समर्थाचिया सेवका वक्र पाहे...
गेल्या ६ ते ८ महीन्यांमध्ये असहीष्णुता आणि त्याला अनुसरून व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच कसा सद्य भारत सरकारच्या कारभारामुळे होत आहे यावरून माध्यमात कशी आणि कुठल्या कुठल्या कारणाने चर्चा झाली, हे येथे सांगत बसायची गरज आहे असे वाटत नाही... :)
हे सर्व चाललेले असताना वास्तवीक तमाम वृत्तपत्रे-माध्यमे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पण कडक टिका करण्यात मागे पडत नव्हती. ही टिका केवळ सरकारवरच नव्हती तर बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानावर देखील तितकीच होती आणि अजूनही होते. काही वेळेस तर ती श्रध्दास्थानापेक्षाही दहशतवाद्यांना शिक्षा दिलेल्या कशा चुकीच्या होत्या, ते कसे बापडे होते असे सांगत सर्वोच्च न्यायालयावर पण अप्रत्यक्ष टिका होती. अनेकांना ती आवडली नव्हती हे वेळोवेळी आलेल्या विविध सामाजिक माध्यमांतील प्रतिक्रीयातून स्पष्ट होत होते. तरी देखील वृत्तपत्रे आणि टिव्ही माध्यमांना त्यांच्या भावनांपेक्षा व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचे वाटले. व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचेच आहे आणि सत्याला धरून जर समाजोपयोगी टिका असली तर ती नेहमीच करावी अशा मताचा मी आहे. म्हणूनच, येथे एक स्पष्ट करू इच्छीतो की जी टिका ही सत्याला धरून असेल, तर्क-"सुसंगत" असेल ती कुणावरही केली असली तरी योग्यच आहे. वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम करणे हे नुसते पोटभरू संपादक नसल्याचे लक्षण आहे, ते समाजातील एका प्रमुख घटकाचे जिवंतपणाचे लक्षण आहे.
आज हे सगळे लिहायचे कारण म्हणजे, १७ मार्चच्या लोकसत्तेत आलेला "असंतांचे संत" हा मदर तेरेसा - पोप/कॅथलीक संस्थेवर टिका करणारा अग्रलेख लिहीला गेला. अर्थात हा अग्रलेख देखील "सेक्युलरी समतोल" वृत्तीने लिहीला होता. म्हणजे असे की सुरवातीसच बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर यांना फटकावले होते, अशोकाचा बुद्ध धर्मप्रसार आणि सौदी अरेबियातील वहाबी धर्म वगैरे सर्वांना आणले होते. पण मूळ विषय होता, मदर तेरेसांना बहाल केले जाणारे संतपद आणि प्रामुख्याने टिका होती, ती कॅथलीक संस्थेवर आणि त्यांचा रोख राज्यविस्तारावर कसा असतो या संदर्भात. संतपद देताना चमत्कार कसे बघितले जातात या संदर्भात, वगैरे, वगैरे...
ज्यांना सध्याच्या लोकसत्तेच्या अग्रलेखांचा रोख माहीत आहे, त्यांना (सेक्युलरी समतोलपणा असला तरी) सुखद आश्चर्य वाटले... वास्तवीक आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. जे लिहीले होते ते बुद्धीवादी होते आणि ज्यांच्या बुद्धीवादाचा कमीजास्त प्रभाव आहे अशा ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवळकरांचे जे काही परखड विचार मदर तेरेसांबाबत होते त्याचेच ते थोडेफार प्रतिबिंब होते, असे कुठेतरी वाटले. (अर्थात ती कॉपी नव्हती हे देखील खरेच ध्यानात ठेवावेत).
पण जो चमत्कार कुठल्याही संतपदाला पोचलेल्या व्यक्तीला उभ्या हयातीत जमला नसता, तो या निमित्ताने झाला! १७ मार्चच्या अग्रलेखावर १८ मार्चला लोकसत्तेच्या छापिल आणि ऑनलाईन आवृत्तीत, "असंतांचे संत - क्षमस्व! प्रिय वाचक!, ‘असंतांचे संत’ या १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. – संपादक" अशी लोकसत्तेच्या वतीने नाही तर संपादकाच्या वतीने माफी मागितली गेली. अग्रलेख तात्काळ अप्रकाशीत केला गेला.
२४ तासाच्या आत, बिगरसरकारी, बिनचेहर्याच्या, बिन (जाहीर) आवाजाच्या कुठल्यातरी अज्ञात शक्तीने एका वृत्तसंपदाकचे व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच केला.
माझ्याकडे आकडेवारी नाही पण माझ्यालेखी सुसंगत तर्क आहे: लोकसत्ता हे मराठी वाचकांचे पत्रक. आजपर्यंत त्यात अनेकदा बहुसंख्यांकांच्या भावना दुखावणारे लिहून आले आहे आणि त्यावर अनेकांनी टिका देखील केली आहे. त्यामुळे हा लेख मागे घेण्याचे कारण बहुसंख्य असणे जरा अवघड वाटते. बहाई आणि बुद्ध धर्माचा उल्लेख आला असला तरी तो संदर्भापुरताच, पक्षि: टिका करणारा उल्लेख नाही. फक्त, त्यांच्याबद्दल पण लिहीले आहे असे for the record ठेवायला म्हणून आलेला आहे. म्हणजे त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रश्न नाही. मग एकूण टक्केवारीच्या किती जण हे कॅथलीक आहेत जे मराठी आहेत आणि जे लोकसत्ता वाचतात आणि ज्यांनी तो अग्रलेख वाचल्याने त्यांच्या भावना दुखावल्या? लोकसत्तेच्या अग्रलेखांमधील प्रत्येक विचाराशी मी सहमत असेनच असे नाही, पण भाषा आणि माहितीसाठी ते नक्कीच चांगले असतात. तरी देखील असे वाटते की या अग्रलेखांना लोकसत्तावाचक मराठी समाज ही एक अपरीहार्य मर्यादा आहे. तरी देखील जर तात्काळ माफी मागावी लागत असेल तर खरेच धक्कादायक आहे.
वास्तवीक जे झाले ते दुर्दैवी आहे... एक टिकात्मक अग्रलेख मागे घ्यावा लागला म्हणून नाही, मदर तेरेसा अथवा कॅथलीक्स वरील टिका होती म्हणून तर अजिबातच नाही. तर या प्रकरणात जो काही तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला गेला आहे, त्यासंदर्भात हे अधिक वाटले.
कधी काळी समर्थ रामदासांनी, "समर्थाचीया सेवका वक्र पाहे..." असे म्हणले होते. अर्थात या घटनेत समर्थ कोण आहे, तसेच कोणी त्याच्या सेवकाकडे वक्र पाहीले हे स्पष्ट झालेच आहे. पण या निमित्ताने ज्यांना रामदासी वाड्मय आवडते, ज्याचा ते अभ्यास करतात, त्यांनी त्याचाच उपयोग करून, आपल्याला अभ्यास-साधनेतून आलेल्या विद्वत्तेच्या देणगीचे आत्मपरीक्षण करावे नाहीतर..
"जनी हीत पंडीत सांडीत गेले।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे।
मना सर्व जाणीव सांडुनि राहे"
असे म्हणायची वेळ येऊ शकते.
प्रतिक्रिया
+१
+१
अरेरे... श्री.गिरिष कुबेर आणि
जाता जाता :- मदर तेरेसा
वेग़ळा उद्देश
विकासराव आपल्या लेखनाचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasamएक्स्प्रेस समूहाने पूर्वी
अतिशय चुकीचे
ह्या लेखातील पिग्गी बँक वरती
गंभीर फरक...
+१
हा फोटो बेरक्या उर्फ नारद च्या साईट वरचा आहे
माझ्याकडे छापील लोकसत्ता येतो
हा फोटो
हम्म
सहिष्णुता
कॅथाॅलिक पंथात संतत्व कसं दिलं जातं
धाग्याचं टायटल चुकलं साहेब
ऑनलाईन आवृत्तीत मागे घेणे
पंख लागणे
इतरांच्या लेखाला पंख लागू दे
दुश्मन्या
+१
निदान शार्ले हेब्दोच्या
अर्थस्य पुत्रो दासः
अभ्या
अनाकलनीय पाऊल
हा फारच धक्कदायक प्रकार आहे..
संपादकाच्या मागे आपण अश्या प्रसंगी उभे
किमान पुढच्या वेळी तरी
+१
धन्यवाद
जाताजाता- कालच कायअप्प वर
ॐ कुबेराय नमः
आम्ही वृत्तपत्र
+१
हा म्हणजे अगदी मास्टरपीस आहे
आम्ही वृत्तपत्र
अग्रलेख प्रसिद्ध झाल्यापासून
?
हा तो लेख, मोबल्यावरुन फोटो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasamलोकसत्ता {संपादकांचे} यांचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasamदोन अग्रलेख - दोन तर्हा!
चित्र दिसत नाही
आता दिसतयं का?
हो.
लोकसत्ताच्या व्यवस्थापनाचा निषेध
खरे कारण
नक्की कुठले?
दुवा असेल तर डकवा...
Pagination