✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

द्रौपदी वस्त्र हरण

स
साहना यांनी
Sun, 03/27/2016 - 11:14  ·  लेख
लेख
आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही. कृष्णाने पांडवांचे देखील प्राण घेतला असता , परंतु द्रौपदीचे कुंकू, तिचे सौभाग्य असल्यामुळे ते वाचले. पांडवांच्या व्यतिरिक्त एक आणखी असामी होती जी त्याच्या क्रोधापासून बचावली - ते होते कृपाचार्य. कारण जेव्हा द्रौपदी सगळ्यांकडे मदत मागत होती तेव्हा त्यांनी एक बोट दर्शवून तिला इशारा केला होता की सर्वांकडे मदतीची याचना करण्यापेक्षा त्या एका शक्तीकडे मदत माग. द्रौपदीला त्यांचा इशारा क्षणात समजला आणि तिने स्वतःला कृष्ण्चरणी अर्पण केले. "आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे आपल्या प्राणांचा रक्षक सुदर्शन चक्रधारी आहे" केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
23761 वाचन

💬 प्रतिसाद (128)

प्रतिक्रिया

जाने भी दो यारो.

तर्राट जोकर
Sun, 03/27/2016 - 18:48 नवीन
  • Log in or register to post comments

"चिंधी बांधिते द्रौपदी

सतिश गावडे
Sun, 03/27/2016 - 18:49 नवीन
"चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला" हे गाणे आठवले.
  • Log in or register to post comments

कृष्ना तुझिया बोटाला लागली

असंका
Mon, 03/28/2016 - 07:59 नवीन
कृष्ना तुझिया बोटाला लागली कशी रे रक्ताची धार...हे तेच, की वेगळे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

वेगळं..

पिलीयन रायडर
Mon, 03/28/2016 - 14:50 नवीन
वेगळं.. एकाच प्रसंगाची तीन गाणी मला माहिती आहेत. अजुनही असतील.. १. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला.. भरजरी फाडुन शेला.. २. भरजरी ग पितांबर दिला फाडुन, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण.. ३. माझीया मंदिरी, नाही एकही चिंधी, शालु शेले अपरंपार.. कृष्णा.. कशी रे लागली रक्ताची धार, तुझीया बोटाला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

..

lgodbole
Tue, 03/29/2016 - 12:44 नवीन
पितांबर बायका नेसायच्या की पुरुष ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पीतांबर

पैसा
Tue, 03/29/2016 - 14:05 नवीन
पीतांबर म्हणजे पिवळे वस्त्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lgodbole

हौ डज द्याट अन्सर दि क्वेष्चण

बॅटमॅन
गुरुवार, 03/31/2016 - 23:59 नवीन
हौ डज द्याट अन्सर दि क्वेष्चण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्वाइंटै !!

खटपट्या
Fri, 04/01/2016 - 22:41 नवीन
प्वाइंटै !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शामची आई

सिरुसेरि
Mon, 03/28/2016 - 07:48 नवीन
शामची आई मधले "द्रौपदीसी बंधु शोभे नारायण" हे गाणे आठवले . त्या सिनेमात एरवी सदा न कदा भांडत असलेल्या बायका हे गाणे मात्र एकजुटीने मिळुन मिसळुन म्हणतात .
  • Log in or register to post comments

एकच कृष्ण राजकारणाता आहे

गॅरी शोमन
Mon, 03/28/2016 - 12:05 नवीन
एकच कृष्ण राजकारणात आहे त्याच नाव लालकृष्ण. वयाच्या ८८ व्या वर्षी ( चुक भुल द्यावी घ्यावी ) तो भाजपच्या बाजुने आहे. सध्या कन्हैया जे करतोय त्या बाललीला आहेत. जे एन यु नावाचे गोकुळ आहे तिथे म्हणे त्याने एका गोपीला त्रास दिला होता.
  • Log in or register to post comments

असुदे असुदे हो देउदे म्हने त्रास

भाऊंचे भाऊ
Tue, 03/29/2016 - 12:54 नवीन
बालपणी कृष्ण गोप्यांच्या चोळ्या लुगड़े पळवुन त्रास देतच असत पण मोटेपनी तेच द्रौपदीसाठी वस्त्र घेउन धावू रायले ना भावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन

आणि कृष्णाने ते सर्व वस्त्र

DEADPOOL
गुरुवार, 03/31/2016 - 16:36 नवीन
आणि कृष्णाने ते सर्व वस्त्र शिऊन एक महासाडी बनवली! कितीही ओढा संपणार नाही अशी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

आता समजा नवर्याला मुड असेल

भाऊंचे भाऊ
Sat, 04/02/2016 - 12:19 नवीन
पण बायकोला नसेल आशा परिस्थितीत बायकोने कृष्णाचा धावा सुरु केला तर कृष्ण कोणाची बाजू घेइल विशेषत: धर्माला मान्य असलेला काम तो मीच असे तो छातीठोक पणे अर्जुनाला सुनावतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

युध्दिष्टर जुगार खेळताना

हेमंत लाटकर
Wed, 03/30/2016 - 15:54 नवीन
युध्दिष्टर जुगार खेळताना कृष्ण एका लढाईत गुंतला होता. त्यावेळेस कृष्ण पांडवा बरोबर असता तर झालेच नसते.
  • Log in or register to post comments

पण तो जळी स्थळी काष्ठी पाषाणी

टवाळ कार्टा
Wed, 03/30/2016 - 16:14 नवीन
पण तो जळी स्थळी काष्ठी पाषाणी असतो ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

हो. फक्त वेळेवर हजर नसतो. ;-

तर्राट जोकर
Wed, 03/30/2016 - 16:33 नवीन
हो. फक्त वेळेवर हजर नसतो. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे कश्यावरून म्हणत आहात

टवाळ कार्टा
Wed, 03/30/2016 - 17:34 नवीन
हे कश्यावरून म्हणत आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

नाहं प्रकाशः सर्वस्य

तर्राट जोकर
Wed, 03/30/2016 - 17:40 नवीन
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः मूढो यं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

भाषांतर कराल का...मला संस्कृत

टवाळ कार्टा
Wed, 03/30/2016 - 17:54 नवीन
भाषांतर कराल का...मला संस्कृत येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

असं नाय करायचं टकाभाऊ,

तर्राट जोकर
Wed, 03/30/2016 - 18:06 नवीन
असं नाय करायचं टकाभाऊ, अडचणीचे प्रश्न आले की संस्कृत श्लोक द्यायचा असा प्रघात आहे ना? आता संस्कृतचे अर्थ हजार. तुम्हाला पाहिजे तो काढून घ्या . =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ज्या अर्थासाठी तुम्ही श्लोक

टवाळ कार्टा
Wed, 03/30/2016 - 18:22 नवीन
ज्या अर्थासाठी तुम्ही श्लोक दिलाय तो अर्थ द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

जौदेत. तुम्हाला अर्थ दिऊ काडून

तर्राट जोकर
Wed, 03/30/2016 - 18:08 नवीन
भावार्थ : अपनी योगमाया से छिपा हुआ मैं सबके प्रत्यक्ष नहीं होता, इसलिए यह अज्ञानी जनसमुदाय मुझ जन्मरहित अविनाशी परमेश्वर को नहीं जानता अर्थात मुझको जन्मने-मरने वाला समझता है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अर्थ मराठीत हवाय

टवाळ कार्टा
Wed, 03/30/2016 - 18:22 नवीन
अर्थ मराठीत हवाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मी सर्वत्र असलो तरी माझ्या

तर्राट जोकर
Wed, 03/30/2016 - 20:05 नवीन
मी सर्वत्र असलो तरी माझ्या योगमायेमुळे प्रकट नसतो. त्यामुळे अज्ञानी जन मला जन्म मरण घेणारा समजतात पण मी तसा जन्म मरण नसलेला अविनाशी परमेश्वर आहे. अर्थ असा आहे की लाटकर सर पांडवांबरोबर झालेल्या प्रकाराला श्रीकृष्ण थांबवू शकले असते असे म्हणतात. पण श्रीकृष्ण म्हणतो मी तर प्रत्येक ठिकाणी आहे पण अज्ञानी जनास दिसत नाही. पांडव अज्ञानी होते म्हणून द्युतास सामोरे गेले, हे त्यांचे कर्मच आहे, हे कर्म स्वत: भगवानांनी करुन घेतले. त्यानंतर झालेले दुष्परिणाम हेही भगवंतांचीच लिला आहे. मग अशा वेळेस भगवंत तिथे नव्हते असे कसे म्हणायचे? मी म्हणालो की वेळेवर हजर नसतात. कारण भगवंत म्हणतात मी माझ्या योगमायेमुळे प्रकट होत नाही, म्हणजे जिथे गरज आहे असे आपल्याला वाटते तिथे भगवंताला गरज वाटत नाही हजर असण्याची. तुमची कर्म तुम्हाला त्या क्षणापर्यंत आणतात. दु:खद प्रसंगात भगवंत हवे असतात, पण भगवंत असतील तर दु:खाचे प्रसंग का निर्माण होतात? आता ह्या प्रश्नाचे उत्तर वरचा परिच्छेद आहे. आप कन्विन्स हुए या मै और बोलू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लहान बाळाचा हट्ट पुरवण्याच्या

आनंदी गोपाळ
Wed, 03/30/2016 - 20:50 नवीन
तुमच्या पेशन्सचे अभिनंदन @ तजो. इतका सर्वशक्तीमान तो विश्वरूपदर्शन दाखवणारा कृष्ण, साक्षात विष्णूभौंचा अवतार, द्रौपदीने धावा केल्यानंतर दुर्योधनाच्या कानाखाली जाळ काढायचा सोडून तिच्या अंगावर लुगडी का फेकत बसलेला हेच मला कळत नाहिये. भाकडकथा सांगायची अन तिच्या स्पष्टीकरणाला दुसरी भाकडकथा, हे लय भारी आहे या सगळ्या ष्टोर्‍यांतून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

भाकडकथा सांगायची अन तिच्या

तर्राट जोकर
Wed, 03/30/2016 - 21:12 नवीन
भाकडकथा सांगायची अन तिच्या स्पष्टीकरणाला दुसरी भाकडकथा, हे लय भारी आहे या सगळ्या ष्टोर्‍यांतून. सत्यवचन. असेच रावणाने सीतेला स्पर्श न करण्याला काहीतरी शापाचे कारण देतात. मुळात रावण एक मर्यादापुरुषोत्तम, पण तसे दाखवले तर रामाचा इम्पॉर्टन्स कमी होइल म्हणून शापाची ष्टुरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

दुसर्याच्या बायकोला पळवून न्हेणार्याला मर्यादापुरुषोत्तम म्हणने

भाऊंचे भाऊ
गुरुवार, 03/31/2016 - 08:08 नवीन
फार सोपे असते. नाही ? आपली बायको थोडीच त्याने पळवलेली असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

=))

sagarpdy
गुरुवार, 03/31/2016 - 11:02 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

अगदी बरोबर. आपली बायको तिच्या

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 13:04 नवीन
अगदी बरोबर. आपली बायको तिच्या मर्जीविरूद्ध पळवून नेल्या जाते, तिचे संरक्षण करण्यात आपण कमी पडतो वरुन तिचीच सत्वपरिक्षाही घेतो तीही एकदा नाही दोनदा, एवढे होऊनही फालतू लोकांच्या सांगण्यावरुन गर्भवती पत्नीचा त्याग करुन मोकळे होतो. आणि आम्ही मर्यादापुरुषोत्तम असतो. असो. काल्पनिक कथेतल्या कॅरेक्टर्सबद्दल आप आपले इंटरप्रिटेशन असणे साहजिक आहे. कोणासाठी राम महान कोणासाठी रावण. बाकी कोणी रामायणाला इतिहास समजत असेल तर समजो बापडा. इतिहास जरी असला तरी जेत्यांचाच आहे. त्यामुळे भांडण्यात काही अर्थ नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

चर्चा रावणाची चालु होती रामाबद्दल न्हवे.

भाऊंचे भाऊ
गुरुवार, 03/31/2016 - 13:34 नवीन
पण आपण भडास काढत आहात तर हो रामाने जनतेला त्रास दिला नाही, दुसर्यांच्या बायका पळवल्या नाहित. देवताना(?) बंदी बनवले नाही व रावणाला पुरून उरला या गोष्टी तोच रावणाविरुध्द विजेता ठरावा यासाठी पूरक आहेत. इतिहास जेत्यांनिच लिहायचा असतो. हो मर्यादा पुरुषोत्तमच. कारण पत्नीचा त्याग करून त्याने दुसरे लग्न केले नाही तो ही व्रतस्थ राहिला. याची बायको दोन दिवस माहेरी गेली की उच्छाद मांडनार्यानी विशेष नोंद घ्यावी मर्यादा पुरुषोत्तमच. तसेच कोणालाही फालतू न समजायची त्याची प्रवृत्ती वर्णव्यवस्थेला लगावलेली कान्फ़टात आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

गुड =)) मग रावणाला

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 15:09 नवीन
गुड =)) मग रावणाला मर्यादापुरुषोत्तम म्हटले तर का भडकले ब्वा लोक? रामाला तर मूळ प्रतिसादात काही बोल लावले नव्हते. स्त्रेंज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

राम जेता होता त्यामुळे

टवाळ कार्टा
गुरुवार, 03/31/2016 - 13:46 नवीन
राम जेता होता त्यामुळे त्याच्या श्टोरीत तोच हिरो असणार...इतिहास्/कथा नेहमी जेते लिहितात असे तुम्हीच मान्य केलेत की http://www.misalpav.com/comment/823511#comment-823511 कदाचित लंकेत गेलात तर तिथे रावणाला हिरो बोलणारे कदाचित भेटतीलही तुम्हाला...तिथे गेल्यावर मग त्याला राम कसा ग्रेट होता असे सांगू नका =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

असु देत ना हिरो, रामायण

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 15:13 नवीन
असु देत ना हिरो, रामायण महाभारतातल्या कॅरेक्टर्सची चिकित्सा करायला मनाई आहे का इस्लाममधे पैगंबरची आहे तशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पुलंचे रावसाहेब आठवले :)

टवाळ कार्टा
गुरुवार, 03/31/2016 - 15:59 नवीन
पुलंचे रावसाहेब आठवले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

कोण रावसाहेब? संदर्भ स्पष्ट

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 16:03 नवीन
कोण रावसाहेब? संदर्भ स्पष्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लोल्ल!

sagarpdy
गुरुवार, 03/31/2016 - 17:02 नवीन
लोल्ल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

फक्त तुम्हालाच समजले कै? ;)

टवाळ कार्टा
Fri, 04/01/2016 - 22:13 नवीन
फक्त तुम्हालाच समजले कै? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

म्हणजे तुम्हाला संस्कृत

तर्राट जोकर
Fri, 04/01/2016 - 22:42 नवीन
म्हणजे तुम्हाला संस्कृत श्लोकाचा अर्थ आणि निरुपण देऊन चूक झाली म्हणायची आमची. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्यांची चिकित्सा केली तर डोकं

DEADPOOL
गुरुवार, 03/31/2016 - 16:40 नवीन
त्यांची चिकित्सा केली तर डोकं उड्वतात म्हणे! राम म्हणजे सॉफ्ट टार्गेट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आपण मला लहान बाळ समजत असाल तर

टवाळ कार्टा
गुरुवार, 03/31/2016 - 13:46 नवीन
आपण मला लहान बाळ समजत असाल तर तुमचा गैरसमज दूर करण्याचा मस्त उपाय आहे माझ्याकडे पण असो बाकी भाकडकथा असो वा कोणतीही दुसरी कथा असो...त्यात एक चांगला आणि एक वाईट असेच असणार....त्याशिवाय लोक ती कथा विंट्रेश्ट घेउन वाचणार कशी...आता भारतीयांना राम चांगला वाटणार तर कदाचीत श्रीलंकेत रावणाला पुजले जात असेल (खखोदेजा) पण त्याचे कारण म्हणजे इतिहास / कथा नेहमी जेतेच लिहितात...अब्दाली आपल्यासाठी व्हिलन असला तरी अफगाण लोकांसाठी सम्राट होता/आहे....तसेच आहे हे....असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

धन्यवाद....

टवाळ कार्टा
गुरुवार, 03/31/2016 - 13:46 नवीन
धन्यवाद....
श्रीकृष्ण म्हणतो मी तर प्रत्येक ठिकाणी आहे पण अज्ञानी जनास दिसत नाही. पांडव अज्ञानी होते म्हणून द्युतास सामोरे गेले, हे त्यांचे कर्मच आहे, हे कर्म स्वत: भगवानांनी करुन घेतले. त्यानंतर झालेले दुष्परिणाम हेही भगवंतांचीच लिला आहे. मग अशा वेळेस भगवंत तिथे नव्हते असे कसे म्हणायचे?
म्हणजे जे झाले, होत आहे आणि होणार आहे हे सगळेच भगवंत "नियंत्रीत" करतो....मग आपण देव मला गरज असताना आला नाही असे बोलू नये...कधी कोणती गोष्ट करावी अथवा करू नये हे आपल्यापेक्षा देवाला जास्त समजते...तस्मात तुम्ही, मी अथवा आणखी कोणी...कितीही चर्चा केल्या तरी त्यामुळे देवाच्या प्लानिंगमध्ये शष्प फरक पडणार नाहिये....त्यामुळे माझा इथे पास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अचूक समजले! हेच ते.

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 14:16 नवीन
अचूक समजले! हेच ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आयला...मी बॅटिंगला आलो की असे

टवाळ कार्टा
गुरुवार, 03/31/2016 - 14:28 नवीन
आयला...मी बॅटिंगला आलो की असे बॅट-बॉल घेउन "आई बोलावतेय" म्हणत जायचे नाही ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आता तुम्हीच पास बोल्ले तर काय

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 15:05 नवीन
आता तुम्हीच पास बोल्ले तर काय येकटाच खेळत बसू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मला तर मराठी पण येत नाही

झेन
गुरुवार, 03/31/2016 - 14:25 नवीन
केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही याचा अर्थ "इष्टार्ट, आणि बारीक कूटा हं" असा आहे एवढी आज ज्ञानात भर पडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

संस्कृत येत नाही ?

झेन
गुरुवार, 03/31/2016 - 14:36 नवीन
अहो साहेब मला तर मराठी पण येत नाही. केवळ कथा आहे, काथ्याकुट करायची गरज नाही याचा अर्थ "इष्टार्ट, आणि बारीक कूटा हं" असा आहे हे आजच समजलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बरोबर. =))

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 15:06 नवीन
बरोबर. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन

मुळात रावण एक

होबासराव
Wed, 03/30/2016 - 21:22 नवीन
मुळात रावण एक मर्यादापुरुषोत्तम, पण तसे दाखवले तर रामाचा इम्पॉर्टन्स कमी होइल म्हणून शापाची ष्टुरी. _____/\_____ नाहि तजो आता दंडवत स्विकाराच. "रावण एक मर्यादापुरुषोत्तम" ह्याचा काहि विदा मिळेल का :)
  • Log in or register to post comments

आपण मूळ रामायण वाचले तर समजेल

तर्राट जोकर
Wed, 03/30/2016 - 22:48 नवीन
आपण मूळ रामायण वाचले तर समजेल. तुलसीरामायणाच्या रचनेनंतर श्रीरामाचे दैवतीकरण झाले, त्याचे नायकत्व अधिकाधिक उजळ दिसण्यासाठी रावणाला अधिकाधिक खलनायक ठरवण्यात पुरक भाकड कथा रचण्यात आल्या. मर्यादापुरुषोत्तम चा तुमचा अर्थ काय ते सांगा मग माझ्या विधानाचा विदा देतो. अण्डरस्टँडींगमें लोच्या नै मंगता बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

सध्याची फ्याशन

ट्रेड मार्क
गुरुवार, 03/31/2016 - 01:25 नवीन
हजारो शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी आताच्या आपल्या समजुती आणि निकषांनुसार कश्या चुकीच्या आहेत हे सांगण्याची सध्या फ्याशन आहे. त्यातही हिंदू देवदेवता आले की मग तर काय सगळंच चुकीचं आणि कपोलकल्पित असतं.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा