✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डनिंग-क्रुगर इफेक्ट

अ
अमृता_जोशी यांनी
Wed, 03/30/2016 - 00:04  ·  लेख
लेख
१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात. 'डनिंग-क्रुगर इफेक्ट' या अवस्थेत तुलनेने अकुशल व्यक्ती स्वतःची क्षमता खरोखर आहे त्यापेक्षा जास्त समजतात व वाजवी पेक्षा जास्त स्वाभिमान, आत्मविश्वास बाळगतात. कुठलीही टीका अथवा नकारात्मक अभिप्राय त्यांना अजिबात सहन होत नाही. डनिंग व क्रुगर यांना या अभ्यासाची प्रेरणा मेकऑर्थर व्हीलर नामक एका व्यक्ती पासून मिळाली होती, ज्याने लिंबाचा रस हा अदृश्य शाई सारखा काम करतो व तो सीसीटीवी केमेऱ्यात रेकोर्ड होत नाही अशा गैरसमजापोटी तोंडाला लिंबाचा रस फासून बॅंक लुटण्याचा प्रयत्न केला होता. 'डनिंग-क्रुगर इफेक्ट' या स्थितीत असणारे लोक:
  1. त्यांची अकार्यक्षमता ओळखू शकत नाहीत
  2. त्यांचे अपुरेपण व मर्यादा ओळखू शकत नाहीत.
  3. इतरांच्या कुशलते बद्दल नेहमी नकारात्मकच असतात.
  4. त्या कौशल्याचे पूर्ण ज्ञान आल्यानंतर अथवा योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण अगोदर अज्ञानी होतो हे मान्य करतात.
हा झाला विकीबाबांच्या माहितीचा मराठी अनुवाद आता याची काही उदाहरणे. फेसबुकवर गेल्यानंतर स्वतःचाच फोटो टाकून स्वतःच्या दिसण्याबद्दल स्वतःच स्तुती करणारे लोक पाहिलेत? चित्रपट पाहून आल्यानंतर लगेचच 'My review of XYZ' असे टंकून त्या चित्रपटाचे समीक्षण करणारे लोक पाहिलेत? एखाद्या परीक्षेत अथवा स्पर्धेत काहीच येत नसल्यामुळे अयशस्वी झालेले परंतु लगेचच आइनस्टायीन, बील गेट्स व धीरूभाई अंबानी चे उदाहरण देणारे लोक पाहिलेत? काहीच माहिती नसताना देखील स्वतःचे श्रेष्ठत्व सांगणारे लोक पाहिलेत? 'Love me or hate me but never ignore me' असे किंवा 'maah lyf maah rulez' असे व्हाट्सअप स्टेटस असणारे लोक पाहिलेत? नसतील पहिले तर ही चित्रफीत पहा: मला 'डनिंग-क्रुगर इफेक्ट' च्या John Cleese यांनी केलेल्या व्याख्या सगळ्यात भारी वाटतात. 'people who are too stupid to know how stupid they are' आणि 'people who don't know that they don't know' सेक्स, ड्रायविंग, पोहणे,चेस व टेनिस खेळणे, पालकत्व या गोष्टींमध्ये ही स्थिती सर्वाधिक कॉमन आहे. अमेरिकेत तर जवळपास ९३% लोक स्वतःच्या ड्रायविंग विषयी या मानसिक स्थितीत आहेत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
13892 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

बुल्ल'स एये

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 15:19 नवीन
बुल्ल'स एये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

वाट दु यु मेअन सर?

अमृता_जोशी
गुरुवार, 03/31/2016 - 15:44 नवीन
वाट दु यु मेअन सर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

योर क्वेश्चन इज टु द वेरी

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 16:10 नवीन
योर क्वेश्चन इज टु द वेरी प्वाइण्ट. उन्देर्स्तन्द?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

एस एस.. थंक यौ!

अमृता_जोशी
गुरुवार, 03/31/2016 - 16:17 नवीन
एस एस.. थंक यौ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हेय, चिल..

नीलमोहर
गुरुवार, 03/31/2016 - 15:20 नवीन
'बाकी अ जो, आपका लिखाण स्टाईल, आपके विचार, आपके अंदाज, कुछ जाने पहचानेसे लगते हैं.. शायद आपको पहले भी यहीं देखा है.' - आह रिपीत मा अबव रिप्लाय, आंद इत दजंत बोथर मी ईन एनिवेय राद आहम अम्युसद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

दोन्त यु थिंक इट्स योर ओव्न

अमृता_जोशी
गुरुवार, 03/31/2016 - 15:37 नवीन
दोन्त यु थिंक इट्स योर ओव्न थोउत? व्ह्य दो यु वंत तो साय इत अगैन अन्द अगैन? अन्द वात मेड यु अमाझेद? सोर्र्य फोर बेईन्ग रुद... प्लीस फोल्लोव द फोल्लोविंग लिंक : संपादित सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी / ताशेरे / हल्ले टाळावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

आववव पलीज

नीलमोहर
गुरुवार, 03/31/2016 - 16:27 नवीन
इतस ओके इफ यु कांत हेल्प बेईन्ग रुद... बत आह दोंत वांत तु फुरथर वेस्त माह देता ऑन सिलि थिनग्स, सो पलीज किप वोडेवर इत इस फो युरसइल्फ, आंद व्हा आ यु गेतिंग दिस्तरबड इफ इतस नौत्त तुरू, लिव इत, बेब्झ देट्स ओल फ्रोम माह सायद, नाओ एक्सकुसे मी. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

नो बुत एवेन इफ योउ दिद सी हेर

बॅटमॅन
गुरुवार, 03/31/2016 - 23:53 नवीन
नो बुत एवेन इफ योउ दिद सी हेर बेफोरे इन सोमे फोर्म ओर थे ओथेर ओन मिप, व्हत दिफ्फेरेन्चे थत मके? थेसे जुद्गेमेन्तल औन्त्य मेन्तलित्य इस सो स्त्रोन्ग ओन मिप उन्फोर्तुनतेल्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

औन्त्य ====== ))))))))

तर्राट जोकर
Fri, 04/01/2016 - 00:06 नवीन
औन्त्य ====== ))))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओव्व्व व्ह्य सो सेरिओउस

नीलमोहर
Fri, 04/01/2016 - 11:08 नवीन
ओफ्चोउर्से इत दोएस्न्त मके अन्य दिफ्फेरेन्चे, एनिवन चन तके अन्य व्हिच नुम्बेर ओफ इद्स नो प्रोब्लेम, बुत इफ योउ अरे प्लयिन्ग अ पर्त अत्लेअस्त दो इत चोन्विन्चिन्ग्ल्य, नो पोइन्त इन पुत्तिन्ग ओन अ मस्क इफ पेओप्ले चन सी योउर रेअल फचे बेहिन्द इत, थेय विल्ल त्र्य तो लूक बेहिन्द ओर पुल्ल ओफ्फ थे मस्क, हुमन नतुरे योउ सी. (ओफ चोउर्से नोत सयिन्ग शेस पुत ओन अ मस्क फोर सुरे, जुस्त इफ इत इस सो) फोर एक्षम्प्ले इन अ मोविए थे अच्तोर प्लय्स थे चरच्तेर हे इस ओन स्च्रीन, नो उसे इफ हे इस प्लयिन्ग हिम्सेल्फ थेरे तू. तके प्रियन्क चोप्र, एवेन इफ शे इस प्लयिन्ग झिल्मिल, कलि, आभा, वे सी ओन्ल्य प्रियन्का थेरे. व्हिले विथ विद्य बलन, वे सी क्रिश्ना, ललिता, विद्या बग्चि, सिल्क, वे दोन्त सी विद्य थेरे, गोतित.. इ सी योउ लिके थिस 'औन्त्य' वोर्द अ लोत ;) बुत व्हत इस थिस औन्त्य मेन्तलित्य, अरेन'त योउ बेइन्ग जुद्गेमेन्तल हेरे, योउ हते गेनेरलिझतिओन व्ह्य दो इत योउर्सेल्फ्फ, एवेन उन्च्लेस इन्दुल्गे इन थेसे थिन्ग्स. इ अम नोत थे ओन्ल्य ओने व्हो सिअद थत तो हेर ओथेर्स हवे अल्सो सैद इत. अन्य्वय्स, हेरेओन विल्ल जुस्त लेत थे गिर्ल बे. इ रेस्पेच्त योउ अन्द दोन्त वन्त तो अर्गुए फुर्थेर अन्द चन्गे थिस ए॑उअतिओन ओवेर ओथेर्स सो लेत्स जुस्त स्तोप हेरे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओफ्चोउर्से इत दोएस्न्त मके

अमृता_जोशी
Fri, 04/01/2016 - 11:38 नवीन
ओफ्चोउर्से इत दोएस्न्त मके अन्य दिफ्फेरेन्चे, एनिवन चन तके अन्य व्हिच नुम्बेर ओफ इद्स नो प्रोब्लेम, बुत इफ योउ अरे प्लयिन्ग अ पर्त अत्लेअस्त दो इत चोन्विन्चिन्ग्ल्य, नो पोइन्त इन पुत्तिन्ग ओन अ मस्क इफ पेओप्ले चन सी योउर रेअल फचे बेहिन्द इत, थेय विल्ल त्र्य तो लूक बेहिन्द ओर पुल्ल ओफ्फ थे मस्क, हुमन नतुरे योउ सी. (ओफ चोउर्से नोत सयिन्ग शेस पुत ओन अ मस्क फोर सुरे, जुस्त इफ इत इस सो) फोर एक्षम्प्ले इन अ मोविए थे अच्तोर प्लय्स थे चरच्तेर हे इस ओन स्च्रीन, नो उसे इफ हे इस प्लयिन्ग हिम्सेल्फ थेरे तू. तके प्रियन्क चोप्र, एवेन इफ शे इस प्लयिन्ग झिल्मिल, कलि, आभा, वे सी ओन्ल्य प्रियन्का थेरे. व्हिले विथ विद्य बलन, वे सी क्रिश्ना, ललिता, विद्या बग्चि, सिल्क, वे दोन्त सी विद्य थेरे, गोतित..
यौ अरे आगिन फोर्चिंग यौर ओपिनिओन... व्हय द हेल दो यौ एक्ष्पेच्त मी टो दो सोमेथिङ्ग? संपादित सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी टाळावी. सदस्यांना उद्देशून अपशब्द वापरल्यास सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

आरं काय टिर टिर चाल्लिया

तर्राट जोकर
Fri, 04/01/2016 - 12:48 नवीन
आरं काय टिर टिर चाल्लिया हिथंसा. भांडायचं तर जरा मर्हाटीत भांडाना च्यामाडी तुम्ही सगळे लोक ;).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

I don't think so.

अगम्य
Fri, 04/01/2016 - 03:10 नवीन
I think it is a compliment.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

:-)

जुइ
Wed, 03/30/2016 - 23:41 नवीन
रोचक संशोधन आहे.
  • Log in or register to post comments

रोचक माहिती. मला लहानपणी

Shridhar Laxma…
गुरुवार, 03/31/2016 - 00:23 नवीन
रोचक माहिती. मला लहानपणी वाटायचे की मी विष्णुचा दहावा अवतार आहे.. आणि मी मनात येईल ते करु शकेन मोठेपणी.. पण आयुष्यात बरेच धक्के खाल्ल्यानंतर आता तसं नाही वाटत..;-)
  • Log in or register to post comments

अमृताजी

बोका-ए-आझम
गुरुवार, 03/31/2016 - 00:42 नवीन
लेख छानच आहे. एक प्रश्न.
सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात.
याचा अर्थ ही स्थिती normal समजली जाते आहे असा घ्यायचा का? आणि अजून एक प्रश्न - याचा अर्थ स्वतःच्या क्षमतेची व्यवस्थित जाणीव असणारे लोक हे abnormal आहेत का?
  • Log in or register to post comments

चांगले प्रश्न. आवडले.

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 01:30 नवीन
चांगले प्रश्न. आवडले. उत्तराच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

व्यक्तीमत्व विकासाचा एक टप्पा म्हणुन ते नॉर्मल असावं

अर्धवटराव
गुरुवार, 03/31/2016 - 04:41 नवीन
पण त्या स्थितीचं सातत्य किंवा वारंवार तशी स्थिती येणे म्ह्णजे प्रॉब्लेम असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

यहीच बोलणे को आई थी... थांकू!

अमृता_जोशी
गुरुवार, 03/31/2016 - 13:00 नवीन
यहीच बोलणे को आई थी... थांकू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

प्रत्येकजणच अशा अवस्थेतून

विजुभाऊ
गुरुवार, 03/31/2016 - 12:39 नवीन
प्रत्येकजणच अशा अवस्थेतून कधीना कधी गेलेला असतोच ( हे खंडन करणारे असू शकतील ;))
  • Log in or register to post comments

खंडन नाही हजार टक्के समर्थन.

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 12:51 नवीन
खंडन नाही हजार टक्के समर्थन. आपण मुर्ख आहोत हे आपल्याला कळणे शक्य नाही अशा अवस्थेतून आपण गेलो हे कसं कळणार आणि कुणी मान्य तरी का करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

१९९९ मध्ये अमेरिकन

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/01/2016 - 12:01 नवीन
१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात. विरोधाभास असा आहे की... या लोकांना नावे ठेवताना आपण विसरतो की, आपल्या क्षमतेची पराकाष्ठा करावी (स्ट्रेच द लिमिट्स ऑफ युवर अ‍ॅबिलिटिज्) अशी मन:स्थिती तयार करण्यासाठी "मोटीवेशन प्रोग्रॅम्स"वर कंपन्या (आणि खाजगीत बर्‍याच व्यक्तीही) जगभर अनेक करोडोंनी पैसे दरवर्षी खर्च करतात. किंबहुना, वास्तवातले सत्य असे आहे की... जोपर्यंत आपण आपल्या कुवतीचा पराभव होईपर्यंत तिला ताणत नाही, तोपर्यंत तिच्या पूर्ण क्षमतेचा नक्की अंदाज आपल्याला येणे शक्य नसते. उदा : १. नऊ वेळा अयशस्वी होऊन दहाव्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या उद्योजकाने/विद्यार्थ्याने/संशोधकाने आपल्या क्षमतेवर संशय घेऊन आपले प्रयत्न आठव्या/नवव्या प्रयत्नात सोडून दिले तर त्याला व जगाला त्याचे यश दिसले असते का ? २. बिल गेट्सने आपल्या कंपनीची दरवर्षी १०-२०% टक्के वाढ बघण्यात धन्यता मानली असती तर मायक्रोसॉफ्ट आणि स्वतः बिल कुठे असते ?! Dunning Kruger Effect मनःस्थिती असलेल्या माणसांनीच इतरांना अशक्य किंवा अतर्क्य वाटणारी कामे करून या जगात क्रांतीकारी बदल घडवून आणले आहेत. ते लोक तसेच असतात; फरक फक्त इतरांनी त्यांना समजून घेण्यात आहे... अ) असे लोक अयशस्वी झाले की बहुतांश इतर लोक त्यांची खिल्ली उडवतात, त्यांच्यापासून स्वतःला दूर करतात आणि कालांतराने त्यांना विसरून जातात. आ) मात्र, ते यशस्वी झाले की लोक त्यांच्याशी आपण कसे संबंधीत आहोत हे चढाओढीने सांगतात; त्यांचे कौतूक करताना जीभा थकत नाहीत; त्यांच्या कृती आणि कार्यशैलीवर पुस्तके/डॉक्युमेंटरीज/लेख/भाषणे/इ चे उद्योगधंदे बनवले जातात !
  • Log in or register to post comments

हा विषय पुढे आणल्याबद्दल

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/01/2016 - 12:05 नवीन
हा विषय पुढे आणल्याबद्दल लेखिकेला धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अजून एक मुद्दा राहिलाच की...

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/01/2016 - 12:13 नवीन
अजून एक मुद्दा राहिलाच की... या लोकांमध्ये भरपूर उर्जा असते आणि बहुतेकांत ती वापरण्याची तयारी असते. मात्र बर्‍याचदा ती उर्जा चुकीच्या दिशेने आणि/किंवा अनुत्पादक पद्धतीने वापरली जाते. अश्या माणसांना जर उत्तम गुरू (मेंटॉर) अथवा समुपदेशक मिळाला व तो त्यांच्या उर्जेला योग्य दिशेने प्रवाहीत करू शकला तर निदान काही जणांच्या बाबतीत बरेच काही अशक्य/अतर्क्य घडू शकते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आपल्यासर्व प्रतिसादांसाठी

तर्राट जोकर
Fri, 04/01/2016 - 12:55 नवीन
आपल्यासर्व प्रतिसादांसाठी स्टॅण्डींग ओवेशन. मान गये. सुंदर मांडलंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा