Skip to main content

जे.एन.यु. - नक्की काय सुरु आहे??

लेखक अर्धवटराव यांनी शुक्रवार, 19/02/2016 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स. (टार्‍याची लै आठवणा येते कधि कधि) जे.एन.यु. प्रकरण कोणि जवळुन फॉलो करत आहे का? नक्की काय सुरु आहे तिथे? भारतात राहुन भारताच्या विघटनाचे ढोल वाजवणे काहि नवीन नाहि. विद्यार्थी जीवनातुन राजकारणाचे लाइव्ह धडे गिरवणे व त्या अनुषंगाने एखाद्या घटनेचे भांडवल करणे सुद्धा नेहेमीचच. प्रत्येक लहान-मोठ्या घटनेचा एक सरकारी अविष्कार व त्याच्या विरुद्ध विरोधी पार्टीची टुम हि तर नित्याचीच बाब. जे.एन.यु तसंही राजकीय आखाडा म्हणुनच प्रसिद्ध आहे. अफझल गुरुच्या फाशीला धार्मीक रंग देणे, त्याच्याशी काश्मीर समस्येची नाळ जोडुन ठेवणे म्हणजे सरळधोप राजकारण झालं. सध्या भाजपाला काश्मीर राज्य-सरकार सरकारात भाग घ्यायला अधिक अडचण यावी हा एक जास्तिचा मुद्दा असु शकतो, पण अफजल गुरु म्हणजे काहि देशव्यापी आगडोंब उसळवणारे प्रस्थ नाहि. यंदा हि जे.एन.यु भानगड काहि भलतीच खिचडी शीजवत आहे असं नाहि वाटत का? पुण्याच्या फिल्म इंस्टिट्युटमधला संप, असहिष्णुता प्रकरण, वेमुला केस, आणि आता जे.एन.यु. आपले (फॉर दॅट मॅटर कुठलेही) राजकारण हीन पातळीवर(सुद्धा) चालते हे आपण बघतोच. पण सरकार विरुद्ध घटनांची एक लांबलचक मालिका चालावी, अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने, असा काहिसा प्रयत्न चालला आहे का? याला दुसरी बाजु देखील आहे. 'अच्छे दिन' म्हणावे तसे फार काहि दृगोच्चर व्हायला तयार नाहित. दिल्ली, बिहारमधे भाजपची व्यवस्थीत धुलाई झाली आहे. भाजपाचे जुने इलेक्शन व्यवस्थापक आता त्यांच्या विरोधकांचे आधारस्तंभ होत आहेत. शहा साहेबांची राजकीय कारकीर्द, आणि एकुणच भाजपाचे पुढील लोकसभा निवडणुकीचे भवितव्य उ.प्र. निकालांवर अवलंबुन असणार आहे. त्याची तयारी म्हणुन आतापासुन एका बाजुने राष्ट्रवादी लाट तयार करणे व दुसरीकडुन मुंबईत मेक इन इंडीयाचा इव्हेण्ट करुन भाजपाचे निवडणुक कम-बॅक ऑपरेशन सुरु झाले असावे काय? जे.एन.यु प्रकरण त्याकरताच शिजवले असावे काय? कि तीसरीच काहि भानगड आहे या मागे?

वाचने 22826
प्रतिक्रिया 129

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

JNU च्या नियमांनुसार कुलगुरूंना मागेल त्याला कार्यक्रमाची परवानगी देणे बंधनकारक आहे, हे आजपासून नव्हे तर विद्यापीठाच्या स्थापनेपासूनची अखंडित संकेत वा परंपरा आहे. ‘Country without Post Office’ ची परवानगी का नाकारली याची विचारणा कन्हैयाने देखील केली असं काही विद्यार्थ्यांचं म्हणनं आहे. अर्थात त्याच्या जबाबदारी आणि कर्तव्याचा भाग आहे.
१) >>JNU च्या नियमांनुसार कुलगुरूंना मागेल त्याला कार्यक्रमाची परवानगी देणे बंधनकारक आहे, ज्ञानार्जनाशी संबंध नसलेल्या सुस्पष्ट राजकीय गोष्टींना जर अशा प्रकारे मागेल त्याला परवानगी देण्याचे बंधन असेल आणि जे काही ज्ञानार्जन एकाच राजकीय दृष्टीपुरते मर्यादीत असेल तर विद्यापिठ बंदकरून उघड आणि अधिकृत देश विरोधी गतीविधींचा अड्डा उघडून त्याला अड्डाच म्हणण्यास सांगावे विद्यापिठ या शब्दाच्या नावाने जनतेची दिशाभूल करण्याचा संभावितपणा करण्याची गरज काय आहे ? २) >>‘Country without Post Office’ ची परवानगी का नाकारली याची विचारणा कन्हैयाने देखील केली असं काही विद्यार्थ्यांचं म्हणनं आहे. अर्थात त्याच्या जबाबदारी आणि कर्तव्याचा भाग आहे. विरोधाभास विनोदी आहे. >>JNU च्या आवारातील राजकीय-सामाजिक आणि वैचारिक वातावरण निकोप ठेवण्याची नैतिक जबाबदारी ह्या विद्यार्थी प्रतिनिधींवर असते. ह्या आपल्या वाक्यात तथ्य असेल तर देश विरोधी कार्यक्रमावर त्याने स्वतः अभाविपच्या आधी आक्षेप घ्यावयास होता, किंवा पुरावे सहकारी उपाध्यक्षाच्या साहाय्याने त्या कार्यक्रम आयोजकांनाच त्यांची भूमिका कशी उणीवेची आहे हे समजावून द्यावयास हवे होते, शिवाय अभाविपच्या मतांशी सहमती नसेल तरीही विरोधी भूमिका समजून घेण्याची क्षमता हवी म्हणजे तीनही बाजूंनी आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा विद्यार्थी म्हणुन, विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून आणि आपणच नमुद करत असलेलि नैतिक जबाबदार्‍या पार पाडण्यात हा कन्हैय्या अयशस्वी होताना दिसत नाही का ?

In reply to by कपिलमुनी

अर्नब गोस्वामी, दीपक चौरसिया, सरदाना इ. यांच्या एकांगी भोकाडबाजीमुळे घोषणाबाजीबाबत मत मांडायला कश्मीरी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळू शकला नाही, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता फक्त भावनिक आवरण चढवून त्यांना दहशतवादी ठरवण्याचा फार्स करण्यात आला.... आणि गेल्या चार दिवसांपासून मिडिया जाणीवपूर्वक अतार्किक आणि अतांत्रिक मुद्दे पुढे करत JNUची आणि विशेषतः डाव्या विद्यार्थी संघटनांची बदनामी करत होती, त्यावरून १२ तारखेच्या संध्याकाळी JNUमध्ये पोलीस अटकसत्र राबवू शकते अशी कुणकुण AISA, SFI आणि AISFच्या कार्यकर्त्यांना लागली होती.
या उतार्‍यातील सर्वश्री ज. सोनवणेंच्या (?) भोकाडबाजी, फार्स करण्यात आला , अतार्किक आणि अतांत्रिक मुद्दे हि वाक्य रचना त्यांनी लावलेला विशीष्ट चष्मा दाखवते का ? JNU ला काही दशकांपासून डाव्या विचारांची मदरसा बनवून ठेवले असेल आणि देश विरोधी राजकीय उद्देशाने कार्यक्रम आयोजनाचा प्रयत्न झाला, मान्यता न मिळाल्या नंतर किमान पक्षी देश विरोधी घोषणा दिल्या गेल्या तर मिडियाने उचलले प्रश्न अतार्कीक कसे काय ठरतात, सोबत भोकाडबाजी, फार्स हे शब्दप्रयोग दुसर्‍या विचारांसाठी आपण ओपन माईंडेड राहीलो नाही याचे निदर्शक नाही किंवा कसे ? जी टिका वस्तुतः रास्त आहे त्यात बदनामी स्वरुप काय आणि कसे ? स्वतःला (म्हणजे डाव्यांना) देश विरोधी गोष्टींना सहानुभूती दाखवण्यासाठी बिनबोभाट स्वातंत्र्य हवे पण टिकाकारांच्या टिकेकडे लक्ष देऊन स्वतःत सुधारणा न करता उलटे टिकाकारांना दामटायचे ? चालू द्या !

In reply to by कपिलमुनी

१३ तारखेच्या पहाटे २ वाजता कन्हैयाला पोलिसांनी अटक केली. रात्रीच्या दोन वाजता कोणतेही राजशिष्टाचार न पाळता महिला-पुरुष होस्टेल्सची झडती घेण्यात आली...... ... सर्व प्रोटोकॉल्स धाब्यावर बसवून एका विद्यार्थी प्रतिनिधीला अटक करण्यात येते, विद्यापीठ यंत्रणेने यात काहीच हस्तक्षेप करू नये? (डॉ. पार्थसारथी कुलगुरू असताना आणीबाणीच्या काळातही त्यांनी पोलिसांना विद्यापीठाच्या आत येण्यास मज्जाव करून विद्यापीठात घडणाऱ्या कुठल्याही घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारण्याची भूमिका घेतली होती.) JNU च्या ४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कैम्पसमध्ये पोलीस येवून विद्यार्थ्याला अटक झाली. ...
संशयीतांना वॉरंट सहीत अटक करणे हा पोलीसांचा अधिकार आणि कर्तव्य आहे, कोर्टात सिद्ध नाही झाले तर व्यक्ती सुटते. कोणत्याही - मग याला का आणि त्याला का नाही या अर्ग्युमेंट्सना पॉईंट नाही प्रत्येकाला तोच नियम लागावा - संशयिताशी पुरेशा सभ्यपणे वागणे पुरेसे असावे त्यात राजशिष्टाचाराच्या वागणूकीची अपेक्षा का असावी ? विद्यार्थी संघटनेच्या इतर विद्यार्थी टोळक्यांशी कमितकमी संघर्ष करून आणि इतर संशयितांचा शोध घेणे या दोन्ही उद्देशांनी रात्रीच्या वेळी अटक हि वस्तुतः योग्य गोष्टच आहे. महिला हॉस्टेल असेल तर महिला पोलीस सोबत असण्याचे बाबतचे नियमांचे पालन व्हावे एवढेच. >>एका विद्यार्थी प्रतिनिधीला अटक करण्यात येते इतर सामान्य संशयितांना अटक केली जाते त्या पेक्षा विद्यार्थी नेता आहे म्हणून विशेष ट्रिटमेंटची आवश्यकता कशी ? पार्थसारथींच्या नैतिक जबाबदारी घेण्याचे गोडवे गाताय ? -डाव्यांची गंमत बघा एका JNU प्राध्यापिकेचा या गोंधळात एक लेख महात्मा गांधींची चौरी चौराप्रकारानंतर नैतिक जबाबदारी घेत इंग्रजांनी दिलेला गांधींजींनी कारावास घेण्याचा उल्लेख लेखात तर केला पण मतितार्थ काय काढला की महात्मा गांधींना अटक करणे कसे चुकीचे होते आणि इकडे गांधीजी स्वतः महणताहेत की मला जो जसा नियम आहे त्या नुसार कारावास व्हावयास हवा पोलिस आणि न्याय यंत्रणेने त्यांचे त्यांचे काम केले पाहीजे- इथे डाव्यांना मात्र गांधींचे नाव घेत जबाबदार्‍यांमधून सुटका हवी आहे आणि त्या साठी विद्यार्थ्यांना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरून घेतले जात आहे. विद्यापिठात पोलीसांना जाण्याची कमितकमी वेळ यावी हे मान्य पण तेथे गुन्हेगारीवरुपाची साठमारीसुद्धा होऊ नये. गुन्हेगारी स्वरुपाची देशविरोधी साठमारी होण्याचा संशय होय केवळ संशयावरूनही वाँरंट असल्यास विद्यापिठ काय कोणत्याही जागेवर जाण्यास पोलीसांना कोणताही मज्जाव असण्याचे काहीही कारण नाही, उद्द्या पाकीस्तानातील विद्यापिठात झाली तशी गोळीबारी होईल आणि तुमचे उपकुलगुरु प्राध्यापक आणि विद्यार्थी नेते काय, 'नैतिक जबाबदारी घेतो हो ! विद्यापिठाच्या आवारात पोलीसांनो येऊ नका अतिरेक्यांना त्यांची गोळीबारी करून घेऊ द्या दोनचार खून करून घेऊनद्या काही बाँबांचे उत्पादन करून घेऊ द्या, ड्रग्सचा व्यापार करू द्या आम्ही आहोत ना नैतिक जबाबदारी घ्यायला असली उत्तरे देणार आहेत का ? भारतातल्या सुवर्ण मंदिराचा असो का पाकीस्तानातल्या लाल मस्जिदीचा एकदा अतिरेकी आत जाऊन बसल्या नंतरचा अनुभव स्पृहणिय राहात नाही पवित्र जागा म्हणून पावित्र्य घालवण्याची अतिरेक्यांना पूर्ण मुभा मिळते आणि त्यांना फ्लश आउट करणार्‍या पोलीस आणि सेनादळांवरच आमच्या पवित्र स्थानांत तुम्ही कसे आला म्हणुन उलटे विचारले जाते तसाच प्रकार या डावे विद्यापिठ नावाचे मदरशांचे/डाव्यावेदपाठशाळांचे प्राध्यापक नावाचे डावे धर्ममार्तंड करु इच्छितात आणि उलटे आपापल्या समर्थकांना देशविरोधी तत्त्वानां सहानूभूती दर्शवण्यासाठी फितवू भडकावू इछित्तात काय ?

In reply to by माहितगार

माहितगारराव, धन्य आहे तुमची. इतके मुद्देसूद आणि तपशीलात लिहिले आहेत की जे.एन.यु मधील दीडशहाण्यांचे समर्थन करणार्‍यांना उत्तर द्यायचे असेल तर तुमच्या या प्रतिसादांची लिंक दिली की काम भागून जाईल. सगळेच प्रतिसाद आवडले हे वेगळे सांगायलाच नको.

In reply to by कपिलमुनी

राष्ट्रवादा’वर JNUमधील जेष्ठ प्राध्यापक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांचा पाठ घेणार आहेत. यात जेष्ठ इतिहासकार रोमिला थापर, ई.एस.अच्युतानंद, जानकी नायर, निवेदिता मेनन इ. ‘राष्ट्रवाद’ या विषयावर खुला पाठ घेणार आहेत. ... ज्या पद्धतीने मिडिया आणि सरकारी पातळीवर हाताळलं जातंय ते निव्वळ जनतेची दिशाभूल करणारे आहे.
राष्ट्रवादावर पाठ घेण्याच्या गप्प्पा करण्यापुर्वी या तथाकथित विचारवंतांनी आत्मपरिक्षणकरून राष्ट्रीय एकात्मतेची महती जवाहरलाल नेहरूंना वाचून पुन्हा एकदा समजून घ्यावी आणि राष्ट्रीय एकतेच्या पाठांना जम्मु काश्मिरच्या शिक्षकांना राजकारण्यांना समाजकारण्यांना आणि तिथल्या जनतेलाही राष्ट्रीय एकात्मतेचे पाठ द्यावेत आणि केवळ स्वतःच्या बाजूने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणी मानवाधिकारांची भाषाकरावयाची इतरांच्या मानवाधिकार हनन करणार्‍या अतिरेक्यांना नक्षल्यांना पाठीशी घालावे अशा दुटपी भूमिकांचाही त्याग त्या तथाकथित विद्वान प्राध्यापकांनी करणे जरूरी आहे किंवा कसे. तथाकथित विद्वान प्राध्यापकांनी आधी स्वतः विद्यार्थ्यांची आणि इतरांची दिशाभूल करणे सोडावे मग इतरांना पाठ देण्याच्या गोष्टी कराव्यात.

In reply to by कपिलमुनी

ओ, अच्छा तुम्ही स्वतः सोनवणे नाहीत तर, -मग सोनवणे रिपोर्ट बद्दल तुमचेही मत इथे तुम्ही टाकायला हवे होते, नुसतेच नकलडकव कॉपीराइटची समस्या आणतो, एका अर्थाने मी उहापोह/समिक्षा केली ते बरे झाले कॉईराइटचा मुद्दा अल्पांशाने का होईना हलका व्हावा. इथे सोनवणे नसल्याने ते त्यांची बाजू मांडू शकणार नाहीत, आणि फेसबुक ट्वीटर अल्पाक्षरी मर्यादा मला झेपत नसल्याने मी तिथे फारसा नसतो. -आता इतर वाचकांच्या सदिंच्छाखातर लेखकांनी त्यांचे चर्चामंच बदलत फिरावे का हा मुद्दा तुर्तास बाजूस ठेउ- मराठी भाषिकांच्या विस्तृत चर्चा विमर्षाचे मंच मायबोली, मिसळपाव, ऐसि अक्षरे हि संकेतस्थळेच आहेत तेव्हा जयंतकुमाररावांना आपणच आमच्यावतीने इथे आंमत्रण देण्यास हरकत नसावी खासकरून फेसबुक त्यांच्या साठी कॅपिटालीस्ट लोकांच्या मालकीचा आहे आणि आमच्यासाठी पुरेसा स्वदेशी नाही तेव्हा जयंतकुमारराव मिपावर आल्यास या किमान मुद्द्यावर आमचे त्यांचे एकमत व्हावे तरीसुद्धा डाव्यांची बाजू आम्ही ऐकुशकू का अशी त्यांना अंमळ शंकाही येऊ शकेल तेव्हा आमच्या कडून नजराणा म्हणून एका डाव्या कवितेचे डावी बाजू समजून घेऊन उजवीकरून देण्यात आम्ही केलेल्या नकोच सोने हिरेजवाहिर -स्वप्नमयकल्पना आणि बदललेल्या काळातील लाकूडतोड्याची गोष्टीचे वास्तव या रसग्रहण दुव्याची भेट आपण आमच्या वतीने त्यांना अवश्य द्यावी. अगदीच डाव्याच मंचावर वाचायचे असल्यास ऐसिअक्षरे या मराठी डाव्या संकेतस्थळावरही आमच्या रसग्रहणाचा आस्वाद तुम्हा उभयतांना घेता येऊ शकेल. असो या निमीत्ताने सविस्तर उहापोहाची संधी दिलीत त्या बद्दल आभार.

In reply to by माहितगार

ऐसी अक्षरे डाव्या विचारांचे आहे
ही नवीन माहिती कळाली. बाकी धुणी धुवायला वेळ नाही.

In reply to by कपिलमुनी

तुम्ही धुवा आम्ही कपडे सांभाळतो असा फंडा आहे का ? ब्व्वॉर ! एकीकडेचे कपडे उचला दुसरीकडे टाकून द्या सेकंड हँड कुणीतरी वापरेल म्हणून; पण मिपाकर बंधूंनी ते तसेच वापरावेत हि कल्पना आम्हाला सहन नाही झाली म्हणून जोर लावून धुतले तसेही आमचा वैचारीक व्यायाम झाला स्वसमाधान मीळाले. स्वच्छता अभियान आपल्यापरीने जमले तेवढे केले. आणि योग कपिलमुनींनी आणला म्हणून आपले आभार :)

In reply to by कपिलमुनी

गेल्या सात दिवसांत झी न्यूज, एबीपी न्यूज, आज तक, टाईम्स नाऊ इ. वृत्तवाहिन्यांनी कुठलेही सत्यशोधन न करता सरळ सरळ “जे.एन.यू. बना आतंकियोंका अड्डा” अशी अविवेकी विधाने प्रसारित केलीत. हनुमनथप्पाच्या मृत्यूच्या घटनेचे जे.एन.यू. प्रकरणाला फैब्रिकेशन करण्यात आले. सत्यशोधनाच्या ऐवजी देशभक्तीच्या परीक्षा पाहणारे असंबद्ध प्रश्न विचारून JNU ची बाजू मांडणाऱ्यांची बोलती बंद कशी राहील या अजेंडाने मिडिया डिबेट्स घडवून आणल्या गेल्या. भारतात आपण कर भरतो म्हणून आपल्याला संविधानातील मुलभूत कर्तव्यांतून मुक्ती मिळाली आहे आणि संपूर्ण देश फक्त आपल्याच पैशावर चालतोय आणि आमच्या पैशांवर शिकणाऱ्यांनी फक्त चुपचाप शिकून घ्यावं, आम्ही उदार मनाने आरक्षण ह्या देशात ठेवलंय म्हणून आमच्या उपकारात राहावं, अशी भावना भारतातील जवळ जवळ ६० टक्के; सामाजिक-राजकीय आणि अर्थशास्त्राच्या जमजुतीत Lag असणाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. अर्थात यात दोष त्यांच्या मानसिकता, विचारसरणी अथवा बुद्धीचा नाही तर त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या गेलेल्या फैब्रीकेटेड माहितीचा.
आपण आतापर्यंत माझे उपरोक्त विश्लेषण वाचले तर फॅब्रीकेश खरोखर कोण करत आहे ? डाव्या तथाकथित विद्वान प्राध्यापकांना दुसर्‍यांवर फॅब्रीकेशन करण्याचा आणि देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करत अकॅडेमीक फ्रीडमचा चक्क चुकीचा अर्थ लावत केवळ राजकीय आणि वैचारीक आकसातून आपापले आणि आपल्या विद्यार्थ्यांचे तर्क गंजलेल्या विचारांनी फॅब्रिकेट केले आहेत किंवा कसे. विद्यापिठ अकॅडेमिक फ्रीडमच्या स्कोपच्या बाहेर जाऊन अथवा त्या स्कोपचा दशकोंदशके गैर आणि एक विचारधारीय उपयोग करत असेल दुसर्‍यांकडे बोट दाखवण्यापुर्वी सदसद विवेक बुद्धीने आत्मपरिक्षण करून स्वतःच्याही विचारांवरचे गंज चढलेले फॅब्रिकेशन जेवढ्या लवकर उतरवले तेवढे या देशा साठी उत्तम असावे. असो. पुर्ण विराम कुणी माझी निसटत्या बाजूंची आणि प्रतिसादांची हि मालिका चुकून पूर्ण वाचलिच तर धन्यवाद आणि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

माझ्याही मनात याच प्रकारचे विचार होते/ आहेत पण इतके मुद्देसूद मांडणे जमले नसते. विद्यापीठांमध्ये चर्चेसाठी अथवा तात्विक वादविवादांसाठी परस्परविरोधी मुद्दे अथवा विचार असणे ठीक आहे. पण तुम्ही राहता त्या देशाविरोधी भाषण/ वर्तन करणे हे चुकीचेच आहे. विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य किंवा व्यक्तीस्वातंत्र्य किती असावे याचे पण काही नियम असतात. समाजाला घातक ठरेल किंवा ठरू शकतील असे विचार किंवा कृती करणे चुकीचेच आहे. हे डाव्या विचारसरणीचे लोक बरेचदा विरोध करायचा म्हणून करतात असं वाटतं. कुठलीही चांगली गोष्ट समोर ठेवा आणि हे लोक त्याच्या फक्त वाईट गोष्टी सांगतील. हरकत नाही पण म्हणून देश कसा वाईट आहे हे नका सांगू. स्वतः सोनवणी पण डाव्या विचारसरणीचे आहेत हे बरेचदा त्यांच्या लेखातून वाटते. आता मूळ मुद्दा बाजूला राहून फक्त कन्हैयाला अटक कशी चुकीची आहे, त्याला कसं अडकवलंय, त्याला कशी मारहाण झाली यावर फोकस केला जातोय. काही वृत्तपत्र, न्यूज चानेल सरकार, पोलिस, कोर्ट सगळे कसे चूक आहेत हे दाखवत आहेत. देशात आणीबाणीची परिस्थिती आहे असं दाखवलं जातंय. सगळे सुप्रीम कोर्टापासून पंतप्रधान, पोलिसांपर्यंत सगळे कसे चुकीचे आहेत कशी मुस्कटदाबी करत आहेत हे सिद्ध करण्यात गुंतले आहेत. बाकी हे विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य कमलेश तिवारीला नाही का? त्याच्या एका व्यक्तव्यावर २ लाख लोक मालदा मध्ये इतके दिवस दिवस हिंसाचार करत होते. त्यावर सोनवणी किंवा त्यांच्या आजूबाजूचे कोणी काही बोलले का?

In reply to by ट्रेड मार्क

बाकी हे विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य कमलेश तिवारीला नाही का? त्याच्या एका व्यक्तव्यावर २ लाख लोक मालदा मध्ये इतके दिवस दिवस हिंसाचार करत होते. त्यावर सोनवणी किंवा त्यांच्या आजूबाजूचे कोणी काही बोलले का?
+१ हेच विचारस्वातंत्र्य साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ यांना देखील हवे ना? नुसत्या देशविरोधी घोषणा दिल्याने कोणी देशद्रोही होत नाही. तशी जर कृती केली असेल तरच तो देशद्रोह असू शकेल. असा या तथाकथित पुरोगामी निधर्मांधांचा दावा असतो. असे असेल तर साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ यांच्या नुसत्या प्रक्षोभक विधानांना एवढा विरोध का?

In reply to by कपिलमुनी

अथपासून इतिपर्यंत biased आहे कारण दुस-या बाजूला काय म्हणायचंय आणि त्यांची बाजू काय आहे याचा उल्लेखही इथे केलेला नाहीये. मीडियाने मोदींच्या गुजरात दंगलींमधल्या कथित सहभागाच्या बाबतीतही अशीच बेजबाबदार विधानं केली होती, पण तेव्हा जयंतकुमार सोनावणे किंवा तत्सम लोक सत्य शोधायला गेल्याचं ऐकिवात नाही. असो. अशा double standards चाच तर प्रचंड तिटकारा आहे. आणि JNU ची प्रतिमा उजळ होत चालल्याचा निष्कर्ष इतक्या घाईघाईने काढलाय की तो self-proclaimed आहे हे अगदी लगेचच समजतंय. People remember allegations, not explanations हे वापरून डाव्यांनी भाजपची यथेच्छ बदनामी केली. आता त्यांचंच अस्त्र त्यांच्यावर उलटल्यामुळे त्यांची ही चिडचिड होते आहे.

In reply to by कपिलमुनी

वेळ पुढे सरकत होती तशी वातावरणातील तनाव वाढत होता. त्यानंतर कश्मीरी विद्यार्थ्यांच्या गटातून घोषणाबाजी झाली “अफजल हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है!”, “भारत की बरबादी तक, जंग हमारी जारी रहेगी”.... ह्या उत्तर-प्रत्युत्तराच्या घोषणाबाजीनंतर काही काश्मिरी विद्यार्थी आणि काही अभाविप कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.
हा काहि देशद्रोह नाहि आहे अस म्ह्णायचे का? आणि जर भारत सरकार ने जर ह्यांच्यावर कारवाहि केलि तर ती तुम्हाला विद्यार्थ्यांचि मुस्कट्दाबी वाटते? त्या रागातुन तुम्हि सरकारलाच आरोपीच्या पिंजर्यात उभे करताय. हा अतिशय खोटा, फालतु व देशद्रोह्यांचे समर्थन करनारा आणि सरकारवरिल द्वेश भावनेने लिहिलेला लेख आहे,

हा संपूर्ण लेखच अत्यंत एकांगी व पूर्वग्रहदूषित आहे.
कन्हैयावर लावलेले गुन्हे न्यायालयाने अमान्य केले आहेत.
कधी आणि कोणत्या न्यायालयाने? जर न्यायालयाने गुन्हे अमान्य केले असतील तर तो अजून तुरूंगात का आहे?
भारत सरकारने कन्हैयाच्या अटकेसाठी केलेला आततायीपणा आणि दुसरीकडे ओमर खलीदच्या बाबतीत घेत असलेला बचावात्मक पावित्रा स्पष्टपणे सरकारच्या अथवा सरकार चालवणाऱ्यांच्या ‘motives’ला अधोरेखित करत आहे.
ओमर खलीद फरारी आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा एकट्याचाच नव्हे तर इतर ९ फरारी विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे.
- ‘जैश-ए-महोम्मद’ या संघटनेचे जम्मू आणि काश्मीर राज्यातील बहुमतातील PDP ह्या पक्षाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. काश्मिरमधील भाजप वगळता इतर सर्व पक्षांना पाकिस्तान व पाकिस्तानी दहशतवाद्यांविषयी सहानुभूती आहे.
- एकीकडे राष्ट्रवादाचा नारा देत भाजपाने जम्मू आणि काश्मीरमध्ये PDP ह्या फुटीरतावादी पक्षाशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती.
त्यामागचे कारण व त्यामुळे पीडीपीच्या फुटिर कृत्यांना कसा लगाम बसला हे मी इतरत्र लिहिले आहे. त्याची पुनरावृत्ती करीत नाही.
- जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महोम्मद यांच्या निधनानंतर राज्यात नवीन सरकार बनले नाहीये, आणि मेहबूबा मुफ्ती सरकार स्थापनेबाबत कोणताही ठोस संकेत देत नाहीयेत त्यामुळे दिवसेंदिवस भाजपा गटातील चुळबुळ वाढत आहे.
त्याबाबतीत भाजप अजिबात अस्वस्थ नाही किंवा भाजपला अजिबात घाई नाही. खरी अस्वस्थता पीडीपीतच आहे.
- JNUचा विद्यार्थी ओमर खालिद (ज्याचे ‘जैश-ए-महोम्मद’सोबत संबंध असल्याचा IBचा रिपोर्ट होता) त्याला अटक झाली तर जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपाविरोधात जनमत तयार होऊन PDPसोबतच्या सत्तेच्या वाटाघाटी फिस्कटू शकतात.
त्यामुळे भाजपला काहीही फरक पडत नाही. राज्यपाल राजवट सुरू राहिली तर केंद्र सरकारच राज्यपालांच्या माध्यमातून प्रशासन चालविते. म्हणजे एका अर्थी ते भाजपचेच प्रशासन असेल.
- ओमरला अटक झाली तर आसाम आणि उत्तरप्रदेशातील मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपाच्या प्रतिमेवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, त्यामुळे सरकार ओमरच्या ऐवजी कन्हैयाला टार्गेट करून बळीचा बकरा बनवत होती. पण न्यायालयाच्या निर्णयाने सरकारच्या मनसुब्यांवर पाणी फेरले अशी चर्चा JNUमध्ये अथवा नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
उत्तर प्रदेशची निवडणुक अजुन १ वर्षानंतर आहे. तोपर्यंत ओमर खलिद व जेएनयु प्रकरण जनतेच्या स्मृतीतून गेलेले असेल. तसेही तिथले मुस्लिम भाजपला मत देतच नाहीत. आसाममध्ये मे महिन्यात निवडणुक आहे. तिथे खूप पूर्वीपासून मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झालेले आहे. तिथले मुस्लिम कधीही भाजपला मत देत नाहीत. ओमर खलिदला अटक केल्यामुळे वा अटक न केल्यामुळे भाजपला कणभरसुद्धा फायदा/तोटा नाही.
- कन्हैयाला अटक करण्यामागे पूर्ववैमनस्याचा भाग ग्राह्य धरायचा म्हटला तर कन्हैया हा JNUमधला School of International Studies च्या African Study Centreला शिकणारा अजातशत्रू विद्यार्थी म्हणून त्याची पहिली इमेज समोर येते. ह्याच इमेजच्या आधारावर यंदाच्या JNUSUच्या निवडणुकीत AISFने फक्त एकच- अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि बहुमतांनी ती जागा निवडून आणली. कन्हैयाच्या अटकेनंतर ज्याप्रकारे भाजपाने आणि सरकारने विषय हाताळला त्याचा निषेध म्हणून ABVPच्या JNU युनिटच्या ३ पदाधिकाऱ्यांनी दिलेला राजीनामा खूप काही सांगून जातो.
कोणत्याही संघटनेत थोडेफार मतभेद असतातच. ज्याचे संघ, भाजप, स्वातंत्र्यवीर सावरकर, ब्राह्मण इ. विषयी इतके टोकाचे विखारी विचार आहेत तो अजातशत्रू असणे अशक्य आहे.
- कन्हैयाला अटक करण्यामागे भाजपा गोटात JNUतील मुक्त वातावरणाबद्दल, डाव्या विद्यार्थी चळवळीबद्दल असलेला आकसही दिसून येतो. अटकेनंतर आणि कोर्टाचा निर्णय यायच्या आधी ABVP आणि भाजपा गोटातून ज्याप्रकारच्या टिप्पण्या आल्या त्यातून त्यांचा रोख त्याच दिशेने होता.
भाजप व डावे पक्ष यात फार पूर्वीपासून वैमनस्य आहे. केरळमध्ये साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक संघ कार्यकर्त्यांच्या हत्या केलेल्या आहेत. अगदी ३-४ दिवसांपूर्वी सुजित नावाच्या संघ स्वयंसेवकाला केरळमध्ये साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या आईवडीलांच्या देखत ठार मारले. भाजपला कोणत्याही विद्यापीठातील मुक्त वातावरणाबद्दल काही आकस नाही. भारतात ३५० विद्यापीठे आहेत. त्यापैकी फक्त हैद्राबाद, जेएनयु, एफटीआयआय अशा २-३ ठिकाणीच समस्या निर्माण झाली. त्याचे कारण लगेच लक्षात येते. हैद्राबाद व जेएनयु मध्ये फाशी दिलेल्या देशद्रोही अतिरेक्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली. तेथे अभाविपने देशद्रोही अतिरेक्यांचे गौरवीकरण करण्यास विरोध केल्याने समस्या निर्माण झाली. एफटीआयआय मध्ये तर २००८ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या गुंडगिरीने समस्या निर्माण झाली. तिथला अध्यक्ष निवडणे व संचालक निवडणे हा केंद्र सरकारचा कायदेशीर अधिकार असताना आम्हाला मान्य आहे तोच अध्यक्ष हवा आणि आम्हाला मान्य आहेत तेच संचालक हवेत असा अत्यंत अनुचित आग्रह विद्यार्थ्यांनी धरल्याने समस्या निर्माण झाली. त्याच्या बरोबरीने आमचे मूल्यमापन कधी व्हावे ते आम्हीच ठरविणार, ते कसे व्हावे ते आम्हीच ठरविणार, ते कोणी करावे ते आम्हीच ठरविणार, संचालक मंडळाने त्यासाठी आग्रह धरता कामा नये अशा विचित्र अट्टाहासातून तिथे संप करण्यात आला. हे संप करनारे विद्यार्थी खरं तर २०११ मध्येच अभ्यासक्रम संपवून बाहेर पडायला हवे होते. परंतु ते अजूनही तिथेच आहेत. केंद्र सरकारने अत्यंत प्रगल्भतेने, खंबीरपणाने व संयमाने ही समस्या हाताळली. या तीनही ठिकाणी ज्या समस्या निर्माण झाल्या त्या तेथील विद्यार्थ्यांनीच निर्माण केल्या होत्या व केंद्र सरकारला त्यात पडावेच लागले कारण त्या केंद्रीय संस्था होत्या. इतर ३४७ विद्यापीठात केंद्र सरकारला पडायची गरजच पडली नाही कारण तिथल्या विद्यार्थ्यांनी अशा समस्या निर्माण केल्याच नव्हत्या.

In reply to by श्रीगुरुजी

ओमर खलीद फरारी आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा एकट्याचाच नव्हे तर इतर ९ फरारी विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे.
गुरुजी लाहिरी का काय नावाच्या प्राध्यापिका बाई आहेत नाव ऐकलेत का त्यांचे तुम्ही कधी ? १) विद्यार्थ्यांच्या बॅचेस विद्यापिठात येतात जातात काही विद्यापिठात विशीष्ट विचारधारा काही दशकांपासून असण्या मागे तेथे अजून काही शिजत असावे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मागे मुख्य सुत्रधार अजून कुणी असण्याची शक्यता असू शकेल तेव्हा मुख्यसुत्रधार हातात न घेता बाजार बुणग्यांच्या मागे पळणे डोवालांसारखे सल्लागार असताना खरेच अपेक्षित होते का ? २) जे मुख्य कर्तेधर्ते होते त्यांना फरारी होण्याची हकनाक संधी कशी दिली गेली ? ती मंडळी न्युज च्यानलना मुलाखती देत फिरत होती तुमची गुप्तचर यंत्रणा काय करत होती ? -एक शक्यता आहे कि डोवालांनीही हाच प्रश्न विचारला असेल आणि पोलिसांकडे उत्तर नसल्यामुळे दबाव टाकु किंवा कुणाच्या तरी नावावर टाकू म्हणून कन्हैय्याला उचलले असेल अशी शक्यता असू शकेल ? पण जो पर्यंत कन्हैय्याची चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत सांगणे कठीण आहे तोपर्यंत बेनिफीट ऑफ डाउट दिला जाऊ शकतो हेही खरे.

In reply to by श्रीगुरुजी

त्या आठ नऊ विद्यार्थ्यांनी जो काही कार्यक्रम बंदीस्त जागेत आयोजीत केला होता त्याला सरसकट परवानगी नाकारण्यापेक्षा मर्यादीत विटनेस वगळता बाकी उपस्थितांवर रोक लावता आली असती आताची स्थिती कशी झाली गुन्हा प्रत्य्क्षात सिद्ध करणे कठीण झाले. व्यवस्थित प्रूफ मिळवायचे आणि मग टाकायचे आत आणि अशा बाबतीत काँग्रेस जरा दम आणि धीर धरू शकते भाजपा समर्थक आणि नेत्यांना एकमेकांसमोर प्रूव्ह करण्याची घाई होत नाही आहे ना अशी एक शंका वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

हा लेख आधी वाचला होता ह्यात लेखात जे एन यु मध्ये नक्षलवादी चळवळीला पाठिंबा देणारी किंवा देशविरोधी तत्वे नाहीच असा अजब तर्क सोनावणे साहेबांनी काढला जे एन न्यू चे अनेक माजी विद्यार्थी ह्यांनी अशी तत्वे ह्या विद्यैठात आहे हे कबूल केले आहे अर्णव च्या कार्यक्रमात त्रिपाठी ह्यंनी अशी तत्वे विद्यापीठात आहेत व देशविरोधी सर्व चालवली करणारे एकत्र येत असल्याचे सांगितले आहे मात्र ऐसी अक्षरे मध्ये माझी विद्यार्थीनि चा लेख आहे त्यात सुद्धा अशी लोक विद्यापीठात आहेत हे स्पष्ट म्हटले आहे उमर ची संघटना २०११ मध्ये युपिए ने बेन केली होती ह्या माणसाने प्राध्यापक गिलानी ह्यांच्या अटकेविषयी विद्यार्थांना अजिबात प्रश्न विचारला नाही त्यांनी भारत विरोधी घोताना दिल्याचा सबळ पुरावा आहे म्हणून त्यांच्या बाजूने कोणी बोलत नाही आहे

तर जे काहि दिसतय ते केवळ हिमनगाचं टोक आहे. पण पाण्याच्या खाली नेहेमीचच राजकारण आहे कि यंदा काहि वेगळी धाटणी आहे हे कळायला मार्ग नाहि.

In reply to by तर्राट जोकर

भाजपा ते हाताळण्यात प्रचंड अननुभवीपणाचा प्रत्यय देतंय.
या वाक्याच्या तुमच्या आणि माझ्या डिटेल्स मध्ये फरक असेल पण वाक्याशी सहमत

In reply to by माहितगार

कदाचित फरक नसेलही. अजून मी कुठल्याच कन्क्लुजनवर पोचलो नाही कारण सगळ्या कन्स्पिरसी थेरी पुढे आल्या नाहीत.फॅक्ट्स तर शंभर टक्के पुढे येणार नाहीत. पण.. आताच काही बोलणे उचित नाही. पण भाजपाच्या हाताळण्याच्या पद्धतीत अगदी, हाथ कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या, इतके स्पष्ट दिसत आहे.

In reply to by कपिलमुनी

:) अंशतः सहमत म्हणजे अगदीच प्रत्येक तार्कीक उणीव दाखवून देत नाही तो पर्यंत लोक अ‍ॅग्री करत नाहीत स्वतः ट्रॅफिकचे नियम तोडताना समोरच्याच अंगावर ओरडणे दोन्ही कडून होते तसे आहे. सर्वसामान्य समर्थक असे वागतात जे अधिकृत कार्यकर्ते असतात त्यांना तसे सिद्धकरण्याची अधिक जबाबदारी पडत असावी ;)

In reply to by माहितगार

कॉंग्रेस कार्यकर्ते २जी स्कॅम विरुद्ध आणि भाजपा कार्यकर्ते व्यापम चा विरोध , आंदोलन करणार नाही कारण ते देशहितासाठी असेल पण पक्षविरोधी असल्याने करणार नाही हे मुद्दे छान मांडले आहे

ओबामा जेंव्हा राष्ट्राध्यक्ष झाले, तेंव्हा (काही) रिपब्लिकन्स नेते अशा अर्थाचे म्हणाले होते की अगदी देशाच्या हिताच्या भुमिकेचे निर्णय असले तरी ते ओबामाचे असल्याने आम्ही त्याला विरोध करू... आज मोदींच्या बाबतीत देखील तेच होत आहे. काल काय हैदराबाद, मग काय जेनयु आणि आता काय तर हरीयाण जाट दंगल... डावे लोकांना राष्ट्र ही संकल्पना मान्य नाहीच. त्यात मोदींचा द्वेष करत सतत काहीतरी पेटवत ठेवायचे असला नतद्रष्ट उद्योग. आता या ट्रिक्स जुन्या झाल्यात. त्याचा "दूरगामी" फायदा (डाव्यांसाठी) होण्याची शक्यता नाही. बाकी तुर्तास कन्हैय्याची याचीका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि जामिनासाठी उच्च न्यायालयात जाण्यासाठी सांगितले. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाला इतरांना डावलून स्वतःच डायरेक्ट दखल घेणे योग्य वाटले नाही. एका अर्थी पहीली चपराक बसली. यात आता एक गंमत आहे. दिल्ली पोलीसांनी आधीच सांगितले आहे कि ते या जामिन अर्जाच्या विरोधात जाणार नाहीत. तरी देखील पुढच्या आठवड्यात जामिन मंजूर झाला की "सरकार ला कशी चपराक बसली" असे म्हणणे चालू होईल. त्या व्यतिरीक्त हायकोर्टाने गिलानींना जामिन देण्यास नकार दिला. गिलानी म्हणत आहेत की पोलीसांनी म्हणे त्यांचा फोन टँपर्ड केला.... इथे एफबीआय ला कॅलीफोर्नियातील दहशतवाद्याचा फोन उघडायला अ‍ॅपल ला सांगावे लागत आहे आणि अ‍ॅपल ला त्यासाठी नवीन प्रोगॅम लिहावा लागेल ज्याला त्याची तयारी नाही. आणि इथे दिल्ली पोलीस फोन उघडताहेत! =)) व्हिडीओ टेप जर टँपर्ड केलेली असली तर मग उमार खलीद लपून का बसला आहे?

In reply to by विकास

देशद्रोह व देशात अराजक माजवणे, देशाविरूद्ध कट करणे हे अजामिनपात्र गुन्हे आहेत. मग कन्हय्यावर जामिन घेउ शकतो असे कुठले आरोप पोलिसांनी लावले आहेत? सुप्रिम कोर्टाने आधी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करायला सांगितला आहे. तिथेच काम होईल तर इथे यायची आवश्यकता नाही असा अर्थ कोर्टाच्या निर्णयाचा आहे. ह्याला चपराक म्हणायची घाई कशाला? जामिन फेटाळला नाही. तो तर मंजूर होईलच. कारणे जे आरोप पोलिस दाखल करतील त्याचे मजबूत पुरावे पोलिसांकडे नाहीत. पहिल्या काही स्टेप्समधे ते उघडे पडतील. उगा इम्पल्सिव कारवाई करुन, इतरांनी काही बोलायच्या आधीच, सरकारने स्वतःच्याच मुस्काटात मारुन घेतली आहे. कोर्टाचे प्रोसिडींग इथे: http://www.thehindu.com/news/national/jnu-row-kanhaiya-kumar-bail-heari… व्हिडीओ टेप जर टँपर्ड केलेली असली तर मग उमार खलीद लपून का बसला आहे? >> जिथे लोक खोट्यापुराव्यांनिशी खोटे आरोप करुन थेट दंड द्यायला टपून बसली आहेत, तिथे तो लपुन का बसला आहे हा प्रश्न किती निरागस आहे.

In reply to by तर्राट जोकर

देशद्रोह व देशात अराजक माजवणे, देशाविरूद्ध कट करणे हे अजामिनपात्र गुन्हे आहेत. मग कन्हय्यावर जामिन घेउ शकतो असे कुठले आरोप पोलिसांनी लावले आहेत? तुमचे वृत्तमाध्यमातून वाचन होत असावे असे गृहीत धरून समजतो, की तुम्हाला माहीत असेलच की गृहमंत्रालयानेच दिल्ली पोलीसांना उत्साहाच्या भरात "राष्ट्रद्रोहाचे" आरोप लावू नका म्हणून सांगितले आहे ते. आणि अजून ते अधीकृतपणे जरी पोलीसांनी मागे घेतले नसले तरी, त्याला कोर्टाचे दार ठोठवायची परवानगी नाही म्हणून कोणी सांगितले? देशात काय कम्युनिझम आहे असे वाटते का? कायद्याचे राज्य आहे. म्हणूनच तर हार्दिक पटेल वर तेच आरोप लावलेले असता, तो कोर्टाचे दार ठोठावू शकला. आता कोर्टाने ऐकले नाही ती गोष्ट वेगळी... जिथे लोक खोट्यापुराव्यांनिशी खोटे आरोप करुन थेट दंड द्यायला टपून बसली आहेत, हे तुम्ही ज्या पध्दतीने मोदींना "मौत का सौदागर" ठरवण्याचा प्रयत्न केला गेला, इशरत कशी निष्पाप आहे हे ओरडले गेले, तिच्या नावाने रुग्णवाहीका काढून कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्या वॄंदा करात यांनी वाभाडे काढले, त्या संदर्भात म्हणत आहात का?

In reply to by विकास

ओबामा जेंव्हा राष्ट्राध्यक्ष झाले, तेंव्हा (काही) रिपब्लिकन्स नेते अशा अर्थाचे म्हणाले होते की अगदी देशाच्या हिताच्या भुमिकेचे निर्णय असले तरी ते ओबामाचे असल्याने आम्ही त्याला विरोध करू... आज मोदींच्या बाबतीत देखील तेच होत आहे. काल काय हैदराबाद, मग काय जेनयु आणि आता काय तर हरीयाण जाट दंगल... डावे लोकांना राष्ट्र ही संकल्पना मान्य नाहीच. >> अमेरिकेत डेमोक्रॅट्स हे डावे आहेत. त्यांना पण राष्ट्र ही संकल्पना मान्य नाहीच असे तुमचे म्हणणे काय? जर अमेरिका आणि भारताच्या राजकारणाची तुलना केली तर असे लक्षात येईल की भाजपा हा पक्ष रिपब्लिकन्सच्या जवळ जातो. उदा. "होलिअर दॅन दाउ" अ‍ॅटिट्यूड, धर्मातील जहालमतवादी गटांना जवळ करणे, पर्यावरणाविषयी उदासिनता, विज्ञानाशी फारकत (सोयीचे तेव्हढे उचलणे), या सर्व गोष्टी कुठल्या पक्षाकडे जास्त बोट दाखवतात? (अमेरिकेत आणि भारतात) आणि मोदी हे तर साक्षात रोनाल्ड रीगन यांचे अवतार वाटतील इतके दोघांच्यात साम्य आहे. लोकांमधे प्रसिद्ध, केलेले काम थोडे असले तरी खूप गाजावाजा, उत्तम मार्केटींग कला, सप्लाय साईड उर्फ व्हूडू इकॉनॉमिक्सचे चाहते (श्रीमंताना करसवलत दिली म्हणजे रोजगार निर्माण होतो यावर विश्वास), आणि रच्याकने, देशाच्या सर्वोच्च पदाला पोहोचण्याआधी दोघेही एका मोठ्या राज्याचे सर्वेसर्वा होते. गंमतीची गोष्ट अशी की सद्ध्या अमेरिकेत गरीब व श्रीमंतांमधे जी प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे ती धोरणे राबवणारे रेगन हे आद्य धोरणी. बघू मोदी उरलेल्या कारकीर्दित कुठल्या मर्गाने जातायत? आणि हो, मोदी आणि रेगन तुलना माझी नाही. जॉन स्टुअर्ट ने केलीये,

In reply to by खालिद

जर अमेरिका आणि भारताच्या राजकारणाची तुलना केली तर असे लक्षात येईल की भाजपा हा पक्ष रिपब्लिकन्सच्या जवळ जातो. मुद्दा अ‍ॅटीट्यूडचा आहे. कुठला पक्ष कुणाला कुणासारखा वाटतो आणि जॉन स्टुअर्ट काय म्हणतो याच्याशी नाही... जो अडमुठेपणा रिपब्लिकन्सनी ओबामाद्वेषातून केला तोच आत्ता डावे - कॉंग्रेस आणि इतर गणंग मोदीद्वेषातून करत आहेत. इतकेच म्हणणे आहे.

In reply to by खालिद

गंमतीची गोष्ट अशी की सद्ध्या अमेरिकेत गरीब व श्रीमंतांमधे जी प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे ती धोरणे राबवणारे रेगन हे आद्य धोरणी.
याला राऊंडिंग अप प्रॉक्झिमेट सस्पेक्ट्स असे म्हणता येईल का? सप्लाय साईड इकॉनॉमिक्सवर लिहितोच खाली.पण रोनाल्ड रेगन यांच्या धोरणांमुळे गरीब आणि श्रीमंत ही दरी वाढली की ही दरी वाढायची प्रक्रीया सुरू झाली त्यावेळी रोनाल्ड रेगन हे अध्यक्ष होते (आणि ही प्रक्रिया थांबविणे अमेरिकेच्या अध्यक्षांच्याही आवाक्याबाहेरचे होते) त्यामुळे दोष द्यायला रोनाल्ड रेगन हे प्रॉक्झिमेट सस्पेक्ट राऊंडिंग अप करायला मिळाले? रेगन अध्यक्ष होते १९८१ ते १९८९ या काळात.अमेरिकेत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटर यायची सुरवात झाली ती १९८० च्या दशकाच्या सुरवातीपासून.कॉम्प्युटर आल्यामुळे पूर्वी हाताने करावी लागायची अशी अनेक कामे रद्दबादलच झाली आणि त्यामुळे त्यासंबंधीच्या अनेक नोकर्‍या इतिहासजमा व्हायला सुरवात झाली.रघुराम राजन यांच्या फॉल्टलाईन्स या पुस्तकात एक उदाहरण दिले आहे.एखाद्या रिसर्च संस्थेत पूर्वी रिसर्च पेपर पाठवा म्हणून पाठविलेले फॉर्म गोळा करणे, चेक जमा करणे, त्यांच्या गरजेप्रमाणे पेपर पोस्टाने पाठविणे इत्यादी कामांसाठी एक माणूस असायचा.नंतर ई-मेल, वेबसाईट इत्यादी प्रकार आल्यानंतर असे जॉब इतिहासजमा झाले.अनेक वेगवेगळ्या नोकर्‍यांविषयी असे लिहिता येईल.त्यातून झाले असे की पूर्वी अगदी हायस्कूल शिक्षित अमेरिकन लोकांना बर्‍यापैकी नोकरी मिळून जात असे तो प्रकार बंद झाला.बदललेल्या काळात चांगली नोकरी मिळायला अधिक शिक्षण असणे गरजेचे झाले. अर्थातच रेगन यांच्या काळात ई-मेल, वेबसाईट वगैरे नव्हते.पण अधिक संगणकीकरणाच्या प्रक्रीयेची सुरवात प्रकर्षाने १९८० च्या दशकापासून झाली म्हणून दोष द्यायला रेगन समोर आपसूकच मिळाले असे का म्हणू नये? किंबहुना रघुराम राजन यांनीही पुस्तकातील त्या प्रकरणात रोनाल्ड रेगन यांना ही दरी रूंदावण्याबद्दल दोष दिलेला नाही. तेव्हा या सगळ्याला रोनाल्ड रेगन किती जबाबदार होते हा निर्णय मी वाचकांवरच सोडतो.
सप्लाय साईड उर्फ व्हूडू इकॉनॉमिक्सचे चाहते (श्रीमंताना करसवलत दिली म्हणजे रोजगार निर्माण होतो यावर विश्वास)
आता हिंडसाईटमध्ये हे सगळे बोलणे ठिक आहे.पण रेगन अध्यक्ष झाले तेव्हा काय परिस्थिती होती? १९६० च्या दशकापर्यंत किनेशिअन इकॉनॉमिक्स प्रमाणे मंदी आल्यास सरकारी खर्च वाढविणे (किंवा केनेडी टॅक्स कटप्रमाणे लोकांना करसवलती कमी देणे) हा रामबाण उपाय असल्याप्रमाणे होता.पण १९७० च्या दशकात पूर्वी न अनुभवलेला स्टॅगफ्लेशन हा प्रकार बघायला मिळाला.किनेशिअन इकॉनॉमिक्सप्रमाणे महागाई आणि मंदी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी येऊच शकणार नाहीत.पण नेमकी तीच जोडी एकत्र १९७० च्या दशकात बघायला मिळाली.अर्थातच किनेशिअन इकॉनॉमिक्समध्ये त्यावर उत्तर नव्हते.ते उत्तर शोधून काढले मिल्टन फ्रिडमन या मोनेटरीस्टने.फ्रिडमनच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे सुरवातीला मनी सल्पाय वाढवणे गरजेचे होते.म्हणजेच आधीच असलेल्या महागाईमध्ये मनी सप्लाय वाढवून अजून महागाईचा कडू डोस घेतल्याशिवाय समस्या सुटणार नव्हती.रोनाल्ड रेगन यांच्या आधी जिमी कार्टर अध्यक्ष असताना फेडचे चेअरमन विल्यम मिलर यांनी तेच केले.त्यातच १९७९ चे इराण प्रकरण आणि १९७९ चा एनर्जी क्रायसिस आला.या सगळ्याचा परिणाम म्हणून १९८० मध्ये अमेरिकेत महागाईचा दर १९७४ पेक्षाही जास्त वाढला . अशा प्रसंगी रोनाल्ड रेगन अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्याकडे नक्की काय उपाय होता? ते रिपब्लिकन असल्यामुळे सरकारी खर्च वाढविण्याकडे त्यांचा कल नव्हता.त्यांनी करसवलती दिल्या त्या नुसत्या कॉर्पोरेटना नाही तर सामान्यांनाही दिल्या. १९८१ मध्ये सगळ्यात वरच्या ब्रॅकेटमध्ये ७०% इतका होता तो १९८६ पर्यंत २८% पर्यंत खाली आला.आता याला केवळ श्रीमंतांनाच करसवलती देणे झाले असे म्हणता येईल का?मला माहित नाही. पण इथे दिलेल्या माहितीवरून तरी सामान्यांनाही सवलती दिल्या गेल्याच होत्या असे दिसते. उदाहरणार्थ १९८० मध्ये वर्षाला २५,००० कमविणार्‍याला ३९% हा टॉप दर तर समजा तो पगार वाढून १९८६ पर्यंत ३२,००० झाला (भारताप्रमाणे अमेरिकेत पगारवाढीचे दर वर्षाला १०-१५% नसतात) तर त्यावर ३४% टॉप दर होता. करकपातीचा असाच प्रयत्न जॉन केनेडींनी केला होता (तो केनेडींची हत्या झाल्यानंतर लिंडन जॉन्सन अध्यक्ष असताना अंमलात आला).मग रेगन यांनीही तसाच प्रयत्न केल्यावर (विशेषतः त्यापूर्वी किनेशिअन आणि मोनेटरीस्ट पध्दती अपेक्षित परिणाम देत नसताना) त्यात चूक काय? रच्याकने भारतातही १९७० च्या दशकात हायेस्ट ब्रॅकेटमध्ये ९०% इतका टॅक्स दर होता.तो १९९० च्या दशकात ५०% इतका खाली आला.आणि या काळात बहुतांश काळ प्रो-गरीब पक्षाचेच सरकार होते. अनेकदा रोनाल्ड रेगन आणि मार्गारेट थॅचर यांना या सगळ्या गोष्टींसाठी दोष दिला जातो. माझ्या मते ते १००% समर्थनीय नक्कीच नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

(किंवा केनेडी टॅक्स कटप्रमाणे लोकांना करसवलती कमी देणे)
याऐवजी किंवा केनेडी टॅक्स कटप्रमाणे लोकांना करसवलती देणे (किंवा करांचे दर कमी करणे) अशी सुधारणा हवी.

अफझलच्या बाबतीत वरकरणी भोकाड पसरणारे अलगतावादी, डावे आणि अविचारवंत तथाकथीत धर्मनिरपेक्ष हे सतत अफझलचे नाव घेत आणि त्यावर झालेला कथीत अन्याय यावर तावातावाने बोलत असताना असताना जनतेला एका गोष्टीचा पद्धतशीरपणे विसर पाडायला लावतात. तो म्हणजे अफझलचा चुलतभाऊ शौकत गुरू आनि आत्ता ज्याला राष्ट्रद्रोहाखाली अटक झाली आहे तो गिलानि. संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ज्यांना पकडण्यात आले त्यात अफझल गुरु व्यतिरीक्त शौकत गुरू, गिलानी आणि नवज्योत संधू उर्फ अफसान गुरु ही शौकतची बायको देखिल होती. ह्या चौघांना प्रमुख आरोपी करण्यात आले होते. या सर्वांवरील आरोपाची स्पेशल कोर्टाने भरपूर छाननी केली. सुरवातीस कोर्टाने त्यांना सरकारी वकील देखील दिला होता. (नंतर मला वाटते त्यांनी स्वतःचे वकील घेतले होते). त्यातील अफसान गुरूस या स्पेशल कोर्टाने देशाविरुद्ध युध्द करण्याचा कट रचण्याचा एक आरोप सोडल्यास इतर आरोपातून मुक्त केले. एका आरोपासाठी तिला पाच वर्षाची सक्त मजूरी देण्यात आली. पण अफझल, शौकत आणि गिलानी यांना फाशीची शिक्षा दिली. पुढे हायकोर्टाने (सुप्रिम पण नाही!), यातील अफसान आणि गिलानी ला सोडून दिले तर शौकत गुरूस दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा दिली. त्यात देखील चांगल्या वर्तणुकीसाठी शौकतची शिक्षा ही कमी करून त्याला नऊ महीने आधी सोडण्यात आले. अफझलच्या बाबतीत मात्र सुप्रिम कोर्टाला दिलेला पुरावा योग्यच वाटला आणि म्हणून परत एकदा विनंती केली तरी देखील त्याची ह्या दहशतवादी हल्यातली भुमिका ही (खल)नायकाची ठरवत त्याला भारतीय दंड विधानानुसार "rarest of the rare" अशी मृत्यूदंडाची शिक्षा दिली. ती शिक्षा युपिए सरकारमधील काँग्रेसचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अमलात आणली. ती देखील कशी, तर त्याच्या निकटच्या नातेवाईकांना (बायको, मुलगा वगैरे) न सांगता. आणि यांचे राहूल गांधी आता जेएनयुत जाऊन इतक्या वर्षांनी सुतक पाळत बसलेत... सुप्रिम कोर्टाने यालप वून केलेल्या अंमलबजावणीवर नाराजी व्यक्त करत फाशीची शिक्षा आमलात आणण्यासंदर्भात काही नियम घालून दिले. जे याकुब मेमनच्या वेळेस पाळले गेले (तरी देखील भोकाड पसरणारे पब्लीक होते हा मुद्दा वेगळा) हे अलगतावादी, डावे आणि अविचारवंत तथाकथीत धर्मनिरपेक्ष अफझलचे नाव घेत आपली न्यायसंस्था कशी वाईट आहे ह्याचे खोटे चित्र रंगवत बसतात. दहशतवादाचा आरोप असलेल्या चार प्रमुख आरोपींपैकी याच न्यायव्यवस्थेने आणि तत्कालीन सरकारने तिघांना काय न्याय दिला या बद्दल मात्र बोलायला तयार नाहीत. अर्थात तसे बोलले असते तर ते डावे आणि तथाकथीत सेक्युलर राहीले असते का?

In reply to by विकास

ह्याच चालीवर म्हणेन हैद्राबाद युनि मध्ये प्रकरण युनि ने मिटवले तरी बोंबा बोंब आता जे एन यु प्रकरण दिल्ली पोलिस हाताळत आहेत तरी बोंबा

In reply to by विकास

आपली न्यायसंस्था कशी वाईट आहे ह्याचे खोटे चित्र रंगवत बसतात.
एक्झॅक्टली डाव्या आणि फुटीरतावादींच्या नॅरेटीव्हचा उद्देश आणि/अथवा परिणाम न्यायव्यवस्थेचे खोटे चित्र रंगवून अन्याय झाल्याची बतावणी करणे व अधिक आतंकवादी विचाराची माणसे गोळा/तयार करणे असा असू/होऊ शकतो. आणि भारतीय न्यायव्यवस्थेचे असे खोटे चित्र जाणीवपुर्वक रंगवणे जेणे करून शासकीय यंत्रणेला अनुचित हिंसक मार्गांनी आव्हान देणे, कुठेतरी शासन व्यवस्थेचाही तोल जातो त्याचे परत परत भांडवल करण्याचे दुष्टचक्र ही यातील सर्वात हानीकारक गोष्ट आहे आणि हे विद्यार्थ्यांना समजायला वेळ लागणे ठिक पण त्यांच्या त्यांच्या तथाकथित प्राध्यापकांना आणि फुटीरतावादाचे आंधळेपणाने समर्थन करणार्‍यांना भान येत नसेल तर ती त्यांच्या आत्मपरिक्षणाची वेळ आहे.

In reply to by विकास

शिवाय काश्मिरचा जिथपर्यंत प्रश्न आहे अशा खोट्यानाट्या प्रसंगांचे भांडवल करून खोट्यानाटी आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी देववण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्नात पाकीस्तानचा हात असू शकतो आणि तसे असेल तर अशा कृती अकॅडेमीक फ्रीडमचा नव्हे देशद्रोहाचाच भाग ठरणर नाही का ? एक कन्हैय्याच्या अटकेची घाई झाली की गहबज केला जातो न्यायव्यवस्थेवर खोटे आरोप लावणार्‍यांची दृष्टीच देशद्रोही असेल पण त्यांचे मुद्दे खोडण्या एवजी त्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न करणार्‍या तथाकथित बुद्धीवंत प्राध्यापकांना लाजा वाटायला नकोत का ?

In reply to by विकास

जरा उशिराने कुणाला जाग आल्याचे दिसते कंटेम्ट ऑफ कोर्ट्ची केअ दाखल केले जाण्याची एक बातमी दिसते आहे.

इतर सर्व पक्षांची साठमारी एकवेळ समजु शकते. त्यांचं पोटपाणी चालतं त्याच्यावर. पण केजरीवालांना विरोधी पक्षाची स्पेस घेरण्याची एव्हढी घाई का झाली आहे कळत नाहि. अत्यंत थर्ड्क्लास कमेण्ट्स देऊन हा माणुस आपली उरली-सुरली इज्जत घालवायला किती उतावीळ झाला आहे. कधि कधि वाटतं मोदी आणि आआप यांचं प्राक्तन सारखंच आहे. मोदिंच्या मेहेनतीला भाजपचे बोलघेवडे ग्रहण लावतात, तर आआपच्या स्वच्छ राजकारणाच्या कन्सेप्टला हा केजरीवाल नासवतो.

In reply to by अर्धवटराव

तिरंग्याला विरोध चालू आहे उद्या भारतीय जनता अश्याने कनैह्या जेल मधून बाहेर आला तरी त्याच्याशी सहानभूती बाळगणार नाही मागे बीकाने विनायक सेन चा धागा काढला होता ते सुटले कारण कोर्ट म्हणते घोषणा देणून देशद्रोही सिद्ध होत नाही तशी कृती करायला हवी अश्या धाटणीचे काहीतरी म्हणून लोकशाहीत अश्या घोषणा द्यायचा अधिकार आहे असे स्वरा भास्कर अभिनेत्री माजी विद्यार्थिनी व उमर चा दावा होता कि देशाला शिव्या घालणे हा देशद्रोह कायद्याचा भाषेत नाही असे त्यांना मागील काही निकालांच्या मुळे वाटते पण जनतेच्या मते तो नक्कीच राजद्रोह आहे आणि जनता म्हणजे राष्ट्र सध्या जनमत अश्या लोकांच्या बौद्धिक हैदोस चा तिटकारा करत आहे तेव्हा लगे हात कानून अपग्रेड किया जाय, अमीर खान ची घर वापसी आयमिन सरकार वापसी नुकतीच झाली आहे हे सुद्धा विचारवंतांना सणसणीत उत्तर आहे आमिर मौका टेरीयन आहे हे ह्या निमित्ताने दुनियेला कळून चुकले ह्या वेळी किरणच्या मन कि बात मनात राहिली

In reply to by अर्धवटराव

मोदिंच्या मेहेनतीला भाजपचे बोलघेवडे ग्रहण लावतात, तर आआपच्या स्वच्छ राजकारणाच्या कन्सेप्टला हा केजरीवाल नासवतो. साधुवाद

In reply to by नाना स्कॉच

मोदिंच्या मेहेनतीला भाजपचे बोलघेवडे ग्रहण लावतात, तर आआपच्या स्वच्छ राजकारणाच्या कन्सेप्टला हा केजरीवाल नासवतो.
:)

वकिलाच्या वेशातील काही लोकांनी कायदा हातात घेऊन, मिडिया सहित काही लोकांना मारहाण केली होती, त्या कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर कारवाई, सध्यातरी झाली नाही असे वाटते, काय कारण असावे बरे ? JNU

In reply to by पगला गजोधर

कायदा त्याची वळणे घेतो म्हणतात तसे कायदा याही बाबतीत निश्चितपणे वळण घेईल, त्यांनी ज्या पद्धतीने केले तो देशप्रेमाचा सर्वोत्तम मार्ग नसेल कदाचित पण दिल्लीतली इतर जनता देशप्रेमासाठी रस्त्यावर आलेली नसताना वकीलांनाच देशप्रेमाची खिंड लढवावी लागणे हे उर्वरीत देशवासीयांचेही चांगले चित्र रंगवत नसावे.

In reply to by तर्राट जोकर

जमेल तेवढे लवकर या विषयावर वेगळा धागा लेख काढून उत्तर नक्कीच देईन. तुर्तास 'कुरकुरे' नावाच्या प्रॉडक्टची जाहीरात लाईन आठवली ती तुमच्याशी शेअर करतो, 'तेढा है; मगर मेरा है !'

In reply to by पगला गजोधर

चित्रामधे दाखवलेल्या रुबिया सयिद यांनी कधी भारत विरोधी घोषणा केल्या? किंबहूना निवडणूका लढताना आणि नंतर शपथविधी च्या वेळेस मला वाटते भारताचे सार्वभौमत्व मान्य करावे लागते. अफझल गुरूवर अन्याय झाला असं त्या म्हणाल्या असल्या अथवा जे एन यु मधली मुले म्हणाली म्हणून राष्ट्रद्रोह मानला गेलेला नाही. हे आपल्याला आणि वरील व्यंगचित्र काढणार्‍या त्या विचित्रकारास माहीत असेलच.

In reply to by विकास

ह्या मेहाबुबा मुफ्ति हो... रुबिया सयिद त्या ज्यांचे अपहरण झाले होते आणि आतंकवादि त्या बदल्यात सोडावे लागले होत :(

एक मोठा विरोधाभास पहा. काहींच्या हातात अफजलचे पोस्टर आहेत आणि काहींच्या हातात आंबेडकरांचे आहेत. मनुवाद,ब्राह्मणवाद,भगवाकरण याला विरोध म्हणून त्यांनी आंबेडकरांचे पोस्टर हाती घेतले आहेत. दुसरी गोष्ट अशी कि अफजलला फाशी या देशाच्या कायद्याने/संविधानाने दिली आहे,आणि त्या संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आहेत. तसेच "अफजल तेरे कातिल जिंदा है"| या घोषणा दिल्या जातात.म्हणजे आपण नेमकं काय करतोय हे त्या विद्यार्थ्यांना समजत नसावं. किंवा हे दोन गट वेगळे असावेत 1) देशविरोधी घोषणा देणारे(अफजलसमर्थक) 2) मनुवाद,संघवाद विरोधक कन्हैया हा दुसर्या गटातला आहे. पण हे दोन्ही गट एकाठिकाणी येवून आंदोलन/प्रदर्शन करत आहेत,त्यामुळे सगळा गोंधळ उडाला आहे.

चुकीच्या आंदोलनाची चुकीच्या पद्धतीने हाताळणी !

ओमर खालेद फरारी आहे म्हणतात..मग तो अर्नब गोस्वामी परवा कोणावर बेंबीच्या देठापासून बेम्बाटत होता ? खालच्या लिंक मध्ये दिसणारा मुलगा आणि ओमर खालेद सारखेच दिसतात म्हणून विचारलं...की हाच ओमर खालेद आहे ? मग तो फार केंव्हा झाला ? https://www.youtube.com/watch?v=D-2DNF3q3H0

In reply to by चिनार

या युट्यूबचे माहित नाही, पण शेवटी तेच ना तो उघड उघड टिव्हीवर मुलाखती देत फिरत होता तेव्हा विद्यापिठीय प्रसंगात न्यायालयांचा अवमान होत असण्याची शक्यता कुणाला अभ्यासाऊन कारवाई कराविशी वाटली नाही आता हरवला म्हणून तोंड पाडण्यात कै पॉईंटॅ ? आता मिळेल तेव्हा मिळेल असे बरेच लोकांच्या आपला देश दशकोंदशके शोधात असतो त्यांच्यात हि नवी भरती एवढेच.

Kanhaiya Kumar's Anti National Presidential speech in JNUSU 2015.

Posted by Unofficial: Subramaniam Swamy on Saturday, February 20, 2016

विकास ह्यांनी अमेरिकेतील ज्या कायद्याचा एकेठिकाणी उल्लेख केला तो यु एस ए पेट्रीओट कायदा येथे देत आहे , हा कायदा सर्व सामान्य जनतेला जाचक वाटू शकतो भारतीय विचार्जंतांना तर तो वाचून भोवळ येईल पण ह्यामुळेच तेथे अजूनही दहशतवादाची झळ परत बसली नाही. The USA PATRIOT Act: Preserving Life and Liberty (Uniting and Strengthening America by Providing Appropriate Tools Required to Intercept and Obstruct Terrorism) Congress enacted the Patriot Act by overwhelming, bipartisan margins, arming law enforcement with new tools to detect and prevent terrorism: The USA Patriot Act was passed nearly unanimously by the Senate 98-1, and 357-66 in the House, with the support of members from across the political spectrum. The Act Improves Our Counter-Terrorism Efforts in Several Significant Ways: 1. The Patriot Act allows investigators to use the tools that were already available to investigate organized crime and drug trafficking. Many of the tools the Act provides to law enforcement to fight terrorism have been used for decades to fight organized crime and drug dealers, and have been reviewed and approved by the courts. As Sen. Joe Biden (D-DE) explained during the floor debate about the Act, "the FBI could get a wiretap to investigate the mafia, but they could not get one to investigate terrorists. To put it bluntly, that was crazy! What's good for the mob should be good for terrorists." (Cong. Rec., 10/25/01) Allows law enforcement to use surveillance against more crimes of terror. Before the Patriot Act, courts could permit law enforcement to conduct electronic surveillance to investigate many ordinary, non-terrorism crimes, such as drug crimes, mail fraud, and passport fraud. Agents also could obtain wiretaps to investigate some, but not all, of the crimes that terrorists often commit. The Act enabled investigators to gather information when looking into the full range of terrorism-related crimes, including: chemical-weapons offenses, the use of weapons of mass destruction, killing Americans abroad, and terrorism financing. Allows federal agents to follow sophisticated terrorists trained to evade detection. For years, law enforcement has been able to use "roving wiretaps" to investigate ordinary crimes, including drug offenses and racketeering. A roving wiretap can be authorized by a federal judge to apply to a particular suspect, rather than a particular phone or communications device. Because international terrorists are sophisticated and trained to thwart surveillance by rapidly changing locations and communication devices such as cell phones, the Act authorized agents to seek court permission to use the same techniques in national security investigations to track terrorists. Allows law enforcement to conduct investigations without tipping off terrorists. In some cases if criminals are tipped off too early to an investigation, they might flee, destroy evidence, intimidate or kill witnesses, cut off contact with associates, or take other action to evade arrest. Therefore, federal courts in narrow circumstances long have allowed law enforcement to delay for a limited time when the subject is told that a judicially-approved search warrant has been executed. Notice is always provided, but the reasonable delay gives law enforcement time to identify the criminal's associates, eliminate immediate threats to our communities, and coordinate the arrests of multiple individuals without tipping them off beforehand. These delayed notification search warrants have been used for decades, have proven crucial in drug and organized crime cases, and have been upheld by courts as fully constitutional. Allows federal agents to ask a court for an order to obtain business records in national security terrorism cases. Examining business records often provides the key that investigators are looking for to solve a wide range of crimes. Investigators might seek select records from hardware stores or chemical plants, for example, to find out who bought materials to make a bomb, or bank records to see who's sending money to terrorists. Law enforcement authorities have always been able to obtain business records in criminal cases through grand jury subpoenas, and continue to do so in national security cases where appropriate. These records were sought in criminal cases such as the investigation of the Zodiac gunman, where police suspected the gunman was inspired by a Scottish occult poet, and wanted to learn who had checked the poet's books out of the library. In national security cases where use of the grand jury process was not appropriate, investigators previously had limited tools at their disposal to obtain certain business records. Under the Patriot Act, the government can now ask a federal court (the Foreign Intelligence Surveillance Court), if needed to aid an investigation, to order production of the same type of records available through grand jury subpoenas. This federal court, however, can issue these orders only after the government demonstrates the records concerned are sought for an authorized investigation to obtain foreign intelligence information not concerning a U.S. person or to protect against international terrorism or clandestine intelligence activities, provided that such investigation of a U.S. person is not conducted solely on the basis of activities protected by the First Amendment. 2. The Patriot Act facilitated information sharing and cooperation among government agencies so that they can better "connect the dots." The Act removed the major legal barriers that prevented the law enforcement, intelligence, and national defense communities from talking and coordinating their work to protect the American people and our national security. The government's prevention efforts should not be restricted by boxes on an organizational chart. Now police officers, FBI agents, federal prosecutors and intelligence officials can protect our communities by "connecting the dots" to uncover terrorist plots before they are completed. As Sen. John Edwards (D-N.C.) said about the Patriot Act, "we simply cannot prevail in the battle against terrorism if the right hand of our government has no idea what the left hand is doing" (Press release, 10/26/01) Prosecutors and investigators used information shared pursuant to section 218 in investigating the defendants in the so-called “Virginia Jihad” case. This prosecution involved members of the Dar al-Arqam Islamic Center, who trained for jihad in Northern Virginia by participating in paintball and paramilitary training, including eight individuals who traveled to terrorist training camps in Pakistan or Afghanistan between 1999 and 2001. These individuals are associates of a violent Islamic extremist group known as Lashkar-e-Taiba (LET), which operates in Pakistan and Kashmir, and that has ties to the al Qaeda terrorist network. As the result of an investigation that included the use of information obtained through FISA, prosecutors were able to bring charges against these individuals. Six of the defendants have pleaded guilty, and three were convicted in March 2004 of charges including conspiracy to levy war against the United States and conspiracy to provide material support to the Taliban. These nine defendants received sentences ranging from a prison term of four years to life imprisonment. 3. The Patriot Act updated the law to reflect new technologies and new threats. The Act brought the law up to date with current technology, so we no longer have to fight a digital-age battle with antique weapons-legal authorities leftover from the era of rotary telephones. When investigating the murder of Wall Street Journal reporter Daniel Pearl, for example, law enforcement used one of the Act's new authorities to use high-tech means to identify and locate some of the killers. Allows law enforcement officials to obtain a search warrant anywhere a terrorist-related activity occurred. Before the Patriot Act, law enforcement personnel were required to obtain a search warrant in the district where they intended to conduct a search. However, modern terrorism investigations often span a number of districts, and officers therefore had to obtain multiple warrants in multiple jurisdictions, creating unnecessary delays. The Act provides that warrants can be obtained in any district in which terrorism-related activities occurred, regardless of where they will be executed. This provision does not change the standards governing the availability of a search warrant, but streamlines the search-warrant process. Allows victims of computer hacking to request law enforcement assistance in monitoring the "trespassers" on their computers. This change made the law technology-neutral; it placed electronic trespassers on the same footing as physical trespassers. Now, hacking victims can seek law enforcement assistance to combat hackers, just as burglary victims have been able to invite officers into their homes to catch burglars. 4. The Patriot Act increased the penalties for those who commit terrorist crimes. Americans are threatened as much by the terrorist who pays for a bomb as by the one who pushes the button. That's why the Patriot Act imposed tough new penalties on those who commit and support terrorist operations, both at home and abroad. In particular, the Act: Prohibits the harboring of terrorists. The Act created a new offense that prohibits knowingly harboring persons who have committed or are about to commit a variety of terrorist offenses, such as: destruction of aircraft; use of nuclear, chemical, or biological weapons; use of weapons of mass destruction; bombing of government property; sabotage of nuclear facilities; and aircraft piracy. Enhanced the inadequate maximum penalties for various crimes likely to be committed by terrorists: including arson, destruction of energy facilities, material support to terrorists and terrorist organizations, and destruction of national-defense materials. Enhanced a number of conspiracy penalties, including for arson, killings in federal facilities, attacking communications systems, material support to terrorists, sabotage of nuclear facilities, and interference with flight crew members. Under previous law, many terrorism statutes did not specifically prohibit engaging in conspiracies to commit the underlying offenses. In such cases, the government could only bring prosecutions under the general federal conspiracy provision, which carries a maximum penalty of only five years in prison. Punishes terrorist attacks on mass transit systems. Punishes bioterrorists. Eliminates the statutes of limitations for certain terrorism crimes and lengthens them for other terrorist crimes. The government's success in preventing another catastrophic attack on the American homeland since September 11, 2001, would have been much more difficult, if not impossible, without the USA Patriot Act. The authorities Congress provided have substantially enhanced our ability to prevent, investigate, and prosecute acts of terror. आपले पंचतारांकीत नगरीत स्वागत आहे.

वहा हर जगह उनके उनके झंडे फहराएं जाते है. फहराएं, फहराना, फहराते है....लिहा शंभर शंभर वेळा ;)