जे.एन.यु. - नक्की काय सुरु आहे??
णमस्कार लोक्स. (टार्याची लै आठवणा येते कधि कधि)
जे.एन.यु. प्रकरण कोणि जवळुन फॉलो करत आहे का? नक्की काय सुरु आहे तिथे?
भारतात राहुन भारताच्या विघटनाचे ढोल वाजवणे काहि नवीन नाहि. विद्यार्थी जीवनातुन राजकारणाचे लाइव्ह धडे गिरवणे व त्या अनुषंगाने एखाद्या घटनेचे भांडवल करणे सुद्धा नेहेमीचच. प्रत्येक लहान-मोठ्या घटनेचा एक सरकारी अविष्कार व त्याच्या विरुद्ध विरोधी पार्टीची टुम हि तर नित्याचीच बाब. जे.एन.यु तसंही राजकीय आखाडा म्हणुनच प्रसिद्ध आहे.
अफझल गुरुच्या फाशीला धार्मीक रंग देणे, त्याच्याशी काश्मीर समस्येची नाळ जोडुन ठेवणे म्हणजे सरळधोप राजकारण झालं. सध्या भाजपाला काश्मीर राज्य-सरकार सरकारात भाग घ्यायला अधिक अडचण यावी हा एक जास्तिचा मुद्दा असु शकतो, पण अफजल गुरु म्हणजे काहि देशव्यापी आगडोंब उसळवणारे प्रस्थ नाहि.
यंदा हि जे.एन.यु भानगड काहि भलतीच खिचडी शीजवत आहे असं नाहि वाटत का? पुण्याच्या फिल्म इंस्टिट्युटमधला संप, असहिष्णुता प्रकरण, वेमुला केस, आणि आता जे.एन.यु.
आपले (फॉर दॅट मॅटर कुठलेही) राजकारण हीन पातळीवर(सुद्धा) चालते हे आपण बघतोच. पण सरकार विरुद्ध घटनांची एक लांबलचक मालिका चालावी, अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने, असा काहिसा प्रयत्न चालला आहे का?
याला दुसरी बाजु देखील आहे. 'अच्छे दिन' म्हणावे तसे फार काहि दृगोच्चर व्हायला तयार नाहित. दिल्ली, बिहारमधे भाजपची व्यवस्थीत धुलाई झाली आहे. भाजपाचे जुने इलेक्शन व्यवस्थापक आता त्यांच्या विरोधकांचे आधारस्तंभ होत आहेत. शहा साहेबांची राजकीय कारकीर्द, आणि एकुणच भाजपाचे पुढील लोकसभा निवडणुकीचे भवितव्य उ.प्र. निकालांवर अवलंबुन असणार आहे. त्याची तयारी म्हणुन आतापासुन एका बाजुने राष्ट्रवादी लाट तयार करणे व दुसरीकडुन मुंबईत मेक इन इंडीयाचा इव्हेण्ट करुन भाजपाचे निवडणुक कम-बॅक ऑपरेशन सुरु झाले असावे काय? जे.एन.यु प्रकरण त्याकरताच शिजवले असावे काय?
कि तीसरीच काहि भानगड आहे या मागे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
राजदीप सरदेसाई
लंडन का न्यूयॉर्क मधे मॅडीसन
लंडन नाही न्यूयॉर्क!
पॉवरफुल
अश्या प्रकारे लंडन निवास
न्यूयॉर्कमध्ये हाणला त्या सरदेसायाला
करावे तसे भरावे
जबरदस्त प्रतिसाद
करावे तसे भरावे २
JNU Ground Zero Report
हा रिपोर्ट इथे टाकण्यब्दाल
पण बापाला बाप न म्हणणारे काही
मी कुठेही समर्थन करत नाही.
निसटत्या बाजू २
निसटत्या बाजू ३
निसटत्या बाजू ४ - ज. सोनवणे रिपोर्टचा उहापोह १
निसटत्या बाजू ५ ज.सोनवणी रिपोर्टचा उहापोह २
निसटत्या बाजू ६ ज. सोनवणी रिपोर्ट उहापोह ३
निसटत्या बाजू ७ ज.सोनवणी रिपोर्ट उहापोह ४
संदर्भ :Jawaharlal Nehru
निसटत्या बाजू ८ ज.सोनवणे रिपोर्टचा उहापोह ५
निसटत्या बाजू ९, ज. सोनवणे रिपोर्ट उहापोह ६
निसटत्या बाजू १० ज. सोनवणे रिपोर्ट ७
माहितगारराव, धन्य आहे तुमची.
राष्ट्रवादा’वर JNUमधील जेष्ठ
उहापोह
आभार
ऐसी अक्षरे
आभार
निसटत्या बाजू १२ ज सोनवणे रिपोर्टचा उहापोह ९
माहितगार… अतिशय मुद्देसूद प्रतिवाद
बाकी हे विचारस्वातंत्र्य,
हा रिपोर्ट
हा अतिशय खोटा, फालतु व देशद्रोह्यांचे समर्थन करनारा लेख आहे.
हा संपूर्ण लेखच अत्यंत एकांगी
गुरुजींसाठी काही शंका
गुरुजींसाठी शंका क्रं २
हा लेख आधी वाचला होता
एकुण काय...
नेहमीचंच राजकारण नाही पण
...पण वाक्याशी सहमत
कदाचित फरक नसेलही. अजून मी
रविश कुमारचे सुंदर स्वगत
:) अंशतः सहमत म्हणजे अगदीच
विरोध
ओबामा आणि रिपब्लिकन्स
देशद्रोह व देशात अराजक माजवणे
?
अस्थानी तुलना
मुद्दा अॅटीट्यूडचा आहे