Skip to main content

अशी कबुतरे येती...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 12/03/2016 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
सध्य:स्थितीत रहात असलेल्या जागेत ह्या कबुतरांनी ग्यालरीत जे डांबरी'करण सुरु केलय..त्याला तोड नाही.खरच नाही. कारण घासून काढायला पत्रा किंवा फावडं जरी वापरलं तरी "ते वाळलेले" तुटत काहि नाही. मेलं इथे उद्वेगानी "श्शी!" पण म्हणता येत नाही! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे! ,अशी विनम्र विनंती.(नैतर काहि हुच्च अभिरूचीसंपन्नतावादी येतील परत आपले किरटे नाक घेऊण हुंगायला! ) पहावं तिथे ह्यांची हागी पडलेली,आणि त्यात ती मेली म्हणे ऑक्साइडं असतात..त्यानी ग्यालरीच्या लादीची पुरती वाट लागते,किंवा वाळत टाकलेल्या कपड्यांवर जर "ती" पडली,तर ते वाटेला लागतात. (ह्या हागी शब्दावरूनच ल्हान मुलांच्या डायपर नामक वाळून योग्य जागी कडक-होणार्‍या वस्त्रास 'हागीज' असे उत्-प्रेरक नाव पडले असावे काय!? ;) ) असो! अशी कबुतरे येती आणिक हागी सोडूनी जाती दोन शिटे ती सांडत सांडत,ग्यालरी रंगवूनी जाती॥धृ॥ वि'हंग पहिला तारेवरला, शिटण्यासाठि उभा राहिला जरा बाजूनी पाय सरकूनी, खाली-सोडूनी देती हकलून देता पुन्हा आले, जिथे बसावे तिथे(च्च!) बैसले धुतले नंतर तरि निरंतर बाधित झाली लादी पंख एक तो हळू थरथरला,शेपटी मागून वरी उचलंला वाळत पडल्या कपड्यांमधूनी, ओघळ खाली येती किती करावी? यांस हकाटी, हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करोनी फिरवूनि काठी त्या भरल्या कठड्यांच्या गाथा, याद अजुनही देती ==========================================
लेखनविषय:

वाचने 19077
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

हेच्चं कबुतरांबद्दल केलं असतत तर कविता पाडायची वेळ नसती आली. बाकी तुम्ही कबुतराची एक जोडी पाळाचं. तेवढचं मोबल्याची रेंज गेली की कबुतर जा जा जा म्हणुन पेहेले प्यार की पहिली चिठ्ठी वगैरे करता आलं असतं. उत्तरादाखल पावशेर हिंग, दोन किलो कांदे, पावशेर मिरच्या आणा घरी एताना वगैरे चिठ्ठ्या चकटफु पाठवता आल्या असत्या =)) =))

असे जातिवंत होती आता कबुतरावर घसरती दोन दिसाची कबुतर संगत मुळातली न लपविता रति बदलले बुवा "खुळे बोलले मी वर त्यात तेल ओतले नव्हेच अंतर काल आजच्या कवितेची बुलशिट क्रांति

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बाळ क्याप्टन. बुवांची चेष्टा कुणी आणि किती करावी ह्याचे लॉजिक शिकायला अजून लै वर्षे आहेत तुला. तूर्तास तुझी काडी न पेटवता ठेवलीस तरी चालेल.

कबुतरांचा असा त्रास लग्नाच्या आधीही होता की नंतर सुरू झालाय? अहो तुमच्या आयुष्यात शांती टिकून रहावी म्हणून येत असतील हो ती.... असो......तुम्ही टीशू पेपर आणि कपडा ठेवत चला..... शिकलेली असली तर बरं पडेल..... आप्लं घर तो त्यांचा शिटारखाना ! काळाचा महिमा.....

=))

कविता चांगली जमलीय. यावर उपाय ( स्वस्तातला ) केलाय.माशाचं जाळं आणलं आणि लावलं.तीनशे रुपयात काम झालं.

हगु आणि बुवाचे जन्मोजन्मीचे नाते अहे, हे परत अधोरेखित झले.बिचारी कबुतरे, त्यांनाही तांब्या घेउन उडावे लागेल. - हगुबुवाच्या शॊच कवितांचा फॅण ( इस्पा)

अगदी याच समस्येने त्रस्त आहे. बाल्कनीची कबुतर हागणदारी झाली आहे. :( अगदी how to get rid of pigeons वगैरे गुगलल्यानंतर सापडलेले जे जे उपाय करता येतील ते ते सारे करून पाहिले. पण नो लक.
माशाचं जाळं आणलं आणि लावलं.तीनशे रुपयात काम झालं.
हाच उपाय सोसायटीमधील इतरांनी केला आहे. मला तसे जाळे लावून बाल्कनी बंदिस्त करण्याची ईच्छा होत नाही. मावळतीचा सूर्य छान दिसतो बाल्कनीतून. ते असं बंदिस्त करायचं नाही. कुणाला दुसरा काही उपाय माहिती आहे का?

In reply to by सतिश गावडे

माझीही हीच समस्या आहे. त्यांची घरटी,काड्या,आणि घाण या गोष्टींचा त्रास कमी म्हणून की काय त्या कबूतरांची अंडी खाण्यासाठी कावळे येतात आणि बाल्कनीतल्या वाळत घातलेल्या कपड्यावर घाण करतात. पण मला तसे जाळे लावून बाल्कनी बंदिस्त करण्याची ईच्छा होत नाही. मावळतीचा सूर्य छान दिसतो बाल्कनीतून. ते असं बंदिस्त करायचं नाही. हेही तितकेच खरे.(आमच्या बाल्कनीतून उगवता सूर्य दिसतो.)

In reply to by कंजूस

धन्यवाद काका. स्वतः विणणे जरा अवघड दिसते. मात्र बाजारातून विकत आणून लावून पाहतो.

घरी दारी कबुतरांगोळी ;) बाकी दुपारीच जेपी कबुतर का बदला शिनमा बघत होते अचानक त्याची आठवण आली. अवांतर- गुर्जींबद्दल कसलं वैर असावं बरं कबुतरांचं? :P

क्या बात है...! एक सहज सुंदर कविता. आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच दिसणाऱ्या घटनेवर बुवांनी काय मार्मिक भाष्य केले आहे पहा ना. चार शब्दांतून ते जणू व्यथारुपी आशयच इतरांना सांगत आहेत. आपण तर कर्जदार झालो राव तुमचे. आम्हाला तुमच्या चाहत्यांच्या जगात एक स्थाण द्या ना प्लीज.

In reply to by प्रचेतस

एक सहज सुन्दर मार्मिक प्रलयकारी नव्हे प्रत्ययकारी रसग्रहण ! कदाचित कबुतरे गुतरघुम चे ट्रेनि़ग द्यायला तर येत नसतील ना ? काय तुमचे काय संंशोधन आहे ?

In reply to by चौकटराजा

अगदी खरे आहे. प्राचीन काळापासून कबुतरे ही प्रेमाची प्रतिके म्हणून ओळखली जातात. कदाचित म्हणूनच ती बुवांना गुटर्रघूम गुटर्रघूम चे ट्रेनिंग द्यायला (सध्या) येत असावीत. आता ती येणार म्हटल्यावर त्यांनी शिटावे तरी कुठे? त्यासाठी बुवांची वीथिका त्यांना आदर्श जागा वाटल्यास नवल नव्हे. बुवांनी येथे काव्य खरे तर उद्वेगाने नव्हे तर कबूतरांपोटी असलेल्या आस्थेतूनच प्रसवलेले असल्यास नवल नव्हे. - रसग्राहक प्रचेतस(थेट रायगडावरुन)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आली कुथूनशी ती स्मायली आली आग्डोमम्ब घेऊन नाद ठो ठो ठो ठो करीत येई सिंहगड रस्त्यातून

In reply to by चौकटराजा

शक्यता क्र १. बुवा अलिकडेच बाल्कनी (पक्षी गच्ची) उघडू लागलेत (पुन्हा पक्षी वापरू लागलेत) शक्यता क्र २. बुवांना त्यांच्या मिपावर त्रिकाळी हजर राहण्याची शि़क्षा म्हून गॅलरीत (पुन्हा पक्षी बाल्कनीत) निवास करावा लागतो काय ? शक्यता क्र ३. कबुतरे आणि (त्यांचे) इतर नातेवाईक-सखे यांनी बुवांनी (अनावधानेने) ठेवलेले चारोळी (पक्षी मी माझा तर माझा कुणाचा) हे अनमोल ग्रंथातील पाने वाचलीत काय? आणि शीघ्र काव्यप्रेमी सहवास असावा या नैसर्गीक उर्मीने ते बाल्कनीत आले असावेत काय ? शक्यता क्र ४.बुवा पुर्वी बाल्कनीत येत असतील तर तेव्हा (त्यांना) कुठली कबुतरे दिसत असतील व त्यांचा काही त्रास होता काय? अता होतो तसाच की वेग्ळा? शक्यता क्र ४.हा धागा घरी दाखवून (प़क्षी प्रूफ तपासून) इथे टाकलाय काय ? (कारण आपण निरूप्नात हात आखडता घेतल्याचे उघड दिसत आहे. वल्ली संचालीत अभ्या पुरस्कृत चौरा मार्गदर्शीत "बुवा चाहता संघ व भावविश्व चक्री पारायण महामंडळा तर्फे धागा-कपोत हितार्थ जारी

In reply to by नाखु

ए सी पी प्रद्युम्न तुमचे तर्क सही आहेत पण दया ( प्रेव्चेटूक) यांच्याशी सल्लामसलत करून काय तो निषकर्ष काढा म्हण्जे पार्टीसकट ग्यालरीवर धाड ठाकू. बाकी ते अभ्या पुरस्कृत म्हणजे काय ? पुढेमागे कविता "ह"संग्रह निघाला तर ""मुख" व मल प्रुष्ठाची सोय आताच करून ठेवली की काय ?

In reply to by चौकटराजा

सुप्त हेतू आहेच पण "कुंथुनाथांची कुंचलेगिरी" या नावाने एक पुस्तीक करण्याचे घाटत आहे प्रस्तावना बॅट्टमण करणार आहे.त्याचीही तजवीज अत्ताच करून ठेवली.

In reply to by पियुशा

जिल्बुचा, आपण हत्तीवर एक कचकूण जिल्बी पाडायची का!? सारका मले ढुश्या देत फिरत असतो. https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif नीच, हलकट ! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

रुपक कविता म्हणून खूप भावली.
  1. कवी म्हणजे मिपावर प्रेम करणारा एक संवेदनशील मिपाकर,
  2. बाल्कनी म्हणजे हक्काचे विरंगुळ्याचे स्थान (मिपा),
  3. अन कबुतरांनी केलेली घाण म्हणजे राजकारणावरच्या न संपणार्‍या दर्जाहीन चर्चा....
__/\__.

In reply to by श्रीरंग_जोशी

ह्या रंगा तू फारच अळणी बूवा ! हे तुमच्या सारखे गुढगुंजन वाले समीक्षक कायच्या बाही लिहितात व कवितेच्या मूळ अंगाला अगदी मल फासतात शी शी !

एकेकाळच्या तांबीय संप्रदायप्रमुखाधिपतींवर अशी वेळ यावी ना ! उचल रे बाबा उचल (कबुतरांना ) =))

वि'हंग पहिला तारेवरला, शिटण्यासाठि उभा राहिला जरा बाजूनी पाय सरकूनी, खाली-सोडूनी देती पंख एक तो हळू थरथरला,शेपटी मागून वरी उचलंला वाळत पडल्या कपड्यांमधूनी, ओघळ खाली येती
क्या बात है......! कसलं जबरदस्त निरिक्षण आहे. आख्खा प्रसंगच डोळ्यांसमोर उभा राहतोय. आता माझ्या नजरेसमोर एक कबूतर हलकेच पंख थरथरवंतय... शेपटा मागून हळूच तो पंख वर होतोय आणि.. आणि... वाहव्वा आत्मूस, तुमच्या लेखणीतली ताकदच अशी की रसिक माणसाला त्या दृश्याशिवाय इतर कुठलेच दृश्य डोळ्यांसमोर येणारच नाही. तुमच्या ह्याच काव्यगुणांवर आम्ही फ़िदा आहोत. ह्या निमित्ताने आम्हाला तुम्ही तुमच्या चाहत्यांच्या जगात स्थाण द्यावे ही प्रलंबित मागणी आम्ही पुन्हा रेटत आहोत.

In reply to by प्रचेतस

ह्या निमित्ताने आम्हाला तुम्ही तुमच्या चाहत्यांच्या जगात स्थाण द्यावे... ++१००००

In reply to by प्रचेतस

कवी आणि धन्य ते रसीक (चतुर गुणग्राही,चलाख भावविभोर वगैरे) आज कबुतरेही आप्लया कर्माने कृतकृत्य झाली असतील. अति अवांतर : पोपशास्त्रींकडे कबुतरे उडविण्याचा किंवा टाळण्याचा उपाय असेल असे वाटते. माहीती देवाण घेवाण केल्याने साहीत्य निर्मीती होते असे मुवी बाबा म्हणतात ते खोटे नाही . पार वाच लेला नाखु

In reply to by प्रचेतस

@ह्या निमित्ताने आम्हाला तुम्ही तुमच्या चाहत्यांच्या जगात स्थाण द्यावे ही प्रलंबित मागणी आम्ही पुन्हा रेटत आहोत.>> http://freesmileyface.net/smiley/tongue/mockery-056.gif

बुवाना कबुतरांचा एक फायदा जरूर आहे. त्याना वश करून घ्या बुवा ! सिन्हगड रोडचे सेन्द्रिय डांबरीकरणाचे कंत्राट मिळेल. शिवाय मॅगसेसे सारखे एखादे पारितोषिक या " नव्या" प्रयोगासाठी मिळेल.

बुवाना कबुतरांचा एक फायदा जरूर आहे. त्याना वश करून घ्या बुवा ! सिन्हगड रोडचे सेन्द्रिय डांबरीकरणाचे कंत्राट मिळेल. शिवाय मॅगसेसे सारखे एखादे पारितोषिक या " नव्या" प्रयोगासाठी मिळेल.