✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अनुवादः तू भेटतेस अशी. मूळ कविता: जरूरी है

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Sat, 05/14/2016 - 07:50
"एस" यांची अनुवादित कविता: तू भेटतेस अशी जसा चंद्र तरंगतो-बुडतो शांत-स्तब्ध डोहात तसा तो पाण्याला स्पर्श तर करत नसतो चंद्र फक्त तरंगतो, असा पाण्यात बुडलेला जशी तू हृदयाच्या किती नकळत त्याच्या सर्वात खोल कप्प्यात उतरतेस अलवार तुला कसं जमतं गं? असं मला तुझ्या सोबत रहायला भाग पाडायला? तू सोबत हवीयेस जवळ हवीयेस. अशी. ..................................... मिसळलेला काव्यप्रेमी यांची मूळ हिंदी रचना: -जरुरी है..!! ठहरे हुए पानीमे तैरते डूबते चांद की तरह होता है तेरा मिलना कहनेको चांद पानीको कभी छूता तो नही बस पानीमे डुबा हुआ तैरता रहता है जैसे तू दिलकी सतह को छूये बिनाही रुह की तह तक पहुंच जाती हो तेरा यही हुनर मुझे तेरे साथ रहनेपे मजबूर कर देता है साथ रहना... जरूरी है पास रहना... जरूरी है |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१४-०५-२०१६)

प्रतिक्रिया द्या
12241 वाचन

💬 प्रतिसाद (38)

तू भेटतेस अशी

एस
Sat, 05/14/2016 - 08:22 नवीन
तू भेटतेस अशी जसा चंद्र तरंगतो-बुडतो शांत-स्तब्ध डोहात तसा तो पाण्याला स्पर्श तर करत नसतो चंद्र फक्त तरंगतो, असा पाण्यात बुडलेला जशी तू हृदयाच्या किती नकळत त्याच्या सर्वात खोल कप्प्यात उतरतेस अलवार तुला कसं जमतं गं? असं मला तुझ्या सोबत रहायला भाग पाडायला? तू सोबत हवीयेस जवळ हवीयेस. अशी.
  • Log in or register to post comments

व्वाह

मिसळलेला काव्यप्रेमी
Sat, 05/14/2016 - 09:14 नवीन
व्वाह सुंदर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सुरेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/14/2016 - 10:01 नवीन
मस्त जमलंय. आवडलं. "तेरा यही हुनर" चं "तुला कसं जमतं गं" हे भारी जमलंय, आवडलं. अनुवादाला दहा पैकी साडेआठ गुण दिले आहेत. अभ्यास चालू ठेवा. -दिलीप बिरुटे (शिक्षक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

फारच सुंदर अनुवाद !!

पथिक
Mon, 05/16/2016 - 11:15 नवीन
फारच सुंदर अनुवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

क्याया बात मिका!

प्राची अश्विनी
Sat, 05/14/2016 - 08:53 नवीन
क्याया बात मिका! एस यांचा अनुवाद पण सुरेख!
  • Log in or register to post comments

असेच म्हणते! मिकादादाची कविता

रातराणी
Sat, 05/14/2016 - 09:15 नवीन
असेच म्हणते! मिकादादाची कविता बघून पावसाची सर आल्यासारख वाटलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

मिका

चाणक्य
Sat, 05/14/2016 - 09:23 नवीन
ईज बॅक. खूप वाट पहायला लावलीस यार. छान आहे कविता.
  • Log in or register to post comments

+१ खूप वाट पहायला लावलीस यार

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 05/14/2016 - 09:42 नवीन
कविता अतिशय आवडली हेवेसांनलगे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/14/2016 - 09:56 नवीन
आवडली कविता. "तेरा यही हुनर मुझे तेरे साथ रहनेपे मजबूर कर देता है साथ रहना... जरूरी है पास रहना... जरूरी है" कसं जमतं तिला काय माहिती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

क्या बत है मिका.

किसन शिंदे
Sat, 05/14/2016 - 10:08 नवीन
क्या बत है मिका. स्वॅप्स काकांचा अनुवादही सुंदर. कहनेको चांद पानीको कभी छूता तो नही बस पानीमे डुबा हुआ तैरता रहता है खरं तर चंद्र ही आमच्या गुलजार साहेबांची मक्तेदारी, पण तू ही त्याला छान पद्धतीने हाताळलंयस. जियो!
  • Log in or register to post comments

वा खूप दिवसांनी मिका दिसला!

सस्नेह
Sat, 05/14/2016 - 11:38 नवीन
वा खूप दिवसांनी मिका दिसला! सुरेख गझल ! एस यांच्या तरल भावानुवादामुळे समजली.नायतर आम्ही काव्यमठ्ठच.
  • Log in or register to post comments

मिका बॅक विथ बँग

स्पा
Sat, 05/14/2016 - 11:47 नवीन
मिका बॅक विथ बँग अप्रतिमच रे चायला आपल्याला फक्त मिका आणि चाणक्य च्याच कविता भिडतात
  • Log in or register to post comments

हाहा

चाणक्य
Sat, 05/14/2016 - 12:22 नवीन
मंडळ आपले आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

असंच म्हणतो!

रमेश भिडे
Tue, 05/17/2016 - 00:12 नवीन
असंच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

क्लास!!!!!!!

एक एकटा एकटाच
Sat, 05/14/2016 - 12:04 नवीन
क्लास!!!!!!!
  • Log in or register to post comments

वा! अतिशय तरल कल्पना. सुंदर

शिव कन्या
Sat, 05/14/2016 - 12:15 नवीन
वा! अतिशय तरल कल्पना. सुंदर मांडणी. अनुवादही सुंदर जमलाय.
  • Log in or register to post comments

मस्त

कवितानागेश
Sat, 05/14/2016 - 15:22 नवीन
गार गार वाटले मिकाची कविता वाचून. अनुवाद तर सुन्दरच जमलाय एस.
  • Log in or register to post comments

मिका डॉन है.

अभ्या..
Sat, 05/14/2016 - 18:38 नवीन
मिका डॉन है.
  • Log in or register to post comments

दोन्हीही सुरेख..

शलभ
Sun, 05/15/2016 - 00:39 नवीन
दोन्हीही सुरेख..
  • Log in or register to post comments

:)

प्रीत-मोहर
Mon, 05/16/2016 - 11:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments

वाह ! काय सुंदर ! खूप आवडली !

पथिक
Mon, 05/16/2016 - 11:14 नवीन
वाह ! काय सुंदर ! खूप आवडली !! फार सुंदर कल्पना !
  • Log in or register to post comments

हिंदी-उर्दू कविता पण चालतात

पथिक
Mon, 05/16/2016 - 11:17 नवीन
हिंदी-उर्दू कविता पण चालतात का इथे ? माहिती नव्हतं. करतो पोस्ट आता! :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव.कॉम वर अन्य भाषांतील

एस
Mon, 05/16/2016 - 14:47 नवीन
मिसळपाव.कॉम वर अन्य भाषांतील लिखाण प्रकाशित करण्यास संस्थळावर प्रकाशित अधिकृत धोरणानुसार निश्चितच मनाई असावी. परंतु हे माझे वैयक्तिक विधान असून मिसळपाव.कॉमचे प्राधिकृत सदस्य वा मालकच नक्की काय ते सांगू शकतील. एका जुन्या धाग्यावर तत्कालीन मिपाचालकांनी आक्षेप घेतल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पथिक

मिसळलेला काव्यप्रेमी नाव

रमेश भिडे
Mon, 05/16/2016 - 11:21 नवीन
मिसळलेला काव्यप्रेमी नाव वाचून कविता वाचायला आलो. तितकीशी आवडली नाही पण समजली. आपल्या मराठी कविता जास्त आवडतात.
  • Log in or register to post comments

मला वाटलं मिपावर हिंदी कविता

नगरीनिरंजन
Tue, 05/17/2016 - 09:49 नवीन
मला वाटलं मिपावर हिंदी कविता चालत नाहीत. माझी एक उडवली गेली होती. चालायचंच. मिपावरचे संपादक इतक्या उच्चप्रतीचा समभाव बाळगतील अशी अपेक्षा नव्हतीच म्हणा. समभावाबद्दल एक विक्रम-वेताळ कथा मी लिहीली होती तेव्हा मात्र मिपावरची बरीच मंडळी खूश झाली होती. असो.
  • Log in or register to post comments

तसं नाही नगरीनिरंजन

पैसा
Tue, 05/17/2016 - 11:53 नवीन
तुम्ही मिपावर कधी कोणाला त्रास दिलेला नाही. तुमच्यासारख्या चांगल्या लिहिणार्‍याबद्दल कोणी आकस का ठेवतील? तुमची कविता अप्रकाशित झाली तेव्हा जे संपादक होते त्यातले आता अर्धेही संपादक मंडळात नाहीत. शक्य आहे की आता जे लोक संपादक मंडळात आहेत ते नेमके तिघेही कविता प्रकाशित झाली तेव्हा उपस्थित नसतील. किंवा त्यांनी हा धागा पाहिला नसेल. तुम्ही संपादक मंडळाला/त्यातल्या सदस्यांना असे का झाले असावे याबद्दल व्यनि, खरड करूनही विचारू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हिंदी

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/17/2016 - 11:07 नवीन
हिंदी कवितेवर बरीच नाराजी दिसली. खरतर मी शक्यतो हिंदी कविता प्रकाशित करण्यापुर्वी, तिचा अनुवाद करतो अथवा करुन घेण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस ते शक्य झाल नाही. पुढील वेळेस ती काळजी घेईन. कारण मिपासदस्य कवितेवर अभिप्राय न देता, हिंदी का मराठी यावर भाष्य करतात. आणि कविता प्रकाशित करण्याचा उद्देश असफल होतो. चुक माझीच. क्षमस्व. संपादकांना हा धागा उडवायचा असल्यास माझी कुठलीही हरकत नाही.
  • Log in or register to post comments

नाराजी हिंदी कवितेवर नसून

नगरीनिरंजन
Tue, 05/17/2016 - 11:19 नवीन
नाराजी हिंदी कवितेवर नसून असमान वागणुकीवर आहे. सगळ्यांना सारखा नियम असावा इतकीच माफक अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

माझ

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/17/2016 - 11:34 नवीन
माझं म्हणण इतकच आहे कि या साठी वेगळा धागा अथवा सरळ संपादकांना व्यनी करण जास्त योग्य झाल असत. असो. मला माहितीये तुमचा आक्षेप कशावर आहे. आणि तो योग्य ही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

तुमची कविता उडवण्यात मला रस

नगरीनिरंजन
Tue, 05/17/2016 - 13:05 नवीन
तुमची कविता उडवण्यात मला रस नाहीप; फक्त सापत्नभावाचा उघड विरोध करायचा आहे. त्यामुळे व्यनि वगैरे करायचा प्रश्नच येत नाही. शिवाय माझी कविता उडवली तेव्हा मला व्यनि करण्याचे कष्ट घेतले गेले नाहीच; अन्यथा मीही व्यनितूनच निषेध/चर्चा वगैरे काय ते केले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

एक काम करता येईल. खालचा

एस
Tue, 05/17/2016 - 12:43 नवीन
एक काम करता येईल. खालचा अनुवाद धाग्यातच समाविष्ट करून धागा ठेवता येईल. तसेच जर कुणाला हिंदी वा अन्य भाषांमधले काही शेअर करायचे असेल तर त्यासाठी खफचा उपयोग करता येईल. काय म्हणता?
  • Log in or register to post comments

वाह ... निशब्द ..

गणेशा
Tue, 05/17/2016 - 12:47 नवीन
वाह ... निशब्द .. अप्रतिम .. पुन्हा पुन्हा वाचली .. अआणि तितकीच आवडली.. खरेच अप्रतिम
  • Log in or register to post comments

पुन्हा वाचलीच

गणेशा
Tue, 05/17/2016 - 12:54 नवीन
पुन्हा वाचलीच ठहरे हुए पानीमे तैरते डूबते चांद की तरह होता है तेरा मिलना कहनेको चांद पानीको कभी छूता तो नही बस पानीमे डुबा हुआ तैरता रहता है काय मस्त कडवी आहेत .. एकदम चित्र निर्माण करणार्‍या ओळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

संमं,

एस
Tue, 05/17/2016 - 13:01 नवीन
हा धागा माझ्या नावे करण्यास माझा नम्र आक्षेप आहे. कृपया मिकांच्याच नावे राहू द्यावा व मूळ कवितेच्या खाली अनुवाद यावा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/17/2016 - 13:02 नवीन
धन्यवाद एस भाउ...
  • Log in or register to post comments

हे काय चाललंय नक्की???

रमेश भिडे
Tue, 05/17/2016 - 14:45 नवीन
हे काय चाललंय नक्की??? अनुवाद आधी? मूळ कविता जी मिसळपाव वरच आधी आली आहे ती नंतर???? बकवास!
  • Log in or register to post comments

कविता जमलीये, ननिंचा

सूड
Tue, 05/17/2016 - 14:52 नवीन
कविता जमलीये, ननिंचा प्रतिसादही वाचला.
  • Log in or register to post comments

अरे वा! अनुवाद मस्त जमलाय आणि

धनंजय माने
Tue, 05/17/2016 - 20:02 नवीन
अरे वा! अनुवाद मस्त जमलाय आणि त्यावरुन बेतलेली मूळ कविता पण छान आहे .... आमची (अनुवादित) सुधा सुद्धा छान दिसायची. सुधीर नंतर आला! ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा