✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोदींच्या काही चुका

त
तिमा यांनी
गुरुवार, 03/10/2016 - 21:03  ·  लेख
लेख
पंतप्रधान, नरेंद्र मोदी, यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत ज्या चुका केल्या त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे. यांत सर्वच मुद्द्यांचा परामर्ष घेतला आहे, असा माझा दावा नाही. मिपाकर त्यांत मोलाची भर घालू शकतात. १. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते. खाण्यापिण्याच्या बाबतीत हे सरकार, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही, हे ठासून सांगणे आवश्यक होते. असे केले असते तर, त्यानंतर असहिष्णुतेवरुन झालेली पुरस्कारवापसीही टळली असती. २. जे.एन.यु. प्रकरणांत, भारतविरोधी घोषणा झाल्यावर, खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायला हवा होता. घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा न लावता, सुप्रीम कोर्टाचा अनादर केल्याचा गुन्हा, वा तत्सम योग्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन पुरले असते. बाकी मिडिया ट्रायल चालूच राहिली असती, पण सरकार बदनाम झाले नसते. ३. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय, असे लोकांना वाटायच्या आंत तो कार्यक्रम बंद करायला हवा होता. तिथे भरभरुन बोलायचे आणि महत्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगायचे, हा प्रकार अनाकलनीय आहे. ४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत केवळ वाईटच गोष्टी केल्या आहेत, हा अपप्रचार आहे. त्यांच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला असता, तर इतके कटु वातावरण झालेच नसते. ५. भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्‍या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते. अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर, वरील सर्व मुद्दे गैरलागू होतात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29185 वाचन

💬 प्रतिसाद (184)

प्रतिक्रिया

शूल भरे कंटक पथ पर,

जेपी
गुरुवार, 03/10/2016 - 21:26 नवीन
शूल भरे कंटक पथ पर, आजीवन अभियान किया है, मैं मधु से अनभिन्न आज भी, जीवन भर विषपान किया है.!! - बाकी चलु द्या!!
  • Log in or register to post comments

+१

रमेश आठवले
Sat, 03/12/2016 - 02:39 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

वा ! वा !

मोहन
Sat, 03/12/2016 - 13:02 नवीन
क्या बात है !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

KYA BAAT HAI!

बोलबोलेरो
Fri, 06/10/2016 - 16:36 नवीन
क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

आजेर्‍आज

मंदार कात्रे
गुरुवार, 03/10/2016 - 21:35 नवीन
जेटली साहेबाना अजुन भारतीय जन-मानसाची जाण्न नसावी का? ईपीएफ टॅक्स ची भानगड आलीच कुठून ? दोन वर्षे होत आली , आता तरी महत्तवाचे आणि खरे मुद्दे हताळायलाच हवेत
  • Log in or register to post comments

प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा

बाळ सप्रे
Fri, 03/11/2016 - 12:53 नवीन
प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे
असं सांगून काहिही होत नाही.. अगदी मोदींच्या चांगल्याबाजू इथे अथवा इतरत्र लिहूनही आता काही फायदा नाही.. मोदीद्वेषाचा शिक्का बसलाय तुमच्यावर आता .. :-) खांग्रेसी, डावे, आपटार्ड्, निधर्मांध, हिंदूविरोधी, सिक्युलर्, फुर्रोगामी आणि म्हणून देशद्रोही तिमांचा णिषेध !!
  • Log in or register to post comments

अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या

बाळ सप्रे
Fri, 03/11/2016 - 14:26 नवीन
अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर, वरील सर्व मुद्दे गैरलागू होतात.
या न्यायाने तुमचे सगळे मुद्दे गैरलागू झालेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

त्या मल्ल्याच पण प्रकरण

सतीश कुडतरकर
Fri, 03/11/2016 - 13:00 नवीन
त्या मल्ल्याच पण प्रकरण घडवलंय, ते पण आहेच.
  • Log in or register to post comments

मोदींची सगळ्यात मोठ्ठी चुक

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 13:20 नवीन
मोदींची सगळ्यात मोठ्ठी चुक म्हणजे - लोकसभा निवडणुकीला उभे राहुन निवडुन येणे आणि वर पंतप्रधान बनणे ! बघा ना , मोदी निवडुन यायच्या आधी देषात सारे कसे आनबान होते , कोणतीही असहिष्णुता नव्हती , गिलानी अरुंधती दिल्लीत येवुन स्वतंत्र काश्मीरचे नारे देवुन अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत होते , लादेनला लादेनजी असे संबोधुन मरणान्तिनी वैराणि ह्या आदर्श संस्क्रुतीचा बोध दिग्विजजज जी करुन देत होते. मनमोहन जी मौनं सर्वार्थ साधनं ह्या गहन सत्याचे आपल्याला सार शिकवत होते. मुंबई हल्ल्यानंतर विलासराव हल्ल्याची खरी माहीती सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचावी ह्या हेतुने रामुला ट्रिप घडवुन आणत होते, अण्णा मस्तपैकी आंदोलन बिंदोलन करुन देशाला फुल्ल इन्टर्टेनमेन्ट देत होते आणि हो , मिसळपाव वर राजकारणाव्यतिरिक्त कितीतरी छान छान लेख साहित्य येत होते वगैरे वगैरे. मोदी निवडुन आले अन पंतप्रधान झाले अन सगळा देश एकदम दुत्त दुत्त झाला :-\ अवांतरः वुमन एम्पावर्मेंट करण्यासाठी आम्ही मागल्या निवडणुकीत राहुलजींना कोंग्रेसला मत दिले होते , पुढल्या निवडणुकीत ही राहुलजींनाच मत देवु आणी निवडुन आणु आणि पंतप्रधान करु , तेव्हाच कोठे गांधी नेहरु वाड्रांच्या पुरोगामी इन्डियाचा विजय होईल. राहुल आप पी.एम बनेंगे इन्शाल्लाह इन्शाल्लाह
  • Log in or register to post comments

प्रगो रॉक्स

होबासराव
Fri, 03/11/2016 - 15:08 नवीन
लादेनला लादेनजी असे संबोधुन ते ओसामा जी ओसाम जी अस होत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

काय राव प्रगो साहेब ! उगाच

नाना स्कॉच
Fri, 03/11/2016 - 13:35 नवीन
काय राव प्रगो साहेब ! उगाच तिरकस प्रतिसाद? राहुल गांधी किंवा काँग्रेसची भलामण धागाकर्त्याने कुठेतरी केलेली आहे काय? प्रमाणिक मुद्दे आधारित विरोधही करायचा नाही का?
  • Log in or register to post comments

नाना , अहो तिरकस काही नाही !

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 14:06 नवीन
नाना , अहो तिरकस काही नाही ! खरेच मी काँग्रेसला/ राष्ट्रवादी काँग्रेसला मत देत आलोय आजवर . गेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादीलाच मत दिले होते ! आणि येवढ्या मोदी लाटेतही आमच्या मतदार संघात राष्ट्रवादीच जिंकली !! राहुल पंतप्रधान व्हावेत असे मला मनापासुन वाटते. काँग्रेस हाच खरा देशाचा तारणहार आहे . गांधी आमचे सावरकर तुमचे ! भारत = गांधी = काँग्रेस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

तुम्ही "मनकी बात" बद्दल जे

साहना
Fri, 03/11/2016 - 14:07 नवीन
तुम्ही "मनकी बात" बद्दल जे काही म्हटले ते अगदी मनाला स्पर्श करून गेले. हे रेडियो वर येवून जनतेला प्रवचन करणे मला तरी अगदी disgusting वाटते. आम्ही काही सरकारी गुलाम नाही आहोत कि आम्हाला हि प्रवचने ऐकावी लागावीत. त्या प्रवचनात जो आव आणला जातो त्याचा तर मला खूपच तिटकारा आहे. म्हणे मुलांनी परीक्षेची चिंता करू नये, देशांत शिक्षणाची इतकी कमतरता आहे कि चांगल्या शाळेत प्रवेश घ्यायचा म्हणजे अर्धा मार्क सुद्धा महत्वाचा ठरतो. मुले आणि पालक मूर्ख आहेत म्हणून अभ्यासाचे इतके टेन्शन घेत नाहीत, सरकरी धोरणा मुले चांगल्या शिक्षणाचा प्रचंड अभाव आहे आणि गरिबीतून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण आहे हे सर्वाना ठावूक आहे. आपले काम करायचे सोडून अम्हाला हि प्रवचने. आणि महत्वाच्या मुद्द्यावर मौन तर माझ्या लक्षांतच येत नाही. - नरेंद्र मोदी ह्यांच्या बद्दल माझ्या मनात अपार आदर भावना आहे. पण निवडणुकी आधीच्या मोदी मध्ये आणि पंतप्रधान मोडी मध्ये बराच फरक दिसून येतो.
  • Log in or register to post comments

आम्ही काही सरकारी गुलाम नाही

बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 14:56 नवीन
आम्ही काही सरकारी गुलाम नाही आहोत कि आम्हाला हि प्रवचने ऐकावी लागावीत.
हे समजलं नाही. कुणी सक्ती केली आहे ' मन की बात ' कार्यक्रम ऐकायची? रेडिओचं बटन आपल्या हातात आहे. नका ऐकू. आजकाल सुदैवाने रेडिओवरही भरपूर channels आहेत. अजिबात नका ऐकू. आणि तसंही त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकायला (to hear या अर्थाने, to follow या अर्थाने पण घेऊ शकता) हव्यात असं अजिबात नाही.
  • Log in or register to post comments

मग गावोगावीच्या शाळा मधली

अभिजित - १
Fri, 03/11/2016 - 16:03 नवीन
मग गावोगावीच्या शाळा मधली मुले ज्यांना जबरदस्तीने हि भाषणे ऐकावी लागतात ती गुलाम आहेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अजिबात नाहीत.

बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 19:09 नवीन
त्यांच्यावर तशी जबरदस्ती होत असेल तर ती चुकीचीच गोष्ट आहे पण साहनाजींच्या प्रतिसादात या मुलांचा उल्लेख कुठे आहे? त्यांनी स्वतःचा उल्लेख केलाय. म्हणून मी तसं लिहिलं. शिवाय या मुलांवर जबरदस्ती होते आहे असं ती मुलं पण म्हणून देत ना. आपणच का असं गृहीत धरायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १

सगळे म्हणणे न म्हणणे जर

नाना स्कॉच
Fri, 03/11/2016 - 20:29 नवीन
सगळे म्हणणे न म्हणणे जर बालाकांना समजले असते तर "बालके" अन "प्रौढ़" असे कायदेशीर वर्गीकरण कश्याला केले असते साहेब? कायदेशीर रीत्या सज्ञान नसणाऱ्या पोरक्या पोरांना 18 चे होईपर्यंत रिजेंट किंवा वार्डन/लीगल प्रॉक्सी/ पर्सन विथ पॉवर ऑफ़ अटॉर्नी कश्याला ठेवत असतील कायद्यानुसार? सरळ त्या पोरालाच विचारायचे की त्याला काय हवे आहे ते!, काय म्हणता?? बाकी मोदक ह्यांच्या खालील प्रतिसादाशी सहमत. बाकी एक कुतूहल आहे मन की बात ही मोदी ज्या मुशीत अन संस्कारात् घडले आहेत त्याचा इफ़ेक्ट असावा काय? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

नानासाहेब, मुलांना समजत नाही

बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 20:58 नवीन
हा गैरसमज आहे. त्यांना ब-याच गोष्टी समजतात. लहान मुलं तर प्रचंड smart असतात. इथे हे उदाहरण अस्थानी नाही की शिवाजीमहाराजांनी तोरणा जिंकला तेव्हा ते आजच्या कायद्याच्या दृष्टीने सज्ञान नव्हते (१६ वर्षांचे). दुस-या टोकाचीही उदाहरणं आहेत - ज्यात लहान म्हणावी अशी मुलं अत्यंत घातकी गुन्हे करताना सापडली आहेत. १८ वर्षे ही सरकारने ठरवलेली मर्यादा आहे. आधी २१ होती. मी पहिली-दुसरीत असताना जे शिकलो त्याच्या अनेकपट जास्त माहिती माझ्या आता पहिलीत जाणाऱ्या मुलाला शिकवली जाते आहे आणि ती त्याला आणि त्याच्या वयाच्या मुलांना समजतेसुद्धा. ते ज्या प्रकारे त्याचा वापर करतात त्यावरून कळतंच. ते असो. इथे कुठल्याही सक्तीचं समर्थन करायचा हेतू नाही. पण मुलांना काही कळत नाही हे म्हणणं चुकीचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

तुम्हाला मान्य नसेल तर सोडतो

नाना स्कॉच
Fri, 03/11/2016 - 21:31 नवीन
तुम्हाला मान्य नसेल तर सोडतो पण शिवाजी महाराज हे उदाहरण लैच जास्त गड़बड़ वाटले इतके नोंदवतो, कारण तो सेट ऑफ़ रिफरेन्स वेगळा आहे ! ती राजेशाही होती, मध्ययुग होते आपण ज्या व्यवस्थे अन सिस्टम बद्दल बोलतोय ती वेस्टमिंस्टर सिस्टम पुर्ण वेगळी पड़ते असे वाटते, नथिंग पर्सनल जाणवले ते सांगतोय. हे एक, दूसरे म्हणजे तुमचा "स्मार्टनेस" अन "डिसिशन मेकिंग मॅचुरिटी" ह्या दोन गोष्टीत गोंधळ उडालाय का भाऊ? असो!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

प्रश्न मुलांच्या अाकलनक्षमतेचा आहे.

बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 21:51 नवीन
शासनव्यवस्थेचा नाही. दुसरी गोष्ट - Smartness आणि decision making maturity या गोष्टीचा वयाशी काहीही संबंध नाही. तसंच म्हणायचं तर ४६ व्या वर्षीसुद्धा या दोन्हीही गोष्टी नसलेला किमान १ माणूस तरी तुम्हाला माहित असेलच, काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

मला याबाबत माहिती नाहीये..

मोदक
Fri, 03/11/2016 - 19:16 नवीन
मला याबाबत माहिती नाहीये.. प्रत्येक मन की बात चे प्रसारण प्रत्येक शाळेमध्ये होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १

मन की बात चे प्रसारण शाळेत

जेपी
Fri, 03/11/2016 - 19:44 नवीन
मन की बात चे प्रसारण शाळेत सक्ती चे नाही आणी होत ही नाही. शिक्षक दिनाचा संवाद मात्र होतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

नाही

शाहिर
Fri, 03/11/2016 - 19:44 नवीन
फक्त शिक्षक दिनाची सक्ती होती. इतर वेळेस सक्ती नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

धन्यवाद जेपी आणि शाहिर साहेब.

मोदक
Fri, 03/11/2016 - 21:59 नवीन
धन्यवाद जेपी आणि शाहिर साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

कमाल आहे मोदींच्या पारंपरिक

श्री गावसेना प्रमुख
Fri, 03/11/2016 - 15:14 नवीन
कमाल आहे मोदींच्या पारंपरिक विरोधकांना त्यांच्या चुका सापडू नये निदान ह्या धाग्यापुरत्या, तिरसिंगराव एखाद सूराग भी दिया करो
  • Log in or register to post comments

हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट

lakhu risbud
Fri, 03/11/2016 - 20:58 नवीन
खिकss बाकी काही नाही पण ती हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट आठवली. मोदींच्या बाबतीत सगळ्यांचे असेच होतेय काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

प्रांजलपणाचा अभाव.

कलंत्री
Fri, 03/11/2016 - 15:24 नवीन
मोदीबद्दल इतर काहीही मतमतांतरे असोत पण त्यात प्रांजलपणाचा अभाव आहे असे मला वाटते. अजूनही ते प्रचारसभा असाव्यात अश्याच उत्साहात बोलत असतात तर कधी काँग्रेसच्या चूका याच भांडवलावर बोलत असतात. सध्या देश अपरिपक्व नेत्यांचा कचाट्यात सापडला आहे मग ते मोदी असो, राजनाथसिंह असो अथवा कॉग्रेसची नेतेमंडली असोत. देशापेक्षा स्व प्रतिमाहीच सर्वांना महत्त्वाची वाटते.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 15:28 नवीन
अपरिपक्वतेच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत. बाकी देशापेक्षा स्वप्रतिमा मोठी वाटणं हे जगातल्या सगळ्याच राजकीय नेत्यांबाबतीत खरं आहे. नार्सिसिस्ट असल्याशिवाय तुम्ही नेता किंवा अभिनेता बनूच शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

+११

नाखु
Fri, 03/11/2016 - 15:29 नवीन
किमान १०% टक्के तरी वाजपेयी असावे आणि त्याकरीता १०% भाजपेयी नसले तरी चालेल !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

अपरिपक्वतेच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत

होबासराव
Fri, 03/11/2016 - 15:31 नवीन
ऑन द टोप नन अदर दॅन युगपुरुष
  • Log in or register to post comments

मोदींच्या चुका आणि माझे मत

गॅरी शोमन
Fri, 03/11/2016 - 16:53 नवीन
१. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते. खाण्यापिण्याच्या बाबतीत हे सरकार, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही, हे ठासून सांगणे आवश्यक होते. असे केले असते तर, त्यानंतर असहिष्णुतेवरुन झालेली पुरस्कारवापसीही टळली असती. बीफ प्रकरण नवे नाही. खास करुन गोमांसावर बंदी काँग्रेसच्या राज्यातच घातली आहे. अमेरीकेतही घोडा आणि कुत्रा याच्या मांसावर बंदी आहे. मग जर मुद्दाम कोणी आमचा हक्क आहे म्हणुन जाहिर बीफ पार्टी करत असतील तर प्रतिक्रिया येणारच. मोदींनी कश्या कश्यात हस्तक्षेप करायचा ? महाराष्ट्रात आलेल्या गोवंश बंदी संदर्भात अल्पभुधारक शेतकरी आणि शेतीची किफायती यावर पद्मश्री सुभाष पाळेकरांच्या विचाराचा परामर्ष जरुर घ्यावा. शेतकरी जर शुन्य खर्चावर आधारीत शेती करायला हवा असेल तर फक्त गाय वाचुन उपयोग नाही. गावरान बैल ( वळु ) यांचेही संगोपन आवश्यक आहे. म्हैस आणि जर्सी गायी लालु प्रसाद यादवांसारखा निधर्मी सुध्दा मारु देणार नाही कारण त्यांची उत्पादकता जास्त आहे. २. जे.एन.यु. प्रकरणांत, भारतविरोधी घोषणा झाल्यावर, खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायला हवा होता. घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा न लावता, सुप्रीम कोर्टाचा अनादर केल्याचा गुन्हा, वा तत्सम योग्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन पुरले असते. बाकी मिडिया ट्रायल चालूच राहिली असती, पण सरकार बदनाम झाले नसते. वो कत्ल भी करते है तो चर्चा नही होती हम हा हा भी भरते है तो हो जाते है बदनाम ( बदनाम करायचे एकदा ठरले की ८३०० विद्यर्थ्यांनी निवडलेला कन्हैया १२० कोटी लोकांनी निवडलेल्या पंतप्रधानांच्या पेक्षा मोठा होतो. गंमत म्हणजे तो पंतप्रधानांवर टीका करतो हे मिडीया दाखवते. ) ३. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय, असे लोकांना वाटायच्या आंत तो कार्यक्रम बंद करायला हवा होता. तिथे भरभरुन बोलायचे आणि महत्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगायचे, हा प्रकार अनाकलनीय आहे. ( कन्हैया किंवा अन्य मिडीयाने उचललेल्या मोहीमा पैड आहेत. मोदी त्यापेक्षा जास्त महत्व स्वच्छ्तेला, मेक इन इंडियाला, किंवा विकासाला देतात ज्यामुळे पुढील काही वर्षात जनता विरोधकांना विसरेल यासाठी हा पेड गदारोळ आहे. ) ४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत केवळ वाईटच गोष्टी केल्या आहेत, हा अपप्रचार आहे. त्यांच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला असता, तर इतके कटु वातावरण झालेच नसते. भाजप टोमणे प्रतिक्रिया म्हणुन देते. स्मृती इराणी केवळ राहुल गांधींच्या मतदार संघात निवडणुक लढल्या त्यामुळे बदनामीला पात्र झाल्या आहेत. मोदी नसते तर काँग्रेसचे घोटाळेबाज सरकार पुन्हा निवडुन आले असते म्हणुन मोदी टिकेला पात्र आहेत हे समजायला थोडासाच विचार करावा लागतो. ५. भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्‍या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते. मायला, दिग्वीजय सिंग यु पी ए च्या काळात बडबड करायचे ते फारच विनोदी असायचे. आता करमणुक होत नाही ही तक्रार असेल तर त्यांची जागा आप नेत्यांनी घेतली आहे.
  • Log in or register to post comments

१) बदनाम करायचे एकदा ठरले की

होबासराव
Fri, 03/11/2016 - 17:34 नवीन
१) बदनाम करायचे एकदा ठरले की ८३०० विद्यर्थ्यांनी निवडलेला कन्हैया १२० कोटी लोकांनी निवडलेल्या पंतप्रधानांच्या पेक्षा मोठा होतो. गंमत म्हणजे तो पंतप्रधानांवर टीका करतो हे मिडीया दाखवते. २) मायला, दिग्वीजय सिंग यु पी ए च्या काळात बडबड करायचे ते फारच विनोदी असायचे. आता करमणुक होत नाही ही तक्रार असेल तर त्यांची जागा आप नेत्यांनी घेतली आहे. आणि अशा तर्‍हेने क्लिंटन भौ ह्यानि ओव्हरच्या ५ बॉल मध्ये ३ चौकार आणि २ षटकार मारलेले आहेत.... २ षटकार हे तर जबरा शॉट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन

नावात लय गोंधळ होतो राव!

sagarpdy
Fri, 03/11/2016 - 17:35 नवीन
नावात लय गोंधळ होतो राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन

अरारा रारा. लैच बेक्कार

तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 18:03 नवीन
अरारा रारा. लैच बेक्कार गोंधुळ. कायतरी करा पाहिजे. संपादक/मालक, लक्ष घाला इकडे. उगा भांडणे व्हायची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

अभ्यासू म्हणवल्या जाणार्

तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 17:40 नवीन
अभ्यासू म्हणवल्या जाणार्‍यांचा असा प्रतिसाद येणं निराशाजनक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन

प्रतिसादकर्ता शोमन आहेत

शिद
Fri, 03/11/2016 - 18:02 नवीन
प्रतिसादकर्ता शोमन आहेत ट्रुमन नाही. मी पण प्रतिसाद वाचून गोंधळलो होतो पण सदस्यनाम वाचून खात्री करुन घेतली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

वरील प्रतिसाद गॅरी ट्रुमन

तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 18:05 नवीन
वरील प्रतिसाद गॅरी ट्रुमन यांचा असल्याच्या नजरचुकीने झालेल्या घोळातून हा प्रतिसाद दिला गेला. संपादकांना विनंती की प्रतिसाद उड्वावा. व गॅरी ट्रुमन यांना विनंती की या चुकी साठी एकडाव माफी द्यावी. नाम साधर्म्यामुळे हा घोळ झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अच्छा!

बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 19:44 नवीन
म्हणजे तो प्रतिसाद ट्रूमन यांनी दिला असता तर अभ्यासू असता आणि शोमन यांनी दिलाय म्हणून अभ्यासू नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आय डी मि सुद्धा ओवरलुक केलाय

होबासराव
Fri, 03/11/2016 - 19:48 नवीन
पण शोमन ह्यांनि जे लिहिले आहे ते चौकार आणि षटकारच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

१) बदनाम करायचे एकदा ठरले की

होबासराव
Fri, 03/11/2016 - 19:52 नवीन
१) बदनाम करायचे एकदा ठरले की ८३०० विद्यर्थ्यांनी निवडलेला कन्हैया १२० कोटी लोकांनी निवडलेल्या पंतप्रधानांच्या पेक्षा मोठा होतो. गंमत म्हणजे तो पंतप्रधानांवर टीका करतो हे मिडीया दाखवते. असे असताना आता कुठलि आझादि मागताहेत हे २) मायला, दिग्वीजय सिंग यु पी ए च्या काळात बडबड करायचे ते फारच विनोदी असायचे. आता करमणुक होत नाही ही तक्रार असेल तर त्यांची जागा आप नेत्यांनी घेतली आहे. मान्य पण कन्हैय्या बेगुसरायकर आणि मंडळिने काहि काळा पासुन ह्याना रंगमंचापासुन दुर ठेवलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

गॅरी ट्रुमन उर्फ क्लिंटन

तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 20:50 नवीन
गॅरी ट्रुमन उर्फ क्लिंटन यांची मिपावर अभ्यासू सदस्य अशी ओळख आहे. शोमन यांची अजुनतरी तशी मिपावर कारकिर्द, ओळख नाही असे मला वाटते, इतर सदस्यही याला कदाचित अनुमोदन देतील. बाकी, मोदींच्या बाजूने येणारा प्रत्येक प्रतिसाद अभ्यासपूर्णच आणि निष्पक्षच आहे असे डोळे झाकून, बुद्धी बंद ठेवून समजायचे असेल तर आमची काहीसुद्धा हरकत नाही. गो अहेड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मोदींच्या बाजूने किंवा विरोधात

बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 21:04 नवीन
असा एकतरी उल्लेख माझ्या प्रतिसादात आहे का? मी गॅरी ट्रूमन आणि गॅरी शोमन यांच्यामध्ये झालेल्या गोंधळाबद्दल बोलतोय. आता तुम्हाला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मोदी दिसतात आणि मी न लिहिलेल्या गोष्टीही त्यांच्याशी जोडाव्याशा वाटतात त्यावरून कोण मोदींबद्दल obsessed अाहे ते समजतंच. असो. Move on.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तुम्ही हा जो आत्ता प्रतिसाद

तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 21:22 नवीन
तुम्ही हा जो आत्ता प्रतिसाद दिलाय ना त्या प्रकाराची सवय झाली आहे. सो नो प्रॉब्लेम. आज फक्त माझ्या नशिबाने हा धागा फक्त आणि फक्त मोदींशी संबंधित आहे. सो आय डोण्ट केअर अ‍ॅट ऑल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तेच तर म्हणतोय. तुम्ही त्यालाच दुजोरा देताय.

बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 21:55 नवीन
तुम्हाला कुठलाही विषय, मग धागा कोणताही असो, मोदींवर न्यायची सवय झाली आहे. हा तर धागाच मोदींवर आहे. म्हणजे तुम्ही फुल बॅटिंग करणारच. होम पिच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अगदी अगदी. वट्ट वसूल करणार.

तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 22:06 नवीन
अगदी अगदी. वट्ट वसूल करणार. एनी ऑब्जेक्शन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

र गांधी नावाची पातशाही अनके

निनाद मुक्काम …
Sun, 03/13/2016 - 00:05 नवीन
र गांधी नावाची पातशाही अनके दशके राज्य करून गेली. घोड्याचे मास हा मुद्दा मागे मी सुद्धा मांडला होता घोड्याचे मास जर्मनीत कायदेशीर आहे पण अमेरिकेत त्यावर बंदी आणतांना ह्या प्रण्याच्यावर तेथील जनतेचे प्रेम त्यांच्या भावना लक्षात घेऊन बंदी आणल्या गेली कारण धार्मिक नाही आहे भारतात गायीचे मास हे बहुसंख्य लोकांच्या धार्मिक भावनेशी निगडीत असल्याने त्यावर बंदी आणल्या गेली किंबहुना ती युपिए व एन डी अ ने सुद्द्धा आणली पण मोदीभरारी मुळे देशात त्यांचे विओर्धक त्यातही विचार्जंत एवढे सैरभैर झाले की त्यांनी कुठल्याही गोष्टींचे अवडंबर माजवले, बीफ च्या मुद्यावर राजकारण आंजा व टीव्ही वर राजकारण तापले सर्व सामान्य माणसाला त्याने शष्प फरक पडला नाही,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन

भारतात गायीचे मास हे बहुसंख्य

तर्राट जोकर
Sun, 03/13/2016 - 11:37 नवीन
भारतात गायीचे मास हे बहुसंख्य लोकांच्या धार्मिक भावनेशी निगडीत असल्याने त्यावर बंदी आणल्या गेली >> अभ्यासू सदस्य, अभ्यास वाढवा. जेव्हा भाजपविरोधक हाच मुद्दा घेऊन विरोध करतात तेव्हा भाजपसमर्थक घटनेतले कायदे दाखवून गोमांसबंदीमागे कसे धार्मिक कारण नाही हे पटवून देतात. तेव्हा एक काय ते निश्चित करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

अभ्यास तुमचा वाढवा

निनाद मुक्काम …
Mon, 03/14/2016 - 02:03 नवीन
अभ्यास तुमचा वाढवा घटने मध्ये जेव्हा एखादे कलम असते त्यामागे एक तर्क असतो व बैठक असते व गोहत्येवर बंदी हा हिंदू धार्जिणे कलम हे धर्मनिरपेक्ष देशात फक्त ह्यासाठी अस्तित्वात आले कारण बहुसंख्य हिंदू लोकांची भावना व श्रद्धेशी निगडीत प्रश्न आहे. म्हणूनच प्रत्येक राज्य सरकारला ह्याबाबत स्वतंत्र कायदा करण्याची मुभा आहे उदा गोव्यात बहुसंख्य ख्रिस्ती बांधवांच्या भावनांचा आदर करत ही बंदी गोव्यात आणली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

ओ दादा असे काय करताय हो?

नाना स्कॉच
Mon, 03/14/2016 - 06:25 नवीन
ओ दादा असे काय करताय हो? भारतीय संविधानात जी

डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़ स्टेट पॉलिसी

दिली आहेत ती 3 तत्वांवर आधारित आहेत. 1 समाजवादी तत्वे 2 गांधियन तत्वे 3 लिबरल इंटेलेक्चुअल तत्वे गोहत्या बंदी ही आर्टिकल 48. च्या अंतर्गत येते , हे तत्व गांधियन तत्वांच्या अंतर्गत घटनेत समाविष्ट केले गेले आहे , आता मग कसे हो? गोहत्या बंदी झाल्याने तुम्हाला त्यात जे कायदेशीर दिसते आहे ते गांधियन तत्वांच्या अंतर्गत आहे, मग आता एक कबुल करा की 1 गांधी हे प्रचंड मोठे हिंदु समर्थक होते (हे तुमच्या राजकीय स्टैंड ला कमीपणा आणेल) किंवा 2 पुर्ण मसूदा समिती (ड्राफ्टिंग कमिटी) हुकलेली होती. गोहत्याबंदी बद्दल कलम 48 म्हणते "Organisation of agriculture and animal husbandry The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle" ह्यात हिंदु धर्माचा संबंध कुठे आला? की आता म्हणता घटना समिति ला गाँधीवादी तत्वे अन हिन्दुत्वातला फरक कळत नव्हता?? कारण गांधी तर तुमच्यालेखी हिंदु विरोधी होते, नाही का? उगाच काय वाटेल ते बोलु नका दादा , धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

त्यांच्या इन्डॉक्ट्रीनेशनच्या

तर्राट जोकर
Mon, 03/14/2016 - 10:35 नवीन
त्यांच्या इन्डॉक्ट्रीनेशनच्या बाहेर ते बोलु शकत नाहीत, तेव्हा त्यांना माफ करा स्कॉचनाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा