जे.एन.यु. - नक्की काय सुरु आहे??
णमस्कार लोक्स. (टार्याची लै आठवणा येते कधि कधि)
जे.एन.यु. प्रकरण कोणि जवळुन फॉलो करत आहे का? नक्की काय सुरु आहे तिथे?
भारतात राहुन भारताच्या विघटनाचे ढोल वाजवणे काहि नवीन नाहि. विद्यार्थी जीवनातुन राजकारणाचे लाइव्ह धडे गिरवणे व त्या अनुषंगाने एखाद्या घटनेचे भांडवल करणे सुद्धा नेहेमीचच. प्रत्येक लहान-मोठ्या घटनेचा एक सरकारी अविष्कार व त्याच्या विरुद्ध विरोधी पार्टीची टुम हि तर नित्याचीच बाब. जे.एन.यु तसंही राजकीय आखाडा म्हणुनच प्रसिद्ध आहे.
अफझल गुरुच्या फाशीला धार्मीक रंग देणे, त्याच्याशी काश्मीर समस्येची नाळ जोडुन ठेवणे म्हणजे सरळधोप राजकारण झालं. सध्या भाजपाला काश्मीर राज्य-सरकार सरकारात भाग घ्यायला अधिक अडचण यावी हा एक जास्तिचा मुद्दा असु शकतो, पण अफजल गुरु म्हणजे काहि देशव्यापी आगडोंब उसळवणारे प्रस्थ नाहि.
यंदा हि जे.एन.यु भानगड काहि भलतीच खिचडी शीजवत आहे असं नाहि वाटत का? पुण्याच्या फिल्म इंस्टिट्युटमधला संप, असहिष्णुता प्रकरण, वेमुला केस, आणि आता जे.एन.यु.
आपले (फॉर दॅट मॅटर कुठलेही) राजकारण हीन पातळीवर(सुद्धा) चालते हे आपण बघतोच. पण सरकार विरुद्ध घटनांची एक लांबलचक मालिका चालावी, अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने, असा काहिसा प्रयत्न चालला आहे का?
याला दुसरी बाजु देखील आहे. 'अच्छे दिन' म्हणावे तसे फार काहि दृगोच्चर व्हायला तयार नाहित. दिल्ली, बिहारमधे भाजपची व्यवस्थीत धुलाई झाली आहे. भाजपाचे जुने इलेक्शन व्यवस्थापक आता त्यांच्या विरोधकांचे आधारस्तंभ होत आहेत. शहा साहेबांची राजकीय कारकीर्द, आणि एकुणच भाजपाचे पुढील लोकसभा निवडणुकीचे भवितव्य उ.प्र. निकालांवर अवलंबुन असणार आहे. त्याची तयारी म्हणुन आतापासुन एका बाजुने राष्ट्रवादी लाट तयार करणे व दुसरीकडुन मुंबईत मेक इन इंडीयाचा इव्हेण्ट करुन भाजपाचे निवडणुक कम-बॅक ऑपरेशन सुरु झाले असावे काय? जे.एन.यु प्रकरण त्याकरताच शिजवले असावे काय?
कि तीसरीच काहि भानगड आहे या मागे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
याला राऊंडिंग अप प्रॉक्झिमेट सस्पेक्ट्स असे म्हणता येईल का?
सुधारणा
अफसान, शौकत गुरू आणि गिलानी
ह्याच चालीवर म्हणेन हैद्राबाद
आपली न्यायसंस्था कशी वाईट आहे
शिवाय काश्मिरचा जिथपर्यंत
जरा उशिराने कुणाला जाग
हे केजरीसाहेब पण भयंकर चीड आणतात राव
तिरंग्याला विरोध चालू आहे
मोदिंच्या मेहेनतीला भाजपचे
:)
सहमत !!!
भर कोर्टात
कायदा त्याची वळणे घेतो
देशप्रेम म्हणजे काय असावे?
'तेढा है; मगर मेरा है !'
वाट बघा...
?
चित्रामधे दाखवलेल्या रुबिया सयिद
एक मोठा विरोधाभास पहा.
JNU
ओमर खालेद फरारी आहे म्हणतात.
या युट्यूबचे माहित नाही, पण
म्हणजे हा तोच का ?
हो,
चीमायबीन !!
Kanhaiya Kumar's Anti
विकास ह्यांनी अमेरिकेतील ज्या
मागाशीच एका बातमी वाहिनी वर
बातमी (बीबीसी रेडीओ)
फ़ैलाने नव्हे फहराने असं असतंय
वहा हर जगह उनके उनके झंडे