेकडील राज्यांमधून त्यांचा पराभव होणे कठिण वाटत आहे त्यामुळे डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरीच असतील असे चित्र या क्षणी तरी आहे.

विस्कॉन्सिन राज्यातील प्रायमरीचे निकाल-- या राज्यात दोन्ही पक्षांमध्ये आघाडीवर असलेल्या (डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प) यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. तर डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स आणि रिपब्लिकन पक्षात टेड क्रुझ यांचा विजय झाला आहे.दोन्ही विजयी उमेदवारांनी १३% चे घसघशीत मताधिक्य घेतले आहे. इथे दिलेल्या नकाशावरून कळेल की डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांनी राज्याच्या सर्वच भागात विजय मिळवला आहे.राज्यात अधिक लोकसंख्येची शहरे दोन---मिलवॉकी आणि मेडिसन.त्यापैकी मिलवॉकीमध्ये हिलरींना ४% ने म्हणजे त्यामानाने थोडक्यात विजय मिळाला आहे तर मेडिसन मध्ये सॅंडर्स यांना २५% ने आरामात विजय मिळाला आहे. राज्याचे इतर भाग तुरळक लोकवस्तीचे आहेत.तिथेही सँडर्स यांनी विजय मिळवला आहे. डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांना ४५ आणि हिलरींना ३१ तर रिपब्लिकन पक्षात टेड क्रुझ यांना ३३ तर डॉनल्ड ट्रम्प यांना ३ प्रतिनिधी मिळाले आहेत. आतापर्यंतची स्थिती पुढीलप्रमाणे:
  
 रिपब्लिकन पक्ष 
 विस्कॉन्सिनआतापर्यंत
डॉनल्ड ट्रम्प3740
टेड क्रुझ33514
जॉन कॅसिक0143
इतर0188
एकूण361585
   
   
 डेमॉक्रॅटिक पक्ष 
 विस्कॉन्सिनआतापर्यंत
हिलरी क्लिंटन311743
बर्नी सँडर्स451056
एकूण762799
तर डेमॉक्रॅटिक पक्षात सुपर डेलीगेट आणि अन्य डेलीगेट यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:
   
 सुपर डेलीगेटअन्य डेलिगेटएकूण
हिलरी क्लिंटन46912741743
बर्नी सँडर्स3110251056
एकूण50022992799
निवडून गेलेल्या प्रतिनिधींमध्ये हिलरींची आघाडी आता बरीच कमी झाली आहे.पण त्यांच्यामागे डेमॉक्रॅटिक पक्षाची संघटना आणि सुपरडेलीगेट आहेत असे सध्याचे चित्र आहे.तिथे बर्नी सँडर्स बरेच मागे आहेत.पण सुपर डेलीगेट आपले मत बदलू शकतात त्यामुळे जर बर्नी सँडर्स यांनी न्यू यॉर्क, कॅलिफॉर्निया यासारखी मोठी राज्ये जिंकली तर कदाचित काही सुपरडेलीगेट त्यांच्या बाजूला जाऊ शकतील. रिपब्लिकन पक्षात मात्र टेड क्रुझ यांनी बरीच रंगत आणली आहे.

आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षातील चित्र कसे आहे हे पुढे दिलेल्या नकाशांवरून समजून येईल. सर्व नकाशे विकिपीडीयावरून घेतले आहेत. १. डेमॉक्रॅटिक पक्षातील निवडून गेलेले प्रतिनिधी Democratic Pledged By Ali Zifan - Own work. Used blank map from here., CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=47348440 २. डेमॉक्रॅटिक पक्षातील एकूण प्रतिनिधी (निवडून गेलेले + सुपरडेलीगेट) Democratic Total By Ali Zifan - Own work. Used blank map from here., CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=47348438 ३. डेमॉक्रॅटिक पक्षातील काऊंटीनिहाय मतदान (काऊंटी म्हणजे जिल्ह्याला समकक्ष) Democratic Countywise By See #filehistory - This file was derived from:  USA Counties.svg, CC0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=46732374 या काऊंटीनिहाय नकाशावरून समजेल की हिलरींनी देशाच्या दक्षिण भागात अगदीच स्वीप केला.पण आपण जसेजसे उत्तरेकडे जातो त्याप्रमाणे परिस्थिती बदलते.उदाहरणार्थ ओक्लाहोमामध्ये सँडर्स यांची कामगिरी बरीच चांगली झाली आहे.कॅन्ससमध्ये तर सँडर्स यांनी सगळीकडेच विजय मिळवला आहे. नेब्रास्कामध्येही कामगिरी चांगली आहे. अर्थातच ही राज्ये तुरळक लोकवस्तीची आहेत त्यामुळे प्रतिनिधीसंख्येमध्ये सँडर्स यांना या विजयाचाही फार फायदा होणार नाही. पण मिशिगन, मिन्नेसोटा या उत्तरेकडील राज्यांमध्येही त्यांची कामगिरी चांगली झाली आहे. स्वतःचे व्हरमॉन्ट आणि त्या शेजारचे मेन ही राज्ये तर त्यांनी अगदी स्वीपच केली आहेत.तीच गोष्ट युटा, आयडॅहो आणि वॉशिंग्टन या राज्यांचीही. आता न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, न्यू जर्सी, मेरीलँड यासारख्या दाट लोकवस्तीच्या राज्यांवर बर्नी सँडर्स अधिक लक्ष देतील.त्यांनी म्हटल्याप्रमाणे दक्षिणेत पराभव होणार हे अपेक्षितच होते आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये प्रायमरी आधी झाल्या आहेत.यापुढे उत्तरेतील महत्वाच्या राज्यांमध्ये प्रायमरी आहेत आणि त्या राज्यांमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा सँडर्स यांना आहे असे दिसते. आणि म्हणूनच ते पिछाडीवर असले तरी अजूनही स्पर्धेत टिकून आहेत.

वर डेमॉक्रॅटिक पक्षातले आतापर्यंतचे चित्र दर्शविणारे नकाशे दिले आहेत. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षातील चित्र दर्शविणारे नकाशेही देत आहे. १. रिपब्लिकन पक्षातील प्रतिनिधींची स्थिती Republican total By Ali Zifan - Own work. Used blank map from here., CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=47348439 २. रिपब्लिकन पक्षातील काऊंटीनिहाय मतदान Republican countywise By Ali Zifan, JCRules, Magog the Ogre, Nizolan, & Spesh531 - This file was derived from:  USA Counties.svg, CC0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=46732339 यावरून समजते की डॉनल्ड ट्रम्प आणि टेड क्रुझ या दोघांनीही ज्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे ती राज्ये अगदीच स्वीप केली आहेत. इथे दिल्याप्रमाणे जनमत चाचण्यांप्रमाणे न्यू यॉर्कमध्ये ट्रम्प चांगल्यापैकी आघाडीवर आहेत तर कॅलिफॉर्नियामध्ये पूर्वी अधिक चुरस होती पण आता ट्रम्प यांनी आघाडी मिळवली आहे असे चित्र आहे.तसेच पेन्सिल्व्हेनियामध्येही ट्रम्पच आघाडीवर आहेत. जर ट्रम्प यांनी ही महत्वाची राज्ये जिंकली तर मात्र टेड क्रुझ यांना उमेदवारी मिळवणे कठिणच जाईल.

भाप्रवे प्रमाणे काल दुपारी न्यू यॉर्क प्रायमरीचा निकाल आला. या प्रायमरीमध्ये दोन्ही पक्षातील आघाडीच्या उमेदवारांनी (डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प) अगदी आरामात विजय मिळवला. रिपब्लिकन प्रायमरीमध्ये ट्रम्प यांना जवळपास ६०% मते मिळाली तर डेमॉक्रॅटिक प्रायमरीमध्ये हिलरी क्लिंटन यांना ५८% मते मिळाली.या विजयामुळे नोव्हेंबरमधील निवडणुक हिलरी विरूध्द ट्रम्प होणार असे जवळपास नक्की झाले असे म्हणायला हरकत नसावी. आता कॅलिफॉर्निया आणि पेन्सिल्व्हेनिया या दोन मोठ्या राज्यांमध्ये प्रायमरी व्हायच्या आहेत.पण या राज्यांमध्ये विजय मिळवला तरी प्रतिस्पर्ध्यांना (डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स आणि रिपब्लिकन पक्षात टेड क्रुझ) आपली पिछाडी भरून काढणे कठिणच जाईल असे दिसते. तसेच ९ एप्रिलला वायोमिंग राज्यात डेमॉक्रॅटिक कॉकसेस झाली.त्यात मतांमध्ये बर्नी सँडर्स पुढे होते पण प्रतिनिधींच्या संख्येत बर्नी सँडर्स आणि हिलरी क्लिंटन यांच्यात बरोबरी झाली. आतापर्यंतचे आकडे खालीलप्रमाणे:
   
 डेमॉक्रॅटिक पक्ष  
 न्यू यॉर्कवायोमिंगआतापर्यंत
हिलरी क्लिंटन13971930
बर्नी सँडर्स10671189
एकूण245143119
    
 रिपब्लिकन पक्ष  
डॉनल्ड ट्रम्प89 845
टेड क्रुझ0 559
जॉन कॅसिक4 148
इतर93 187
एकूण186 1739
तर डेमॉक्रॅटिक पक्षात सुपरडेलीगेट आणि इतर डेलीगेट यांचे आकडे पुढीलप्रमाणे:
   
 सुपरडेलीगेटइतर डेलीगेटएकूण
हिलरी क्लिंटन50214281930
बर्नी सँडर्स3811511189
एकूण54025793119

गेल्या आठवड्यात आणि आज काही महत्वाचे बदल घडले आहेत.गेल्या मंगळवारी पेन्सिल्व्हेनिया, कनेक्टिकट, डेलावेअर,मेरीलँड आणि र्‍होड आयलंड या राज्यांमध्ये तर कालच्या मंगळवारी इंडियाना राज्यात प्रायमरी झाल्या. गेल्या मंगळवारी ज्याला 'न्यू इंग्लंड' भाग म्हटला जातो त्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात प्रायमरी झाल्या आणि एका अर्थी गेला मंगळवार प्रायमरींमध्ये निर्णायक होता. अमेरिकेतील रेल्वे कंपनी अ‍ॅमट्रॅकची 'असेला एक्सप्रेस' या भागातून जाते म्हणून या प्रायमरींना 'असेला प्रायमरी' असेही म्हटले जाते. असेला प्रायमरीमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांनी तर रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प यांनी जोरदार विजय मिळवला.हिलरींनी या राज्यांमधील आकारात, लोकसंख्येत आणि प्रतिनिधीसंख्येत सगळ्यात पेन्सिल्वेनिया राज्यात १२% ,मेरीलँडमध्ये तब्बल ३०%, डेलावेअरमध्ये २०% तर कनेक्टिकटमध्ये त्यामानाने कमी म्हणजे ५% ची आघाडी मिळवली. तर बर्नी सँडर्स यांनी केवळ र्‍होड आयलंडमध्ये सुमारे १२% मते जास्त मिळवून विजय संपादन केला. आतापर्यंतचा कल बघितला तर असे लक्षात येत आहे की वरकरणी बर्नी सँडर्स यांनी अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला आहे असे दिसत असले तरी त्यांनी विजय मिळवलेली राज्ये त्या मानाने आकाराने, लोकसंख्येने आणि प्रतिनिधीसंख्येने लहान राज्ये आहेत (उदाहरणार्थ अलास्का, हवाई, आयडॅहो, कॅन्सस, नेब्रास्का, न्यू हॅम्पशायर, वायोमिंग इत्यादी). केवळ मिशिगन या एकाच मोठ्या राज्यात त्यांना विजय मिळाला आहे. आणि विजय मिळाला तो ही ३०-४०% अशा घसघशीत आघाडीने नाही तर ५-१०% च्या मताधिक्याने. त्यामुळे प्रतिनिधीसंख्येमध्ये या राज्यांमधून त्यांना हिलरींपेक्षा थोडीशीच आघाडी मिळाली. त्याउलट हिलरींनी न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, टेक्सस, जॉर्निया, फ्लॉरीडा इत्यादी मोठ्या राज्यांमध्ये आरामात विजय मिळवला.कालच्या इंडियाना प्रायमरीमध्येही बर्नी सँडर्स यांनी विजय मिळवला पण तो ५% मताधिक्याने. त्यामुळे तिथूनही प्रतिनिधीसंख्येत त्यांना फार आघाडी मिळालेली नाही. असेला प्रायमरीमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांनी सगळी राज्ये जिंकली.टेड क्रुझ यांचा असेला प्रायमरीमध्ये अजिबात निभाव लागला नाही. बहुसंख्य राज्यांमध्ये उमेदवारी मिळायची अजिबात शक्यता नसलेल्या जॉन कॅसिक यांनी टेड क्रुझ यांच्यापेक्षा जास्त मते घेतली.कालच्या इंडियाना प्रायमरीमध्येही डॉनल्ड ट्रम्प यांनी टेड क्रुझ यांचा १७% मताधिक्याने आरामात पराभव केला. त्यानंतर झालेली सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे टेड क्रुझ यांनी उमेदवारी मिळवायच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता डॉनल्ड ट्रम्प यांच्यापुढे केवळ जॉन कॅसिक आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळायची शक्यता शून्य आहे. तेव्हा रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प हेच उमेदवार असतील हे आता स्पष्ट झाले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षात मात्र हिलरींकडे आता सुपरडेलीगेट मिळून २२०२ प्रतिनिधी आहेत आणि त्यांना गरज आहे एकूण २२८३ प्रतिनिधींची. तेव्हा सुपरडेलीगेटनी मत बदलले नाही तर हिलरींची उमेदवारी पण पक्कीच असे धरायला हरकत नसावी.तरीही बर्नी सँडर्स अजूनही माघार घ्यायला तयार नाहीत. भाप्रवेप्रमाणे आजच सकाळी सी.एन.एन वर बघितले की बर्नी सँडर्स यांची अपेक्षा आहे की त्यांनी प्रायमरीमध्ये ज्या राज्यांमधून विजय मिळवला होता त्या राज्यांमधील सुपरडेलीगेट त्यांना मत देतील.पण वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी विजय मिळवलेली राज्ये आकाराने लहान आहेत.आणि त्यापैकी बर्‍याच राज्यांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षापेक्षा रिपब्लिकन पक्षाचा जोर जास्त आहे (उदाहरणार्थ कॅन्सस, नेब्रास्का, आयडॅहो इत्यादी). तेव्हा या राज्यांमधून डेमॉक्रॅटिक पक्षाचे किती सुपरडेलीगेट असणार आणि त्यापैकी किती मते बदलणार हा पण प्रश्नच आहे. तेव्हा ८ नोव्हेंबरला हिलरी क्लिंटन विरूध्द डॉनल्ड ट्रम्प अशी लढत होईल असे जवळपास नक्की झाले आहे. रिपब्लिकन पक्षात मात्र असेला

कालच्या मंगळवारी वेस्ट व्हर्जिनिया राज्यात दोन्ही पक्षांच्या तर नेब्रास्कामध्ये रिपब्लिकन पक्षाची प्रायमरी झाली. डेमॉक्रॅटिक पक्षात वेस्ट व्हर्जिनियामध्ये बर्नी सँडर्स यांनी हिलरींचा १५% मताधिक्याने पराभव केला.सँडर्स यांना १६ तर हिलरींना ११ प्रतिनिधी मिळाले. रिपब्लिकन पक्षात वेस्ट व्हर्जिनिया आणि नेब्रास्का या दोन्ही राज्यात डॉनल्ड ट्रम्प यांनी जोरदार विजय मिळवला आहे. रिपब्लिकन पक्षात ट्रम्प हेच उमेदवार असणार हे नक्की झाले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षात मात्र बर्नी सँडर्स अजूनही माघार घ्यायला तयार दिसत नाहीत. आता १७ मे रोजी केंटकी आणि ऑरेगन या राज्यांमध्ये तर ७ जूनला कॅलिफॉर्निया या सगळयत मोठ्या राज्यात प्रायमरी आहेत. मला वाटते की कॅलिफॉर्नियात पराभव झाल्यास सँडर्स माघार घेतील (त्यांच्यापुढे दुसरा पर्याय राहणार नाही). या घडीला हिलरींना ५६% तर सँडर्स यांना ४२% मते मिळाली आहेत. ४२% हा आकडाही तसा कमी नाही.त्यामुळे नंतर उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपला दावा बळकट रहावा या कारणामुळे सँडर्स माघार घेत नसतील हे कारण आहेच. डॉनल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पारंपारिक रिपब्लिकनपेक्षा थोडे वेगळे आहेत. म्हणजे पारंपारिक रिपब्लिकन फ्री ट्रेडला समर्थन देतात तर ट्रम्प हे त्याच्या विरोधात आहेत. अर्थातच हे निवडणुकपूर्व र्‍हेटॉरीक आहे आणि ते अध्यक्षपदी आल्यास नंतर ते बदलेल ही शक्यता आहेच. पण सांगायचा मुद्दा हा की अमेरिकेत मतदारांमधील काही गटाला फ्री ट्रेडचे चटके बसले आहेत. असे मतदार ट्रम्पकडे वळायची शक्यता आहे.आणि डेमॉक्रॅटिक पक्षात सँडर्स यांची भूमिकाही फ्री ट्रेडविरोधी आहे. मिशिगनमध्ये त्यांना अनपेक्षित विजय मिळाला त्यामागे हे एक मोठे कारण होते असे म्हटले जात आहे. फ्री ट्रेडविरोधी डेमॉक्रॅटिक मतदार ट्रम्पकडे जाऊ नये म्हणून सँडर्स यांना उपाध्यक्षपदाचे उमेदवार केले जाईल ही शक्यता आहेच. फ्री ट्रेडविरोधी डेमॉक्रॅटिक मतदार फ्री ट्रेडच्या समर्थक रिपब्लिकन पक्षाचे फ्री ट्रेडचे (निदान वरकरणी) विरोधक असलेल्या उमेदवाराच्या बाजूने जायची शक्यता आहे. आणि डॉनल्ड ट्रम्प न आवडणारे रिपब्लिकन पक्षाचे अनेक पारंपारिक मतदार डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकायची शक्यता आहे. त्यातून पॅरीस, ब्रसेल्ससारखा आणखी एखादा हल्ला युरोपात झाला तर ते ट्रम्पच्या पथ्यावर पडेल ही पण शक्यता मोठी. एकंदरीत चित्र रोचक असेल असे वाटते.

In reply to by अर्धवटराव

हा इशारावजा धोका किंवा धोकावजा इशारा आहे काय ?
दोन्ही नाही. तर केवळ एक शक्यता :)

In reply to by गॅरी ट्रुमन

पारंपारिक भूमिकेपेक्षाही जास्त उजवीकडे झुकलेले आहेत. मला वाटतं ते निव्वळ एक तडजोड म्हणून रिपब्लिकन पक्षात आले, कारण स्वतंत्र उमेदवाराला अमेरिकन राजकारणात स्थान आणि भवितव्य नाहीये.राॅस पेराॅट यांच्यानंतर स्वतंत्र उमेदवार असा कुणी उभा राहिलेलाच नाही अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत. ट्रम्प हे apparatchik नसल्यामुळेच ते अशी बेछूट विधानं करताहेत.

ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होणार आणि ते अध्यक्ष व्हायची शक्यता आहे हे स्पष्ट झाल्यावर इतर देशांच्या नेत्यांनी त्यांची ट्रम्पविरोधी भूमिका नमती घेतलेली दिसते. या नेत्यांमध्ये ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांचा समावेश आहे. याविषयी http://edition.cnn.com/2016/05/09/politics/world-leaders-react-trump-pr… हा लेख वाचनीय आहे.

दुर्दैवाने लिंक मिळत नाहीये. त्यानुसार या निवडणुकीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर नकारात्मक मतदान होण्याची शक्यता आहे. मला ट्रम्प नकोय म्हणून मी हिलरीला मत देणार किंवा हिकरी नकोय म्हणून ट्रम्पला मत देणार - असं होण्याची शक्यता या निवडणुकीत भरपूर आहे. मला स्वतःला Democratic पक्षाला म्हणजे हिलरी क्लिंटन यांना या नकारात्मक मतदानाची आणि anti-incumbency ची झळ लागेल असं वाटतंय.

काल रिपब्लिकन पक्षात नॉर्थ डॅकोटा राज्यातील अनबाऊंड डेलिगेटनी (डेमॉक्रॅटिक पक्षातील सुपरडेलीगेटना समकक्ष) डॉनल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहिर केला आणि त्यामुळे डॉनल्ड ट्रम्प यांनी १२३७ हा जादूचा आकडा (मॅजिक फिगर) ओलांडला आहे. रिपब्लिकन पक्षात आता डॉनल्ड ट्रम्प हे उमेदवार असणार हे नक्की झाले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षात मात्र बर्नी सँडर्स यांना उमेदवारी मिळणे जवळपास अशक्य असले तरी ते अजूनही माघार घ्यायच्या मनस्थितीत नाहीत. बर्नी सँडर्स यांची ट्विटरवरील पुढील ट्विट त्याचेच द्योतक आहे-- आणि त्यातून बर्नी सँडर्स यांना कॅलिफॉर्निया हे मोठे राज्य जिंकणे अवघडच आहे.तेव्हा ७ जूनला कॅलिफॉर्निया प्रायमरी झाली की त्यानंतर सँडर्स माघार घेतील असे वाटते.

ट्रम्प आला तर जागतिक लेवल वर लैच धिंगाणा होईल असे वाटते, ट्रूमन सरांचे विचार ह्यावर वाचण्यास उत्सुक आहे मी !

In reply to by नाईकांचा बहिर्जी

ट्रम्प आला तर जागतिक लेवल वर लैच धिंगाणा होईल असे वाटते,
तसे व्हायची शक्यता कमी आहे असे मला वाटते. ट्रम्प बोलत काहीही असले तरी प्रत्यक्षात काय करतील आणि किती करतील हा प्रश्नच आहे. ट्रम्प अमुक एखादी गोष्ट करतील असे वाटत आहे त्याच्या बरोबर उलटी गोष्ट त्यांनी अध्यक्षपदी आल्यावर केली तरी आश्चर्य वाटायला नको. रिचर्ड निक्सन अध्यक्षपदी येण्यापूर्वी चीनविरोधी समजले जात असत.पण अध्यक्षपदी आल्यावर चीनला मान्यता देणारे आणि भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष तेच होते. याचे कारण (मला वाटते) एखाद्या गोष्टीवर टोकाची भूमिका सुरवातीला घेतली तर नंतर निर्णय घेताना तीच गोष्ट केली तरी ती गोष्ट करताना देशाच्या हितसंबंधांना धोका निर्माण झालेला नाही असे चित्र उभे करता येणे सोयीचे होते. भारतातील उदाहरण द्यायचे झाले तर पारंपारिकपणे भाजप हा विरोधी पक्षात असताना पाकिस्तानविरोधी कडक भूमिका मांडणारा पक्ष राहिला आहे.त्याउलट काँग्रेस हा पाकिस्तानवर त्या मानाने कमकुवत भूमिका घेणारा पक्ष असे चित्र होते. त्यामुळे वाजपेयींनी पुढाकार घेऊन १९९९ मध्ये लाहोर डिक्लेरेशनवर सही केली तेव्हा वाजपेयी भारताच्या हितसंबंधांशी तडजोड करून असे काही करणार नाहीत असे चित्र निदान वरकरणी फार काही प्रयत्न करायला न लागता उभे राहिले. तीच गोष्ट काँग्रेस पक्षाच्या सरकारला करणे तितके सोपे गेले नसते कारण काँग्रेसच्या सरकारने असे कोणतेही पाऊल उचलले तर 'कशावरून हे भारताचे हितसंबंधांना धक्का पोहोचवत नाहीत' या प्रश्नाला सामोरे जाणे गरजेचे पडले असते. वाजपेयींना त्यावेळी तरी या प्रश्नाला सामोरे जावे लागले नव्हते. वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर बोलताना (एप्रिल १९९९ मध्ये-- याच ठरावावरील मतदानात वाजपेयी सरकार एका मताने पडले होते) अडवाणींनी हा मुद्दा मांडला होता. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की राजकारणी सत्तेवर येण्यापूर्वी कितीही काहीही बोलत असले तरी प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना त्या सगळ्या गोष्टी गाऊंड रिअ‍ॅलिटी लक्षात आल्यावर करता येतातच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) असे नाही. त्यामुळे डॉनल्ड ट्रम्प यांच्याविरूध्द 'ते अमुक करतील ते तमुक करतील' इत्यादी बोलले जात असले तरी ते प्रत्यक्षात किती गोष्टी करू शकतील याविषयी शंकाच आहे. रॉनाल्ड रेगन यांच्याविषयी 'ते तिसरे महायुध्द सुरू करतील' अशी भिती व्यक्त केली जात होती. अर्थातच त्यांनी तसे काही केले नाही. पण त्यांनी अशी पावले उचलली की त्यातून सोव्हिएट रशियाच पुढे कोलमडला आणि रशियाविरूध्द तिसरे महायुध्द सुरू करायची गरज (त्यावेळी) राहिली नाही.

In reply to by नाईकांचा बहिर्जी

ट्रंपचे विचार हे जागतिक पातळीवर उलथापालथी करण्याचे आहेत असे वाटत नाही. मेक्सिकोतून होणारी घुसखोरी थांबवली तर जागतिक पातळीवर काय धिंगाणा होणार डोंबल? चीनशी व्यापार करताना अमेरिकेच्या फायद्याचे धोरण ठरवले, समजा चीनमधून येणार्या मालावर कर लावला तर चीनवर परिणाम होईल पण जगावर का? ट्रंपबद्दल अकारण बाऊ करणे ही क्रेझ बनली आहे.

निर्वासित, स्थलांतरीत, भारतीय, मुस्लिम इ. विरूद्ध ट्रम्प कितीही बोलत असले तरी ते जर प्रत्यक्षात निवडून आले तर त्यांना आहे तीच धोरणे पुढे चालवावी लागतील. वरील प्रश्नांवर त्यांचे धोरण पूर्वीच्या अध्यक्षांसारखेच असेल. समजा नोव्हेंबर मध्ये ट्रम्प निवडून आले तर, अमेरिकेत कट्टर उजव्या विचारांचे ट्र्म्प आणि भारतात तथाकथित फॅसिस्ट मोदी अशा परिस्थितीत जगभरातील 'पुरोगामी, उदारमतवादी, मानवतावादी आणि निधर्मी विचारवंताचे' काय होणार? त्यांची अवस्था 'न घरका ना घाटका' अशी होईल.

(खालील प्रतिसाद हा हिलरी क्लिंटनच्या बाजूचा प्रतिसाद म्हणून धरून वाचू नये. कारण तसा तो नाही. केवळ ट्रम्प इतकाच मुद्दा आहे. हिलरीबद्दल नंतर कधीतरी). ट्रम्प आता रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासात प्रायमरी निवडणुकांमधे सगळ्यात जास्त मते ट्रम्प यांना मिळाली आहेत आणि अजून १० राज्यातील निवडणुका झालेल्या नाहीत! काल रात्री सीएनएन वर मायकल रेगन यांची मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी काही चांगले मुद्दे मांडले... सगळ्यांना आशा आहे की ट्रम्प आता जरा गिअर्स बदलतील आणि जरा नीट बोलायला लागतील. त्यात हे मायकल रेगन देखील आले. पण त्यांच्या मते रेगन यांनी शत्रूंमधून मित्र तयार केले तर ट्रम्प हे मित्रांमधे (स्वपक्षियात) शत्रू तयार करत आहेत. त्यांचे दुसरे म्हणणे होते की, त्यांना ट्रम्प यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत नाही, पण तसे आवडणारे बहुसंख्य असणे हे काळजीचे कारण आहे. अजून एक महत्वाचा भाग - ट्रम्प यांचा विचार करताना आपण साहजिक रेगन यांच्याशी कळत-नकळत तुलना करतो कारण रेगन देखील आधी कलाकार होते (अर्थात राजकारणी नव्हते). ते जरी खरे असले तरी राष्ट्राध्यक्ष होण्याआधी रेगन हे दोन वेळेस म्हणजे ८ वर्षे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर होते आणि एकदा रिपब्लिकन प्रायमरीत हरलेले देखील होते. हे महत्वाचे का, कारण त्यांना राजकारणाचा आणि राज्यशासनाचा अनुभव होता. हे अगदी नजिकच्या भूतकाळातील अत्यंत अनपॉप्युलर ठरलेल्या बुश-चेनींना पण लागू होते. बुश हे गव्हर्नर होते तर चेनी हे मला वाटते, प्रेसिडंट फोर्ड, रेगन आणि मोठ्या बुश यांच्या राज्यात कसले न कसले सेक्रेटरी होते. ट्रम्प यांची आपण नकळत मोदींशी तुलना करतो. कारण मोदींना पण असाच विरोध झाला होता असे वाटून. पण त्यात जमिन अस्मानाचे अंतर आहे. दुसरा भाग असा की. मोदी आधी संघप्रचारक होते. त्यांना ८०च्या दशकाच्या शेवटास भाजपामधे पाठवले गेले. तेथे त्यांनी विविधपातळीवर कामे केली. त्यातून अनुभवी झाल्यावर आणि योग्य वाटल्यावर त्यांना मुख्यमंत्री केले गेले. पुढचा सर्व इतिहास आहे. ट्रम्प यांना यातील काहीच नाही आहे. ट्रम्प हे काही वाटत असले तरी उजवे नाहीत. ते डावे देखील नाहीत. हिलरी क्लिंटनच्या सिनेट निवडणुकीच्या निधीसाठी त्यांनी भरपूर मदत केली आहे. चेलसी क्लिंटन आणि ट्रम्प यांची मुलगी या मैत्रिणी आहेत. (अथवा होत्या) क्लिंटन दांपत्य ट्रंप यांच्या इस्टेटीवर (मला वाटते युरोपमधे देखील) पाहूणे म्हणून जाऊन आलेले आहे. म्हणून असे सुरवातीस म्हणले गेले होते की क्लिंटन दांपत्यानेच त्यांना प्रोत्साहन दिले, जेणे करून रिपब्लिकन पक्षात गोंधळ होईल. जर ते खरे असले तर हा आता त्यांच्यासाठी तो भस्मासूर ठरला आहे. गंमत म्हणजे ट्रम्प यांच्या मुलांनी न्यूयॉर्क प्रायमरीमधे (जेथे ते मतदान करू शकले असते तेथे) मतदार म्हणून नोंदवणी न करता मत देण्याचे टाळले असेच म्हणावे लागेल. ट्रम्प हे यशस्वी उद्योगपती आहेत असे म्हणण्याऐवजी उद्योगी आहेत असे म्हणणे जास्त योग्य ठरेल! :) अर्थात त्यामुळे काही फरक पडत नाही. विशेषतः अमेरीकेत हे नक्कीच चालू शकते आणि चालले पाहीजे देखील. वर चर्चेत दोन्ही बाजूने आलेला मुद्दा जो इतरत्र देखील वाचला ऐकला आहे, तो म्हणजे ट्रम्प निवडणून आल्यावर काय होईल - युद्ध, मुसलमानांवर आणि त्याच लाईनीत सर्वच अल्पसंख्यांकांवर अन्याय वगैरे... मला नाही वाटत तसे काही होईल. पण तरी देखील ते या सत्तापदासाठी योग्य नाहीत असेच वाटते. त्याचे कारण म्हणजे एकंदरीतच त्यांचे वर्तन आणि वक्तव्ये. (त्यात एकदा स्वतःच्या मुलीच्या रुपाचे विचित्र कौतुक देखील ऐकायला मिळाले). ट्रम्प यांना असलेला अंतर्गत म्हणजे रिपब्लिकन पक्षातला विरोध, हा मोदींना झालेल्या भाजपांतर्गत (अडवाणी वगैरे) विरोधासारखा नाही. येथे खरेच तत्वाचा प्रश्न तयार झाला आहे. एका अधिकृत रिपब्लिकन ब्लॉगरने म्हणल्याप्रमाणे हिलरी कुणालाच (रिपब्लिकन्सना) नको आहे. पण म्हणून अण्वस्त्रांच्या चाव्या ट्रम्पच्या हातात देणे बरोबर ठरणार नाही.... अर्थात हे केवळ उदाहरण म्हणून तो म्हणत होता. पण मुद्दा आहे तो राजकीय नेतृत्व गुणांचा. म्हणूनच अजूनही अनेक रिपब्लिकन नेते हे पाठींबा जाहीर करायला तयार नाहीत. किंबहूना काल ऐकल्याप्रमाणे अनेक जण कन्व्हेंशनला जाणार देखील नाही आहेत. इतके सगळे असले तरी एक नक्की वाटते - अमेरीकन लोकशाही व्यवस्था (त्यातील गुणदोषांसहीत) खूपच प्रौढ आहे. त्यामुळे जगबुडी होईल असे काही मला वाटत नाही. तसेच क्लिंटन येवोत अथवा ट्र्म्प, ते एक टर्म राष्ट्राध्यक्ष होण्याचीच शक्यता अधिक आहे. ------------- जाता जाता विरंगुळा... :) ज्यांनी कोणी स्पिलबर्गची "बॅक टू द फ्युचर" चित्रपटमालीका पाहीली असेल त्यातील विनोदी खलनायक "बिफ" (Biff) ची कॅरेक्टर ही स्पिलबर्ग आणि त्याच्या टिमने ट्रंपवर रेखाटली आहे. या चित्रपटाच्या भाग दोन मधे वर्तमानात जाताना गडबड होते आणि सगळा काळ आणि वर्तमान बदलले असते. त्याला An alternative time line 1985 A - Paradox म्हणले आहे. कॅसिनोज आणि गुंडगिरी वाढलेली असते. ते विशेष करून ट्रम्प कॅसिनोवर आधारीत होते... Marty: "I don't get it, Doc. I mean, how can all this be happening? It's like we're in hell or something." Doc: "No, it's Hill Valley. Although I can't imagine hell being much worse!" -----

In reply to by विकास

ट्रम्प हे काही वाटत असले तरी उजवे नाहीत. ते डावे देखील नाहीत.
नेमकं! असलाच तर त्याची धोरणं/मतं (प्रायमरीत बदलण्यापूर्वी) डावीकडे झुकलेली वाटतात - बहुतेक 'न्यू यॉर्क व्हॅल्युज'च्या प्रभावामुळे.
वर चर्चेत दोन्ही बाजूने आलेला मुद्दा जो इतरत्र देखील वाचला ऐकला आहे, तो म्हणजे ट्रम्प निवडणून आल्यावर काय होईल - युद्ध, मुसलमानांवर आणि त्याच लाईनीत सर्वच अल्पसंख्यांकांवर अन्याय वगैरे... मला नाही वाटत तसे काही होईल.
सहमत. शिवाय, अमेरिकन व्यवस्थेतल्या चेक्स अँड बॅलन्सेसमुळे कुणाही एका व्यक्तीला (किंवा ब्रँचला) हटवादीपणे आपलं घोडं पुढे दामटणं सोपं नसतं.

In reply to by विकास

अजून एक महत्वाचा भाग - ट्रम्प यांचा विचार करताना आपण साहजिक रेगन यांच्याशी कळत-नकळत तुलना करतो कारण रेगन देखील आधी कलाकार होते (अर्थात राजकारणी नव्हते). ते जरी खरे असले तरी राष्ट्राध्यक्ष होण्याआधी रेगन हे दोन वेळेस म्हणजे ८ वर्षे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर होते आणि एकदा रिपब्लिकन प्रायमरीत हरलेले देखील होते. हे महत्वाचे का, कारण त्यांना राजकारणाचा आणि राज्यशासनाचा अनुभव होता. हे अगदी नजिकच्या भूतकाळातील अत्यंत अनपॉप्युलर ठरलेल्या बुश-चेनींना पण लागू होते. बुश हे गव्हर्नर होते तर चेनी हे मला वाटते, प्रेसिडंट फोर्ड, रेगन आणि मोठ्या बुश यांच्या राज्यात कसले न कसले सेक्रेटरी होते.
रॉनाल्ड रेगन पूर्वी राजकारणी नव्हते त्याचप्रमाणे आयसेनहॉवरही पूर्वी राजकारणी नव्हते तर ते सैन्याचे प्रमुख होते. तरीही आयसेनहॉवर हे वाईट अध्यक्ष होते असे कोणी म्हणेल असे वाटत नाही. रेगन तर अलीकडच्या काळातील चांगलेच लोकप्रिय अध्यक्ष होते. ओबामांचे म्हणाल तर त्यांनाही कितपत अनुभव होता? राष्ट्रीय पातळीवर केवळ साडेतीन वर्षांचा-- इलिनॉयचे सिनेटर म्हणून जानेवारी २००५ ते २००८ च्या निवडणुकीपर्यंत एवढाच राष्ट्रीय पातळीवरील अनुभव त्यांना होता. त्यापूर्वी ७ वर्षे ते इलिनॉय राज्यातील हाऊसचे सदस्य होते. त्याउलट उपाध्यक्ष जोसेफ बायडेन ३६ वर्षांपासून सिनेटचे सदस्य होते म्हणजे त्यांना राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव ओबामांपेक्षा बराच जास्त होता. प्रशासनाचा आणि राजकारणाचा पूर्वानुभव असणे हा थोडासा ओव्हररेटेड मुद्दा आहे का?

In reply to by गॅरी ट्रुमन

प्रशासनाचा आणि राजकारणाचा पूर्वानुभव असणे हा थोडासा ओव्हररेटेड मुद्दा आहे का? माझ्या मते कसलातरी अनुभव असणे महत्वाचे आहे अगदी एका टोकाच्या विचारसरणीचे राज्य करायचे असले तरी. म्हणजे किमान प्रशासनाचा तरी अनुभव असावा अथवा सत्तेच्या राजकारणाचा तरी... असा विचार करा, इतरत्र म्हणल्याप्रमाणे, मल्या ला सोडा (आय मीन या चर्चेतील वादातून! ;) ) पण उद्या अंबानी बंधू अथवा रतन टाटा पंतप्रधानपदी जाऊन बसले तरी त्यांना अवघड जाऊ शकते. सरकार चालवणे आणि धंदा चालवणे हे जरी वरकरणी समांतर वाटले तरी त्यात जमिन अस्मानाचा फरक आहे. याचा अर्थ असा नाही की टाटा-अंबानींना चालवता येणार नाही पण त्याला वेळ द्यावा लागेल आणि काही अंशी का होईना पण धंदेवाईकाची वस्त्रे बाजूला ठेवावी लागतील... ट्रम्पच्या बाबतीत लफडे असे आहे की ते बोलतात इतकेव ते काही धंद्यात पण यशस्वी नाहीत. शिवाय आत्तापर्यंत सर्वांनाच दुखावण्याचा चंग बांधला आहे. ट्रंपना फक्त डावेच विरोध करत आहेत असे नाही तर स्वपक्षिय पण विरोध करत आहेत हे आधी सांगितले आहेच. बरं त्यातील प्रत्येकजण काही politics as usual म्हणणार्‍यातला आणि तसे वागणार्‍यातला नाही. याचे मोठे उदाहरण म्हणजे अमेरीकन काँग्रेसचा सभापती (स्पिकर) पॉल रायन जो अत्यंत कडक उजवा आहेच, रॉमनी बरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उभा होता. हा शेवटी त्याला पाठींबा देईल ही कदाचीत पण अजूनही ट्रम्पबद्दलचे रिझर्वेशन्स जाहीरपणे सांगत आहे. असे का व्हावे, ह्याचा विचार करायला हवा असे वाटते.

(हा प्रतिसाद हिलरीच्या विरुद्ध समजला जाऊ नये. अनुभवी राजकारणी हाच विषय आहे. हिलरीबद्दल नंतर कधीतरी!) देशाची धुरा संभाळताना राजकारणाचा अनुभव असणे, सरकार चालवण्याचा अनुभव असणे ह्याचा अकारण बाऊ केला जात आहे. बुश आणि चेनी ह्यांचे अमाप, अफाट, अगाध अनुभव विचारात घेऊनही असे म्हणता येईल की त्यांनी अमेरिकेकरता घातक, दीर्घकाळ मारक ठरणारे, अमेरिकेला दिवाळखोरीकडे नेणारे, अमेरिकेची प्रतिमा काळीकुट्ट करणारे निर्णय घेतले. इराकचे युद्ध हा त्यातला सगळ्यात घातक निर्णय. बुश चेनीची कारकीर्द ही अमेरिकेतील सगळ्यात वाईट राजवट समजली जाते. असे असेल तर प्रशासनाचा अनुभव काय कामाचा? आपल्या मूर्खपणाचे असे दूरगामी घातक परिणाम होतात हे कळण्याची अक्कल नसेल तर निव्वळ त्यांच्या अनुभवाचे काय लोणचे घालायचे आहे का? हिलरीही अत्यंत अनुभवी, कसलेली मुत्सद्दी वगैरे समजली जाते. तिनेही इराक युद्धाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता. जर तिलाही आपल्या निर्णयाची घातकता समजत नसेल तर असल्या राजकारणाच्या पोकळ अनुभवाचा काय उपयोग? जर व्यावसायिक राजकारणी अशी वाट लावत असतील तर राजकारणापासून अलिप्त असणारे लोक सत्तेवर आणून बघू असा विचार लोकांनी केला तर चूक काय? शिवाय ओबामाला असा काय सत्तेचे शकट हाकायचा प्रचंड अनुभव होता? लोकशाहीत लोकांमधून नेता निवडायचा असतो हे आपण विसरता कामा नये. केवळ राजकारणी कारकीर्द असणारेच (करीयर पॉलिटिशियन्स) ह्या पदाला लायक आहेत असा प्रवाद रुजवणे हे घातक आहे.

In reply to by हुप्प्या

जर व्यावसायिक राजकारणी अशी वाट लावत असतील तर राजकारणापासून अलिप्त असणारे लोक सत्तेवर आणून बघू असा विचार लोकांनी केला तर चूक काय? म्हणूनच आपण राहूल गांधींना पंतप्रधान करायला हवे होते! ते व्यवसायाने राजकारणात असून पण अलिप्त राहू शकतात! विनोदाचा भाग सोडा, ट्रंपला पाठींबा देणारी लोकं ही बहुतांशी त्यांच्या भडक विधानात आपल्याला हवे असलेले ऐकणारी आहेत. म्हणून त्याच्या बाजूने आहेत. मग त्यात कधी मुस्लीम विरोध असतो तर कधी अल्पसंख्य-स्थलांतरीत-मेक्सिकन्स विरोध असतो. कधी गन्स च्या बाजूने बोलणे असते तर बर्‍याचदा स्त्रीयांच्या विरोधात बोलणे असते. आत्ताच्या काळात ज्याला सभ्यतेने बोलणे समजले जाऊ शकेल असे बोलणे ट्र्म्प करत नाहीत. त्यामुळे आपल्याला जे बोलायचे असते तो हा माणूस पब्लिकमधे बोलतो यावर जनता खूष होते. बुश चेनीची कारकीर्द ही अमेरिकेतील सगळ्यात वाईट राजवट समजली जाते. म्हणूनच माझ्या प्रतिसादात, "नजिकच्या भूतकाळातील अत्यंत अनपॉप्युलर ठरलेल्या बुश-चेनींना पण लागू होते." असे म्हणले होते. पण गंमत माहीत आहे का? या बुश-चेनींनीच परत यावे असे तमाम भारतीयांना - विशेष करूण भारतातील देखील भारतीयांना वाटत होते. कारण त्यांच्या कारकिर्दीत भारतातल्या कंपन्यांना येथे काँट्रॅक्ट्स मिळणे सोपे गेले त्यामुळे आउटसोअर्सिंग वाढले म्हणून...त्या वेळेस देखील असे अनेक डेमोक्रॅटीक अमेरीकन्स होते ज्यांना केरी आवडत नव्हते. पण बुश-चेनी पण नको होते. आज काही वेगळे चाललेले नाही. देशाची धुरा संभाळताना राजकारणाचा अनुभव असणे, सरकार चालवण्याचा अनुभव असणे ह्याचा अकारण बाऊ केला जात आहे. प्रश्न नुसत्या राजकारणाचा अनुभवाचा नाही. ट्रम्प यांचे एअरलाईन्स, व्होडका, कॅसिनो, आदी उद्योग बुडीत खात्यात गेले आहेत. कौटूंबिक गोष्टी काढायच्या ठरवल्या तर त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या लग्नांना ग्रीनकार्ड मॅरेजेस म्हणले जाते. ते जर क्वालीफिकेशन असले तर मग आपल्याकडे विजय मल्यांनाच पंतप्रधान करायला हवे. ट्रम्प आज स्वतःचे टॅक्सफॉर्म्स अजून जाहीर करायला तयार नाहीत आणि नुसतेच मी श्रीमंत आहे आणि कुणाकडून पैसे घेणार नाही म्हणत टिमकी वाजवत होते. आता पैसे मागायला लागलेत.... म्हणूनच भारतीय संदर्भ देऊन उदाहरण देयचेच असेल तर इतकेच म्हणेन की, देव न करोत, पण उद्या फक्त आपल्याला दोनच पर्याय असतील - मल्या विरुद्ध केजरीवाल, तर काय करायचे? आज अमेरीकन निवडणुकीची ही अवस्था आहे. तरी देखील वरील प्रतिसादात म्हणलेले परत लिहीतो, "अमेरीकन लोकशाही व्यवस्था (त्यातील गुणदोषांसहीत) खूपच प्रौढ आहे. त्यामुळे जगबुडी होईल असे काही मला वाटत नाही. तसेच क्लिंटन येवोत अथवा ट्र्म्प, ते एक टर्म राष्ट्राध्यक्ष होण्याचीच शक्यता अधिक आहे." असो.

In reply to by विकास

या बुश-चेनींनीच परत यावे असे तमाम भारतीयांना - विशेष करूण भारतातील देखील भारतीयांना वाटत होते. कारण त्यांच्या कारकिर्दीत भारतातल्या कंपन्यांना येथे काँट्रॅक्ट्स मिळणे सोपे गेले त्यामुळे आउटसोअर्सिंग वाढले म्हणून..
२००४ मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश विरूध्द जॉन केरी अशी लढत होती त्यावेळी भारत सरकारलाही बुशच निवडून यावेत असे वाटत होते असे वाचल्याचे आठवते. तसेच २००८ मध्ये बराक ओबामा विरूध्द जॉन मॅककेन अशी लढत होती तेव्हाही ओबामांचे भारताविषयी धोरण कसे असेल हे स्पष्ट नसल्यामुळे जॉन मॅककेन हे बुश यांचेच भारताविषयीचे धोरण चालू ठेवतील या अपेक्षेने २००८ मध्येही भारताचा कल ओबामांपेक्षा मॅककेन यांच्याकडे होता असेही वाचल्याचे आठवते. याक्षणी याचे संदर्भ लगेच देता येणार नाहीत पण अशा स्वरूपाचे त्यावेळी वाचले होते हे आठवते हे नक्कीच. एकूणच आधीच्या अध्यक्षांपेक्षा बुश हे भारतासाठी चांगले होते. सप्टेंबर २००८ मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी वॉशिंग्टनला भेट दिली होती त्यावेळी बुश यांच्याविषयी खालील उद्गार काढले होते--- When history is written, it will be recorded that Bush played a historic role in bringing our democracies closer. The credit for ending India’s nuclear apartheid goes to you. People of India love you तसेच मनमोहन आणि बुश यांची ही मिठी प्रसिध्दच आहे--- Bush तेव्हा सांगायचा मुद्दा हा की बुश अमेरिकेसाठी आणि इतर जगासाठी कसेही असले तरी भारतासाठी ते चांगले असतील तर भारतातील सरकारला आणि सामान्य नागरिकांना बुशविषयी अधिक आत्मीयता वाटली तर त्यात फार काही चूक आहे असे मला तरी वाटत नाही. त्याचप्रमाणे हिलरी आणि डॉनल्ड ट्रम्प या दोघांमध्ये जर डॉनल्ड ट्रम्प अध्यक्ष होणे भारताला अधिक चांगले असेल तर (हा तर फार महत्वाचा आहे) भारतीयांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला तर त्यात काय चुकले?
पण उद्या फक्त आपल्याला दोनच पर्याय असतील - मल्या विरुद्ध केजरीवाल, तर काय करायचे? आज अमेरीकन निवडणुकीची ही अवस्था आहे.
बापरे!!