मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृँगार १०

अनाहूत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माणसाच्या मनाचही अस असत ना कधी कोणता विचार येईल आणि काय मानसिक स्थिती होईल सांगता येत नाही . तसच झाल होत आता . साधी दाढी करायची त्यातही दोन तीनदा कापून घेतल होत आता अशा परिस्थितीत मी न डगमगता मिशांकडे मोर्चा वळवला . फारच वाढल्या आहेत म्हणून त्यांना थोड बारीक करण्याचा आणि आकार देण्याचा प्रयत्न होता पण हे साध कामही किचकट झाल होत . कधी इकडची मिशी बारीक कधी तिकडची . इकडं एक आकार तिकड भलताच फार प्रयत्न करूनही काही जमेना तेव्हा तीन पर्याय राहिले होते आहे तसच राहू देण व हस करून घेण . इतके दिवस अस्ताव्यस्त दाढी मिशा घेऊन फिरत होतो पण आता तो उपाय अशक्य होता . दुसरा उपाय ह्या परिस्थितीत सलूनमधे जाऊन ठीक करून घेणे पण तेही ठीक वाटेना तेव्हा शेवटचा पर्याय मिशा पुर्णपणे काढण . शेवटी वाईट वाटत असूनही हाच पर्याय निवडला . कधीही पूर्ण मिशी न काढलेल्या माणसाला पहिल्यांदाच मिशी काढल्यावर काय वाटत हे ज्यांना अनुभव आहे त्यांनाच माहीत . सो आता घरातून बाहेर पडल्याबरोबर काहीही न बोलता अनेकांच्या प्रतिक्रिया मिळू लागल्या . कशाचही फारस मनावर न घेता तसाच पाय-या उतरत होतो तेव्हढ्यात पाटलांनी हाक मारली . " बायको माहेरी गेली त्याच सेलीब्रेशन का परत बॅचलर लाईफ एंजॉय करायला सुरूवात . " - पाटील " अहो काय पाटील साहेब मस्करी करताय काय माझी ? " - मी " अहो छे छे आम्ही कुठले साहेब ? साहेब तर तुम्ही . आणि रविवारी एवढ्या सकाळी सकाळी बनठनके कहा ? " - पाटील म्हणजे आज रविवार आहे आणि मी ऑफिसला निघालो होतो , हे अतीच झाल होत . असो इथेच कळल ते बर झाल . आता सावरायला हव . " नाही जरा काम होत म्हणून निघालो होतो . " - मी " अस अस " करत पाटील गेले . आता तयार होऊन बाहेर तर पडलो पण जाणार कुठे ? असा विचार करत होतो तोपर्यंत " अरे दादा थांब ना रविवारी सुद्धा कुठ निघाला आहेस इतक्या लवकर जरा थांब तर . " ' अरे ' ' दादा ' आपुलकी आणि जिव्हाळा वाटत होता या शब्दांमधे . आमच्या जीममधे पाहिल होत याला . नेहमी एकमेकांना ' भाई ' बोलणारे या लेहज्यात नविन होते . मलाही कुठ जायच होत ? म्हणून थांबलो . " काय दादा आपण दोघ एकाच जीममधे जातो पण तू काय आम्ही यायच्या आधीच निघतो . बाकी बॉडी भारी बनवली आहेस . आम्हालाही काही टिप्स दे . " माझ्यापेक्षा चांगली शरीरयष्टी असलेला मला त्याबद्दल विचारत होता . चांगल आहे , यात उत्तर अपेक्षित नसत तर दाखवलेली आत्मियता महत्त्वाची . बोलत बोलत त्याने मला गच्चीवर यायला सांगितल . आम्ही तिकडे गेलो तर त्यांचा सगळा ग्रूप होता . गप्पा-गप्पांमधे गणेशोत्सव आता जवळ आला आहे आणि त्याची वर्गणी याचा विषय निघाला आणि मला जे आतापर्यंत झाडावर चढवल होत त्याच्या बिलासकट १००० चा आकडा आला . आधीही मला ५०० जास्त वाटायचे आणि आता एकदम डबल . पण हे निगोशिएबल होते पण मी त्या मूडमधे नव्हतो . मी आपला झाडावर बसल्या बसल्या खूष होत होतो . मानसिक स्थितीच अशी होती की कुणाच चांगल बोलण छान वाटत होत अगदी ते वरकरणी किंवा गरजेपुरत असल तरीही . मी तयार होतो पण त्यांचा काहीतरी घोळ सुरू होता . एवढ सगळ केल्यावर त्यांना पावती पुस्तक सापडत नव्हत . ते शेवटी एक एक करून सगळेच खाली गेले तरी मी जाऊ नये यासाठी त्यांच्या ग्रूपमधल्या मुलींना त्यानी तिथ थांबायला सांगितल होत . यातल्या ब-याच मुली तशा आमच्याच सोसायटीतल्या पण कधी कुणाशी बोलण झाल नव्हत त्यामुळे काय बोलायच हा प्रश्नच होता पण त्यांच्यातल्या एकीने स्वतःहून सुरूवात केली . " हाय , मी पूजा . तुम्ही नॉर्मल बोलता हो पण त्या तुमच्या वाईफ किती लाऊड आहेत अगदी भांडायला आल्यासारखे बोलतात . म्हणून तर आम्ही त्यांच्यापासून लांबच असतो . " काय हे माझ्यासमोरच मंजूबद्दल कशाला बोलायला लागली ही ? " सॉरी , तुम्हाला राग येईल पण खर तेच बोलले मी . " आता याला काय बोलायच . सॉरी म्हणून स्वतःला बोलायच ते बोलून मोकळ व्हायच आणि दुस-याला काय बोलायची सोयही नाही ठेवायची . " you look quite young , वाटत नाही you are married but your wife ... Whatsoever ...." माझ्या चेह-यावरचे expressions पाहून तिने आवरत घेतल . तेव्हढ्यात तिलाही तिच्या घरून बोलावण आल आणि ती निघाली पण जाताना एका शाळकरी मुलीला तिथे सोडून गेली . खाली गेलेली मंडळी अजून आली नव्हती आणि त्यांना मला जाऊ द्यायच नव्हत म्हणून हा सगळा उपद्व्याप सुरू होता . बाकी मलाही इतक्या लवकर आवरून बाहेर पडल्यामुळे करण्यासारखही दुसर काही नव्हत म्हणून मीही थांबलो होतो . " तुम्ही किती शांत आणि चांगल बोलता पण तुमची वाईफ आणि माझी आई जेव्हा गप्पा मारतात तेव्हा तिथ थांबायचीही भिती वाटते . त्या दोघींच छान जमत . तुम्ही आज इथे बोलत होता म्हणून समजल तुम्ही किती छान आहात ते . नाहीतर अस अनोळखी लोकांबरोबर बोलायची भितीच वाटते . तुम्हाला तर माहीतच आहे गर्ल्सला किती त्रास सहन करावा लागतो ते . बसमधे , मार्केटमधे अगदी कुठेही . बॉइजच तस नसत ना . " कितीतरी वेळ ती continuously बोलत होती पण या शेवटच्या वाक्यामुळ मला बोलायला लागल . " तुला कोणी सांगितल की हे बॉईजना face कराव लागत नाही ? " " हो . बॉइजना कुठे असल काही face कराव लागत ? " जखमेवरची खपली निघाली होती आणि जुन्या जखमेची ठसठस जाणवू लागली होती . पण आता पर्याय नव्हता या गोष्टी समजणे खरच गरजेच होत तिला . तिला झाली तर यातून मदतच होणार होती . " It does not matter that you are a boy or girl , या गोष्टी कोणाच्याही बाबतीत होऊ शकतात ." " कोणाच्या बाबतीत घडलय का अस ? " " हो " " कोण आहे ज्याला असे experience आले आहेत ? " " मी स्वतः " कोणी कोणाशी पहिल्या वेळी बोलताना असे विषय निघतील अस वाटल नव्हत पण आज तस झाल होत . स्वतःला लागलेल्या ठेचांच्या अनुभवातून दुस-याला सावरण्याचा प्रयत्न होता तो . ....क्रमशः भाग १ http://www.misalpav.com/node/34867 भाग २ http://www.misalpav.com/node/34922 भाग ३ http://www.misalpav.com/node/34975 भाग ४ http://www.misalpav.com/node/35040 भाग ५ http://www.misalpav.com/node/35115 भाग ६ http://www.misalpav.com/node/35170 भाग ८ http://www.misalpav.com/node/35325 भाग ९ http://www.misalpav.com/node/35678

वाचन 5605 प्रतिक्रिया 0