भारतावर मुस्लिमांचे आक्रमण झाले व मंदिरावर हल्ले होऊन मंदिर पाड़ण्याल्या सुरुवात झाली . मंदिर हे भारतीय श्रद्धा स्थानाचे केंद्र बिंदुच आहे. त्या मागे शास्त्रिय कारण ही आहे मात्र अशा आपल्या श्रद्धा स्थानांवर मुस्लिम टोळक्यानि नेहमीच हल्ले केले आता ही असे अतिरेकी करतच आहेत. यात आपल्या काही महत्वाच्या मंदिराना कायमच नुकसान सहन कराव लागल.
सध्या जे काही मंदिर प्रवेशा बाबत सुरु आहे तेहि काही असच आहे मंदिरात प्रवेशा च्या नावाखाली जो गोंधळ घातला जात आहे तो चिड निर्माण करणारा आहे. याला कारण हे असले आंदोलन करणारे पुरोगामी. आंदोलन करणाऱ्या महिला या नेहमी मंदिरात जाणाऱ्या व खरोखर देवभक्ति असणाऱ्या अथवा संत मीरा सारख्या कृष्ण वेड्या किंवा पांडुरंग प्रेमी जनाबाई सारख्या असत्या तर त्याचा हट्ट प्रत्यक्ष देवाला ही पुरवावा लागला असता मात्र आंदोलन कोणत्या महिला करत आहेत ज्यांचा व देव धर्माचा काडिमात्र ही संबंध नाही ज्या समलैंगिगतेच्या समर्थनासाठी भर रसत्यात एकमेकिना चुम्बन करतात अशा महिलांना मंदिर प्रवेश हवा आहे हेतु यांचा हेतु स्पष्टच आहे प्रसिद्धि आणि भक्तिच वातावरण गढुळ करणे याला मंदिर प्रशासन आपल्या पद्धतीने विरोध करत ही आहे पन काही गोष्टींचा विचार मात्र गम्भीरतेने होणे अनिवार्य आहे मंदिर समित्यानि मंदिरा मधे काही नियम कड़क करण्याची गरज आहे. आज किती मंदिर समिति मधे धर्मशास्त्र जाननारे सभासद आहेत त्यांची संख्या अजिबात नाही असेच म्हणावे लागेल समिति मधे धर्मशास्त्राच् अध्ययन केलेले विद्वान असतील तर देवतेला अनुकूल असे नियम बनवता येतील तिथे असणाऱ्या पूजकांची शुद्धता देखील पाहणे अनिवार्य आहे , मूर्ति शास्त्रातील माहिती किती जनाना असते हे सगळ लक्षात घेण्याची वेळ आली आहे या साठी दक्षिण भारतातील मंदिरांचा आदर्श घ्यायला हवा . आपण जर देवकलेची शुद्धता ठेवली तर लाखो आक्रमण सहन करण्याची व परतून लावण्याची ताकद तो ईश्वर आपणास देईल या साठी आपण ही शुद्धता व पवित्रता याचं पालन करायला हव
देव मूर्तिला स्पर्श करण्या आधी आपण खरोखर किती शुद्ध अवस्थेत आहोत याचा विचार प्रत्येकाने करावा मंदिर हे ऊर्जा स्थान आहे तिथे प्रवेश केला की आपोआप च ती ऊर्जा तुम्हाला भेटनार आहे त्या गाभार्यात प्रवेश पहिंजे हा हट्ट का ? आणि खर तर जे मनापासून देवाला मानतात ते असल्या मुर्ख पणाच्या मागण्या करणार ही नाहीत या मागण्या करणारे कोण आहेत हे सामान्य लोक ओळखून आहेत मात्र आता सर्वानी जागे होण्याची वेळ मात्र नक्कीच आली आहे
साभार-© तीर्थराज पैठणकर गुरुजी .
मंदिरे व आक्रमणे
गाभा:
प्रतिक्रिया
5 Apr 2016 - 11:25 pm | प्रचेतस
क्या बात है..!!!
खरं आहे तीर्थराज पैठणकर गुरुजींचे म्हणणे. आमचे एक मित्र त्यांना टनाटनी म्हणतील ही गोष्ट वेगळी.
ह्या धाग्याने खूपच विचारप्रवृत्त केलंय.
6 Apr 2016 - 8:35 am | अत्रुप्त आत्मा
क्या बात है..!!!
खरं आहे अग्नीराज आगलावेकर आगोबाजींचे म्हणणे.त्यांचे एक मित्र त्यांना सनसनीखेज म्हणतील ही गोष्ट वेगळी.
ह्या प्रति'सादा ने खूपच विचारप्रवृत्त केलंय.
6 Apr 2016 - 8:12 pm | DEADPOOL
मला आधुनिक सत्यनारायण घालायचा आहे!
कसा घालतात!
7 Apr 2016 - 10:37 pm | आनंदी गोपाळ
लोकाच्या घरी जावून पूजा सांगून घालतात. स्वतःच्या घरी बोलावून घालून्/घालवून घेतात.
नक्की काय करायचंय तुम्हाला?
6 Apr 2016 - 10:38 am | माहितगार
टंकाळा आला !!
6 Apr 2016 - 11:18 am | आनन्दा
सेम हिअर..
6 Apr 2016 - 1:48 pm | माहितगार
इथे समताधिष्ठीत मंदिर प्रवेश विरोधात कुणी मांडणी करत असेल आणि ती अबेटमेंट ऑफ ऑफेन्स कुप्रोत्साहक/कुप्रेरक ठरलीतर दि बॉम्बे हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वरशीप (एंट्री ऑथोरायझेशन अॅक्ट), १९५६ च्या कलम ५ मध्ये अबेटमेंट ऑफ ऑफेन्स (कुप्रोत्साहक/कुप्रेरकास) मुळ गुन्ह्या एवढेच शिक्षेचे बहुधा प्रावधान आहे. तेव्हा लेखन करताना सुयोग्य काळजी घ्यावी वाटल्यास पहावे.
*संदर्भ : http://bombayhighcourt.nic.in/libweb/acts/1956.31.html संबंधीत संस्थळ दुवा पान दिनांक ६ एप्रिल २०१६ रोजी दुपारी १३ वाजुन ४५ मिनीटांनी जसे दिसले
** उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) लागू
** हा प्रतिसाद प्रचेतस यांच्या प्रतोसादस उपप्रतिसाद नाही केवळ धागा प्रतिसादांमध्ये वरच्या बाजूस दिसावा म्हणून दिला आहे.
6 Apr 2016 - 6:28 pm | काळा पहाड
साली
फुकट प्रसिद्धीसाठी हपापलेली
काँग्रेसी मेंटॅलिटीवाली पाल!
ता.क. हे काही विशिष्ट मनोवृत्तीच्या आंदोलनकर्त्यांना म्हटलंय, तुम्हाला किंवा कोर्टाला नव्हे. तेव्हा हे 'कुप्रोत्साहक/कुप्रेरकास' वगैरे भानगडीत येत नाही).
ता.ता.क.आलं तर उपडून घ्या. बांधावरचं गवत. आणि गुरांना घाला. है कै नै कै.
6 Apr 2016 - 7:04 pm | राही
असे निंदाव्यंजक शब्द कुणाच्याही बाबतीत वापरू नयेत असे मत 'महत्त्वाची सूचना' धाग्यावर प्रकट झाले आहे.
6 Apr 2016 - 8:15 pm | DEADPOOL
झाली जाहिरात चालू!
6 Apr 2016 - 12:13 am | viraj thale
कडक !!!
6 Apr 2016 - 2:08 am | रामपुरी
मंदिर समित्यानि मंदिरा मधे काही नियम कड़क करण्याची गरज आहे
कोण करणार?
देवतेला अनुकूल असे नियम बनवता येतील
कोण बनवणार?
तिथे असणाऱ्या पूजकांची शुद्धता देखील पाहणे अनिवार्य आहे
कोण पाहणार?
मूर्ति शास्त्रातील माहिती किती जनाना असते
हे शास्त्र कुणी तयार केले?
सगळ्या प्रश्नांची उत्तर एकच आहे - "माणूस". देवाचा संबंध कुठे आला? देव/धर्म याची खरंच गरज आहे का? आता गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सर्वानी जागे होण्याची वेळ नक्कीच आली आहे
6 Apr 2016 - 5:24 pm | DEADPOOL
सध्या बिजी आहे
नंतर आपल्याला काशी करण्याचे महत्व सांगेल!
(टिप- येथे काशी करण्याचा अर्थ काशीयात्रा करणे असा घ्यावा. फुकाचा प्रतिसाद व आयडी उडायचा)
6 Apr 2016 - 2:16 am | उगा काहितरीच
नोssssss नॉट अगेन.... !
6 Apr 2016 - 2:36 am | तर्राट जोकर
आमेन ;)
6 Apr 2016 - 3:16 am | विद्यार्थी
भारतीय मंदिरांवर झालेले मुस्लिम आक्रमण आणि महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सध्या चालू असलेले आंदोलन याची तुलना योग्य नाही असे मला वाटते. त्याशिवाय हा हिंदू धर्मियांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यामुळे मुस्लिमांना यात ओढणेही बरोबर नाही.
हिंदू धर्मातील अनेक वाईट परंपरा आणि चाली-रीतींविरोधात वेळोवेळी आंदोलने होऊन त्या बंद पाडण्यात आपण यशस्वी झालो आहोत आणि ते हिंदू धर्मियांचे फार मोठे यश आहे. बदलत्या काळानुसार आपल्या परंपरा आणि चाली-रीतींमध्ये सुधारणा केल्या जातात आणि त्याकरता हिंदूधर्मीय लोक प्रयत्न करतात हेच हिंदू धर्माचे मोठे वैशिष्ठ्य आहे आणि आपल्याला त्याचा अभिमान वाटायला हवा.
मग समलैंगिक लोकांना मंदिर प्रवेश नाकारायचा असे आपले म्हणणे आहे का? तसे असेल तर आपण कित्येक दशकांपूर्वी प्रचलित असणाऱ्या समाजव्यवस्थेकडे परत जाऊ, कारण समाजातील काही घटकांना मंदिरात प्रवेश नाकारणे हे बहुतेक काही दशकांपूर्वी होत असे. देवाच्या दारात सगळे समान असतात त्यामुळे मंदिर प्रवेशाकरता नियम असण्याची / करण्याची गरजच नाही.
राजकारण सोडले तर सध्या मंदिर प्रवेशासाठी चाललेल्या आंदोलनाचे आपण स्वागतच करायला हवे.
6 Apr 2016 - 5:00 am | साहना
देवळांत उर्जा बिर्जा काही नसते. देवळांत पावित्र्य, उर्जा इत्यादी सगळ्या कायदेशीर दृष्टीने भाकड कथा आहेत. असल्या argument करून कोणीही जिंकत नाही पण मूर्खपणाचा शिक्का मात्र पडतो.
गाभार्यांत प्रवेश वगैरे ज्या चळवळी सुरु आहेत त्यांचा विरोध केला पाहिजे पण असली फालतू कारणे दिल्याने नुकसान जास्त आहे. महिला किंवा समलिंगी लोक पवित्र नाही आहेत असे म्हणायचे आहे का ? रस्त्यांत चुंबन घेणाऱ्या व्यक्ती पवित्र नाहीत म्हणायचे आहे का ? इंटरनेट वर पोर्न पाहणार्या व्यक्ती पवित्र नाही आहेत का ?
रास्त argument :
देवूळ ही कुणाची तर मालमत्ता आहे. माझ्या घरांत कुणाला प्रवेश आहे नाही हे ठरविण्याचा अधिकार मला आहे त्याच प्रमाणे देवूळ ज्या लोकांची मालमत्ता आहे त्यांना देवळांत कुणाला किती अधिकार द्यावा हे ठरविण्याचा अधिकार आहे. ज्या शनि-भक्तांना शनि शिंगणापूर चे नियम पसंद नाहीत त्यांनी आपले वेगळे शनि मंदिर बांधून तेथे आपल्याला पाहिजे तसले नियम काढावेत. इतर लोकांच्या मालमत्तेवर अतिक्रमण करू नये. ह्या प्रकारचा युक्तिवाद कदाचित कोर्ट मध्ये आणि पब्लिक मध्ये सुद्धा चालू शकतो. हे उर्जा, पावित्र्य वगैरेच्या गोष्टी चालणार नाहीत.
मुळांत स्वतःला निधर्मी मानणारे सरकार हिंदू लोकांच्या देवळांवर अतिक्रमण करणार तेंव्हा ह्या असल्या समस्या उत्पन्न होणारच. देवूळ सरकारी मालमत्ता असेल तर कुणालाही प्रवेश नाकारणे कायदेशीर दृष्ट्या अशक्य वाटते. सरकारी मालमत्तेच्या दृष्टीकोनाने देवूळ आणि सार्वजनिक शौचालय ह्यांत फरक नाही. ह्या प्रकारचे विधान काही हिंदुना भावना दुखावणारे वाटेल पण ज्या क्षणी हिंदूनी सरकारला आपली देवळे ताब्यांत घ्यायला दिली त्या क्षणी देवळांचे पावित्र्य वगैरे सगळे खड्ड्यांत गेले.
सम-लैगिक लोकांना विरोध हे ख्रिस्ती, इस्लाम मध्ये समजते. हिंदू लोकांनी हा विरोध कुठून उत्पन्न केला ते समजत नाही. आणि भर रस्त्यांत चुंबन देणे आणि देवूळ प्रवेश ह्यांचा संबंध काय? माझ्या मते सम लैगिकनी आपले चुंबन देवीचे देवूळ काढावे आणि खुशाल वाट्टेल तेव्हडी चुंबने द्यावी. वर्गणी मी द्यायला तयार आहे.
6 Apr 2016 - 7:54 am | lgodbole
रास्त युक्तिवाद म्हणुन जे लिहिले आhe ते कोर्टात टिकणार नाही.
स्त्री पुरुष असमानता कोर्ट मान्य करत नाही.
मुसलमानांनी देवळं पाडली वगैरे या लेखात्का लिहिलेय समजले नाही.
....
लंगड्या शनिदेवाला रामराम ठोकून लंगड्या तैमुरलंगाचा प्रेरणादायी इतिहास वाचणारा .
आ. न.
?
6 Apr 2016 - 9:17 am | भंकस बाबा
गोडबोले तुम्हाला तैमूरलंग लंगड़ा होता ह्याव्यतिरिक्त अजुन काही माहीत आहे का?
6 Apr 2016 - 5:33 pm | DEADPOOL
गाण्याच्या भेंड्या खेळू!
तुझी चिमणी उडाली फुर्र्र्र्र!
माझा पोपट पिसाटला!
6 Apr 2016 - 9:23 am | साहना
स्त्री पुरुष असमनतेचा प्रश्नच नाही. प्रश्न "खाजगी मालमत्तेचा" आहे. कोर्ट जात सुद्धा मनात नाही म्हणून "मराठा वधू पाहिजे" जाहिरात बेकायदेशीर ठरते काय ?
समानतेचा फक्त सर्वानाजिक गोष्टींत असतो, खाजगी बाबतीत लागू होत नाही.
6 Apr 2016 - 9:46 am | माहितगार
१९४७च्या आधी जी काँग्रेस जिवंत होती तिने सामाजिक समतेच्या आश्वासनावरच जनतेचा पाठींबा मिळवला होता आणि भारतीय राज्यघटना त्या आश्वासनांचे देणे लागते. भारतीय राज्यघटना जन्माधारीत विषमतेस नाकारते. खाजगी वगैरे गोष्टी नंतर, "अबकड जाती धर्माची/वर्ण वधू/वर पाहीजे" ह्या बद्दल मी कदाचित कायद्याचा बडगा घेऊन शिक्षा देणार नाही पण आदर्श नागरीकत्वही नव्हे असेच सांगेन.
6 Apr 2016 - 11:22 am | आनन्दा
सर्वसामान्यपणे माझ्यामते ट्रस्ट ही सार्वजनिक मालमत्ता मानली जाते.
वर्तमानपत्रीय वाचनावर आधारित. चुकीचे असल्यास थांबा.
6 Apr 2016 - 6:23 pm | मराठी कथालेखक
निदान त्या गावापुरती मालमत्ता तरी मानली पाहिजे. जर त्या गावातील स्त्रियांचा गाभाराप्रवेशाकरिता ह्ट्ट्/आग्रह नाही तर इतरांना काय पडली.
इतरांनी आपल्याला आवडेल तशी मंदिरे खुशाल बनवावीत..हिंदू धर्मात इश्वराचे साकर रुप कसे असावे यावर काही बंधन नाही. प्रत्येकजण आपापल्या कल्पनेप्रमाणे साकारु शकतो.
6 Apr 2016 - 12:52 pm | उडन खटोला
"देवळांत उर्जा बिर्जा काही नसते. देवळांत पावित्र्य, उर्जा इत्यादी सगळ्या कायदेशीर दृष्टीने भाकड कथा आहेत." हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय साहना मॅडम ?
जे आध्यात्मिक साधना करणारे व धर्मनियम पाळून उपासना करणारे लोक आहेत ,त्यांनाच अशा गोष्टी समजू शकतात .
तुमची आध्यात्मिक योग्यता अथवा पातळी किती ? असा प्रश्न मी येथे विचारला तर चालेल का?
6 Apr 2016 - 3:21 pm | सतिश पाटील
सारखं काहीतरी वाचाळ आणि निरर्थक बडबड करणाऱ्या ह्या व्यक्ती म्याडम आहेत तर....
7 Apr 2016 - 11:36 am | साहना
अध्यात्मिक पातळी वगैरे सगळे थोतांड आहे. ज्याला विश्वास ठेवायचा आहे त्याने ठेवावा. असल्या भाकडकथा सांगून नियम बनवता येत नाहीत.
7 Apr 2016 - 10:26 am | दिगोचि
तुमचे बरेचसे विचार पटले. फक्त एव्हढे सान्गावेसे वाटते कि सर्व देवळात कोणालाहि प्रवेश नाकारता येउ नये. जर देऊळ खाजगी माल़कीचे असेल तर तसे जाहीर करावे व दरवाजा बन्द ठेऊन आत येणार्या व्यक्तीला नियम सान्गावे व त्याप्रमाणे वागायची तयारी असेल तरच प्रवेश द्यावा.
6 Apr 2016 - 7:13 am | भंकस बाबा
कड़क व् पटेल असा युक्तिवाद!
ह्या मंदिरप्रवेश महिलाबद्दल एक प्रश्न पडतो. आपल्या देशात इतर अनेक समस्या असताना ह्या पेज3 महिला तिथे का लक्ष घालत नाही?
6 Apr 2016 - 9:40 am | साहना
विषय अगदी सोपा आहे. ह्या प्रकारच्या गदारोळात खूप पैसा आहे. त्या प्रकारचा पैसा आमटे परिवार जे करतो त्यांत नाही.
कान्हया ला पहा ना, काही तरी फालतू आंदोलन करून आज तो अनेक लोकांच्या गळ्यांतील ताईत झाला आहे आणि देश भर फिरत आहे.
6 Apr 2016 - 7:29 am | श्री गावसेना प्रमुख
उंपकराव:नको पुन्हा हे
तंपकराव:बरोबर आहे
उंपकराव:बघा ना रोज रोज तेच वाद
तंपकराव:ह्या लोकांकडे दुसरे मुद्दे नसल्याने ते असे लिहितात आणि चर्चा भरकटवली म्हणून आपल्या नावाने शिमगा करतात
उंपकराव:आता आपण आपले प्रतिसाद एकमेकांना द्यायचे नाही,त्यांना डू आयडी चा संशय येतोय।
तंपकराव:येऊ दे ब्लॉक केला कि आपण आपला रिसर्व आयडी काढायचा बाहेर दंगा करायला, हाय काय नाय काय।
6 Apr 2016 - 7:51 am | अत्रे
http://scroll.in/article/802721/meet-trupti-desai-the-woman-who-wanted-t...
हा लेख वाचावा, म्हणजे असा गैरसमज होणार नाही. कोणी सांगितले तुम्हाला की या महिलांचा आणि देवधर्माचा काही संबंध नाही?
6 Apr 2016 - 7:58 am | अत्रे
बा द वे, देवाने कोर्टामार्फत आदेश दिला नसेल कशावरून? :)
6 Apr 2016 - 8:04 am | 'पिंक' पॅंथर्न
मुस्लिम स्रियांना मशिदीत प्रवेश नसतो.
त्यासाठीही एक आंदोलन करा.
6 Apr 2016 - 9:40 am | माहितगार
+१ कोणतीही विषमता गैर असते. एका विषमतेने दुसर्या विषमतेचे समर्थन होत नाही.
6 Apr 2016 - 10:51 am | 'पिंक' पॅंथर्न
समर्थन नाही करत !! .. फक्त विषमता दुर करण्याची एवढीच हौस आहे तर ती सगळीकडचीच दुर करावी, एवढचं म्हणनं आहे... बाकी काही नाही.
6 Apr 2016 - 10:59 am | माहितगार
तेच तर भारतीय मुस्लीम महिला आंदोलंन या विषयावर त्यांच्या धर्मातील समतेसाठी समांतर आंदोलन करते आहे. बाकी तुम्ही तुमच्या प्रार्थनास्थळात/मंदीरात तुमच्याच महीलांना समान वागणूक समान अधिकार देण्याचा प्रश्न आहे. दुसर्या धर्मातील लोक मागास विचाराचे आहेत तो पर्यंत आपल्याही धार्मीक विचार मागास ठेऊया हा तर्क तुमच्याच धर्मातील तुमच्याच आया, बहीणी, मुलींवर अन्याय करत असतो किंवा कसे.
6 Apr 2016 - 11:34 am | 'पिंक' पॅंथर्न
नाही, माझा पाठिंबाच आहे स्त्रियांच्या मंदीर प्रवेश आंदोलनाला. तुमच्या म्हणन्याप्रमाणे विषमता वाईटचं. मग आपला धर्म- दुस-याचा धर्म ही विषमता नाही का ???
6 Apr 2016 - 11:51 am | माहितगार
तुमचं म्हणण बरोबर आहे. बेसिकली सर्वच धर्मात धर्मगुरु/पुजारी या लेव्हललाच स्त्रीयांना कायद्याने समान संधी मिळवून दिली की पुढचा प्रश्न अलगद सोपा व्हावा. एका धर्मातील स्त्रीयांनी दुसर्या धर्मातील स्त्रीयांना पाठींबा द्यावयास हवा. अर्थात स्त्रीयांचे स्वतःच माघार घेणे मोठी समस्या आहे नाही तर लोकशाही मतदानात समान संधी, कायद्याचे पाठबळ गेल्या ६० वर्षापासून, ३३ टक्के स्थानिक स्वराज्य संस्थातील जागा एवढे करुन तृप्ती देसाई असो अथवा भारतीय मुस्लिम महिला आंदोलन एकही स्त्री नगरसेविका/आमदार पुढाकार घेऊन त्यांच्या आंदोलनांच्या मागे उभी रहाताना अथवा स्वतंत्रपणे आंदोलन चालवताना दिसत नाही. एवढ सगळ होऊन मिपावर एखादी अनाहिता निषेधाचा धागाही काढताना दिसत नाही. उलटे आम्रेकेत बसून काही मंडळी काळाची पावले मागे टाकणार्या गोष्टींचे समर्थन करत आहेत सगळेच अजब आहे.
6 Apr 2016 - 6:22 pm | काळा पहाड
@'पिंक' पॅंथर्न
बघितलं? किती सोपंय ते! ह्यांनी हे करायला हवं, त्यांनी ते करायला हवं. टीका मात्र आम्ही फक्त हिंदू धर्मावरच करणार.
6 Apr 2016 - 7:02 pm | माहितगार
काळा पहाड, असा समज बाळगण्याचा तुमचा हट्ट असेल तर कुणि काही करु शकेल का ? पण तुमच्या दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती नसावी, माझे हिंदू धर्माची, हिंदू संस्कृतीची बाजू घेणारे धागे आहेत प्रतिसाद आहेत तसेच उणीवांबद्दल टिकाही आहेत. हिंद्वेतर धर्मांच्याबाबतही असेच बाजूने आणि टिकात्मक लेखन मिपावर बरेच केले आहे. माझा चष्मा विशीष्ट नक्कीच नाही हे निश्चित.
आपल्याच माता भगिनींना अधिकार देण्याचा प्रश्न आहे. आपल्या लोकांना आपण अधिकार देणार नाही तर कोण देणार ? तरीही या पुर्वी विषय चघळून झाला असल्याने मेगा बायटी प्रतिसाद देण्याचेही टाळले आहे. जेवढे लिहिले तेवढेही खुपते आहे !
6 Apr 2016 - 10:20 pm | काळा पहाड
अधिकार मिळाला पाहिजे हे माझंही (आणी बाकी बर्याच जणांचं) मत आहे. प्रश्न आहे की एका काँग्रेस च्या बाईला पब्लिसिटी कमवायचीय म्हणून तिनं जिथं तिथं तमाशा करावा का हा. आणि तो हिंदूंच्याच देवळाबद्दल का करावा हा. हिंदूंच्या देवळाबद्दल हिंदू बघून घेतील. एका इटालियन बार डान्सर च्या (मुसलमान, पक्षी, अतिरेक्यांबद्दल सहानुभूती दाखवणार्या) ख्रिश्चन पक्षानं ते हिंदूंना सांगू नये. मुद्द्या ला पाठिंबा आहे. प्रश्न उचलणार्या लोकांबद्दल जळजळीत द्वेष आहे. हो. आहेच.
6 Apr 2016 - 10:43 pm | गामा पैलवान
माहितगार,
तुमच्या या विधानास माझा कडाडून आक्षेप आहे :
भारतीय संस्कृतीत अधिकारापेक्षा कर्तव्यांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे स्त्रियांची (आणि पुरुषांचीही) कर्तव्ये काय आहेत त्यानुसार कामाची वाटणी झाली पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
6 Apr 2016 - 10:58 pm | तर्राट जोकर
प्लीज एक्ष्प्लेन इन डीटेल... इफ यु कॅन.
7 Apr 2016 - 9:28 am | sagarpdy
धर्मसंस्था आणि राजसंस्था यांनी एकमेकांत ढवळाढवळ करू नये. कायद्याच्या बडग्याने धर्मसुधारणा हा काहीसा विचित्र प्रकार वाटतो. किमान अशा वेळी कि जेव्हा धर्मसंस्थेचे नियम व्यक्तीच्या मुलभूत गरजा व हक्कांच्या आड येत नाहीत तोवर.
7 Apr 2016 - 10:16 am | दिगोचि
मुस्लिम धर्मतील असमानता दूर करायला त्यान्च्या धर्मातील लोकानी व महिलानी प्रयत्न केले पाहिजेत ट्यान्च्या धर्माची वागणुक अशी आहे कि त्यान्च्या धर्मात जर इतर धर्मीयानी धवळाधवळ करायच प्रयत्न केल तर ते सर्वे त्यान्च्यावर तुटुन पडतील. तेम्व्हा हिन्दूनी आपल्या धर्मतील असमानता कशी दूर करता येइल तेच पहावे.
6 Apr 2016 - 9:54 am | सतिश गावडे
तीर्थराज पैठणकर गुरुजी अगदी योग्य म्हणत आहेत. मात्र देवाच्या तथाकथित भक्तांना अक्कल येईल असे वाटत नाही. धर्माला ग्लानी आल्याने आता देवानेच अवतार घेऊन काहीतरी केले पाहीजे.
आपण सार्यांनी त्यासाठी अनन्यभावाने प्रभूची प्रार्थना करूया.
रच्याकने, मला एक प्रश्न आहे. धर्मशास्त्र म्हणजे नेमका कोणता ग्रंथ?
6 Apr 2016 - 11:03 am | मालोजीराव
देवस्थान समितीला स्वतः ला मंदिर संस्थान परिसरात स्वतःचे कायदे आणि नियम लागू करण्याचे अधिकार आहेत. त्या नियमांचा भंग हा कायदेशीर अपराध असू शकतो. महिलांना चौथर्यावर प्रवेश हवा असेल तर धर्मादाय आयुक्तांना देवस्थान समिती बरखास्त करून नवीन नियम आणावे लागतील , हि कायदेशीर procedure आहे
बाकी पैठणकर गुरुजी सनातनी आहेत आणि तृप्ती देसाई यांनी महिलांच्या इतर गंभीर समस्यांकडे लक्ष द्यावे.
6 Apr 2016 - 11:16 am | माहितगार
अवघड आहे
6 Apr 2016 - 6:29 pm | काळा पहाड
मग मलम लावा
6 Apr 2016 - 11:48 am | तर्राट जोकर
ह्या हिंदुंशी संबंधित धाग्यांवर मुस्लिमांबद्दल मुद्दा मांडून विषय भरकटवला जातोय. सहज आपलं नोंद करावी म्ह णून प्रतिसाद दिलाय.
बाकी चलुद्या.
6 Apr 2016 - 12:27 pm | अमित_निंबाळकर
आज मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून राडा करतात आहेत .. उद्या मंदिर समिती , तसेच इतर मंदिरातील पदे यासाठी राडा करतील ..यांचा हेतू ...देव भक्ती नसून पैसा भक्ती आहे ..
6 Apr 2016 - 12:31 pm | lgodbole
पुरुष बायकाना विरोध करताहेत म्हणजे पुरुषानाही त्या जागा बळकवायच्या आहेत. असे म्हणायचे का?
6 Apr 2016 - 12:41 pm | अमित_निंबाळकर
पुरुष पूर्वीपासून त्या पदांवर आहेत ते का विरोध करतील ?? महिलांना प्रवेश हवा आहे पण का ?? याने काय सध्या होणार आहे ??
6 Apr 2016 - 12:48 pm | माहितगार
मंदिरातल्या प्रवेशाच मागाहून बघू; मंदिर समिती, तसेच इतर मंदिरातील पदे आणि तेथील स्वच्छ अथवा भ्रष्ट जो काही कारभार असेल त्यात महिलांना वाटा का नको ? ते तर आधी सांगा !
6 Apr 2016 - 4:50 pm | अमित_निंबाळकर
पुरुष आणि स्त्री यात काही भिन्नता आहेत ... समानता कोणत्या पातळीवर हवी आहे स्त्रियांना हे अगोदर स्त्रियांनी ठरवायला हवे आहे ...उद्या पुरुष देखील त्यांच्या समानतेसाठी स्त्रियानकडे मागण्या करतील .. पण काही गोष्टी विज्ञानाला धरून तसेच भावनिक पातली समजून केल्या पाहिजेत. मंदिराची रचना त्याचा प्राचीन काल त्यावेळेची परिस्थिती हि काय होती हे तपासाव लागेल ..महिलांना प्रवेश का नको हे तेव्हाच समजेल .. पण एखादी पद्धत बदलायची असेल तर ती आंदोलनच्या मार्गातून बदलाने हे चुकीचे ...विषय चव्हाट्यावर आला कि शेंबड पोरगपण त्यावर बोलू लागत ..त्याचे परिणाम चागले होतात असे नाही ??
6 Apr 2016 - 4:57 pm | माहितगार
मंदिर समिती, तसेच इतर मंदिरातील पदे आणि तेथील स्वच्छ अथवा भ्रष्ट जो काही कारभार असेल त्यात महिलांना वाटा का नको ? याचे उत्तर बाकी आहे अमितजी,
.
.
.
.
बाकी कायदा त्याची त्याची वळणे घेतो त्यामुळे मंदिर प्रवेशाचे कायद्याने काय ते होईल.
* कायदे विषयक एक सर्वसाधारण लक्षवेध
** समताधिष्ठीत मंदिर प्रवेश विरोधात कुणी मांडणी करत असेल आणि ती अबेटमेंट ऑफ ऑफेन्स कुप्रोत्साहक/कुप्रेरक ठरलीतर दि बॉम्बे हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वरशीप (एंट्री ऑथोरायझेशन अॅक्ट), १९५६ च्या कलम ५ मध्ये अबेटमेंट ऑफ ऑफेन्स (कुप्रोत्साहक/कुप्रेरकास) मुळ गुन्ह्या एवढेच शिक्षेचे बहुधा प्रावधान आहे. तेव्हा लेखन करताना सुयोग्य काळजी घ्यावी वाटल्यास पहावे.
*संदर्भ : http://bombayhighcourt.nic.in/libweb/acts/1956.31.html संबंधीत संस्थळ दुवा पान दिनांक ६ एप्रिल २०१६ रोजी दुपारी १३ वाजुन ४५ मिनीटांनी जसे दिसले
** उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) लागू
6 Apr 2016 - 5:22 pm | अमित_निंबाळकर
मंदिर शेकडो वर्षापूर्वी बनले कायदा आजच्या युगातला ??
मग कसा apply होणार ??
समंजस पणा आणायला हवा .. काही विशिष्ट मंदिरातच स्त्रियांना प्रवेश नाकारण्यात येतो ..
स्त्री आणि पुरुष यात भिन्नता आहे ..म्हणून काहीतरी करणे असावीत जेणेकरून प्रवेश निषिद्ध ठरवण्यात येतो ..
आपल्या देशात अनेक संप्रदाय आहेत .. प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा आहे .. अनेक साम्प्रयानी वेगवेगळे प्रयोग त्यांच्या संप्रदायात केले आहेत ..व ते त्या वेळेस ते यशश्वी हि झाले आहेत ..
पण बदल अश्या मार्गाने अनुचित आहे .. याने भारतीय संकृतीचीच बदनामी होते ..
विचार परिवर्तन करायला हवे अगोदर .. मग आपले घर हि मंदिरच आहे हे कळेल ..आपले शरीर हि मंदिरच आहे ..
6 Apr 2016 - 6:51 pm | माहितगार
मंदिर समिती, तसेच इतर मंदिरातील पदे आणि तेथील स्वच्छ अथवा भ्रष्ट जो काही कारभार असेल त्यात महिलांना वाटा का नको ? याचे उत्तर अद्यापही बाकी आहे अमितजी,
6 Apr 2016 - 1:00 pm | तर्राट जोकर
तुमचा संपूर्ण प्रतिसाद मूळ लेखात मांडलेल्या भावनेच्या विपरित आहे.
6 Apr 2016 - 4:21 pm | सस्नेह
तीर्थराज पैठणकर गुरुजींनी श्री रमेश भिडे यांना हा लेख मिपावर प्रकाशित करायला परवानगी दिलीय का ?
6 Apr 2016 - 4:56 pm | तर्राट जोकर
तेच म्हणणार होतो, आता भिडे साहेबांचे स्वतःचे हे मत नसल्याने आपण शांत बसलोय.
6 Apr 2016 - 4:38 pm | सौंदाळा
अजुन ५० वर्षांनी...
देवळात शिरा, लाडु, खोबरे प्रसाद म्हणुन तेच तेच का खायचे? आम्हा मांसाहारी प्रेमींना प्रसाद म्हणुन चिकन नगेट्स, चमचाभर खिमा मिळाले पाहिजेत.
6 Apr 2016 - 5:17 pm | भंकस बाबा
इकदम परफेक्ट उत्तर पेज3 महिलांना!
6 Apr 2016 - 7:13 pm | राही
मांसाहारामुळे माणूस अपवित्र होतो काय?
आणि देव तर बिचारा काहीच खात नाही. त्याला सगळे समान. गाभार्यात उंदिर झुरळे पाल असली काय आणि माणसे असली काय. त्याच्या लेखी हे सगळे जीवच. इतकेच नव्हे, तर जडचेतनामध्येसुद्धा फरक ईश्वर का करेल?
6 Apr 2016 - 7:43 pm | सौंदाळा
तेच तर मी म्हणतोय
तुम्ही व्हा नगेट्स तळायला पुढे मी येतोच मागुन (खायला)
6 Apr 2016 - 7:59 pm | भंकस बाबा
मग बसा एखाद्या मंदिराबाहेर मांसाहारी पदार्थ घेऊन, हाय नाय ती सहिष्णुता फटक्यात रंग बदलते की नाही ते बघा!
असा कोणता क्रांतिकारी बदल घडून येणार आहे चौथर्यावर गेल्यावर? हे लोक असे दाखवत आहे की आम्हीच सुधारणा घडवून आणत आहोत. जरा तो मुम्बईतला स्त्रीपुरुष रेशो बघा, मुलींचे प्रमाण अजुन कमी आहे. त्यासाठी काहीतरी कराना.
6 Apr 2016 - 9:04 pm | राही
मी काय करावं हे मला ठाऊक आहे असं मला वाटतं. मी इथे कोणताही अजेंडा मांडलेला नाही. म्हणजे कोणी मंदिराबाहेर काही तळत बसावं वगैरे. इथे सहिष्णुतेचा वादही मी आणलेला नाही किंवा स्त्रीपुरुष रेशिओही. त्याही आघाडीवर अनेकांचे काम सशक्तपणे चालू आहेच. आणि केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातही रेशिओ कमीच आहे.
अशा अनेक गोष्टी आहेत. ज्याला इच्छा आहे तो प्रत्येकजण आपापलं लहानमोठं वर्तुळ निवडून काही ना काही करत असतोच. सगळ्यांनी एकाच विषयावर (तेही दुसर्याने सुचवलेल्या) काम करावं असं घडत नसतं. परंपरा सतत बदलत असतात हे सांगायचं होतं. आणि बदलास प्रतिकार जितका जास्त तितका तो बदल झपाट्याने घडतो हेही अनेक वेळा दिसून आलेले आहे. 'केला जरी पोत बळेंच खालें, ज्वाळा तरी ते वरती उफाळे', हे स्वयंसिद्ध आहे.
7 Apr 2016 - 8:46 am | भंकस बाबा
काडीचीही किमंत कट्टर हिंदुत्ववादी देणार नाही. सहिष्णुता तुमची नाही तर हिंदुत्ववादयाची बिथरेल.
प्रतिसादातला विनोद लक्षात घ्या. थंड डोक्याने विचार करा. अनेक समाज उपयोगी कामे असताना मंदिरप्रवेश सारख्या क्षुल्लक गोष्टीवर रान माजवु नका.
माझे म्हणने असे आहे की या महिलांनी गर्भलिंग परीक्षा, मुलींचे शाळेतील ड्रॉपआउट, त्यांचे कुपोषण, त्यांची परवड यासारख्या ज्वलन्त मुद्द्यावर काम करावे. त्यांच्या कामाने एकदा काय या महिलेंचि ओळख झाली तर कोणीही माईचा लाल त्यांना मंदिर प्रवेशापासून रोखु शकणार नाही.
उदाहरण पाहिजे तर अण्णा हजारेकडे पहा. त्यांनी फक्त वाचाळविराचे काम केले नाही तर राळेगणसिद्धिसारख्या गावाचा कायापालट केला. आता हजारेना शिंक जरी आली तरी सरकारला त्याची दखल घ्यावी लागते. ह्या महिला महाराष्ट्रमधील गड़ किल्ले सोडून डायरेक्ट एवरेस्टवर चढ़ाई करायला बघत आहेत. दमाने घ्या एवरेस्टपण दूर नाही.
7 Apr 2016 - 11:11 am | राही
प्रतिसाद मला उद्देशून आहे म्हणून उत्तर देणे भाग आहे.
प्रतिसादातला 'विनोद' आणि त्याची गर्भित धार लक्ष्यात आली. एक तर कोणी काही किंमत द्यावी म्हणून मी लिहीत नाही. दुसरे म्हणजे अनेक क्षेत्रात महिलांचे अनेक समाजोपयोगी विषयांवर हिरिरीने काम चालू आहे याची माहिती आपणास नसेल तर त्याची जंत्री इथे देण्यात मला स्वारस्य नाही. केवळ हिंदूच नव्हे तर इतर धर्मांतल्या सुधारणावाद्यांना बळ देण्याचे काम गाजावाजा न करता सुरू असते हे मला माहीत आहे. आपण उल्लेख केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर समविचारी महिलांकडून काम होत आहे. त्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात इतक्या मग्न आहेत की कदाचित हे अनाहूत सल्ले विचारात घेण्याइतका वेळही त्यांच्यापाशी नसेल.
आणि अण्णा हजारेंचे गैरलागू उदाहरण हेच दाखवून देते की महिला किती वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करीत आहेत याची माहिती एकतर आपल्याला नाही किंवा माहीत असूनही आपण दुर्लक्ष्य करीत आहात. आणि शिवाय, मंदिरप्रवेशाच्या आंदोलनाची दखल सरकारला, न्यायसंस्थेला घ्यावी लागली आहे. असो. आता नेहमीप्रमाणेच, अधिक काही लिहिण्याची इच्छा नाही. प्रतिसाद देण्या न देण्याचा हक्क राखून ठेवीत आहे.
7 Apr 2016 - 2:14 pm | भंकस बाबा
मी तुम्हाला असे कुठेच् सुचवले नाही आहे की महिला समाजोपयोगी काम करतच नाही. त्या करतात व् अनेकदा पुरुषापेक्षा चांगले करून दाखवतात. माझा मुद्दा आहे हे जे आता शनिशिंगणापुरमधे ज्या महिला आंदोलन करत आहेत त्याबद्दल आहे. तुम्हाला पुढे एवरेस्टचे उदाहरण देखिल दिले.
अन्ना हजारेचे उदाहरण एक जनरल गोष्ट म्हणुन तुम्ही घेतले पाहिजे. आज सरकार( त्यात आजी माजी दोन्ही आले, स्पष्ट करतो नाहीतर परत तुमचा गोंधळ उडायचा) कित्येक गावात हागनदारी मुक्त गाव, चराइबन्दी, सामजिक वनीकरण याचा प्रचार करते. यश किती मिळते त्यांना? पाच टक्के तरी आहे का? हे हजारेंनि सहज करून दाखवले. त्याचे फायदे त्यांनी लोकांना पटवून दिले. ते पुरुष आहेत म्हणुन त्यांचे उदाहरण नाही दिले.
8 Apr 2016 - 9:08 pm | राही
अखेर शिंगणापूर ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिचौथर्यावर स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता सर्वांना प्रवेश देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. सर्व संबंधित यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. न्यायालयात लढणार्या विद्या बाळ आणि त्यांच्या सहकारी, सामाजिक दबाव आणणार्या तृप्ती देसाई आणि त्यांची संघटना, अनेक अप्रसिद्ध महिलागट यांनी हा प्रश्न लावून धरला. डोळस न्यायसंस्था, विवेकी सरकार आणि समजूतदारपणा दाखवणारे ग्रामस्थ यांमुळे तिढा समजुतीने सुटला. या सर्वांचे अभिनंदन.
8 Apr 2016 - 9:12 pm | तर्राट जोकर
त्रिवार अभिनंदन! आता शनीचा काही कोप-बीप होत नाही ह्या अंधश्रद्धेला सुरुंग लागून वर धाग्यात जी मुक्ताफळे उधळली आहेत त्याला सणसणीत चपराक बसेल.
9 Apr 2016 - 2:16 am | गामा पैलवान
राही,
शिंगणापूरची प्रथा स्त्रियांवर अन्याय करण्यासाठी मुद्दाम तर उत्पन्न केली नव्हती ना? मग ती मोडल्याने काय मोठी समानता साधली जाणार आहे?
आ.न.,
-गा.पै.
7 Apr 2016 - 11:43 am | बाळ सप्रे
अच्छा म्हणजे आंदोलन कोण करतयं त्याच्यावर ठरणार की अन्याय बंद करायचा की नाही!! म्हणजे मुळात अन्याय आहे हे मान्य आहे .. पण इगो दुखावतोय तो कोणितरी ऐरागैरा (/ऐरीगैरी??) येउन सांगतोय म्हणून :-))
7 Apr 2016 - 12:05 pm | तर्राट जोकर
येनकेन प्रकारेण महिलाप्रवेश टाळेन =)) =))
7 Apr 2016 - 2:31 pm | भंकस बाबा
मंदिरप्रवेश टाळण्याचा नाही तर तो का करावा याची जनतेला माहिती करून देने आवश्यक आहे. तुम्ही व् मी बोलून हा प्रश्न सुटनारा नाही. जी लोक तिथे वर्षानुवर्षे रहातात ज्यात महिलादेखिल आहेत त्यांचे मत देखिल ग्राह्य धरले पाहिजे. पुष्कळ भक्ताची ही धारणा असते की शनिदेवाचा कोप झाला तर आपले आयुष्य बरबाद होईल. मझ्यासारख्या नास्तिक व् तुमच्यासारख्या विद्ववान माणसाने कितीही कंठशोष केला तरी त्यांना ते पटवून देने कठिन आहे. अगदी उद्या शनिमंदिर सर्वाना खुले केले व् गावातील काही जणांवर काही अरिष्ट आले ज्याचा प्रवेशाशी काही संबंध नाही, जर अशा लोकांनी हाय खाल्ली तर त्याला जबाबदार कोण?
मंदिर प्रवेश बंदीपासून असा कोणताही फरक या पेज 3 महिलांना पडणार नाही आहे.
6 Apr 2016 - 10:24 pm | काळा पहाड
आमचा देव करतो. पटत नसेल तर मुसलमान व्हा.
6 Apr 2016 - 10:51 pm | राही
तुमचा सल्ला मी का मानावा? आणि आता तर मुसलमान व्हा, पाकिस्तानात जा ह्या आज्ञा वापरून वापरून अर्थहीन झाल्या आहेत. दुसरे काहीतरी ज्वलज्जहाल आदेश/फर्माने काढा बुवा.
आमचा देव फरक करत नाही. आणि मी हिंदु आहे. आता हे हिंदूंच्या देवाचे वागणे पटत नसेल तर बघा बुवा. मी काही आदेश देत नाही अमुक करा तमुक करा म्हणून.
7 Apr 2016 - 12:25 am | काळा पहाड
तुम्ही हिंदू असाल तर एकच करा. मांसाहारी प्रसाद घेवून महाराष्ट्रातल्या दगडूशेठ, महालक्श्मी, कुठलाही गणपती, शंकर, दुर्गा, साईबाबा वगैरे मंदिरात देवाला दाखवून पहा. नै म्हणजे तिथे असलेले हिंदू लोक तुमच्याशी सुरवातीला ज्या वेळी वाद घालतील, त्यावेळी हाच प्रतिवाद करा. परतलात तर मग बोलू.
7 Apr 2016 - 1:33 am | तर्राट जोकर
हिंदूंच्या देवांना मांसाहारी नैवेद्याचे वावडे नसते ही माहिती एका कट्टर हिंदूला नक्कीच असायला हवी अशी माझी भाबडी आशा होती.
7 Apr 2016 - 7:48 am | सुनील
गौरीला कोकणात अनेक घरात मटणाचा नैवेद्य असतो.
7 Apr 2016 - 12:44 pm | अद्द्या
देवी समोर बकरा मारतात तो चालतो का ?
इथे लक्ष्मीच्या जत्रेत जवळपास २५ बकरी मारून पूर्ण गावाला " प्र सा द " म्हणून दिलेला आहे लोकांनी .
मुद्दा काय आहे, तुमच चाललाय काय
6 Apr 2016 - 4:39 pm | हेमंत लाटकर
चिक्की ताईंनी शनि चौथर्यावर जाऊन शनि महाराजांचे दर्शन घेतले.
6 Apr 2016 - 5:36 pm | DEADPOOL
ही काडी आहे!
आता भाजपवाले येणार!
6 Apr 2016 - 5:34 pm | गामा पैलवान
रमेश भिडे,
लेखात व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत आहे. विषमता दूर करायला थुक्टीढोसईछाप ढोरोगाम्यांना मंदिरेच का सापडतात? देवाशी निगडीत जी काही पद्धती वा परंपरा आहे तिला स्त्रीपुरुष विषमतेच्या चष्म्यातून बघायचा अट्टाहास का? उद्या असाही आरोप करता येईल की, सगळ्या स्त्रियांनी पुरुषांविरुद्ध कट करून मुलं जन्माला घालायचं रहस्य दडवून ठेवलंय बघा !
आ.न.,
-गा.पै.
विशेष सूचना :
१. थुक्टीढोसई म्हणजे ढोस ढोस दारू ढोसून ठिकठिकाणी थुंकत जाणारी व्यक्ती. दहापैकी नऊ घोट गिळणार आणि एक घोट थुंकून दारू त्यागल्याचा आव आणणार. हिचा तृप्ती देसाई यांच्याशी काहीही संबंध नाही.
२. ढोरोगामी म्हणजे ढोर आणि माणूस यांत धर्मामुळे फरक पडतो हे न जाणणारे. हे ढोराप्रमाणे निर्बुद्धपणे मार्गक्रमण करतात. यांचा स्वयंघोषित पुरोगाम्यांशी घनिष्ट संबंध आहे.
6 Apr 2016 - 7:07 pm | राही
असे निंदाव्यंजक शब्द कुणाच्याही बाबतीत वापरू नयेत असे मत 'महत्त्वाची सूचना' धाग्यावर प्रगट झाले आहे.
6 Apr 2016 - 8:12 pm | lgodbole
त्यांचा आयडी उडाला तरी पुन्हा बाइज्जत बरी होतो.
7 Apr 2016 - 8:55 am | नाना स्कॉच
अच्छा म्हणजे ह्या असल्या कॉमेंट लिहिताना तुम्ही थुक्टीढोसई झालेलात तर!! उत्तम शब्दच खुंटले!
तरीही एक शेवटचा प्रयत्न, मुद्द्यावर बोला हो वैयक्तिक शेरेबाजी करून काही साध्यहोत नाही, वरतुन ज्या महान धर्माची आपण होलसेल डीलरशिप घेतल्यागत वागता आहात त्याला होलसेल मधे कमीपणा येतो!. असो!!
7 Apr 2016 - 5:54 pm | गामा पैलवान
स्कॉचनाना,
माझी थुक्टीढोसई झाली म्हणता?
१. मी दहापैकी नऊ घोट दारू गिळल्याचं दाखवा.
२. मी दारूचा दहावा घोट थुंकल्याचं दाखवा.
३. मी दारूचा त्याग केल्याचा आव आणलेला दाखवा.
वरील तिन्ही दावे सफल असतील तर आणि तरंच माझी थुक्टीढोसई झाल्याचं मान्य करेन.
आ.न.,
-गा.पै.
7 Apr 2016 - 7:03 pm | नाना स्कॉच
माफ़ करा चुक झाली आपण महातप्त प्रकाशमान धर्मसूर्य आहात अन आपण नसता हिंदु धर्म रसातळाला जाईल.
_______________/\__________________
7 Apr 2016 - 7:10 pm | गामा पैलवान
शाब्बास स्कॉचनाना ! असाच लीन भाव ठेवत चला. आम्ही प्रसन्न आहोत. भगवान आपले भले करोत.
आ.न.,
-गा.पै.
7 Apr 2016 - 8:56 pm | नाना स्कॉच
हॅलो!! हां पोचलात न हरभर्याच्या झाडावर!! बरंय बरंय नीट बसा हं पड़ताल नाहीतर नेमक्या ऊंचीवरुन अन नेमकेच प्रकरण शेकेल! :D जरा सांभाळून बरंका हो धर्मयोद्धे!.
7 Apr 2016 - 10:06 pm | गामा पैलवान
स्कॉचनाना,
हरभऱ्याच्या झाडावर चढून देखील आम्ही तुमच्या खुशालीचं कंत्राट भगवंतांच्या हवाली केलं आहे. हे तुम्हाला कळलं असेलंच! तसे तुम्ही हुशार आहात. बघितलंत? असा लीन भाव ठेवावा म्हणतो मी. बाकी चालू द्या.
आ.न.,
-गा.पै.
6 Apr 2016 - 5:41 pm | गरिब चिमणा
लेख नक्की कशावर लिहायचा याचा लेखकाचाच गोंधळ उडालेला आहे,या लेखात मुस्लिमांना आणण्याचा काही एक संबंध नव्हता.मुस्लिम शासकांनी मंदीरे पाडली याला कोणताही पुरावा नाही,काही मंदिरात अमाप संपत्ती असायची ,ती लुटण्याच्या वळेस काही मंदीरांची मोडतोड मुस्लिम शासकांनी केली असेल, याचा अर्थ सगळे मुस्लिम शासनकर्ते हिंदूविरोधी होते असा होत नाही.मध्ययुगात मुस्लिम शासकांनी काही मंदिरे तोडलीही असतील,त्याचा दाखला देऊन सांप्रत काळच्या मुस्लिमांना टारगेट करणे योग्य नव्हे.
6 Apr 2016 - 5:46 pm | अमित_निंबाळकर
त्यावेळेचा मुस्लिमही कुराणाचे पालन करत होता आणि आजचा मुस्लिम हि कुराणाच follow करतो .. इस्लाम मूर्तीपूजा मनात नाही .. म्हणून बहुतेक मंदिर मुस्लिम शासकानीच उद्धवस्त केली
6 Apr 2016 - 5:51 pm | तर्राट जोकर
बहुतेक मंदिर मुस्लिम शासकानीच उद्धवस्त केली
नक्की काय म्हणायचे आहे? खालच्या दोन पैकी काय?
१. उद्धवस्त केलेल्यातली बहुतेक मंदिरं मुस्लिमांनी उद्धवस्त केली.
२. व्यवस्थित असलेल्यांपैकी बहुतेक मंदिरं मुस्लिमांनी उद्धवस्त केली.
6 Apr 2016 - 5:56 pm | अमित_निंबाळकर
२. व्यवस्थित असलेल्यांपैकी बहुतेक मंदिरं मुस्लिमांनी उद्धवस्त केली.
6 Apr 2016 - 5:56 pm | अमित_निंबाळकर
6 Apr 2016 - 6:00 pm | तर्राट जोकर
धन्यवाद!
बहुतेक म्हणजे किमान ५१% टक्के. व्यवस्थित असलेल्यांपैकी किमान ५१% मंदिरं मुस्लिमांनी उध्वस्त केली ह्याबद्दल कुठेतरी विदा आहे की हे आपले वैयक्तिक मत आहे?
लक्षात घ्या. 'मुस्लिमांनी मंदिरांना हातसुदिक लावला नाय' असल्या भ्रमात मी नाही. मला सत्य जाणून घ्यायचे आहे.
6 Apr 2016 - 6:06 pm | तर्राट जोकर
ह्याबद्दल शोधता एक पुस्तक आहे असे कळले.
https://en.wikipedia.org/wiki/Hindu_Temples:_What_Happened_to_Them
6 Apr 2016 - 8:10 pm | DEADPOOL
निंबाळकर साहेब नका नादी लागू!
हाही धागा वाचनमात्र होईल नाहीतर!
6 Apr 2016 - 6:21 pm | तर्राट जोकर
लेखात मुस्लिमांना आणण्याचा संबंध असा आहे की तेव्हा त्यांनी आक्रमणं केली त्यात लुटालुट करणे हा एक भाग होता, आता लुटालूट करण्यासाठी काही नतद्रष्ट हिंदू कायदेशीर आक्रमणं करत आहेत.
असाच अर्थ असावा. खखो ते पैठणकर गुरुजी जाणे.
6 Apr 2016 - 5:42 pm | बाळ सप्रे
अच्छा.. यात पण जनाना/मर्दाना असतं का? ;-)
6 Apr 2016 - 5:48 pm | तर्राट जोकर
=)).
रच्याकने- सप्रेसाहेब, तोच मुद्दा, तोच काथ्याकूट. तुम्हाला परत परत करायची इच्छा आहे काय? ह. घ्या. :)
6 Apr 2016 - 7:51 pm | 'पिंक' पॅंथर्न
"मुर्तीशास्र" म्हणजे नक्की कसलं शास्त्र ?
6 Apr 2016 - 8:09 pm | वडापाव
सगळी मंदीरं, चर्च, मशीदी इ पाडून, हवं तर वास्तुशास्त्रीयरीत्या चांगला नमुना असलेली मोजकी धर्मस्थानं अपवाद म्हणून टूरिस्टांसाठी प्रत्येकी दोन रुपये घेऊन मोकाट सोडून, उर्वरित ठिकाणी शाळा-काॅलेजं आणि हाॅस्पिटलं बांधली जावीत अशी कळकळीची इच्छा आहे. त्याचसोबत नवी धर्मस्थानं/श्रद्धास्थानं बांधण्यावर बंदी यायला हवी.
6 Apr 2016 - 8:21 pm | गामा पैलवान
वडापाव, नवी श्रद्धास्थानं बांधायला बंदी घालणं अयोग्य अन अशक्य आहे. जगात एव्हढी लोकसंख्या वाढली आहे. तरी लोकांनी पोरे काढायचा उद्योग थांबवला आहे का?
आ.न.,
-गा.पै.
6 Apr 2016 - 9:47 pm | हेमंत लाटकर
देवस्थानात तरी कोणता प्रामाणिकपणा राहिलाय. पैशाचा भष्ट्राचार, तिकीट फाडले तर २तासात दर्शन. देवस्थानांकडे एवढा पैसा आहे पण एकही देवस्थानाने दुष्काळासाठी, शेतकर्यांना मदत दिली नाही. सरकारने सर्व देवस्थाना जवळील पैसा सरकारी जमा करून समापयोगी वापरावा.
6 Apr 2016 - 9:59 pm | viraj thale
आतापर्यंत कितीतरी देवस्थानांनी दुष्काळग्रस्ताना कोट्यावधी ची मदत केलेली आहे .
6 Apr 2016 - 10:06 pm | तर्राट जोकर
लोकांनी देवस्थानांना पैसा देण्यापेक्षा मग थेट सरकारजमा का करु नये?
6 Apr 2016 - 11:04 pm | गामा पैलवान
तजो,
शासननियुक्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधला असीम भ्रष्टाचार तुमच्या कानी आला असेल अशी आशा आहे. शिरडीच्या संस्थानात भ्रष्टाचाराने परम पातळी गाठली आहे. याउलट शेगावचं देवस्थान भक्तांच्या ताब्यात असल्याने तिथली व्यवस्था अप्रतिम आहे.
देवळांचा पैसा सरकारजमा झाला की भ्रष्टाचार फोफावतो. मग का द्यायचा पैसा?
आ.न.,
-गा.पै.
6 Apr 2016 - 11:23 pm | तर्राट जोकर
भ्रष्टाचारमुक्त असे शेगावचं देवस्थान हे एकमेव संस्थान असावं. तसेच प्रत्येक भ्रष्टाचारसंपृक्त देवस्थान हे सरकारनियुक्त समितीद्वारे चालवले जात नाही.
माझा मुद्दा वेगळा आहे. देवस्थानातला पैसा जर सामाजिक कार्यासाठी वापरला जातो तर मग तीच सामाजिक कार्ये करण्यासाठी देवळांऐवजी पैसा सरकारकडे द्यावा. सरकारला मोप गरज आहे. दर सहा महिन्यांनी सर्विसटॅक्स वाढवण्याची गरज पडणार नाही.
देवस्थानने आपल्याला मिळालेला पैसा आणि त्याच्या खर्चाचा ताळेबंद सादर करतात काय?
7 Apr 2016 - 12:12 am | काळा पहाड
सरकार गॅरंटी देईल का की हा पैसा मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, कम्युनिस्ट आणि तत्सम अहिंदू लोकांसाठी वापरला जाणार नाही ते? मी देवस्थानला देणगी कन्हैया कुमारला शिक्षण घेता यावं म्हणून देत नाही. तेव्हा पहिल्यांदा ही सुचना मुसलमानांना करून बघा. मग पाहू.
पोप करतात काय ताळेबंद सादर? त्याचे भारतातले हस्तक? मशिदी करतात?
7 Apr 2016 - 12:18 am | तर्राट जोकर
सरकार गॅरंटी देत नाही मग सरकारला कर तरी कशाला देता?
एवढा विश्वास आहे तर देवस्थानांनाच चालवू दे ना देश.
हाय काय नाय काय.
7 Apr 2016 - 12:37 am | काळा पहाड
आज काय वीकडेजलाच काय हो?
आम्ही सरकारला कर देतो तो तो भरावाच लागतो (कर्तव्य म्हणून) देतो. तसा कायदा आहे म्हणून देतो. सरकारनं ते पैसे नक्की कुठे खर्च करायचे हे सरकारनं ठरवण्यास आमची ना नाही. ते आम्हाला आधीच माहिती आहे.
देवस्थानला देणगी देतो ते देवावरच्या प्रेमामुळे देतो. हिंदू धर्मावरच्या प्रेमामुळे देतो. इतर धर्म हिंदू धर्माचे शत्रू आहेत हे माहीत असल्यानं त्याच्या उत्थानासाठी देतो. ते आमचे खाजगी पैसे आहेत. जर आम्ही सेक्युलरच असतो तर सरकारलाच ते पैसे देणगी म्हणून दिले नसते का?
राहता राहिला प्रश्न देश चालवण्याचा. देवस्थानांकडून देश चालवणं अपेक्षित नाही. देवस्थाने सुद्धा ते म्हणत नाहीत. तेव्हा तुमच्या सुपीक डोक्यात ही क्ल्पना कुठून आली हे माहिती नाही. पण माझा देणगीचा पैसा सरकारनं मुसलमानांना, कम्युनिस्टांना वगैरे वाटणं एक हिंदू म्हणून मला चालणार नाही.
कर आणि देणगी या वेगळ्या गोष्टी आहेत. डोक्यात घुसलं का?
7 Apr 2016 - 12:56 am | तर्राट जोकर
आम्ही चोविस तास तारेत असतो, विकेण्ड्स पाळण्यासारखी क्षुद्रभक्ती आपण करत नाही.
खालील प्रश्न डोक्यात (सुपिक) आलेत.
देवस्थानला देणगी देतो ते देवावरच्या प्रेमामुळे देतो.
>> देव तर चराचरात आहे ना? देवस्थानात तर बडवे, पुजारी, पुरोहित, ट्रस्टी असतात.
हिंदू धर्मावरच्या प्रेमामुळे देतो.
>> जो मंदिरात जात नाही, देणगी देत नाहीत त्याचे हिंदू धर्मावर प्रेम नसते?
इतर धर्म हिंदू धर्माचे शत्रू आहेत हे माहीत असल्यानं त्याच्या उत्थानासाठी देतो.
>> हे उत्थान नक्की काय असते आणी मंदिरात दान केल्याने कसे होते काही सांगू शकाल काय?
भक्तांनी दिलेल्या देणगीचे काय होते हे विचारण्याचा हक्क एका हिंदूला आहे की नाही? ट्रस्टी स्वतःचे गल्ले भरतात का हे बघणे आवश्यक आहे की नाही?
7 Apr 2016 - 1:00 am | काळा पहाड
मला फालतू पांचट प्रश्नांना उत्तरं देत बसण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि वेळ तर त्याहूनही नाही.
तेव्हा, नमस्कार!
7 Apr 2016 - 1:15 am | तर्राट जोकर
=)) =))
7 Apr 2016 - 8:21 am | lgodbole
पहाडगुरुजीना क्लीन बोल्ड केले.
7 Apr 2016 - 8:27 am | नाना स्कॉच
विनाकामी वसवस केली की असे फळ पदरात पड़ते ! :D :D
7 Apr 2016 - 10:20 am | lgodbole
ते माउंटन आहेत म्हणुन त्याना देवाकडे जावेच लागते.
इफ मोहम्मद कान्ट गो टू माउंटन,
माउंटन हॅस टु गो टु मुहोम्मद
7 Apr 2016 - 12:19 pm | काळा पहाड
क्लीन बोल्ड वगैरे काही नाही. पण प्रश्न र्हिटॉरिकल आहेत. शिवाय त्यांचा मेन धाग्याशी काही संबंधच नाही. आणि त्यांची उत्तरे काय येणार हे त्यांना एक्स्पेक्टेड आहे त्यावर काथ्या कुटण्यासाठीच त्यांनी प्रश्न विचारले आहेत. तेव्हा उगीच फालतू डिस्कशन मध्ये घाळवण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. आणि उगीच चेस्ट पाऊंडींग ची सुद्धा गरज नाही. माझ्या पोस्टस छोट्या असल्या तरी त्या जळजळीत असतील याची काळजी मी घेतोच. सध्या वेळ नाही. तेव्हा भेटूच, मोगासाहेब. तोपर्यंत चालू दे.
7 Apr 2016 - 12:25 pm | तर्राट जोकर
फाइन. तुम्ही धाग्याशी संबंधित नसलेल्या विषयाबद्दलच्या प्रतिसादावर प्रतिसाद केला. तुमच्या त्याच प्रतिसादावर आधारित प्रश्न आहेत. धाग्याशी संबंधित नसलेल्या बर्याच विषयांवर आपण इथे प्रतिसाद दिले आहेत. तेव्हा असोच.
6 Apr 2016 - 10:16 pm | viraj thale
देवाच्या नावावर तरी पैसा देतात आणि देवस्थाने ही सरकारच्याच ताब्यात आहेत .
7 Apr 2016 - 8:27 am | जेपी
100..
अता सत्कार करायचा पण कंटाळा आला अश्या धाग्यावर...
कुणाकुणाचा करायचा??
रच्याकने सत्कार समितीला देणगी मिळेल का ??
7 Apr 2016 - 6:23 pm | माहितगार
या इलेक्शन कमिशनच्या खडकवासला उमेदवार २०१४ अफिडेवीट यादीत तृप्ती देसाईंचे नाव आढळले नाही. भंडारींनी मुद्दाम चुकीचे सांगितले असेही होणार नाही-कदाचित नाव वापस घेतले असेही काही असू शकेल, जर त्या विधानसभेला उभ्या टाकल्या असतील तर इलेक्शन कमिशनचा सुयोग्य दुवा कुणि शोधून देऊ शकेल का ?
भंडारींना हिन्दी भाषी संकेत माहित असणार, सहसा हिन्दीभाषी आदरार्थी उल्लेखांबद्दल अधिक सजग असतात, कदाचित पत्रकाराने बातमीत उल्लेख नीट केला नसेल अशी शक्यता असू शकेल का ?
बाकी प्रकरण सुरु झाले तेव्हा मंदिर समितीवरील बरेच लोक राष्ट्रवादी अथवा मनसे गटाचे होते आणि आंदोलक काँग्रेसच्या म्हणजे भाजपाला त्यांचा एक पाठीराखावर्ग सनातनी आहे हे ओळखून मुद्दाम कात्रीत पकडायचे - अर्थात कॉन्स्पीरसी थेअरीवर चिमुटभर मीठा पलिकडे विचार करु नये असेच वाटते.
7 Apr 2016 - 6:51 pm | माहितगार
लोकमत बातमीचा दुवा जोडावयाचा राहीला होता:
http://www.lokmat.com/storypage.php?catid=20&newsid=12013325
7 Apr 2016 - 9:01 pm | श्रीगुरुजी
खालील दोन संकेतस्थळावर तृप्ती देसाईने २०१२ मधील पुणे महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेसच्या तिकिटावर लढविल्याचे उल्लेख आहेत.
http://archive.indianexpress.com/news/officials-say-polls-fair-candidate...
https://www.hindujagruti.org/news/74813.html
7 Apr 2016 - 10:23 pm | lgodbole
काँग्रेस व रा . काँ. म्हणजे हिंदुविरोधी ?
हिंदू छत्रपतींचे वंशजही याच पक्षात आहेत ना ?
7 Apr 2016 - 10:54 pm | माहितगार
योग्यबाजू आणि कायदा स्त्री प्रवेशाच्या बाजूने आहे तेव्हा आज ना उद्या त्यांना प्रवेश तसाही मिळणारच योग्यवेळी प्रसिद्धीत येऊन राजकीय प्रगती साधण्यात यश आहे आणि अशा पद्धतीने यश घेण्यात एक स्त्री मागे नाही हे ही नसे थोडके. अर्थात राजकीय पार्श्वभूमीच्या व्यक्तीने सामाजिक दृष्ट्या रास्त पुरोगामी भूमिका घेण्यात गैर काहीच नाही, पण जेव्हा राजकीय पार्श्वभूमी आहे तेव्हा ती जी काही आहे किंवा होती ती पारदर्शकपणे मांडली पाहीजे. पारदर्शकता हा कोणत्याही सामाजिक आंदोलनाचा आत्मा असावा. आंदोलनाची एकुण पद्धत तरुण राजकीय कार्यकर्ता स्टाईलच आहे त्यामुळे सामाजिक आंदोलनात सहसा दिसणार्या प्रबोधनाच्या स्टेप्स अगदीच वगळलेल्या दिसतात मुख्य म्हणजे आंदोलनाची नाळ सर्वसामान्य स्त्रीशी पुरेशी न जुळताच आंदोलन चालू आहे. मंदिर प्रवेशावरुन एवढे राजकारण रंगते आहे मिपावर एका अनाहितेचा एक धागा सुद्धा नाही. या धाग्यावर प्रतिसाद सुद्धा नाहीत, मिपा सोडून द्या वृत्तपत्रिय बातम्यांखाली चर्चा होतात त्यात महिलाही नाहीत आणि पुरुष पुरोगामीही नाहीत. छुटकु फुटकु बातम्या आहेत, एखाद नमनाला अग्रलेखही आहे पण सामाजिक आंदोलन म्हणून जसे जोमदार समर्थन दिसावयास हवे, लेखनात जोश हवा त्याचा सार्वत्रिक अभाव आहे.
पंढरपुरात साने गुरुजी उपोषणास बसले तर प्र.के. अत्रे चौका चौकात चार चार माणसांसाठीसुद्धा एकसारख्या सभाच घेत आपली भूमिका मांडत सुटले पण मुख्य म्हणजे इतर पुढारी कायदा येईल थांबा म्हणत होते साने आणि प्रकेंनी कायद्याच्या पुढे समाज प्रबोधनाला महत्व दिले. या वेळी एक स्त्री राजकारणात जिंकणार हे नक्की, अनेकांचे समाजकारण दिखाऊ असते अजून एक समाजकारण दिखाऊ असल्याने फारसे बिघडत नाही, समाज प्रबोधनातून जेव्हढा फायदा व्हावयास हवा कदाचित तेवढा होऊ शकेल का? शेवटी मंदिर प्रवेशाचे आंदोलन प्रातिनिधीक असणार त्यातून एकुण स्त्री समतेची चळवळ किती पुढे जाते आहे या बद्दल साशंकता वाटते आहे.
8 Apr 2016 - 6:08 am | भंकस बाबा
शेवटी मंदिर प्रवेशाचे आंदोलन प्रातिनिधिक असणार, हेच म्हणायचे आहे.
ह्या मंदिर प्रवेशाला राष्ट्रवादी व् कॉंग्रेसच्या किती महिला आमदार व् खासदार हजेरी लावतात ते पाहू. विशेष करून शनिच्या चौथर्यावर! अगदी न्यायालयाने परवानगी देऊन देखिल वा कायदा बनून देखिल हा हक्क् बजावन्यास किती प्रतिसाद मिळेल?
जाता जाता, या महिलातील काहिना कुठलेतरी टिकिट पक्के आहे. याचसाठी केला होता अट्टाहास!
8 Apr 2016 - 9:11 am | चेक आणि मेट
व्वा छान!
हिंदूराष्ट्र देवो भवः
भारत माता कि जय
:
:
:
(मराठी नववर्षाच्या शुभेच्छा,प्रभू रामचंद्र कि जय,जय भवानी जय शिवाजी,जय भीम)
8 Apr 2016 - 9:12 pm | राही
शनिचौथर्यावर महिलाप्रवेशाचा तिढा सामंजस्याने सुटला आहे. ग्रामस्थांनी स्त्री-पुरुष दोघांनाही चौथर्यावर प्रवेश असण्यास ना हरकत दाखवली आहे.
सर्व संबंधितांचे अभिनंदन.
9 Apr 2016 - 11:06 am | अत्रे
मी तर लोकसत्तामधे वाचलं की ग्रामस्थ शनिवारी ग्रामसभा घेणार आहेत या विषयावर. अजून विषय पूर्णपणे पचनी पडलेला नाही असे वाटते. सध्या तरी न्यायालयीन बडगा दाखवल्याने ऐकत आहेत एवढेच.