Skip to main content

समर्थाचिया सेवका वक्र पाहे...

लेखक विकास यांनी शुक्रवार, 18/03/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ६ ते ८ महीन्यांमध्ये असहीष्णुता आणि त्याला अनुसरून व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच कसा सद्य भारत सरकारच्या कारभारामुळे होत आहे यावरून माध्यमात कशी आणि कुठल्या कुठल्या कारणाने चर्चा झाली, हे येथे सांगत बसायची गरज आहे असे वाटत नाही... :) हे सर्व चाललेले असताना वास्तवीक तमाम वृत्तपत्रे-माध्यमे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पण कडक टिका करण्यात मागे पडत नव्हती. ही टिका केवळ सरकारवरच नव्हती तर बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानावर देखील तितकीच होती आणि अजूनही होते. काही वेळेस तर ती श्रध्दास्थानापेक्षाही दहशतवाद्यांना शिक्षा दिलेल्या कशा चुकीच्या होत्या, ते कसे बापडे होते असे सांगत सर्वोच्च न्यायालयावर पण अप्रत्यक्ष टिका होती. अनेकांना ती आवडली नव्हती हे वेळोवेळी आलेल्या विविध सामाजिक माध्यमांतील प्रतिक्रीयातून स्पष्ट होत होते. तरी देखील वृत्तपत्रे आणि टिव्ही माध्यमांना त्यांच्या भावनांपेक्षा व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचे वाटले. व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचेच आहे आणि सत्याला धरून जर समाजोपयोगी टिका असली तर ती नेहमीच करावी अशा मताचा मी आहे. म्हणूनच, येथे एक स्पष्ट करू इच्छीतो की जी टिका ही सत्याला धरून असेल, तर्क-"सुसंगत" असेल ती कुणावरही केली असली तरी योग्यच आहे. वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम करणे हे नुसते पोटभरू संपादक नसल्याचे लक्षण आहे, ते समाजातील एका प्रमुख घटकाचे जिवंतपणाचे लक्षण आहे. आज हे सगळे लिहायचे कारण म्हणजे, १७ मार्चच्या लोकसत्तेत आलेला "असंतांचे संत" हा मदर तेरेसा - पोप/कॅथलीक संस्थेवर टिका करणारा अग्रलेख लिहीला गेला. अर्थात हा अग्रलेख देखील "सेक्युलरी समतोल" वृत्तीने लिहीला होता. म्हणजे असे की सुरवातीसच बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर यांना फटकावले होते, अशोकाचा बुद्ध धर्मप्रसार आणि सौदी अरेबियातील वहाबी धर्म वगैरे सर्वांना आणले होते. पण मूळ विषय होता, मदर तेरेसांना बहाल केले जाणारे संतपद आणि प्रामुख्याने टिका होती, ती कॅथलीक संस्थेवर आणि त्यांचा रोख राज्यविस्तारावर कसा असतो या संदर्भात. संतपद देताना चमत्कार कसे बघितले जातात या संदर्भात, वगैरे, वगैरे... ज्यांना सध्याच्या लोकसत्तेच्या अग्रलेखांचा रोख माहीत आहे, त्यांना (सेक्युलरी समतोलपणा असला तरी) सुखद आश्चर्य वाटले... वास्तवीक आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. जे लिहीले होते ते बुद्धीवादी होते आणि ज्यांच्या बुद्धीवादाचा कमीजास्त प्रभाव आहे अशा ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवळकरांचे जे काही परखड विचार मदर तेरेसांबाबत होते त्याचेच ते थोडेफार प्रतिबिंब होते, असे कुठेतरी वाटले. (अर्थात ती कॉपी नव्हती हे देखील खरेच ध्यानात ठेवावेत). पण जो चमत्कार कुठल्याही संतपदाला पोचलेल्या व्यक्तीला उभ्या हयातीत जमला नसता, तो या निमित्ताने झाला! १७ मार्चच्या अग्रलेखावर १८ मार्चला लोकसत्तेच्या छापिल आणि ऑनलाईन आवृत्तीत, "असंतांचे संत - क्षमस्व! प्रिय वाचक!, ‘असंतांचे संत’ या १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. – संपादक" अशी लोकसत्तेच्या वतीने नाही तर संपादकाच्या वतीने माफी मागितली गेली. अग्रलेख तात्काळ अप्रकाशीत केला गेला. २४ तासाच्या आत, बिगरसरकारी, बिनचेहर्‍याच्या, बिन (जाहीर) आवाजाच्या कुठल्यातरी अज्ञात शक्तीने एका वृत्तसंपदाकचे व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच केला. माझ्याकडे आकडेवारी नाही पण माझ्यालेखी सुसंगत तर्क आहे: लोकसत्ता हे मराठी वाचकांचे पत्रक. आजपर्यंत त्यात अनेकदा बहुसंख्यांकांच्या भावना दुखावणारे लिहून आले आहे आणि त्यावर अनेकांनी टिका देखील केली आहे. त्यामुळे हा लेख मागे घेण्याचे कारण बहुसंख्य असणे जरा अवघड वाटते. बहाई आणि बुद्ध धर्माचा उल्लेख आला असला तरी तो संदर्भापुरताच, पक्षि: टिका करणारा उल्लेख नाही. फक्त, त्यांच्याबद्दल पण लिहीले आहे असे for the record ठेवायला म्हणून आलेला आहे. म्हणजे त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रश्न नाही. मग एकूण टक्केवारीच्या किती जण हे कॅथलीक आहेत जे मराठी आहेत आणि जे लोकसत्ता वाचतात आणि ज्यांनी तो अग्रलेख वाचल्याने त्यांच्या भावना दुखावल्या? लोकसत्तेच्या अग्रलेखांमधील प्रत्येक विचाराशी मी सहमत असेनच असे नाही, पण भाषा आणि माहितीसाठी ते नक्कीच चांगले असतात. तरी देखील असे वाटते की या अग्रलेखांना लोकसत्तावाचक मराठी समाज ही एक अपरीहार्य मर्यादा आहे. तरी देखील जर तात्काळ माफी मागावी लागत असेल तर खरेच धक्कादायक आहे. वास्तवीक जे झाले ते दुर्दैवी आहे... एक टिकात्मक अग्रलेख मागे घ्यावा लागला म्हणून नाही, मदर तेरेसा अथवा कॅथलीक्स वरील टिका होती म्हणून तर अजिबातच नाही. तर या प्रकरणात जो काही तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला गेला आहे, त्यासंदर्भात हे अधिक वाटले. कधी काळी समर्थ रामदासांनी, "समर्थाचीया सेवका वक्र पाहे..." असे म्हणले होते. अर्थात या घटनेत समर्थ कोण आहे, तसेच कोणी त्याच्या सेवकाकडे वक्र पाहीले हे स्पष्ट झालेच आहे. पण या निमित्ताने ज्यांना रामदासी वाड्मय आवडते, ज्याचा ते अभ्यास करतात, त्यांनी त्याचाच उपयोग करून, आपल्याला अभ्यास-साधनेतून आलेल्या विद्वत्तेच्या देणगीचे आत्मपरीक्षण करावे नाहीतर..
"जनी हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥ तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडुनि राहे"
असे म्हणायची वेळ येऊ शकते.

वाचने 51721
प्रतिक्रिया 125

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

स्वखुशीने आत्महत्या करण्याच्या केसमधे कोणावर खुनाचा आरोप ठेवतात काय? म्हणजे "संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल..." मध्ये स्वखुशी दिसत असली तर ती आत्महत्येच्या वेळेस लिहीलेल्या कुठल्याही पत्रात दिसली पाहीजे, नाही का? विशेष करून जेंव्हा आत्महत्या करणारी व्यक्ती, "I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That’s pathetic. And that’s why I am doing this." असे म्हणते, तेंव्हा इतरांना दोषी ठरवणे योग्य असते असे म्हणायचे आहे का?

In reply to by विकास

माहित होतं तुम्ही हाच मुद्दा काढाल. पण आता आपण मूळ मुद्द्यावर राहुयात का? संपादकांनी कोणत्या वाचकांच्या भावना दुखावल्या ते तर काही लिहिले नाही. तसे कोणी वाचक दिसतही नाहीत. कुठे काही विरोध प्रकटला नाही. संपादकिय मागे घेण्यामागचं कारण कुठेही स्पष्ट नसतांना स्वखुशीने केलेली आत्महत्या आहे असेच म्हणावे लागेल. ह्यात तुम्ही वेमुला केस घुसडू नका. अवांतरासाठी आम्ही बदनाम आहोत. आम्हालाच बदनाम राहु द्या. जगात आत्महत्या करणारा वेमुला पहिला इसम नाही.

In reply to by तर्राट जोकर

का का? तुम्ही वारीस पठाणच्या वेळेस दुष्काळ काढलात ते बरोबर, आणि यांनी इथे रोहित वेमुला काढला ते चूक काय? असो.. तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या नाहेत असे ठरवून आलो होतो खरे तर, पण अनवधानाने प्रतिसाद टाइप झाल्यावर लक्षात आले.

In reply to by आनन्दा

चालेल ना वेमुला काढा, कन्हया काढा, गांधी, कोणीही कुठेही काहीही काढा, स्वातंत्र्य आहे. पण विषयांतर करतो म्हनून फक्त माझं नाव बदनाम करु नका म्हणजे झालं. बाकी वारीस पठाणच्या निलंबनासाठी जे विधानसभासदस्य एकत्र आले त्यांना जनतेच्या तातडीच्या कामांसाठी असेच एकत्र यायला का जमत नाही असा तो प्रश्न होता, पण तुम्हाला मला टार्गेटच करायचं असेल तर कुठलंही कारण पुरतं.

In reply to by विकास

बाकी सगळे जाऊद्या, मात्र गिरीश कुबेरांनी स्वखुशीने आत्मह्त्या केली आहे, ही मात्र खूपच भावले. जे काही झाले त्याला "आत्महत्या" यापेक्षा समर्पक उपमा असूच शकत नाही. मला असे वाटते की आपण १ दिवस लोकसत्ता न घेऊन काही फरक पडणार नाही, तर पुढचा पूर्ण महिना लोकसत्ता न घेऊन गिरीश कुबेरांना पाठिंबा दिला पाहिजे.

In reply to by विकास

यात कुठल्या बुवाबाबाच्या चमत्कारा पेक्षा लिबरल्स लोकांच्या चमत्कारीक वर्तनाचे पितळ उघडे पडले असे म्हणावे लागत आहे... १००० टक्के हे न समजलेले लोक झोपलेले नसून झोपेचे सोंग घेऊन आहेत, हे केजीतल्या पोरालाही सांगण्याची गरज नाही.

प्रभावशाली व्यक्तीचा धर्म देव इतरानी फॉलो करणे यात गैर काहीच नाही... पेशवाईचा नगारा वाजत होता ता काळात पेसवे पुजतात म्हणुन गणेशभक्त वाढले व अश्टविनायकांचे प्रस्थ वाढले. ..... मुसुलमान फार वैट ! इथे येऊन ते दिल्लीत राजे झाले. ख्रिस्चन फार वैट ! इथे येउन अनाथालये व कुश्टरोगी आश्र्म काढले व नोबेल मिळवले. ( हे सगळे ' तुम्ही ' का नै केले ? ग्लानीर्भवती झाला होता काय? असं मात्र इचारायचं नाही . ) . ... पैशाचं मिंधेपण ! हं ! ते तर सगळीकडेच असते. एक कुठले तरी कुडमुडे पारितोषिक वाघाकडुन घेताना एक बटाटा बोलला होता ... ही लोकशाही आहे की ठोकशाही ? वाघाने पंजा उगार्ताच बटाट्याने शब्द गिळले होते ना ? ........ तसेही कुष्ठरोग आश्रम आता टीबी एड्समध्ये कन्वर्त होत चाललेत कारण कुष्ठर्ग्ण आता कमी होत चाललेत. त्यामुळे हिंदु संघटनानीही आता टीबी एड्सचे आस्रम खोलावेत व २०५० चे नोबेल घेण्याचे टार्गेट ठेवावे.

In reply to by hmangeshrao

मिसळपाव.कॉम वर आपले स्वागत आहे.

In reply to by विकास

कोदलानीबैना सध्या तसेही काही काम नाही. त्याना एखादा आश्रम काढुन दिल्यास त्यांचे , रुग्नांचे व हिंदु धर्माचे भले होइइल. २०५० चे नोबेल घेण्यास शुभेच्छा !

In reply to by मितभाषी

बाळासाहेबांच्यआ हस्ते पुलना एक पुरस्कार मिळाला होता. तो स्वीकारुन लगेच पुलं बोलले होते के हे सरकार लोकशाही आह की ठोकशाहीचे ? ठाकरेनी फटकारले होते ... आमच्यचकडुन पुरस्कार घेउन आम्हालाच बोलता का ?

In reply to by मृत्युन्जय

सिम्बोलिक हो .. बाघोबा आणि बटाट्याची चाळ नावे लिहिणे टाळायचे होते म्हणुन लिहिले होत्व. पण घटना व त्या बातम्या जगजाहिर आहेत म्हणुन नावे लिहिण्यात काही प्रॉब्लेम नसावा

तर सदर प्रकरण 'असहिष्णुता' कॅटॅगरीत मोडत नाहि, त्यामुळे त्याचा निषेध वगैरे करण्याचं काहि कारण नाहि. हायबर्नेटमोड मधे वावरणार्‍या मिपाकरांना चार शब्द वकिली थाटात भिरकावयाला मिळाले. काहिंनी मुख्य मुद्दे बाजुला फेकत आपले जुनेच दळण कांडण उकरुन काढले. काहि नवसदस्यांनी आपण जुनेच असल्याचे पुरावे दिले... एव्हढी उपलब्धी काहि कमि नाहि.

ऑल इंडिआ बकचोद (AIB) नामक ग्रुपने त्यांच्या एका कार्यक्रमात ख्रिस्ती धर्माची यथेच्छ टवाळी केली होती. आरडाओरडा झाला. सुरुवातीला माफी अजिबात मागणार नाही अशी भूमिका घेतली त्यांनी. पण नंतर काय झालं माहिती नाही. दोन दिवसांनी मुंबैच्या एका चर्च अधिकार्‍याची प्रतेक्ष भेट घेऊन माफी मागितली. त्याचा फोटोदेखील प्रसिद्ध झाला.

या घटनेतुन काही गोष्टी सिद्ध होतातः १. देशातली असहिष्णूता वाढत चालली आहे आणि त्यासाठी सध्याचे सरकार अथवा हिंदु जनता जबाबदार आहे असा जो कांगावा केला जात आहे तो धादांत खोटा आहे.. २. सहिष्णुता फक्त हिंदुंमध्येच असली पाहिजे. इतर धर्मीयांना हा नियम लागू नाही, ३. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे थोतांड मांडणारे प्रेस्टिट्युट्स सिलेक्टिव्ह गोष्टींकडे बरोबर काणा डोळा करतात. ४. भावना फक्त हिंदोतेर लोकांना आहे. हिंदु लोकांना कुठल्याही धार्मिक / सामाजिक भावना अथवा जाणीवा असता कामा नये. ५. अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त हिंदुंविषयी गरळ ओ़कण्यासाठी आहे. ६. हिंदु वगळता इतर सर्व धर्मांमध्ये चमत्कार होतात. हिंदु धर्मातील अश्या गोष्टींवर मात्र जळाजळीत टीका केली जाइल. ७. कोणीही यावे आणि हिंदुंना मारुन जावे. एक्खाद्या राजकीय पक्षाने त्याविरुद्ध आवाज उठवला की ते "अतिरेकी " आणि असहिष्णू ठरावेत. इतर धर्मीयांचा चुकांवर कुणी बोट ठेवले तर काय होते ते दिसलेच. ८. गिरीश कुबेर पक्के दुतोंडी आणी ढोंगी आहेत. त्याची शिरजोरी फक्त सात्विक संताप येणार्‍या लोकांविरुद्धच. असे कोणी नरडे दाबले की *गणाला पाय लावुन पळत सुटतात.

"असंतांचे संत" एक उत्तम लेख होता. तो मागे घेण्याचे पाउल निश्चितच पळपुटेपणाचे वाटले. त्यातही धागालेखकाला रामदेवबाबा व श्रीश्रींचा छोटासा उल्लेख खटकला.. कमाल आहे!!

In reply to by बाळ सप्रे

त्यातही धागालेखकाला रामदेवबाबा व श्रीश्रींचा छोटासा उल्लेख खटकला.. त्यात मी, अग्रलेखात अनावश्यक असलेला बुद्ध आणि वहाबी धर्माच्या उल्लेखांबद्दल पण लिहीले आहे. पण कदाचीत तुम्हाला ते दिसले नसावे. असो.

In reply to by विकास

अनावश्यक असलेला बुद्ध आणि वहाबी धर्माच्या उल्लेखांबद्दल
इतर धर्मांचा उल्लेख अनावश्यक अजिबात नव्हता.. राजसत्तेला लोंबकळणारी धर्मांची दुकानदारी असा विषय असल्याने सर्व धर्मांना सारखेच फटकारणे योग्यच होते या निमित्ताने.. बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !!

In reply to by बाळ सप्रे

बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !! "हिंदूविरोध" हा तुम्हाला दिसला. मला नाही. नाहीतर वहाबीबद्दल लिहीले नसते आणि लिहीलेले तुम्हाला दिसले असते.

In reply to by विकास

हिंदूविरोध या प्रकरणात नाही म्हणत आहे.. इतर बर्‍याच ठि़काणच्या आक्षेपाबद्दल आहे ते.. बाकी मला वहाबी न दिसण्याचा काही प्रश्नच नाही.. मला कुठल्याही धर्माविषयी अजिबात आत्मीयता नाही.. सर्व धर्म थोड्याबहुत फरकाने एकाच माळेचे मणी..

In reply to by बाळ सप्रे

बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !! >> अचूक पकडलंय सप्रेसाहेब. उदा. 'होळीला पाणी वाचवा' म्हणणे, प्लास्टरऑफपॅरिसच्या गणपतीला विरोध, दिवाळीचे फटाकेविरोध, इत्यादी, हे हिंदूसणांविरुद्धचे कारस्थान आहे असे म्हटले जाते. ;-)

In reply to by तर्राट जोकर

तसं नाही काही... पण स्वतः काय करावे हे पहाण्याऐवजी इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना! उगाच कशाला असहीष्णुता वाढवायची! बरोब्बर की नाही?

In reply to by तर्राट जोकर

इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना! अजूनही समजले नसेल तर मी माझे हे गीतापठण थांबवतो.

In reply to by विकास

इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना!
जे खटकतय ते सांगणं हा व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला नव्हे. कोणी पाणी वाचवण्यासाठी कींवा नदी प्रदूषण थांबवण्यासाठी होळीच्या कार्यक्रमावर किंवा गणपती विसर्जनावर हल्ला वगैरे केल्याचे ऐकिवात नाही .. आवाहन करण्यात काही चूक नाही. ज्यांना पटेल त्यांनी करावं , नाही ते करतातच आहे आपापल्या मनासारखं .. असो.. खूप अवांतर व्हायला लागलय ..

In reply to by विकास

नाही ते समजले हो. पण माझ्या प्रतिसादातल्या कोणत्या मुद्द्याबद्दल तुम्हाला ही गीता सांगावी वाटली ते कळले नाही. ह्यातले इतर कोण आहेत ते स्पष्ट केलेत तर मजसारख्याला समजेल तरी. बाकी, मिसळपाव चर्चांमधे उच्च अलंकारिक भाषेत एखाद्यास गाढव म्हणणे सर्वसंमत असावे. तेच आम्ही सरळ सरळ म्हटले की लोक पिसाळतात. ;-)

एच्चमंगेशराव, १. >> ( हे सगळे ' तुम्ही ' का नै केले ? ग्लानीर्भवती झाला होता काय? असं मात्र इचारायचं नाही . ) अगदी बरोबर बोललात पहा. आता हिंदू जागा होऊ लागलाय. नेमकं तेच तुमचं दुखणं आहे. वेलकम टू मिपा. २. >> २०५० चे नोबेल घेण्याचे टार्गेट ठेवावे. जगाचे उकिरडे फुंकून पारितोषिकं मिळवायची वेळ अजूनतरी हिंदूंवर आलेली नाहीये. सुदैवाने वा दुर्दैवाने जे काही असेल ते. तरीपण तुमच्या सल्ल्याबद्दल आभार. आ.न., -गा.पै. जाताजाता : एच्चमंगेशराव हे बटाट्याच्या पुस्तकातलं नाव घेतांना तुम्हाला अजिबात लाज वाटली नसेल.

In reply to by पैसा

और का? बाकी ह्या व्यक्तीचे इतके आयडी आले आणि ब्यान झाले. काय करतो काय हा असे ब्यान होण्यासारखे?

माघार जरी चुकीचं पाउल असलं तरी त्यानिमित्ताने हा लेख जास्त लोकांपर्यंत पोहोचला हे मात्र चांगलं झालं !!

In reply to by बाळ सप्रे

सहमत. त्याच बरोबर, यात एरवी व्यक्ती/विचार स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे आणि अंधश्रद्धेच्या विरोधात विज्ञानवादी आवाज उठवणारे एकंदरीतच गप्प बसलेले पाहून आश्चर्य वाटले नाही.

In reply to by विकास

चॅनलवर उहापोह झाला नाही वा ट्वीटरवर ट्रेंड झालं नाही म्हणजे सगळ्यांना ही माघार घेणं पटलयं असा सोयीस्कर निष्कर्ष काढायचीही गरज नाही.. :-)

In reply to by बाळ सप्रे

, यात एरवी व्यक्ती/विचार स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे आणि अंधश्रद्धेच्या विरोधात विज्ञानवादी आवाज
विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या अस्मादिकांनी या काथ्याकूटाला सर्वप्रथम प्रतिसाद देऊन लोकसत्ताचा निषेध केला आहे. या वेळी केतकर आठवले. अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाबाबत अग्रलेख लिहिल्यावर त्यांना घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न झाला तरीही त्यांनी अग्रलेख मागे घेतला नाही. कुबेर यांची मात्र या सर्व प्रसंगात चांगलीच शोभा झाली आहे.

In reply to by आजानुकर्ण

विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या अस्मादिकांनी या काथ्याकूटाला सर्वप्रथम प्रतिसाद देऊन लोकसत्ताचा निषेध केला आहे. पूर्ण सहमत. आपण निषेध केलात याचे चांगल्या अर्थाने आश्चर्य वाटले नाही. वास्तवीक, लेख लिहीताना हा मुद्दा डोक्यात पण नव्हता. मात्र काही प्रतिसाद ज्या पद्धतीने येऊ लागले त्यामुळे असे नक्कीच वाटू लागले. असो. अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाबाबत अग्रलेख लिहिल्यावर त्यांना घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न झाला तरीही त्यांनी अग्रलेख मागे घेतला नाही. खरे आहे. या वरून मला विनोद मेहतांची आठवण झाली. त्यांनी The Independent म्हणून एक नियतकालीक चालू केले होते. ज्या प्रमाणे आठवते त्याप्रमाणे ते अतिशय प्रोफेशनल होते. टाईम्स ला वगैरे सहज हरवू शकले असते. ते मुंबईतच चालू झाले होते, सुरवातीस ते मोफत वाटायचे आणि नंतर ते मुंबईतच बंद पडले.. या नियतकालीकात, मेहतांनी अचानक एका लेखात शिवाजी आणि यशवंतराव चव्हाणांवर वक्तव्य केले. शिवाजीवरील आठवत नाही. पण यशवंतरावांना त्यांनी मला वाटते सीआयएचे हस्तक ठरवले होते. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता. महाराष्ट्रातील तमाम पक्ष एकत्र येऊन विरोधात बोलले होते. मला वाटते पवार मुख्यमंत्री असावेत तेंव्हा पण ते पण अर्थातच यावर आक्षेप घेण्यात पुढे होते. विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आला. त्याचे काय झाले ते आठवत नाही. पण त्यांनी, "जर-तर"च्या भाषेत मोघम माफी मागितली होती. म्हणजे आत्ता कसे, "वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो...." असे स्पष्ट म्हणले आहे. त्याउलट, तेंव्हा "जर वाचकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल..." अशा अर्थाची माफी (म्हणजे, मी चुकलो वगैरे नाही) मागितली होती. तसेच अंतुलेंचे प्रकरण जेंव्हा बाहेर आले तेंव्हा, "अंतुलेंच्या साडूच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी, सिद्धीविनायका तूच सिद्ध हो" असा रविवारचा दृष्टीक्षेप लिहून माधव गडकरींनी हक्कभंग प्रस्ताव ओढवून घेतला होता. अर्थात पुढे काय झाले ते आठवत नाही. पण गडकरींवर कारवाई झाल्याचे ऐकीवात तरी नाही. पण या दोन्ही गोष्टी राजकीय होत्या... वर चर्चाप्रस्तावात म्हणल्याप्रमाणे, म.टा.चे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवळकर यांचा एक मदर तेरेसांवर ताशेरे ओढणारा लेख वाचल्याचे आठवते. त्यात, त्यांची एक आठवण देखील होती...(मी आता आठवणीतून लिहीत आहे) एकदा ते आणि मदर तेरेसा एकाच विमानात एकाच लाईन (रो मध्ये) बसले होते. संपुर्ण विमानातले सगळे जण या बाईंच्या पाया पाडून गेले. तळवळकरांना त्यांच्याबद्दल राग होता कारण त्यांचे काम प्रामाणिक वाटत नव्हते. शिवाय असले नमस्कार करण्यात इंटरेस्ट नसल्याने, ते करायला गेले नाहीत. थोड्यावेळाने फ्लाईट अटेंडंटकडून त्यांना एक चिठ्ठी मिळाली. मदर तेरेसांनी त्यात "गॉड ब्लेस यू" अथवा तत्सम आशिर्वादपर संदेश दिला होता. अर्थातच त्यात गर्भितपणे, "तू मला नमस्कार करायला आला नाहीस" अशा अर्थाचे निरीक्षण देखील केले होते असे तळवळकरांच्य लक्षात आले. वास्तवीक त्यांचा हा लेख वाचेपर्यंत इतर कुठल्याही तत्कालीन व्यक्तीप्रमाणे, मदर तेरेसांबद्दल माझे मत निगेटीव्ह नव्हते. पण तळवळकर म्हणतात म्हणल्यावर लक्ष गेले आणि नंतर कधीकाळी न्यूयॉर्क टाईम्समधे देखील तसेच नकारात्मक लेख वाचल्यावर खात्री पटली... असो.

In reply to by विकास

या नियतकालीकात, मेहतांनी अचानक एका लेखात शिवाजी आणि यशवंतराव चव्हाणांवर वक्तव्य केले. शिवाजीवरील आठवत नाही. पण यशवंतरावांना त्यांनी मला वाटते सीआयएचे हस्तक ठरवले होते. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता.
अमेरिकन पत्रकार सेमूर हर्श (Seymour Hersh) यांनी १९८३ मध्ये The Price of Power: Kissinger in the Nixon White House हे एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी मोरारजी देसाई हे इंदिरा गांधींच्या सुरवातीच्या काळात सीआयचे हस्तक होते असा आरोप केला होता. हर्श यांचा असा आरोप होता की जॉन्सन व निक्सन अमेरिकेचे अध्यक्ष असण्याच्या काळात मोरारजी देसाईंनी भारताचे परराष्ट्र धोरण व स्थानिक धोरणाची महत्त्वाची माहिती सीआयएला २०००० डॉलर्स (तत्कालीन ३.४० लाख रूपये) च्या बदल्यात दिली होती. त्यामुळे मोरारजी देसाईंनी सेमूर हर्श विरूद्ध अमेरिकन न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. मोराराजी देसाई हेच मंत्रीमंडळातील हेर होते हे सेमूर हर्श यांना सिद्ध करता आले नाही. परंतु त्या आरोपामुळे मोरारजींची बदनामी झाली आहे हे मोरारजींच्या वकीलाला सिद्ध करता आले नाही व त्यामुळे तो खटला मोरारजी देसाई हरले. नतर १९८९ च्या उत्तरार्धात टाईम्स गटाच्या द इंडिपेंडंट या नवीन इंग्लिश दैनिकात पहिल्या पानावर मोठी बातमी देऊन विनोद मेहतांनी असा आरोप केला होता की सेमूर हर्श यांच्या पुस्तकात उल्लेख केलेला केंद्रीय मंत्रीमंडळातील सीआयए चा हेर हे मोरारजी देसाई नसून यशवंतराव चव्हाण होते. हा आरोप प्रसिद्ध झाल्यावर महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली. मुंबईत व इतरत्र मोर्चे निघाले. आपले आरोप सिद्ध करण्यासाठी विनोद मेहतांना कोणतेही पुरावे देता आले नाहीत व शेवटी त्यांना माफी मागून आरोप मागे घ्यावे लागले. काही काळातच हे दैनिकही बंद झाले.

अह्हा हितेश दरेकर उर्फ मग्गा वापिस आयेला हय... काय जंत बर झालेत का?

In reply to by होबासराव

अख्ख्या देशालाच जंत झालेत. २०१४ पासुन

In reply to by मदनबाण

आमचे एक डी एच ओ ( म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ... म्हाणजे जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रातील डोक्टरांचे बॉस , ते स्वतः माळकरी होते.) आम्हाला सतत सांगायचे... भारत ही संतांची व जंतांची भूमी आहे. ( पेशंटला ताप , खोकला , डायरिया , अ‍ॅनेमिया , भूक नसणे , व्हिट्यामिन कमतरता , अ‍ॅलर्जी .... काहीही असले तरी जंताना विसरू नका. )

उठ सुठ केंद्रीय सरकारवर टीका करणाऱ्यांना मोदींचा काही पर्याय दिसतो आहे का,म्हणजे कोणती पार्टी हि मोदींपेक्षा चांगला कारभार देऊ शकेल,मुसळमान आणि बाकीचे सर्व वेमुला किंवा कन्हैय्या पंथाचे अल्पसंख्याक हे न भिता राहू शकतील,आर्थिक प्रगती हि सुसाट होईल,भ्रष्टाचार होणार नाही,पुरस्कार वापसी हि होणार नाही (आता ह्या उपटसुभं लेखकाना त्यांचे खाऊ सरकार असल्यावर पुरस्कार वापसी ची गरज काय)fti च्या विद्यार्थ्यांना आंदोलनाची गरज भासणार नाही,jnu ला हिंदुस्थान मुर्दाबाद वैगरे घोषणा दिल्या म्हणून कोर्ट कचेरीचे भय राहणार नाही, ओवेसी ला भारत माता कि जय म्हणायची गरज भासणार नाही,हिकडे राणे पुत्राला मराठ्यांचा नेता म्हणून स्थापित होता येईल,भुजबळ बाहेर येतील,तिकडे मालदा मधल्या निर्दोष मुस्लिमांना पोलिसांवर हल्ला करण्याचे भय राहणार नाही।तिस्ता ,पाटकर ह्या फोर्ड चा पैसा विना भय घेऊ शकतील,ग्रीन पीस हि संघटना पर्यावरण हाणीचे प्रकल्पाला विदेशी पैशाने विरोध करू शकतील।केजरिवाल ,सरदेसाई ,बरखा ह्यांना मोदींच्या नावाने कंठशोष करायची गरज भासणार नाही,है कोई

In reply to by श्री गावसेना प्रमुख

बहुतेक लोकांना मोदीचाय व्हीजनबद्दल शंका नसावी. हे वाचाळवीर, भक्त, मनुवादी यांच्यामुळे जातीय तेढ वाढत आहे.

विचारस्वातंत्र्याच्या दडपशाहीचे अजून एक जुने उदाहरण आहे. पण ही दडपशाही पुरोगामी विचारवंत समजल्या जाणार्‍यांनीच केली असल्याने त्याला दडपशाही म्हणता येणार नाही. १९८८ किंवा १९८९ मध्ये 'माणूस' नावाच्या साप्ताहिकात (त्यावेळी संपादक कोण होते ते आठवत नाही) बाळ गांगल यांनी 'महात्मा फुले व त्यांचा सत्यशोधक समाज' अशा शीर्षकाचा एक टीकात्मक लेख लिहिला होता. तो लेख प्रसिद्ध झाल्यावर प्रचंड वादळ उठले. ब्राह्मण संपादक असलेल्या सदाशिव पेठेतून प्रसिद्ध होणार्‍या साप्ताहिकात ब्राह्मण लेखकाने बहुजन समाजाच्या नेत्यांवर लिहिलेल्या टीकात्मक लेखाने एकदम जातीयवादी धुरळा उडाला. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. विधानसभेत या लेखावर चर्चा होऊन कडक टीका करण्यात आली. पुण्यातील तत्कालीन महापौर (बहुतेक काकडे असावेत) आपल्या गाडीतून ४-५ जणांना घेऊन साप्ताहिकाच्या कार्यालयावर दगडफेक करून काचा वगैरे फोडल्याचे वृत्तपत्रातून आले होते. नंतर पुढे काय झाले ते आठवत नाही. माणूस साप्ताहिक नंतर केव्हा तरी बंद झाल्याचे आठवते. छगन भुजबळांनी १९९१ मध्ये शिवसेना सोडली तेव्हा हे एक कारण वापरले होते. त्यांनी बाळासाहेब ठाकर्‍यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात "तुम्ही इतर मागासवर्गियांना राखीव जागा देणार्‍या मंडल आयोगाला विरोध केला, महात्मा फुल्यांची बदनामी करणार्‍या बाळ गांगल यांना पाठीशी घातले" असे आरोप इतर आरोपांबरोबर केले होते.

महात्मा फुले नी पुण्यात वर्तमानपत्र काढल्यास प्रेस जाळून टाकू अशा जाहीर धमक्या दिल्या होत्या. म्हणून त्यांनी ते काम मुंबईतुन करावे लागले. हे सोयीस्करपणे विसरले जाते.