मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृँगार ९

अनाहूत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कुणाला बस लागते , कुणाला गाडी लागते पण कोकणात कुणाला बोट लागत असेल अस वाटल नव्हत . असो असेल कोणीतरी माझ्यासारखा बाहेरचा . बाकी कोकणातून परतताना या अथांग सागरातून प्रवास करण्याची कवी कल्पना दूर होऊन मला वास्तवात आणण्याच काम केल होत त्या बोट लागलेल्याने . बाकी पुर्वी लोक घोड्यावरून प्रवास करायचे त्यांच काय ? त्यांनाही .... असो. इतर वेळी आयुष्यात फार काही होत नाही , होत नाही म्हणता म्हणता किती काही घडलय गेल्या काही दिवसांमधे . अथांग समुद्र दूरपर्यंत पाहील तिथपर्यंत अगदी क्षितीजापर्यंत . काय आहे क्षितीज ? फक्त एक आभास.... कधी आकाश आणि समुद्र किंवा आकाश आणि जमीन भेटतात का ? फक्त आभास . आणि आकाश म्हणजे तरी काय नुसता दृष्टीचा भ्रम . या भ्रमातच होतो आजपर्यत आणि आयुष्यभर तसाच राहीलो असतो पण तस झाल नाही ..... ======================================= " अग अस काय करतेस डॉक्टर बोलल्या ना या सगळ्या उपचारांनंतर सगळ होईल ठीक . " " पण मला हे सगळ करायचच नाही ना . " " अग अस कस म्हणतेस , हे नाही केल तर आयुष्यात पुढे कस जाऊ शकतो आपण ? आताच प्रयत्न केले तर पुढच्या काही महिन्यात किंवा अगदीच नाही तर एखाद्या वर्षात आपण हा आनंद परत उपभोगू शकतो . " " कसला आनंद ? तुला होत असेल आनंद , मिळत असेल सुख पण मला त्रास होतो , फार त्रास होतो आणि मला या मार्गाने जायचच नाही . " " अग तुला होणा-या त्रासातून तुझी मुक्तता व्हावी यासाठी हे सगळ चालल आहे . " " मला होणा-या त्रासासाठी की तुला हव्या असलेल्या सुखासाठी . " " अग तू आणि मी वेगळे आहोत का ? हे आपल्या सुखासाठी चालल आहे . " " आपल नाही फक्त तुझ . मला कधीही यात इंटरेस्ट नव्हता . " " काय बोलते आहेस तू ? तुला कधीच इंटरेस्ट नव्हता ? अगदी लग्न झाल्यापासून ? " " हो कधीच नव्हता . " " तू स्वतःहून पुढाकार घ्यायची . " " मला कधीही इंटरेस्ट नव्हता , तो फक्त बलात्कार होता जो तू माझ्यावर करत होता . " डोक्यात एखादा स्फोट झाल्यासारख वाटल . आजवरच सगळ प्रेम सगळा शृंगार आता फक्त बलात्कार ठरला होता.... Marital Rape ... माझ्या सगळ्या भावभावनाच संपल्या होत्या . तिच्या डोळ्यात दिसणारी आसक्ती ते तृप्ती या भावना फक्त माझा भ्रम होता का ? तिचे ते अस्पष्ट हंकार फक्त होणा-या त्रासाचेच होते का ? सगळ वैवाहिक आयुष्य झरझर डोक्यापुढून जात होत आणि त्यात दिसणारे प्रेमाचे प्रणयाचे सगळे क्षण बेगडी वाटू लागले होते . माझ सगळ आयुष्यच निरर्थक वाटू लागल होत . अपराधीपणाची जाणीव होऊ लागली होती . तिच्याकडे पाहण्याची हिम्मत होत नव्हती आणि काही बोलण्याचा विचारही करता येत नव्हता . अस कस झाल ? मला तिच्या डोळ्यातली कोणतीही भावना कळलीच नाही का ? अशा एक ना अनेक विचारांच काहूर माजल होत डोक्यात . या विचारांमधे रात्री की पहाटे कधी झोप लागली समजलही नाही . सकाळी कधीतरी जाग आली तेव्हा सोफ्यावर होतो आणि पुरेशी झोप नाही झाली हे सांगायला चुरचुराने डोळे जड होणार डोक आणि झाकणा-या पापण्या पुरेशा होत्या . मंजू समोर आली तर तिच्याशी कस आणि काय बोलायच या प्रश्नाच उत्तर शोधत असतानाच ती समोर आली आणि तिला माहेरी सोडण्याबद्दल सांगून निघूनही गेली . मीही लगेच निघायची तयारी सुरू केली . आज ऑफिसमधे यायला जमणार नाही अस सांगून टाकल . इतरवेळी हेच किती अवघड वाटत होत आणि आता .. इतका वाईट प्रवास आजवर कधी झाला नव्हता , दोघे सोबत होतोही आणि नव्हतोही . रेल्वेचे दोन रूळ एकमेकांना समांतर प्रवास करतात तसच काहीस कायम सोबत प्रवास पण अंतर राखून . सास-यांशी मोघम बोलून आणि सासूबाईंना खोट-खोट हसून उत्तर देतानाही अवघडल्यासारख झाल होत . माघारी येताना कसलीच ओढ नव्हती आणि गडबडही . ऑफिसच काय याचा विचारही नव्हता , म्हणून समुद्रमार्गे यायच ठरवल आणि बोटीवर चढलो .. ======================================= बोट पाण्यावर हेलकावे खात निघाली होती तशाच मनातही अनेक भावभावना आठवणी हेलकावे खात होत्या . सकाळी उठून यंत्रवत आवरत ऑफिसला जात होतो , येत होतो . काय चालल आहे काय नाही कशाचही भान नव्हत . " अरे काय चालल आहे ? कुठ लक्ष आहे तुझ ? कोणत्या दुनियेत असतोस ? काही प्रॉब्लेम आहे का लाईफमधे ? " चक्क बॉस विचारत होता . " काही नाही सर काही नाही . " " अरे मुड ऑफ वाटतोय तुझा . काही असल तर सांग . काही त्रास असेल तर आराम कर थोडा . थोडी सुट्टी घे . " " नाही सर फार काही नाही तुम्ही विचारल हेच खूप झाल माझ्यासाठी सुट्टीची काही गरज नाही . " " काळजी घे आणि काय असेल तर सांग . हेल्थ फस्ट ." चक्क चक्क बॉसने आपल्या तब्येतीची चौकशी केली . आपण याच्याबद्दल काय मत बनवल होत . बॉस असला तरी शेवटी तोही एक माणूसच आहे . छे आपण गेले काही दिवस अतीच केल , अस सर्वांसमोर दुःख उगाळण्यात काय हाशिल आहे . = = = = = = = = आजचा दिवस थोडा उत्साहातच सुरू झाला . काय माहीत का पण आज जरा छानच वाटत होत . नविन दिवस नविन आशा घेऊन येतो तसच काहीतरी असाव . छे गेल्या काही दिवसांमधे मी स्वतःचा अगदी अवतार करून घेतला आहे . दाढीही केली नाही इतके दिवस . कस वाटतय ते ? बर ज्याला दाढी व्यवस्थित येते त्याच ठीक पण माझ्यासारख्या ज्याला ती व्यवस्थित येत नाही , कुठे येते कुठे नाही त्याला सदैव क्लिन शेव्हच रहाव लागत . जे इतके दिवस मी करत होतोच पण गेल्या काही दिवसात .. असो . पण इतक्या दिवसात मंजूचा एकदाही फोन आला नाही . आणि मला स्वतःला इच्छा असूनही फोन करण्याच धाडस होत नव्हत . काय बोलणार होतो ? दाढी करण्यासाठी सगळ साहित्य घेतल होत आणि आता या विचारांनी परत ते कॅन्सल करणार होतो पण विचार केला आता हे दुःखाच प्रदर्शन बास . ....क्रमशः भाग १ http://www.misalpav.com/node/34867 भाग २ http://www.misalpav.com/node/34922 भाग ३ http://www.misalpav.com/node/34975 भाग ४ http://www.misalpav.com/node/35040 भाग ५ http://www.misalpav.com/node/35115 भाग ६ http://www.misalpav.com/node/35170 भाग ८ http://www.misalpav.com/node/35325

वाचने 8204 वाचनखूण प्रतिक्रिया 18

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 13/04/2016 - 20:31
वाचतोय. -दिलीप बिरुटे

बाळ सप्रे 14/04/2016 - 16:53
शृँगार
याचा उच्चार कसा करायचा?????????????????????????????

पैसा 14/04/2016 - 23:26
वाचत आहे. आता इंटरेस्टिंग वळणावर कथा आली आहे.

मराठी कथालेखक 15/04/2016 - 11:58
माझ सगळ आयुष्यच निरर्थक वाटू लागल होत . अपराधीपणाची जाणीव होऊ लागली होती .
अरेरे...इतकं मनाला नाही लावून घ्यायचं.. दुसरी सोय शोधायची किंवा 'आपला हात जगन्नाथ' म्हणायचं :)

In reply to by मराठी कथालेखक

अनाहूत 15/04/2016 - 13:59
आजवरच सगळ प्रेम सगळा शृंगार आता फक्त बलात्कार ठरला होता . ...... यामुळे अस वाटू लागलेल आहे कथानायकाला .