✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राजे - ७

श
श्रावण मोडक यांनी
Wed, 01/07/2009 - 20:03  ·  लेख
लेख

Book traversal links for राजे - ७

  • ‹ राजे - ६
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16631 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

व
विनायक पाचलग Wed, 01/07/2009 - 20:19 नवीन

लय भारी

एकच शब्द जबरदस्त फिरवुन फिरवुन मुळ पदावर लय भारी मानले आपल्याला काहितरी वेगळा शेवट असणार हे माहित होतेच पण इतका वेगळा असेल असे वाटले नव्हते. च्यामारी धरुन फट्याक्......(गाववाल्याकडून चोरलेला टोला) विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Wed, 01/07/2009 - 20:23 नवीन

झकास

श्रावणजी झकास! फर्मास!!मस्त!!! थोडक्यात या कथेचा कळसाध्याय लिहिताना आपण ज्या पद्धतीने लिहिलाय तो वेग, आवेग खरंच छान आहे! हॅट्स ऑफ टू यू!!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 01/07/2009 - 20:47 नवीन

अप्रतिम !!!

ही कथा आहे की सत्यघटना ?? खूपच अप्रतिम लिहिलं आहे श्रावणजी. लिहिण्याची स्टाईल, वेग कमी - जास्त करण्याची पद्धत सगळंच आवडलं पुलेखूशु :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 01/07/2009 - 21:22 नवीन

वाचताना वेगवेगळे भाव

पहिले काही भाग वाचताना व्यक्तिरेखेबद्दल कुतूहल, पुढील काही भाग वाचताना भ्रष्ट यंत्रणेबद्दल आचंभायुक्त राग/हळहळ, या भागात व्यक्ती/समाज तत्त्वज्ञानाबद्दल चिंतन... वाचताना भाव सारखे बदलत होते. तरी सुद्धा कथा ओघवती, एकसंध वाटली. राजेंची ओळख इतक्या सहज-कुशल शैलीने करून दिल्याबद्दल श्रावण मोडक यांचे आभार.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 01/07/2009 - 21:49 नवीन

सगळे भाग

सगळे भाग आवडले. कथेचा वेग चांगला ठेवला आहे. 'राजे' ह्या व्यक्तीचं शेवटपर्यंत कायकाय होतं हे सांगितल्यामुळे गोष्ट पूर्ण झाल्यासारखी वाटली. रेवती
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 01/07/2009 - 21:51 नवीन

अप्रतिम

काहीसा वेगळा पण अपेक्षित शेवट. कथेची एकंदर मांडणी सुंदर. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 01/07/2009 - 21:57 नवीन

छान. सर्व

छान. सर्व भाग आवडले. कथा सात भागात असूनही आपण भराभर भाग लिहिल्याने वाचताना सलगता राहिली. कथालेखक म्हणून तुमचा सहभाग चित्रकारासारखा वाटला. तुम्ही कथेतले पात्र बनुन फार ढवळाढवळ केली नाहीत. त्यामुळे राज्यांच्या स्वभाव-व्यक्तिमत्त्वावरचा झोत टिकून राहिला. पु ले शु -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 01/07/2009 - 21:57 नवीन

जबरदस्त!

जबरदस्त!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/07/2009 - 22:19 नवीन

बापरे!

खरंच ही सत्य घटना आहे का? कथा अशी वळण घेईल वाटलं नव्हतं. मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 01/07/2009 - 23:13 नवीन

राजे ही

राजे ही व्यक्तीरेखा, खरी असो वा खोटी आम्हाला पूर्ण कळेल असं तुम्ही लिहीलंत! हॅट्स ऑफ! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भिंगरि गुरुवार, 01/08/2009 - 00:07 नवीन

खुप आवडल!

खुप आवडल!
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 01/08/2009 - 01:39 नवीन

झकास!!!

झकास!!!
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ गुरुवार, 01/08/2009 - 02:11 नवीन

सुंदर

सगळे भाग सॉल्लीड झाले आहेत. खिळवून ठेवणारी ओघवती भाषा. श्रावण साहेब, तुम्ही ही दीर्घकथा बाहेर मासिकात वगैरे प्रसिद्ध करायला हवीत, म्हणजे उर्वरीत मराठी प्रेमी पण त्याचा आनंद घेऊ शकतील.
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/08/2009 - 02:56 नवीन

.

लैच्च भारी राव
  • Log in or register to post comments
व
वेदनयन गुरुवार, 01/08/2009 - 04:13 नवीन

अतिसुंदर!!!

शेवट हृदय पिळवटुन टाकणारा. पण तुमच्या लेखन शैलिला पुर्ण मार्क्स. विशेष म्हणजे "क्रमशः" खुप दिवस तुंबले नाही (रोशनी लिहिणारे बोध घेतिल ही अपे़क्षा).
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 01/08/2009 - 06:01 नवीन

वेगळीच कथा

आवडली. एकतर जास्त तटकळत ठेवले नाहीत त्याबद्दल मनःपुर्वक आभार. :-) कथेची एकंदर मांडणी सुंदर. असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान गुरुवार, 01/08/2009 - 06:04 नवीन

मस्त

गोष्ट खूप आवडली
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष गुरुवार, 01/08/2009 - 10:53 नवीन

भन्नाट...

लिहिलं आहे तुम्ही सर!
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 01/08/2009 - 12:20 नवीन

सातही

भाग आवडले, सारेच ओघवत्या शैलीत आले आहेत.'तो'ची (आंतरजालीय नव्हे :).) प्रसंगी आठवण करून देणार्‍या या वल्लीचे चित्र अगदी नेटकेपणे उतरले आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 01/08/2009 - 12:47 नवीन

आभार

सर्वांचे मनःपूर्वक आभार. ही घटना सत्य आहे का? अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे. कोणी प्रतिसादात, कोणी व्य. नि.ने. एकाने खरडवहीत. माझे उत्तर - "हा सारा प्रवास असा सत्य किंवा कल्पित असा कृष्ण-धवल सांगता येत नसतो. अनेकदा लेखक त्या सीमेवरून इकडे किंवा तिकडे जात असतो." यापलीकडे, राजे हे वास्तविक व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे हे कथन एका अर्थी वास्तववादी म्हणता येईल. पूर्ण वास्तविक नव्हे. त्याची कारणेही स्वाभाविक आहेत. काही घटना-प्रसंग, मूळ आशय तोच ठेवून, संदर्भचौकट बदलत येथे उतरली आहेत. विसुनानांनी विचारले आहे की, या घटना अनुभवल्या तेव्हा मी त्या प्रकाशात आणल्या का, त्याही नावानिशी? नाही. वैयक्तिक श्रावण मोडक यांनी घेतलेला अनुभव यापलीकडे, कोणत्याही मार्गाने त्या प्रकाशात आणण्यासाठी, कायद्याच्या कसोटीवर उतरणारा पुरावा नाही. त्यामुळे वृत्तपत्रीय लेखनाच्या किंवा तत्सम स्वरूपात हा भाग प्रकाशात आणता आलेला नाही. जेव्हा हे अनुभव घेतले तेव्हा स्टिंग ऑपरेशन हा प्रकार आपल्या येथे इतका आलेला नव्हता. त्यासाठी आवश्यक साधनस्रोतही माझ्याकडे नव्हते. एक पत्रकार म्हणून मी बघ्याची भूमिका घेतली इतके सत्य. मात्र, अशा काही प्रकरणात लाचखोरीच्या पलीकडे जाऊन प्रश्न उपस्थित करीत हे मुद्दे तडीला लावण्याचे प्रयत्न पत्रकार या भूमिकेतून केले होते. तेथे संमीश्र यशच पदरी पडले. आपल्या अ-क्षमतेची टोचणी लावून घेण्याच्या अनेक अनुभवातील हे काही अनुभव आहेत. सिस्टमवर कुरघोडी करण्याच्या (हे शब्द विसूनानांचे, अगदी नेमके) आपल्या सोसामुळे या माणसाने मला आकृष्ट करून घेतले होते. तो तसा का झपाटला गेला, यामागे सूडभावना होती का हे मला शेवटपर्यंत पूर्ण उमगले नाही. त्याच्या स्वप्नांचा विरस झाल्यामुळे तसे घडले का हा एकच प्रश्न मला छळतो आहे. या माणसाचा अंत मात्र खोलवर हादरवून गेला. अशा संवेदनशील माणसांना समाजात स्पेस असतच नाही का, आणि ती न मिळाल्याने ही माणसं असं काही करतात का हेही असेच छळणारे प्रश्न.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 01/08/2009 - 12:48 नवीन

सुंदर

सर्व लेखन अगदी वेळेत पुर्ण केलेत. राजे खरोखर राज्यासारखे जगले. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 01/08/2009 - 13:14 नवीन

आभारी आहे.

व्यक्तीचित्रण, मानसिक विश्लेषण आणि यंत्रणेला आधारभूत बनलेल्या भ्रष्टाचाराचा परामर्श या सर्वच बाबी अत्युत्कृष्ट उतरल्या आहेत. या कसदार 'व्यक्तीचित्र-लेख-कथा' लेखनाबद्दल लेखकाचे अभिनंदन आणि आभार.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक गुरुवार, 01/08/2009 - 13:18 नवीन

मस्त

सगळे भाग सॉल्लीड झाले आहेत. खिळवून ठेवणारी ओघवती भाषा. श्रावण साहेब, तुम्ही ही दीर्घकथा बाहेर मासिकात वगैरे प्रसिद्ध करायला हवीत, म्हणजे उर्वरीत मराठी प्रेमी पण त्याचा आनंद घेऊ शकतील. आपलि परवानगी मिळू शकेल ? .
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 01/08/2009 - 17:37 नवीन

जबराट

जबराट !!!!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/08/2009 - 18:13 नवीन

चाबूक

चाबूक! अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/08/2009 - 23:22 नवीन

श्रावण, सर्व लेखन पुन्हा एकदा संगतवार वाचले. अतिशय सुरेख आहे.

प्रस्थापित व्यवस्था, त्यातला भ्रष्टाचार, तो करणारे अधिकार पदावरचे लोक ह्या बाबी कितीही माहीत असल्या तरी प्रत्यक्ष आपल्या समोर अशा घटना घडणे आणि आपण त्याचे मूक साक्षीदार असणे हाच एक खचवून टाकणारा अनुभव आहे, तुमच्या बाबतीत तर जास्तीच तसा कारण एक पत्रकार म्हणूनही तुमचे काम आहे. तुम्ही म्हणता तसे स्टिंग ऑपरेशन त्या वेळी नसल्याने आणि मुळात तो तुमचा उद्देश नसल्याने तुम्हाला ह्या घटना वृत्तपत्रात पुराव्याने देणे शक्य नव्हते, त्याने तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला लागलेली टोचणी ह्यालेखनातून काही अंशी तरी कमी झाली असावी असे मला वाटते. 'राजे' ही एक व्यक्ती नसून संपूर्ण सिस्टिममधली एक छोटी बांडगुळासारखी उपव्यवस्था आहे असे वाटते. काही व्यक्तिगत कार्यात असफलता मिळाल्याने व्यवस्थेविरुद्ध काही अंशी सूड उगवायला टपलेल्या माणसाने व्यवस्थेत राहूनच व्यवस्थेशी एकप्रकारे बंड केल्यासारखे काही. राजेंच्या ह्या कामाच्या उर्जेचा स्त्रोत म्हणजे डीसीपी विपिनसारखी त्या व्यवस्थेतली काही चाके की जी त्या व्यवस्थेत आहेत पण शक्य तिथे योग्य गोष्टींची कदर करतात आणि तुमच्यासारखे पत्रकार मित्रही, जे हे सगळे अनुभवून केव्हातरी, कुठेतरी त्याला वाचा फोडण्यात महत्त्वाचा वाटा उचलू शकतात! राजेंच्या एकूण व्यक्तिमत्त्वाकडे पहाता एक अतिशय बुद्धिमान, संवेदनक्षम, तीव्र इच्छाशक्ती असलेला माणूस जो म्हटले तर संपूर्णपणे भ्रष्टाचाराच्या चिखलात स्वतःला रोवून एक मोठे धेंड स्वतःच होऊ शकला असता पण त्याचे सच्चेपण आणि मनातली सूडाची आग ह्यांच्या द्वंद्वात तो सतत होरपळत आणि हेलकावे खात असलेला दिसला! ह्या सगळ्या राड्यात घरापासून त्यांनी स्वतःला तोडून घेतले आहे हे हेतुपुर:सर आहे. कारण आपल्या रोजच्या जळण्याचा त्रास त्यांना घरच्यांना द्यायचा नाहीये! एकप्रकारे त्यांचा शेवट होण्याची दुसरी कोणती रीत माझ्यातरी नजरेत आली नाही कारण एकेककरुन व्यवस्थेतले ऊर्जा स्त्रोत विझल्यानंतर किंवा बाजूला टाकले जाऊन दूरस्थ झाल्यानंतर व्यवस्थेशी 'सामना' करताना त्यांची शोकांतिका स्वाभाविक आहे! अतिशय कसदार आणि जिवंत अनुभव देणार्‍या लेखनाबद्दल अभिनंदन! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 01/08/2009 - 23:31 नवीन

सुरेख!

श्रावणजी, लिखाणाचे सातही भाग सलग वाचले. कथा मस्त उतरली आहे.. तुमचे हार्दिक अभिनंदन! राजेंची कॅरेक्टर सुरेख रंगवली आहे.. तसेच लेखकाने पत्रकाराच्या त्रयस्थ भूमिकेतून केलेले निरिक्षणही झकास आहे. विशेषतः राजेंचं जीवनविषयक/ समाजविषयक तत्वज्ञान आणि त्या विचारांचं एका मध्यमवर्गीय (हा माझा आपला अंदाज!) पत्रकाराच्या विचारधारेबरोबर चाललेलं मंथन तुम्ही मस्त मांडलं आहे. जियो! असेच लिहीत रहा ही प्रार्थना!! आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 01/09/2009 - 00:27 नवीन

आभार

नव्या मंडळींचे आभार. अदिती, चाबूक उगारलेला नाही ना?:) चतुरंग, टोचणी कमी झाली असे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की बरेच हलके वाटले लिहून झाल्यानंतर. मोकळे वाटले. टोचणी म्हणाल तर तिचा संदर्भ राजेंशी कमी, व्यवस्थेशी अधिक. त्यामुळे ती कायम राहणार. तिच्यात मी तीव्र आणि कमी तीव्र असे करू शकत नाही. पिवळा डांबिस, तुमचा अंदाज बरोबर आहे. मध्यमवर्गीयच!!! बहुतेक पत्रकार याच कॅटगरीत मो़डतात. अलीकडे त्यात भारतीय मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग (आता तर यात श्रीमंतही येतात) असे दोन प्रकारही अनेकदा केले जातात, तो भाग वेगळा. तो प्रामुख्याने आर्थिक स्थितीशी संबंधित. बाकी सामाजिक स्तरावर मानसीकतेचा उगम भारतीय मध्यमवर्गातूनच. काही बाबींमध्ये 'डी-क्लास' होणं अवघडच दिसतंय थोडं. पण मी आपला मार्क्सवर विश्वास ठेवतो याबाबतीत. त्यानं म्हटलं होतं की, डी-क्लास होण्याची पहिली पायरी म्हणजे क्लास उमजून घेणं. मी ती पायरी गाठतोय असं म्हणूया.:)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 01/09/2009 - 16:54 नवीन

+++१

क्रमशः लेखन सुद्धा अगदी झटपट लिहीण्याची तुमची पद्धत आवडेच... पुर्ण लेखमाला अतीशय आवडली...राजे अगदी समोर उभे केलेत ... अजुनही उत्तमोत्तम लेखाची तुमच्या कडुन अपेक्षा आहे... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Fri, 01/09/2009 - 19:14 नवीन

आवडले

व्यक्तिचित्र आवडले. बाकी जे सांगायचे आहे ते इतर अनेक प्रतिसादात आले आहेच.. सोनाली
  • Log in or register to post comments
म
मोहन Mon, 01/12/2009 - 11:32 नवीन

जबरदस्त!

जबरदस्त! आणखी येवू द्या. मोहन
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 03/14/2009 - 18:08 नवीन

प्रतिक्रिया

अस ठरवल होत कि राजे निवांत वाचायच. वाचलं त बधिर होण्यासाठीच. श्रावण अत्यंत भावपुर्ण चित्रण . (घुसमटलेला) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/10/2016 - 00:32 नवीन

_/\_

श्रामो ग्रेट माणूस !!
  • Log in or register to post comments
R
Rahul D गुरुवार, 03/10/2016 - 01:20 नवीन

_^_

_^_
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Wed, 05/31/2017 - 18:29 नवीन

लेखमाला खुप आवडली. _/\_

लेखमाला खुप आवडली. _/\_
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Wed, 09/22/2021 - 23:56 नवीन

जबरदस्त!

जबरदस्त!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/23/2021 - 00:27 नवीन

वास्तवदर्शी व्यक्तिचित्रण

वास्तवदर्शी व्यक्तिचित्रण. __/\__. यानिमित्ताने स्व. श्रावण मोडक यांना आदरांजली. त्यांना जाऊन आठ वर्षे होऊन गेली :-(.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 09/23/2021 - 01:30 नवीन

नो वर्ड्स.. जस्ट सिंपली नो वर्ड्स.

स्व. श्रावण मोडक यांना भावपुर्वक आदरांजली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा