✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

समर्थाचिया सेवका वक्र पाहे...

व
विकास यांनी
Fri, 03/18/2016 - 20:20  ·  लेख
लेख
गेल्या ६ ते ८ महीन्यांमध्ये असहीष्णुता आणि त्याला अनुसरून व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच कसा सद्य भारत सरकारच्या कारभारामुळे होत आहे यावरून माध्यमात कशी आणि कुठल्या कुठल्या कारणाने चर्चा झाली, हे येथे सांगत बसायची गरज आहे असे वाटत नाही... :) हे सर्व चाललेले असताना वास्तवीक तमाम वृत्तपत्रे-माध्यमे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पण कडक टिका करण्यात मागे पडत नव्हती. ही टिका केवळ सरकारवरच नव्हती तर बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानावर देखील तितकीच होती आणि अजूनही होते. काही वेळेस तर ती श्रध्दास्थानापेक्षाही दहशतवाद्यांना शिक्षा दिलेल्या कशा चुकीच्या होत्या, ते कसे बापडे होते असे सांगत सर्वोच्च न्यायालयावर पण अप्रत्यक्ष टिका होती. अनेकांना ती आवडली नव्हती हे वेळोवेळी आलेल्या विविध सामाजिक माध्यमांतील प्रतिक्रीयातून स्पष्ट होत होते. तरी देखील वृत्तपत्रे आणि टिव्ही माध्यमांना त्यांच्या भावनांपेक्षा व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचे वाटले. व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचेच आहे आणि सत्याला धरून जर समाजोपयोगी टिका असली तर ती नेहमीच करावी अशा मताचा मी आहे. म्हणूनच, येथे एक स्पष्ट करू इच्छीतो की जी टिका ही सत्याला धरून असेल, तर्क-"सुसंगत" असेल ती कुणावरही केली असली तरी योग्यच आहे. वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम करणे हे नुसते पोटभरू संपादक नसल्याचे लक्षण आहे, ते समाजातील एका प्रमुख घटकाचे जिवंतपणाचे लक्षण आहे. आज हे सगळे लिहायचे कारण म्हणजे, १७ मार्चच्या लोकसत्तेत आलेला "असंतांचे संत" हा मदर तेरेसा - पोप/कॅथलीक संस्थेवर टिका करणारा अग्रलेख लिहीला गेला. अर्थात हा अग्रलेख देखील "सेक्युलरी समतोल" वृत्तीने लिहीला होता. म्हणजे असे की सुरवातीसच बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर यांना फटकावले होते, अशोकाचा बुद्ध धर्मप्रसार आणि सौदी अरेबियातील वहाबी धर्म वगैरे सर्वांना आणले होते. पण मूळ विषय होता, मदर तेरेसांना बहाल केले जाणारे संतपद आणि प्रामुख्याने टिका होती, ती कॅथलीक संस्थेवर आणि त्यांचा रोख राज्यविस्तारावर कसा असतो या संदर्भात. संतपद देताना चमत्कार कसे बघितले जातात या संदर्भात, वगैरे, वगैरे... ज्यांना सध्याच्या लोकसत्तेच्या अग्रलेखांचा रोख माहीत आहे, त्यांना (सेक्युलरी समतोलपणा असला तरी) सुखद आश्चर्य वाटले... वास्तवीक आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. जे लिहीले होते ते बुद्धीवादी होते आणि ज्यांच्या बुद्धीवादाचा कमीजास्त प्रभाव आहे अशा ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवळकरांचे जे काही परखड विचार मदर तेरेसांबाबत होते त्याचेच ते थोडेफार प्रतिबिंब होते, असे कुठेतरी वाटले. (अर्थात ती कॉपी नव्हती हे देखील खरेच ध्यानात ठेवावेत). पण जो चमत्कार कुठल्याही संतपदाला पोचलेल्या व्यक्तीला उभ्या हयातीत जमला नसता, तो या निमित्ताने झाला! १७ मार्चच्या अग्रलेखावर १८ मार्चला लोकसत्तेच्या छापिल आणि ऑनलाईन आवृत्तीत, "असंतांचे संत - क्षमस्व! प्रिय वाचक!, ‘असंतांचे संत’ या १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. – संपादक" अशी लोकसत्तेच्या वतीने नाही तर संपादकाच्या वतीने माफी मागितली गेली. अग्रलेख तात्काळ अप्रकाशीत केला गेला. २४ तासाच्या आत, बिगरसरकारी, बिनचेहर्‍याच्या, बिन (जाहीर) आवाजाच्या कुठल्यातरी अज्ञात शक्तीने एका वृत्तसंपदाकचे व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच केला. माझ्याकडे आकडेवारी नाही पण माझ्यालेखी सुसंगत तर्क आहे: लोकसत्ता हे मराठी वाचकांचे पत्रक. आजपर्यंत त्यात अनेकदा बहुसंख्यांकांच्या भावना दुखावणारे लिहून आले आहे आणि त्यावर अनेकांनी टिका देखील केली आहे. त्यामुळे हा लेख मागे घेण्याचे कारण बहुसंख्य असणे जरा अवघड वाटते. बहाई आणि बुद्ध धर्माचा उल्लेख आला असला तरी तो संदर्भापुरताच, पक्षि: टिका करणारा उल्लेख नाही. फक्त, त्यांच्याबद्दल पण लिहीले आहे असे for the record ठेवायला म्हणून आलेला आहे. म्हणजे त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रश्न नाही. मग एकूण टक्केवारीच्या किती जण हे कॅथलीक आहेत जे मराठी आहेत आणि जे लोकसत्ता वाचतात आणि ज्यांनी तो अग्रलेख वाचल्याने त्यांच्या भावना दुखावल्या? लोकसत्तेच्या अग्रलेखांमधील प्रत्येक विचाराशी मी सहमत असेनच असे नाही, पण भाषा आणि माहितीसाठी ते नक्कीच चांगले असतात. तरी देखील असे वाटते की या अग्रलेखांना लोकसत्तावाचक मराठी समाज ही एक अपरीहार्य मर्यादा आहे. तरी देखील जर तात्काळ माफी मागावी लागत असेल तर खरेच धक्कादायक आहे. वास्तवीक जे झाले ते दुर्दैवी आहे... एक टिकात्मक अग्रलेख मागे घ्यावा लागला म्हणून नाही, मदर तेरेसा अथवा कॅथलीक्स वरील टिका होती म्हणून तर अजिबातच नाही. तर या प्रकरणात जो काही तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला गेला आहे, त्यासंदर्भात हे अधिक वाटले. कधी काळी समर्थ रामदासांनी, "समर्थाचीया सेवका वक्र पाहे..." असे म्हणले होते. अर्थात या घटनेत समर्थ कोण आहे, तसेच कोणी त्याच्या सेवकाकडे वक्र पाहीले हे स्पष्ट झालेच आहे. पण या निमित्ताने ज्यांना रामदासी वाड्मय आवडते, ज्याचा ते अभ्यास करतात, त्यांनी त्याचाच उपयोग करून, आपल्याला अभ्यास-साधनेतून आलेल्या विद्वत्तेच्या देणगीचे आत्मपरीक्षण करावे नाहीतर..
"जनी हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥ तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडुनि राहे"
असे म्हणायची वेळ येऊ शकते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51616 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

आसारामबापू नव्हेत.

राही
Sun, 03/20/2016 - 14:08 नवीन
सीतामाई आणि लक्ष्मणाचे उल्लेख आसारामबापूंना लागू होत नाहीत. महाराष्ट्रामध्ये आसारामबापूंना फारसे अनुयायी नाहीतच. उलट दुसर्‍या बापूंची अनुयायी संख्या डोळे विस्फारवणारी आहे. आणि..
  • Log in or register to post comments

अच्छा नळाला पाणी सोडणारे

मितभाषी
Sun, 03/20/2016 - 14:13 नवीन
अच्छा नळाला पाणी सोडणारे बाप्पू का =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

राम राम राम राम राम राम राम

तर्राट जोकर
Sun, 03/20/2016 - 14:28 नवीन
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

उत्सुकता...

विकास
Sun, 03/20/2016 - 17:25 नवीन
शेवटच्या परीच्छेदातले उल्लेख केवळ बालाजी असा स्पष्ट म्हणजे नाव घेऊन आहे. पण या दुसर्‍या बापूंचे नाव तरी आलेले नाही. अशा वेळेस वृत्तपत्रांना इतकी टिका करण्याची परवानगी असते. अर्थात कोर्टात काही होऊ शकणार नाही असे मला वाटते... पण ते जाउंदेत, माझी उत्सुकता उगाच ताणली गेली आहे... :) कोण आहे हा नवाराम? :) जर इथे लिहीणे योग्य वाटत नसेल तर खरड केलीत तरी चालेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

मिशिवाल्या बापूंची पांढरा

तर्राट जोकर
Sun, 03/20/2016 - 18:34 नवीन
मिशिवाल्या बापूंची पांढरा शर्ट, काळी प्यांट. बलात्कारासाठी मंत्र दिला कसा झ्यांग झ्यांग. दर गुरुवारी लागते बघा बांद्र्यामधी रांग भक्त भरती वह्या लिहुन फक्त रामनाम. भावना दुकावतील काय हो मिपानी रुद्ध झालेल्या सदस्यांच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अनिरुद्ध बापू ?

श्री गावसेना प्रमुख
Sun, 03/20/2016 - 18:37 नवीन
अनिरुद्ध बापू ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अग्रलेखात

विकास
Sun, 03/20/2016 - 19:03 नवीन
अग्रलेखात "लैंगिक शोषण करणारे कोणी बाबाबापू" असे म्हणले आहे. त्याला धरून कोण असू शकतील ते समजावे लागतील. मी कुठल्याच बाबाबापूंचा समर्थक अथवा भक्त नाही. तसेच मधल्याकाळात लक्ष जावे अशा त्यांच्याबद्दल बातम्या देखील दिसलेल्या नाहीत. त्यामुळे गोंधळ होत आहे. तरी देखील मुळ मुद्यासंदर्भात: जर अप्रत्यक्ष उल्लेख असला तर त्यामुळे संपूर्ण अग्रलेख काढायला लावण्याइतका कायदेशीर प्रश्न तयार झालेला नाही. शिवाय लॉजिकली, असल्या बुवाबाबांचे भगतगण शांतपणे असे करतील अशातले नाहीत. त्यामुळे ही शक्यता वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

विकासराव संपादकीय थोडेसे

श्री गावसेना प्रमुख
Sun, 03/20/2016 - 20:58 नवीन
विकासराव संपादकीय थोडेसे चुकलेले वाटते,त्यांच्या लिखाणानुसार स्वतःला राम धाकल्या बंधुस लक्ष्मण आणि दागिन्यांनी मढवलेल्या स्वतःच्या पत्नीस सीता ठरवत भक्तांचे आर्थिक व लैंगिक शोषण करणारे बाबा बापू असे जे म्हटले आहे ,माझ्या मते ते दोघे बाबा दोन वेगवेगळ्या व्यक्ती असाव्यात।। एक म्हणजे अनिरुद्ध बापू आणि दुसरे आसाराम बापू।। काय आहे आपण ठरलो कुबेरांच्या बुद्धी व वयापेक्षा लहान ,पण तोरसेकर ह्यांच्यानुसार कुबेराना स्वतःच्या बुद्धी बद्दल जास्तच घमंड आहे।त्यामुळें ते जे काही लिहितात ते त्यांना अंतिम सत्य वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मला वाटतं की....

गामा पैलवान
Sun, 03/20/2016 - 15:29 नवीन
विकास, >> ज्या इंडीयन एक्सप्रेस वृत्तसमुहाने एकेकाळी आणिबाणीच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला, त्या वृत्तसमुहातील >> एका संपादकाची इतकी मुस्कटदाबी हा समुहच करतो? हे काही पटले नाही. मलाही पटलं नाही. तातडीने माफी मागून लेख मागे घ्यावा इतका काही तो स्फोटक वगैरे नाहीये. त्यामुळे गिरीश कुबेरांचा बोलविता धनी वेगळाच असणार. कशावरून मोदीकाका नसतील? त्यांनी बरोबर डाव साधलेला दिसतोय. गोयनका कुटुंब आणीबाणीच्या विरोधात ठामपणे उभे राहिले होते ते असल्या दबावांना भीक घालणारे वाटतात का? माझ्या अंदाजाप्रमाणे मोदीकाकांनी बरोब्बर नेम साधलाय. बघूया आता असहिष्णुतेच्या नावाने कोणकोण पुरस्कार परत करताहेत ते. जरी बदनामी झाली तरी चर्चची होणार. हे सगळं करूनही मोदीकाका नामानिराळेच राहणार. शिवाय गिरीश कुबेर आणि गोयनका यांचाही फायदाच फायदा आहे. मस्त गेम खेळलाय. आ.न., -गा.पै. विशेष : सदर लेख आजूनही लोकसत्तावर उपलब्ध आहे : http://epaper.loksatta.com/c/9207507. मग तर शंका अधिकच बळावतेय.
  • Log in or register to post comments

:)

विकास
Sun, 03/20/2016 - 17:41 नवीन
खरेच आहे... आत्ता ज्या पद्धतीने व्यक्तीस्वातंत्र्याच्या पाईकांनी "हाताची घडी, तोंडावर बोट" ठेवले आहे ते बघून अहोआश्चर्यंम् असे म्हणावे लागत आहे! काय गंमत आहे, कन्हैय्या आणि उमरच्या व्यक्तीस्वातंत्र्यावरून बोंब झाली, पण येथे वृत्तपत्रस्वातंत्र्यावरून कोणी कुबेरांच्या बाजूने उभे राहीलेले दिसले नाही. थट्टा अथवा कुचेष्टा नाही, पण ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे आणि ती देखील स्वतःला पुरोगामी म्हणणार्‍या महाराष्ट्रात झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हेच पळाले ह्यांच्यामागे कोण

श्री गावसेना प्रमुख
Sun, 03/20/2016 - 21:16 नवीन
हेच पळाले ह्यांच्यामागे कोण उभे राहील विकासराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

खरे आहे.

अगम्य
Mon, 03/21/2016 - 09:46 नवीन
खरे आहे. जर बरखा दत्त ला विचारले तर ती साळसूद पणे म्हणेल की कुबेरांना jenuinely वाईट वाटले आणि त्यांनी voluntareely लेख मागे घेतला. ह्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झालेलीच नाही. कुठे आहे त्यांना कुणी धमकावल्याचा पुरावा? उलट असे लिहून सुद्धा कुणी ख्रिश्चन संघटनेने मोर्चा, मोडतोड असे काही केले नाही हा ख्रिश्चनांच्या सहिष्णुतेचा पुरावाच आहे. भाजप , संघ परिवार, शिवसेना, मनसे ह्या सर्वांना गाजावाजा न करता कार्यभाग कसा उरकावा ते कळत नाही. उलट ते करणार फारसे नाहीत पण त्याचा गाजावाजा इतका करतील की त्यांच्या विरोधकांना आयतेच कोलीत मिळते. उदाहरणार्थ असे ऐकले की मुंबईतल्या एका आस्थापनेत नोकरी मिळण्यासाठी "knowledge of Marathi mandatory" असे होते. तो नियम बदलून "knowledge of Marathi is desirable" असा केला. आता धडाधड परप्रांतीय त्या नोकऱ्या राजरोस मिळवतील आणि मराठीच्या नावाने दुकान चालवणारे पक्ष खळ्ळ खट्याक करत बसतील. पण शांतपणे कागदी डावपेच लढवून आपले उद्दिष्ट साधणे हे त्यांना जमत नाही. तीच गोष्ट घर वापसीची. ख्रिश्चनांनी सर ईशान्य भारत अजिबात गाजावाजा न करता ख्रिस्ती केला आणि हे पन्नास जणांना घर वापसी करवून ढोल बडवायला लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

भाजप , संघ परिवार, शिवसेना,

मदनबाण
Mon, 03/21/2016 - 10:32 नवीन
भाजप , संघ परिवार, शिवसेना, मनसे ह्या सर्वांना गाजावाजा न करता कार्यभाग कसा उरकावा ते कळत नाही. उलट ते करणार फारसे नाहीत पण त्याचा गाजावाजा इतका करतील की त्यांच्या विरोधकांना आयतेच कोलीत मिळते. अगदी... मुंबईतल्या एका आस्थापनेत नोकरी मिळण्यासाठी "knowledge of Marathi mandatory" असे होते. तो नियम बदलून "knowledge of Marathi is desirable" असा केला. आता धडाधड परप्रांतीय त्या नोकऱ्या राजरोस मिळवतील आणि मराठीच्या नावाने दुकान चालवणारे पक्ष खळ्ळ खट्याक करत बसतील. पण शांतपणे कागदी डावपेच लढवून आपले उद्दिष्ट साधणे हे त्यांना जमत नाही. तीच गोष्ट घर वापसीची. ख्रिश्चनांनी सर ईशान्य भारत अजिबात गाजावाजा न करता ख्रिस्ती केला आणि हे पन्नास जणांना घर वापसी करवून ढोल बडवायला लागले. जसा पोशाखात बदलाव केला तसा आता मोडस ओपरेंडी मध्ये सुद्धा बदल केला गेला पाहिजे ! जसे गळ्यात क्रॉस घालण्याचे फॅड गुपचुप आणले गेले तसेच ओम सुद्धा व्हावे ही इच्छा. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajram
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

उत्तम प्रतिसाद.

तर्राट जोकर
Mon, 03/21/2016 - 10:49 नवीन
उत्तम प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

ओव्हरऑल संत प्रकरणावर

नितिन थत्ते
Sun, 03/20/2016 - 17:46 नवीन
ओव्हरऑल संत प्रकरणावर कुबेरांनी तोंडसुख घेतले असल्याने कोणत्या संतांकडून दबाव आला हे कळायला मार्ग नाही. मागील काही वर्षांत संत मंडळींच्या भक्तांकडून मुस्कटदाबी झाल्याचे आणखी एक उदाहरण तुकारामभक्तांकडून घडले आहे.
  • Log in or register to post comments

मागील काही वर्षांत संत

मोदक
Sun, 03/20/2016 - 18:25 नवीन
मागील काही वर्षांत संत मंडळींच्या भक्तांकडून मुस्कटदाबी झाल्याचे आणखी एक उदाहरण तुकारामभक्तांकडून घडले आहे. बरोबर आहे. फक्त पाऊणे चारशे वर्षांपूवी गॅलिलीओ वर पण असाच दबाव आला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

..

विकास
Sun, 03/20/2016 - 19:09 नवीन
ओव्हरऑल संत प्रकरणावर कुबेरांनी तोंडसुख घेतले असल्याने कोणत्या संतांकडून दबाव आला हे कळायला मार्ग नाही. तसे म्हणा हवे तर. पण माझ्या लेखी कुठल्याच संताकडून हा दबाव आलेला असण्याची शक्यता नाही. पण खेद वाटण्यासारखे एकच आहे की जे लोकं कन्हैय्याच्या आचरटपणाला व्यक्तीस्वातंत्र्य म्हणत सांभाळत होते ते सगळे इतके (खर्‍याअर्थाने)बुद्धीवादी कुबेरांच्या बाबतीत पाठींबा देण्यासाठी पुढे कसे आले नाहीत? यातकुठल्या बुवाबाबाच्या चमत्कारा पेक्षा लिबरल्स लोकांच्या चमत्कारीक वर्तनाचे पितळ उघडे पडले असे म्हणावे लागत आहे... मागील काही वर्षांत संत मंडळींच्या भक्तांकडून मुस्कटदाबी झाल्याचे आणखी एक उदाहरण तुकारामभक्तांकडून घडले आहे. ती मुस्कटदाबी देखील अशीच कुठलाच जाहीर निषेध न करता झाली होती का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हे प्रकरण वेगळं आहे. कुठेही

तर्राट जोकर
Sun, 03/20/2016 - 19:24 नवीन
हे प्रकरण वेगळं आहे. कुठेही विरोध स्पष्ट आणि जाहीर नसतांना संपादकाने मी असा उल्लेख करुन लेख मागे घेणे विचित्र शंकांना जन्म देणारे आहे. ह्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणारे खरंच आहेत की नाहीत, खरंच झाला का नाही हेच कळले नसल्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गळा कसा काढणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ऑ?

विकास
Sun, 03/20/2016 - 19:31 नवीन
ह्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणारे खरंच आहेत की नाहीत, खरंच झाला का नाही हेच कळले नसल्याने .... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

ओ साहेब, स्वखुशीने आत्महत्या

तर्राट जोकर
Sun, 03/20/2016 - 19:50 नवीन
ओ साहेब, स्वखुशीने आत्महत्या करण्याच्या केसमधे कोणावर खुनाचा आरोप ठेवतात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अच्छा!

विकास
Sun, 03/20/2016 - 20:41 नवीन
स्वखुशीने आत्महत्या करण्याच्या केसमधे कोणावर खुनाचा आरोप ठेवतात काय? म्हणजे "संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल..." मध्ये स्वखुशी दिसत असली तर ती आत्महत्येच्या वेळेस लिहीलेल्या कुठल्याही पत्रात दिसली पाहीजे, नाही का? विशेष करून जेंव्हा आत्महत्या करणारी व्यक्ती, "I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That’s pathetic. And that’s why I am doing this." असे म्हणते, तेंव्हा इतरांना दोषी ठरवणे योग्य असते असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

माहित होतं तुम्ही हाच मुद्दा

तर्राट जोकर
Sun, 03/20/2016 - 21:29 नवीन
माहित होतं तुम्ही हाच मुद्दा काढाल. पण आता आपण मूळ मुद्द्यावर राहुयात का? संपादकांनी कोणत्या वाचकांच्या भावना दुखावल्या ते तर काही लिहिले नाही. तसे कोणी वाचक दिसतही नाहीत. कुठे काही विरोध प्रकटला नाही. संपादकिय मागे घेण्यामागचं कारण कुठेही स्पष्ट नसतांना स्वखुशीने केलेली आत्महत्या आहे असेच म्हणावे लागेल. ह्यात तुम्ही वेमुला केस घुसडू नका. अवांतरासाठी आम्ही बदनाम आहोत. आम्हालाच बदनाम राहु द्या. जगात आत्महत्या करणारा वेमुला पहिला इसम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

का का? तुम्ही वारीस पठाणच्या

आनन्दा
Mon, 03/21/2016 - 13:38 नवीन
का का? तुम्ही वारीस पठाणच्या वेळेस दुष्काळ काढलात ते बरोबर, आणि यांनी इथे रोहित वेमुला काढला ते चूक काय? असो.. तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या नाहेत असे ठरवून आलो होतो खरे तर, पण अनवधानाने प्रतिसाद टाइप झाल्यावर लक्षात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

चालेल ना वेमुला काढा, कन्हया

तर्राट जोकर
Mon, 03/21/2016 - 13:52 नवीन
चालेल ना वेमुला काढा, कन्हया काढा, गांधी, कोणीही कुठेही काहीही काढा, स्वातंत्र्य आहे. पण विषयांतर करतो म्हनून फक्त माझं नाव बदनाम करु नका म्हणजे झालं. बाकी वारीस पठाणच्या निलंबनासाठी जे विधानसभासदस्य एकत्र आले त्यांना जनतेच्या तातडीच्या कामांसाठी असेच एकत्र यायला का जमत नाही असा तो प्रश्न होता, पण तुम्हाला मला टार्गेटच करायचं असेल तर कुठलंही कारण पुरतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

बाकी सगळे जाऊद्या, मात्र

आनन्दा
Mon, 03/21/2016 - 15:52 नवीन
बाकी सगळे जाऊद्या, मात्र गिरीश कुबेरांनी स्वखुशीने आत्मह्त्या केली आहे, ही मात्र खूपच भावले. जे काही झाले त्याला "आत्महत्या" यापेक्षा समर्पक उपमा असूच शकत नाही. मला असे वाटते की आपण १ दिवस लोकसत्ता न घेऊन काही फरक पडणार नाही, तर पुढचा पूर्ण महिना लोकसत्ता न घेऊन गिरीश कुबेरांना पाठिंबा दिला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आम्ही तर कैक वर्षे झाले बंद

तर्राट जोकर
Mon, 03/21/2016 - 16:13 नवीन
आम्ही तर कैक वर्षे झाले बंद केलाय. आता कसा पाठिंबा द्यावा? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

यात कुठल्या बुवाबाबाच्या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/21/2016 - 14:30 नवीन
यात कुठल्या बुवाबाबाच्या चमत्कारा पेक्षा लिबरल्स लोकांच्या चमत्कारीक वर्तनाचे पितळ उघडे पडले असे म्हणावे लागत आहे... १००० टक्के हे न समजलेले लोक झोपलेले नसून झोपेचे सोंग घेऊन आहेत, हे केजीतल्या पोरालाही सांगण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

थत्तेचाचा

मितभाषी
Sun, 03/20/2016 - 21:42 नवीन
तुम्ही आनंद यादवांबद्दल म्हणताय का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

...

hmangeshrao
Mon, 03/21/2016 - 04:56 नवीन
प्रभावशाली व्यक्तीचा धर्म देव इतरानी फॉलो करणे यात गैर काहीच नाही... पेशवाईचा नगारा वाजत होता ता काळात पेसवे पुजतात म्हणुन गणेशभक्त वाढले व अश्टविनायकांचे प्रस्थ वाढले. ..... मुसुलमान फार वैट ! इथे येऊन ते दिल्लीत राजे झाले. ख्रिस्चन फार वैट ! इथे येउन अनाथालये व कुश्टरोगी आश्र्म काढले व नोबेल मिळवले. ( हे सगळे ' तुम्ही ' का नै केले ? ग्लानीर्भवती झाला होता काय? असं मात्र इचारायचं नाही . ) . ... पैशाचं मिंधेपण ! हं ! ते तर सगळीकडेच असते. एक कुठले तरी कुडमुडे पारितोषिक वाघाकडुन घेताना एक बटाटा बोलला होता ... ही लोकशाही आहे की ठोकशाही ? वाघाने पंजा उगार्ताच बटाट्याने शब्द गिळले होते ना ? ........ तसेही कुष्ठरोग आश्रम आता टीबी एड्समध्ये कन्वर्त होत चाललेत कारण कुष्ठर्ग्ण आता कमी होत चाललेत. त्यामुळे हिंदु संघटनानीही आता टीबी एड्सचे आस्रम खोलावेत व २०५० चे नोबेल घेण्याचे टार्गेट ठेवावे.
  • Log in or register to post comments

स्वागत

विकास
Mon, 03/21/2016 - 06:33 नवीन
मिसळपाव.कॉम वर आपले स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

...

hmangeshrao
Mon, 03/21/2016 - 08:09 नवीन
कोदलानीबैना सध्या तसेही काही काम नाही. त्याना एखादा आश्रम काढुन दिल्यास त्यांचे , रुग्नांचे व हिंदु धर्माचे भले होइइल. २०५० चे नोबेल घेण्यास शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

बटाटा कोण?

मितभाषी
Mon, 03/21/2016 - 12:34 नवीन
बटाटा कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

.

hmangeshrao
Mon, 03/21/2016 - 17:48 नवीन
बाळासाहेबांच्यआ हस्ते पुलना एक पुरस्कार मिळाला होता. तो स्वीकारुन लगेच पुलं बोलले होते के हे सरकार लोकशाही आह की ठोकशाहीचे ? ठाकरेनी फटकारले होते ... आमच्यचकडुन पुरस्कार घेउन आम्हालाच बोलता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

पुलंना बटाटा म्हणाण्यामागे

मृत्युन्जय
Mon, 03/21/2016 - 17:53 नवीन
पुलंना बटाटा म्हणाण्यामागे काही कारण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

..

hmangeshrao
Mon, 03/21/2016 - 18:34 नवीन
सिम्बोलिक हो .. बाघोबा आणि बटाट्याची चाळ नावे लिहिणे टाळायचे होते म्हणुन लिहिले होत्व. पण घटना व त्या बातम्या जगजाहिर आहेत म्हणुन नावे लिहिण्यात काही प्रॉब्लेम नसावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

इथे चर्चा वाचुन एक नक्की कळलय

अर्धवटराव
Mon, 03/21/2016 - 07:57 नवीन
तर सदर प्रकरण 'असहिष्णुता' कॅटॅगरीत मोडत नाहि, त्यामुळे त्याचा निषेध वगैरे करण्याचं काहि कारण नाहि. हायबर्नेटमोड मधे वावरणार्‍या मिपाकरांना चार शब्द वकिली थाटात भिरकावयाला मिळाले. काहिंनी मुख्य मुद्दे बाजुला फेकत आपले जुनेच दळण कांडण उकरुन काढले. काहि नवसदस्यांनी आपण जुनेच असल्याचे पुरावे दिले... एव्हढी उपलब्धी काहि कमि नाहि.
  • Log in or register to post comments

मिपाचे मुक्तपीठही होण्यास

मोदक
Mon, 03/21/2016 - 08:45 नवीन
मिपाचे मुक्तपीठही होण्यास आणखी वेग मिळाला हे नोंदवायचे विसरलात का? ;) (ह घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ख्या.ख्या. ख्या...खि क्क. ;)

मदनबाण
Mon, 03/21/2016 - 08:53 नवीन
ख्या.ख्या. ख्या...खि क्क. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajram
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ऑल इंडिआ बकचोद (AIB) नामक

अनुप ढेरे
Mon, 03/21/2016 - 10:18 नवीन
ऑल इंडिआ बकचोद (AIB) नामक ग्रुपने त्यांच्या एका कार्यक्रमात ख्रिस्ती धर्माची यथेच्छ टवाळी केली होती. आरडाओरडा झाला. सुरुवातीला माफी अजिबात मागणार नाही अशी भूमिका घेतली त्यांनी. पण नंतर काय झालं माहिती नाही. दोन दिवसांनी मुंबैच्या एका चर्च अधिकार्‍याची प्रतेक्ष भेट घेऊन माफी मागितली. त्याचा फोटोदेखील प्रसिद्ध झाला.
  • Log in or register to post comments

या घटनेतुन काही गोष्टी सिद्ध

मृत्युन्जय
Mon, 03/21/2016 - 11:48 नवीन
या घटनेतुन काही गोष्टी सिद्ध होतातः १. देशातली असहिष्णूता वाढत चालली आहे आणि त्यासाठी सध्याचे सरकार अथवा हिंदु जनता जबाबदार आहे असा जो कांगावा केला जात आहे तो धादांत खोटा आहे.. २. सहिष्णुता फक्त हिंदुंमध्येच असली पाहिजे. इतर धर्मीयांना हा नियम लागू नाही, ३. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे थोतांड मांडणारे प्रेस्टिट्युट्स सिलेक्टिव्ह गोष्टींकडे बरोबर काणा डोळा करतात. ४. भावना फक्त हिंदोतेर लोकांना आहे. हिंदु लोकांना कुठल्याही धार्मिक / सामाजिक भावना अथवा जाणीवा असता कामा नये. ५. अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त हिंदुंविषयी गरळ ओ़कण्यासाठी आहे. ६. हिंदु वगळता इतर सर्व धर्मांमध्ये चमत्कार होतात. हिंदु धर्मातील अश्या गोष्टींवर मात्र जळाजळीत टीका केली जाइल. ७. कोणीही यावे आणि हिंदुंना मारुन जावे. एक्खाद्या राजकीय पक्षाने त्याविरुद्ध आवाज उठवला की ते "अतिरेकी " आणि असहिष्णू ठरावेत. इतर धर्मीयांचा चुकांवर कुणी बोट ठेवले तर काय होते ते दिसलेच. ८. गिरीश कुबेर पक्के दुतोंडी आणी ढोंगी आहेत. त्याची शिरजोरी फक्त सात्विक संताप येणार्‍या लोकांविरुद्धच. असे कोणी नरडे दाबले की *गणाला पाय लावुन पळत सुटतात.
  • Log in or register to post comments

"असंतांचे संत" एक उत्तम लेख

बाळ सप्रे
Mon, 03/21/2016 - 11:50 नवीन
"असंतांचे संत" एक उत्तम लेख होता. तो मागे घेण्याचे पाउल निश्चितच पळपुटेपणाचे वाटले. त्यातही धागालेखकाला रामदेवबाबा व श्रीश्रींचा छोटासा उल्लेख खटकला.. कमाल आहे!!
  • Log in or register to post comments

निरीक्षण

विकास
Mon, 03/21/2016 - 16:02 नवीन
त्यातही धागालेखकाला रामदेवबाबा व श्रीश्रींचा छोटासा उल्लेख खटकला.. त्यात मी, अग्रलेखात अनावश्यक असलेला बुद्ध आणि वहाबी धर्माच्या उल्लेखांबद्दल पण लिहीले आहे. पण कदाचीत तुम्हाला ते दिसले नसावे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अनावश्यक असलेला बुद्ध आणि

बाळ सप्रे
Mon, 03/21/2016 - 16:57 नवीन
अनावश्यक असलेला बुद्ध आणि वहाबी धर्माच्या उल्लेखांबद्दल
इतर धर्मांचा उल्लेख अनावश्यक अजिबात नव्हता.. राजसत्तेला लोंबकळणारी धर्मांची दुकानदारी असा विषय असल्याने सर्व धर्मांना सारखेच फटकारणे योग्यच होते या निमित्ताने.. बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

:)

विकास
Mon, 03/21/2016 - 17:08 नवीन
बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !! "हिंदूविरोध" हा तुम्हाला दिसला. मला नाही. नाहीतर वहाबीबद्दल लिहीले नसते आणि लिहीलेले तुम्हाला दिसले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

हिंदूविरोध या प्रकरणात नाही

बाळ सप्रे
Mon, 03/21/2016 - 17:26 नवीन
हिंदूविरोध या प्रकरणात नाही म्हणत आहे.. इतर बर्‍याच ठि़काणच्या आक्षेपाबद्दल आहे ते.. बाकी मला वहाबी न दिसण्याचा काही प्रश्नच नाही.. मला कुठल्याही धर्माविषयी अजिबात आत्मीयता नाही.. सर्व धर्म थोड्याबहुत फरकाने एकाच माळेचे मणी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

बाकी हिंदू धर्माविषयी

तर्राट जोकर
Mon, 03/21/2016 - 17:10 नवीन
बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !! >> अचूक पकडलंय सप्रेसाहेब. उदा. 'होळीला पाणी वाचवा' म्हणणे, प्लास्टरऑफपॅरिसच्या गणपतीला विरोध, दिवाळीचे फटाकेविरोध, इत्यादी, हे हिंदूसणांविरुद्धचे कारस्थान आहे असे म्हटले जाते. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

नाही हो!

विकास
Mon, 03/21/2016 - 17:13 नवीन
तसं नाही काही... पण स्वतः काय करावे हे पहाण्याऐवजी इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना! उगाच कशाला असहीष्णुता वाढवायची! बरोब्बर की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

सीपीयु ह्यांग झाला माझा. जरा

तर्राट जोकर
Mon, 03/21/2016 - 17:16 नवीन
सीपीयु ह्यांग झाला माझा. जरा विस्कळीत करुन सांगा काय म्हनायचे आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

:)

विकास
Mon, 03/21/2016 - 17:22 नवीन
इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना! अजूनही समजले नसेल तर मी माझे हे गीतापठण थांबवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

इतरांनी काय करावे हे सांगणे

बाळ सप्रे
Mon, 03/21/2016 - 17:34 नवीन
इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना!
जे खटकतय ते सांगणं हा व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला नव्हे. कोणी पाणी वाचवण्यासाठी कींवा नदी प्रदूषण थांबवण्यासाठी होळीच्या कार्यक्रमावर किंवा गणपती विसर्जनावर हल्ला वगैरे केल्याचे ऐकिवात नाही .. आवाहन करण्यात काही चूक नाही. ज्यांना पटेल त्यांनी करावं , नाही ते करतातच आहे आपापल्या मनासारखं .. असो.. खूप अवांतर व्हायला लागलय ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा