Skip to main content

माध्यमे

अभिनेते, अभिनेत्रीची बेटावर सुटी

लेखक केदार पाटणकर यांनी गुरुवार, 07/09/2023 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानपत्रांमध्ये विविध तऱ्हांच्या बातम्या असतात. सर्व तऱ्हांच्या बातम्या प्रसिध्द करणे हे वर्तमानपत्रांचे कर्तव्य (!) आहे. सध्या कोणत्या तरी एका बेटावर अमुक अभिनेत्रीने वा अभिनेत्याने सुटी घालवली, अशा बातम्या मोठ्या प्रमाणात इ-आवृत्तीमध्ये दिसतात. बातमीसोबत बिकिनीतले मोठे फोटोही असतात. अशा बातम्यांना बातमी म्हणून अर्थ असावा पण त्या बरीच जागा व्यापतात. एखाददुसरा फोटो कमी करून , मजकूर थोडा कमी करून इतर बातम्यांना जागा दिली जावी.

समर्थाचिया सेवका वक्र पाहे...

लेखक विकास यांनी शुक्रवार, 18/03/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ६ ते ८ महीन्यांमध्ये असहीष्णुता आणि त्याला अनुसरून व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच कसा सद्य भारत सरकारच्या कारभारामुळे होत आहे यावरून माध्यमात कशी आणि कुठल्या कुठल्या कारणाने चर्चा झाली, हे येथे सांगत बसायची गरज आहे असे वाटत नाही... :) हे सर्व चाललेले असताना वास्तवीक तमाम वृत्तपत्रे-माध्यमे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पण कडक टिका करण्यात मागे पडत नव्हती. ही टिका केवळ सरकारवरच नव्हती तर बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानावर देखील तितकीच होती आणि अजूनही होते.

सुंदर पिचई आणि ऐंशीच्या दशकातली गरीबी...

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 23/08/2015 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
सुंदर पिचईबद्दल लेख वाचला लोकमतमधे... आजकाल कुणीही यशस्वी झाला की तो कसा गरिबीत जगला याचं फारच चर्वितचर्वण करतात बॉ पत्तर्कार लोक. काय तर म्हणे "तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं.. अरे काय राव गरिबाची चेष्टा करताय. हे ऐंशीच्या दशकातल्या एका साध्या गरिब मध्यमवर्गीय कुटूंबाचं वर्णन आहे का? आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय?