१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ
पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे.
वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा.
मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून. ;) ) तर कळले की हे बळी मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गेले होते! विदर्भ महाराष्ट्रात यावा म्हणून नाही. मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती जणू, महागुजरात आणि महाराष्ट्र दोघांनाही पाहिजे होती.
केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाडयासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई दयावयास केंद्र सरकार तयार नव्हते. या वेळी घडलेल्या हिंसाचारात १५ माणसे ठार झाली.
पुढे केंद्राने जेव्हा मुंबई केंद्रशासित करायचा निर्णय घेतला तेव्हा पुन्हा उद्रेक झाला. या खेपेला ७६ लोकांचा बळी गेला.
तसेच निवडणुकांचे निकाल पाहिले तर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश फक्त कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र इलाख्यात मिळाले. मराठवाड्यात किंचित आणि विदर्भात अजिबात नाही. म्हणजे लक्षात येईल की, संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत!
या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! मी विदर्भातला आहे त्यामुळे एवढे नक्की सांगू शकतो की आम्हाला मुंबई महाराष्ट्रात असावी की नको याचे सोयरसुतक नाही, आधीही नव्हते, आताही नाही. त्यामुळे मुंबईसाठी झालेल्या आंदोलनाचा संबंध विदर्भाशी जोडून उगाच भावनेला हात घालणाऱ्या पोस्टी टाकण्यात आणि भाषणे करण्यात अर्थ नाही. विदर्भ पूर्वी वेगळा होता, विदर्भाच्या लोकांनी महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीस बळ मिळावे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भासोबत नागपूर करार करून त्यांना सोबत घेण्यात आले. आणि विदर्भ वगळता द्वैभाषिक राज्य मान्य होत नव्हते म्हणून समितीने नव्या द्वैभाषिक राज्यात विदर्भाला घेतले अन्यथा विदर्भ वगळून पण ते मुंबईसह द्वैभाषिक राज्याला तेव्हा तयार होते हे लक्षात घेतले पाहिजे. सगळे लफडे मुंबईपायी झालेत, विदर्भासाठी कुणी गोळ्या खाल्ल्या नाहीत तेव्हा.
अजून एक उदाहरण देता येईल ते आंध्रचे. आंध्र वेगळे व्हावे म्हणून पोट्टी श्रीरामुलु या नेत्याने (खरेखुरे) आमरण उपोषण केले. त्यांच्या बलिदानानंतर जे राज्य अस्तित्वात आले त्यात तेलंगण नव्हते. आताचे रायलासीमा आणि सीमांध्र होते. नंतर तेलंगण आले. आता जेव्हा तेलंगण राज्यासाठी चळवळ सुरु होती तेव्हा कोणीही पोट्टी श्रीरामुलु ह्यांच्या बलिदानाची आठवण करून देत बसले नाहीत. सगळे झगडे हैदराबादसाठी होते. हैदराबाद तेलंगणात नसते तर आंध्रच्या नेत्यांनी परत तेलंगण वेगळे करायला विरोधही केला नसता. आम्ही ना मुंबई मागत आहोत ना पुणे! नागपूरात पण असे काही नाही की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यासाठी गोळ्या खाव्यात! उलट गोंदिया-गडचिरोलीला पोस्टिंग आली की जणू काळ्या पाण्याला पाठवले असे वाटते आणि मंत्रालयात खोके पोचवून ट्रान्सफर करवून घेतात. किती लोक तिकडून इकडे आनंदाने पोस्टींगवर पूर्ण वेळ राहतात? म्हणजे विदर्भावर तुमचे प्रेम उतू चालले आहे असेही नाही! मग वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की एकदम चिडून जाण्यासारखे काय आहे? आपण काहीतरी मोठ्ठे गमावतोय असे का वाटते? विदर्भ हा फक्त तुमच्या इगोला सुखावणारा एक फील गुड फॅक्टर आहे का? की विदर्भ म्हणजे 'प्राइझ्ड पजेशन' आहे तुमचे?
आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे
आप भाई नहीं कहते हैं मियाँ कहते हैं
--मुनव्वर राना
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पूर्णपणे सहमत
२ वर्षांपूर्वी उन्हाळ्यात
विवेकसाहेब निर्मीती पारेषण व
विज नियामक आयोग एक संस्था आहे.
एकदा चंद्रपूरला या आणि वास्तव
विश्वासाचा प्रशन नाही साहेब.
विदर्भ अलग झाला तर छत्तीसगड
सहमत!
लेखकाने
शुद्धिपत्रक
हम्म या न्यायाने
Nation ही संकल्पना लक्षात
काय भाऊ राज्य अन देश ह्यात
लेखकाला इतकेच म्हणायचे आहे की
आराररा
भाऊ की गोली अपना निशाना खुद ढूंड लेती है
लेख आवडला
पण मुद्दा सध्या तो नाहीच्चै
ओके
म्हणूनच मी कंसात पश्चिम
तसं बघाया गेलं तर आमच्या कवठे
हाहा!
घेऊन टाका
कोकण गोव्यात समाविष्ट करा
नाका रे! गोयां आसा तितलें
लेखकांचे मुद्दे सिद्ध करायची
लेखकांचे मुद्दे सिद्ध करायची पश्चिम महाराष्ट्रियन जनतेत जबरी चुरस !
बरोबर राजेहो! तुमी बी
नाही मी प्रॉपर पश्चिम
नाही मी प्रॉपर पश्चिम
नाही मी प्रॉपर पश्चिम
नाही मी प्रॉपर पश्चिम
नाही मी प्रॉपर पश्चिम
पुढं बोला की देवा !!
च्यायला , आता मिपाला माझे
ऑ, आम्हालातर कुंपणावरही
तसे नसेल,विदर्भाच्या वाटयाचा
खाज
मराठी भाषिक 2 राज्ये झाली तर
कर्णाटक च्या
कर्नाटक महाराष्ट्र जो
खरा इतिहास - नानांचा
तुमच्या म्हणन्यानुसार
अहो सातारकर
मग आपण एकाच पार्टीचे की
इतर कोणत्याही
असहमत
त्यावर भावनिक उत्तरे देणे तर अतिशय चुकीचे आहे.
धन्यवाद
चर्चांवर लक्ष ठेऊन असतोच.
श्री गजू तायडे यांच्या शब्दांत