गेल्या ६ ते ८ महीन्यांमध्ये असहीष्णुता आणि त्याला अनुसरून व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच कसा सद्य भारत सरकारच्या कारभारामुळे होत आहे यावरून माध्यमात कशी आणि कुठल्या कुठल्या कारणाने चर्चा झाली, हे येथे सांगत बसायची गरज आहे असे वाटत नाही... :)
हे सर्व चाललेले असताना वास्तवीक तमाम वृत्तपत्रे-माध्यमे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पण कडक टिका करण्यात मागे पडत नव्हती. ही टिका केवळ सरकारवरच नव्हती तर बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानावर देखील तितकीच होती आणि अजूनही होते. काही वेळेस तर ती श्रध्दास्थानापेक्षाही दहशतवाद्यांना शिक्षा दिलेल्या कशा चुकीच्या होत्या, ते कसे बापडे होते असे सांगत सर्वोच्च न्यायालयावर पण अप्रत्यक्ष टिका होती. अनेकांना ती आवडली नव्हती हे वेळोवेळी आलेल्या विविध सामाजिक माध्यमांतील प्रतिक्रीयातून स्पष्ट होत होते. तरी देखील वृत्तपत्रे आणि टिव्ही माध्यमांना त्यांच्या भावनांपेक्षा व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचे वाटले. व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचेच आहे आणि सत्याला धरून जर समाजोपयोगी टिका असली तर ती नेहमीच करावी अशा मताचा मी आहे. म्हणूनच, येथे एक स्पष्ट करू इच्छीतो की जी टिका ही सत्याला धरून असेल, तर्क-"सुसंगत" असेल ती कुणावरही केली असली तरी योग्यच आहे. वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम करणे हे नुसते पोटभरू संपादक नसल्याचे लक्षण आहे, ते समाजातील एका प्रमुख घटकाचे जिवंतपणाचे लक्षण आहे.
आज हे सगळे लिहायचे कारण म्हणजे, १७ मार्चच्या लोकसत्तेत आलेला "असंतांचे संत" हा मदर तेरेसा - पोप/कॅथलीक संस्थेवर टिका करणारा अग्रलेख लिहीला गेला. अर्थात हा अग्रलेख देखील "सेक्युलरी समतोल" वृत्तीने लिहीला होता. म्हणजे असे की सुरवातीसच बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर यांना फटकावले होते, अशोकाचा बुद्ध धर्मप्रसार आणि सौदी अरेबियातील वहाबी धर्म वगैरे सर्वांना आणले होते. पण मूळ विषय होता, मदर तेरेसांना बहाल केले जाणारे संतपद आणि प्रामुख्याने टिका होती, ती कॅथलीक संस्थेवर आणि त्यांचा रोख राज्यविस्तारावर कसा असतो या संदर्भात. संतपद देताना चमत्कार कसे बघितले जातात या संदर्भात, वगैरे, वगैरे...
ज्यांना सध्याच्या लोकसत्तेच्या अग्रलेखांचा रोख माहीत आहे, त्यांना (सेक्युलरी समतोलपणा असला तरी) सुखद आश्चर्य वाटले... वास्तवीक आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. जे लिहीले होते ते बुद्धीवादी होते आणि ज्यांच्या बुद्धीवादाचा कमीजास्त प्रभाव आहे अशा ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवळकरांचे जे काही परखड विचार मदर तेरेसांबाबत होते त्याचेच ते थोडेफार प्रतिबिंब होते, असे कुठेतरी वाटले. (अर्थात ती कॉपी नव्हती हे देखील खरेच ध्यानात ठेवावेत).
पण जो चमत्कार कुठल्याही संतपदाला पोचलेल्या व्यक्तीला उभ्या हयातीत जमला नसता, तो या निमित्ताने झाला! १७ मार्चच्या अग्रलेखावर १८ मार्चला लोकसत्तेच्या छापिल आणि ऑनलाईन आवृत्तीत, "असंतांचे संत - क्षमस्व! प्रिय वाचक!, ‘असंतांचे संत’ या १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. – संपादक" अशी लोकसत्तेच्या वतीने नाही तर संपादकाच्या वतीने माफी मागितली गेली. अग्रलेख तात्काळ अप्रकाशीत केला गेला.
२४ तासाच्या आत, बिगरसरकारी, बिनचेहर्याच्या, बिन (जाहीर) आवाजाच्या कुठल्यातरी अज्ञात शक्तीने एका वृत्तसंपदाकचे व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच केला.
माझ्याकडे आकडेवारी नाही पण माझ्यालेखी सुसंगत तर्क आहे: लोकसत्ता हे मराठी वाचकांचे पत्रक. आजपर्यंत त्यात अनेकदा बहुसंख्यांकांच्या भावना दुखावणारे लिहून आले आहे आणि त्यावर अनेकांनी टिका देखील केली आहे. त्यामुळे हा लेख मागे घेण्याचे कारण बहुसंख्य असणे जरा अवघड वाटते. बहाई आणि बुद्ध धर्माचा उल्लेख आला असला तरी तो संदर्भापुरताच, पक्षि: टिका करणारा उल्लेख नाही. फक्त, त्यांच्याबद्दल पण लिहीले आहे असे for the record ठेवायला म्हणून आलेला आहे. म्हणजे त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रश्न नाही. मग एकूण टक्केवारीच्या किती जण हे कॅथलीक आहेत जे मराठी आहेत आणि जे लोकसत्ता वाचतात आणि ज्यांनी तो अग्रलेख वाचल्याने त्यांच्या भावना दुखावल्या? लोकसत्तेच्या अग्रलेखांमधील प्रत्येक विचाराशी मी सहमत असेनच असे नाही, पण भाषा आणि माहितीसाठी ते नक्कीच चांगले असतात. तरी देखील असे वाटते की या अग्रलेखांना लोकसत्तावाचक मराठी समाज ही एक अपरीहार्य मर्यादा आहे. तरी देखील जर तात्काळ माफी मागावी लागत असेल तर खरेच धक्कादायक आहे.
वास्तवीक जे झाले ते दुर्दैवी आहे... एक टिकात्मक अग्रलेख मागे घ्यावा लागला म्हणून नाही, मदर तेरेसा अथवा कॅथलीक्स वरील टिका होती म्हणून तर अजिबातच नाही. तर या प्रकरणात जो काही तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला गेला आहे, त्यासंदर्भात हे अधिक वाटले.
कधी काळी समर्थ रामदासांनी, "समर्थाचीया सेवका वक्र पाहे..." असे म्हणले होते. अर्थात या घटनेत समर्थ कोण आहे, तसेच कोणी त्याच्या सेवकाकडे वक्र पाहीले हे स्पष्ट झालेच आहे. पण या निमित्ताने ज्यांना रामदासी वाड्मय आवडते, ज्याचा ते अभ्यास करतात, त्यांनी त्याचाच उपयोग करून, आपल्याला अभ्यास-साधनेतून आलेल्या विद्वत्तेच्या देणगीचे आत्मपरीक्षण करावे नाहीतर..
"जनी हीत पंडीत सांडीत गेले।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे।
मना सर्व जाणीव सांडुनि राहे"
असे म्हणायची वेळ येऊ शकते.
वर्गीकरण
वाचने
51721
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्छा!
In reply to ओ साहेब, स्वखुशीने आत्महत्या by तर्राट जोकर
माहित होतं तुम्ही हाच मुद्दा
In reply to अच्छा! by विकास
का का? तुम्ही वारीस पठाणच्या
In reply to माहित होतं तुम्ही हाच मुद्दा by तर्राट जोकर
चालेल ना वेमुला काढा, कन्हया
In reply to का का? तुम्ही वारीस पठाणच्या by आनन्दा
बाकी सगळे जाऊद्या, मात्र
In reply to अच्छा! by विकास
आम्ही तर कैक वर्षे झाले बंद
In reply to बाकी सगळे जाऊद्या, मात्र by आनन्दा
यात कुठल्या बुवाबाबाच्या
In reply to .. by विकास
यात कुठल्या बुवाबाबाच्या चमत्कारा पेक्षा लिबरल्स लोकांच्या चमत्कारीक वर्तनाचे पितळ उघडे पडले असे म्हणावे लागत आहे...१००० टक्के हे न समजलेले लोक झोपलेले नसून झोपेचे सोंग घेऊन आहेत, हे केजीतल्या पोरालाही सांगण्याची गरज नाही.थत्तेचाचा
In reply to ओव्हरऑल संत प्रकरणावर by नितिन थत्ते
...
स्वागत
In reply to ... by hmangeshrao
...
In reply to स्वागत by विकास
बटाटा कोण?
In reply to ... by hmangeshrao
.
In reply to बटाटा कोण? by मितभाषी
पुलंना बटाटा म्हणाण्यामागे
In reply to . by hmangeshrao
..
In reply to पुलंना बटाटा म्हणाण्यामागे by मृत्युन्जय
इथे चर्चा वाचुन एक नक्की कळलय
मिपाचे मुक्तपीठही होण्यास
In reply to इथे चर्चा वाचुन एक नक्की कळलय by अर्धवटराव
ख्या.ख्या. ख्या...खि क्क. ;)
In reply to मिपाचे मुक्तपीठही होण्यास by मोदक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajramऑल इंडिआ बकचोद (AIB) नामक
या घटनेतुन काही गोष्टी सिद्ध
"असंतांचे संत" एक उत्तम लेख
निरीक्षण
In reply to "असंतांचे संत" एक उत्तम लेख by बाळ सप्रे
अनावश्यक असलेला बुद्ध आणि
In reply to निरीक्षण by विकास
:)
In reply to अनावश्यक असलेला बुद्ध आणि by बाळ सप्रे
हिंदूविरोध या प्रकरणात नाही
In reply to :) by विकास
बाकी हिंदू धर्माविषयी
In reply to अनावश्यक असलेला बुद्ध आणि by बाळ सप्रे
नाही हो!
In reply to बाकी हिंदू धर्माविषयी by तर्राट जोकर
सीपीयु ह्यांग झाला माझा. जरा
In reply to नाही हो! by विकास
:)
In reply to सीपीयु ह्यांग झाला माझा. जरा by तर्राट जोकर
इतरांनी काय करावे हे सांगणे
In reply to :) by विकास
नाही ते समजले हो. पण माझ्या
In reply to :) by विकास
आता कसं बोललात, hmangeshrao
आता हिंदू जागा होऊ लागलाय
In reply to आता कसं बोललात, hmangeshrao by गामा पैलवान
जामोप्या?
In reply to आता हिंदू जागा होऊ लागलाय by hmangeshrao
और का?
In reply to जामोप्या? by पैसा
काय करतो काय हा असे ब्यान होण्यासारखे?
In reply to और का? by तर्राट जोकर
माघार जरी चुकीचं पाउल असलं
+१
In reply to माघार जरी चुकीचं पाउल असलं by बाळ सप्रे
चॅनलवर उहापोह झाला नाही वा
In reply to +१ by विकास
सहमत
In reply to चॅनलवर उहापोह झाला नाही वा by बाळ सप्रे
+१
In reply to सहमत by आजानुकर्ण
या नियतकालीकात, मेहतांनी
In reply to +१ by विकास
१०० झाले. अभिनंदन.
hmangeshrao
...
In reply to hmangeshrao by होबासराव
अख्ख्या देशालाच जंत झालेत.
In reply to ... by hmangeshrao
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Habibi Ya Eini... :- Nourhanne.
In reply to अख्ख्या देशालाच जंत झालेत. by मदनबाण
म्हणजे तुम्हालाही.
In reply to ... by hmangeshrao
बोका सर
In reply to म्हणजे तुम्हालाही. by बोका-ए-आझम
उठ सुठ केंद्रीय सरकारवर टीका
हय ना !
In reply to उठ सुठ केंद्रीय सरकारवर टीका by श्री गावसेना प्रमुख
बहुतेक लोकांना मोदीचाय
In reply to उठ सुठ केंद्रीय सरकारवर टीका by श्री गावसेना प्रमुख
*मोदीच्या असे वाचावे.
विचारस्वातंत्र्याच्या
महात्मा फुले नी पुण्यात