✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शृँगार १५

अ
अनाहूत यांनी
गुरुवार, 06/02/2016 - 19:28  ·  लेख
लेख
हे इतक सोप होत मग मी उगाचच इतका वेळ वाया घालवला . किती सहजपणे ती तयार झाली . पण ती येईल तेव्हा खर . आता ती आली की परत एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊ . आताच अपॉंइंटमेंट घेऊन ठेऊ . खरच आहे १+१=११ आणि २-१=० . ओके आज घर जरा आवरून घेऊ फारच पसारा झाला आहे . आणि नविन काहीतरी करूया , काय करूया ? कर्टन्स चेंज करूया का ? हो बरेच दिवस झाले आता चेंज करायला हवे . नको तिला आवडणार नाही उगाच खर्च केला म्हणेल . मग दुसर काय कराव ? फुलं ठीक आहेत आणि आणि ... तेव्हढ्यात फोन वाजला . परांजपे सरांनी बोलावून घेतलं . " काय सांगायचं , काय माग लागलय आमच्या , अरे कुणी तक्रार केलीय का आणि काही कारण आहे पण आमचा बॉस आमच्या माग लागला आहे सगळ्या गोष्टी पर्सनली एक्सप्लेन करायला लावतो आहे . तुझी मदत हवी मला . जरा हे सगळं शॉर्टमधे एक्सप्लेन कर ना . " " ठीक आहे पण आमच्या बॉसचं काय ? " " त्याची तू काळजी नको करू मी करतो मॅनेज . " " मग ठीक आहे . " दिवस तिकडेच गेला . संध्याकाळी नेहमीपेक्षा जरा लवकर निघालो त्यामुळे प्रवास आरामशीर झाला . लवकर घरी जाऊन जरा आवरा आवर करण्याचा विचार होता म्हणून जरा भरभर निघालो होतो . शेजारच्या गार्डनपाशी पोहोचलो तर समोरून पूजा येत होती . हाय हॅलो करून पटकन निघायचा विचार होता . इतक्यात तिने विचारले " काय मग वाईफ कधी येते आहे . " " तुला कस माहीत ती येणार आहे ते ? " " हं , काय आहे ना आपल्याला अस वाटत ब-याच गोष्टी आपण कंट्रोल करतो . आपला आपल्या लाईफवर कंट्रोल आहे , पण तस नसतं ना . " " तू काय म्हणते आहेस मला काहीच समजत नाहीए . " " सगळच कुठे समजत आपल्याला ? किंवा सगळं समजण्याचा प्रयत्नतरी का करावा ? " " काय ? कशाबद्दल बोलते आहेस समजेल का मला ? " " आता तुम्ही गडबडीत आहात . भेटूया परत , तेव्हा बोलू . " एवढ बोलून ती निघाली . काय चाललय ? मला तर काही समजायलाही मागत नाही . ही एवढ्याशा वेळात किती प्रश्न निर्माण करून गेली . ही दरवेळी भेटते तेव्हा नविनच काहूर माजवते डोक्यात . त्यापेक्षा तिला भेटायलाच नको . पण तसही चालणार नाही . आता जे प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरतरी मिळूदे मग बघू . आता ही या प्रश्नांची उत्तर देते का नविन प्रश्न निर्माण करते ते तेव्हाच कळेल . घरी आलो आणि आवराआवर करायला सुरूवात केली पण डोक्यात तेच प्रश्न घोळत होते . त्या विचारातच कसतरी काम आवरल आणि बाहेर जाऊन जेवण करून आलो . माघारी येत होतो वाटेत पूजा आणि तिच्या मैत्रिणी चालल्या होत्या . त्यांना पुढे जायचे असल्यामुळे पूजा त्यांचा निरोप घेऊन आमच्या बिल्डिंगच्या दिशेने निघाली . मी काही अंतर मागेच होतो पण आता या वेळी तिच्याशी जाऊन बोलावे का नाही या विचारात होतो . शेवटी विचार केला आता नकोच म्हणून चालण्याचा वेग कमी केला आणि तिला पुढे जाऊ दिले . पुढे कॉर्नरवर ती पुढे गेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी तिथल्या झाडाच्या मागून डोकावून पहाण्याचा प्रयत्न केला , ती काही दिसली नाही . आता मी निर्धास्तपणे पुढे जाऊ शकतो , मी असा विचार करतच होतो तितक्यात समोर पूजा . तिला अस अचानक समोर पाहून मला एकदम दचकायला झालं . " तुम्ही मला फॉलो करत होता . " " नाही " " मग इकडे झाडामागे उभे राहून डोकावून काय बघत होता ? " " ते.. हे .. काय.. ते ..." असा अचानक भलताच प्रसंग ओढावल्यामुळे मला बोलायला पटकन काही सुचतही नव्हत . आणि मी ती आहे की नाही हेच पाहत होतो त्यामुळे काय बोलाव याचा फारच गोंधळ होत होता . मला अस गोंधळलेल पाहून तिला हसू आलं व ते वाढतच गेलं आणि ती हसतच राहिली . इकडे मला कळत नव्हत की मी यावर काय प्रतिक्रिया द्यावी .आपणही हसाव का स्वतःच्या या परिस्थितीवर रडाव .थोड्या वेळाने ती हसायची थांबली आणि म्हणाली " फॉलो करत होता तर सांगायचं ना तस . आणि फॉलो कशाला करायचं माझ्याबरोबर आला असता तर बरोबरच गेलो असतो ना दोघे . इथे या मधल्या सेक्शनमधे लाइटही कमी असते आणि वर्दळही फार नसते . आणि अशात कोणीतरी पाठीमागून चोरपावलांनी येत आहे म्हटल्यावर भिती वाटणारच ना . बरोबर आला असता तर मलाही सोबतच झाली असती ना . असू द्या . आता जाऊया ? " " हो " थोडावेळ कोणीच कोणाशी काही बोलल नाही . मग मलाच राहवल नाही आणि मी तिला विचारलं " तू मघाशी काय म्हणत होतीस ? " " तुम्ही मला फॉलो का करत होतात ? " मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो . " अस मी तुम्हाला म्हटले मघाशी . " " ते नाही ग , ते तुला कस कळल मंजू येणार आहे ते . " तिने परत एक स्माईल दिली . आता मात्र ती स्माईल जीवघेणी झाली होती . परत तेच , प्रश्नाच उत्तर नाहीच . याचसाठी मी हिला टाळत होतो . चेह-यावर तेच गूढ हसू ठेवून ती म्हणाली " एव्हढ काय आहे त्यात न समजण्यासारखं ? " आता पुढे काही सांगणार आहे का तिथेच फिरत राहणार आहे ही ? " काही गोष्टी न सांगताच समजतात . तुम्हीही समजून घ्या ना न सांगताच . " मला आता कशाच काही समजायला मागत नव्हत . आणि आपण हिला इतक टाळूनही एका फारच विचित्र परिस्थितीला सामोर जाव लागल . आपल्या प्रश्नांची उत्तर मिळाली नाही ती नाहीतच उलट अजूनच प्रश्न निर्माण झाले ते वेगळेच . आता या प्रश्नांची उत्तर कशी आणि कधी मिळवायची याच विचारात होतो . या विचारात झोपही येत नव्हती . किती वेळा स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न केला की याने आपल्याला काही फरक पडत नाही . पण सगळं व्यर्थ रात्रभर झोप आली नाही ती नाहीच . क्रमशः

Book traversal links for शृँगार १५

  • ‹ शृँगार १४
  • Up
  • शृँगार १६ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
4194 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

Cheating Cheating

मराठी कथालेखक
गुरुवार, 06/02/2016 - 19:45 नवीन
हे काय या आठवड्यात मंजू येणार होती ना ? काय ही घोर फसवणूक हो गरीब बापड्या वाचकांची :) आता या आठवड्यात अजून एक भाग टाकून त्या मंजूला आणा बरं एकदा बरं पुजा या नायकाला कधी एकेरीत बोलत आहे कधी अहो-जाओ.. गोंधळ पुजाचा झालाय की लेखकाचा ? :) एकेरीतच राहूद्यात की ते, मजा येते वाचायला. अवांतर :
मला तर काही समजायलाही मागत नाही
तुम्ही विदर्भाकडचे का ?
  • Log in or register to post comments

मंजू यायच्या आधी काही घटना

अनाहूत
Sat, 06/04/2016 - 19:49 नवीन
मंजू यायच्या आधी काही घटना घडणार आहेत . म्हणून मंजूला यायला वेळ लागत आहे . बरं पुजा या नायकाला कधी एकेरीत बोलत आहे कधी अहो-जाओ..>>> ते तसच असणं अपेक्षित आहे तुम्ही विदर्भाकडचे का ?>>> मी कुठही गेलो तरी तिथल्या लोकांना माझं बोलण दुसरीकडचच वाटत , अगदी सध्याच वास्तव्य ठिकाण आणि मूळ जिथून आहे तिथेही .
  • Log in or register to post comments

चला गाडी काढा

मराठी कथालेखक
गुरुवार, 06/09/2016 - 18:52 नवीन
मंजू काय स्वतःहून येतेय असं दिसत नाही.. आपणच आणायला जावू :)
  • Log in or register to post comments

मंजूबद्दल नाही सांगत पण पुढील

अनाहूत
Fri, 06/10/2016 - 17:55 नवीन
मंजूबद्दल नाही सांगत पण पुढील भाग उद्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा