Skip to main content

मोदींच्या काही चुका

लेखक तिमा यांनी गुरुवार, 10/03/2016 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान, नरेंद्र मोदी, यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत ज्या चुका केल्या त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे. यांत सर्वच मुद्द्यांचा परामर्ष घेतला आहे, असा माझा दावा नाही. मिपाकर त्यांत मोलाची भर घालू शकतात. १. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते. खाण्यापिण्याच्या बाबतीत हे सरकार, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही, हे ठासून सांगणे आवश्यक होते. असे केले असते तर, त्यानंतर असहिष्णुतेवरुन झालेली पुरस्कारवापसीही टळली असती. २. जे.एन.यु. प्रकरणांत, भारतविरोधी घोषणा झाल्यावर, खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायला हवा होता. घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा न लावता, सुप्रीम कोर्टाचा अनादर केल्याचा गुन्हा, वा तत्सम योग्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन पुरले असते. बाकी मिडिया ट्रायल चालूच राहिली असती, पण सरकार बदनाम झाले नसते. ३. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय, असे लोकांना वाटायच्या आंत तो कार्यक्रम बंद करायला हवा होता. तिथे भरभरुन बोलायचे आणि महत्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगायचे, हा प्रकार अनाकलनीय आहे. ४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत केवळ वाईटच गोष्टी केल्या आहेत, हा अपप्रचार आहे. त्यांच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला असता, तर इतके कटु वातावरण झालेच नसते. ५. भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्‍या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते. अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर, वरील सर्व मुद्दे गैरलागू होतात.

वाचने 29256
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

In reply to by चौकटराजा

आपले मुख्य मंत्रीपद टिकवायचे असेल. भाजपाचा झेंडा पि चि महापालिकेवर लावायचा असेल. त्यात आयत्या वेळी राष्ट्रेवादीतून भाजपात आलेल्याना महत्वाची पदे द्यायची असतील तर ६६००० घरे काय आख्ही दुनिया नियमित करावी लागली तरी चालेल . जय लोकशाही ! जय कायद्याचे राज्य ! जय नियमांचे राज्य ! आता सर्वत्र नियमितता आणायची म्हणजे सर्व कच्च्या कैद्यांची शिक्शाच कायदा करून माफ करायची. इन्कम टॅक्स माफ करायचे, शेती जो करतो त्याची सर्व ४२ पिढ्यांची कर्ज माफ करायची. कशी ? हे सगळे राज्यघटनेच्या चौकटीत कसे बसवायचे याचे प्रशिक्षण वर्ग देवेन्द्र विद्यापीठात चालू होणारेत म्हणे !

भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा करण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही हे आत्ता पर्यंत केव्हाच स्पष्ट झाले आहे. त्यांनी फक्त , आपण तसे करू, हा भास निर्माण केला निवडणुकीच्या काळात. मनुस्मृती प्रमाण मानायची झाली तर त्यात एकाच गुन्हाची शिक्षा . शुद्र ला २ फटके, क्षत्रिय ला ५ फटके, वैश्य ला १० फटके , ब्राह्मणाला मात्र १५ फटके. हे सर्वाना माहित आहेच. आता सध्याच्या जमान्यात - भाजप ने आपण ब्राह्मण असल्याचा आव आणला होता. त्यांना तशीच शिक्षा निवडणुकीत झाली पाहिजे.

१५ फटके म्हणजे पुन्हा यु पी ए १५ वर्षे असेच म्हणायचे ना ?

तिमा साहेबांशी सहमत आहे. ग्यारी ट्रूमन साहेबांचा समर्थक प्रतिसाद पाहून वाईट वाटले. अहो बाकीचे अडाणचोट आहेत म्हणून मोदीवर आशा लावली होती लोकांनी, त्यांच्याकडून काही जास्त आशा बाळगल्यास त्यात चूक ते काय? असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

अर्र्र अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र साहेब त्रिवार माफी असावी ही विनंती. _/\_ नाव बदलून घ्या राव, लै गोंधळ होऊ राहिला. :(

In reply to by बॅटमॅन

:)
नाव बदलून घ्या राव, लै गोंधळ होऊ राहिला
मी का नाव बदलू? माझा या जन्मीचा बिल्ला क्रमांक २६१४२ आणि शोमन यांचा २७१८६. म्हणजे मी माझे नाव आधी घेतले आहे. नाव शोमनना बदलायला सांगा :)

४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते.
सहमत. राज्यसभेत कोणतेही बिल विरोधी पक्षांच्या मदतीशिवाय संमत होऊ शकत नसताना टोमणे मारून विरोधी पक्षाला दुखावून त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

राज्यसभेत कोणतेही बिल विरोधी पक्षांच्या मदतीशिवाय संमत होऊ शकत नसताना टोमणे मारून विरोधी पक्षाला दुखावून त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.
भाजपाने कॉंग्रेसशी अधिकृत हातमिळवणी करुन राज्यसभेतून बिले पास करुन घेण्याची पॉलीसी अधिक चांगली वाटते का आपल्याला म्हणजे संसदही चालेल आणि बिलेही पास होतील असे काही ?

In reply to by माहितगार

त्यांनी एकमेकांना पाठिंबा देऊन सरकार बनवावं. ज्याच्या जास्त जागा त्याचा पंतप्रधान. हाकानाका. (ह.घ्या.)

In reply to by बोका-ए-आझम

डोळ्यासमोर असा प्रसंग आला... "त्यांनी एकमेकांना पाठिंबा देऊन सरकार बनवावं." हे रागांना कळले, आणि ते मोदींसमोर उभे राहून "दहा-वीस-तीस-चाळीस" असे म्हणत, मोदींकडे बोट असताना १०० आल्याने, शेवटी म्हणले, हं, तुमच्यावर राज्य आले!

In reply to by मार्मिक गोडसे

तेव्हापासून काँग्रेसचे लोक अस्वस्थ आहेत. घटनेनुसार विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी किमान १०% जागा लागतात. म्हणजे ५४ जागा. त्यांच्याकडे ४४ आहेत. चूभूद्याघ्या पण ज्या अधिवेशनात बांगलादेशबरोबरचा करार पारित झाला त्या अधिवेशनापर्यंत गोष्टी ब-यापैकी सुरळीत होत्या पण भूमी अधिग्रहण आणि जीएसटी या दोन कायद्यांवरुन अधिवेशने गुंडाळली जायला सुरुवात झाली. आता रिअल इस्टेट विधेयक राज्यसभेत मंजूर झालेलं आहे. ते लोकसभेत होईलच. हळूहळू गाडी पुढे सरकेल अशी अपेक्षा आहे. एक सामान्य नागरिक म्हणून आपण एवढंच करु शकतो.

काँग्रेस ने पर्यायाने मनमोहन सिंग यांनी सुब्रोतो राय याला मनी लाँन्ड्रींग केसमध्ये जेलमध्ये पाठवले होते, अजुनही तो तिथेच आहे याउलट. ... भाजपने पर्यायाने नरेंद्र मोदींनी विजय माल्या याला मनी लाँड्रींग केसमध्ये गुन्हेगार असूनही देशाबाहेर जावू दिले..

In reply to by गरिब चिमणा

तेंव्हाच्या सत्ताधिशांनी सहाराश्रींनी तुरुंगात जाऊ नये म्हणुन खुप प्रयत्न केले पण "अब्राहम" नावाच्या केरळी अधिकार्‍यानी ( सेबीच्या ) केस पक्की बांधली होती आणि म्हणुन न्यायालयात काही करता आले नाही. त्या केरळी अधिकार्‍यावर प्रचंड दबाव आणला होता असे वाचल्याचे आठवते. गिरीश कुबेरांनी त्याच्यावर चांगला लेख लिहीला होता.

भाजपने पर्यायाने नरेंद्र मोदींनी विजय माल्या याला मनी लाँड्रींग केसमध्ये गुन्हेगार असूनही देशाबाहेर जावू दिले.. हे खरे असेल असे चौकशि अंति समोर आल्यास आणि मल्ल्या आता परत येणारच नसेल तर दोषिंवर कारवाई व्हावि. क्वात्रोचि बद्दल आपले सुविद्द मत ऐकायला आवडेल.

In reply to by होबासराव

क्वात्रोचीला काँग्रेसच्या काळात अभय मिळाले हा गैरसमज आहे. सीबीआयने त्याला फरारी घोषीत केले तेव्हा काँग्रेसचे सरकार होते ,नंतर इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावली तेव्हा तो देश बदलत पळत होता ,अखेरीस ब्राझील का कुठेतरी तो मरण पावला

In reply to by होबासराव

क्वात्रोचिला पळून जाऊ देणार्‍यांना 'फारच बुवा भ्रष्टाचारी हे हरामखोर' असे म्हणूनच जनतेने घरी बसवले आहे ना? त्यांचीच री ओढायची भाजपाने ठरवले आहे की काय आता? प्रश्न केला की व्हाटअबाउटरी आहेच मदतीला.

काँग्रेस ने भ्रष्टाचारी लोकांना जेल मध्ये टाकणे हा मोठा विनोद आहे,काही विनोद राय ह्यांच्या मुळे गेले बाकी कोर्टामुळे गेले।

In reply to by मार्मिक गोडसे

PDP भाजपा झाली तशी भाजपा आणि काँग्रेसची ! मोदी आणि गांधी एकमेकांवर टिका करणार नाहीत तर लोक सध्या भाजपावर PDP सोबत कसे जाता म्हणून विचारतात तसे मोदींना काँग्रेसवर टिका का केली नाही असे विचारणार नाहीत का ? लोक दोन्ही कडून बोलतात, मुख्य विरोधीपक्षांना एकमेकांवर किमान दिखावू टिका तरी करावीच लागत असावी

In reply to by माहितगार

एकीकडे 'सबका साथ सबका विकास' म्हणत विरोधकांना चहापाण्याला बोलावून संसदेत पाठिंब्याची विनवणी करायची,प्रत्यक्षात देशाच्या विकासाचा मुद्दा सोडून सभागृहात घासून गुळ्गुळीत झालेल्या गोष्टी सांगून विरोधी खासदाराची अपरिपक्वता दाखवून द्यायची. देशाच्या जनतेकडून विकासाकरता कर गोळा करायचा व हाच पैसा संसदेचा अमुल्य वेळ वाया घालविण्यासाठी वापरायचा. अशाने फक्त करमणूक होते विकास नव्हे.
मोदींना काँग्रेसवर टिका का केली नाही असे विचारणार नाहीत का ?
काँग्रेसच्या धोरणांवर टिका करायला हरकत नाही, परंतू व्यक्तिगत टिका केल्याने विरोधक खूष होउन पाठिंबा देणार आहेत क?

चर्चा विषय चांगला आहे. खाली काही (अर्थातच) मते मांडत आहे. त्यातील प्रत्येक मत प्रत्येकाला पटेल अशातला भाग नाही. त्यामुळे मला कोणीही मोदी भक्त, मोदी द्वेष्टा अथवा कन्फुझ्ड देसी असे काही म्हणलेत तरी फरक पडत नाही... सर्व प्रथम तुम्ही "मोदींच्या चुका" असे म्हणत त्या संदर्भात जे मुद्दे मांडत आहात, त्यात तुम्हीच म्हणल्याप्रमाणे एखाद्या सामान्य नागरीकासच असे नव्हे, तर "मी त्या जागी असतो तर कसे वागले असतो" या संदर्भातली उदाहरणे वाटली. एखादे वर्तन हे चुकीचे कधी धरता येते जर त्याचे परीणाम हे त्या व्यक्तीला अथवा त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्यांना "भोगावे" लागतात. आता सर्व प्रथम तुम्ही मांडलेल्या मुद्यांचा या संदर्भात विचार करू.. बीफ प्रकरण सर्वप्रथम मोदी आत्ता पंतप्रधान आहेत अर्थात संपुर्ण देशाचे (कुणाला आवडोत अथवा न आवडोत) नेते आहेत. त्यांनी माध्यमात चालू असलेल्या चर्चेत - भाग घेणे योग्य नाही. इथे केवळ मोदीच नाही तर अजून कोणीही पंप्र असते, तसेच राष्ट्रपतींनी भाग घेणे देखील चुकीचे आहे असे मला वाटते. कारण एकदा का तोंड उघडले की त्यातून देशाचा नेता बोलत असतो, पक्षाचा नाही, ह्याची मोदींना जाण आहे. तरी देखील भाजपाच्या नेत्यांना त्यांनी सुनावल्याची बातमी मला न्यूयॉर्क टाईम्स मधे दिसली (जे मोदी विरोधक पत्र आहे असे नक्की समजू शकता) पण पटकन इतर भारतीय माध्यमात तरी दिसू शकली नाही... त्या व्यतिरीक्त: बीफ बंदी कुठल्यान कुठल्या स्वरूपात बहुतेक सर्वत्रच आहे. अगदी काश्मिर मधे देखील. तरी देखील गोवंश बंदी आत्ता जाहीर करणे जरूर नव्हते असे मला वाटते. पण ते केवळ महाराष्ट्र आणि मला वाटते हरीयाणा/मध्यप्रदेश पुरतेच मर्यादीत होते. त्याचा नॅशनल इश्यू हा मोदी विरोधकांनी केला आणि माध्यमांनी तेल ओतले. असो अधिक नंतर कधीतरी कारण तो विषय नाही... जे.एन.यु. प्रकरणांत, भारतविरोधी घोषणा झाल्यावर, खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायला हवा होता. घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा न लावता,.. अजाणतेपणे लिहीले असेल कदाचीत, पण हे वाक्य जर subtle नसले तर किमान गंमतीशीर नक्कीच आहे... "खर्‍या गुन्हेगारांचा शोध" म्हणजे काय म्हणायचे आहे? त्या प्रकरणात अजूनही फक्त आरोपीच आहेत. त्यात जसा कन्हैय्या हा एक आरोपी आहे तसेच उमर आणि त्याची गँग पण आहेत. ते मधल्या काळात लपले होते आणि विद्यापिठ त्यांना पदराखाली लपवून ठेवत होते. दिल्ली हायकोर्टाकडे उमरने अटकेच्या विरोधात मागणी केली होती जी हायकोर्टाने नाकारली.. गुन्हा सिद्ध करणे हे दिल्ली पोलीसांचे काम आहे आणि तो सिध्द झाला असे म्हणणे हे न्यायालयाचे काम आहे. अर्थात त्या उलट, त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करणे हे आरोपीच्या वकीलांचे काम आहे. मात्र ज्या पद्धतीने आरोपीचे प्रमुख वकील कपिल सिब्बल यांना सध्या दातखीळ बसली आहे त्यावरून निर्दोषत्व सिद्ध करणे अवघड जाणार आहे असे वाटते... पण तो मुद्दा वेगळा झाला. या सर्वामधे मोदींनी पडण्याचा प्रश्न येत नाही. दिल्ली पोलीस हे गृहमंत्रालयाच्या अख्त्यारीत येतात त्यामुळे गृहमंत्री म्हणून राजनाथ सिंग यांनी पडणे समजू शकते. त्या साठी त्यांची नेमणूक केली आहे. कुठेतरी आपल्याला (म्हणजे माझ्यासकट सर्व भारतीयांना) एक सवय आहे जी राजेशाहीची अजून सवय असल्याचे द्योतक आहे. ती म्हणजे उठसुठ सगळ्यात प्रमुख नेत्याने मधे पडायचे. असो. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय, असे लोकांना वाटायच्या आंत तो कार्यक्रम बंद करायला हवा होता. तिथे भरभरुन बोलायचे आणि महत्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगायचे, हा प्रकार अनाकलनीय आहे. कशाला बंद करायचा. ऐकायचा का नाही ते आपल्या हातात आहे. वर कोणीतरी उगाच असे म्हणले होते की जणू काही शाळेतल्या विद्यार्थ्यांवर सक्ती आहे म्हणून. तसले काही नाही. राहता राहीला महत्वाच्या प्रश्नांवर बोलण्याचा... मोदींनी एकूणच तथाकथीत माध्यमांमधे न बोलण्याचा विडा उचलला आहे. फक्त सोशल मेडीयामधेच लिहीतात. (हे योग्य का अयोग्य ह्यावर चर्चा केलीत तर एकवेळ समजू शकेल). पण "हमे देखना है", "नानी याद आयेंगी", "सत्तेचे दलाल", "गरीबी हटाव", "परकीय हात", वगैरे बोलणे हे निवडणूक प्रचाराच्या वेळेस ठीक असते. नंतर बोलण्यापेक्षा काय करत आहेत अथवा त्याचे फायदे काय आहेत यावर चर्चा करणे अधिक उचीत ठरेल. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते. हा मुद्दा काही अंशी मान्य. म्हणजे मोदींनी असले काही करू नये हे मान्य. पण केवळ त्यामुळेच लोकसभा-राज्यसभा बंद पाडण्याचे प्रकार घडतील असे वाटत असेल तर ते मान्य नाही. आधी सुषमा स्वराज ज्वर झाला होता नंतर स्मृती इराणीज्वर झाला... त्यात मधेच इंटॉलरन्स म्हणत तमाशा केला. बरं, यातील प्रत्येक गोष्टीत जर विरोधक तत्वाशी प्रामाणिक होते तर मग आधीच्या आधिवेशनात जे मुद्दे आधिवेशन बंद पाडायला उपयोगात आणले, त्यावर कुठलाच तोडगा, उपाय न निघता देखील पुढच्या आधिवेशनात तो मुद्दा विरोधकांकडून वापरला कसा जात नाही? ललीत मोदी, बीफ, व्यापम, स्मृती इराणी - यातील प्रत्येक गोष्ट फक्त प्रत्येकी एका आधिवेशनास बंद पाडण्यापुरतीच मर्यादीत होती... थोडक्यात यातील कुठलीच गोष्ट मोदींच्या टोमण्यांमुळे झालेली नाही. पण आधी म्हणल्यासारखे, याचा अर्थ मोदींच्या तशा बोलण्याचे समर्थन आहे असे समजण्याची गरज नाही. पण त्यांचे ते भाषण स्वातंत्र्य नक्कीच आहे... ;) भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्‍या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते. अशी कानउघडणी ही काय सार्वजनिक ठिकाणी करावी अशी अपेक्षा आहे का? केंद्रीय मंत्रिमंडळ आणि भाजपाचे खासदार यांनी नजिकच्या भूतकाळात काय बडबड केली आहे? मला वाटते सगळ्यांना व्यवस्थित दम भरून झालेला असावा... आता कुठल्याही पक्षात, संघटनेत, संस्थेत आणि अगदी उद्योगात देखील कसे बोलायचे, काय आणि कोणी कुठल्याविषयावर बोलायचे, या संदर्भात नियम केले तरी एखादा दिवटा निघणारच. जसे आत्ता जेएनयू मधल्या काँडम प्रकरणात झाले. पण त्याला मोदी कसे जबाबदार? जर भारतविरोधी घोषणा करणारे विद्यार्थी असले तरी त्याला विद्यापिठ जबाबदार नाही तसेच. नाहीतर काय कन्हैय्याने सार्वजानिक ठिकाणी खाजगी कारभार केला म्हणून काय त्या वर्तनाला कम्युनिस्ट मॅनिफेस्टो जबाबदार आहे का? वास्तवीक कम्युनिस्ट रशियात तो तसे वागला असता तर समजले असते. असो. आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर... काम करणार्‍याच्या हातून चुका नक्की घडतात. :) त्यामुळे मोदींच्या आणि या सरकारच्या हातून नक्कीच घडल्या असतील. माझ्या लेखी त्यात डाळींचे भाव कंट्रोल मधे आणणे आणि तत्सम सामान्यांच्या पोटाला चिमटा बसेल असे काही घडून न देणे ह्या संदर्भातील निर्णय आहेत. ते निर्णय देखील जर चुकले असतील (चुकलेत असेच म्हणावे लागेल) आणि जर त्यावर corrective actions घेतल्या गेल्या नसल्या तर ती घोडचूक आहे. पण ते कळायला किंचीत वेळ द्यावा लागेल.... जर पठाणकोट हल्ल्यादरम्यान काही सुरक्षा यंत्रणेच्या संदर्भात आणि intelligence gathering च्या संदर्भात चुका झाल्या असल्या तर ते गंभिर आहे. भले ते प्रकाशात येवोत अथवा न येवोत पण त्यावर जर corrective actions घेतल्या गेल्या नसल्या तर ती सगळ्यात मोठी घोडचूक ठरेल. आशा करतो तसे झालेले नसेल.

In reply to by विकास

बाकी सगळे बरे आहे भाऊ

फ़क्त

या सर्वामधे मोदींनी पडण्याचा प्रश्न येत नाही. दिल्ली पोलीस हे गृहमंत्रालयाच्या अख्त्यारीत येतात त्यामुळे गृहमंत्री म्हणून राजनाथ सिंग यांनी पडणे समजू शकते. त्या साठी त्यांची नेमणूक केली आहे. कुठेतरी आपल्याला (म्हणजे माझ्यासकट सर्व भारतीयांना) एक सवय आहे जी राजेशाहीची अजून सवय असल्याचे द्योतक आहे. ती म्हणजे उठसुठ सगळ्यात प्रमुख नेत्याने मधे पडायचे. असो.

हे काही पटले नाही

कारण. आपण जी संसदीय व्यवस्था आत्मसात केली आहे त्यात "कलेक्टिव रिस्पांसिबिलिटी" ही मुळ आहे, सगळ्या शक्ति एकवटलेले लेजिस्लेटिव/ एग्जीक्यूटिव पद आहे ते. त्यामुळे जबाबदारी सुद्धा बहुतांश ठिकाणी त्यांचीच असते. हे फ़क्त मोदी आहेत म्हणून नाही तर ओवरऑल कोणीही प्रधानमंत्री असले तरी लागु आहे.

केंद्र सरकारची २ वर्षे पूर्ण झाल्यावर २ वर्षात झालेल्या चुका व चुकलेले निर्णय यावर धागा लिहायचा विचार होता. पण हा धागा आधीच आला. या लेखात चुका म्हणून लिहिलेल्या मुद्द्यात फारसा दम नाही. अनेकांनी त्यावर सविस्तर लिहिले आहे त्यामुळे नवीन काही लिहित नाही. काही निर्णय जाणताअजाणता नक्कीच चुकलेले आहेत, परंतु त्यांचा इथे उल्लेख दिसत नाही.

In reply to by नितिन थत्ते

मोदींची, मोदीभक्तांची, मोदी समर्थकांची, झालतर अगदी मोदी टायर्स, मोदी धाग्यांची पण थट्टा केलीत, त्यांना ridicule केले म्हणून हरकत नाही. आनंदाने करा. अशीच थट्टा तुम्हाला करता यावी म्हणून पुढच्या निवडणुकीत देखील व्यवस्था केली जाईल... :) पण आशा करतो, यात सीमेवर गोळ्या खाण्यार्‍या सैनिकांना ridicule केले जात नाही आहे...

In reply to by विकास

सैनिकांना ridicule केल्यासारखे का वाटले? मी तर मोदी द्वेष्ट्यांना सांगत होतो.....

In reply to by नितिन थत्ते

सीमेवर गोळ्या? यमुनेच्या तीरी घरगड्यासारखी राबवल्या जात आहेत. स्वयंघोषित देशभक्त अळीमिळी गुप्प्चिळी करुन बसलेत. आता लष्कराचा अपमान होत नाहीये. घोषणा दिल्या की होतो.

In reply to by तर्राट जोकर

कोणत्याही एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होत नाही. या कार्यक्रमास इतर देशांचे राजप्रमुख येत असतील तर त्यांच्या संरक्षण आणि प्रोटोकॉल्स दृष्टीने सुविधा द्यावी म्हणून लष्कराची मदत घेणे आवश्यक झाले असू शकते तर ठिक आहे पण तसे विशीष्ट कारण नसेल तर लष्कराला खाजगी संस्थेच्या कार्य करावयास दिले असल्यास प्रशस्त ठरत नसावे.

In reply to by माहितगार

हा कार्यक्रम सरकारी आहे काय? सरकार आयोजक आहे काय? त्या कोणा राजप्रमुखांना सरकारने आमंत्रण धाडले आहे काय? कुणीही उपटसुंभ स्वतःच्या हिरोगीरीसाठी आरती ओवाळुन घ्यायचे कार्यक्रम घ्यायला लागला तर लष्कर काय ही असली कारणे देऊन राबवले जाणार काय? जे चूक आहे त्याला स्पष्ट चूक म्हणण्याची तरी तयारी दाखवायला हवी. नरो वा कुंजरोवा अपेक्षित नाही.

In reply to by तर्राट जोकर

त्या कोणा राजप्रमुखांना सरकारने आमंत्रण धाडले आहे काय?
राजप्रमुख व्यक्तिगत दौर्‍यावर जरी आले तरीही प्रोटोकॉल्स पाळावे लागतात सहसा पाळले जातात, देशाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय राजकारणातील डिप्लोमसीचा राजकीय संबंध राखण्याचा भाग असतो. सरकारी आमंत्रण दिले नसेल तरीही राजप्रमुखांनी भेटीची इच्छा कळवली तर आमंत्रणाची अथवा स्वागताची फॉर्मॅलिटी शक्यतोवर पाळली जाते. दुसर्‍या देशाच्या राजप्रमुखांची आवभगत देशाच्या संबंधाच्या दृष्टीने केली जाते, खाजगी संस्थांना अथवा राजकीय पक्षांना काय फायदे पोहोचतात हे सहसा गौण असते. अर्थात शत्रुराष्ट्रे आणि देशाच्या अंतर्गत गोष्टीत हस्तक्षेप होण्याची शक्यता असेल तर स्वागत टाळले जाते खाजगी आमंत्रणेही रद्द होतील हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाहिले जाते. या सर्व गोष्टी सर्वच देश करत असतात.

In reply to by तर्राट जोकर

आता लष्कराचा अपमान होत नाहीये. घोषणा दिल्या की होतो.
त.जो. कन्हैय्याने केलेल्या अपमानाची आणि सैनिकांकडून एखादे काम करुन घेतल्याची बरोबरी होत नाही उलटपक्षी कन्हैय्या म्हणतो त्यापेक्षा वेगळी कामे भारतीय लष्कर करत असते हे या निमीत्ताने लक्षात आले असेल तर ठिकच.

In reply to by तर्राट जोकर

लष्कराचा वापर उठसूठ नागरी गोष्टींमधे करण्याच्या मी विरुद्ध आहे. (अर्थात माझे मत म्हणजे काही ब्रेकींग न्यूज नाही, तरी आपलं सांगतो!). या मधे लष्कराचा वापर हा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस अथवा जेंव्हा दंगल अथवा दंगलसदृश प्रसंग होतात तेंव्हा वापरणे देखील मान्य नाही. लष्कराने केवळ आणि केवळ बाह्य शत्रूपासून देशाचे संरक्षण केले पाहीजे. नागरी घटनांमधे लष्कराने, भले कारण कितीही उदात्त असुंदेत पण लष्कर म्हणून involve होणे हे अयोग्य आहे. याचा अर्थ आपली नागरी व्यवस्था पुरेशी तयारच केलेली नाही असा होतो. हे बदलणे गरजेचे आहे. जसे वाजपेयींच्या काळात नैसर्गिक आपत्तीसाठी परदेशी सरकारची मदत घेणे बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला तसेच ह्या संदर्भात केले पाहीजे. स्वतःला विकसीत म्हणवून घेयचे असले तर परदेशी मदतीबरोबर लष्करी मदत देखील नागरी कामासाठी घेऊ नये.... तीच गोष्ट वर्ल्ड कल्चरल फेस्टीवलच्या दरम्यान झाली असावी. जेंव्हा कैक लाख लोकं ही देश-परदेशातून येणार असतात तेंव्हा आवडो अथवा न आवडो त्यांची जबाबदारी सरकारवर पडते. आमच्या इथे साधे शाळेत ५०-१०० च्या वर कुठल्याही सार्वजनिक संस्थेला कार्यक्रम करायचा असेल तर पोलीस ठेवावा लागतो. काही शे अथवा हजाराच्या घरात कार्यक्रम असला तर पोलीस, अँब्युलन्स, अग्निशमन वगैरे सर्व लागते. वॉशिंग्टनच्या काँग्रेस आणि व्हाईटहाऊस मधील जागेवर - नॅशनल मॉल वर अथवा न्युयॉर्कच्या टाईम स्क्वेअर, सेंट्रल पार्कमध्ये असे कार्यक्रम होतात तेंव्हा सरकारला देखील मदत करावी लागते. अर्थातकधी कधी सूट देतही असतील पण त्याचे ते संघटनेकडून पैसे घेतात. इथे मिलिटरीला बोलवले होते म्हणजे सीमेवरील सैनिकांना बोलावले नव्हते आणि हमाली काम तर नक्कीच करायला बोलावले नव्हते. तर कमी वेळात जर बांधकाम करायचे असेल तर आपल्याकडे खर्‍या अर्थाने मिलिटरी इंजिनिअरींग सर्विसेस ला खूप चांगले ज्ञान आहे आणि व्यवस्थापन कौशल्य देखील आहे. त्यामुळे त्यांची मदत द्यावित अशी विनंती आपचे मंत्री कपिल मिश्रा यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे केली होती. (अजून एक दुवा) . अर्थात याचे नंतर माध्यमांकरवी राजकारण केले गेले. जर खरेच यात काही दम असता, तर आपल्या सगळ्यांचे लाडके नेते दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंदजी केजरीवालसर यांनी कित्ती आक्रस्ताळे पणा केला असता! पण तशी टिवटिव करण्याऐवजी त्यांनी खालील व्टीट केली.... असो.

In reply to by विकास

फारच लंगडा प्रतिवाद. त्यातही केजरीवाल यांच्या ट्विटची साक्ष देऊन हा प्रकार कसा लेजिटिमेट आहे, अनैतिक नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्नही लाजवाब. ज्या केजरीवालला मोदिसमर्थक चोविस तास शिव्या घालत असतात त्याचेच ट्विट साक्ष म्हणून द्यावे हा काय प्रकार असावा. असो. तुम्हाला सामाजिक कार्यक्रम आणि व्यक्तिगत कार्यक्रम ह्यात फरक माहित असावा अशी अपेक्षा आहे. आता तुम्ही खोदकाम करुन काँग्रेसच्या राज्यात एखाद्या व्यक्तीसाठी लष्कर वापरले गेले तेव्हा कुठे होतात असा प्रश्न विचारणार असा कयास आहे.

In reply to by तर्राट जोकर

काय राव! सरळ प्रतिसादाला लंगडा म्हणून जोक करता काय? माझे म्हणणे आधी स्पष्ट केले आहे. मला लष्कर हे कुठल्याच नागरी कामात येता कामा नये असे वाटते. तेच चुकीचे आहे. तुम्हाला तसे वाटते का? ते जरी वाटत असले तरी त्यासाठी आपली नागरी यंत्रणा तरबेज आहे का? याची आधी उत्तरे दिलीत तर बरे होईल. हा कार्यक्र्म व्यक्तिगत म्हणणे हा अजून एक जोक झाला. तुम्हाला मान्य नाही असले कार्यक्रम असे म्हणालात तर काहीच हरकत नाही. आर्ट ऑफ लिव्हिंग (मी याच्याशी संलग्न नाही) हे काहीतरी वेगळेच रसायन आहे. यात फक्त भारतीय आणि त्यातही केवळ हिंदूच आहेत असे नाही. किंबहूना यात अभारतीय आणि अहिंदूच जास्त असतील. ह्या कार्यक्रमाला म्हणूनच खूप अहिंदू अमेरीकेतूनही गेल्याचे मला माहीत आहे. आता तो एका संघटनेचा कार्यक्रम आहे म्हणालात तर ठीक आहे. पण जे काही पाहीले आहे त्यावरून श्री श्री हे टिपिकल बुवा बाबा नाहीत ह्याची बर्‍यापैकी कल्पना आहे. पण तो विषय वेगळा आहे. असो. केजरीवालांची व्टीट देण्याचे कारण इतकेच होते की या माणसाने इतकी सुवर्णसंधी सोडली नसती जर खरेच यात काहीतरी चुकले आहे सिध्द झाले असते तर... अर्थात तुम्हाला तर्कशास्त्र मान्य नसेल तर मुद्दा वेगळा. समजू शकतो झालं! जेंव्हा पस्तिस लाख लोकं गोळा होतात तेंव्हा त्यांची काळजी घेणे हे कुठल्याही सरकारचे काम असते. दिल्ली सरकारला देखील हे समजले, जरी ते सहज केंद्र सरकारला दोष देऊ शकले असते तरी! तशी मदत देण्याचे टाळणे म्हणजे अनैतिक ठरले असते. यात कुठल्याच पक्षाचा संबंध नाही. तसेच मला खात्री आहे, त्याचा खर्च देखील सरकार वसुल करेल. आर टी आय अंतर्गत ही माहिती देखील नक्की बाहेर येईल. अर्थात त्याला वेळ लागेल. अर्थात तुम्ही तात्काळ आरटीआय फाईल करू शकता...

In reply to by विकास

मला लष्कर हे कुठल्याच नागरी कामात येता कामा नये असे वाटते. >> मलाही. याबाबतीत समर्थन. यात फक्त भारतीय आणि त्यातही केवळ हिंदूच आहेत असे नाही. >> मी हा कार्यक्रम हिंदू वैगरे आहे असे कुठे म्हटले नाही. प्रायवेट कार्यक्रम हिंदू असो वा हिब्रू, तो प्रायवेटच. बाकी आर्ट ऑफ लिविंग आरतीवोवाळू कार्यक्रम आहे ह्याची बर्‍यापैकी कल्पना आहे. या माणसाने इतकी सुवर्णसंधी सोडली नसती जर खरेच यात काहीतरी चुकले आहे सिध्द झाले असते तर. >> म्हणजे ह्या माणसाचे वर्तन हा काहीतरी चुकले आहे की नाही याचा पुरावा मानावा का? लोकं गोळा होतात तेंव्हा त्यांची काळजी घेणे हे कुठल्याही सरकारचे काम असते >> ओके फाईन. आता जसा मी नेहमी वाकडाच विचार करतो त्यायोगे हे मान्य करुया की उद्या दाऊद इब्राहिम भारतात पकडून आणला, त्याल फाशी बीशी झाली तर त्याचे जेवढे नेटवर्क आहे ते सगळे मयतीला हजर राहिल, तो आकडा साधारण पाच-सहा लाख होईल तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी लष्कराला पैसे देऊन पाचारण केले व्यवस्था बघायला तर चालेल. तुमचा दृष्टिकोन लक्षात आला. मतभेद राहतीलच. तुम्ही मला जास्त समजवण्याच्या फंदात पडू नका, मी पण पडत नाही. ओके?

In reply to by तर्राट जोकर

जर तुम्ही म्हणताय तसं झालं आणि त्याला फाशी झाली तर कोण कोण उघडपणे येईल हे बघणं खरोखर मनोरंजक असेल.किती लोक आपण दाऊदचे पाठीराखे आहोत हे openly दाखवतील तो तर अजून वेगळा मुद्दा.

In reply to by बोका-ए-आझम

इट वाज हायपोथेसिस. हायपोथिसिस मधे कल्पनेला महत्त्व असते की उदाहारणाला? हायपोथेसिस ची कल्पना सोडून उदाहरनाकडे विस्तृत व अनावश्यक लक्ष देणे मुद्दे संपल्याचं लक्षण आहे. व्हाट यु से?

In reply to by तर्राट जोकर

Army in aid of civil authority: when, how do troops come in? दिल्ली सरकारने संरक्षण मंत्रालयाला लष्कराच्या विशेष मदतीसाठी विनंती केली होती... ती संरक्षण मंत्रालयाने खालील मार्गदर्शक तत्वांनुसार पाळली. Under what circumstances is the Army requisitioned by the civilian administration? Regulations permit civil authorities to requisition the Army for (1) maintenance of law and order, (2) maintenance of essential services, (3) assistance during natural calamities such as earthquakes, (4) any other type of assistance which may be needed by the civil authorities. Who approves the request from the civil administration for using the Army? When the services of the Army are requested by the civil administration, the local military commander is supposed to take the permission of the central government through official Army channels. If the delay in seeking permission is likely to exacerbate the situation, leading to loss of life and property, local Army authorities are required to respond immediately, as far as possible, and send a report of the action taken at the first instance for approval by Army authorities. उरलेले त्या दुव्यावर वाचा. आता मुद्दा असा आहे की संरक्षण मंत्रालयाने अशी मदत देण्याचे नाकारले असते तर तत्वांच्या बाहेर जाऊन, आपने मदत मागितली म्हणून मोदींनी दिली नाही असे म्हणणार. बर आता दिली तर मोदींनी श्री श्रींच्या वैयक्तीक कार्यक्रमासाठी मोदींनी मदत केली असे म्हणणार. म्हणजे काही केले तरी मोदीच चुकलेत असे म्हणायचे असले तर काय उपयोग आहे? बरं अशी मदत केली जाते तेंव्हा त्याचा खर्च देखील संरक्षण मंत्रालय वसुल करते. या संदर्भात देखील तो केला जाईलच असे वाटते.

In reply to by तर्राट जोकर

मिपावर गेल्या चोवीस तासांत केजरीवालना एकही शिवी घातली आहे का ते बघा. आता कन्हैयाला बाल केजरीवाल म्हणणं हे तुम्हाला शिवी वाटत असली तर इलाज नाही. धागा मोदींवर असल्यामुळे तुम्ही सुटणार आणि आयडी सार्थ करणार हे उघड आहे. केजरीवाल यांचं ट्विट पाहून तर मला गहिवरून आलं. धरणं धरण्याऐवजी ते चक्क लोकांचं स्वागत करताहेत. काय खरं नाही राव! बरं, त्यांनी लष्कराची मदत मागितली असती आणि जर या सरकारने ती नाकारली असती तर बाहेरच्या देशांतून येणाऱ्या लोकांपुढे आपण आपले राजकीय मतभेद समोर आणले आणि देशाला लाज आणवली म्हणून इकडे धागे काढले गेले असतेच (तुम्ही काढले असते असं म्हणत नाहीये मुद्दामच, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतःवर घ्यायची सवय आहे). रच्याकने भाजपवाले राहुल गांधींबद्दल काय म्हणतात ते तर आपल्याला माहित आहेच. त्यांनाही कुठल्यातरी एका सूचनेसाठी (EPF नाही. ही वेगळी सूचना आहे)अरुण जेटलींनी आपल्या भाषणात धन्यवाद दिलेच. द्यायलाच पाहिजेत. जर देशाच्या image चा प्रश्न असेल तर पक्षीय मतभेद विसरून काम करायलाच पाहिजे.

In reply to by बोका-ए-आझम

बोकाशेठ, नीट वाचा. मिपावर चोविस तास शिव्या घातल्या जातात असे लिहिलेले नाही तिथे. कोण्यातरी बाबाबुवाची इवेंटगीरी देशाच्या इमेजचा प्रश्न झालाय. वॉव. यनावाला सर, यु आर मोस्ट वेलकम हीअर.

In reply to by तर्राट जोकर

त्याला ३५ लाख लोक उपस्थित आहेत. त्यांची व्यवस्था जर नीट ठेवली गेली नाही तर देशाची इमेज खराब होणारच. अर्थात तुम्हाला मोदींचे दोष दाखवण्यापुढे त्याची काही फिकिर नसावी हे समजू शकतो. घटनेने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहेच. रच्याकने यनावालांना बोलावताय? म्हणजे तुमची पाॅवर गेली? तुम्हाला मुद्दे सुचत नाहीत? का तुमच्याकडे बोलायला आता मुद्देच नाहीत? बाकी यनावालांची सर तुम्हाला येणार नाही हेही तितकंच खरं आहे. ता.क. मिपावर असं मी मुद्दाम म्हटलं कारण इथे केजरु के गुलाम नावाचा सदाहरित (निदान ५ वर्षे) धागा आहे. त्यावर काहीही post झालेलं नाही हा मला पुरावा म्हणून दाखवायचा होता. बाकी भाजपवाले exactly किती तास शिव्या घालतात हे तुम्ही नोंद करुन ठेवताय का? घटनेने तुम्हाला तोही अधिकार दिलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

देशाची इमेज ह्या गोंडस नावाखाली बरं चाललंय. आम्ही भारतीय नागरिकांनी श्री श्री यांचे पाय पकडुन आमच्या देशाच्या इमेज खातर कार्यक्रम घ्याच असे साकडे घातले नव्हते ब्वा. त्याला त्याची इमेज ग्लोबल करायची आहे. त्यासाठी देशाच्या सैन्याचा, पर्यावरणाचा वापर. कोण कुठचा तो बाबा, त्याला स्वतःला जगत्गुरु सिद्ध करायचंय त्यासाठी आमची सेना राबते हे आम्हाला अजिबात पटत नाही. दुसरं असं की सरकारने म्हणे ह्या कार्यक्रमाला ग्रँटही दिली आहे. तेही घसघषीत अडीच कोटी. तुम्हीच दिलेल्या लिंकमधे होतं. म्हणजे करदात्यांच्या पैशातून प्रायवेट इवेंटला सढळ हस्ते मदत. वरुन कोर्टात पाच कोट भरले नाही तर हे अडीच कोटी जप्त होणार. म्हणजे ह्यांनी कायदे मोडून इवेंट करायचे, त्याला सरकार करदात्यांच्या पैशातून मदत करणार, तेच पैसे दंड म्हणून हे इवेंटबाबा भरणार. तिसरं असं टुकार लॉजिकपुढे मुद्दे संपत नसतात. यनावालांना यासाठी बोलावलं का ब्वॉ, घटनेत वैज्ञानिक विचारसरणीचा अवलंब करावा असं दिलंय त्याचा ते सतत प्रसार, प्रचार करत असतात. त्यांना फार मान देतात इथले लोक. ह्या असल्या बाबाबुवांच्या इवेंटमधे नक्की कोणत्या वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार होतो ते विचारायचे होते. बाकी आम्हाला कुणाची सर नकोच. आमची सरसरच भल्याभल्यांना धडकी भरवते. ;-) बाकी, मी सांगतो मुद्दे संपले की काय होतं. प्रतिवाद्याच्या मुद्द्याला खोडू शकलो नाही की अगदी क्षुल्लक शब्द उचलून तीसमारखानच्या आविर्भावात प्रश्न केले जातात. जसे इथे आधी 'मिपावर कुठे शिव्या दिल्या' हा प्रश्न मांडला, मग तो खोडला तर 'मिपावर अमुक धागा आहे त्यात कुठे शिव्या दिल्यात' हा प्रश्न. हाही खोड्ल्या जाईल हे लक्षात येताच पुढल्या वाक्यात 'तुम्ही चोविस तास शिव्याच मोजता काय' हा प्रश्न केला जातो. मुद्दे नसले की असे होते बोकाशेठ.

In reply to by तर्राट जोकर

देशाची इमेज ह्या गोंडस नावाखाली बरं चाललंय. आम्ही भारतीय नागरिकांनी श्री श्री यांचे पाय पकडुन आमच्या देशाच्या इमेज खातर कार्यक्रम घ्याच असे साकडे घातले नव्हते ब्वा. त्याला त्याची इमेज ग्लोबल करायची आहे. त्यासाठी देशाच्या सैन्याचा, पर्यावरणाचा वापर. कोण कुठचा तो बाबा, त्याला स्वतःला जगत्गुरु सिद्ध करायचंय त्यासाठी आमची सेना राबते हे आम्हाला अजिबात पटत नाही.
बरं मग त्या मनोज मिश्रांच्या ऐवजी तुम्ही कोर्टात जाऊन हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी याचिका का दाखल केली नाही? तेही कुणी मोठा माणूस वगैरे नाहीयेत. सामान्य माणूसच आहेत. बाकी तुमचा एकंदरीत आविर्भाव पाहून आणि मुद्दे सोडून भांडणं बघून एक शंका आली होती आणि ती खरी असल्याचं नुकतंच समजलं आहे. बाकी तुम्ही तुमचे मुद्दे संपले की कुठल्या पातळीवर उतरता ते पाहिलेलं आहेच. त्याबद्दल बोलायला लावलं नाहीत तर बरं होईल.

In reply to by बोका-ए-आझम

तुमचा एकंदरीत आविर्भाव पाहून आणि मुद्दे सोडून भांडणं बघून एक शंका आली होती आणि ती खरी असल्याचं नुकतंच समजलं आहे. बाकी तुम्ही तुमचे मुद्दे संपले की कुठल्या पातळीवर उतरता ते पाहिलेलं आहेच. त्याबद्दल बोलायला लावलं नाहीत तर बरं होईल. >>मी आमंत्रण तर दिलं नव्हतं माझ्या प्रतिसादावर प्रतिसाद द्यायला या म्हणून. तुमच्या मुद्द्यात दम नाही म्हणून तुम्हाला माझा आविर्भाव आता भांडणाचाही वाटू शकतो, थोड्यावेळाने शिवीगाळही वाटू शकते. तुम्ही आता पर्सनलही होत आहात. मी इथे तुम्हाला दिलेला एकही प्रतिसाद मुद्दा सोडून आहे हे सिद्ध करा. धमक्या देण्याची भाषा नाही केली तर उपकार होतील.

In reply to by तर्राट जोकर

आणि ते तुम्हाला सांगून काय फायदा? तुम्हाला जिथे स्वतःची चूक होऊ शकते हेच मान्य नाही तिथे बोलणंच खुंटलं. आअापला २४ तास शिव्या देणारे भाजपवाले, आमचे सैनिक घरगड्यांसारखे वापरले जात आहेत, वगैरे अनेक मुक्ताफळं तुम्ही याच धाग्यावर उधळलेली आहेत. आणि मी काही पर्सनल वगैरे होत नाही. तुमची पातळी मला माहित आहे. ती सगळ्यांसमोर सांगावी अशी इच्छा असल्यास सांगतो. आणि याला धमकी समजायचं की काय तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही काय समजताय त्याने मला काहीही फरक पडत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

तुम्हाला जिथे स्वतःची चूक होऊ शकते हेच मान्य नाही तिथे बोलणंच खुंटलं. अगदी अचूक

ब्रीज बांधण्याचा सराव सैनिक नेहमीच करतात. यावेळेला यमुनेवर केला इतकेच.

In reply to by नितीनचंद्र

सोनिया गांधी वायुसेनेचे हेलिकॉप्टर आणी सेवा वापरत होत्या. ते आपणांस मान्य असावे ह्याच लॉजिकने.

In reply to by तर्राट जोकर

हवाईदलाचं विमान वापरायचे आणि काँग्रेसच्या केंद्रीय मंत्र्यांच्या हातांच्या ओंजळींवर पाय देऊन विमानात जायचे - शिडी मिळाली नाही तर. हे तुम्हाला कुठे माहीत आहे?

In reply to by तर्राट जोकर

मला लष्कराचा नागरीसेवे साठी वापर मान्य नाही. सोनिया गांधी ह्या पंतप्रधान अथवा कुठलेच घटनेने तयार केलेले पद नसताना जेंव्हा वायूसेनेचा वापर करतात ते मान्य नाही. तुम्हाला मान्य आहे का?

In reply to by विकास

तसले प्रकार अजिबात मान्य नव्हते व आताही. परत तसले काही होऊ नये म्हणुन त्याचमुळे तर भाजपाला निवडून दिलंय ना?

In reply to by तर्राट जोकर

त्याचमुळे तर भाजपाला निवडून दिलंय ना? आपले अमुल्य मत भाजपाच्या पारड्यात टाकल्याबद्दल प्रवक्ता नसलो तरी धन्यवाद! :) तसले म्हणजे कसले? मिलीटरी कुणी वैयक्तिक खर्चाला वापरली आहे? इथे तर पंतप्रधान स्वतःचा घरखर्च देखील स्वतःच्या पगारातून करतात.

In reply to by विकास

श्री श्री रविशंकर हे पंतप्रधान अथवा कुठलेच घटनेने तयार केलेले पद नसताना जेंव्हा सेनेचा वापर करतात ते मान्य नाही. कुणी पैसे देऊन विकत घ्यायला भारतीय सेना रस्त्यावर पडलेली नाही एवढी तरी जाणीव मोदीसमर्थकांनी ठेवावी. अर्थात तुम्हाला आहे हे मान्य, हे इतरांसाठी ज्यांना देशाच्या इमेज हा शब्द फार आवडला आहे.

In reply to by तर्राट जोकर

श्री श्री रविशंकर हे पंतप्रधान अथवा कुठलेच घटनेने तयार केलेले पद नसताना जेंव्हा सेनेचा वापर करतात ते मान्य नाही. सेनेच्या वापराबद्द्ल माझे काय मत आहे हे सांगून झाले. तरी देखील यात तुमच्या विधानात दोन चुका होत आहेत. एक म्हणजे श्री श्री रविशंकर यांच्यासाठी सेनेचा वापर झालेला नाही तर ३५ लाखांच्या समुदायासाठी झालेला आहे, जसा कुंभमेळ्याला देखील होतो. दुसरे म्हणजे ही विनंती श्री श्रींनी केलेली नव्हती अथवा केंद्राने आपणहून घेतलेला निर्णय नव्हता. तुमच्या वाचनात आले असले की श्री श्रींनी पैसे टाकून अथवा न टाकता भारतीय सेनेची मदत मागितली होती, तर तसे अवश्य दाखवा, नाहीतर शुद्ध कांगावा करत आहात हे मान्य करा. हा निर्णय दिल्ली सरकारने त्यांच्या अख्त्यारीत होणारा कार्यक्रम सुखरूप पार पाडण्यासाठी घेतलेला निर्णय होता. आणि तो योग्यच होता... इथे वादाकरता केंद्रात कॉंग्रेस/साम्यवादी/आप/तिसरी आघाडी/अथवा इतर कोणा गोम्यासोम्याचे सरकार असते आणि त्यांनी देखील असे केले असते तर ते बरोबरच आहे. यात सुरक्षा आणि सावधानता होती. केंद्राने त्यांची विनंती कशी मान्य केली ह्याचे कारण वर एका प्रतिसादात दिले आहेच. पण परत खाली चिकटवत आहे... Army in aid of civil authority: when, how do troops come in? दिल्ली सरकारने संरक्षण मंत्रालयाला लष्कराच्या विशेष मदतीसाठी विनंती केली होती... ती संरक्षण मंत्रालयाने खालील मार्गदर्शक तत्वांनुसार पाळली. Under what circumstances is the Army requisitioned by the civilian administration? Regulations permit civil authorities to requisition the Army for (1) maintenance of law and order, (2) maintenance of essential services, (3) assistance during natural calamities such as earthquakes, (4) any other type of assistance which may be needed by the civil authorities. Who approves the request from the civil administration for using the Army? When the services of the Army are requested by the civil administration, the local military commander is supposed to take the permission of the central government through official Army channels. If the delay in seeking permission is likely to exacerbate the situation, leading to loss of life and property, local Army authorities are required to respond immediately, as far as possible, and send a report of the action taken at the first instance for approval by Army authorities. आता मुद्दा असा आहे की संरक्षण मंत्रालयाने अशी मदत देण्याचे नाकारले असते तर तत्वांच्या बाहेर जाऊन, आपने मदत मागितली म्हणून मोदींनी दिली नाही असे म्हणणार. बर आता दिली तर मोदींनी श्री श्रींच्या वैयक्तीक कार्यक्रमासाठी मोदींनी मदत केली असे म्हणणार. म्हणजे काही केले तरी मोदीच चुकलेत असे म्हणायचे असले तर काय उपयोग आहे? राजा भिकारी आणि राजा घाबरला ही उंदीर छाप गोष्ट झालं! बरं अशी मदत केली जाते तेंव्हा त्याचा खर्च देखील संरक्षण मंत्रालय वसुल करते. या संदर्भात देखील तो केला जाईलच असे वाटते.