Skip to main content

जे.एन.यु. - नक्की काय सुरु आहे??

लेखक अर्धवटराव यांनी शुक्रवार, 19/02/2016 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स. (टार्‍याची लै आठवणा येते कधि कधि) जे.एन.यु. प्रकरण कोणि जवळुन फॉलो करत आहे का? नक्की काय सुरु आहे तिथे? भारतात राहुन भारताच्या विघटनाचे ढोल वाजवणे काहि नवीन नाहि. विद्यार्थी जीवनातुन राजकारणाचे लाइव्ह धडे गिरवणे व त्या अनुषंगाने एखाद्या घटनेचे भांडवल करणे सुद्धा नेहेमीचच. प्रत्येक लहान-मोठ्या घटनेचा एक सरकारी अविष्कार व त्याच्या विरुद्ध विरोधी पार्टीची टुम हि तर नित्याचीच बाब. जे.एन.यु तसंही राजकीय आखाडा म्हणुनच प्रसिद्ध आहे. अफझल गुरुच्या फाशीला धार्मीक रंग देणे, त्याच्याशी काश्मीर समस्येची नाळ जोडुन ठेवणे म्हणजे सरळधोप राजकारण झालं. सध्या भाजपाला काश्मीर राज्य-सरकार सरकारात भाग घ्यायला अधिक अडचण यावी हा एक जास्तिचा मुद्दा असु शकतो, पण अफजल गुरु म्हणजे काहि देशव्यापी आगडोंब उसळवणारे प्रस्थ नाहि. यंदा हि जे.एन.यु भानगड काहि भलतीच खिचडी शीजवत आहे असं नाहि वाटत का? पुण्याच्या फिल्म इंस्टिट्युटमधला संप, असहिष्णुता प्रकरण, वेमुला केस, आणि आता जे.एन.यु. आपले (फॉर दॅट मॅटर कुठलेही) राजकारण हीन पातळीवर(सुद्धा) चालते हे आपण बघतोच. पण सरकार विरुद्ध घटनांची एक लांबलचक मालिका चालावी, अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने, असा काहिसा प्रयत्न चालला आहे का? याला दुसरी बाजु देखील आहे. 'अच्छे दिन' म्हणावे तसे फार काहि दृगोच्चर व्हायला तयार नाहित. दिल्ली, बिहारमधे भाजपची व्यवस्थीत धुलाई झाली आहे. भाजपाचे जुने इलेक्शन व्यवस्थापक आता त्यांच्या विरोधकांचे आधारस्तंभ होत आहेत. शहा साहेबांची राजकीय कारकीर्द, आणि एकुणच भाजपाचे पुढील लोकसभा निवडणुकीचे भवितव्य उ.प्र. निकालांवर अवलंबुन असणार आहे. त्याची तयारी म्हणुन आतापासुन एका बाजुने राष्ट्रवादी लाट तयार करणे व दुसरीकडुन मुंबईत मेक इन इंडीयाचा इव्हेण्ट करुन भाजपाचे निवडणुक कम-बॅक ऑपरेशन सुरु झाले असावे काय? जे.एन.यु प्रकरण त्याकरताच शिजवले असावे काय? कि तीसरीच काहि भानगड आहे या मागे?

वाचने 22826
प्रतिक्रिया 129

प्रतिक्रिया

अर्धवटराव, जनेविमध्ये पुरोगामी कसे तोंडघशी पडले ते भाऊ तोरसेकारांनी दाखवून दिलंय. तुम्हाला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं भाऊंनी दिलीत. त्यांचा लेख इथे आहे : http://jagatapahara.blogspot.co.uk/2016/02/blog-post_18.html आ.न., -गा.पै.

In reply to by अर्धवटराव

त्या ब्लॉग पोस्टमध्ये पुरोगामी हा शब्द ज्या व्यक्तीसमुहाला उद्देशून वापरला आहे त्यावरून ब्लॉगरला पुरोगामी शब्दाचा अर्थच माहिती नसावा असे वाटते.

In reply to by सतिश गावडे

भाऊ तोरसेकारांचे लिखाण मी नेहमीच वाचतो. अभ्यासपूर्ण आणी तर्कशुद्ध असते.पण लिखाणात प्रत्येकच मुद्दा 'पुरोगामी' शब्दाशी जोडणे हा जरा अतिरेक वाटतो. प्रामाणिकपणे सांगायचे तर, त्यांचे लिखाण वाचल्यामुळे पुरोगामी म्हणजे नक्की कोण हा प्रश्न मलाही सतावतोय

In reply to by सतिश गावडे

मला वाटते कुणालाच माहित नसावा. बाकी गृह खात्यात १८ हून अधिक वर्ष झाले, काही बोलणे उचित नाही. कुणालाही रुचणार नाही.

हा लेख इंग्रजीत असल्याने तसाच चोप्य पास्ते करतोय India has been branded as 'An Intolerance Nation' , where rivers are full of blood of innocents ,Now India don't have freedom of speech etc. Have you ever tried to connect the dots? NO? Let me try to analyse , 16th May 2014 ,India voted &elected a majority government under the leadership of PM Narendra Modi ,Government elected Former IB chief as NSA ,Changed the chief of security commands. As a Response of these changes ,Indian Security agencies had started combing operations in Government institutions ,Loopholes were found& Culprits(Brokers) were punished ,Corporate interference into policy was stopped , No Entry board came into action for the brokers and this is how Narendra Modi Government kneel down the Corporate &Government Nexus ,Powerful corporates got FURIOUS with these actions ,LUTYENS people too were feeling the heat as they were denied access to the Ministries ,Corporates are feeling uncomfortable (No Leakage of Policy ,Intelligence people are in Industry so no big SCAMS ,Big losses for cheaters ,You know how powerful these corporates are? And Africa is a typical example of their anger) Swift &Decisive actions of Government made many sections Uncomfortable ,Agencies tried to make way for the Faster growth & As a hurled they found NGOs ,As IB Suggested these NGOs have powerful connection across the Globe and Some people are trying to control the pulse of the Nation through these setups ,NGOs were responsible for 2-3%less GDP of India so Crackdown of NGOs was the need of time and thankfully government played hard with it ,This strong action left many Elites red faced ,There source of income was no more so they had to find there bread and butter ,it's very uncomfortable, (PIL industry is jobless ,No lame policies to snatch the money ,No leaked info ,You know A person can go to any extent to ensure his/her bread) Indian Arm forces have shown interest into global politics ,Foreign ministry came into action with PM ,Foreign trips of PM made many insiders&outsiders uncomfortable, Frequent visits and Strongly put demand for India's seat into UN forced the world to take interest in World's vibrant economy ,Indian Warships had started guarding the interests of India as well as of friendly Nations ,Direct MOUs were signed with the concerned persons ,Entry for International brokers too was prohibited so Powerful Brokers got irked ,Politicians across the globe are now finding it difficult to limit the rising power of Indian PM or India ,Politics across the world is feeling uncomfortable, (Interference in India have been denied& Whenever it happened World politics did everything to destroy that Nation) Intelligence agencies and Arms forces got their actual powers ,Now they don't need to think even for a second before killing the enemies ,As a result ,ISI moles ,Naxalites ,Terrorists had started feeling the heat ,200+ Moles were caught ,Naxal belt is quite and Hundreds of Naxalite are surrendering ,Peaceful India made Arms dealers and their brokers uncomfortable,( Moles are Blackmailing the People because of their hands in glove ,Previously Arms lobbies have forced countries into civil wars for their sell or arms ,ShriLanka's civil was is a typical example) Eminent Personality were denied unnecessary benefits ,No free foreign trips ,No 5star hotel meetings ,Top posts have been filled with the deserving candidates, No family planer was entertained so It made so-called Eminent Uncomfortable ,(Hitjobs and Award Wapsi) Policies of Government were made to take care of 12.5Billion people unlike previous governments where 8billion Hindus,2billion Minorities etc Policies were made ,and as a result Minorities were denied unnecessary benefits so Minorities too are feeling uncomfortable,(Vote bank is putting pressure) Babus have been forced to complete their work in limited time ,Responsibilities are fixed ,If violated punishment comes from PMO ,No family trips ,No overstay ,No 5star food nothing ,Now Babus are uncomfortable,( Elitism has been challenged ,EGO is very bad thing ) Indian Opposition too were denied unnecessary rights ,powers etc ,Crackdown on their illegal affairs has been in full swing ,Some are inside jail or some are in queue ,Political relevance at stake because of Strong growth and Development policies so they are uncomfortable, (Mandatory resistance for everything to survive ,Can go to any extent ,Nation could be out on the line for survival ) Now , Politicians , Arms dealers , Brokers , Eminent ,NGOs , World leaders ,Moles are feeling uncomfortable ,Their sources of income have been put under scanner and therefore many of them are either jobless or not able to get enough , PM came outside the LUTYENS Zone so it's completely unacceptable for the Eminent to accept him ,Ego issue comes ,No power for The Eminent, in fact nothing for the tradition LUTYENS gang ,Meanwhile many GANGS are either feeling heat or on the brink of Death so THEY WILL go to any extent to defame , destabilise the Government ,Here are a few patterns , To hide their sins ,Campaign Modi is dictator was launched to save NGOs from crackdown, ISI agents were caught ,Campaign Suit boot ki Sarkar/Lalit Modi were launched , Naxalites were neutralised/CORRUPTS were/are feeling heat ,Yakub was hanged and many exposed themselves by supporting a Terrorist....so Campaign Intolerance India was launched to cover the sins, India emerged as powerful Nation/Political families are on the brink of arrest...so Rohtih Varmuls's issue was picked Now #MakeInIndia ,The biggest event of Indian History ,was/is successfully going on so This JNU/Jadavpur type incidents and FOE campaign has been launched to distract the Investment for Make in India and Now Save Anti Indians campaign on the name of Freedom of Speech (FOE) Well, you don't need to be an Einstein tk understand the reason behind these Intolerance and FOE things ,I'm telling you another such planned activity is on the way to stop the Education REFORMS, One Powerful step/crackdown force the opposition to pick these Anti Development/Indian steps as Opposition is still to find one good mistake of Modi Government ,Certainly it's good sign for India but bad for the survival of opposition. Be wise ,Choose your stand carefully ,It's LONG War and You have to stand with the government and help them in small battles and therefore #IStandWithGovernment and #IWillNotTolerate these fake Intolerances and FOEs anymore ,Will you tolerate?

In reply to by ट्रेड मार्क

आपण सगळे मराठी संस्थळावर मायमराठी मधे लिखाणाचा अन वाचनाचा आनंद घ्यायला जमतो असा आमचा होरा आहे साहेब . आपण दिलेल्या लेखाबद्दल काहीच म्हणणे नाही किंबहुना त्याचे कौतुकच वाटते. तरीही जर त्याचा किमान गोषवारा मराठीत दिल्यास आम्हाला वैयक्तिक पातळीवर आनंद होईल. ही एक विनंती आहे आपल्याला डिवचायचा उद्देश नाही अजिबात ह्याची नोंद घेणे. -नाना

अगदी लक्ष्मण ह्यांच्या 'कॉमन मॅन' सारखी सगळे पाहणारी आम्हाला एक फोटो हा दिसतो . अन दूसरा फोटो हा दिसतो . काय खरे मानावे अन काय खोटे! आमचे प्रश्न निराळे आहेत बजेट काय येईल? यंदा घरी पोरीच्या लग्नासाठी (सद्धया वय ५) गुंजभर तरी सोने जोड़ता येईल का? वगैरे टिपिकल प्रश्न पडतात आम्हाला. सैनिक लोकांबद्दल अतीव आदर अन राजकारणी लोकांचा राग ही करतो आम्ही आमच्या निम्न मध्यमवर्गीय चौकटीमधे राहून. वैषम्य वाटते जेएनयु प्रकारणाचे पण त्याच्यापालिकडे जाऊन काही बोलु शकत नाही आम्ही. काय खरे अन काय खोटे? :( (उद्विग्न स्कॉचप्रेमी) नाना

In reply to by नाना स्कॉच

लेखकाने लिहिल्याप्रमाणे
शहा साहेबांची राजकीय कारकीर्द, आणि एकुणच भाजपाचे पुढील लोकसभा निवडणुकीचे भवितव्य उ.प्र. निकालांवर अवलंबुन असणार आहे. त्याची तयारी म्हणुन आतापासुन एका बाजुने राष्ट्रवादी लाट तयार करणे
जेएनयु प्रकरण हे निव्वळ राजकारणच आहे, राष्ट्रवादी लाट तयार करणे व रोहित वेमुला प्रकरणावरुन लक्श विचलित करन्यचाच ह एक भाग आहे, असे वाटतय.....

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधरजी, लक्ष विचलित करणे तर खरेच..पण रोहित वेमुलावरून का इशरत जहाँ व मेक इन इण्डियावरून? रोहित वेमुलाच्या बाबतीत जशी चौकशी सुरू झाली, तसे सगळे अळीमिळीगुपचिळी करून बसले होतेच.. म्हणजे एक वाद, जो पेटून शांत झालाय, त्याच्यावरून लक्ष विचलित करायला तसाच वाद उकरुन काढणे, हे काय लॉजिक आहे?

In reply to by पिशी अबोली

पिशी अबोलीजी, तुम्ही म्हणता, तसेही असू शकते, कदाचित ( 'इशरत जहाँ' प्रकरणावरून लक्ष विचलित करणे )… तुमचा अंदाज बरोबरही असू शकतो. मी काही कुठल्या पार्टीचा अंध भक्त नाही, की तुमच्या मताला संपूर्णपणे नाकारायला. असो, माझ्या मते, येणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकीत, 'इशरत जहाँ' प्रकरणावरून भा ज प, कॉंग्रेसला फार नुकसान पोहचवू शकेल, असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाहि. उप्र मधे मुलायम व माया ही खरी समस्या असावी शहा पुढे. त्यांना कौंटर करण्यासाठी, शहा कशी खेळी करेल, याचा अंदाजच मी कदाचितच करू शकतो. मायाची सोशल इंजी चा (ब्राम्हण + दलित ) (आठवा : हाथी नही ये गणेश है, ब्रम्हा विष्णू महेश है ) धसका भा ज प ला असावा, कारण भा ज प च्या परंपरागत मतदारांच्या वाट्या मधला वाटा, माया ने मागच्यावेळी पळवला होता. त्यामुळे रोहिथ वेमुला प्रकरणाच्या दाबण्याची निकड भा ज प ला जास्त असावी, असा माझा अंदाज आहे. पण मी वर म्हटल्याप्रमाणे तुमचा अंदाज बरोबरही असू शकतो.

In reply to by पगला गजोधर

कोणती राजकीय मंडळी प्रत्यक्ष विद्यापीठात आली कैह्न्या साठी याचुरी विद्यापीठात व गृहमंत्री भेट आता त्याच्यासठी जेष्ठ वकिलांची फौज सगळे पक्षातर्फे मग हैद्राबाद मध्ये एविबिपि च्या नेत्या साठी स्मृती इराणी ह्यांनी पत्र लिहिले तेव्हा का बोंबा बोंब ह्या प्रकरणात राजकीय फाद्यासाठी अनेक मोदी विरोधक उतरले तेव्हा त्यांना उत्तर द्यायला भाजप पुढे आली मग ह्या घटनेचे राजकीयकरण होणे स्वाभाविक होते

In reply to by पगला गजोधर

मग असंही म्हणता येईल की डेव्हिड हेडली आणि इशरत जहा प्रकरणावरून लक्ष विचलीत करण्यासाठी कोन्ग्रेस ने रचलेला हा डाव आहे.

हो, मलाही अस वाटतंय. बिहार मध्ये मार खाल्ल्यानंतर उ.प्र. ची निवडणूक जिंकणे गरजेच आहे. भारताविरुद्ध घोषणाबाजी झाली ती काश्मीरच्या मुस्लिम विध्यार्थांकडून अस व्हीडीओ दाखवतो. खरे अपराधी शोधण्यापेक्षा निरापराध लोकांना अडकवणे चुकीचे आहे. ठिणगी पडली होती पण लागलेली आग आहे कि नुसताच धूर हे पाहायला हवंय. असच जाता जाता.... 'भारत तेरे तुकडे होंगे' अस म्हटल्यावर आपल्याला खूप राग येतो पण आपणच स्वतंत्र विदर्भ, स्वतंत्र अमक-स्वतंत्र तमक करतो. जाती-धर्माच्या नावाखाली बेट तयार करतो. (कुठलाही एक धर्म किंवा विशिष्ट जातीच अशी बेट तयार करतात अस नाही. सगळेच करतात. आणि 'सेक्युलर' या नावाखाली एका विशिष्ट धर्मालाच झोडपणाऱ्यांचे पण एक वेगळ बेट आहे बर का!) तेव्हा नाही का आपण आपल्या देशाचे तुकडे करत?

In reply to by पूर्वाविवेक

'भारत तेरे तुकडे होंगे' अस म्हटल्यावर आपल्याला खूप राग येतो पण आपणच स्वतंत्र विदर्भ, स्वतंत्र अमक-स्वतंत्र तमक करतो.
शब्दच खुंटले यापुढे. मिपाकरांनो, स्वतंत्र विदर्भ करा ही मागणी ही स्वतंत्र देशाची आहे बरं का. भारत-पाकिस्तान जशी फाळणी झाली होती तशी फाळणी उर्वरीत महाराष्ट्र आणि विदर्भात होणार आहे बरं का.मी नागपूर अजून बघितलेलं नाही.लवकरच बघून यायला हवं, कुणास ठाऊन भविष्यात व्हिसा घेऊन जावे लागेल.
'सेक्युलर' या नावाखाली एका विशिष्ट धर्मालाच झोडपणाऱ्यांचे पण एक वेगळ बेट आहे बर का!
आणि काश्मीरातून एका विशिष्ट धर्माच्या ३ लाख लोकांना नेसत्या वस्त्रानिशी हाकलले गेले तेव्हा तुमच्यासारखे लोक त्यावर काही बोलत नव्हते (हे एक उदाहरण झाले. अशा अनेक घटना आहेत) म्हणून हे वेगळं बेट तयार झाले आहे याकडे तुम्ही सोयीस्करपणे डोळेझाकच करणार. या अशा तिरपागड्या विचार करणार्‍या लोकांमुळेच टोकाचा विचार करणार्‍यांना अधिक समर्थन मिळते. असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

मला माहित आहे मिपा मध्ये खूप खूप हुशार मंडळी आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या सामन्य लोकांच काय. पहिल्यादाच इथे लिहील आहे मी. आपणच स्वतंत्र विदर्भ, स्वतंत्र अमक-स्वतंत्र तमक करतो किंवा जाती-धर्मच राजकारण करतो यातून मला म्हणायचं आहे की आपण आपल्या देशाच्या हिताला/एकीला धोका निर्माण करीत नाही का? आमच्या गावातून बाहेर न पडणाऱ्या माझ्या मनात 'विसा' यासारखे प्रश्न नाही येत बाबा.
या अशा तिरपागड्या विचार करणार्‍या लोकांमुळेच टोकाचा विचार करणार्‍यांना अधिक समर्थन मिळते.
मी अगदी १००% हिंदू आहे. हा धर्म मनापासून मानणारी. मला RSS , भाजप, मोदिजी बद्दलही आदर आहे. हिंदुत्व बद्दल मला किती आदर आहे हे मी तुम्हाला इथे कस दाखवणार. मी स्व:त लिहिलंय की 'सेक्युलर' या नावाखाली एका विशिष्ट धर्मालाच झोडपणाऱ्यांचे पण एक वेगळ बेट आहे. कारण मला हे सेक्यालर लोक अजिबात आवडत नाहीत. त्यांचा दांभिकपण टोचतो मला. आपल्या देशात आपण 'सेक्युलर' आणि पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी हिंदूंचा राग करणे हि फॅशन आहे हे काय मला माहित नाही.अमीर खान, शरद पवार सारखे लोक या बद्दल बोलतात तेव्हा ते किती ढोंगी आहेत हे पण मला माहित आहे. पण एखादा पक्ष आवडतो तर त्यांच्या सर्व गोष्टी बरोबर आहेत अशी मनाची समजूत काढायची का? हीच का लोकशाही?

In reply to by पूर्वाविवेक

आपल्या देशात आपण 'सेक्युलर' आणि पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी हिंदूंचा राग करणे हि फॅशन आहे हे काय मला माहित नाही.अमीर खान, शरद पवार सारखे लोक या बद्दल बोलतात तेव्हा ते किती ढोंगी आहेत हे पण मला माहित आहे.
आणि अश्या ढोंगी लोकांच्या दारासमोर, सत्तेला चिकटून राहण्याच्यासाठी, भविष्यातला पाठींबा मिळवण्यासाठी, ताटकळत उभे राहणारे व त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारे जेटली, बापट, मुख्यमंत्री वैगरे लोकं ही आपल्यापुढील सत्यवान मंडळीची उदाहरणे आहेत. शिवाय आमिर खान ला दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा ब्रांड आंब्यासीटर केला म्हणे मुख्यमंत्री साहेबांनी…. मज्जाय बुवा ….

In reply to by पगला गजोधर

शिवाय आमिर खान ला दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा ब्रांड आंब्यासीटर केला म्हणे मुख्यमंत्री साहेबांनी…. मज्जाय बुवा …. ------------------------------------------------------------- आमिर खान सध्या तरी ब्रांड अ‍ॅम्बॅसीटर नाहीये. संदर्भ :- http://zeenews.india.com/news/maharashtra/aamir-khan-not-to-be-brand-am… बाकि चालू द्या..

In reply to by गॅरी ट्रुमन

नेसत्या वस्त्रानिशी हाकललेले विशिष्ट धर्मांचे ३ लाख लोक कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मानतात का? मी जिथे काम करतो तिथे असलेले येणारे हेच नेसत्या वस्त्रानिशी (अन लाखोत डोनेशन भरून) आलेले लोक अतिशय जास्त वेगळेपण जपताना स्वतः रोज पाहतो, चपराशी ऑफिस क्लर्क ह्यांना हडुतहुडूत करणे, वसतिगृहात 'स्टोण्ड' होऊन 'वीड' ची कौतुके करणे,वगैरे ही सुरु असते. ते जरी वैयक्तिक म्हणून सोडले तरी त्यांना 'भारतीय' राहायचे आहे का नाही हे दोनदा तपासून घेणे हे मला महत्वाचे वाटते. नाहीतर धर्माच्या नादात त्यांना विक्टिम कार्ड आपण द्यावे अन त्याच धर्माचे अविभाज्य अंग असलेल्या अखंड भारत स्वप्नाला सुरुंग लावत त्यांनी फ़क्त आपल्याला वापरुन घ्यावे असे व्हायला नको. अर्थात माझा अनुभव फार सिमित आहे तरीही ह्या डायनामिक वर आपण काही सांगू शकलात तर आनंद होईल

In reply to by नाना स्कॉच

माझा अनुभव तर यापेक्षा वेगळा आहे.आमच्या कॉलेजात प्रत्येक डिसीप्लीनमध्ये काश्मीरी विस्थापित विद्यार्थ्यांसाठी एक जागा राखीव होती.मी कॉलेजात असताना माझ्या वयाचे हे विद्यार्थी होते म्हणजेच १९९० मध्ये स्वतः विस्थापित व्हायची वेळ त्यांच्यावर आली होती.कॉलेजात एकदा एक इव्हेन्ट होता.त्याअंतर्गत शेवटच्या फेरीमध्ये स्टेजवर त्या विद्यार्थ्यांची सर्वांसमोर मुलाखत घेतली जात असे.त्यात सर्वांना एक प्रश्न समान होता--जगातील कुठल्याही देशाला तुम्हाला जाता आले तर तुम्ही कुठल्या देशात जाल आणि का. त्यावर त्या काश्मीरी विद्यार्थ्याने सांगितले--पाकिस्तान. आणि कारण---"I want to tell people of Pakistan that Kashmir will never become part of Pakistan. We will never let it join Pakistan!!" वेगळेपणा जपणे म्हणजे ते स्वतःला भारतीय म्हणवत नाहीत असे म्हणणे जरा अतिशयोक्ती होईल असे वाटते.अर्थात त्या काश्मीरी लोकांची वर्तणूक मी बघितलेली नाही पण वेगळ्या मुलखात असताना गटाने एकत्र राहणे हे प्रकार सगळे जण कधीनाकधी करत असतात. चेन्नईमध्ये एखाद्या ऑफिसात पाचच मराठी लोक असतील तर ते पण आपला गट करून आपले वेगळेपण थोडेफार जपायचा प्रयत्न करत असतील तर ते अगदीच अस्वाभाविक नाही.त्यावरून असे लोक स्वतःला भारतीय म्हणवत नाहीत असे कसे म्हणता येईल? चपराशी क्लार्क यांना वाईट वागणूक देणारे अगदी मराठी लोकही सापडतील.

In reply to by गॅरी ट्रुमन

काश्मीरातून एका विशिष्ट धर्माच्या ३ लाख लोकांना नेसत्या वस्त्रानिशी हाकलले गेले तेव्हा तुमच्यासारखे लोक त्यावर काही बोलत नव्हते.
हो आमच्या सारखे भ्याड, एकी नसलेले हिंदू लोक खूप राग येवूनही या विरुध्द काही बोलले नाहीत. मग तुमच्यासारखे ज्वलंत राष्ट्रवादी काय बोलले बर?

In reply to by पूर्वाविवेक

"आम्ही तेव्हा शाळेत होतो. पेप्रात फार काय येत नव्हते. आम्ही लहान होतो. तेव्हा एवढं काय समजत नव्हते. नंतर आम्हाला सगळे सांगण्यात आले. आमचे ब्रेनवॉशिंग झाले, तेव्हापासून आम्ही सारखं इतरांना तुम्ही काय केले, तुम्ही तेव्हा कुठे होतात असे प्रश्न विचारायला लागलो. हाच तो प्रखर राष्ट्रवाद जो आम्ही फॉलो करतो. फेसबुक, ट्वीटरवर."

In reply to by पूर्वाविवेक

फक्त स्वतंत्र विदर्भ चा उलेख केला...कळले नाही बुवा!! अन्याय आहे हा विदर्भावर...

वर विश्लेषण करणारे प्रतिसाद देणार्‍यांपैकी किती जणांनी कलकत्त्याच्या जादवपूर विद्यापिठातील देश विरोधी घोषणांची बातमी वाचली अथवा ऐकली आहे ? माहिती असेल तर ते तुम्ही तुमच्या विश्लेषणात कसे बसवता ?

In reply to by माहितगार

घोषणांच्या विडियोतल्या मुलांचे लिपसिन्किन्ग म्याच होत नाही. ऑडियोत जे ऐकायला येत आहे ते व प्रत्यक्ष जे ओरडल्याजात आहे ते दोन्ही वेगळे भासत आहे.

In reply to by तर्राट जोकर

घोषणांच्या विडियोतल्या मुलांचे लिपसिन्किन्ग म्याच होत नाही. ऑडियोत जे ऐकायला येत आहे ते व प्रत्यक्ष जे ओरडल्याजात आहे ते दोन्ही वेगळे भासत आहे. ज ब रा ट जेएनयु च्या बाबतित आपले निरिक्षण काय आहे..का तो व्हिडियो दुरुन काढला आहे किंवा ते हरामखोर कदाचित वंदे मातरम किंवा भारत माता कि जय म्हणत असावेत आणि मोदींनि नंतर त्याच्यात चेंजेस करुन "अफझल हम शरमिंदा है तेरे कातिल जिंदा है" किंवा "भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह" ह्या घोषणा टाकल्या असाव्यात.

In reply to by तर्राट जोकर

नाहि मि कुठे म्हणालो तसे. पण जर लिपसिंक मॅच होत नाहिये म्हणजे हे " सरकार ने काहि निरपराध विद्यार्थ्यांना फसवण्याकरता मिडियाला हाताशि धरुन केलेल कारस्थान आहे" असे काहि विधान ह्यावर येवु शकतात, आता सरकार म्हणजे कोण "वो मोदि ने किया है" ** त्यामुळे मला तिथे मोदिंचा उल्लेख करावा लागला. ऑफिस मध्ये तुम्हि उल्लेख केलेला व्हिडीयो नाहि पाहता येणात, पण देशद्रोहि, हरामखोर लोकांना बेनेफिट ऑफ डाउट चा सुद्धा फायदा मिळायला नको असे मला वाटते, संदिप म्हणाला तसे रणगाडे सुद्धा नकोत जिलेटिन च्या काड्या ठासुन ह्यांना तिथेच ह्यांनि जिथे नारे दिलेत तिथे उडवायला हवे. युट्युब ला मि असे किति तरि व्हिडिओ दाखउ शकतो जिथे भारतात झालेल्या कित्येक आतंकवादि हल्ल्या मागे पाकिस्तान नसुन खुद्द भारत सरकारच हे घडवुन आणतेय हे सांगण्यात आलय 'लोल'. पाकिस्तान सरकार ने सुद्धा भारताचा कुठलाहि पुरावा आजपर्यंत मान्य केला नाहिये. ह्यावर आपले मत वाचायला आवडेल. ** देशाच्या पंतप्रधानानां एकेरित उल्लेखणारे महाभाग दिल्लि तच आहेत, सरपंच व्हायचि लायकि नाहिये पण मुख्यमंत्रि होउन बस्लेयत.

In reply to by होबासराव

पण जर लिपसिंक मॅच होत नाहिये म्हणजे हे " सरकार ने काहि निरपराध विद्यार्थ्यांना फसवण्याकरता मिडियाला हाताशि धरुन केलेल कारस्थान आहे" असे काहि विधान ह्यावर येवु शकतात, आता सरकार म्हणजे कोण "वो मोदि ने किया है" ** त्यामुळे मला तिथे मोदिंचा उल्लेख करावा लागला. >> दादा, गेम असेल तर मोठाच असेल. फक्त मोदीच का, अमित शहा आहे, संघही आहेच. दुसर्‍या बाजुने गेम असेल तर काँग्रेससोबत कम्युनिस्ट पलटण आहे, तिसर्‍या बाजूने अमेरिका, चीनही आहेत. मी फक्त विडियो डॉक्टर्ड आहे असे बोललोय तो सरकारनेच केला असे नाही म्हणत. सध्या बुद्धीबळाचा गेम सुरु आहे. सरकार आणि भक्त ह्या गेममधे धूर्त चाली खेळायच्या ऐवजी लाठीकाठी घेऊन उतरलेत इतके बिघडले.

In reply to by होबासराव

युट्युब ला मि असे किति तरि व्हिडिओ दाखउ शकतो जिथे भारतात झालेल्या कित्येक आतंकवादि हल्ल्या मागे पाकिस्तान नसुन खुद्द भारत सरकारच हे घडवुन आणतेय हे सांगण्यात आलय 'लोल'. पाकिस्तान सरकार ने सुद्धा भारताचा कुठलाहि पुरावा आजपर्यंत मान्य केला नाहिये. ह्यावर आपले मत वाचायला आवडेल. >> प्रस्तुत विडियो न पाहता इतर विडियोबद्दल आताच बोलणे योग्य वाटत नाही. कन्हयाचा झीने दाखवलेला डॉक्टर्ड विडियो आणि खरा विडियो ह्यात ख्हुप फरक आहे. तो काय आहे हे वरच्या रिपोर्ट मधे आहे.

In reply to by तर्राट जोकर

कारण आहे. अनेकदा व्हिडीयो क्लिप्स अपलोड केल्या जातात तेव्हा सुमार कोडेकच्या वापरामुळे लिपसिंक बिघडू शकते. उदा. यू ट्यूबवरील अनेक जुन्या हिंदी गाण्यांच्या क्लिप्समधे (ज्या कुणीही, सर्वसाधारण इसमांनी अपलोड केलेल्या आहेत, अशा) हे प्रकर्षाने दिसून येते.

In reply to by प्रदीप

यू ट्यूब, अपलोड केलेले सर्व काही VP9 मधे ट्रान्सकोड करते. काही बिघाड तेथेही येऊ शकतो.

In reply to by प्रदीप

सदर विडियो न्युज चॅनेलने अपलोड केलेला आहे. त्यांचे इतर विडियो नीट आहेत. इवन अ‍ॅन्करचे अ‍ॅन्करिंग लिप्सिंकिंगमधे चुकलेले नाही. फक्त विडियोतल्या मोर्च्यात घोषणादेनार्‍या मुलांचे चुकलेले आहे.

In reply to by माहितगार

तीन विडियो मिळाले, ज्यात फक्त झी न्युजच्या विडियोत लिपसिन्किंग म्याच होत आहे. माझे मत पहिल्या विडियोवर आधारित होते. झी न्युजच्या विडियोत स्पष्ट होत आहे. ह्या घोषणा मोदीसरकार, आरएसएसविरोधी आहे. पण कश्मिर मांगे, अफ्झल मांगे, मणिपूर मांगे आझादी हा काय प्रकार आहे ते कळत नाही. कश्मिर आणि मणिपूर ह्यांमधे स्पेशल फोर्सेस अ‍ॅक्ट का काय आहे त्याबद्दल ह्या घोषणा आहेत काय? कारण कश्मिर आणि अफझल समजले पण मणिपूर मांगे आझादी हे काय पचले नाही. ह्या प्रकरणाची योग्य ती चौकशी होऊन सत्य समोर यायला हवे.

In reply to by तर्राट जोकर

कन्हयाकुमारबद्दल नाही. जादवपुरविद्यापिठाच्या मोर्च्याबद्दल आहे.
प्रकरण सुरवातीला अभ्यासतानाच मी माझ्या माझ्यापुरत्ता कन्हैय्या कुमारला बेनीफीट ऑफ डाऊट दिलेला, डिएसयू वेगळी आहे तिची चर्चा वेगळी करू, पण जिथपर्यंत कलकत्त्याच्या जादवपूरच्या विद्यार्थ्यांचा संबंध आहे ज्यांनी घोषणा दिल्या त्यांनी पत्रकांराशी तसे स्विकारल्याची वेगवेगळी वृत्ते वाचण्यात आली आहेत (तिथल्या टेलिग्राफने जादवपूर बातमी जवळपास दाबलीच आहे) अर्थात त्यांनी घोषणा आजादी म्हणून दिल्या आणि पत्रकारांनी विचारल्यावर भाजपापासून का काय आजादी असा अर्थ होतो असा फिरवा फिरवीचा प्रयत्न केल्याचे दिसते. दिल्लीतला खरा प्रॉब्लेम बहुधा डिएसयु ने वापरलेल्या नाटकासाठी -जे प्रत्यक्षात परवानगी न मिळालेल्या- वापरलेल्या भाषेत असावयास हवा ज्यात 'ज्युडीशिअल किलींग' असा काठावरचा शब्द प्रयोग जाणीव पुर्वक केलेला असावा, प्रत्येक फाशी एका अर्थाने न्यायालयाने अ‍ॅप्रुव्ह केलेले किलींग असते पण याच शब्दांचा दुसरा अर्थ न्यायालयाने निरपराधांचा केलेली हत्या असे पोर्टेट करण्याचा प्रयत्न साधू इच्छितो का अशि साशंकता वाटते आणि भारतीय न्यायव्यवस्थेला बीरेट करणे हा उद्देश अधिक धोका दायक वाटतो.-खरी केस त्या उमरवर न्यायालयाच्या अवमाननेबद्दल तपासली जावयास हवी होती का अशी शंका वाटते- अशा प्रकारे रिप्रेझेंट केले की उद्देश बदलतो आणि असा वेगळा उद्देश नसता तर नाटकाचा घाट घातला नसता, डिएसयु चा नाटक रचणारा जो म्होरक्या उमर खालिद आहे त्याचे वडील जमाते इस्लामी का काय चे नेते असावेत. या जमाते इस्लामीचा केरळात अधिक प्रभाव आहे. आमेरीका विरोधाच्या मुद्द्यावर डावे आणि जमाते इस्लामीचे एकमत असल्यामुळे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. या उमर खालिदची मार्गदर्शिका दिल्ली विद्यापीठातली 'लाहिरी' नावाची प्राध्यापिका कट्टर डाव्या विचारांची असावी. हि डिएसयू सुधा माओवादी टोकाचे कट्टर प्रकरण असावे. चुभूदेघे. कन्हैय्याकुमार प्रकारामुळे खर्‍या असवयास असलेल्या मुद्यावरून लक्ष भरकटले आहे असे वाटते.

In reply to by माहितगार

दिल्लीतला खरा प्रॉब्लेम बहुधा डिएसयु ने वापरलेल्या नाटकासाठी -जे प्रत्यक्षात परवानगी न मिळालेल्या- वापरलेल्या भाषेत असावयास हवा ज्यात 'ज्युडीशिअल किलींग' असा काठावरचा शब्द प्रयोग जाणीव पुर्वक केलेला असावा....खरी केस त्या उमरवर न्यायालयाच्या अवमाननेबद्दल तपासली जावयास हवी होती का अशी शंका वाटते
उशिराने का होईना कुणालातरी न्यायालयाच्या अवमान होत असल्याच्या शक्यते बद्दल जाग आली असे दिसते. या विद्यर्थ्यांवर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस एका वकिलाने दाखल केल्याची बातमी आहे. हे आधी केले असते तर भाजपाला टिकेस तोंड देणे अधिक सुलभ गेले असते किंवा कसे.

पुण्याच्या फिल्म इंस्टिट्युटमधला संप, असहिष्णुता प्रकरण, वेमुला केस, आणि आता जे.एन.यु. आपले (फॉर दॅट मॅटर कुठलेही) राजकारण हीन पातळीवर(सुद्धा) चालते हे आपण बघतोच. पण सरकार विरुद्ध घटनांची एक लांबलचक मालिका चालावी, अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने, असा काहिसा प्रयत्न चालला आहे का?
इन जनरल तसेच वाटते.रोहित वेमुलापूर्वी हैद्राबाद विद्यापीठातच गेल्या १० वर्षात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या आणि त्यापैकी ८ विद्यार्थी दलित होते. अर्थातच जातीवरून अन्याय झाला यामुळे अगदी एका विद्यार्थ्याची आत्महत्या होणे हे वाईटच आहे.पण यावेळी या घटनेला इतका मोठे स्वरूप दिले गेले यामागे नक्कीच घाणेरडे राजकारण आहे असे वाटायला नक्कीच जागा आहे. बाकी असहिष्णुता आणि पुरस्कार वापसी म्हणाल तर हे उद्योग करणारे लोक किती ढोंगी आहेत याविषयी इथे लिहिले आहे. चाटुगिरीकरून पुरस्कार मिळविणारे हे लोक मोदी सरकारने यांच्या साम्राज्यावर घाला घालायला सुरवात केली आहे (उदाहरणार्थ नंदिता दासच्या वडिलांना कित्येक वर्षापासून तळ ठोकून असलेला सरकारी बंगला सोडायला सांगणे आणि त्यानंतर 'भारतात असहिष्णुता वाढीस लागली आहे' असे तिने म्हणणे) यामुळे हे लोक पिसाळले आहेत आणि त्यांनी असहिष्णुतेचा बागुलबोवा उभा केला आहे. आपण कितीही म्हणत असलो की भारत देश आणि भारतीय समाज सहिष्णु आहे तरी आपण जितका दावा करतो तितके सहिष्णु वगैरे अजिबात नाही. पण हे लोक असे चित्र उभे करत आहेत की मोदी सरकार आल्यानंतर एकाएकी असहिष्णुता आली आहे. हा सगळा एका रॅकेटचाच भाग आहे असे मलाही वाटते.

भारतातले राजकारण, हा दिवसेंदिवस क्रूर होत जाणारा साठमारीचा खेळ झाला आहे. त्यांत कोणाचाही जीव, प्रतिष्ठा, देशहित, याचा जराही विचार केला जात नाही. कसंही करुन सत्ता मिळवायची आणि ती त्याच पद्धतीने टिकवायची असा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न असतो. आणि ज्यांच्या हातची ही सत्तेची दुभती गाय गेली आहे, तेही वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करुन ती सत्ता परत मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. यांत, सामान्य जनता, विद्यार्थी, संघटना , यांचा केवळ प्यादी म्हणून उपयोग केला जातो. त्यासाठी कसलाही विधिनिषेध नसलेल्या मिडियालाही उतरवले जाते. तेही ज्याचा पट्टा गळ्यांत घातला असेल त्याच्या वतीने खर्‍याखोट्याची बेमालुम भेसळ करत जनतेला झुलवत ठेवतात. ज्यांना हा खेळ कळतो, ते असहायपणे गप्प बसतात. तर इतर त्यावर चर्चा करत बसतात.

या विषयावर बरीच मंडळी प्रतिक्रिया देताएत. राजदीप सरदेसाई यांनी एक ब्लोग पोस्त लिहिलीये जी बर्यापैकी ट्रेंड करतेय. पण बर्याच लोकांनी यात नथुराम गोडसे ,गांधी आणि हिंदू महासभा यांचा उल्लेख केलाय. का ते कळत नाहीये. सरकार ने या प्रकरणात हात घालून उगाच याला मोठ केलय आणि बर्याच मंडळीना रातोरात सेलेब्रिटी बनवल अस वाटू लागलय.

पुढे नाहि वाचल्या गेले :) ह्याने तर पार लंडन मध्ये भारतियांचे रट्टे खाल्लेयत, चुक त्याचि होति तो मुद्दामच लोकांना उचकावत होता. ह्याचा चेला पिखिल पागळे दिसत नाहि इतक्यात कोठे ;)

In reply to by होबासराव

होबासराव, लंडन नाही हो न्यूयॉर्कमध्ये हाणला त्या सरदेसायाला. लंडनमध्ये झालं असतं तर माझी एखादी एक लाथ खाऊन शहाणा झाला असता. पण काये की त्याच्या ललाटी सुधारणाच नाही ना! ;-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

लंडनमध्ये झालं असतं तर माझी एखादी एक लाथ खाऊन शहाणा झाला असता
आणि पैलवानाची लाथ म्हणजे खरोखरच पॉवरफुल असती :) ह.घ्या.हे.वे.सां.न.ला

असहिष्णुतेचे कंत्राट काही भाजपने घेतलेले नाही. भाजपविरोधी असलेल्या आणि उदारमतवादाचा आव आणणाऱ्या प्रत्येक पक्षाने आणि व्यक्तीने वेळोवेळी टोकाची असहिष्णुता दाखवलेली आहे. आता भाजप सत्तेवर असल्यामुळे इतर सर्वांच्या xxxवर लाथा बसत आहेत, इतकेच. राहुलबाबांना सांगा सलमान रश्दींचे पुस्तक भर सभेत वाचून दाखवायला. ममतादींना म्हणा तस्लिमाबरोबर फोटो काढून घ्यायला. ओवेसींना सांगा मोहम्मदाची व्यंगचित्रे बनवणाऱ्या चित्रकाराचे हक्क जपायला. पवारांना सांगा जेम्स लेनला संरक्षण द्यायला. मायावतींना म्हणा आंबेडकरांवर टीका करणारे पुस्तक छापायला. सिद्धरामय्यांना आणि जयललितांना सांगा 'मराठी टायगर' आणि 'विश्वरूपम' सिनेमे प्रदर्शित होऊ द्यायला.

बरखा दत्तला सांगा त्या ब्लॉगरवरची केस मागे घ्यायला. कराटना म्हणा नंदीग्राममधे बंदुका चालवणाऱ्या पोलिसांवर खटले भरायला. मेहबूबा आणि अब्दुल्लांना सांगा काश्मीरबाहेरच्या भारतीयांवरची बंदी उठवायला. --- आहे का कुणी शिल्लक..?

नवी दिल्लीच्या महरौली-वसंतकुंज भागात वसलेलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU सध्या देशभरात चर्चेचा विषय बनलं आहे. अर्थात ते आधी चर्चेचा विषय नव्हतं अशातला भाग नाही. ह्या वर्षात पहिल्यांदा चर्चेत राहिलं ते केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने उच्चशिक्षणासाठी फेलोशिप बंद केल्याच्या विरोधात “Occupy UGC” ह्या आंदोलनाबद्दल; दुसऱ्यांदा चर्चेत आलं ते हैदराबाद सेन्ट्रल विद्यापीठाच्या रोहीथ वेम्युला आत्महत्या (?) प्रकरणात केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयावर नेलेल्या मोर्चाबद्दल; तिसरा मुद्दा, दि. ९ फेब्रुवारीच्या संध्याकाळी JNU कैम्पसमध्ये झालेल्या देशविरोधी घोषणाबाजीमुळे. ९ फेब्रुवारी ते आज १७ फेब्रुवारी ह्या गेल्या आठ दिवसात उतावळ्या मिडिया ट्रायल्समधून भारतातील सर्वांत नामांकित विद्यापीठ म्हणून लौकिक असलेली जनमानसातील प्रतिमा जावून ‘दहशतवाद्यांचा अड्डा’ अशी झाली. देशात राहणाऱ्या प्रत्येकाला मत मांडण्याचा, प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे त्यानुसार अनेकांनी राष्ट्रीय भावनिक लाटेवर स्वार होत मिडिया ट्रायल्सच्या ‘ओ’ला ‘हो’ जोडत JNU बंद करा म्हणून तगादा लावला. प्रथमदर्शनी या संपूर्ण प्रकाराबाबत एक संदिग्धता वाटत होती, मिडीयात ज्या अविवेकी पद्धतीने JNU बाबत वक्तव्ये होत होती (आजही-आताही होत आहेत) त्यामुळे त्या संदिग्धतेला बळकटी प्राप्त होत होती म्हणून शेवटी संपूर्ण प्रकरण समजावून घेण्यासाठी पुन्हा JNU गाठलं, ९ तारखेच्या घटनेपासून परवाच्या पटियाला हाऊस कोर्ट मारहाण प्रकरणाच्या अनेक प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांशी चर्चा केली; त्याचा हा ‘ग्राउंड झिरो रिपोर्ट’! मागच्या काही महिन्यांपूर्वी JNU कैम्पस मधील DSF (डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन) मधून काही विद्यार्थी वैचारिक मतभेदांमुळे बाहेर पडले, ज्यात ओमर खालिद पण होता. दि. ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता साबरमती हॉस्टेलसमोरील पटांगणावर ओमर खालिद आणि त्याच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी “Country without Post Office” हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता ज्यात ‘Debate on Judicial Killing’ हा एक वादविवादाचा मुद्दा ठेवण्यात आला होता. विद्यापीठाच्या नियमानुसार अटींची पूर्तता करण्याचे वचन देवून दि. ७ रोजी सकाळी कुलगुरूंच्या कार्यालयातून या कार्यक्रमाला परवानगी दिली गेली. त्याच दिवशी दुपारपर्यंत ह्या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या आठ ते नऊ विद्यार्थ्यांच्या नाव आणि सहीचे प्रसिद्धीपत्रक JNU मध्ये वाटले गेले. (‘Country without Post Office’ हा काश्मीरी वंशाचे अमेरिकन कवी आगा शाहीद अली यांचा कवितासंग्रह आहे.) कार्यक्रम सुरु होण्याच्या एक तास आधी कुलगुरू कार्यालयातून हा कार्यक्रम रद्द करण्याची सूचना आली, आयोजकांनी कुलगुरूंना याबाबत विचारणा केली असता ABVP ने यासंदर्भात तक्रार केली असल्याचे निष्पन्न झाले. यावर कुलगुरू कार्यालयातून एक कारण देण्यात आले ते म्हणजे ‘ह्या कार्यक्रमादरम्यान अनुचित प्रकार घडण्याची संभावना आहे, यामुळे परवानगी नाकारण्यात येत आहे.’ पाच वाजता कार्यक्रमाच्या नियोजीत स्थळी जमलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना तयार झाली आणि त्यांनी त्यांच्या विशिष्ट पद्धतीने शिट्ट्या मारत झालेल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त करायला सुरुवात केली. त्याचवेळी तेथे आधीपासून उपस्थित असलेल्या ABVPच्या गटातून “अफजल जैसी मौत मरा, तुम्हें भी वैसी मौत मारेंगे”, “कश्मीरी देश के गद्दार है, उन्हें पाकिस्तान भेजो” अशी घोषणाबाजी झाली. प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार काश्मिरी गटात आणि ABVP अशा दोन्हीही गटात Non-JNU विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. वेळ पुढे सरकत होती तशी वातावरणातील तनाव वाढत होता. त्यानंतर कश्मीरी विद्यार्थ्यांच्या गटातून घोषणाबाजी झाली “अफजल हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है!”, “भारत की बरबादी तक, जंग हमारी जारी रहेगी”.... ह्या उत्तर-प्रत्युत्तराच्या घोषणाबाजीनंतर काही काश्मिरी विद्यार्थी आणि काही अभाविप कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. तेथे उपस्थित असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आणि JNUSU कौन्सिलर्सनी ह्या दोन्ही पक्षातील विद्यार्थ्यांना घोषणाबाजी रोखण्याची विनंती केली. हा सगळा मुद्दा संपूर्ण भारतात मिडीयाने व्हिडीओसकट पोहोचवला. साबरमती हॉस्टेल पटांगणावर झालेल्या ह्या प्रकारानंतर सर्वांत पहिल्यांदा रिपोर्ट्स आले ते ‘झी न्यूज’ आणि ‘आज तक’वर. प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार दुपारच्या चार वाजेपासूनच त्या ठिकाणी या वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे तैनात होते. वर उल्लेख केलेल्या वृत्तवाहिन्यांसहित सर्वच ‘पान टपरी छाप’ वृत्तवाहिन्यांच्या मिडिया ट्रायल्समधून सरसकट संपूर्ण JNU ला एका रात्रीत ‘आतंकवादी’ जाहीर करण्यात आलं. यानंतर मुद्दा उठतो तो JNUSU चा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या अटकेचा... पहिल्यांदा JNUSU काय आहे हे समजून घेवूयात. आपल्या शाळां आणि कॉलेजेसमध्ये जसे विद्यार्थी मंत्रीमंडळ असते तसंच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यापीठाच्या अधिष्ठातांच्या (Dean) कार्यकक्षेअंतर्गत JNUSU- Jawaharlal Nehru University Students’ Union ही अस्थायी संघटना बनवली आहे. चार मुख्य पदाधिकारी आणि विविध विभागांचे (Schools) ३० कौन्सिलर्स असे मिळून सुमारे ३४ सदस्यांची दरवर्षी विद्यार्थ्यांमधून खुल्या निवडणुकांच्या माध्यमातून सदर संघटनेवर निवड करण्यात येते. JNU च्या आवारातील राजकीय-सामाजिक आणि वैचारिक वातावरण निकोप ठेवण्याची नैतिक जबाबदारी ह्या विद्यार्थी प्रतिनिधींवर असते. सन १९६९ पासून आजपर्यंतच्या ५७ वर्षांच्या इतिहासात JNUSU वर नेहमीच डाव्या विचारसरणीच्या AISF- All India Students’ Federation, AISA- All India Students’ Union, SFI- Students’ Federation of India ह्या संघटनांचे वर्चस्व राहिले आहे. विद्यापीठात कॉंग्रेस प्रणीत NSUI- National Students’ Union of India आणि भाजपा प्रणीत ABVP- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचे नाममात्र अस्तित्व आहे. JNUSU च्या चार मुख्य पदाधिकाऱ्यांपैकी अध्यक्ष कन्हैया कुमार हा AISF चा, उपाध्यक्ष शेहला रशीद आणि मुख्य सचिव नागाजी हे दोघेही AISA आणि सहसचिव सौरभ शर्मा हा ABVP चा सदस्य आहे. ९ फेब्रुवारीची घटना घडली त्याठिकाणी म्हणजे साबरमती हॉस्टेल परिसरात कन्हैयाकुमार आपल्या साथीदारांसोबत सहा-साडे सहाच्या दरम्यान पोहोचला, आपली नैतिक जबाबदारी ओळखून त्याने दोन्हीही पक्षाच्या विद्यार्थ्यांना घोषणाबाजी बंद करण्याची विनंती केली. JNUSU चे कौन्सिलर्स तसेच काही प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. साडे पाच ते साडे सात दरम्यान जे काही घडलं ते वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरा मध्ये टिपलं गेलं आहे. जे स्क्रीनवर पूर्ण आवाजात आणि अनकट स्वरूपात दिसतंय ते सत्य आहे. आणि जर व्हिडीओचा ऑडीओ म्युट न करता, व्हाईसओव्हर न करता ऐकवलं जात असेल तर तेही सत्य आहे. JNU च्या नियमांनुसार कुलगुरूंना मागेल त्याला कार्यक्रमाची परवानगी देणे बंधनकारक आहे, हे आजपासून नव्हे तर विद्यापीठाच्या स्थापनेपासूनची अखंडित संकेत वा परंपरा आहे. ‘Country without Post Office’ ची परवानगी का नाकारली याची विचारणा कन्हैयाने देखील केली असं काही विद्यार्थ्यांचं म्हणनं आहे. अर्थात त्याच्या जबाबदारी आणि कर्तव्याचा भाग आहे. कुलगुरू कार्यालयातून मिळालेल्या उत्तराने काश्मिरी विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही आणि त्यातल्या त्यात ABVP च्या तक्रारीवरून आपल्याविरोधात सूडभावनेने निर्णय घेतला गेला अशी काश्मिरी विद्यार्थ्यांची धारणा झाली. वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामागे उभे असलेल्या ABVP च्या कार्यकर्त्यांनी काश्मिरी जनतेविरोधात आणि अफजल गुरु विरोधात घोषणाबाजी केली आणि वादाची ठिणगी पडली, हे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनीही सांगितले आणि मिडिया फुटेजमधूनही स्पष्ट होत आहे. JNU मधील School of Historical Studies मधून M. Phil. करणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितलं की कुलगुरू कार्यालयाने JNUSU च्या कौन्सिलर्सला कारण देताना सांगण्यात आलं की, “JNU के इन्टेलिजेन्स के अनुसार कोई बड़ी अनुचित घटना की आशंका जताई गई है और उसी के आधारपर सावधानी के तौर पर इस प्रोग्रामकी अनुमती रद्द कर दी गई..” मी या विद्यार्थ्याला विचारलं की, “क्या आपने इससे पहले ऐसा रिज़न कभी सुना है जे.एन.यू. में ?” तर यावर त्याने मानेने नकार दिला पुढे आश्चर्य व्यक्त केलं की “JNU इन्टेलिजेन्स नामकी चीज मै पहलीबार सून रहा हुं.” घटना घडली ती रात्र, दुसरा, तिसरा दिवस आणि तिसऱ्या रात्रीच्या बारा वाजेपर्यंत कन्हैया कुमार, शेहला रशीद, नागजी आणि सौरभ शर्मा हे JNU च्या आवारातून वा वृत्तवाहिन्यांच्या स्टुडीओ मधून मिडिया ट्रायल्सला सामोरे जात होते. यासर्व घटना घडत असतानाच गेल्या १८ दिवसांपासून ‘Justice for Rohith’ हे आंदोलन सुरु होते, या आंदोलनाचा भाग म्हणून सुमारे दहा ते बारा विद्यार्थी उपोषणाला बसले होते. दि. ११ फेब्रुवारीच्या संध्याकाळी कन्हैयाने मिडिया ट्रायल्स मधून JNU च्या करण्यात आलेल्या मानहानीबाबत निंदा केली आणि देशद्रोही घोषणाबाजीच्या विरोधात त्याची आणि JNUSU ची भूमिका स्पष्ट केली. दुसऱ्या दिवशी दि. १२ रोजी सकाळी कन्हैयाचे भाषण व्हायरल झाले. दि. १२ फेब्रुवारी पर्यंत कन्हैया, शेहला, नागजी आणि सौरभ हे चौघे मिडियामध्ये आपापल्या भूमिका मांडत असताना ज्यांच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला ते काश्मिरी विद्यार्थी कुठे गेले? दि. ९ आणि १० रोजी ओमर खालिद आणि काही काश्मिरी विद्यार्थी आपले मत मांडण्यासाठी वृत्तवाहिन्यांच्या विनंतीवरून डिबेटमध्ये सहभागी झाले त्यावेळी अर्नब गोस्वामी, दीपक चौरसिया, सरदाना इ. यांच्या एकांगी भोकाडबाजीमुळे घोषणाबाजीबाबत मत मांडायला कश्मीरी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळू शकला नाही, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता फक्त भावनिक आवरण चढवून त्यांना दहशतवादी ठरवण्याचा फार्स करण्यात आला म्हणून त्यांनी दि. ११ पासून कुठल्याही मिडीयाला कुठल्याही प्रकारे सामोरे न जाण्याचा निर्णय घेतला. १२ तारखेला दिल्ली पूर्व चे भाजपा खासदार महेश गिरी यांनी ‘JNU हा दहशतवाद्यांचा अड्डा आहे’ अशी FIR दाखल करत केंद्राकडून कठोर कारवाईची विनंती केली. याआधी दोन आंदोलनांत JNUच्या विद्यार्थ्यांनी मानव संसाधन विकास मंत्रालयाला टार्गेट केले होते, १२ तारखेलाच स्मृती इराणी यांनी JNU संदर्भात जाहीर वक्तव्य केले; आणि गेल्या चार दिवसांपासून मिडिया जाणीवपूर्वक अतार्किक आणि अतांत्रिक मुद्दे पुढे करत JNUची आणि विशेषतः डाव्या विद्यार्थी संघटनांची बदनामी करत होती, त्यावरून १२ तारखेच्या संध्याकाळी JNUमध्ये पोलीस अटकसत्र राबवू शकते अशी कुणकुण AISA, SFI आणि AISFच्या कार्यकर्त्यांना लागली होती. AISF वगळता सगळे सक्रीय कौन्सिलर्स आणि कार्यकर्ते JNUमधून बाहेर पडले. काहींनी कन्हैयालाही बाहेर जाण्याचा सल्ला दिला, पण ज्यात आपली काही चूक नाही त्या लफड्यापासून दूर का पळावं म्हणून तो कैम्पसमधेच थांबला. १३ तारखेच्या पहाटे २ वाजता कन्हैयाला पोलिसांनी अटक केली. रात्रीच्या दोन वाजता कोणतेही राजशिष्टाचार न पाळता महिला-पुरुष होस्टेल्सची झडती घेण्यात आली. कैम्पसमध्ये असलेल्या कोणत्याही डाव्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्याला अटक न करता फक्त कन्हैयाकुमारला अटक करण्यात आली. प्रथमदर्शनी घटनाक्रमातून काही प्रश्न उपस्थित होतात, - देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या, ज्यांच्या कार्यक्रमात आणि ज्यांनी फूस लावून हा प्रकार घडवून आणला त्या ओमार खालिद व कंपनी आणि ABVP यांना अटक न करता कन्हैया कुमारला का अटक करण्यात आली? - ‘Country without Post Office’ ह्या कार्यक्रमात Non-JNU काश्मिरी विद्यार्थी सहभागी होवून कायदा- सुव्यवस्था आणि सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होईल म्हणून ABVPने कुलगुरूंकडे तक्रार केली, पण ABVPच्या गटात देखील Non-JNU चेहरे होते त्यांना कोणतं लेबल लावायचं? - रात्रीच्या दोन वाजता देशाच्या एका प्रीमिअर इंस्टीट्युटमध्ये सर्व प्रोटोकॉल्स धाब्यावर बसवून एका विद्यार्थी प्रतिनिधीला अटक करण्यात येते, विद्यापीठ यंत्रणेने यात काहीच हस्तक्षेप करू नये? (डॉ. पार्थसारथी कुलगुरू असताना आणीबाणीच्या काळातही त्यांनी पोलिसांना विद्यापीठाच्या आत येण्यास मज्जाव करून विद्यापीठात घडणाऱ्या कुठल्याही घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारण्याची भूमिका घेतली होती.) JNU च्या ४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कैम्पसमध्ये पोलीस येवून विद्यार्थ्याला अटक झाली. - राष्ट्रीय मिडियातून JNUची बदनामी होत असताना त्याविरोधात किमान स्टेटमेंट देण्याची साधनसुचिता कुलगुरूंना अथवा विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणेला पाळता आली नाही का? हे प्रश्न JNUच्या सामान्य विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. कन्हैयावर लावलेले गुन्हे न्यायालयाने अमान्य केले आहेत. कोर्टातील गुंडांनी, भाजपा आमदार व त्याच्या समर्थकांनी केलेली मारहाण, कायदा हातात घेण्याची भाषा आणि दुसरीकडे अगदी सुरुवातीपासून भारतीय संविधानावर आपला अगाध विश्वास असल्याचा कन्हैया करत असलेला दावा बघता, आणि तो ज्या पद्धतीने या सर्व कार्यवाहीला सामोरा जात आहे त्यातून त्याची आणि एकुणात JNUची प्रतिमा उजळ होत आहे. कन्हैयाला अटक झाल्यानंतर ओमर खालिद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कैम्पसमधून काढता पाय घेतला. ह्या घटनेचे मूळ जिथे आहे त्यावर नजर फिरवली तर कन्हैया ची अटक ही अतार्किक आहे हे सामान्य बुद्धिमत्तेचा कोणताही व्यक्ती मान्य करेल. कन्हैयाला अटक झाल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्याने विधान केले की “कन्हैयाला हाफिज सईदचा पाठींबा आहे.” दोन दिवसांपूर्वी भारताच्या गुप्तेहेर यंत्रणेने (IB) भारत सरकारला दिलेल्या अहवालानुसार कन्हैयाचे हाफिज सईदशी कुठलेही धागेदोरे मिळत नाहीयेत. ह्या अहवालासोबतच अजून एक अहवाल सरकारला सादर करण्यात आला त्यानुसार ओमर खालिदला काश्मीरमधील जैश-ए-महोम्मद या फुटीरतावादी संघटनेचा पाठींबा आहे, तर हा दुसरा अहवाल सरकारने अमान्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भारत सरकारने कन्हैयाच्या अटकेसाठी केलेला आततायीपणा आणि दुसरीकडे ओमर खलीदच्या बाबतीत घेत असलेला बचावात्मक पावित्रा स्पष्टपणे सरकारच्या अथवा सरकार चालवणाऱ्यांच्या ‘motives’ला अधोरेखित करत आहे. - ‘जैश-ए-महोम्मद’ या संघटनेचे जम्मू आणि काश्मीर राज्यातील बहुमतातील PDP ह्या पक्षाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. - एकीकडे राष्ट्रवादाचा नारा देत भाजपाने जम्मू आणि काश्मीरमध्ये PDP ह्या फुटीरतावादी पक्षाशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती. - जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महोम्मद यांच्या निधनानंतर राज्यात नवीन सरकार बनले नाहीये, आणि मेहबूबा मुफ्ती सरकार स्थापनेबाबत कोणताही ठोस संकेत देत नाहीयेत त्यामुळे दिवसेंदिवस भाजपा गटातील चुळबुळ वाढत आहे. - JNUचा विद्यार्थी ओमर खालिद (ज्याचे ‘जैश-ए-महोम्मद’सोबत संबंध असल्याचा IBचा रिपोर्ट होता) त्याला अटक झाली तर जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपाविरोधात जनमत तयार होऊन PDPसोबतच्या सत्तेच्या वाटाघाटी फिस्कटू शकतात. - ओमरला अटक झाली तर आसाम आणि उत्तरप्रदेशातील मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपाच्या प्रतिमेवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, त्यामुळे सरकार ओमरच्या ऐवजी कन्हैयाला टार्गेट करून बळीचा बकरा बनवत होती. पण न्यायालयाच्या निर्णयाने सरकारच्या मनसुब्यांवर पाणी फेरले अशी चर्चा JNUमध्ये अथवा नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. - कन्हैयाला अटक करण्यामागे पूर्ववैमनस्याचा भाग ग्राह्य धरायचा म्हटला तर कन्हैया हा JNUमधला School of International Studies च्या African Study Centreला शिकणारा अजातशत्रू विद्यार्थी म्हणून त्याची पहिली इमेज समोर येते. ह्याच इमेजच्या आधारावर यंदाच्या JNUSUच्या निवडणुकीत AISFने फक्त एकच- अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि बहुमतांनी ती जागा निवडून आणली. कन्हैयाच्या अटकेनंतर ज्याप्रकारे भाजपाने आणि सरकारने विषय हाताळला त्याचा निषेध म्हणून ABVPच्या JNU युनिटच्या ३ पदाधिकाऱ्यांनी दिलेला राजीनामा खूप काही सांगून जातो. - कन्हैयाला अटक करण्यामागे भाजपा गोटात JNUतील मुक्त वातावरणाबद्दल, डाव्या विद्यार्थी चळवळीबद्दल असलेला आकसही दिसून येतो. अटकेनंतर आणि कोर्टाचा निर्णय यायच्या आधी ABVP आणि भाजपा गोटातून ज्याप्रकारच्या टिप्पण्या आल्या त्यातून त्यांचा रोख त्याच दिशेने होता. JNUच्या निमित्ताने माझ्याही मनात उठलेला एक प्रश्न मी प्रत्येकाला विचारून त्यांची मतं घेत होतो. “क्या यूनिवर्सिटी या किसीभी शैक्षणिक संस्थान में पढ़ते समय राजनीतिक मामलोंमे दखलंदाजी करना आपको सही लगता है?” जे.एन.यु.च्या प्रशासकीय ब्लॉकपासून पेरियार हॉस्टेलकडे पायवाटेने जाताना सोबतच्या एका विद्यार्थ्याला विचारलेला हा पहिला प्रश्न. त्यावर तो उद्गारला, “बेशक सर! शैक्षणिक जीवन में राजनीतिक घटनाओंपर सोचविचार होना, बहस होना-डिबेट होना बहुत जरुरी है; मैं यह कहूँगा की यह एक सक्रीय विद्यार्थी जीवन का अंग है |” मग मी त्याला प्रतिप्रश्न केला, “लेकिन राजनीती और पढाई दोनों तो अलग बातें है, आप इनका संबंध कैसे जोड़ सकते है?” यावर तो हसला आणि म्हणाला, “बहुत गहरा ताल्लुख है, अगर राजनीती कर रहे नेताओंने जरासी भी पढाई की होती तो इस बारके सालाना शिक्षा बजट में कटौती नहीं होती, फ़ेलोशिप बंद नहीं होती,” तोच पुढे बोलू लागला, “राजनीती कहां नही होती? घर हो या हॉस्टल, पोलिटिक्स तो हर जगह है ना... जैसे हम अपने परिवार को एकोनोमिक्स का सबसे छोटा युनिट समझते है, वैसेही युनिवर्सिटी राजनीतिक मामलो का स्मोलेस्ट युनिट समझ लिजीये.” एम.ए.च्या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या ह्या मित्राची राजकीय समज ऐकून एकुणात त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही बौद्धिक कुवतीचा अंदाज बांधला. पुढे सेन्ट्रल लायब्ररी समोरील मेसमध्ये School of International Relation मध्ये शिकणाऱ्या सौरभ, राशी आणि इरफान यांच्याशी रोहीथ वेम्युलासंदर्भातील ‘Justice for Rohith’ या आंदोलनाच्या भविष्याबाबत चर्चा झाली. सौरभ म्हणाला की, “JNU मधली आंदोलनं म्हणजे फक्त नारेबाजी नसते. Passive Resistance च्या नीतीने आंदोलनं केली जातात, त्याचाच एक भाग म्हणून रोहित वेम्युला ते कन्हैया कुमार प्रकरणात अधोरेखित झालेल्या ‘राष्ट्रवादा’वर JNUमधील जेष्ठ प्राध्यापक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांचा पाठ घेणार आहेत. यात जेष्ठ इतिहासकार रोमिला थापर, ई.एस.अच्युतानंद, जानकी नायर, निवेदिता मेनन इ. ‘राष्ट्रवाद’ या विषयावर खुला पाठ घेणार आहेत. मुळची चंडीगडची असलेली राशी सांगत होती की, “JNUच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर खुल्या पटांगणात ही सगळी व्याख्याने होतात, यात सर्वच विचारसरणीचे विद्यार्थी सहभागी होवून खुल्या चर्चेद्वारे विचारमंथन करतात.” School of Historical Studies मध्ये M. Phil. करणारा नील निर्दोष कुमार म्हटला की, “मी वैयक्तिक कुठल्याही विचारसरणीला बांधील नसलो तरी रोहित वेम्युला प्रकरणाबाबत मलाही तीव्र दुःख झाले आहे, आणि JNUच्या घोषणाबाजीचं प्रकरण ज्या पद्धतीने मिडिया आणि सरकारी पातळीवर हाताळलं जातंय ते निव्वळ जनतेची दिशाभूल करणारे आहे.” गेल्या सात दिवसांत झी न्यूज, एबीपी न्यूज, आज तक, टाईम्स नाऊ इ. वृत्तवाहिन्यांनी कुठलेही सत्यशोधन न करता सरळ सरळ “जे.एन.यू. बना आतंकियोंका अड्डा” अशी अविवेकी विधाने प्रसारित केलीत. हनुमनथप्पाच्या मृत्यूच्या घटनेचे जे.एन.यू. प्रकरणाला फैब्रिकेशन करण्यात आले. सत्यशोधनाच्या ऐवजी देशभक्तीच्या परीक्षा पाहणारे असंबद्ध प्रश्न विचारून JNU ची बाजू मांडणाऱ्यांची बोलती बंद कशी राहील या अजेंडाने मिडिया डिबेट्स घडवून आणल्या गेल्या. भारतात आपण कर भरतो म्हणून आपल्याला संविधानातील मुलभूत कर्तव्यांतून मुक्ती मिळाली आहे आणि संपूर्ण देश फक्त आपल्याच पैशावर चालतोय आणि आमच्या पैशांवर शिकणाऱ्यांनी फक्त चुपचाप शिकून घ्यावं, आम्ही उदार मनाने आरक्षण ह्या देशात ठेवलंय म्हणून आमच्या उपकारात राहावं, अशी भावना भारतातील जवळ जवळ ६० टक्के; सामाजिक-राजकीय आणि अर्थशास्त्राच्या जमजुतीत Lag असणाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. अर्थात यात दोष त्यांच्या मानसिकता, विचारसरणी अथवा बुद्धीचा नाही तर त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या गेलेल्या फैब्रीकेटेड माहितीचा. - जयंतकुमार सोनवणे

In reply to by कपिलमुनी

हा रिपोर्ट इथे टाकण्यब्दाल धन्यवाद! मलाच इथे टाकायच होता. पण बापाला बाप न म्हणणारे काही लोक इथे आहेत त्यामुळे उगाच श्रम नको वाटत होते. - तर्राट. असांसदिय श्बदांसाठी (असलेच तर) क्षमस्व.

In reply to by तर्राट जोकर

पण बापाला बाप न म्हणणारे काही लोक इथे आहेत त्यामुळे उगाच श्रम नको वाटत होते. .... असांसदिय श्बदांसाठी (असलेच तर) क्षमस्व.
त.जो. तुमच्या दृष्टीने हा (व्यापक) विषयाला इतरांच्या असंसदीयते बद्दल शंका असलेले कंगोरे आहेत असे वाटत असेल तर स्वतःच्या असंसदीयतेचे समर्थ कसे आणि नेमके काय साध्य करण्यासाठी. उपरोक्त रिपोर्ट मध्ये काही चांगल्या बाबी आहेत पण त्यास परिपुर्णतेचे सर्टीफिकेट कितपत देता येईल आणि त्यातल्या निसटत्या बाजूं विषयी मी लिहिण्यात आहेच तेव्हा सेल्फसर्टीफिकेशन्सपुर्वी धीर धरता आला तर पहावे.

In reply to by माहितगार

मी कुठेही समर्थन करत नाही. माझे प्रतिसाद असांसदिय वाटू शकतात हे मीच मान्य करत आहे. संपादक मंडळ आपली कार्यवाही करण्यास समर्थ आहे.

In reply to by कपिलमुनी

जयंतकुमार सोनवणे यांनी त्यांच्या समोर नरेटीव्ह जसा आला तसा तो त्यांनी मांडण्याचा प्रयत्न संयत आणि चांगला प्रयत्न केला आहे पण मुलतः त्या नरेटीव्ह मध्ये माझ्यादृष्टीने अपरिपूर्णता आहेत त्यांच्या नरेटीव्हच्या मर्यादा दाखवण्यापुर्वी माझ्या व्यक्तिगत निष्पक्षतेच्या दृष्टीने मला दिसणार्‍या भाजपा/अभाविप या साईडच्या मला जाणवणार्‍या काही मर्यादा नमुद करतो , भाजपा समर्थक सहमत होतीलच असे नाही. १) स्मृती इराणींच्या व्यक्तिगत शिक्षणावरची विरोधी पक्षाची टिका कितपत सयुक्तीक होती नव्हती हा मुद्दा जरा बाजूला ठेवला तरीही टिकेचा मौका विरोधकांना अपेक्षेपेक्षा लौकर मिळाला. म्हणजे सुरवात प्रभावीपणे होण्यात हकनाक अडथळा आला. -मला आधीही वाटले होते आणि आता अधिक वाटते कि सुषमा स्वराज ह्या परराष्ट्र खात्यापेक्षा ह्युमन रोसोर्स मध्ये उजव्या ठरल्या असत्या त्यांच्या करीअरचा विकास विद्यार्थी चळवळीतून असल्यामुळे त्यांना विद्यार्थी चळवळीची पल्स चटकन गवसली असती. २) गोष्टी डोळ्यात खुपताहेत लोकांचे त्या मिनीस्ट्रीतून अपॉईंट होणार्‍या लोकांवर विशेष लक्ष असणार आहे म्हटल्यावर, पुढच्या अपॉईंटमेंट करताना आपण अगदीच नजरेत येण्या इतपत घाई करू नये याची काळजी घ्यावयास हवी होती. ज्याचा फटका फिल्म आणि टेलिव्हीजन इन्स्टिट्यूटच्या प्रकरणात हकनाक नकारात्मक प्रसिद्धी होऊन झाला. ३) समस्या आली तर रिस्पॉन्स वेल आर्टीक्युलेटेड, डिप्लोमॅटीक, विरोधकांना कमितकमी संधी देतील असे, पॉलीटीकली करेक्ट असावयास हवेत. पण त्यांचे समर्थकही गुडघ्याला बाशिंग बांधून अपेक्षा ठेवतात नेतेही तसेच वागतात. अर्थात काही राजकीय शहाणपण सत्तेचा अनुभव आल्या शिवाय येत नाही. आदर्श ते जावयांचे व्यवसाय सगळ करून काँग्रेसी अधिक यशस्वीपणे नामा निराळे राहु शकतात त्या टॅक्ट्स -सगळ्याच इथे नमुद करता येणार नाहीत- भाजपाईंच्या अद्याप अंगवळणी पडल्या नाहीत. ४) भाजपा समर्थकांची वाचाळ विरता हि सुद्धा सातत्याने समस्या राहिली आहे. नमोंनी येती पाच वर्षे फक्त विकासाचेच बोलूया म्हटले की नेत्याचे ऐकायला हवे पण भाजपाईंचा उताविळपणा संपताना दिसत नाही. ५) रामदास आठवलेंच्या पक्षातून किवा इतरत्रचे अधिक दलित नेतृत्वास केंद्रात संधी दिली असती तर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात किमान टिकेची धार बोथट करण्यात हातभार लागला असता. वाजपेयी पंतप्रधान असताना पक्षाध्यक्षपदी दलित नेता राष्ट्रपती पद मुस्लिम आणि तेही स्वपक्षीयांना न दुखावता झाले. भारतीय राजकारणाचा समतोल पाळण्यासाठी जी समिकरणे पाळावी लागतात ती लागतात -योग्य की अयोग्य हा मुद्दा निराळा राजकारणात राजकारण सांभाळावे लागते - त्याकडे नमोंचे लक्ष गेलेच नसते असे नाही भारतातील प्रत्येक बातमीवर ते बारीक नजर ठेऊन असणार पण प्रत्यक्ष राजकीय व्यक्तिंच्या भेटी गाठींसाठी तुम्ही पुरेसे देशात उपलब्धही असावयास हवे. जम्मुकाश्मिरचे मुख्यमंत्री दिल्लीत दवाखान्यात असताना मोदींनी भेटीसाठी वेळ काढला होता का ? किंवा उद्धव ठाकरेंशी जमवून घेणे इतर एनडीए घटकांशी जमवून घेणे - याबाबत प्रणव मुखर्जींचे राष्ट्रपती निवडणूक लढवताना छोट्यात छोट्या विरोधी पक्षांचीही मते केवळ रिलेशन्सवर मिळवण्याचे यश उल्लेखनिय असावे- अशा बारीक सारिक गोष्टी साठी वेळ उरावयास हवा तो मोदींकडे उरत नाहीए किंवा कसे या बद्दल साशंकता वाटते.

In reply to by कपिलमुनी

केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने उच्चशिक्षणासाठी फेलोशिप बंद केल्याच्या विरोधात
सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आणि इतर सर्वसामान्यांच्या देशप्रेमात कितीसे अंतर असेल ? विशीष्ट तत्त्वज्ञानाने थोडा काळ भारावले जात असतील पण सोबतीला फेलोशिप्स हि दुखती रग असू शकेल. आणि डाव्यांना विद्यापिठांच्या बाहेर घालवण्याच्यादृष्टीने फेलोशिप कमी केल्या असतील तर रिझर्वेशन कटेगरितील विद्यार्थ्यांशी निगोशिएट करून फोड फाड करण्याच्या संपर्कासाठी दलित नेत्यांना सोबत घ्यावयास हवे इथे भाजपा राजकारणात कमी पडली असू शकते का ?

In reply to by कपिलमुनी

सरसकट संपूर्ण JNU ला एका रात्रीत ‘आतंकवादी’ जाहीर करण्यात आलं.
जर देश विरोधी घोषणा झाल्या हे वास्तव असेल आणि .. JNUच्या विद्यार्थ्यांना द्यावयास हवी होती भारतीय न्याय व्यवस्था कशी स्त्तरीय आहे - जर काही काश्मिरी स्वतःला धार्मिक कारणाने वेगळे समजत असतील तर त्यांच्या धर्मात नमुद न्याय पद्धती पेक्षा आजची भारतीय न्यायव्यवस्था कितीतरी पटीने सुसंस्कृत आहे त्रिस्तरीय आहे हे सांगता आले असते, ज्यांच्या विरुद्ध पुरावे सबळ नाही वाटले त्याच केस मधिल काही जणांची त्याच न्याय व्यवस्थेने मुक्तता केली त्या अर्थी भारतीय न्यायव्यवस्था चुकलेली नाही तर संसद एक लोकशाहीतील पवित्र जागा आहे त्याच्यावर सशस्त्र हल्ल्ल्याच्या कटात सहभागी होण्याबद्दल तुमची लाज वाटते, अशी हवी होती किंवा कसे. आणि हे सांगणे तेथिल प्राध्यापकांना जमावयास नको का ? प्राध्यापकांनी कुठल्यान कुठल्या विद्यापिठात/कॉलेजातले घोषणा देणारे काश्मिरी विद्यार्थी जिथले कुठले होते त्यांच्या भूमिकेतल्या त्रुटी त्यांना वेळीच म्हणजे कॉलेज मध्ये अ‍ॅडमिशन्स घेतल्या नंतर समजावून दिल्या असत्या तर आतंकवादी घोषणाही झाल्या नसत्या या अर्थाने दिल्लीतील प्राध्यापक मंडळी या प्रकारास नैतिक दृष्ट्या जबाबदार ठरत नाहीत का ? आणि मग त्यांच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित का केले जाऊ नये ?
त्याचवेळी तेथे आधीपासून उपस्थित असलेल्या ABVPच्या गटातून .... ,..... अशी घोषणाबाजी झाली.
अशी घोषणाबाजी करणे खरेच सयुक्तीक आहे का ? हा एक प्रश्न, - एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन होत नाही- टाळीची सुरवात अफजल गुरुच्या फाशीचे भांडवल करणारे नाटक आयोजीत करून वाजवली गेली, केवळ अकॅडेमिक डिस्कशन करायचे असेल तर १) बाहेरुन प्रसार माध्यमांना बोलवण्याची गरज नसते २) विद्यापिठाच्या बाहेर प्रसिद्धी देण्याची गरज नसते ३) विरुद्ध बाजूने देश विरोधी मुद्दे खोडणारा तिथे प्राध्यापक असून त्यास त्यात संधी असावयास हवी गंभीर विवाद्य मुद्दे असतील तर देशविरोधी मुद्दे खोडू शकणार्‍या प्राध्यापकांना असे नाटक वगैरे आधी दाखवले जावयास हवे. एकच बाजू आणि तिही जाणीवपुर्वक आंतरराष्ट्रीय गैर प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने देशविरोधी पद्धतीने मांडणे हा अकॅडेमिक फ्रिडमचा भाग होऊ शकतो का ? जवाहरलाल नेहरुंच्या नावाने असलेल्या विद्यापिठातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जावा का समविचारी फुटीरतावादी मंडळी गोळा करण्याचे कारस्थान व्हावे ? भारतीय न्यायव्यवस्था एवढी तकलादू नाही हे माहित असूनही भारतीय न्याययवस्थेस बदनाम करण्याचा घाट घालणे त्यात दिल्ली विद्यापिठाच्या प्राध्यापिकेची भूमिका असण्याची शक्यता आणि प्राध्यापकांनी न्याय व्यवस्थेस हकनाक बदनाम करून
अविवेकी पद्धतीने JNU बाबत वक्तव्ये होत होती
एकतर जयंतकुमार सोनवणे यांचे उपरोक्त वाक्य त्यांनी त्यांचे विशीष्ट चष्म्याचे मत आधीच बनवून घेतले असण्याचे द्योतक नाही का याची शंका वाटते. दुसरे JNU आणि इतर विद्यापिठातील देशहीताचे भान सुटलेले प्राध्यापक आणि तथाकथित विचारवंतांचा विवेक जागेवर राहू शकत नसेल आणि तर सर्वसामान्य जनतेकडून विवेकाची अपेक्षा कितपत रास्त ठरते अशी सुद्धा शंका वाटते.

In reply to by कपिलमुनी

कन्हैया हा JNUमधला School of International Studies च्या African Study Centreला शिकणारा ... विद्यार्थी
जर कन्हैय्या School of International Studies चा विद्यार्थि असेल आणि भविष्यात भारताला रिप्रेझेंट करावे लागू शकते अशी शक्यता असेल तर अशा विद्यार्थ्यांचे आणि त्या विभागातील त्याच्या प्राध्यापकांचे आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दलचे सामान्य ज्ञान चांगले असावयास हवे एखादी गोष्ट केवळ न्यायव्यवस्थेची केवळ खोटी बदनामी साठी होते आहे तर कायदा अभ्यासक युनिय्न उपाध्यक्ष त्याच्या साथिदार विद्यार्थीनीने त्यास सांगावयास हवी आणि अशी खोटी बदनामी भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खालवण्यासाठीही वापरली जाऊ शकते याची समज कन्हैय्या आणि त्याच्या विभागातील प्राध्यापकास असावयास हवी की नको. ज्या कार्यक्रमावर बंदी आणण्यासाठी अभाविपने प्रयत्न केले त्या एवजी खरेतर कन्हैय्यानेच पुढाकार घ्यावयास हवा होता तसा त्याने घेतला नसेल तर त्याच्या प्राध्यापकाचे प्राध्यापक कोण आहेत पाहून सगळ्यांच्याच डिग्र्या रद्दकरून आंतरराष्ट्रीय संबंधातील कंगोर्‍यांबद्दल त्यांची पुर्नशिकवणी घेतली जाण्याची गरज असू शकते का हे तपासण्यास वाव असावा असे वाटते.

In reply to by कपिलमुनी

भाजपा गोटात JNUतील मुक्त वातावरणाबद्दल, डाव्या विद्यार्थी चळवळीबद्दल असलेला आकसही दिसून येतो.
१) हे आकस एकतर्फी आहेत का ? तथाकथित डावी चळवळ - यांच्या चळवळीतून किती प्रकाश आमटे जन्मले हा वेगळ्या अभ्यासाचा विषय असेल - भाजपा आणि अभाविपचा राजकीय आकस बाळगते हे समजता येते, जी अकॅडेमिक स्वातंत्र्याच्या मर्यादा वक्तृत्वमंच शोधनिबंधादी अंतर्गत पर्यंतच असावी त्यात विद्यार्थ्यांच्या चुकीच्या दृष्टीकोणांचे खंडन करावे असे इथे संपते, ज्यावेळी बाहेरुन माध्यमांना आणि विद्यापिठा बाहेरच्या लोकांचा सहभाग येतो घोषणाबाजी होते तेथे अकॅडेमिक स्वातंत्र्य संपते आणि निव्वळ राजकारण चालू होते तेही राजकारण देश विरोधी घोषणांसाठी सहानुभूती ठेवणारे असेल डाव्यांच्या उजव्यांप्रती आकस देश विरोधी वातावरणाला खतपाणी घालणारा आहे का हे तपासले जावयास नको काय ? २) यातील अनेक डावे पॉलीटीकल सायन्सादी डिपार्टमेंटातून येतात त्यांनी काश्मिर मध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार्‍या शालेय पुस्तकांचा आतापर्यंत काय अभ्यास केला आहे ? त्यात काय काय सुधारणा करवल्या आहेत ? अतिरेकी भूमिका कशा चुकीच्या आहेत याबद्दल काश्मिरातील राजाकारणि समाजकारणी, शिक्षक मुल्ला मौलवी यांचे काय प्रबोधन केले आहे ? अशा स्वरुपाचे कार्य डाव्या प्राध्यापक आणि तथाकथीत विचारवंतांकडून झाल्या नसतील तर त्यातूनच काश्मिरींची वैचारीक बैठक कमकुवत राहीली, काश्मिरींच्या कृतीवर उजव्यांचे उजवेपण खुपणारे असेल पण डाव्यांनीही त्यांची देशाप्रती भूमिका पुरेशा प्रमाणात पारपाडली असे म्हणणे कठीण दिसते किंवा कसे.

In reply to by कपिलमुनी

सन १९६९ पासून आजपर्यंतच्या ५७ वर्षांच्या इतिहासात JNUSU वर नेहमीच डाव्या विचारसरणीच्या AISF- All India Students’ Federation, AISA- All India Students’ Union, SFI- Students’ Federation of India ह्या संघटनांचे वर्चस्व राहिले आहे. विद्यापीठात कॉंग्रेस प्रणीत NSUI- National Students’ Union of India आणि भाजपा प्रणीत ABVP- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचे नाममात्र अस्तित्व आहे.
विद्यार्थ्यांच्या बॅचेस वस्तुत तीन-चार वर्षात बदलून जात असतात, प्राध्यापक मंडळींच्या आशिर्वादाशिवाय एकच एक विचारसरणी दशकोंदशके कशी काय चालू शकते ? वर्षानुवर्षे कोणतीही एकच विचारसरणि चालण्यात प्राध्यापकांचा यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोल असेल तर ते विद्यार्थ्यांना सर्व विचारसरणींशी परिचय न करवता काही विशीष्ट विचारसरणिचाच प्रभाव पाडण्यात प्राध्यापक व्यस्त असतील तर त्यांच्या व्यक्तिगत राजकीय भूमिकांच्या प्रचारासाठी विद्यापिठाच्या सार्वजनिक मंचाचा गैर उपयोग प्राध्यापकांकडून होत नाहीए हे तपासले जावयास नको काय ? विद्यापिठातून केवळ काही विशीष्ट विचारसरणिच राबवावयाच्या असतील तर मदरसा, वेदपाठशाळा आणि विद्यापिठांमध्ये फरक तो काय राहीला ?