Skip to main content

डनिंग-क्रुगर इफेक्ट

बुधवार, 30/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात. 'डनिंग-क्रुगर इफेक्ट' या अवस्थेत तुलनेने अकुशल व्यक्ती स्वतःची क्षमता खरोखर आहे त्यापेक्षा जास्त समजतात व वाजवी पेक्षा जास्त स्वाभिमान, आत्मविश्वास बाळगतात. कुठलीही टीका अथवा नकारात्मक अभिप्राय त्यांना अजिबात सहन होत नाही. डनिंग व क्रुगर यांना या अभ्यासाची प्रेरणा मेकऑर्थर व्हीलर नामक एका व्यक्ती पासून मिळाली होती, ज्याने लिंबाचा रस हा अदृश्य शाई सारखा काम करतो व तो सीसीटीवी केमेऱ्यात रेकोर्ड होत नाही अशा गैरसमजापोटी तोंडाला लिंबाचा रस फासून बॅंक लुटण्याचा प्रयत्न केला होता. 'डनिंग-क्रुगर इफेक्ट' या स्थितीत असणारे लोक:
  1. त्यांची अकार्यक्षमता ओळखू शकत नाहीत
  2. त्यांचे अपुरेपण व मर्यादा ओळखू शकत नाहीत.
  3. इतरांच्या कुशलते बद्दल नेहमी नकारात्मकच असतात.
  4. त्या कौशल्याचे पूर्ण ज्ञान आल्यानंतर अथवा योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण अगोदर अज्ञानी होतो हे मान्य करतात.
हा झाला विकीबाबांच्या माहितीचा मराठी अनुवाद आता याची काही उदाहरणे. फेसबुकवर गेल्यानंतर स्वतःचाच फोटो टाकून स्वतःच्या दिसण्याबद्दल स्वतःच स्तुती करणारे लोक पाहिलेत? चित्रपट पाहून आल्यानंतर लगेचच 'My review of XYZ' असे टंकून त्या चित्रपटाचे समीक्षण करणारे लोक पाहिलेत? एखाद्या परीक्षेत अथवा स्पर्धेत काहीच येत नसल्यामुळे अयशस्वी झालेले परंतु लगेचच आइनस्टायीन, बील गेट्स व धीरूभाई अंबानी चे उदाहरण देणारे लोक पाहिलेत? काहीच माहिती नसताना देखील स्वतःचे श्रेष्ठत्व सांगणारे लोक पाहिलेत? 'Love me or hate me but never ignore me' असे किंवा 'maah lyf maah rulez' असे व्हाट्सअप स्टेटस असणारे लोक पाहिलेत? नसतील पहिले तर ही चित्रफीत पहा: मला 'डनिंग-क्रुगर इफेक्ट' च्या John Cleese यांनी केलेल्या व्याख्या सगळ्यात भारी वाटतात. 'people who are too stupid to know how stupid they are' आणि 'people who don't know that they don't know' सेक्स, ड्रायविंग, पोहणे,चेस व टेनिस खेळणे, पालकत्व या गोष्टींमध्ये ही स्थिती सर्वाधिक कॉमन आहे. अमेरिकेत तर जवळपास ९३% लोक स्वतःच्या ड्रायविंग विषयी या मानसिक स्थितीत आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13904
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

रोचक आहे ही संकल्पना. थोडक्यात लिहिलय पण छान लिहिलय.

"उथळ पाण्याला खळखळाट फार" आणि "निम हकीम खतरे जान" ते हेच का? अवांतर: या विषयावर पहिल्यांदा वाचल्यावर मला फारच रोचक विषय वाटला होता हा. पण नंतर कुठेतरी 'Incomplete knowledge of the Dunning-Kruger effect could give you impostor syndrome' असे वाचायला मिळाले म्हणून असल्या मानसिक स्थितीन्विषयी वाचणे व आंतरजालीय संशोधन करणे मी बंद करून टाकले. कशाला नसत्या उचापती!

In reply to by निशांत_खाडे

"उथळ पाण्याला खळखळाट फार" आणि "निम हकीम खतरे जान" ते हेच का?
अगदी अगदी.
या विषयावर पहिल्यांदा वाचल्यावर मला फारच रोचक विषय वाटला होता हा. पण नंतर कुठेतरी 'Incomplete knowledge of the Dunning-Kruger effect could give you impostor syndrome' असे वाचायला मिळाले म्हणून असल्या मानसिक स्थितीन्विषयी वाचणे व आंतरजालीय संशोधन करणे मी बंद करून टाकले. कशाला नसत्या उचापती!
कुठे वाचलेत हे? काही दुवा वैगेरे असेल तर देता का?

सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात. वरील माहिती आवडली. हसू आले. आपण सगळेच लोक या परिस्थितीतून कायम जात असतो असे वाटले. काही बाबतीत भ्रमाचा भोपळा फुटतो, मग शहाणपण येते. तिथे सुधारणा होईपर्यंत दुसरीकडे मनाच्या कोपर्‍यात यास्थितीची सुरुवात होते. मग सव्वाशेर कधी ना कधी भेटतो व त्या बाबतीत शहाणपण येते. हे सतत चालू असते असे वाटते. अर्थात याबाबतीत माझेच म्हणणे खरे असे मात्र नाही. ;)

विषय आवडला। पण या दोन उदाहरणाचा संबंध कसा काय ते नाही कळालं। चित्रपट पाहून आल्यानंतर लगेचच 'My review of XYZ' असे टंकून त्या चित्रपटाचे समीक्षण करणारे लोक पाहिलेत? यात DK इफेक्ट कसा काय? परीक्षण तर कोणीही करू शकतो। एखाद्या परीक्षेत अथवा स्पर्धेत काहीच येत नसल्यामुळे अयशस्वी झालेले परंतु लगेचच आइनस्टायीन, बील गेट्स व धीरूभाई अंबानी चे उदाहरण देणारे लोक पाहिलेत? हे ती लोकं स्वतःला धीर देण्यासाठी करत असतील। कि बाबा असे पण लोक आहेत जे आधी अपयश येऊन मग मोठे झाले।

याबाबतीत माझं आवडतं वाक्यः 'स्वतःला अतिशहाणे समजण्यात काहीच प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम दुसर्‍याला मूर्ख समजण्यात आहे' बाकी अ जो, आपका लिखाण स्टाईल, आपके विचार, आपके अंदाज, कुछ जाने पहचानेसे लगते हैं.. शायद आपको पहले भी यहीं देखा है ;)

मस्त विषय आणि लेख. मानसशास्त्राविषयी फार वाचलेले नाही. जे काही थोडेफार वाचले आहे ते डॅनिएल कॅनेमन या मानसशास्त्रज्ञाचेच लिखाण. अजून वाचायला आवडेल. तोपर्यंत अशा गोष्टींची ओळख करून देणारे असेच लेख येऊ द्या :)

अमेरिकेत तर जवळपास ९३% लोक स्वतःच्या ड्रायविंग विषयी या मानसिक स्थितीत आहेत.
म्हणजे नेमका काय गैरसमज आहे या ९३% लोकांचा ?

सध्या आपला देश असाच आहे ना ?

In reply to by lgodbole

नक्की किती "गोडबोले" आहेत? म्हणजे आडनावाने गोडबोले म्हणतोय मी.

चांगली माहिती आहे. पण खूपच त्रोटक वाटली. स्वतःबद्दल असे गैरसमज असलेले अनेकजण पाहण्यात आहेत. कदाचित मी स्वतःसुद्धा या अवस्थेतून गेलो असणार. अशा लोकांना स्वतःची कार्यक्षमता माहिती नसेल असे वाटत नाही. किंबहुना आपली मर्यादीत कार्यक्षमता ओळखूनच स्वतःची कमतरता लपविण्यासाठीच ही मंडळी स्वतः सर्वज्ञ असल्याचा आव आणून इतरांना कमी लेखून स्वतःचे महत्त्व वाढविण्याच्या प्रयत्नात असतात.

परीक्षण लिहीणे ह्या इफेक्ट मध्ये कसं आलं ते कळालं नाही. फारशी माहिती नसताना उगाच शो ऑफ करणारे किंवा अगदी मनापासुन स्वतःला महान समजणारे लोक पाहिले आहेत. रेवाक्का म्हणते तसं सगळेच थोड्याबहुत प्रमाणात असे वागत असतातच. टप्पे टोणपे खाऊन लाईन वर येतात सगळेच. स्वतःला कमी लेखणार्‍या किंवा आपल्या क्षमतेवर विश्वास नसणार्‍या मानसिकतेला काय म्हणतात?

In reply to by पिलीयन रायडर

अरेरे.. हे विसरलेच टंकायचे.
स्वतःला कमी लेखणार्‍या किंवा आपल्या क्षमतेवर विश्वास नसणार्‍या मानसिकतेला काय म्हणतात?
हाही DK चा प्रकार आहे. येथे वाचा: https://en.wikipedia.org/wiki/Dunning–Kruger_effect

In reply to by पिलीयन रायडर

स्वतःला कमी लेखणार्‍या किंवा आपल्या क्षमतेवर विश्वास नसणार्‍या मानसिकतेला काय म्हणतात?
कमी आत्मसन्मान (low self esteem) असलेली मानसिकता.

नार्सिसिस्ट: स्वत:विषयी अत्यंत अवास्तव कल्पना बाळगणारे व स्वत:च्या प्रेमात पूर्ण बुडून गेलेले I Specialist Narcissistic Personality Disorder (NPD) गुगलून पहा. मजेदार!

In reply to by स्वधर्म

>>Narcissistic Personality Disorder (NPD) गुगलून पहा. मजेदार! नार्सिसिझम हा मजेदार विषय नाही. टोकाचे नार्सिसिझम असलेली व्यक्ती आई किंवा वडील किंवा आयुष्याचा जोडीदार असेल तर आयुष्याचा नरक होऊ शकतो.

In reply to by सतिश गावडे

मजेदार नसतेच. त्याला नार्सिसिझमही अपवाद नाही. माणूस स्वत:विषयी एवढ्या अवास्तव कल्पना कशा बाळगू शकतो, या अर्थाने मजेदार म्हटले होते. DMS classification काही कारणाने पहावे लागले होते, तेव्हा अगदी कोडे सुटल्यासारखे वाटले होते.

In reply to by स्वधर्म

फरक भरपूर आहेत, पण थोडक्यात सांगायचे झाले तर Narcissism हा एक मानसिक आजार आहे, DK ही एक नॉर्मल मानसिक स्थिती आहे, एका ठराविक काळानंतर व्यक्ती थाऱ्यावर येते, उपराचाराची गरज पडत नाही (बहुतेक वेळा). Narcissism मध्ये ती व्यक्ती धोकाधायक प्रमाणात स्वतःच्या प्रेमात पडलेली असते, DK मध्ये ती व्यक्ती फक्त स्वतःच्या क्षमतेला आहे त्या पेक्षा जास्त दाखवते.

In reply to by स्वधर्म

नार्सिसिस्ट: स्वत:विषयी अत्यंत अवास्तव कल्पना बाळगणारे व स्वत:च्या प्रेमात पूर्ण बुडून गेलेले I Specialist Narcissistic Personality Disorder (NPD) गुगलून पहा. मजेदार!
म्हणजे पुणेकर म्हणा की =))

वाचल्या बरोबर जो आय डी डोळ्यासमोर आला ते फक्त मानसशास्त्रावर चांगले लिहित नाहित तर अध्यात्मा वर हि त्यांचि प्रचंड पकड आहे. :)

In reply to by अमृता_जोशी

काँप्लीमेंट च आहे हो, कुणाच्या मनात नाही आले ते तुम्हाला लिहावेसे वाटले ही चांगलीच गोष्ट आहे की :) ते जोशांच्या क्लास ला जातात त्यामुळे प्रश्नाला प्रतिप्रश्न करतात :प लेख छान लिहीलाय तुम्ही पण अजुन सविस्तर वाचायला आवडेल. अनेकांसारखाच मला ही सिने परिक्षण लिहीण्यात ही मानसिकता कशी दिसते ते अजुन कळलेलं नाहीये.

In reply to by अमृता_जोशी

Is this a complement?
वेल्ल ओफ चोउर्से इत इस. व्ह्य वोउल्द योउ थिन्क ओथेर्विसे?

In reply to by अमृता_जोशी

'बाकी अ जो, आपका लिखाण स्टाईल, आपके विचार, आपके अंदाज, कुछ जाने पहचानेसे लगते हैं.. शायद आपको पहले भी यहीं देखा है.' - आह रिपीत मा अबव रिप्लाय, आंद इत दजंत बोथर मी ईन एनिवेय राद आहम अम्युसद

In reply to by नीलमोहर

दोन्त यु थिंक इट्स योर ओव्न थोउत? व्ह्य दो यु वंत तो साय इत अगैन अन्द अगैन? अन्द वात मेड यु अमाझेद? सोर्र्य फोर बेईन्ग रुद... प्लीस फोल्लोव द फोल्लोविंग लिंक : संपादित सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी / ताशेरे / हल्ले टाळावेत.

In reply to by अमृता_जोशी

इतस ओके इफ यु कांत हेल्प बेईन्ग रुद... बत आह दोंत वांत तु फुरथर वेस्त माह देता ऑन सिलि थिनग्स, सो पलीज किप वोडेवर इत इस फो युरसइल्फ, आंद व्हा आ यु गेतिंग दिस्तरबड इफ इतस नौत्त तुरू, लिव इत, बेब्झ देट्स ओल फ्रोम माह सायद, नाओ एक्सकुसे मी. .

In reply to by नीलमोहर

नो बुत एवेन इफ योउ दिद सी हेर बेफोरे इन सोमे फोर्म ओर थे ओथेर ओन मिप, व्हत दिफ्फेरेन्चे थत मके? थेसे जुद्गेमेन्तल औन्त्य मेन्तलित्य इस सो स्त्रोन्ग ओन मिप उन्फोर्तुनतेल्य.

In reply to by बॅटमॅन

ओफ्चोउर्से इत दोएस्न्त मके अन्य दिफ्फेरेन्चे, एनिवन चन तके अन्य व्हिच नुम्बेर ओफ इद्स नो प्रोब्लेम, बुत इफ योउ अरे प्लयिन्ग अ पर्त अत्लेअस्त दो इत चोन्विन्चिन्ग्ल्य, नो पोइन्त इन पुत्तिन्ग ओन अ मस्क इफ पेओप्ले चन सी योउर रेअल फचे बेहिन्द इत, थेय विल्ल त्र्य तो लूक बेहिन्द ओर पुल्ल ओफ्फ थे मस्क, हुमन नतुरे योउ सी. (ओफ चोउर्से नोत सयिन्ग शेस पुत ओन अ मस्क फोर सुरे, जुस्त इफ इत इस सो) फोर एक्षम्प्ले इन अ मोविए थे अच्तोर प्लय्स थे चरच्तेर हे इस ओन स्च्रीन, नो उसे इफ हे इस प्लयिन्ग हिम्सेल्फ थेरे तू. तके प्रियन्क चोप्र, एवेन इफ शे इस प्लयिन्ग झिल्मिल, कलि, आभा, वे सी ओन्ल्य प्रियन्का थेरे. व्हिले विथ विद्य बलन, वे सी क्रिश्ना, ललिता, विद्या बग्चि, सिल्क, वे दोन्त सी विद्य थेरे, गोतित.. इ सी योउ लिके थिस 'औन्त्य' वोर्द अ लोत ;) बुत व्हत इस थिस औन्त्य मेन्तलित्य, अरेन'त योउ बेइन्ग जुद्गेमेन्तल हेरे, योउ हते गेनेरलिझतिओन व्ह्य दो इत योउर्सेल्फ्फ, एवेन उन्च्लेस इन्दुल्गे इन थेसे थिन्ग्स. इ अम नोत थे ओन्ल्य ओने व्हो सिअद थत तो हेर ओथेर्स हवे अल्सो सैद इत. अन्य्वय्स, हेरेओन विल्ल जुस्त लेत थे गिर्ल बे. इ रेस्पेच्त योउ अन्द दोन्त वन्त तो अर्गुए फुर्थेर अन्द चन्गे थिस ए॑उअतिओन ओवेर ओथेर्स सो लेत्स जुस्त स्तोप हेरे :)

In reply to by नीलमोहर

ओफ्चोउर्से इत दोएस्न्त मके अन्य दिफ्फेरेन्चे, एनिवन चन तके अन्य व्हिच नुम्बेर ओफ इद्स नो प्रोब्लेम, बुत इफ योउ अरे प्लयिन्ग अ पर्त अत्लेअस्त दो इत चोन्विन्चिन्ग्ल्य, नो पोइन्त इन पुत्तिन्ग ओन अ मस्क इफ पेओप्ले चन सी योउर रेअल फचे बेहिन्द इत, थेय विल्ल त्र्य तो लूक बेहिन्द ओर पुल्ल ओफ्फ थे मस्क, हुमन नतुरे योउ सी. (ओफ चोउर्से नोत सयिन्ग शेस पुत ओन अ मस्क फोर सुरे, जुस्त इफ इत इस सो) फोर एक्षम्प्ले इन अ मोविए थे अच्तोर प्लय्स थे चरच्तेर हे इस ओन स्च्रीन, नो उसे इफ हे इस प्लयिन्ग हिम्सेल्फ थेरे तू. तके प्रियन्क चोप्र, एवेन इफ शे इस प्लयिन्ग झिल्मिल, कलि, आभा, वे सी ओन्ल्य प्रियन्का थेरे. व्हिले विथ विद्य बलन, वे सी क्रिश्ना, ललिता, विद्या बग्चि, सिल्क, वे दोन्त सी विद्य थेरे, गोतित..
यौ अरे आगिन फोर्चिंग यौर ओपिनिओन... व्हय द हेल दो यौ एक्ष्पेच्त मी टो दो सोमेथिङ्ग? संपादित सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी टाळावी. सदस्यांना उद्देशून अपशब्द वापरल्यास सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते.

In reply to by अमृता_जोशी

आरं काय टिर टिर चाल्लिया हिथंसा. भांडायचं तर जरा मर्हाटीत भांडाना च्यामाडी तुम्ही सगळे लोक ;).

रोचक संशोधन आहे.

रोचक माहिती. मला लहानपणी वाटायचे की मी विष्णुचा दहावा अवतार आहे.. आणि मी मनात येईल ते करु शकेन मोठेपणी.. पण आयुष्यात बरेच धक्के खाल्ल्यानंतर आता तसं नाही वाटत..;-)

लेख छानच आहे. एक प्रश्न.
सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात.
याचा अर्थ ही स्थिती normal समजली जाते आहे असा घ्यायचा का? आणि अजून एक प्रश्न - याचा अर्थ स्वतःच्या क्षमतेची व्यवस्थित जाणीव असणारे लोक हे abnormal आहेत का?

In reply to by बोका-ए-आझम

पण त्या स्थितीचं सातत्य किंवा वारंवार तशी स्थिती येणे म्ह्णजे प्रॉब्लेम असावा.

In reply to by विजुभाऊ

खंडन नाही हजार टक्के समर्थन. आपण मुर्ख आहोत हे आपल्याला कळणे शक्य नाही अशा अवस्थेतून आपण गेलो हे कसं कळणार आणि कुणी मान्य तरी का करणार?

१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात. विरोधाभास असा आहे की... या लोकांना नावे ठेवताना आपण विसरतो की, आपल्या क्षमतेची पराकाष्ठा करावी (स्ट्रेच द लिमिट्स ऑफ युवर अ‍ॅबिलिटिज्) अशी मन:स्थिती तयार करण्यासाठी "मोटीवेशन प्रोग्रॅम्स"वर कंपन्या (आणि खाजगीत बर्‍याच व्यक्तीही) जगभर अनेक करोडोंनी पैसे दरवर्षी खर्च करतात. किंबहुना, वास्तवातले सत्य असे आहे की... जोपर्यंत आपण आपल्या कुवतीचा पराभव होईपर्यंत तिला ताणत नाही, तोपर्यंत तिच्या पूर्ण क्षमतेचा नक्की अंदाज आपल्याला येणे शक्य नसते. उदा : १. नऊ वेळा अयशस्वी होऊन दहाव्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या उद्योजकाने/विद्यार्थ्याने/संशोधकाने आपल्या क्षमतेवर संशय घेऊन आपले प्रयत्न आठव्या/नवव्या प्रयत्नात सोडून दिले तर त्याला व जगाला त्याचे यश दिसले असते का ? २. बिल गेट्सने आपल्या कंपनीची दरवर्षी १०-२०% टक्के वाढ बघण्यात धन्यता मानली असती तर मायक्रोसॉफ्ट आणि स्वतः बिल कुठे असते ?! Dunning Kruger Effect मनःस्थिती असलेल्या माणसांनीच इतरांना अशक्य किंवा अतर्क्य वाटणारी कामे करून या जगात क्रांतीकारी बदल घडवून आणले आहेत. ते लोक तसेच असतात; फरक फक्त इतरांनी त्यांना समजून घेण्यात आहे... अ) असे लोक अयशस्वी झाले की बहुतांश इतर लोक त्यांची खिल्ली उडवतात, त्यांच्यापासून स्वतःला दूर करतात आणि कालांतराने त्यांना विसरून जातात. आ) मात्र, ते यशस्वी झाले की लोक त्यांच्याशी आपण कसे संबंधीत आहोत हे चढाओढीने सांगतात; त्यांचे कौतूक करताना जीभा थकत नाहीत; त्यांच्या कृती आणि कार्यशैलीवर पुस्तके/डॉक्युमेंटरीज/लेख/भाषणे/इ चे उद्योगधंदे बनवले जातात !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून एक मुद्दा राहिलाच की... या लोकांमध्ये भरपूर उर्जा असते आणि बहुतेकांत ती वापरण्याची तयारी असते. मात्र बर्‍याचदा ती उर्जा चुकीच्या दिशेने आणि/किंवा अनुत्पादक पद्धतीने वापरली जाते. अश्या माणसांना जर उत्तम गुरू (मेंटॉर) अथवा समुपदेशक मिळाला व तो त्यांच्या उर्जेला योग्य दिशेने प्रवाहीत करू शकला तर निदान काही जणांच्या बाबतीत बरेच काही अशक्य/अतर्क्य घडू शकते !