Skip to main content

डनिंग-क्रुगर इफेक्ट

लेखक अमृता_जोशी यांनी बुधवार, 30/03/2016 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात. 'डनिंग-क्रुगर इफेक्ट' या अवस्थेत तुलनेने अकुशल व्यक्ती स्वतःची क्षमता खरोखर आहे त्यापेक्षा जास्त समजतात व वाजवी पेक्षा जास्त स्वाभिमान, आत्मविश्वास बाळगतात. कुठलीही टीका अथवा नकारात्मक अभिप्राय त्यांना अजिबात सहन होत नाही. डनिंग व क्रुगर यांना या अभ्यासाची प्रेरणा मेकऑर्थर व्हीलर नामक एका व्यक्ती पासून मिळाली होती, ज्याने लिंबाचा रस हा अदृश्य शाई सारखा काम करतो व तो सीसीटीवी केमेऱ्यात रेकोर्ड होत नाही अशा गैरसमजापोटी तोंडाला लिंबाचा रस फासून बॅंक लुटण्याचा प्रयत्न केला होता. 'डनिंग-क्रुगर इफेक्ट' या स्थितीत असणारे लोक:
  1. त्यांची अकार्यक्षमता ओळखू शकत नाहीत
  2. त्यांचे अपुरेपण व मर्यादा ओळखू शकत नाहीत.
  3. इतरांच्या कुशलते बद्दल नेहमी नकारात्मकच असतात.
  4. त्या कौशल्याचे पूर्ण ज्ञान आल्यानंतर अथवा योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण अगोदर अज्ञानी होतो हे मान्य करतात.
हा झाला विकीबाबांच्या माहितीचा मराठी अनुवाद आता याची काही उदाहरणे. फेसबुकवर गेल्यानंतर स्वतःचाच फोटो टाकून स्वतःच्या दिसण्याबद्दल स्वतःच स्तुती करणारे लोक पाहिलेत? चित्रपट पाहून आल्यानंतर लगेचच 'My review of XYZ' असे टंकून त्या चित्रपटाचे समीक्षण करणारे लोक पाहिलेत? एखाद्या परीक्षेत अथवा स्पर्धेत काहीच येत नसल्यामुळे अयशस्वी झालेले परंतु लगेचच आइनस्टायीन, बील गेट्स व धीरूभाई अंबानी चे उदाहरण देणारे लोक पाहिलेत? काहीच माहिती नसताना देखील स्वतःचे श्रेष्ठत्व सांगणारे लोक पाहिलेत? 'Love me or hate me but never ignore me' असे किंवा 'maah lyf maah rulez' असे व्हाट्सअप स्टेटस असणारे लोक पाहिलेत? नसतील पहिले तर ही चित्रफीत पहा: मला 'डनिंग-क्रुगर इफेक्ट' च्या John Cleese यांनी केलेल्या व्याख्या सगळ्यात भारी वाटतात. 'people who are too stupid to know how stupid they are' आणि 'people who don't know that they don't know' सेक्स, ड्रायविंग, पोहणे,चेस व टेनिस खेळणे, पालकत्व या गोष्टींमध्ये ही स्थिती सर्वाधिक कॉमन आहे. अमेरिकेत तर जवळपास ९३% लोक स्वतःच्या ड्रायविंग विषयी या मानसिक स्थितीत आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13932
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

In reply to by विजुभाऊ

खंडन नाही हजार टक्के समर्थन. आपण मुर्ख आहोत हे आपल्याला कळणे शक्य नाही अशा अवस्थेतून आपण गेलो हे कसं कळणार आणि कुणी मान्य तरी का करणार?

१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात. विरोधाभास असा आहे की... या लोकांना नावे ठेवताना आपण विसरतो की, आपल्या क्षमतेची पराकाष्ठा करावी (स्ट्रेच द लिमिट्स ऑफ युवर अ‍ॅबिलिटिज्) अशी मन:स्थिती तयार करण्यासाठी "मोटीवेशन प्रोग्रॅम्स"वर कंपन्या (आणि खाजगीत बर्‍याच व्यक्तीही) जगभर अनेक करोडोंनी पैसे दरवर्षी खर्च करतात. किंबहुना, वास्तवातले सत्य असे आहे की... जोपर्यंत आपण आपल्या कुवतीचा पराभव होईपर्यंत तिला ताणत नाही, तोपर्यंत तिच्या पूर्ण क्षमतेचा नक्की अंदाज आपल्याला येणे शक्य नसते. उदा : १. नऊ वेळा अयशस्वी होऊन दहाव्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या उद्योजकाने/विद्यार्थ्याने/संशोधकाने आपल्या क्षमतेवर संशय घेऊन आपले प्रयत्न आठव्या/नवव्या प्रयत्नात सोडून दिले तर त्याला व जगाला त्याचे यश दिसले असते का ? २. बिल गेट्सने आपल्या कंपनीची दरवर्षी १०-२०% टक्के वाढ बघण्यात धन्यता मानली असती तर मायक्रोसॉफ्ट आणि स्वतः बिल कुठे असते ?! Dunning Kruger Effect मनःस्थिती असलेल्या माणसांनीच इतरांना अशक्य किंवा अतर्क्य वाटणारी कामे करून या जगात क्रांतीकारी बदल घडवून आणले आहेत. ते लोक तसेच असतात; फरक फक्त इतरांनी त्यांना समजून घेण्यात आहे... अ) असे लोक अयशस्वी झाले की बहुतांश इतर लोक त्यांची खिल्ली उडवतात, त्यांच्यापासून स्वतःला दूर करतात आणि कालांतराने त्यांना विसरून जातात. आ) मात्र, ते यशस्वी झाले की लोक त्यांच्याशी आपण कसे संबंधीत आहोत हे चढाओढीने सांगतात; त्यांचे कौतूक करताना जीभा थकत नाहीत; त्यांच्या कृती आणि कार्यशैलीवर पुस्तके/डॉक्युमेंटरीज/लेख/भाषणे/इ चे उद्योगधंदे बनवले जातात !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून एक मुद्दा राहिलाच की... या लोकांमध्ये भरपूर उर्जा असते आणि बहुतेकांत ती वापरण्याची तयारी असते. मात्र बर्‍याचदा ती उर्जा चुकीच्या दिशेने आणि/किंवा अनुत्पादक पद्धतीने वापरली जाते. अश्या माणसांना जर उत्तम गुरू (मेंटॉर) अथवा समुपदेशक मिळाला व तो त्यांच्या उर्जेला योग्य दिशेने प्रवाहीत करू शकला तर निदान काही जणांच्या बाबतीत बरेच काही अशक्य/अतर्क्य घडू शकते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आपल्यासर्व प्रतिसादांसाठी स्टॅण्डींग ओवेशन. मान गये. सुंदर मांडलंत.