Skip to main content

मोदींच्या काही चुका

लेखक तिमा
Published on गुरुवार, 10/03/2016
पंतप्रधान, नरेंद्र मोदी, यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत ज्या चुका केल्या त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे. यांत सर्वच मुद्द्यांचा परामर्ष घेतला आहे, असा माझा दावा नाही. मिपाकर त्यांत मोलाची भर घालू शकतात. १. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते. खाण्यापिण्याच्या बाबतीत हे सरकार, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही, हे ठासून सांगणे आवश्यक होते. असे केले असते तर, त्यानंतर असहिष्णुतेवरुन झालेली पुरस्कारवापसीही टळली असती. २. जे.एन.यु. प्रकरणांत, भारतविरोधी घोषणा झाल्यावर, खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायला हवा होता. घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा न लावता, सुप्रीम कोर्टाचा अनादर केल्याचा गुन्हा, वा तत्सम योग्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन पुरले असते. बाकी मिडिया ट्रायल चालूच राहिली असती, पण सरकार बदनाम झाले नसते. ३. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय, असे लोकांना वाटायच्या आंत तो कार्यक्रम बंद करायला हवा होता. तिथे भरभरुन बोलायचे आणि महत्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगायचे, हा प्रकार अनाकलनीय आहे. ४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत केवळ वाईटच गोष्टी केल्या आहेत, हा अपप्रचार आहे. त्यांच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला असता, तर इतके कटु वातावरण झालेच नसते. ५. भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्‍या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते. अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर, वरील सर्व मुद्दे गैरलागू होतात.

वाचन संख्या 29215
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

In reply to by विकास

हे हे ;-) हे गंमतीशीर आहे. चूक आहे हे दिसले तरी मान्य करायला एव्हढे जड का जात आहे? हाच प्रश्न मीही तुम्हाला विचारू शकतो. सदर कार्यक्रम श्री श्रींचा वैयक्तिक कार्यक्रम आहे की नाही एवढं बघा. बाकी तिथे किती लोक येतात ह्याच्याशी काही कर्तव्य नाही. दंड भरु पण कायदे मोडू हाही अरेरावीचा प्रकार सरकारने कसा सहन केला कुणास ठावूक. तुम्ही कुंभमेळा इत्यादी उदाहरणं देऊन जस्टीफाय करत आहात तेही लॉजिक हुकलेलं आहे. माझ्या दृष्टीने हा लष्करी सेवेचा वैयक्तिक लाभाच्या कामासाठी सरकारच्या संगनमताने झालेला गैरवापर आहे. ह्याला कितीही कायदेशीररित्या बसवण्याचा प्रयत्न केला तर जे चूकीचं ते चुकीचंच. भुजबळांच्या धाग्यावर लेखकाने हाच प्रश्न विचारला आहे. सगळं कायदेशीररित्या बसवलं तरी भ्रष्टाचार तो भ्रष्टाचारच.

In reply to by तर्राट जोकर

ऑर्ग्युमेण्ट लॉजीकमधे बसवायच्या नादात तुम्ही तर्ककर्कश आणि इल्लोजीकल होत आहात. मिपावर या कॅटॅगिरीचे काहि सदस्य आहेत. तुम्ही त्यांच्या पंक्तीला जाऊन बसु नका. पुढेही अनेक महत्वाचे वादविवाद होणार आहेत, व आपल्याला तयारीचे वाक्पटु लागणार आहेत. तुमचं पोटेन्शीअल चांगलं आहे. त्याची माती करु नका हि विनंती. बाकी आपण सुज्ञ आहात.

In reply to by तर्राट जोकर

दंड भरु पण कायदे मोडू हाही अरेरावीचा प्रकार सरकारने कसा सहन केला कुणास ठावूक. दंड भरणार नाही घाला जेलात असे काहीसे ते बाबाजी म्हणाले होते न??

तिमा जी, चांगला धागा काढला आहे तुम्ही. मोदी चुका करू शकतात, करत आहेत हेच मुळी काही लोक मान्य करायला तयार होत नाहीत. मोदींचे आणी त्यांच्या अंध भक्तांचे (हे सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखाना आणी त्यांच्या अंध भक्ताना लागू होते) विमान जमिनीवर येईल तो सुदिन.

In reply to by अभिजीत अवलिया

तिमांचा धागा चांगलाच आहेच,पण प्रश्न तो नाही. मोदी चुका करू शकतात नक्कीच. पण ज्या प्रकारे द्वेषभावनेने मोदीविरोधक वावरत असतात,त्या द्वेषभावनेला विरोध आहे.

In reply to by चेक आणि मेट

पण ज्या प्रकारे द्वेषभावनेने मोदीविरोधक वावरत असतात,त्या द्वेषभावनेला विरोध आहे. चेक मेट साहेब, हीच गोष्ट मोदी आणी त्यांच्या भक्ताना पण लागू होते. ह्यांच्या विरुद्ध कोणी बोलले की लगेच त्याना देश विरोधक घोषित करायचे, पाकिस्तान ला निघून जायचे सल्ले द्यायचे हे बंद केले तर बरे होईल.

टिकेला द्वेषभावनेचे नाव दिले की सगळं कसं सोपं, सुटसुटीत, मंगल, मंगल होऊन जातं. म्हणजे टिका ही द्वेषभावना आहे म्हणून नुसती उडवूनच लावता येत नाही तर टिका करणार्‍याची लायकीच नाही हेही ठरवून टाकता येते. तसेच आम्ही ठरवू ती टिका किंवा द्वेषभावना असा खाक्या टिका होऊच नये म्हणून दाखवावा. सरतेशेवटी काय तर आम्हाला जे योग्य वाटेल तेच बोला करा अन्यथा बोलूच नका. आम्हाला अडचणीत आणणारे बोललात तर ते तुमच्या मनात विखारी द्वेष आहे म्हणून बोलताय असे म्हणायला आम्ही मोकळे.

प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःवर का घेता? तुम्ही द्वेषभावनेने टीका केलेली नाही तर मग चेक आणि मेट यांचं विधान तुम्हाला लागू नाही. त्यांच्या विधानात तुमचं नावही नाहीये. तुमचे बहुतेक सगळे वाद हे असं स्वतःवर ओढवून घेण्यामुळे झालेले आहेत. If your conscience is clear that your criticism is without malice and prejudice, why are you becoming so serious?

In reply to by बोका-ए-आझम

ते ओवरआॅल देशामध्ये असणार्या वातावरणाबद्दल आहे. कोणी मला टार्गेट करीत नाही याची मला जाणीव आहे.

२०१४ पासुन फरक जाणवतो "जो मोदि समर्थक नाहि तो धर्मभ्रष्ट आणि राष्ट्रदोही आहे. मोदि निवडुन आलेत म्हनुण सक्तिने आंधळे मोदि समर्थक / भक्त बना असा पवित्रा मोदि समर्थक (***) घेत आहेत. याच कारणावरुन बरेच Whatsapp group exit करावेसे वाटतात. काहि Whatsapp group exit केले सुध्दा (यावर दु:ख नाहि) असो........ १. बीफ प्रकरण या प्रकरणांत, एका हवाई दल सैनिकाच्या कुटुंबाचा बळी गेला. हे किती वाइट झाले यावर अस्सल लष्करी माणसाने बोललेलेच चांगले २. जे.एन.यु. प्रकरण अतिशय बालिश प्रकारे हाताळलेले प्रकरण. मला वाट्ते. जे.एन.यु. मुख्य कार्यालय दिल्लीत आहे पण जे.एन.यु. ला अर्थपुरव केन्द्र सरकार करते Jawaharlal Nehru University was established in 1969 by an act of parliament.[4] It was named after Jawaharlal Nehru, India's first Prime Minister. G. Parthsarthi was the first vice-chancellor The following are the constituent institutes under the university:[6] Centre for Cellular and Molecular Biology (CCMB), Hyderabad Officers Training Academy, Chennai Central Drug Research Institute (CDRI), Lucknow Centre for Development Studies (CDS), Trivandrum College of Military Engineering (CME), Pune Institute of Microbial Technology, Chandigarh Military College of Telecommunication Engineering (MCTE), Mhow The National Defence Academy, Pune The Army Cadet College, Dehra Dun (विकिपेडिया साभार ) जे.एन.यु. ची व्याप्ती पहा. राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये ३ वर्ष प्रशिक्षण पुर्ण केलेल्या कॅडेटला जे.एन.यु. मधुन पदवी मिळते. जे.एन.यु. मध्ये राष्ट्रविरोधी कारवाया चालतात तर संरक्षण खात्यासाठी लष्करी कर्मचारी नेमूण स्वतंत्र विद्यापीठ स्थापुन (जे.एन.यु. पासुन राष्ट्रीय संरक्षण अकादमी व इतर संलग्न लष्करी संस्था वेगळ्या करुन.) एक चपराक दयायची सोडुन घाणेरडे राजकारण चालु आहे. ३. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय 'मनकी बात'चा अतिरेक होतोय का ते माहीत नाही. आधीचे पंतप्रधान बोलत नाहि म्हणुन शिमगा झाला. मनकी बात " एकटे " बोलायचे माध्यम होते तेव्हा गरज नसलेल्या विषयावर " एकटे " जवळ जवळ एकतर्फ बोलुण मोकळे झाले. ४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी सरकार कोणतेही असो संसद नीट चालेल ?? भत्ते कमी झाले तर ............................... ५. भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्‍या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते. भाजप कार्यकर्ता समज देवुन समजत नाहि. त्यामूळे यावर बोलुन मी माझ्या साहिष्णुतेला गालबोट लावु इच्छित नाहि. अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर, वरील सर्व मुद्दे गैरलागू होतात सहमत..............

मोदींची एक मोठी राजकीय चूक म्हणजे डिसेंबर २०१३ मध्ये निवडली गेलेली दिल्ली विधानसभा बरखास्त करायला अक्षम्य उशीर केला ही. खरे तर दिल्लीत विधानसभा निवडणुका महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकांबरोबर ऑक्टोबर २०१४ मध्येच व्हायला हव्या होत्या. हा उशीर केला आणि त्यामुळे आम आदमी पक्षाचे फावले. एप्रिल-मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्याच्या धक्क्यातून सावरायला आम आदमी पक्षाला अधिक वेळ मिळाला. दुसरे म्हणजे भाजप निवडणुकांना घाबरत आहे म्हणून उशीर केला जात आहे असा प्रचार करायला आआपला आयते कारण मिळाले. त्यातूनच आआपला ७० पैकी ६७ जागा मिळून अभूतपूर्व यश मिळाले आणि केजरीवाल नावाचा एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला.राजकारणात प्रतिस्पर्धी हवाच.पण तो केजरीवाल नको (अगदी राहुल गांधीही चालेल) असे मला वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

आर्थिक सुधारणा नेहरू - गांधी परिवाराशिवाय असलेल्या एकमेव काँग्रेस सरकारनेच केल्या. भारताच्या आजवर झालेल्या पंतप्रधानांमध्ये पीव्हीएन (हे त्यांचं टोपणनाव) हे सर्वात underrated पंतप्रधान होते. दुर्दैवाने ते फक्त ५ वर्षेच पंतप्रधान राहिले.

एप्रिल-मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्याच्या धक्क्यातून सावरायला आम आदमी पक्षाला अधिक वेळ मिळाला.
ह्याचा अर्थ भाजपाने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे दिल्लिकरांना गृहीत धरले होते का? की, डिसेंबर २०१३ मधील विधानसभा निवडणुकीतील पराभवातून सावरली नव्हती?

150 निमीत्त सर्वांना चुक्याच्या 2-2 पेंड्या देऊन सत्कार करण्यात येत आहे. -शुभेच्छुक -जेपी आणी तमाम चुक्याप्रेमी कार्यकर्ते. *चुका-एक पालेभाजी आहे. **दुष्काळा मुळे 2 च पेंड्या मिळतील.

In reply to by जेपी

निवेदनात पेंड्याच्या ऐवजी "गड्डी" असे वाचावी आणि सदर चुका

निस्तरून

माफ करा निवडून मिळणार नाही. सचीव जेपी आणी तमाम चुक्याप्रेमी कार्यकर्ते.

An InstaVaani poll shows 74% of the respondents approved of Modi’s performance as PM—unchanged from the finding of an end-November survey http://www.livemint.com/Politics/GR5CA3625Va9MVtjdSTeaI/Narendra-Modis-approval-ratings-stay-high-at-74.html

In reply to by सुबोध खरे

१०४४ लोकांच्या सर्वेतून टक्केवारी काढणे आणि त्यायोगे देशव्यापी निष्कर्ष काढणे. काय बोलावे यावर? रच्याकने, मागे आपण आणि म्हात्रे सरांसोबत झालेल्या चर्चेत ह्यापेक्षा कितीतरी मोठे आकडे मी मांडले होते. तेव्हा एकूण जनतेपैकी आंतरजालावर असलेली १७ टक्के जनता हा काही जनमताचा, देशाच्या वातावरणाचा खात्रीलायक पुरावा नव्हे असे आपण दोघे पटवून देत होतात ते आठवले. http://www.misalpav.com/comment/757968#comment-757968 हा आपला प्रतिसाद. चेपू किंवा इतर सार्वजनिक जालीय न्यासावर सामान्य नागरिक (CITIZEN) नव्हे तर जालीय नागरिक(NETIZEN) असतात. तेंव्हा त्यांचे मत हे सामान्य माणसांचे मत धरणे कितपत बरोबर आहे याची शंका आहे. ह्यात म्हात्रेसरांचे हे एक विधानही रोचक आहे. १७% नेट्युजर्स हे १००% भारतियांचे स्टॅटिस्टिकली योग्य (ना स्ट्रॅटिफाईड, ना अडिक्वेट) सँपल नाही. म्हणजेच, त्यांच्या मताला अख्ख्या भारतियांच्या मताचे व्यावहारीक प्रतिबिंब म्हणणे चूक आहे. ही सगळी चर्चा वाचनिय आहे. मला कधी कंटाळा आला की नेहमी वाचत असतो.

In reply to by तर्राट जोकर

जोकर बुवा माझे त्यावर कोणतेही म्हणणे नाही कि ते सर्वेक्षण बरोबर आहे कि चूक आहे. तुम्ही लगेच भांडायला उठलात. हा काळा चष्मा घातल्याचा परिणाम आहे एवढेच सिद्ध होते. पण काडी टाकून मजा पाहायला मला पण मजा आली हे नमूद करून आपली रजा घेतो.

In reply to by सुबोध खरे

हायला. आता मी अभ्यासपूर्ण काही मांडले की भांडण असते का? अरे वा. छान. काड्या टाकून ज्या कोणाला मजा येत असेल त्याला मजा घेण्याचा पूर्ण हक्क आहे असे माझे मत आहे. काडी टाकतांना काळजीही आवश्यक आहे. उगा आपलेच घर पेटायचे.

In reply to by तर्राट जोकर

काही लष्करी अधिकार्यांनी टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ते मान्य केले तरीही लष्कराला अशा कार्यक्रमात ओढू नये असेच मत मी नोंदवलेले आहे आणि त्याची कारणेही दिलेली आहेत. लष्करात असताना मी किंवा अनेक डॉक्टर मित्रांनी जेथे सरकारी / खाजगी वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती किंवा तुटपुंजी होती तेथे सेवा पुरवलेली आहे (उदा मी उत्तर अंदमान, निकोबार येथे रुग्णसेवा दिली होती) आणि तसे करण्यात मला, माझ्या मित्रांना किंवा तेथील लष्करी अधिकार्यांना कोणताही कमीपणा वाटलेला नाही. मग ती अशा दूरच्या ठिकाणी राहत असतील तरीही ही पण आपलीच माणसे आहेत. अशा दूरस्थ खेड्यात लष्कर शाळा चालवते रस्ते बांधून देते किंवा शुद्ध पिण्याचे पाणी सारख्या इतर सुविधाहि पुरवते. परंतु दिल्ली सारख्या मध्यवर्ती ठिकाणी जेथे इतर मुलकी सेवा उपलब्ध आहेत तेथे लष्कराला अशा (खाजगी) कार्यक्रमात गुंतवू नये असेच माझे मत आहे. "लष्कराला खाजगी नोकरासारखे वागवले" इतकी टोकाची प्रतीक्रिया द्यायची गरज नाही.

In reply to by सुबोध खरे

ती लिंक तुमच्यासाठी किंवा तुमच्यासारखे मत असणार्‍यांसाठी नाही. बाकी ज्यांनी खरोखर वागवले त्यांच्या बद्दल एवढा त्रागा झाला नाही जेवढा मी बोललो त्याबद्द्ल झाला. जो विरुद्ध बोलणार ते बोलणेच कसे चुकीचे हे सांगणे हा समर्थकांचा व्यव्च्छेदक गुण.

लोकहो, नागरी कामासाठी सैन्याचा वापर करण्यासंबंधी इथे कोणाचं लक्ष गेलेलं दिसंत नाही. http://www.globalmarathi.com/globalmarathi/20100925/4952112892220927479.htm हे काम करण्यासाठी संबंधितांकडून एक छदामही मोजला गेला नाही. सैन्यालाच सगळा खर्च सोसावा लागला (इंग्रजी दुवा). http://www.ndtv.com/india-news/commonwealth-games-army-asked-to-work-at-no-cost-428133 आ.न., -गा.पै.

In reply to by तर्राट जोकर

तजो, भ्रष्ट नागरी कामामुळे सैन्याला पूल बांधून द्यावा लागला. तोही फुकटात. हे आपल्या ध्यानी आलं असेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

'काँग्रेसने भ्रष्टाचार केला बघा बघा' हे एवढं बोलण्यासाठी एवढं घुमवायची गरज नाही हो. कॉमनवेल्थ गेम्स ही कोणा काँग्रेसी किम्वा त्यांच्या बगलबच्च्यांच्या घरचा कार्यक्रम होता असे तुम्ही समजत असाल तर वेगळी गोष्ट आहे म्हणा.

In reply to by तर्राट जोकर

तजो, विषय सैन्यावरील अतिरिक्त भाराचा चाललाय. तसा भार पडायला नको. पण ऐन वेळेस पडला तर योग्य मोबदला मिळावा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विषय सैन्यावरील अतिरिक्त भाराचा चाललाय. >>>>>>>> कुणी ठरवला हा विषय ह्या धाग्यावर??????? डॉण्टचेन्जदाटापिक.

In reply to by तर्राट जोकर

तजो, कोणी म्हणून काय विचारता? साक्षात मीच ठरवलाय. पण तसं सांगितलं नाही. मला वाटलं की तुम्हाला टेलीपथी अवगत असेल. पण हाय रे दैवा! आ.न., -गा.पै.