तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे.
२)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार.
३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व .
४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व.
५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान.
६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी.
७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे.
८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले.
९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव.
१०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व.
सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.
तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान.
मी या तिघींना भेटलो नाहीये...पण वर्णन वाचल्यावर त्या तिघींच्या चेहऱ्यावरचे भाव काय असतील ह्याचा विचार करतोय.
सनईचौघडा साहेब जीव मुठीत धरून सैरावैरा पळतायेत असं चित्र डोळ्यासमोर येतंय...
अजुन एक महत्वाचा तपशील ध्यानात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद!!
मी दिवसभर इथे मेगाबायटी प्रतिसाद टंकत असते ह्यावरुनच तुम्हाला कळायला हवं की मला नोकरी आहे.. चांगलं दणदणीत स्पीडचं इंटरनेट असणारी!!!! गृहीणींना एवढा वेळ मिळत नसतो.. खापर खापर खापर पणजोबा... ;)
पुढच्या वर्षभरात पुण्याला जौ नको.>>>>
पुण्यात ? हॅट कोण जातंय? कोणते पुणे? काय पुणे ?
च्यायला त्या पेशाव्यांनी पुणे राजधानी केली म्हणुन एवढी पुणेकरांची पोपटपंची नाही तर " ठाणे तिथे काय उणे" अशी म्हणच आहे. म्हणजे आमचे भाईच अस म्हणालेत ना.
पेशव्यांनी खरे तर ठाण्याला रविवार वाडा बांधायला पाहिजे होता. मग खाडीतुन समुद्रमार्गे खुप व्यापार करुन बक्कळ पैसा कमावला असता तर भारताचे किमान महाराष्ट्राचे तरी चित्र काहीसे वेगळे बघायला मिळाले असते. ते राहले बाजूला गेले तिकडे अटके पार झेंडा रोवायला गेले. काय गरज होती?
यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे
आणि
स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या
>>>>
मरेगा . भाई तू मरेगा . .
=]]
बर्याच लोकांना पाहिलेलं आहे तसे प्रत्यक्ष आणि फेबु वर,
बाकी काही ID
ग्यानोबाचे पैजार : ६० च्या पुढचे, धोतर , कापली टिळा, पांढरी बंडी, शांत व्यक्तिमत्व
पिरा : दामिनी मधल्या प्रतीक्षा लोणकर टाईप लुक
एस ओर्फ स्व्याप : ३५ शी दरम्यान कचकून स्थूल , टिपिकल आयटी पर्सन
संक्षी / विठा : ४५-५० च्या दरम्यान , उंच व्यक्तिमत्व, बर्यापैकी केस गेलेले , धारदार नाक, कदाचित चष्मा, घारे डोळे
आनंद मोरे : ४० च्या आसपास , मध्यम उंची, स्थूल , गौर वर्णीय :)
अजून आठवतील तसे लिहितो
मला चा मिळालाय. पुणेकरानी त्याचे फटु काढून ठेवलेत. तुझ्या मस्तानीचे काय ते तू बघ. आणि पिरा समोर आली की मी लगेच तिच्या बाजूला जाणार आहे. मला कै एवढ्यात मरायचं नाय.
मग काय तर.. एक तर मह्त्प्रयासाने आपला कंपु बनवायचं चाल्लय आपलं.. एका मस्तानी पाइ फुट पाडुन घेउ काय????
आणि स्रुजा लांब कॅनडात आहे असं समजु नकोस.. येतेच आहे ती.. ठार मारेल ठार!
जय देवी जय देवी जय पिरातै
आईस्क्रीम खायची तुला इतकी का घाई
जय देवी जय देवी || १||
मेगाबायटी प्रतिसादाने तु करिशी बोळवण
विठा , संक्षी,डांगे रोज काढती आठवण
जय देवी जय देवी... ||२||
वाढवले वय असता करिशी तणतण
दंबुक , तोफ उडवुन दे दणादण
जय देवी जय देवी....||३||
बाकीची पुरी करा रे कोणी तरी च्यायला तो अभ्या कुठे उलथला नेमका आत्ताच...
ये ये रे.. ये ये रे पम्या..
पुण्याला आणुन... दणके घालुन
पुजा बांधिन रे सोन्या....
ये ये रे.. ये ये रे पम्या.. || ध्रू ||
मेगा बायटी नसते बोळवण
मिपा ट्यार्पीची ठेव आठवण
अभ्यास वाढव चम्या
ये ये रे.. ये ये रे पम्या.. || १ ||
एज म्ह्णे असे जस्ट नंबर
तुक्का मारला तरी कमीचा मार
खुश होतील रे तर्ण्या!
ये ये रे.. ये ये रे पम्या.. || २ ||
रेवाक्का तरी आहे प्रेमळ
मी आणि स्रुजा भारी लाथाळ
सांभाळुन अस रे डोम्या
ये ये रे.. ये ये रे पम्या.. || ३ ||
(चाल :- जय देवी मंगळागौरी)
हे गृहस्थ साधारण पंचेचाळीशीचे, गोरे, घारे, नाकावर बायफोकल चष्मा आणि डाव्या बाजूचे केस उजव्या बाजूकडे चापून चोपून वळवून टक्कल झाकायचा प्रयत्न केलेला, "मराठी कवितेची सौंदर्य मिमांसा" ते "मोकाट कुत्र्यांच्या केकाटण्याचे जागतीक परिणाम " अशा कुठल्याही विषयावर व्याख्यान ठोकतील असे वाटतात.
बबन ताम्बेसाहेब, लै भारी इम्याजिनेशन !
आईशप्पत, मी येवडा भारी असेल हे बगुन मला गहिवरुन आले.
आता माझा हा फुटु मी आरश्यावर लावलाय अन त्यात भांग पाडल्या बिगर कामाला जात नाय.
(आमची धाव म्हण्जे भिंतीतला कोनाडा ते फारतर ओसरी पर्यंत ! पण माझी रेंज "मराठी कवितेची सौंदर्य मिमांसा" ते "मोकाट कुत्र्यांच्या केकाटण्याचे जागतीक परिणाम " ही बघुन कुठल्यातरी विद्यापिठाची डॉक्कटरेट मिळाल्या सारखं वाटलं!)
प्रतिक्रिया
महत्वाचं राहिलं.
अगं पिरातै बरोबर ओळखलेस हो १७
हो का? १.७५ नको का? मानसिक वय
धावा धावा संपादक ओ संपादक
महायुद्धाची पहिली ठिणगी अजून
महालोल धागा...घरी जौन टंकतो..
स्रुजातै , रेवतीआक्का ,
अजुन एक महत्वाचा तपशील
१) अजया - पन्नाशीच्या जवळपास
त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी
दोन वेण्या आणि एक फुलाची वेणी
=))
केव्हा भेटतेस ग ताई
शिक्रेट कट्टा करूया
वोक्कै
पैसा ताई एकता कपुर स्टाईल
=))
हम हे ना
बघ तु बस डायलॉग सुरु कर..
कवडे लोवे यु ;)
प्राडॉ-
जेप्या, हे कोणत्या पंच्यागात
त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी ?
दोन वेण्या आणि एक फुलाची वेणी
हाहाहा!
अजया - पन्नाशीच्या जवळपास
तुला "गेलो " म्हणायच का
पिव्डे मराठी कधी शिकणार गो तू
ह ह पु वा अरे काय हे माझ्या
शांत तोफची मिपाकरीण शांत
पम्या तू मेलास आता
पुढच्या वर्षभरात पुण्याला जौ
पम्याभाऊ, पेशवे तुमच्याकडून
यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या
बर्याच लोकांना पाहिलेलं आहे
स्पावड्या....
"स्थूल" काय, "गीता पे हाथ
जाता ना तुला बरोबर घेवुन
हिहिहि
मग काय तर.. एक तर
ठार हा शब्द मवाळ वाटत नाहिये
नाऊ दॅट आय थिंक अबाऊट इट....
अवखळ??????? मी पन्नशीची
मस्तानी चालेले कै.
जय देवी जय देवी जय पिरातै
ये ये रे.. ये ये रे पम्या..
ऐकत नाही हा तै तु. लै भारी
याला ये गो ये ये मैना पिंजरा
वात्रट मेली. एवढी छान देवीची
चौथा कोनाडा..
बबन ताम्बेसाहेब, लै भारी
Pagination