✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

समर्थाचिया सेवका वक्र पाहे...

व
विकास यांनी
Fri, 03/18/2016 - 20:20  ·  लेख
लेख
गेल्या ६ ते ८ महीन्यांमध्ये असहीष्णुता आणि त्याला अनुसरून व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच कसा सद्य भारत सरकारच्या कारभारामुळे होत आहे यावरून माध्यमात कशी आणि कुठल्या कुठल्या कारणाने चर्चा झाली, हे येथे सांगत बसायची गरज आहे असे वाटत नाही... :) हे सर्व चाललेले असताना वास्तवीक तमाम वृत्तपत्रे-माध्यमे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पण कडक टिका करण्यात मागे पडत नव्हती. ही टिका केवळ सरकारवरच नव्हती तर बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानावर देखील तितकीच होती आणि अजूनही होते. काही वेळेस तर ती श्रध्दास्थानापेक्षाही दहशतवाद्यांना शिक्षा दिलेल्या कशा चुकीच्या होत्या, ते कसे बापडे होते असे सांगत सर्वोच्च न्यायालयावर पण अप्रत्यक्ष टिका होती. अनेकांना ती आवडली नव्हती हे वेळोवेळी आलेल्या विविध सामाजिक माध्यमांतील प्रतिक्रीयातून स्पष्ट होत होते. तरी देखील वृत्तपत्रे आणि टिव्ही माध्यमांना त्यांच्या भावनांपेक्षा व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचे वाटले. व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचेच आहे आणि सत्याला धरून जर समाजोपयोगी टिका असली तर ती नेहमीच करावी अशा मताचा मी आहे. म्हणूनच, येथे एक स्पष्ट करू इच्छीतो की जी टिका ही सत्याला धरून असेल, तर्क-"सुसंगत" असेल ती कुणावरही केली असली तरी योग्यच आहे. वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम करणे हे नुसते पोटभरू संपादक नसल्याचे लक्षण आहे, ते समाजातील एका प्रमुख घटकाचे जिवंतपणाचे लक्षण आहे. आज हे सगळे लिहायचे कारण म्हणजे, १७ मार्चच्या लोकसत्तेत आलेला "असंतांचे संत" हा मदर तेरेसा - पोप/कॅथलीक संस्थेवर टिका करणारा अग्रलेख लिहीला गेला. अर्थात हा अग्रलेख देखील "सेक्युलरी समतोल" वृत्तीने लिहीला होता. म्हणजे असे की सुरवातीसच बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर यांना फटकावले होते, अशोकाचा बुद्ध धर्मप्रसार आणि सौदी अरेबियातील वहाबी धर्म वगैरे सर्वांना आणले होते. पण मूळ विषय होता, मदर तेरेसांना बहाल केले जाणारे संतपद आणि प्रामुख्याने टिका होती, ती कॅथलीक संस्थेवर आणि त्यांचा रोख राज्यविस्तारावर कसा असतो या संदर्भात. संतपद देताना चमत्कार कसे बघितले जातात या संदर्भात, वगैरे, वगैरे... ज्यांना सध्याच्या लोकसत्तेच्या अग्रलेखांचा रोख माहीत आहे, त्यांना (सेक्युलरी समतोलपणा असला तरी) सुखद आश्चर्य वाटले... वास्तवीक आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. जे लिहीले होते ते बुद्धीवादी होते आणि ज्यांच्या बुद्धीवादाचा कमीजास्त प्रभाव आहे अशा ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवळकरांचे जे काही परखड विचार मदर तेरेसांबाबत होते त्याचेच ते थोडेफार प्रतिबिंब होते, असे कुठेतरी वाटले. (अर्थात ती कॉपी नव्हती हे देखील खरेच ध्यानात ठेवावेत). पण जो चमत्कार कुठल्याही संतपदाला पोचलेल्या व्यक्तीला उभ्या हयातीत जमला नसता, तो या निमित्ताने झाला! १७ मार्चच्या अग्रलेखावर १८ मार्चला लोकसत्तेच्या छापिल आणि ऑनलाईन आवृत्तीत, "असंतांचे संत - क्षमस्व! प्रिय वाचक!, ‘असंतांचे संत’ या १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. – संपादक" अशी लोकसत्तेच्या वतीने नाही तर संपादकाच्या वतीने माफी मागितली गेली. अग्रलेख तात्काळ अप्रकाशीत केला गेला. २४ तासाच्या आत, बिगरसरकारी, बिनचेहर्‍याच्या, बिन (जाहीर) आवाजाच्या कुठल्यातरी अज्ञात शक्तीने एका वृत्तसंपदाकचे व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच केला. माझ्याकडे आकडेवारी नाही पण माझ्यालेखी सुसंगत तर्क आहे: लोकसत्ता हे मराठी वाचकांचे पत्रक. आजपर्यंत त्यात अनेकदा बहुसंख्यांकांच्या भावना दुखावणारे लिहून आले आहे आणि त्यावर अनेकांनी टिका देखील केली आहे. त्यामुळे हा लेख मागे घेण्याचे कारण बहुसंख्य असणे जरा अवघड वाटते. बहाई आणि बुद्ध धर्माचा उल्लेख आला असला तरी तो संदर्भापुरताच, पक्षि: टिका करणारा उल्लेख नाही. फक्त, त्यांच्याबद्दल पण लिहीले आहे असे for the record ठेवायला म्हणून आलेला आहे. म्हणजे त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रश्न नाही. मग एकूण टक्केवारीच्या किती जण हे कॅथलीक आहेत जे मराठी आहेत आणि जे लोकसत्ता वाचतात आणि ज्यांनी तो अग्रलेख वाचल्याने त्यांच्या भावना दुखावल्या? लोकसत्तेच्या अग्रलेखांमधील प्रत्येक विचाराशी मी सहमत असेनच असे नाही, पण भाषा आणि माहितीसाठी ते नक्कीच चांगले असतात. तरी देखील असे वाटते की या अग्रलेखांना लोकसत्तावाचक मराठी समाज ही एक अपरीहार्य मर्यादा आहे. तरी देखील जर तात्काळ माफी मागावी लागत असेल तर खरेच धक्कादायक आहे. वास्तवीक जे झाले ते दुर्दैवी आहे... एक टिकात्मक अग्रलेख मागे घ्यावा लागला म्हणून नाही, मदर तेरेसा अथवा कॅथलीक्स वरील टिका होती म्हणून तर अजिबातच नाही. तर या प्रकरणात जो काही तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला गेला आहे, त्यासंदर्भात हे अधिक वाटले. कधी काळी समर्थ रामदासांनी, "समर्थाचीया सेवका वक्र पाहे..." असे म्हणले होते. अर्थात या घटनेत समर्थ कोण आहे, तसेच कोणी त्याच्या सेवकाकडे वक्र पाहीले हे स्पष्ट झालेच आहे. पण या निमित्ताने ज्यांना रामदासी वाड्मय आवडते, ज्याचा ते अभ्यास करतात, त्यांनी त्याचाच उपयोग करून, आपल्याला अभ्यास-साधनेतून आलेल्या विद्वत्तेच्या देणगीचे आत्मपरीक्षण करावे नाहीतर..
"जनी हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥ तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडुनि राहे"
असे म्हणायची वेळ येऊ शकते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51616 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

+१

आजानुकर्ण
Fri, 03/18/2016 - 20:35 नवीन
लोकसत्ता आणि कुबेर यांनी अग्रलेख मागे घेेऊन अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह पाऊल उचलले आहे. धर्मांध लोकांना अशा कृतीमुळे निश्चितच बळ मिळेल आणि भावना दुखावण्याची जोरदार साथ येईल.
  • Log in or register to post comments

+१

ऋषिकेश
Fri, 03/25/2016 - 11:00 नवीन
+१ खरेतर अग्रलेख मागे घेण्यापेक्षा कुबेरांनी राजीनामा द्यायला हवा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

अरेरे... श्री.गिरिष कुबेर आणि

मदनबाण
Fri, 03/18/2016 - 20:56 नवीन
अरेरे... श्री.गिरिष कुबेर आणि लोकसत्ता यांच्याकडुन हे असे अघटित कसे घडले ? नक्की कुणाच्या भावना दुखावल्या ? बाकी लोकसत्ते मधील मदर तेरेसा यांच्या सेवाकार्यामागे धर्मांतरणाचा उद्देश- मोहन भागवत ही बातमी वाचल्यावर अनेकांना पोट शूळ उद्भवल्याचे समजले आहे ! ;) जाता जाता :- मदर तेरेसा मॄत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला देखील धर्मांतरीत करायच्या असे कुठेतरी वाचनात किंवा ऐकणात आल्याचे वाटते, हे खरे होते का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Obama’s counterproductive Pakistan policy
  • Log in or register to post comments

जाता जाता :- मदर तेरेसा

मदनबाण
Fri, 03/18/2016 - 21:04 नवीन
जाता जाता :- मदर तेरेसा मॄत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला देखील धर्मांतरीत करायच्या असे कुठेतरी वाचनात किंवा ऐकणात आल्याचे वाटते, हे खरे होते का ? संदर्भ मिळाला ! तो देखील लोकसत्ते मधलाच ! धर्मा म्हणू नये आपुला आज जगात सर्वात वेगाने वाढणारा कोणता धर्मगट असेल तर तो पेंटाकोस्टल ख्रिश्चन हा आहे. जास्तीत जास्त अन्य धर्मीयांना ख्रिस्ताच्या पायाशी आणून त्यांचे धर्मातर घडवणे हे या पंथाचे जीवितकार्य आहे. या पंथीयांच्या मागे राजसत्ता नसती तर तिचा इतका प्रसार झाला असता काय? समाजसेवेसाठी म्हणून गौरवल्या जाणाऱ्या मदर तेरेसा या अगदी मरणासन्न असलेल्या व्यक्तीचेही धर्मातर करीत, हा इतिहास आहे. लोकसत्ता यांनी हा लेख देखील काढुन टाकुन टाकावे ! कशाला डेटा हवा असा भावना दुखावणारा "डेटा" त्यांच्या संकेस्थळावर ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Obama’s counterproductive Pakistan policy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

वेग़ळा उद्देश

विकास
Fri, 03/18/2016 - 22:16 नवीन
मदर तेरेसांबद्दल आपण मांडलेले मुद्दे मी आधी देखील विविध विचारांच्या लोकांकडून वाचले आहेत. त्यामुळे त्या संदर्भात सहमत असलो तरी हे लिहीताना माझा उद्देश किंचीत वेगळा होता... येथे एका संपादकाचे हात इतके बांधण्यासारखे काय झाले आहे? आणि हो या संपादकाचे अनेक विचार हे मला दिशाभूल करणारे वाटले आहेत, तरी देखील हेच मत आहे. अग्रलेखात देशाचे तुकडे करण्याची भाषा नव्हती की कुठल्याही धर्माच्या सामान्य जनांवर अत्याचार होईल अशा पध्दतीची प्रक्षोभक भाषा नव्हती. तरी देखील, ज्या इंडीयन एक्सप्रेस वृत्तसमुहाने एकेकाळी आणिबाणीच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला, त्या वृत्तसमुहातील एका संपादकाची इतकी मुस्कटदाबी हा समुहच करतो? हे काही पटले नाही. येथे मराठी ऐवजी इतर कुठल्या भाषेतले असते तरी असेच मत असते पण येथे मराठीत झाल्याने आपण सगळे ते वाचू शकतो आणि त्या अर्थाने लोकसत्तेचा संबंध आहे. आणि हो , असाच लेख जर कुठल्यातरी तशाच भोंदू पण हिंदू धर्मिय व्यक्तीवर लिहीला गेला असता आणि त्याबद्दल माफी मागायला लावली असती, तर ते देखील तितकेच निषेधार्ह असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

विकासराव आपल्या लेखनाचा

मदनबाण
Sat, 03/19/2016 - 09:40 नवीन
विकासराव आपल्या लेखनाचा उद्देश अर्थातच समजला आहे... जबरदस्तीने शेपुट घालायला लावणे असे म्हणता येईल ! ज्या इंडीयन एक्सप्रेस वृत्तसमुहाने एकेकाळी आणिबाणीच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला, त्या वृत्तसमुहातील एका संपादकाची इतकी मुस्कटदाबी हा समुहच करतो? हे काही पटले नाही. खरयं... यावरुन मुस्कटदाबी कोणत्या थरापर्यंत गेली आहे आणि जाऊ शकते याचे उदाहरणच लोकसत्ताने त्यांच्या वाचकांना सप्रमाण घालुन दिले आहे ! एक वाचक म्हणून या झालेल्या घटनेचा मी निशेध व्यक्त करतो. असाच लेख जर कुठल्यातरी तशाच भोंदू पण हिंदू धर्मिय व्यक्तीवर लिहीला गेला असता आणि त्याबद्दल माफी मागायला लावली असती, तर ते देखील तितकेच निषेधार्ह असते. १०० % सहमत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasam
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

एक्स्प्रेस समूहाने पूर्वी

नितिन थत्ते
Mon, 03/21/2016 - 06:51 नवीन
एक्स्प्रेस समूहाने पूर्वी व्ही पी सिंग पंतप्रधान असताना अरूण शौरींची तातडीने उचलबांगडी केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अतिशय चुकीचे

श्रीरंग_जोशी
Fri, 03/18/2016 - 21:01 नवीन
लोकसत्तेने या अग्रलेखासठी माफी मागणे अतिशय चुकीचे आहे. अवांतर - मिपाकर राजघराणं यांचा संबंधीत विषयावरचा हा लेख वाचनीय आहे - दयाळू मदर तेरेसा.
  • Log in or register to post comments

ह्या लेखातील पिग्गी बँक वरती

श्री गावसेना प्रमुख
Fri, 03/18/2016 - 21:04 नवीन
Image removed. ह्या लेखातील पिग्गी बँक वरती जे उर्दूत लिहिलेलं आहे त्याने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या म्हणून mim च्या लोकांनी लोकमत जळगाव कार्यालयावर हल्ला केल्यानंतर ह्यांनी सपशेल लोटांगण घातलं ना।भावना फक्त ह्यांना असतात हिंदूंना नसतात हे नेहमी अधोरेखित होत राहत।
  • Log in or register to post comments

गंभीर फरक...

विकास
Fri, 03/18/2016 - 22:24 नवीन
ज्या गुंडागर्दीला लोकमतला (कधीकाळी महानगरला ) तोंड द्यावे लागले, ती भले कोणी ठरवून केली असली तरी झुंडशाहीतली एक प्रतिक्रीया होती. अर्थात हे त्याचे समर्थन अथवा त्याचा बचाव करण्यासाठीचा मुद्दा नाही. इथे, माझ्या अनुभवाप्रमाणे आणि जे काही ऐकले-वाचले आहे, त्यावरून मराठी ख्रिस्तीधर्मिय समाज हा बर्‍यापैकी शांत आहे. मग तो महाराष्ट्रातला असो अथवा गोव्यातला. त्यांच्यातल्या काहींचे जरी काही धर्मांतराचे चाळे चालले असतील तरी ते मर्यादीत असावे आणि तो मुद्दा वेगळा आहे, वेगळ्यापद्धतीने (कायद्याने) हाताळता येईल. त्यामुळे त्या लोकांच्या भावना इतक्या टोकाला जाऊन दुखावल्या असतील असे वाटत नाही. मग या अग्रलेखानंतर एक विरोधी प्रतिक्रीया मराठी ख्रिस्ती समाजातून दिसली नाही आणि तरी देखील २४ तासात माफी मागून अग्रलेख अप्रकाशीत करावा लागतो? याच्या मागे नक्की कर्ताकरविता आहे तरी कोण? म्हणून म्हणले लोकमत वरील हल्ला आणि लोकसत्ता संपादकाची कुठेही आवाज न करता, गोंधळ न करता, एखाद्या surgical strike सारखी केलेली मुस्कटदाबी जास्त गंभीर वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

+१

अजया
Fri, 03/18/2016 - 21:07 नवीन
कुबेर यांचे हात बांधले गेलेले दिसतात.शिवाय त्यांनाच वैयक्तिक माफीनामा द्यायला लावलेला दिसतोय.नेहमी काही चुकीचे असल्यास वृत्तपत्राकडून माफी मागितली जाते.इथे मी लिहिले आहे!
  • Log in or register to post comments

हा फोटो बेरक्या उर्फ नारद च्या साईट वरचा आहे

श्री गावसेना प्रमुख
Fri, 03/18/2016 - 21:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माझ्याकडे छापील लोकसत्ता येतो

जेपी
Fri, 03/18/2016 - 21:21 नवीन
माझ्याकडे छापील लोकसत्ता येतो.त्यात हा माघारनामा दिसला नाही. जरा लिँक द्या..
  • Log in or register to post comments

हा फोटो

श्रीरंग_जोशी
Fri, 03/18/2016 - 22:03 नवीन
छापील आवृत्तीवरून घेतलेला हा फोटो चेपूवरून साभार.... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हम्म

खालीमुंडी पाताळधुंडी
Fri, 03/18/2016 - 21:31 नवीन
"सेक्युलरी समतोलपणा" अलिकडे फार फोफावलाय.
  • Log in or register to post comments

सहिष्णुता

रामपुरी
Fri, 03/18/2016 - 22:57 नवीन
सहिष्णूता सहिष्णुता म्हणतात ती हीच
  • Log in or register to post comments

कॅथाॅलिक पंथात संतत्व कसं दिलं जातं

बोका-ए-आझम
Fri, 03/18/2016 - 23:16 नवीन
याबद्दल ही एक लिंक आहे. लिहिणारे धर्मगुरूच आहेत,त्यामुळे तथ्य आहे असं मानायला हरकत नाही. http://m.dummies.com/how-to/content/saints-for-dummies-cheat-sheet.html म्हणजे जोपर्यंत पोप म्हणत नाही, तोपर्यंत तुम्ही संत नाही. शिवाय संत अशी पदवी ही मृत्यूनंतरच मिळणार. लोकांनी स्वयंस्फूर्तीने तुम्हाला संतत्व बहाल केलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि कुणीही केलेल्या कामात जर धर्मप्रसार हा मुद्दा नसेल, तर पोप त्याचा विचार संतत्वासाठी का करेल? कारण जर तसं असतं तर फक्त कॅथाॅलिक पंथीयांचाच विचार झाला नसता. एखादा हिंदू किंवा मुस्लिमही सेंट अमुक किंवा सेंट तमुक म्हणून गणला गेला असता. पण तसं होत नाही. एका हाडा-मांसाच्या माणसात लोकांना संतत्व देण्याची बुद्धी असते आणि त्याची निवड कोण करतात - तर इतर हाडा-मांसाची माणसेच. पण ती एखाद्याला संतत्व देऊ शकत नाहीत. असं हे चमत्कारिक त्रांगडं आहे!
  • Log in or register to post comments

धाग्याचं टायटल चुकलं साहेब

अर्धवटराव
Fri, 03/18/2016 - 23:33 नवीन
"लोकसत्ता: संपादकीयाची संतपदाशी प्रांजळ भेट" असं काहिसं शीर्षक हवं :प
  • Log in or register to post comments

ऑनलाईन आवृत्तीत मागे घेणे

अभ्या..
Fri, 03/18/2016 - 23:43 नवीन
ऑनलाईन आवृत्तीत मागे घेणे प्रोसेस समजू शकतो. प्रिंट आवृत्तीत तो होता ना लेख? मला पाहिल्यासारखा वाटतोय पण जुन्या अंकात असणारच. अशा बाबतीत (जर ऑनलाइन आवृत्ती नसलीच असती) तर संपादकांचे धोरण काय राहिले असते? आमचे विचार चुकीचे की माझे विचार चुकीचे म्हणले गेले असते?
  • Log in or register to post comments

पंख लागणे

श्रीरंग_जोशी
Fri, 03/18/2016 - 23:59 नवीन
ऑनलाइन आवृत्तीच्या बाबतीत मिपावरचा पंख लागणे हा वाक्प्रचार वापरता येईल ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

इतरांच्या लेखाला पंख लागू दे

अभ्या..
Sat, 03/19/2016 - 00:03 नवीन
इतरांच्या लेखाला पंख लागू दे रे. इथे संपादकीयच उडवलेय. लै भारी शब्द हाय पण ऑलरेडी दुश्मन्या वाढल्यात त्यात भर नको. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

दुश्मन्या

श्रीरंग_जोशी
Sat, 03/19/2016 - 00:17 नवीन
दोस्तो का दोस्त, दुश्मनो का दुश्मन... अभ्या द हिरो :-) एक वेळ चुकीची आकडेवारी किंवा तथ्य छापले गेले तर त्याविषयी चुक झाली म्हणून माफी मागणे समजू शकतो. इथे तार्किक विचार आहेत ते एकदा मांडले की मांडले. अशा प्रकारे परत घेण्याने ते गायब होत नसतात उलट अधिक वेगाने पसरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१

विकास
Sat, 03/19/2016 - 00:25 नवीन
आधी लाथ मारायची मग नमस्कार केल्यासारखे हात पुढेमागे करायचे! ;) तरी देखील तेव्हढे सोपे नसावे इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

निदान शार्ले हेब्दोच्या

अभ्या..
Sat, 03/19/2016 - 00:31 नवीन
निदान शार्ले हेब्दोच्या हल्ल्यानंतरच्या डेरिंगवरचा जुनालेख आधी मागे घेऊन मग हे केले असते तर चालले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अर्थस्य पुत्रो दासः

आनन्दा
Sat, 03/19/2016 - 13:20 नवीन
अर्थस्य पुत्रो दासः
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभ्या

नाखु
Mon, 03/21/2016 - 08:35 नवीन
पुणे छापील आवृत्तीत तसा माफी खुलासा आणि लेख मागे घेतल्याचे निवेदन आहे (वल्लींना सांगून त्याचा फटु उद्या टाकतो). च्या मारी असहिष्णुताची व्याख्या एकदा मिपा विचारवंत धुरीणांनी करून केंद्र सरकारकडे पाठवून द्यावी ही मिपा वाचकांतर्फे जाहीर विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अनाकलनीय पाऊल

दा विन्ची
Sat, 03/19/2016 - 11:44 नवीन
गिरीश कुबेर यांनी अतिशय अनाकलनीय पाऊल उचलले. एवढा कोणता दबाव आहे कळायला मार्ग नाही. लोकसत्ता सारख्या आघाडीच्या वर्तमानपत्राला अशोभनीय आहे हे सारे.
  • Log in or register to post comments

हा फारच धक्कदायक प्रकार आहे..

आनन्दा
Sat, 03/19/2016 - 13:16 नवीन
हा फारच धक्कदायक प्रकार आहे.. विकास सर तुमची अडचण नसेल तर हा तुमचा लेख कायअप्पा वर टाकावा म्हणतो.. लोकसत्तच्या संपादकाच्या मागे आपण अश्या प्रसंगी उभे राहिलेच पाहिजे.. बाकी चिमणराव, सर्वज्ञानी आणि विदूषकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.. ते परवाच अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने गळा काढत होते.
  • Log in or register to post comments

संपादकाच्या मागे आपण अश्या प्रसंगी उभे

कपिलमुनी
Sat, 03/19/2016 - 14:42 नवीन
तेच पळाले त्यांचा मागे काय उभा रहायचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

किमान पुढच्या वेळी तरी

आनन्दा
Sat, 03/19/2016 - 14:58 नवीन
किमान पुढच्या वेळी तरी त्यांनी शेपुट घालू नये म्हणून त्यांना पाठिंबा द्यायचा हो. आता झाले ते झाले. पण याविरुद्ध जनमताचा रेटा उभा करणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/19/2016 - 15:03 नवीन
सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

धन्यवाद

विकास
Sat, 03/19/2016 - 18:03 नवीन
धन्यवाद, माझी काहीच हरकत नाही कायअप्प्पा वर टाकण्यासाठी. मी आधी देखील म्हणले तसे, हा मुद्दा कुणाबद्दचा लेख मागे घेतला अथवा लिहीणार्‍या व्यक्तीविषयी नाही. कारण त्या संपादक महाशयांचे एकांगी विचार पटत नाहीत. मला मराठी ख्रिस्ती समाजाबद्दल बर्‍यापैकी खात्री आहे, की ते असे नाहीत. (चूक असलो तर चूक म्हणेन पण तुर्तास पॉझिटीव्ह गृहीतक म्हणा हवे तर). कुबेरांचे आणि एक्सप्रेस व्यवस्थापनाचे कशासाठी जमत नसेल तर तो देखील त्यांचा अंतर्गत मामला होतो. त्यामुळे हे कुबेर या व्यक्तीवर अन्याय झाला म्हणून देखील नाही. हा गंभिर प्रश्न अशा करता आहे कारण बोलवता धनी पूर्ण गप्प बसला आहे. आज कुबेरांचे झाले त्यावर जर आवाज केला नाही तर यांचा धीर आणि माज अजूनच वाढेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

जाताजाता- कालच कायअप्प वर

आनन्दा
Sat, 03/19/2016 - 13:19 नवीन
जाताजाता- कालच कायअप्प वर वाचलेला विनोद -
मदर तेरेसांचे दोन चमत्कार ज्यामुळे त्यांना संतपद दिले गेले - १. ब्राझीलमध्ये एका महिलेचा कर्करोग बरा केला. २. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना हे कळू नये म्हणून त्यांना आंधळे आणि बहिरे केले.
  • Log in or register to post comments

ॐ कुबेराय नमः

प्रदीप साळुंखे
Sat, 03/19/2016 - 13:54 नवीन
जागता पहारा: कुबेरांची ‘उसंत’वाणी
  • Log in or register to post comments

आम्ही वृत्तपत्र

आनन्दा
Sat, 03/19/2016 - 15:05 नवीन
आम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आब राखु इच्छितो. माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आम्ही झुगारु इच्छितो. अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी रोखु इच्छितो आणि याचे सामूहिक प्रतीकात्मक प्रकटीकरण म्हणून आम्ही रविवार दि.20 मार्चचा लोकसत्ता घेणार नाही वाचक म्हणून आमच्या या कृतीची दखल घेऊन संपादकीय मागे घेण्याची कारण जाहीर करावी." चला निर्धार करा ! माध्यमांच्या हितासाठी एक दिवस Say No To लोकसत्ता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे

+१

प्रदीप साळुंखे
Sat, 03/19/2016 - 15:22 नवीन
SAY NO TO लोकसत्ता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

हा म्हणजे अगदी मास्टरपीस आहे

आनन्दा
Sat, 03/19/2016 - 15:07 नवीन
हा म्हणजे अगदी मास्टरपीस आहे -
नुसते अग्रलेखाचे शीर्षक देवून मागे घेतल्याची नोटीस देतात. इतके हे महाशय मदर टेरेसाच्या अवकृपेने भयभीत झाले आहेत. म्हणूनच मग मदर टेरेसा खरेच चमत्कारी व दैवी कुवतीच्या संत असाव्यात, यावर विश्वास ठेवणे भाग आहे. व्हॅटीकनचा पोप किंवा आणखी काही व्यवस्थेने मदरना संतपद देण्याची गरजच नाही. त्या महिलेच्या चमत्कारी क्षमतेची साक्ष खुद्द भारतीय सेक्युलर माध्यमेच देत आहेत. कुठल्याही बाबा महाराज यांच्यावर चिखलफ़ेक करण्यात हे बुद्धीमंत जराही कचरत नाहीत. पण कुठला दर्गापीर वा मदर टेरेसाचा विषय आला, मग यांची बोलती बंद होते. तोही एक वैज्ञानिक चमत्कारच नाही काय? आपण अग्रलेखात काय लिहीले व त्यातले काय खुपणारे होते, याची आठवणही करून द्यायला संपादकला दरदरून घाम फ़ुटत असेल, तर टेरेसा यांच्या दैवीशक्तीचा आणखी कुठला पुरावा समोर आणण्याची गरज उरते काय? खरे तर पोपने मदरला संतपद दिल्याने त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. पण कुबेरांनी ज्या पद्धतीने ‘शेपूट घालून’ माफ़ी मागितली आहे, ती मदरच्या संतपदाची खरी प्रचिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे

आम्ही वृत्तपत्र

प्रदीप साळुंखे
Sat, 03/19/2016 - 15:31 नवीन
आम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आब राखु इच्छितो. माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आम्ही झुगारु इच्छितो. अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी रोखु इच्छितो
माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आपण झुगारून काय उपयोग? कारण असल्या गोष्टींची माध्यमांना फिकीर नाही,त्यांना सिलेक्टिव अभिव्यक्तीस्वातंत्र्य हवे असते.आणि त्यातच ते धन्यता मानतात. लोकमतचीही याआधी घाबरगुंडी उडाली होती. माध्यमांची ही बायस भूमिका सर्वातीत आहेच.डरपोक आहेत साले!
  • Log in or register to post comments

अग्रलेख प्रसिद्ध झाल्यापासून

श्रीगुरुजी
Sat, 03/19/2016 - 17:55 नवीन
अग्रलेख प्रसिद्ध झाल्यापासून केवळ २४ तासात माफी मागून अग्रलेख मागे घेणे हे अत्यंत धक्कादायक आहे. केवळ २४ तासात गिरीश कुबेरांचे विचार बदलले असणे शक्य नाही. गिरीश कुबेरांवर कोणाचा तरी जबरदस्त दबाव आला असावा. माध्यमांवर दडपण आणले जात आहे हा निधर्मांधांचा आरोप एका अर्थी खरा ठरला आहे. मात्र हिंदू वगळता इतर धर्मियांबद्दल लिहिल्याबद्दल हा दबाव आणला असावा. असाच अग्रलेख हिंदू धर्मातील एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल लिहिला असता तर तो मागे घेण्याची गरज पडली नसती. हा अग्रलेख मागे घेतल्याबद्दल अपेक्षेप्रमाणे एकाही निधर्मांधाने अजूनपर्यंत चकार शब्दानेही विरोध केला नाही. गिरीश कुबेर लवकरच लोकसत्तातून बाहेर पडले किंवा त्यांना बाहेर काढले तर आश्चर्य वाटणार नाही. ज्यांना हा अग्रलेख वाचायला मिळाला नसेल त्यांच्यासाठी तो खालील पानावर उपलब्ध आहे. https://www.facebook.com/photo.php?fbid=10153959678189454&set=a.10153762589229454.1073741848.539949453&type=3&theater
  • Log in or register to post comments

?

नितिन थत्ते
Sun, 03/20/2016 - 21:41 नवीन
अग्रलेखाचा मुख्य विषय ख्रिश्चन संताविषयी होता. परंतु लोकसत्ता वाचणारे मराठी ख्रिश्चन ही संख्या इतकी कमी असावी की त्यांच्या मागणीपुढे मान तुकवण्याची लोकसत्ताला धंद्याच्या दृष्टीने काहीच गरज नसावी असे धागाकर्ते सुचवतायत. त्याअर्थी पूर्वी इंदिरा गांधी म्हणत असत त्याप्रमाणे हा "परकीय हात" असावा असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हा तो लेख, मोबल्यावरुन फोटो

मदनबाण
Sat, 03/19/2016 - 18:21 नवीन
Image removed. हा तो लेख, मोबल्यावरुन फोटो काधुन इथे देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasam
  • Log in or register to post comments

लोकसत्ता {संपादकांचे} यांचे

मदनबाण
Sat, 03/19/2016 - 18:36 नवीन
लोकसत्ता {संपादकांचे} यांचे अभिव्यक्ति स्वातंत्र नष्ट झाले आहे,ही घटना साधी नसुन या मागचे गूढ उकलले गेले पाहिजे. ही वाचकांशी केलेली प्रतारणा तर आहेच, तसेच हिंदू समाजाच्या भावनांना काडीची किंमत नसुन इतर धर्मा बद्धल सत्य कथन केल्यास दडपशाही केली जाईल हे अधोरेखित करणारे धोरण स्पष्ट झाले आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasam
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

दोन अग्रलेख - दोन तर्‍हा!

विकास
Sat, 03/19/2016 - 19:45 नवीन
खालील बोलके चित्र सामाजिक माध्यमातून... Image removed.
  • Log in or register to post comments

चित्र दिसत नाही

अगम्य
Sun, 03/20/2016 - 00:43 नवीन
प्रतिक्रिया द्यायला शब्दच सुचत नाहीत. लेखात "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" लिहिले आहे. त्याचाच अनुभव घेतल्यासारखे वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आता दिसतयं का?

विकास
Sun, 03/20/2016 - 01:22 नवीन
आता दिसतयं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

हो.

अगम्य
Mon, 03/21/2016 - 09:21 नवीन
आता दिसतयं. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

लोकसत्ताच्या व्यवस्थापनाचा निषेध

पैसा
Sat, 03/19/2016 - 20:25 नवीन
लोकसत्ताच्या व्यवस्थापनाचा निषेध. संपादकीय प्रसिद्ध करण्यापूर्वी कोणीतरी वाचून बघत असतील ना की थेट प्रसिद्ध करतात?
  • Log in or register to post comments

खरे कारण

राही
Sat, 03/19/2016 - 22:31 नवीन
खरे कारण अगदीच वेगळे असावे. एका क्षेत्रात बरीच खळबळ माजली. मायबोलीवरच्या एका लेखातले काही प्रतिसाद सूचक आहेत.
  • Log in or register to post comments

नक्की कुठले?

विकास
Sun, 03/20/2016 - 01:32 नवीन
मायबोलीवरच्या एका लेखातले काही प्रतिसाद सूचक आहेत. मायबोलीतील लेखाबद्दल सुचवल्याबद्दल धन्यवाद. आपण नक्की कुठले प्रतिसाद म्हणत आहात ते माहीत नाही. पण मी असे गृहीत धरतो की आपण अग्रलेखातील शेवटच्या परीच्छेदात जे काही बालाजी तांब्यांचे नाव(च) आणि अप्रत्यक्षपणे नाव न घेता केलेला असारामबापूंचा कथीत उल्लेख म्हणत असाल, तर ते काही तार्कीक वाटत नाही. सर्वप्रथम बालाजी तांब्यांना बुवा-बाबांच्या स्टाईलचे फॉलोअर्स आहेत असे वाटत नाही. असारामबापूंकडे गणंग बरेच असले तरी जस जसे त्यांचे जेल मधले राहाणे वाढत आहे त्याबरोबर त्यांचे फॉलोअर्स पण गप्प होऊ लागले असावेत. शिवाय असारामबापूंचे मराठी फॉलोअर्स किती असू शकतील? बरं या दोघांवरही अनेकदा अनेक ठिकाणी टिका झालेली असेल. मला वाटते दोघांवर विनोद देखील भरपूर झालेले आहेत. या सर्वामुळे लोकसत्तासंपादक तात्काळ अग्रलेख मागे घेतील असे वाटत नाही... तुम्हाला तसे वाटत नाही का? का इतर कुठल्यातरी प्रतिक्रीयेस आपण सूचक म्हणत आहात? एका क्षेत्रात बरीच खळबळ माजली. कुठल्या क्षेत्रात आणि काय खळबळ माजली आहे? आता उत्सुकता वाढली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

दुवा असेल तर डकवा...

निशांत_खाडे
Sun, 03/20/2016 - 01:33 नवीन
दुवा असेल तर डकवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा